Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2707

राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली तशी उद्या देशातही होऊ शकते; काँग्रेस नेत्याचे महत्वाचे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गेल्या अडीत वर्षापासून महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याबाबत भाजप नेत्यांकडून बोलत आहेत. अशात काँग्रेसच्या एका नेत्याने आता महाविकास आघाडी सरकार राज्यात नव्हे तर देशात होऊ शकते, असे महत्वाचे विधान केले आहे. “राज्यात जशी युती झाली आणि महाविकास आघाडी स्थापन झाली, असेच चित्र देशात दिसण्याची शक्यता आहे. तसेच राहुल गांधी देशातल्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करू शकतात, असे काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी म्हंटले आहे.

काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात ज्या प्रमाणे महाविकास आघाडी झाली आहे. त्याचप्रमाणे आज ना उद्या देशातही महविकास आघाडी होऊ शकते. आणि ती जर झाल्यास त्या आघाडीचे नेतृत्व हे राहुल गांधी करतील. त्याचप्रमाणे प्रथम आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत, काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यानी त्या तयारीला लागावे, असे देशमुख यांनी म्हंटले.

गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकताच उत्तर प्रदेशचा दौरा केला. यावेळी त्या ठिकाणी त्यांनी शिवसेना देशातही दिल्लीत जाऊन पोहचेल असे म्हंटले होते. दिल्लीतही आपण सत्ता स्थापन करू, असे ठाकरे यांनी विधान केले होते. त्यांच्या नंतर आता काँग्रेस नेते तथा मंत्री अमित देशमुख यांनी काँग्रेसबाबत आणि राहुल गांधीबाबत मोठे विधान केले आहे.

Sovereign Gold Bond : स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी आता फक्त 4 दिवसच शिल्लक

Digital Gold

नवी दिल्ली । केंद्र सरकार पुन्हा एकदा सर्वसामान्यांना आणि गुंतवणूकदारांना स्वस्तात सोने विकत आहे. सोव्हरेन गोल्ड बाँडची खरेदी, वर्षातील शेवटची सिरीज, सोमवार 28 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे, जी 4 मार्च रोजी बंद होईल. अशा परिस्थितीत तुमच्याकडे आता स्वस्तात सोने खरेदी करण्यासाठी फक्त चारच दिवस शिल्लक आहेत. यावेळी एक ग्रॅम सोन्याची किंमत 5,109 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये ऑनलाइन पेमेंट करण्यावर 50 रुपयांची सूट देखील असेल, म्हणजेच तुम्हाला 5059 रुपये भरावे लागतील, त्यामुळे तुमच्यासाठी आणि गुंतवणूकदारांसाठी चांगली संधी आहे.

सरकारने जारी केलेल्या सोव्हरेन गोल्ड बाँडच्या सब्सक्रिप्शनमध्ये, गुंतवणूकदाराला फिजिकल स्वरूपात सोने मिळत नाही. मात्र, हे सोने फिजिकल गोल्डपेक्षा सुरक्षित आहे. सध्या बाजारात प्रति 1 ग्रॅम सोन्याचा दर 5100 रुपयांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार तुम्हाला स्वस्तात सोने विकत आहे.

सोने कसे खरेदी करावे ? : तुम्ही हे सोव्हरेन गोल्ड बाँड NSE, BSE सारख्या मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंजमधून खरेदी करू शकता. याशिवाय, तुमची स्वतःची बँक, सार्वजनिक क्षेत्रातील किंवा खाजगी बँका देखील गोल्ड बाँड खरेदी करण्याचा पर्याय देतात. हे स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SHCIL) आणि पोस्ट ऑफिसमधून देखील खरेदी केले जाऊ शकते. ते स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकांकडून विकले जात नाही.

किती व्याज मिळेल ? : सोव्हरेन गोल्ड बाँड योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 8 वर्षांचा असेल. पुढील व्याज भरण्याच्या तारखेला 5 वर्षांनंतर बाँडमधून गुंतवणूक काढून घेण्याचा पर्याय देखील असेल. यामध्ये तुम्ही 1 ग्रॅम सोने खरेदी करून गुंतवणूक करू शकता. या अंकावर वार्षिक 2.5 टक्के दराने व्याज मिळेल. हे व्याज दर 6 महिन्यांनी तुमच्या खात्यात जमा केले जाईल.

टॅक्स सूट उपलब्ध आहे : त्याच्या विक्रीतून झालेल्या नफ्यावर इन्कम टॅक्स नियमांतर्गत सूट देऊन आणखी बरेच फायदे मिळतील. 2021-22 या आर्थिक वर्षातील सरकारच्या गोल्ड बाँड मध्ये गुंतवणुकीचा हा चौथा भाग आहे. अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, मे ते सप्टेंबर दरम्यान सहा हप्त्यांमध्ये सोव्हरेन गोल्ड बाँड जारी केले जातील.

2015 मध्ये सुरू झाली योजना : सरकारने 2015 मध्ये ही योजना सुरू केली. सोव्हरेन गोल्ड बाँड हे सरकारी बाँड आहेत. हे फिजिकल गोल्डला पर्याय म्हणून लाँच केले गेले.

धक्कादायक ! पैशांसाठी सासरच्यांनी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड आणि….

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका 23 वर्षीय विवाहितेला तिच्या सासरच्या कुटुंबीयांनी फरसी पुसण्याचे अ‍ॅसिड पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यानंतर पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. पीडित तरुणीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढवा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

फिरदोस रेहान काझी असे पीडित महिलेचे नाव आहे. पोलिसांनी फिरदोस रेहान काझी या महिलेच्या तक्रारीवरून पती रेहान काझी, सासू नजमा काझी , नणंद गजाला काझी आणि हीना खान यांच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित महिला आणि आरोपी रेहान यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर फिरदोस आपल्या पतीसह हांडेवाडी परिसरात राहायला आली होती. याठिकाणी आरोपी पती रेहानने एक फ्लॅट विकत घेतला होता. मात्र या फ्लॅटसाठी फिरदोसने आपल्या माहेरून दोन लाख रुपये घेऊन यावेत, असे रेहानला वाटत होते.

यासाठी आरोपी रेहानने आपल्या पत्नीकडे पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. त्यासाठी तो पत्नी फिरदोसला सतत टोचून बोलणं, शिवीगाळ करणं अशाप्रकारे मानसिक त्रास देत होता. यानंतर याच कारणावरून सासू नजमा काझी, नणंद गजाला काझी आणि हीना खान यांनी पीडितेचा छळ करण्यास सुरुवात केली. यानंतर घटनेच्या दिवशी सासूने सतत सांगूनही पैसे आणत नसल्याच्या कारणातून पीडित फिरदोसला नणंदेंच्या मदतीने फरशी पुसण्याचं अ‍ॅसिड पाजले. यानंतर फिरदोसची प्रकृती खालावली. यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. यानंतर कोंढवा पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदवून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

करदात्यांना धक्का ! जुनी टॅक्स स्लॅब सिस्टीम संपुष्टात येऊ शकते, कोणतीही सूट मिळणार नाही

Share Market

नवी दिल्ली । सध्याची वाढती महागाई पाहता सरकार करदात्यांना मोठा झटका देण्याची तयारी करत आहे. जुनी टॅक्स सिस्टीम रद्द केली जाऊ शकते, ज्यामध्ये 70 प्रकारच्या सूट उपलब्ध आहेत. महसूल सचिव तरुण बजाज यांचे म्हणणे आहे की,”जुन्या टॅक्स सिस्टीमकडे करदात्यांचे आकर्षण कमी करण्याची गरज आहे. यामुळे आणखी लोकांना नवीन टॅक्स सिस्टीमचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल.”

2020 मध्ये नवीन टॅक्स सिस्टीम सुरू झाली. यामध्ये टॅक्स रेट कमी असला तरी डिडक्शनची सुविधा मात्र उपलब्ध नाही. सूट न मिळाल्यामुळे, करदात्यांनी या नवीन टॅक्स सिस्टीममध्ये स्वारस्य दाखवले नाही. बहुतेक करदात्यांनी आपले ITR जुन्या टॅक्स सिस्टीमनुसारच भरले आहेत.

2020-21 मध्ये आला नवीन टॅक्स स्लॅब
सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात नवीन टॅक्स सिस्टीम आणली होती. ही टॅक्स सिस्टीम अतिशय सोपी असल्याचे सांगण्यात आले. यामध्ये वैयक्तिक करदात्यांना टॅक्स रेट कमी आहे. मात्र, त्यांना स्टँडर्ड डिडक्शन आणि कलम 80C ची सुविधा मिळत नाही. स्टँडर्ड डिडक्शन आणि कलम 80C च्या सुविधेने टॅक्सचा बोझा कमी होतो.

5 लाखांवर टॅक्स नाही
नवीन टॅक्स सिस्टीम नुसार 5 ते 7.5 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या करदात्यांना 10 टक्के टॅक्स भरावा लागेल. जुन्या पद्धतीत या उत्पन्नावर 20 टक्के टॅक्स भरावा लागतो. मात्र, कलम 87A अंतर्गत उपलब्ध सवलतीमुळे, वार्षिक 5 लाखांपर्यंत कमाई करणार्‍या लोकांना नवीन किंवा जुन्या नियमांतर्गत कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.

8.5 लाखांच्या कमाईवर टॅक्स नाही
बजाज म्हणाले की,”पर्सनल इन्कम टॅक्स कमी करण्यासाठी सरकारने नवीन टॅक्स सिस्टीम आणली आहे. मात्र, फार कमी लोकांनी त्यात रस दाखवला आहे. याचे कारण असे आहे की, लोकांना वाटते एखाद्या सिस्टीममध्ये जर 50 रुपयांनीही कमी टॅक्स भरावा लागत असेल तर तीच सिस्टीम त्यांच्यासाठी योग्य आहे. देशातील 80C आणि स्टँडर्ड डिडक्शन वापरून 8-8.5 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.”

यामुळे लोकं नवीन स्लॅब निवडत नाहीत
यामुळेच लोकं नवीन सिस्टीम वापरू इच्छित नाहीत, असे ते म्हणाले. त्यामुळे जुन्या सिस्टीमचे आकर्षण कमी केल्याशिवाय नवीन सिस्टीम अंगीकारायला लोकं धजावणार नाहीत. जोपर्यंत आपण असे करत नाही तोपर्यंत आपला टॅक्स रेट कमी होऊ शकणार नाही.

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या महिन्यातच करावे ‘हे’ काम अन्यथा त्यांना ट्रेडिंग करता येणार नाही

Share Market

नवी दिल्ली । शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करणाऱ्यांना या महिन्याच्या आत आपले KYC अपडेट करावे लागेल. असे न केल्यास आपले डिमॅट खाते बंद केले जाईल. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी, लवकरात लवकर तुमचे डीमॅट खात्याचे KYC करा. यासाठीची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) ने जवळपास महिनाभरापूर्वी KYC बाबत ऍडव्हायझरी जारी केली होती. BSE वेबसाइटवर अपलोड केलेल्या या ऍडव्हायझरी नुसार, डीमॅट खात्यात KYC अपडेट करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 पर्यंत आहे. यासह, शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मुदत संपण्यापूर्वी आपले डीमॅट खाते KYC करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. असे न केल्यास 31 मार्च 2022 नंतर KYC नसलेली डीमॅट खाती बंद केली जातील.

कोणती माहिती देणे आवश्यक आहे?
KYC करण्यासाठी, डिमॅट खातेधारकांना 6 महत्त्वाची माहिती शेअर करावी लागेल. यामध्ये तुमचे नाव, पॅन कार्ड क्रमांक, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि इनकम रेंज यांचा समावेश आहे. जे गुंतवणूकदार कस्टोडियन सर्व्हिस वापरत आहेत, त्यांनी देखील कस्टोडियन डिटेल्स देणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती अंतिम मुदतीपर्यंत अपडेट न केल्यास, गुंतवणूकदाराचे एक्सचेंज ट्रेड अकाउंट देखील सस्पेंड केले जाईल.

KYC कसे करावे ?
डीमॅट खात्याच्या KYC अपडेटसाठी गुंतवणूकदार स्टॉक ब्रोकरशी संपर्क साधू शकतात. ते डिपॉझिटरी पार्टिसिपंटद्वारे KYC अपडेट देखील मिळवू शकतात. गुंतवणूकदारांना डिपॉझिटरीज आणि एक्सचेंजेसच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

लवासाबाबत आदित्य ठाकरेंनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी; आशिष शेलार यांनी मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  लवासा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ‘ही राष्ट्रीय संपत्तीची लूट असून यात पवार कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग असल्याबाबत गंभीर ताशेरे ओढले. हाच धागा पकडून भाजप आमदार आशिष शेलार यांनी याप्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे.

आशिष शेलार म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने लवासा बाबत काही निरीक्षणे नोंदवली. न्यायालयाचा हा निकाल, निष्कर्ष आणि निरीक्षणे राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी वाचली असतील, अशी अपेक्षा आहे. न्यायालय म्हणते की लवासमध्ये राजकीय मनमानी आहे, सत्तेचा दुरूपयोग आहे, प्रशासकी हलगर्जीपणा आहे. पवार कुटुंबीयांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच राष्ट्रीय संपत्तीची लूट आहे. या कामात पारदर्शकतेचा अभाव आहे.

लवासाची संकल्पना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आहे, व्यक्तीगत स्वारस्य खासदार सुप्रिया सुळे यांचे आहे तर कर्तव्य निभावताना हजगर्दीपणा म्हणून परवानग्यांमध्ये निष्काळजीपणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. शेतक-यांच्या जमिनींचे विषय अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे या विषयाकडे सरकारचे लक्ष आहे का, या विषयाशी संबंधित असलेले मंत्री आदित्य ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी अशी आमची मागणी आहे असे आशिष शेलार यांनी म्हंटल.

“कोणीही केला नसेल असा मूर्खपणा त्यांनी केलाय”; राज्यपालांच्या वक्तव्यप्रकरणी बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी समर्थ रामदास स्वामी यांच्याशिवाय शिवाजी महाराज यांना कोण विचारेल, असे वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याचा समाचार बच्चू कडू यांनी घेतला आहे. “एवढा मूर्खपणा कोणीही केला नसेल तसा मूर्खपणा त्यांनी केलेला आहे.’ त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्यपालांचा वाचन विचित्र पुस्तकाकडे गेले असेल पण आपण काय वाचतो आणि आपण काय बोलावं याचं भान ठेवलं पाहिजे,” अशी टीका कडू यांनी केली.

बच्चू कडू यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील राज्यपाल हे पद आहे ते खूप मोठ पद आहे. त्या पदाचा गरिमा राखणे महत्वाचा आहे. राज्यपालांनी तुलनात्मक बोलण अतिशय निंदनीय आहे. हे अतिशय निंदनीय आहे. ‘मला वाटतं एवढा मूर्खपणा कोणीही केला नसेल तसा मूर्खपणा त्यांनी केलेला आहे.’ त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. राज्यपालांचा वाचन विचित्र पुस्तकाकडे गेल असेल कदाचित. पण आपण काय वाचतो आणि आपण काय बोलावे याचे भान ठेवले पाहिजे.

यावेळी बच्चू कडू यांनी नवाब मलिक यांच्या अटक प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला. नवाब मलिक यांनी राजीनामा द्याचा काही विषयच नाही. ईडी हा शासकीय विषय नसून तो भाजपच्या कार्यालयातला एक भाग आहे. ईडीची कारवाई ही भाजपची कारवाई ही भारतीय जनता पक्षाची कारवाई आहे. त्यामुळे ती शासकीय कारवाई नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळणार या चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले मी भविष्यावर जात विश्वास ठेवत नाही, मी वर्तमानावावर विश्वास ठेवतो,” असे बच्चू कडे यांनी म्हंटले आहे.

लग्नाला काही दिवस शिल्लक असताना दोघे हॉटेलमध्ये आले आणि…

वसई : हॅलो महाराष्ट्र – मुंबई जवळील वसईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याठिकणी एका हॉटेलमध्ये एका तरुणीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला आहे. या तरुणीबरोबर एक तरुणसुद्धा आला होता. मात्र हा मृतदेह आढल्यानंतर हा तरुण बेपत्ता झाला आहे. धक्कादायक म्हणजे या दोघांचे लग्न ठरलेले होते. मात्र हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
वसई पश्चिम येथील स्टेटस हॉटेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या हॉटेलच्या एका रुममध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सायली शहाणे असे या मृत तरुणीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी सायली हि आपला मित्र सागर नाईक सोबत स्टेटस हॉटेलमध्ये आली होती. पण त्यानंतर संध्याकाळी सागर नाईक सायलीला हॉटेलमध्ये सोडून निघून गेला.

घटनेच्या दुसऱ्या दिवशी रूम मधून कोणीच बाहेर न आल्याने हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी रूम साफ करण्यासाठी सकाळी रुमचा दरवाजा वाजवला पण आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे हॉटेल मालकाने याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी हॉटेलमधून जाऊ रूमची पाहणी केली असता सायलीचा मृतदेह आढळून आला. मृत सायलीच्या मानेला आणि डोक्यावर जबर मार लागल्याचे निशाण आढळून आले आहे. मृत सायली आणि तिचा मित्र सागर नाईक हे दोघेही वसई येथील एव्हर शाइन या परिसरातील रहिवाशी होते. या दोघांचे काही दिवसांनी लग्न होणार होते. मात्र अचानक आज सायलीचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

अनाधिकृत बायोडिझेल अड्ड्यावर छापा; 57 लाखांचा माल जप्त

औरंगाबाद – पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय पथकाने सोलापूर-धुळे नवीन हायवे वरील गोलवाडी शिवारातील एका फार्म हाऊस मधील अनाधिकृत बायोडिझेल अड्ड्यावर रविवारी छापा मारला. या कारवाईत पथकाने कंटेनर, ट्रक, बायोडिझेल स जवळपास 57 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केले असून, मुख्य सूत्रधार कलीम कुरेशी यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कराडला मार्केट यार्डमध्ये धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा लाभ घ्यावा : पणनमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड परिसरात ऊसाचे उत्पन्न जास्त असले तरी आता शेतकऱ्यांचा सोयाबीन, गहू, ज्वारी, हरभरा असे पीक घेण्याकडे कल वाढत आहे. उत्पादित केलेल्या मालात कचरा, खडे असतील तर उत्पादित मालाला भाव कमी मिळतो. शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची निकड लक्षात घेऊन 5 मेट्रीक टन प्रतितास क्षमता असलेल्या धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणा कार्यन्वीत करण्यात आली आहे, याचा कराड परिसरातील शेतकरी व धान्य व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहकार, पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

कराड येथील मार्केट यार्डमध्ये धान्य चाळणी व प्रतवारी यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे सचिव रमेश शिंगटे, वसंतराव पाटील(बापू), लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील(काका), कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, चंद्रकांत हिंगमीरे, रेळेकर साहेब, माजी विभागीय उपायुक्त तानाजीराव साळुंखे, उपनिबंधक सहकारी संस्था कराड संदीप जाधव, कराड नगरपरिषदडचे विरोधीपक्षनेते सौरभ पाटील, अख्तर अंबेकरी, हेमंत ठक्कर, भाऊसाहेब शिंदे, माणिकराव पाटील, दाजी पवार, लालासाहेब पाटील, शिवाजी पवार, वैभव हिंगमीरे, देवेंद्रभाई संगोई, रवींद्र मुंढेकर, बजरंग पवार, प्रदीप पवार, जयवंत मोहिते, अनुज पाटील, संजय साळुंखे, बापूसो साळुंखे, संतोष पाटील, तुषार कदम, पिराजी पवार, संजय घोलप, पिनु जाधव तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी व वखार महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची स्थापना 1957 मध्ये करण्यात आली. याला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी गती दिली. वखार महामंडळाची 1 हजार 190 गोदामे आहेत. यामध्ये पनवेल व सांगोला येथे शितगृहे आहेत. सर्व गोदामांची साठवणूक क्षमता 21.83 लाख मे. टन इतकी आहे. या गोदामांमध्ये शेतकऱ्यांना राखीव जागा उपलब्ध करुन दिली जाते. महामंडळातर्फे शेतकऱ्यांना 7/12 उताऱ्यावर 50 टक्के साठवणूक आकारात सवलत दिली जाते. तसेच मालाची शास्त्रशुद्ध साठवणूक केली जाते व शंभर टक्के विमा संरक्षणाबरोबर 75 टक्क्यांपर्यंत अल्पदराने त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते.