Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2711

युक्रेनहून भारतीयांना परत आणण्याची मोहीम शिवसेनेने सुरु केली का?; नारायण राणेंचा राऊतांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या जोरात युद्ध सुरु आहे. युद्धाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान त्या ठिकाणी अडकलेल्या भारतीय विध्यार्थी आणि नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी “मिशन गंगा” राबविले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. यावरून भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी “पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल संजय राऊतांनी कधी चांगलं म्हटलं आहे का? युक्रेनहून इथे लोकांना आणण्याची ही मोहीम काय शिवसेनेनं सुरू केली का? हा माणूस शुद्धीत असतो का? अशी टीका केली.

नारायण राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, युक्रेनमध्ये अडकलेल्या विध्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने “मिशन गंगा” राबविले आहे. यासाठी चार मंत्र्यांची नेमणूक केलीये, मला इथे पाठवलं, लक्ष नाय काय म्हणता, या माणसाला टीका करण्याखेरीज काही काम नाही.

रशिया आणि युक्रेनमध्ये भारतीय अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी कार्यक्रम दिला गेला आहे. विमान लँड झाल्यानंतर विमानात जाऊन भेटलो, विद्यार्थी भयभीत झाले असून काही मुली घाबरल्या होत्या. त्यांचं स्वागत केलंय, त्यांचं मनोबल वाढवलंय, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आहे… पालकही भेटलेयत, बोलणं झालं, काय त्रास झाला सगळे सांगितले. त्यांना देशात पोहोचल्याचं समाधान आहे, असे नारायण राणेंनी त्यावेळी म्हंटले.

शिवछत्रपतींवरील ‘त्या’ विधानावर राज्यपालांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण; म्हणाले की….

bhagatsing koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका होत आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. ते जळगाव येथे बोलत होते.

कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत, मला जेवढे जानकारी आहे समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत म्हणून मी ते वक्तव्य केलं. इतिहासातील काही नवीन तथ्य मला काही लोकांनी सांगितले. त्या तथ्यानुसार मी पुढे पाहिल, असे पत्रकारांशी बोलताना कोश्यारी म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यपाल कोशारी यांच्या विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज्यपालांनी संपूर्ण महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तर राज्यपाल म्हणजे भाजपचे नव्याने नेमलेले शिवव्याख्याते आहेत असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता.

“छत्रपतींना प्राण पणाला लावावे लागले हा महाराष्ट्राचा अपमान”; चंद्रकांतदादांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी काल खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषण केले. सरकारच्या लेखी आश्वासनानंतर त्यांनी उपोषण सोडले. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मराठा आरक्षणासाठी छत्रपतींना आपले प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे,” अशी टीका पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ठाकरे सरकावर निशाणा साधला आहार. त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “छत्रपती संभाजी राजे यांनी मराठा समाजासाठी सुरू केलेले उपोषण मागे घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. छत्रपतींना आपले प्राण पणाला लावावे लागले ही महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. आता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर मविआ सरकार समाजाची फसवणूक करणार नाही, अशी आशा आहे.”

“भाजपाचा या उपोषणाला पूर्ण पाठिंबा होता. महाविकास आघाडी सरकारने हे उपोषण टाळण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही किंवा त्याची ताबडतोब दखलही घेतली नाही. अखेरीस छत्रपतींचे प्राण पणाला लागल्यावर या सरकारला जाग आली आणि त्यांनी काही मागण्या मान्य केल्या. तथापि, बारकाईने विचार केला तर जे काम या सरकारने करायलाच हवे होते आणि जे त्यांना सहजपणे करता आले असते. त्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांना प्राण पणाला लावावे लागले, असे दिसते.

डॉक्टर नालायक अन् लुटारू, ते मारायच्या लायकीचे; संभाजी भिडे पुन्हा बरळले

Sambhaji Bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत आपलं लक्ष वेधून घेत असतात. त्यातच आता त्यांनी डॉक्टरांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर हरामखोर आहेत असे विधान त्यांनी केले आहे. संभाजी भिडे यांनी यापूर्वी देखील कोरोना वरून वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

संभाजी भिडे म्हणाले, कोरोनात 105 टक्के लोक भीतीनेच मेले. जेवढा शिकलेला माणूस तेवढा तो गाढव. डॉक्टर नालायक आहेत, ते लुटारू आहेत. डॉक्टर …… खोर आहेत. डॉक्टर मारायच्या लायकीचे आहेत. त्यांच्याकडे कधीही जाऊ नका’, असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे डॉक्टरांमध्ये नाराजी असून डॉक्टरांच्या संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांनी या आधीदेखील कोरोनाबाधितांबाबत वक्तव्य केले होते. ज्यांना कोरोना होतोय, ते जगायच्या लायकीचे नसल्याचे भिडे यांनी म्हटले होते.

शहरातील 15 हजार पथविक्रेत्यांना देणार प्रमाणपत्र

औरंगाबाद – शहरातील 14 हजार 98 पथक विक्रेत्यांना लवकरच विक्रेता प्रमाणपत्र देण्याचे व उर्वरित पथविक्रेत्यांसाठी सर्वेक्षण सुरू ठेवण्याचा निर्णय अस्थायी शहर पथविक्रेता समितीने घेतला आहे.

पथविक्रेता उपजीविका संरक्षण व विनियमन कायदा 2014 लागू होऊन आठ वर्षे झाली. तरीही विक्रेता प्रमाणपत्र देण्यात आलेले नव्हते. स्मार्ट सिटी कार्यालयात मनपा अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी काल आयोजित केलेल्या अस्थायी पथविक्रेत्या समितीच्या बैठकीत पहिल्या अनलॉकच्या वेळी झालेल्या पंधरा दिवसांच्या सर्वेक्षणात आढळलेल्या 14 हजार 98 पथविक्रेत्यांना विक्रेता प्रमाणपत्र देण्यास मंजुरी देण्यात आली.

तसेच पथविक्रेता उपजीविका संरक्षण व विनियमन कायदा 2014 च्या कलम 27 व 33 प्रमाणे पोलीस व मनपा अतिक्रमण विरोधी पथकाला पथक विक्रेत्यांवर कारवाई करण्यास मज्जाव आहे. हे पथक पंचनामा न करता कायद्याचा भंग करून हातगाडी व सामान उचलून नेतात हे थांबले पाहिजे, असा आग्रह ॲड. अभय टाकसाळ यांनी धरला. यावेळी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन तर्फे राजू हिवराळे, शेख इसाक उपस्थित होते.

आई-वडिलांच्या मनाविरुद्ध प्रेमविवाह केला, पती दारुडा निघाल्याने सोडले सासर, अखेर…

rape

औरंगाबाद – आई-वडिलांचा विरोध पत्करून प्रेमविवाह केला. अवघ्या दोन वर्षांतच त्याने रंग दाखविण्यास सुरुवात केली. प्रचंड दारू पिऊन दररोज मारहाण करू लागला. हा जाच सहन होत नसल्यामुळे शेवटी दीड वर्षाच्या मुलाला घेऊन तिला घराबाहेर पडावे लागले. काही दिवस नातेवाइकांकडे काढल्यानंतर शेवटी शहर पोलिसांच्या ‘दामिनी’ पथकाकडे मदतीचा हात मागितला. दामिनी पथकानेही मदतीचा हात देत त्रासलेल्या युवतीची सेजल आधार निकेतन केंद्रात व्यवस्था केली.

वैजापूर तालुक्यातील 24 वर्षीय रुपालीने (नाव बदलले आहे) 2019 मध्ये आई-वडिलांच्या मनाविरुद्ध विवाह केला. यानंतर ती पतीसह शहरातील टाऊन हॉल परिसरात राहू लागली. दीड वर्षांपूर्वी मुलगा झाला. पती कामधंदा करीत नव्हता. त्याला दारूचे व्यसन लागले. तो दारू पिऊन रुपालीला मारहाण करीत असे. त्याच्या त्रासाला रुपालीसह तिच्या सासरचेही कंटाळले. शेवटी तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्याचाही काही परिणाम झाला नाही. रुपालीने 15 दिवसांपूर्वी दीड वर्षाच्या मुलाला सोबत घेत सासर साेडले. सासर सोडल्यानंतर कोठे जायचे, हा प्रश्न तिच्यापुढे होता. आई-वडिलांच्या मनाविरुद्ध विवाह केलेला असल्यामुळे माहेरीही जाऊ शकत नव्हती. काही दिवस विविध नातेवाइकांकडे राहून शेवटी तिने 26 फेब्रुवारीला सिटी चौक पोलीस ठाणे गाठले. त्या ठिकाणी सर्व आपबिती सांगितली. सिटी चौक पोलिसांनी हा प्रकार दामिनी पथकाला कळवला. ‘दामिनी’च्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, पोलीस नाईक निर्मला निंभोरे यांनी रुपालीची सर्वतोपरी मदत केली.

रुपालीला बनायचे पोलीस –
रुपालीची दामिनी पथकाने सेजल आधार निकेतन केंद्रात व्यवस्था केली आहे. ती ‘दामिनी’चे आभार मानते. जिवाचे काही तरी बरेवाईट करून घेतले असते; पण दीड वर्षांच्या मुलाकडे पाहून हा विचार सोडून आता पोलिसांत भरती व्हायचे असल्याचे तिने सांगितले. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक उमाप यांनी तिला स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसह इतर मदतही देण्याची तयारी दाखवली आहे.

धावत्या दुचाकीवर बिबट्याचा हल्ला; महिला जखमी

औरंगाबाद – धावत्या मोटरसायकलवर बिबट्याने हल्ला केल्याने एक महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील लाडगाव-कापूसवाडगाव रस्त्यावर घडली. मीना परशुराम मुठ्ठे (वय 45) असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव असून, सदर महिला ही कापूसवाडगाव येथील रहिवासी आहे.

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, मीना मुठ्ठे पति परशुराम मुठ्ठे व त्यांचा मुलगा रविवारी रात्री लाडगावहुन कापुसवाडगाव येथे आपल्या घरी मोटरसायकलने जात असताना कापुसवाडगावजवळ अंधारात झुडपात लपलेला बिबट्या मोटरसायकलच्या पाठीमागून धावत येऊन पाठीमागे बसलेल्या मिना यांचे हात जबड्यात धरल्याने मिना मोटरसायकल वरुन खाली पडल्या. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मीना यांनी जोरजोरात आरडाओरड केल्याने घटना स्थळावरुन बिबट्याने धूम ठोकली.

दरम्यान, जखमी झालेल्या मीना यांना पती परशुराम यांनी वैजापूर शहरातील दवाखान्यात उपचारासाठी भरती केले. या विषयी दवाखान्याचे डॉ. ईश्वर अग्रवाल यांनी सांगितले की जखम मोठी असल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाले असून मीना यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर विरगाव पोलिस व वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले असून रात्री उशीरापर्यन्त बिबट्याचा शोध सुरु होता.

कोरोना काळातही घरांची मागणी वाढली; ‘या’ शहरांमध्ये किमतीत 7 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली । गेल्या वर्षी प्रमुख शहरांमध्ये घरांची विक्री 13% वाढली आणि घरांच्या किंमती 3-7% वाढल्या. मात्र, या वाढीमागील एक प्रमुख कारण म्हणजे घराच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या सिमेंट आणि स्टीलसारख्या साहित्याच्या किंमतीत झालेली वाढ. सोमवारी एका इंडस्ट्री रिपोर्टमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे.

PropTiger.com च्या “रिअल इनसाइट रेसिडेन्शिअल – एन्युअल राऊंड-अप 2021” रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या 1,82,639 घरांच्या तुलनेत 2,05,936 घरे विकली गेली. 2021 च्या उत्तरार्धात कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाची घातक दुसरी लाट आल्यानंतर, इतर क्षेत्रांमध्ये रिकव्हरीसह हाउसिंग सेक्टरला चांगले दिवस परत आले आहेत.

टॉप 8 प्रमुख मार्केट्समध्ये अहमदाबाद टॉपवर
गेल्या वर्षी, भारतातील आठ प्रमुख हाउसिंग मार्केट्समध्ये 2,05,936 घरांची विक्री झाली, जी 2020 मधील एकूण विक्रीपेक्षा 13% जास्त आहे. अहमदाबाद आणि हैदराबादमध्ये मालमत्तेच्या किंमतीत सर्वाधिक वाढ दिसून आली. येथे 2021 मध्ये 7% वाढ झाली. बेंगळुरूमध्ये 6%, पुण्यात 3% आणि मुंबईत 4% पर्यंत किमती वाढल्या. चेन्नई, दिल्ली-एनसीआर आणि कोलकाता येथे घरांच्या किंमती 5% वाढल्या आहेत.

विक्रीच्या आकड्यांबद्दल बोलायचे झाले तर चेन्नईमध्ये घरांच्या विक्रीत 25% वाढ झाली आहे. 2020 मध्ये 10,452 युनिट्सच्या तुलनेत 2021 मध्ये 13,055 युनिट्सची विक्री झाली. दिल्ली-एनसीआरमध्ये केवळ 1 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 2020 मध्ये 17,789 युनिट्स आणि 2021 मध्ये 17,907 युनिट्स विकल्या गेल्या आहेत.

हैदराबादमध्ये 36% जास्त किंमतीत घरे विकली गेली
हैदराबादमध्ये विक्री खूप झाली आहे. येथे विक्री 16,400 वरून 22,239 युनिट्सपर्यंत वाढली असून 36% ची वाढ नोंदवली आहे. कोलकात्यात 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथे 9,061 च्या तुलनेत 9,896 घरांची विक्री झाली आहे. 2020 मध्ये 54,237 युनिट्सच्या तुलनेत महाराष्ट्रात घरांची विक्री 8% ने वाढून 58,556 युनिट्स झाली आहे. 2020 मध्ये 39,086 युनिट्सच्या तुलनेत 2021 मध्ये पुण्यात 42,425 युनिट्सची विक्री झाली.

“भाजपकडून सरकार पाडण्याच्या प्रयत्नानंतर आता नेत्यांच्या बदनामीची मोहीम हाती”; जयंत पाटील यांची घणाघाती टीका

Jayant Patil

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून ईडीच्या कारवाईवरून टीका केली जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते यांनाही अटक करण्यात आली आहे. सरकावर केल्या जात असलेल्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात होते. ते प्रयत्न फसल्यानंतर आता आघाडी सरकारमधील मंत्र्यांना, नेत्यांना बदनाम करण्याची मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. कन्सल्टंशीसारखे इडीचे आणि भाजपचे काम सुरु आहे, अशी टीका मंत्री पाटील यांनी केली.

कराड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने “राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत सांगायचे झाले तर एक प्रकारे ओढून ताणून मलिक यांना अडचणीत आणण्याचा ड्रयूष्टीने हे प्रकरण तयार करण्यात आलेले आहे.

राज्यपाल भगतसिह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जे वक्तव्य केले. त्याबाबत सांगायचे झाले तर रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते हा निर्णय न्यायलयाने दिला आहे. याबाबत वाद निर्माण करण्याची गरज नाही, असे मंत्री पाटील यांनी म्हंटले.

अखेर संभाजीराजेंचे उपोषण मागे; सरकारने मान्य केल्या मागण्या

Sambhaji Raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर आज राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संभाजी राजे यांची आझाद मैदानात भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य केल्याचं लेखी उत्तर दिलं. त्यानंतर संभाजीराजेंनी आपले उपोषण मागे घेतले.

संभाजीराजे म्हणाले, आरक्षण हा दीर्घकालीन लढा आहे. मला आनंदानं सांगायचंय की, ज्या मागण्या समोर ठेवल्या होत्या त्यातील काही मागण्या मान्य झाल्या आहेत. मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री वळसे पाटील, अमित देशमुख यांच्यासह इतर नेते इथे आले त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. मलासुद्धा वाचवलंत याबद्दलही आभार मानतो असे संभाजीराजे म्हणाले

राज्यसरकार इतकी तयारी करेल याची मला अपेक्षा नव्हती. मात्र, सरकारने जी तयारी केली ते पाहून भारावलो आहे. मराठा आरक्षणाचा प्रश सर्वोच्च न्यायालयात आहे हे माहित आहे. पण, जेथे जेथे माझी गरज बसेल तेथे राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करेन मी सुद्धा तुमच्यासोबत असेन, अशी ग्वाही संभाजीराजे यांनी यावेळी दिली.