Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2715

“मराठवाड्यातील भूमिपुत्र म्हणुन प्रलंबित कामांचा अनुशेष भरून काढणार” – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

मागील पाच वर्षात मराठवाड्यातील रस्ते कामांकडे फार दूर्लक्ष झाले असुन, मराठवाड्याला याकरीता निधीच उपलब्ध होत नव्हता. सुदैवाने ही संधी मराठवाड्याकडे आल्याने तसेच मराठवाड्याचा भूमिपुत्र म्हणून मराठवाड्यातील प्रलंबित कामाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

परभणी तालुक्यातील जांब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे लोकार्पण, जिल्हा परिषद शाळेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि नाबार्ड 36 अंतर्गत बाभूळगाव ते मांडाखळी ग्रामीण रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम 27 फेब्रुवारी घेण्यात आले यावेळी अशोक चव्हाण हे बोलत होते. यावेळी खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, डॉ. राहुल पाटील, बाबाजानी दुर्रानी, सुरेश देशमुख, राजेश विटेकर, तुकाराम रेंगे पाटील, सुरेश नागरे जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधीनी अधिक लक्ष देवून आपल्या मतदार संघातील जेवढ्या शाळा चांगल्या करता येतील तेवढ्या चांगल्या कराव्यात. याशाळा करीता निधी डिपीसी, आमदार निधी किंवा अन्य मार्गाने उपलब्ध करुन दिला पाहिजे. कारण मराठवाड्यामध्ये या गोष्टींची कमतरता आहे. रस्त्यांचे विषय आहेत. मला याठिकाणी सांगताना आनंद होत आहे, परभणी शहराकरीता 80 कोटी रुपयांचे रस्त्याकरीता मी आज मंजूरी देत असून त्याचे भूमिपूजन आज होत आहे. मागील पाच वर्षात मराठवाड्यातील रस्त्त्यांकडे फार दूर्लक्ष झाले होते.

मराठवाड्याला याकरीता निधीच उपलब्ध होत नव्हता. सुदैवाने ही संधी मराठवाड्याकडे आली आहे. यामुळे मराठवाड्यातील कोणताही प्रस्ताव आल्यास त्यास मंजूरी देण्याचे काम करीत आहे. अनेक वर्षापासूनचा जो आपला अनुशेष आहे तो पूर्ण झाला पाहिजे. हा अनुशेष दूर करुन जे महत्वाचे रस्ते आहेत, ते रस्ते अतिशय चांगल्या पध्दतीन करण्याचा प्रयत्न आपल्या करायचा आहे. मराठवाड्याच्या आठही जिल्ह्याला जेवढे झुकते माप देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी ते म्हणाले .

परभणी जिल्ह्यात 1 हजार 553 बुथवर 2 लाख बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

जिल्ह्यात लसीकरण मोहिमेचा विविध ठिकाणी शुभारंभ होऊन आरोग्य यंत्रणेमार्फत रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. सोनपेठ येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती निर्मलताई विटेकर यांच्या हस्ते बालकास पोलिओचा डोस देऊन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुभाष पवार, तालुका संपर्क अधिकारी डॉ व्ही आर पाटील, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

त्याचप्रमाणे सामान्य रुग्णालय परभणी येथे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आपली कन्या निश्वि सह लसीकरण सत्रास भेट देऊन मोहिमेचे औपचारिक उदघाटन केले याप्रसंगी समाज कल्याण आयुक्त गीता गुट्टे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते,डॉ प्रकाश डाके,डॉ कालिदास चौधरी, डॉ बी टी धुतमल, डॉ कल्याण कदम,डॉ किशोर सुरवसे, डॉ रावजी सोनवणे, माधव जाधव, श्रीमती बुरकुले, श्रीमती भालेराव, श्रीमती दास ई उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजलीताई गंगाप्रसाद आनेराव यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र पिंगळी येथे मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी सभापती आनेराव यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या लाभार्थ्यांची भेट घेऊन समस्या जाणून घेतल्या व संबंधीताना योग्य त्या सूचना केल्या याप्रसंगी सरपंच सुरेश गरुड, उपसरपंच प्रशांत धाबाले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते, लसीकरण अधिकारी डॉ रावजी सोनवणे, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ गणेश सिरसुलवार, डॉ मोबीन, डॉ चव्हाण, प्रसिद्धी प्रमुख कैलास सोमवंशी, तालुका पर्यवेक्षक शिंदे, आरोग्य कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान परभणी जिल्ह्यामध्ये ग्रामीण व शहरी भागामध्ये दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ८ ते संध्या. ५ पर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांकरिता पल्स पोलिओ लसीकरण मोहिम स्वरुपात राबविण्यात आली असु आजच्या दिवशी पोलिओ डोस पासून वंचित लाभार्थ्यांसाठी ता. १ ते ३ मार्च या काळात घरोघरी शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राहुल गिते यांनी सांगितले.

गांजे विकास सेवा सोसायटीवर आमदार शशिकांत शिंदे गटाचा दणदणीत विजय

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

नुकतीच जिल्ह्यातील विकास सेवा सोसायटींची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत अनेक राजकीय गटांनी बाजी मारली तर काही गटांना पराभव पत्करावा लागला. गांजे विकास सेवा सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे व माजी शिक्षण सभापती अमित (दादा) कदम यांच्या गटाने 11/0 ने दणदणीत विजयी मिळविला.

सोसायटी निवडणुकीत विजय झालेल्या सर्व उमेदवारांचे माथाडी कामगारांचे नेते ऋषिकांत शिंदे, उपसरपंच सुनिल दिवडे, सचिन करंजेकर, दिपक कदम, सोमनाथ कदम, महेश कदम , राम कदम , आनंदा शेलार आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सर्व विजयी उमेदवार यांनी भैरवनाथ मंदिरा मध्ये दर्शन घेतले असून मंदिराच्या परिसरामध्ये विजयी सभा घेतली.

यावेळी माजी आमदार सदाभाऊ सपकाळ म्हणाले, येणाऱ्या सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकाणमध्ये महाविकास आघाडीचीच सत्ता येण्यापासून कोणीही थांबाऊ शकत नाही. जावळीचा स्वाभिमान राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहावे.

यावेळी अमित कदम यांनी पैशाची मस्ती असलेल्या पुढाऱ्याची गांजे गावच्या मतदारांनी जागा दाखवून दिली आहे. हा विजय म्हणजे रयतेचे राज्य आणण्यासाठी असेल व जावलीचा स्वाभिमान राखण्यासाठी गांजे गावच्या ग्रामस्थांनी व मतदारांनी विजयी रुपी दाखवून दिला आहे, असे म्हंटले. यावेळी युवा नेते साधू चिकणे यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच विकास चिकणे यांनी सुत्रसंचालन केले व शंकर चिकणे यांनी आभार मानले.

राज्यपाल हे भाजपने नव्याने नेमलेले शिवव्याख्याते; संजय राऊत कडाडले

RAUT KOSHYARI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. राज्यपाल हे भाजपने नव्याने नेमलेले शिवव्याख्याते आहेत अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा जोरदार समाचार घेत भाजपने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी असे म्हंटल आहे. अशा प्रकारचे विधान दुसऱ्या कोणी केलं असत तर भाजपने आत्तापर्यत रस्त्यावर उतरून गोंधळ घातला असता कि आम्हीच कसे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार आहोत पण आता त्यांच्याच राज्यपालांनी असे वक्तव्य केल्याने राज्यातील जनतेमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे

राज्यपाल नेमकं काय म्हणाले
औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात गुरू- शिष्यांच्या नात्यामधील महत्त्व सांगताना राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात गुरुची परंपरा असून,ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते. समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार ?? चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते. तसेच, मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही असा दावाही राज्यपालांनी केला

Cryptocurrency Prices : क्रिप्टो मार्केटमध्ये घसरण, बिटकॉइन आणि इथेरियमची नवीन किंमत जाणून घ्या

Online fraud

नवी दिल्ली । सोमवारी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरणीचा कल होता. आज सकाळी 10:07 वाजता, ग्लोबल क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप 2.00% ने घसरून $1.71 ट्रिलियनवर आली. Bitcoin आणि Ethereum या दोन्ही मोठ्या करन्सी रेड मार्कवर ट्रेड करत होत्या.

गेल्या 24 तासांत, Bitcoin 2.08% खाली येऊन $37,852.88 वर तर Ethereum ची किंमत 3.73% ने घसरून $2,613.33 वर ट्रेडिंग करत आहे. बातमी लिहिण्याच्या वेळी, क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचे मार्केट वर्चस्व 41.9% होते, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 18.3% होते.

कोणत्या कॉईन्समध्ये वाढ झाली तर कोणते कॉईन्स घसरले ते जाणून घ्या
– Terra – LUNA – प्राइस: $70.80, घसरण : -3.85%
– Avalanche – प्राइस: $73.30, घसरण : -6.90%
– Cardano – ADA – प्राइस: $0.872, वाढ : +0.73%
– Solana – SOL – प्राइस: $86.49, घसरण : -0.83%
– Shiba Inu – प्राइस: $0.00002359, घसरण : -1.21%
– XRP – प्राइस: $0.7212, घसरण : -1.85%
– Dogecoin – DOGE – प्राइस: $0.123, घसरण : -1.59%
– BNB – प्राइस: $362.53, घसरण : -1.07%

सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सी
गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सी म्हणजे Trodl (TRO), OBRok Token (OBROK) आणि GoCryptoMe (GCME). Trodl (TRO) मध्ये 968.17% वाढ झाली आहे, तर OBRok Token (OBROK) ने देखील 501.23% ची वाढ नोंदवली आहे. याशिवाय, GoCryptoMe (GCME) मध्ये 263.97% ची वाढ झाली आहे.

“पुतीन यांच्याकडून माझ्या हत्येचे आदेश”; वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठ्या प्रमाणात युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे युक्रेन देखील रशियाला चोख प्रतित्युत्तर देताना दिसून येत आहे. दरम्यान युक्रेन- रशिया युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्म्हमहत्वाची बैठक बोलवली असून यात नाटो आणि युरोपियन देश सहभागी होणार आहे. अशात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मोठे विधान केले आहे. पुतीन यांच्याकडून माझ्या हत्येचे आदेश देण्यात आले असल्याचे झेलेस्की यांनी म्हंटले आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रशियाचे राष्ट्र अध्यक्ष पुतीन यांच्याकडून धमकी देण्यात आलेली आहे. माझ्या हत्येचे आदेश त्यांनी त्यांच्या सैनिकांना दिले आहेत. त्यामुळे युक्रेनसाठी आता चोवीस तास महत्वाचे आहेत, असे झेलेस्की यांनी विधान केले आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी क्रेमलिन येथे महत्वाची बैठक घेतली. त्या बैठकीला सुमारे 13 अब्जाधीश उपस्थित होते. पुतिन व्यावसायिकांशी बोलताना म्हणाले की, ‘जे घडत आहे तो आवश्यक उपाय आहे. आमच्यासाठी याशिवाय कोणतीही संधी उरली नाही. दरम्यान त्यांनी आता थेट झेलेस्की याच्या हत्येचे आदेश दिले असल्याने युक्रेनची चिंता अधिक वाढली आहे.

केंद्रीय मंत्र्याला दाखवणार काळे झेंडे – खा. इम्तियाज जलील

jalil

औरंगाबाद – खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा मुद्दा पुन्हा छेडला आहे. अलिकडेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री आवास योजनेची मर्यादा 2 वर्षांसाठी वाढवावी यासाठी पत्रव्यवहार केला होता. जिल्हा प्रशासनाने घरकुल बांधण्यासाठी विवादग्रस्त जागा दिली त्याठिकाणी डोंगर, उच्च विद्युत वाहिन्या, खदानी व अतिक्रमण असून प्रशासनाने गोरगरीब जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यानी केला. तसेच शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे गॅस पाईप लाईनची नाही.

आता 2 मार्च रोजी केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्री हरदीप सिंह पूरी औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर येणार आहे. यावेळी ते शहरात टाकण्यात येणाऱ्या गॅस पाईप लाईनचे उद्घाटन करणार आहे.

परंतु खासदार जलील यांनी काल घेतलेल्या आपल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांचा पक्ष घरकुल योजना संदर्भात हरदीप सिंह पुरी यांचा काळे झंडे दाखवून विरोध करणार आहे.

Gold Price : सोने-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचा सोन्याचा दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया-युक्रेनच्या संकटामुळे गुंतवणूकदार सोमवारी पुन्हा सुरक्षित आश्रयाला परतत सोन्यावर सट्टा लावत आहेत. त्यामुळे भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सकाळी सोन्याची फ्युचर्स किंमत 1.5% वाढून 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. त्यात 800 रुपयांनी जोरदार वाढ झाली. त्याचप्रमाणे, चांदीची फ्युचर्स किंमत देखील 1,000 रुपये किंवा सुमारे 1.5 टक्क्यांनी वाढून 65,869 किलोवर पोहोचली. जगभरातील वाढत्या महागाईमुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रशियावरील निर्बंधांमुळे जागतिक बाजारालाही धक्का बसला
युक्रेनवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ अमेरिका आणि युरोपीय देश रशियावर सातत्याने नवनवीन निर्बंध लादत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. सोन्याचा भाव 1 टक्क्यांनी वाढून $1,909.89 प्रति औंस झाला. चांदीचा भावही 1 टक्‍क्‍यांनी वाढून प्रति बॅरल 26 डॉलरच्या आसपास पोहोचला आहे.

शुक्रवारी भाव खाली आले
शेअर बाजारातील तेजीमुळे शुक्रवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. शुक्रवारी MCX वर सोन्याची फ्युचर्स किंमत 1.05 टक्के किंवा 553 रुपयांनी घसरून 51 हजारांच्या आसपास पोहोचली होती. चांदीचा भावही 1,105 रुपयांनी घसरून 65,793 रुपये प्रति किलो झाला.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,200 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,300 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,200 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,000 रुपये
पुणे – 47,100 रुपये
नागपूर – 46,950 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,280 रुपये
पुणे -51,300 रुपये
नागपूर – 51,200 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4644.00 Rs 4645.00 0.022 %⌃
8 GRAM Rs 37152 Rs 37160 0.022 %⌃
10 GRAM Rs 46440 Rs 46450 0.022 %⌃
100 GRAM Rs 464400 Rs 464500 0.022 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5064.00 Rs 5065.00 0.02 %⌃
8 GRAM Rs 40512 Rs 40520 0.02 %⌃
10 GRAM Rs 50640 Rs 50650 0.02 %⌃
100 GRAM Rs 506400 Rs 506500 0.02 %⌃

Stock Market : सेन्सेक्स 1,000 हून अधिक अंकांनी घसरला तर निफ्टीही कोसळला

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजाराने सोमवारी सर्व अंदाजांच्या विरोधात जोरदार घसरणीसह ट्रेड सुरू केले. सेन्सेक्स 1000 हून अधिक अंकांनी घसरला आणि नंतर 55 हजारांच्या खाली पोहोचला.

रशिया-युक्रेन युद्धामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास सोमवारी पुन्हा डळमळीत झाला आणि त्यांनी विक्री सुरू केली. सेन्सेक्स 530 अंकांच्या घसरणीसह 55,329 वर उघडला, तर निफ्टी 177 अंकांच्या घसरणीसह 16,481 वर उघडला.

10 मिनिटांत दुप्पट घसरण
बाजारात ट्रेडिंग सुरू होऊन 10 मिनिटेही उलटली नाहीत आणि विक्री वाढतच गेली. सकाळी 9.31 वाजता, सेन्सेक्स सुरुवातीच्या सत्रापासून दोनदा घसरला आणि 1,018 अंकांच्या घसरणीसह 54,840 वर ट्रेड करण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे निफ्टीही 290 अंकांनी घसरून 16,368 वर पोहोचला.

गुंतवणूकदार येथे सट्टेबाजी करत नाहीत
बीएसईवर मेटल वगळता इतर सर्व क्षेत्रांत घसरण दिसून येत आहे. ऑटो, बँक, एफएमसीजी, आयटी, रियल्टी, फार्मा आणि पीएसयू बँक सेक्टरमध्ये 1 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. फ्युचर्स ग्रुपचे शेअर्स 6 ते 15 टक्क्यांनी वाढताना दिसत आहेत.

दुसरीकडे, आशियाई बाजार काठावर उघडले
आशियाई बाजारातील बहुतांश शेअर बाजारांवर सोमवारी वाढीसह ट्रेडिंग सुरू झाला. सिंगापूरच्या एक्सचेंजमध्ये 0.36 टक्के आणि जपानच्या निक्केईमध्ये 0.40 टक्के वाढ दिसून येत आहे. याशिवाय, तैवानच्या बाजारात 0.33 टक्के आणि दक्षिण कोरियाच्या एक्सचेंजमध्ये 0.40 टक्के वाढीसह ट्रेडिंग होत आहे. भारतीय गुंतवणूकदारांना आशियाई बाजारांचा मोठा प्रभाव दिसतो.

समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? राज्यपालांचे वादग्रस्त वक्तव्य

Bhagatsing Koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थ रामदास स्वामी नसते तर शिवाजी महाराजांना कोणी विचारले असते ?? अस वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी केले आहे. औरंगाबादेत झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले आहे. राज्यपालांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

गुरू- शिष्यांच्या नात्यामधील महत्त्व सांगताना राज्यपाल म्हणाले, आपल्या देशात गुरुची परंपरा असून,ज्याला सद्गुरू मिळाला तो यशस्वी होतो. समर्थ नसते तर शिवाजी महाराजांचे स्थान काय असते. समर्थ रामदास नसते तर शिवाजी नसते, चाणक्य नसते तर सम्राट अशोक नसते, गुरुचे महत्त्व मोठे आहे”, असं कोश्यारी म्हणाले. मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचं मोठं योगदान असतं, तसंच आपल्या समाजात गुरूचं मोठं स्थान असतं असे कोशारी यांनी म्हंटल

ते पुढे म्हणाले, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असं शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचं सांगितलं. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो,” असं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.