Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2723

जिंतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थे वतीने 25 फेब्रुवारी रोजी जिंतूर शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे 160 किशोरवयीन मुलीसाठी ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला मुख्याध्यापिका शिक्षिका श्रीमती रेवता राऊत, श्रीमती एस एस पाटील, श्रीमती के जी अंभोरे, श्रीमती एस के कोकणे, श्रीमती एस ए बेग, श्रीमती जे एस लोखंडे, श्रीमती एस .आर . पाईकराव, शिक्षक शहेजाद खान, घुगे , शिंदे , सावळे , बाळू बुधवंत यावेळी 160 किशोरवयीन मुलींची उपस्थिती होती.

या कार्यक्रमात डॉ .सौ . आशा चांडक (मासिक पाळी समुपदेशन तज्ञ) यांनी उपस्थित किशोरवयीन मुलींना स्त्रियांचे आरोग्य, मासिक पाळी व्यवस्थापन, समज, गैरसमज, पाळीतील जननेंद्रियांची स्वच्छता, सॅनिटरी पॅड/सुती कापडाच्या घड्याचा वापर, त्याची योग्य विल्हेवाट, सोबत मासिक पाळीशी संबंधित विविध आरोग्य समस्या, पीसीओएस तसेच शाश्वत पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कप आदी विषयी मार्गदर्शन केले.

या समुपदेशन सत्रात 160 विद्यार्थिनींना एचएआरसी संस्थे तर्फे समुपदेशन करून मासिक पाळी व्यवस्थापन माहितीपत्रकाचे वाटप केले. शेवटी तितक्याच मुलींची 20 प्रश्नांची स्वयंअध्ययन चाचणी घेण्यात आली.

कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय जिंतूर व जिल्हा परिषद शाळा पांगरी येथील मुलींसाठी ‘मेन्स्ट्रुपेडिया’ या मासिक पाळी विषयक मराठी कॉमिक बुक चे इयत्ता नुसार वाटप करण्यात आले. “येत्या काळात शाश्वत पर्याय म्हणून एचएआरसी संस्थे तर्फे पॅड ऐवजी मेन्स्ट्रुअल कप वापरण्यासाठी इच्छुक गरजू किशोरवयीन मुलींना मोफत मेन्स्ट्रुअल कप चे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे ” संस्थेचे अध्यक्ष डॉ पवन चांडक म्हणाले.

कोणतेही शासकीय मदत किंवा मानधन न घेता समुपदेशन करणारी टीम: एचएआरसी संस्थेतील टीम सदस्य डॉ आशा चांडक या मासिक पाळी समुपदेशन उपक्रमात स्वतःच्या व्यस्त नियोजन सांभाळून शासनाकडून किंवा संबंधित संस्थेकडून कोणतेही मानधन किंवा प्रवास खर्च न घेता काम करत आहे. एचएआरसी संस्था सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करून लोकसहभागातून मागील 2019 पासून संपूर्ण जिल्ह्यात मासिक पाळी समुपदेशन चे कार्य करत आहे.

युक्रेनच्या मदतीला 28 देश; अमेरिकेनेही जाहीर केली मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, रशियाविरोधात आता युक्रेनच्या बाजूने जगातल्या इतर देशांनी एकजूट होताना पाहायला मिळत आहे. जगातील 28 देशांनी युक्रेन ला पाठिंबा दिला आहे. अमेरिकेनं देखील रशियाविरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रांची आणि फौजांची मदत करण्यास सुरुवात केली आहे.

युक्रेनची राजधानी कीवला रशियन सैन्याने वेढा दिल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. नॉर्थ अटलांटिक ट्रिटीतील देश आता युक्रेनच्या मदतीला धावत असून या देशांकडून मदत लागली आहे. नेदरलँडने युक्रेनला 200 अँटि-एअर क्षेपणास्त्रे दिली आहेत. दुसरीकडे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी “हे युद्ध आता दीर्घकाळ चालेल”, असा गंभीर इशारा दिला आहे.

अमेरिकेने युक्रेनला तत्काळ आर्थिक मदत जाहीर केली आहे. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार अमेिरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांना युक्रेनच्या सुरक्षा आणि संरक्षणासाठी तात्काळ $350 दशलक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. सीएनएनच्या वृत्तानुसार, जो बायडेन आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यातील चर्चेनंतर ही मदत जाहीर करण्यात आली आहे.

“राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची जीभ छाटा,” वादग्रस्त वक्तव्याविरोधात चित्रा वाघ आक्रमक

chitra wagh

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | अनेकवेळा नेत्यांकडून अगोदर वादग्रस्त विधाने केली जातात. नंतर त्यांना त्यांनी केलेल्या विधानावरून माफी मागावी लागते. अशाच प्रकार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृताफडणवीस यांच्या बद्दल केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यावरून घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे वादात सापडले आहे. त्यांनी मिसेस फडणवीस याच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावरून भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आक्रमक पावित्रा घेतला असून त्यांनी “अशोक गावडेची जीभ छाटा,” असे ट्विट करीत संताप व्यक्त केला आहे.

चित्रा वाघ यांनी आक्रम पावित्रा घेत आज एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे कि, देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अशोक गावडेची जीभ छाटा, राष्ट्रवादीचा नवी मुंबईचा हा हरामखोर जिल्हाध्यक्ष….कुठल्या मस्तीतं आहे. अमृता फडणवीस यांचा ज्या निचमनोवृत्तीने उल्लेख याने केला हे राष्ट्रवादीला मान्य आहे का? आणि यात कुणालाही महिलांचा अपमान विनयभंग दिसत नाही? त्यामुळे अशा प्रकारे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यावर नवी मुंबई पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मालिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात आंदोलन चालू होते. त्यावेळी नवी मुंबईतील महाविकास आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यात काँग्रेसचे अनिल कौशिक, शिवसेनेचे विठ्ठल मोरे, यांची देखील भाषणे झाली. त्याचवेळी अशोक गावडे हे भाषण करत असताना त्यांची जीभ घसरली.

अशोक गावडे यांनी काय केले होते वक्तव्य?

“आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते” असे वादग्रस्त आणि आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असे सांगत त्यांनी अक्कलही काढली. या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

परभणी जिल्ह्यात रविवारी 2 लाख 11 हजार बालकांसाठी पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन !

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

जिल्ह्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकांना पोलिओ लसीकरण करण्यासाठी रविवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकाला पोलिओ बुथवर नेऊन पोलिओ लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

जिल्हात रविवारी आयोजीत या मोहिमेत 0 ते 5 वर्ष वयोगटातील 2 लाख 11 हजार 432 बालकांना लस देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात एकुण 1 हजार 553 बुथ स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच 128 मोबाईल टीम आणि 393 ट्राझिंट टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी 4 हजार 093 मनुष्यबळ मोहिमेसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

जिल्ह्यात एकही बालक पोलिओ लसीकरणांपासुन वंचित राहू नये यासाठी 27 फेब्रुवारी रोजी आयोजित पल्स पोलिओ मोहिमेतून वंचित राहिलेल्या बालकांना लस देण्यासाठी ग्रामीण भागात 1 ते 8 मार्च तर शहरी भागात 1 ते 5 मार्च या कालावधीत पुन्हा मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या बालकांचे पल्स पोलिओची लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.

पोस्ट ऑफिस की SBI? कोणत्या FD मध्ये पैसे गुंतवावे ?

PMSBY

नवी दिल्ली । आजही, जेव्हा गुंतवणुकीचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोकं FD म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट्सची शिफारस करतात. गुंतवणुकीच्या दृष्टीने FD हा उत्तम पर्याय मानला जातो, ज्यामध्ये रिटर्नची गॅरेंटी असते. यामध्ये बचत खात्यापेक्षा जास्त रिटर्न मिळतो. देशातील अनेक लहान-मोठ्या बँका FD करण्याची सुविधा देतात. याशिवाय पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमची सुविधा देखील देते. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट बँक FD प्रमाणेच असतात.

SBI FD रेट
देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या वेगवेगळ्या कालावधीसाठी FD ऑफर करत आहे. अलीकडेच SBI ने 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी FD वर व्याजदर वाढवले ​​आहेत.

SBI ने 2-3 वर्षांसाठी 5.10 टक्क्यांवरून 5.20 टक्के व्याजदर वाढवले ​​आहेत. त्याच वेळी, 2-5 वर्षांच्या FD वरील दर 15 बे पॉईंट्सनी 5.45 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. 5-10 वर्षांच्या मुदतीच्या FD साठी व्याजदर 5.50 टक्के करण्यात आले आहेत. बँकेचे सुधारित व्याजदर 15 फेब्रुवारी 2022 पासून लागू होणार आहेत.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट अकाउंट
त्याच वेळी, पोस्ट ऑफिस 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी फिक्स्ड डिपॉझिट ऑफर करतात. बँक FD प्रमाणे, गुंतवणूकदारांना पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममधून गॅरेंटेड रिटर्न मिळू शकतो.
1 वर्ष – 5.50 टक्के
2 वर्षे – 5.50 टक्के
3 वर्षे – 5.50 टक्के
5 वर्षे – 6.70 टक्के

सरकार 28 फेब्रुवारीपासून देत ​​आहे स्वस्तात सोने खरेदीची संधी; जाणून घ्या गुंतवणूक कशी करावी

Sovereign Gold Bond

नवी दिल्ली । जगातील सर्वात सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी तुम्हीही शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकार तुम्हाला 28 फेब्रुवारी 2022 पासून स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी देणार आहे. वास्तविक, सरकार फेब्रुवारी 2022 च्या शेवटच्या दिवशी सॉव्हरेन गोल्ड बाँडचा 10वा हप्ता जारी करेल. यासाठी इश्यूची किंमत 5,109 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे.

जर तुम्हालाही त्यात पैसे गुंतवून नफा मिळवायचा असेल, तर तुम्ही सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेच्या 10व्या मालिकेसाठी 28 फेब्रुवारीपासून म्हणजेच सोमवारपासून अर्ज करू शकता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने सांगितले की, गुंतवणूकदार 4 मार्च 2022 पर्यंत सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेच्या 2021-22 च्या 10 व्या हप्त्यासाठी अर्ज करू शकतात.

इश्यू किंमतीत सूट कोणाला मिळेल ?
रिझव्‍‌र्ह बँकेने सांगितले की,”पाच दिवसांसाठी सुरू असलेल्या SGB योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपये (SGB वर सूट) सवलत दिली जाईल. त्यांना डिजिटल पेमेंट करावे लागेल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ऑनलाइन अर्ज करणार्‍यांना SGB योजनेच्या 10 व्या मालिकेअंतर्गत 5,059 रुपये प्रति ग्रॅम इश्यूची किंमत मिळेल.

आपण कोठून खरेदी करू शकता ?
RBI भारत सरकारच्या वतीने SGB चा 10 वा हप्ता जारी करेल. हे बॉण्ड्स सर्व बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), पोस्ट ऑफिस आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मार्फत विकले जातील. ते स्मॉल फायनान्स बँक आणि पेमेंट बँकांमध्ये विकले जात नाहीत.

कोण किती गुंतवणूक करू शकतो ?
सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेत, एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त 4 किलो सोन्याचे बॉण्ड्स (SGB मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक) खरेदी करू शकते. त्याच वेळी, किमान गुंतवणूक (SGB मध्ये किमान गुंतवणूक) एक ग्रॅम असावी. ट्रस्ट किंवा तत्सम संस्था एका आर्थिक वर्षात 20 किलोपर्यंतचे बॉण्ड्स खरेदी करू शकतात.

अमित शहांमुळेच मुंबई महापालिका शिवसेनेसाठी सोडली- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील वाद हा विकोपाला गेला आहे. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. गत मुंबई महापालिका निवडणुकीत अमित शहा यांच्या मुळेच शिवसेनेसाठी सत्ता सोडली होती अस त्यांनी म्हंटल आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, अमितभाईंनी सांगितले म्हणून मुंबई महापालिकेची सत्ता ही शिवसेनेकडे दिली. अन्यथा मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ८४ आणि भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले होते. दोन सहा नगरसेवक हे सहज इथे तिथे गेले असते. पण आम्ही उपमहापौरही दिला नाही, ना स्थायी समिती किंवा कोणत्याच समितीची मागणी केली नाही.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारने गांधी पुतळ्याजवळ केलेल्या आंदोलनावर आक्षेप घेतला. मराठा आंदोलक असो की ओबीसी आंदोलक यांना मंत्रालयाच्या परिसरात फिरकू दिले जात नाही. त्यांना नियम आणि कायदे दाखवले जातात. मग मंत्र्यांनी मंत्रालयासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलने कशी केली? त्यांना नियम आणि कायदे लागू होत नाही का? असा सवाल करत या मंत्र्यांवर कारवाई करण्यात येणार आहे का? याची चौकशी केलीच पाहिजे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हंटल.

PNB बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 4 एप्रिलपासून बदलणार पेमेंटचे नियम

Punjab National Bank

नवी दिल्ली । देशातील दुसरी सर्वात मोठी सरकारी कर्ज देणारी बँक असलेली पंजाब नॅशनल बँक (PNB) ग्राहकांसाठीच्या पेमेंट नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करणार आहे. वास्तविक, PNB 4 एप्रिल 2022 पासून पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम लागू करत आहे. या अंतर्गत, व्हेरिफिकेशन शिवाय चेक पेमेंट होणार नाही. नियमानुसार, ते फेल झाल्यास चेक परत केला जाईल.

₹ 10 लाख किंवा त्याहून अधिकच्या चेकसाठी अनिवार्य
PNB च्या अधिकृत वेबसाइट http://pnbindia.in वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2022 पासून, पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम लागू केली जाईल. यानंतर, ग्राहकाने शाखा किंवा डिजिटल चॅनलद्वारे 10 लाख रुपये किंवा त्याहून जास्तीचा चेक जारी केल्यास, PPS व्हेरिफिकेशन अनिवार्य असेल. ग्राहकांना खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेक अल्फा, चेकची तारीख, चेकची रक्कम आणि लाभार्थीचे नाव द्यावे लागेल. PNB ने म्हटले आहे की,” ग्राहक 1800-103-2222 किंवा 1800-180-2222 वर कॉल करून PPS चे संपूर्ण डिटेल्स मिळवू शकतात. त्याच वेळी, ग्राहक बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे देखील संपूर्ण माहिती गोळा करू शकतात.

पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टीम ‘हे’ फ्रॉड पकडण्याचे साधन आहे
रिझर्व्ह बँकेने 1 जानेवारी 2022 पासून फ्रॉड पकडण्याचे साधन पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्याचे निर्देश दिले होते. आतापर्यंत अनेक बँकांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. PPS च्या मदतीने चेक पेमेंट तर सुरक्षित होईलच त्याबरोबरच मंजुरीसाठी देखील कमी वेळ लागेल. त्यासाठी चेक घेऊन जागोजागी भटकावे लागणार नाही.

PPS फ्रॉड कसे रोखेल ?
PPS अंतर्गत, चेक जारी करणाऱ्याला चेकचा तपशील SMS, मोबाइल अ‍ॅप, नेट बँकिंग किंवा ATM द्वारे बँकेला द्यावा लागेल. चेक बँकेत पोहोचल्यावर खातेदाराने दिलेल्या माहितीचे व्हेरिफिकेशन केले जाईल. या दरम्यान काही तफावत आढळल्यास चेक नाकारला जाईल. पंजाब नॅशनल बँकेने म्हटले आहे की,” PPS व्हेरिफिकेशन नसल्यास चेक परत केला जाईल.”

शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार थांबवा अन्यथा झोडपून काढू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ऊसतोडणी मजुरांना इशारा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब

भिलवडी ऊस पट्टयात साखर कारखान्याचे स्लिप बॉय व ऊस तोडणीदारांचा मनमानी कारभार सुरू आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. ऊस कारखान्यास घालण्यासाठी स्लिप बॉय, ऊसतोडणी मुकादम यांची ऐनकेन प्रकारे मनधरणी करून खुश करण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. भिलवडी, ब्रम्हनाळ, खटाव, वसगडे, सुखवाडी, चोपडेवाडी, माळवाडी, खंडोबाचीवाडी, अंकलखोप ऊसपट्टयात तोडणीची धांदल सुरू आहे.

कारखाने सुरु झाल्यावर अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे ऊस तोडी लांबल्या. याचा परिणाम वेळेत ऊस तुटण्यावर झाला. मार्च महिना आला तरी तोडी मिळेनात. ऊस उत्पादक शेतकरी गट ऑफिसमध्ये हेलपाटे मारून थकले. प्रोग्रॅमनुसार तोड न देता अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्लिप बॉय व तोडणी मुकादमांचा मनमानी कारभार सुरू आहे. स्लिप बॉय, ऊसतोडणी मुकादम व गट कार्यालयातील अधिकारी यांची ऐनकेन प्रकारे मनधरणी करून खुश केल्यावर ऊसाला कोयता लागत आहे.

ऊसतोडणी मशीन करता तीन हजार पासून सात हजार पर्यंत मोजावे लागत आहेत. शेतकऱ्यांच्या हतबलतेचा गैरफायदा घेत लुटण्याचा धंदा सुरू आहे. काही टोळी मालकांकडून ऊस पळवण्यासाठी फड जाळण्यायाचे प्रकार सुरू आहेत. स्लिपबॉय, मुकादमांनी गैरप्रकार थांबवावेत अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना झोडपून काढेल असा इशारा संदीप राजोबा यांनी दिला.