Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2724

6 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात; ‘या’ प्रकल्पाचे करणार उद्घाटन

Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात एकमेकांवर टीकास्र्त डागले जात आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार असून 6 मार्च रोजी त्यांच्या हस्ते पुणे येथे मेट्रोच्या प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे.

महाराष्ट्रातील महत्वाचे शहर असलेल्या पुणे शहरातील गरवारे या मेट्रोच्या स्टेशनचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तसेच पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी करणार आहेत.

पुणे महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. महापालिका निवडणूकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदींचा दौरा भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब

मनी लॉडरींग प्रकरणात ईडीने अटक केलेल्या अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा म्हणून सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीने मारुती चौकात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार सुधीरदादा गाडगीळ व भाजप प्रदेश सचिव पृथ्वीराज भैया पवार यांनी केले. यावेळी 1993 साली मुंबई बॉम्बस्फोटां मध्ये मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली तसेचभ्रष्टाचारी देशद्रोही मंत्री नबाब मलिक यांच्या प्रतिमेस चप्पल हार घालून निषेध व्यक्त केला.

यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ म्हणाले,”मुंबईत बॉम्बस्फोट घडविणाऱ्या देशद्रोही दाऊद इब्राहिमच्या कुटुंबियांकडून वादग्रस्त जमीन घेऊन मलिक यांनी एक प्रकारे देशद्रोह्यांना मदतच केली आहे. मलिकाना पाठीशी घालणाऱ्या महाविकासआघाडी नेत्यांचा हा उद्योग चुकीचा आहे. देशद्रोही ना मदत करणाऱ्या मलिक यांना मंत्री पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळे त्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा,” अशी मागणी आंदोलन वेळी केली.

नबाब मलिक यांनी 300 कोटींची जमीन अवघ्या 55 लाख आत घेऊन उरलेले रुपये देशद्रोही कारवायांसाठी दाऊदला पोचवले आहेत. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे मंत्री नवाब मलिक यांची देशद्रोही गुन्ह्याखाली चौकशी करावी व राजीनामा नाही दिल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला.

मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या; भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहारमध्ये भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी मुस्लिमांबाबत बेताल वक्तव्य केले आहे. मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे अशी मागणी ठाकूर यांनी सरकार कडे केली आहे . या वक्तव्यानंतर बिहार भाजपाने ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून वक्तव्याचा नक्की काय अर्थ आहे यासंदर्भातील स्पष्टीकरण मागवलं आहे.

1947 मध्ये धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाली. त्यांना धर्माच्या आधारावर दुसरा देश मिळाला होता त्यामुळे त्यांनी तिकडे जायला हवे होते पण आता ते जर देशात राहत असतील तर त्यांचा मतदानाचा हक्क रद्द करावा, अशी माझी सरकारकडे मागणी आहे. ते दुसऱ्या दर्जाचे नागरिक म्हणून भारतात राहू शकतात.

ते पुढे म्हणाले, मुस्लिम लोकांना आयएसआयच्या अजेंड्याखाली भारताला इस्लामिक स्टेट बनवायचे आहे. हे लोक अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये काय करत आहेत हे सर्व पाहत आहेत. हे लोक मानवतेचे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून मतदानाचा हक्क हिरावून घेतला पाहिजे. ते अल्पसंख्याकही नाहीत. त्यांचा अजेंडा संपूर्ण जगाला इस्लामिक स्टेट बनवण्याचा आहे.

पतीचा गळा चिरून खून करणाऱ्या पत्नीला मिळाली जन्मठेपेची शिक्षा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब

तासगाव मधील इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये पती सोबत झालेल्या वादाच्या रागातून पतीचा खून करणाऱ्या पत्नीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शांताबाई उर्फ शोभा कल्लाप्पा बागडी असे शिक्षा झालेल्या महिला आरोपीचे नाव आहे. सदरचा गुन्हा हा 2019 साली घडला होता. आरोपी शांताबाई आणि तिचा मयत पाटील कल्लाप्पा बागडी हे दोघेजण तासगाव मधील इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये राहत होते.

मयत कल्लाप्पा बागडी यांना टि. बी. चा त्रास असल्यामुळे ते कामधंदा करु शकत नव्हते. यावेळी आरोपी शांताबाई आणि कल्लाप्पा यांच्यात जेवण देण्याच्या कारणावरून वाद झाला. याच रागातून शांताबाईने रात्रीच्या वेळी धारदार वस्तारने कल्लाप्पा याचा गळा चिरुन खुन केला. सदर गुन्हयाच्या वेळी आसपासचे इतर कोणीसही गुन्हयाचा सुगावा लागणार नाही अशा परीस्थितीमध्ये शांताबाईने तिच्या पतीचा निर्घृण खुन केला.

शिक्षेपासून वाचता यावे म्हणून स्वतःच पोलीस स्टेशन मध्ये जावून पतीने आत्महत्या केल्याची खोटी तकार नोंद केली. परंतु पोलिसांनी मयताच्या जखम बघून सदरचा मृत्यू हा आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय आल्यामुळे सखोल तपास केला. सखोल तपासानंतर खुन तिच्या पत्नीने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार साक्षी पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने शांताबाईला शिक्षा सुनावली.

“मराठा समाजाला फक्त खूश करण्यासाठी घोषणा नको” – संभाजीराजे छत्रपती

sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मराठा आरक्षणाच्या मुद्यांवरून खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुंबईत आमरण उपोषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणासंदर्भात नुकताच मुख्यमंत्री ठाकरेंनी निर्णय घेतला. एक मागासवर्ग आयोग असताना फक्त मराठा समाजासाठी वेगळा आयोग तयार करता येतो का? फक्त मराठा समाजाला खूश करण्यासाठी असे वक्तव्य, घोषणा करता येता कामा नये. माझा लढा ३० टक्के श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी आहे. त्यांच्या आरक्षणासोबत इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा लढा आहे”, असे संभाजी छत्रपती यांनी म्हंटले.

मुंबई येथील आझाद मैदानावर आज संभाजी छत्रपती यांनी उपोषणास सुरुवात केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा आरक्षणा संदर्भात मी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे. मी महाराजांचा वंशज आहे. हा लढा मी लढायलाच हवा. हा माझा निर्णय आहे. एक मागासवर्गीय आयोग असतांना, मराठा समाजासाठी स्वतंत्र आयोग स्थापन करण्याची कायद्यात घटनेत तरतूद नाही. उगाच समाजाला दिशाभूल करू नये.

यावेळी संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारकडे मागणीही केली. ते म्हणाले की, राज्य सरकारने येणाऱ्या अर्थसंकल्पात मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत. त्या मागण्यांसदर्भात तरतूद करावि., ब्लू प्रिंट दाखवावी. आर्थिक नियोजन सांगावे. त्यामुळे मुख्यमंत्र्यानी त्यांच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या करावयात, असे ते यावेळी म्हणाले.

नवाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ मविआचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश परब

राज्याचे अल्पसंख्यांक नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कारवाई करत अटक केल्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना महाविकास आघाडी सरकारच्या वतीने येथील गांधी पुतळ्याजवळ एकत्र येऊन आंदोलन केले. विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजप शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी यावेळी केला.

राज्याचे अल्पसंख्यांक नवाब मलिक यांच्यावर ईडीच्या माध्यमातून कारवाई करत अटक केली आहे. यामुळे कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शिवसेनेचे शंभराजे काटकर यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गांधी चौकातील गांधी पुतळ्यासमोर निषेध व्यक्त केला. यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील म्हणाले, नवाब मलिक यांनी भाजप विरोधात आवाज उठवला. भाजपच्या सत्तेच्या खुर्चीला धक्का दिला म्हणूनच भाजपने ईडीचा वापर करत त्यांच्यावर कारवाई केली.

सामान्य जनतेने आवाज उठवला तर त्यांचाही आवाज दाबण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. संजय बजाज म्हणाले, राज्यात जो कोणी केंद्र सरकारच्या विरोधात बोलेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय यंत्रणेचा वापर करून करीत आहे त्यांच्या अंगात विशिष्ट खोड्या आहेत त्या त्यांनी जिल्ह्यातील अनेक नेत्यांना त्याचा वापर करून पाहिला परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते कार्यकर्ते झुकणार नाहीत. भाजप नेत्यांना अटक झाली तेंव्हा मूग गिळून गप्प बसणारे आज आंदोलन करीत आहेत.

“चंपाने सोमय्यांना हाताशी धरून टरबुजाच्या कितीही खापा केल्या तरी टरबूज गोड लागणार नाही”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राष्ट्रवादी अधिकच आक्रमक आहे. जळगाव मध्ये मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी भाजप आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. “चंपाने समोय्यांना हाताशी धरून टरबूजाच्या कितीही खापा केल्या तरी राज्यातील जनतेला टरबूज गोड लागणार नाही, अशी टीका अनिल पाटील यांनी केली आहे.

आमदार अनिल पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपमधील अनेक नेत्यांकडून सध्या राजकारण केले जात आहे. चंद्रकांत पाटील यांचे हे षडयंत्र आहे. किरीट सोमय्यांना हाताशी धरून हे सरकार पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

कोणत्याही प्रकारे महाराष्ट्र सरकार पाडण्याचा केंद्र सरकारचा अट्टाहास आहे. मात्र, त्यांनी लक्षात ठेवावे कि नवाब मलिक यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकारमधील सर्व आमदार खंबीरपणे उभे आहेत, असे पाटील यांनी म्हंटले.

आता फक्त एका मिस्ड कॉलद्वारे मिळेल LPG कनेक्शन, त्यासाठी काय करावे लागेल ‘हे’ समजून घ्या

Cashback Offers

नवी दिल्ली । आता नवीन LPG कनेक्शन घेण्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये जावे लागणार नाही. एक काळ असा होता की, लोकांना LPG कनेक्शन घेण्यासाठी महिनोन् महिने वाट पाहावी लागत होती आणि हे काम सहजासहजी देखील होत नव्हते. मात्र आता तुम्हाला LPG कनेक्शनसाठी फक्त एक मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला LPG चे कनेक्शन सहज मिळेल.

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ट्विट करून ही माहिती दिली आहे की आता ग्राहक मिस्ड कॉल देऊनही गॅस कनेक्शन घेऊ शकतात. आपण याचा फायदा कसा घेऊ शकता हे समजून घेऊया.

मिस्ड कॉल करावा लागेल
IOCL ने दिलेल्या माहितीनुसार, आता कनेक्शनसाठी ग्राहकांना 8454955555 वर मिस्ड कॉल करावा लागेल आणि कंपनीचे कर्मचारी त्यांच्याशी संपर्क साधतील. यानंतर तुम्हाला एड्रेस प्रूफ आणि आधारद्वारे गॅस कनेक्शन मिळेल. या नंबरद्वारे गॅस रिफिल देखील केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला फक्त रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून कॉल करावा लागेल.

जुने कनेक्शन एड्रेस प्रूफ म्हणून ग्राह्य धरले जाईल
तुमच्या कुटुंबातील कोणाचे गॅस कनेक्शन असेल आणि पत्ता एकच असेल, तरीही तुम्ही गॅस कनेक्शन घेऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला एकदा गॅस एजन्सीमध्ये जाऊन जुन्या गॅस कनेक्शनशी संबंधित कागदपत्रे दाखवून त्याची पडताळणी करून घ्यावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला त्या पत्त्यावर गॅस कनेक्शन मिळेल.

अशाप्रकारे LPG सिलेंडर बुक करा
1. तुमच्या रजिस्टर्ड क्रमांकावरून 8454955555 वर मिस्ड कॉल द्या.
2. LPG सिलेंडर भारत बिल पेमेंट सीसीट्म (BBPS) द्वारे देखील रिफिल केले जाऊ शकतात.
3. बुकिंग इंडियन ऑइलच्या अ‍ॅप किंवा https://cx.indianoil.in द्वारे देखील केले जाते.
4. ग्राहक 7588888824 वर व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे सिलेंडर भरून घेऊ शकतात.
5. याशिवाय 7718955555 या क्रमांकावर SMS किंवा IVRS करूनही बुकिंग करता येईल.
6. Amazon आणि Paytm द्वारे देखील सिलेंडर भरता येतो.

मार्चमध्ये अर्ध्याहून जास्त दिवस बँका बंद राहणार, सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा

Bank Holiday

नवी दिल्ली । मार्च महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल तर आधी सुट्ट्यांची लिस्ट जाणून घ्या. मार्च महिन्यात जवळपास अर्धा दिवस म्हणजे 13 दिवस बँका बंद राहतील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने फेब्रुवारी 2022 साठी बँक सुट्ट्यांची लिस्ट प्रसिद्ध केली आहे.

मार्चमध्ये, एकूण 13 दिवसांच्या बँक सुट्ट्यांपैकी (फेब्रुवारीमधील बँक सुट्ट्या) 4 सुट्ट्या रविवारी असतात. यातील अनेक सुट्ट्याही सातत्याने पडणार आहेत. देशभरात 13 दिवस बँका बंद राहणार नाहीत. RBI च्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या लिस्टनुसार, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहेत. या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. त्याच वेळी, RBI च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवार व्यतिरिक्त महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात.

फेब्रुवारी 2022 मध्ये बँक सुट्ट्या
फेब्रुवारी 2022 मध्ये कोणत्या राज्यांमध्ये बँका कधी बंद होतील? त्यामुळे पुढील महिन्याच्या सुट्ट्यांच्या लिस्टच्या आधारे तुम्ही तुमचे बँकेशी संबंधित काम पूर्ण करावे, जेणेकरून तुम्हाला अनावश्यक त्रास टाळता येईल.

1 मार्च (महाशिवरात्री) – आगरतळा, ऐझॉल, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाळ, कोलकाता, नवी दिल्ली, पणजी, पाटणा आणि शिलॉंग वगळता इतर ठिकाणी बँका बंद.
3 मार्च (लोसर) – गंगटोकमध्ये बँक बंद
4 मार्च (चपचर कुट) – आयझॉलमध्ये बँक बंद
6 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
12 मार्च (शनिवार) – महिन्याचा दुसरा शनिवार
13 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
17 मार्च (होलिका दहन) – डेहराडून, कानपूर, लखनौ आणि रांचीमध्ये बँका बंद
18 मार्च (होळी / धुलेती / डोल जत्रा) – बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, इंफाळ, कोची, कोलकाता आणि तिरुवनंतपुरम व्यतिरिक्त इतर ठिकाणी बँका बंद आहेत.
19 मार्च (होळी / याओसांगचा दुसरा दिवस) – भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथे बँका बंद
20 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी
22 मार्च (बिहार दिन) – पाटण्यात बँक बंद
26 मार्च (शनिवार) – महिन्याचा चौथा शनिवार
27 मार्च (रविवार) – साप्ताहिक सुट्टी

जनता संकटात असताना मी देश सोडून जाणार नाही; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेचा प्रस्ताव नाकारला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू असून आज तिसरा दिवस आहे. रशियाने युक्रेनमध्ये आपलं सैन्य घुसवले असून ठिकठिकाणी हल्ले सुरूच आहेत. याच दरम्यान, काहीही झालं तरी आपण युक्रेन सोडून जाणार नाही अस युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी म्हंटल आहे.

रशियन सैन्य आता युक्रेनची राजधानी किव्ह येथे पोहोचले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेने युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना किव्ह सोडण्यास सांगितले. पण त्यांनी अमेरिकेचा प्रस्ताव धुडकावून लावला. काहीही झाले तरी मी देश सोडून जाणार नाही, माझी जनता संकटात असताना मी जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही असे त्यांनी म्हंटल.

दरम्यान, रशियन सैन्याने शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला तसेच सरकारी निवास स्थानांजवळ गोळ्या झाडल्या. या युद्धात आत्तापर्यंत अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. युक्रेनचे नागरिक भीतीपोटी देश सोडण्याची तयारी करत आहेत.