Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2722

ऑटोमेटिक रूटने LIC मध्ये 20% पर्यंतच्या परदेशी गुंतवणुकीला मंत्रिमंडळाची मंजुरी

LIC

नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) मध्ये थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता दिली आहे, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. LIC मध्ये आता ऑटोमेटिक रूटने 20 टक्क्यांपर्यंत FDI ला परवानगी असेल.

LIC चा IPO पाहता आजच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते, असे मानले जात होते. सध्याच्या FDI पॉलिसी नुसार विमा क्षेत्रात 74 टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे. मात्र, हा नियम भारतीय आयुर्विमा महामंडळाला (LIC) लागू होत नाही. त्याचे व्यवस्थापन स्वतंत्र कायदा LIC कायद्यांतर्गत आहे.

सेबीच्या नियमांनुसार IPO अनिवार्य
बाजार नियामक सेबीच्या नियमांनुसार, IPO ऑफर अंतर्गत FPI (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट) आणि FDI या दोन्हींना परवानगी आहे. LIC कायद्यात विदेशी गुंतवणुकीची तरतूद नसल्यामुळे, विदेशी गुंतवणूकदारांच्या सहभागासंदर्भात सेबीच्या नियमांनुसार प्रस्तावित LIC IPO करणे आवश्यक आहे. त्यामुळे LIC ला परदेशी गुंतवणुकीला परवानगी देणे आवश्यक होते.

मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी जुलैमध्ये LIC च्या IPO ला मंजुरी दिली होती. LIC ने या IPO साठी बाजार नियामक सेबीकडे अर्ज केला आहे. LIC चा IPO कदाचित मार्चमध्ये येईल.

LIC IPO मध्ये रस घेणारे गुंतवणूकदार
युक्रेनच्या संकटानंतर शेअर बाजारावर आलेल्या दबावादरम्यान, अर्थमंत्र्यांनी LIC IPO पुढे ढकलण्याचा सट्टा फेटाळून लावला असून, बाजारात IPO ची चर्चा सुरू आहे. गुंतवणूकदारही यामध्ये मोठी उत्सुकता दाखवत आहेत. या कारणास्तव, सरकार हा इश्यू पुढे करत आहे. LIC चा IPO हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचा टायर फुटल्याने ऊसाने भरलेली ट्राॅली पलटी

कराड | पुणे- बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर कराड शहराजवळ वारुंजी फाटा येथील उड्डाणपुलावर आज दि.26 रोजी शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास भरधाव ट्रकचा टायर फुटला. ट्रकचा टायर फुटल्याने उसाने भरलेल्या ट्रॅक्टर- ट्राॅलीला जोराची धडक दिल्याने ट्रॉली पलटी झाली. या अपघातात महामार्गावर ऊस पसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहिती अशी, ऊसवाहतूक करणारा चालक ट्रॅक्टरसह उसाने भरलेल्या दोन ट्रॉली घेऊन कराडच्या दिशेने निघाला होता. सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावर वारुंजी फाट्यावरील उड्डाणपुलावर आला असता, कराडकडे निघालेल्या कंटेनर (एनएल-01- एई- 6820) चा अचानक टायर फुटला. यामुळे ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ऊस भरून निघालेल्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या धडकेमुळे ट्रॉलीतील ऊस मोठ्या प्रमाणावर महामार्गावर पसरला होता.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभालचे दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, प्रकाश गायकवाड, सलीम देसाई, अमित पवार यांच्यासह महामार्ग पोलीस कर्मचारी व कऱ्हाड शहरचे प्रशांत जाधव अपघातस्थळी दाखल झाले. ऊस वाहतूक कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेला ऊस बाजूला केला. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

अमृता फडणवीसांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी अक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मालिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाई विरोधात नवी मुंबईत निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यावरून भाजप शिष्टमंडळातर्फे तक्रार देत गावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

वादग्रस्त वक्तव्यानंतर वाशी पोलिस ठाण्यात भाजपा आमदार मंदा म्हात्रे तर माजी खासदार संजीव नाईक यांनी पोलिस उपायुक्तांकडे तक्रार केली होती. दरम्यान, कलम 509 अंतर्गत गाडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युद्धामुळे शेअर बाजार 3 टक्क्यांनी घसरला; विदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच

Share Market

नवी दिल्ली । गेल्या 2 दिवसांपासून रशिया आणि युक्रेन मध्ये जोरदार युद्ध सुरु असून याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शेअर बाजारात 3 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली. युद्धसदृश परिस्थितीच्या अनिश्चिततेच्या दरम्यान गेल्या आठवड्यात बाजारात कमालीची अस्थिरता दिसून आली. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर गुरुवारी सर्वात मोठी एकदिवसीय घसरण नोंदवण्यात आली. मात्र, दुसऱ्या दिवशीच बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली.

25 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 1,974.45 अंक किंवा 3.41 टक्क्यांनी घसरून 55,858.52 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 617.9 अंकांनी म्हणजेच 3.57 टक्क्यांनी घसरून 16,658.40 वर बंद झाला.

मोठे चढ-उतार कशात झाले ?
गेल्या आठवड्यात, tata Teleservices (Maharashtra), Aegis Logistics, Urja Global, Sadbhav Infrastructure Projects, Soril Infra Resources, Olectra Greentech, Indiabulls Housing Finance, Syncom मध्ये 10-22 टक्क्यांची मोठी घसरण झाली. दुसरीकडे, Salasar Techno Engineering, Orient Bell, Garware Hi-Tech Films, Federal-Mogul Goetze आणी Vadilal Industries 10-18 टक्क्यांनी वधारले.

रुपयाही घसरला
जर आपण वेगवेगळ्या सेक्टर्सवर नजर टाकली तर, मागील आठवड्यात सर्व सेक्टर्स रेड मार्कमध्ये बंद होते. निफ्टी मीडिया इंडेक्स 7.6 टक्क्यांनी घसरला. त्याच वेळी, PSU बँक इंडेक्स 5.7 टक्क्यांनी आणि ऑटो इंडेक्स 4.6 टक्क्यांनी तुटला. गेल्या आठवड्यात, भारतीय रुपया साप्ताहिक आधारावर 63 पैशांनी घसरून 75.29 वर बंद झाला, तर 18 फेब्रुवारी रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया 74.66 वर बंद झाला.

परदेशात विक्री-बंद
25 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनीही पुन्हा विक्री केली. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांची विक्री या आठवड्यातही चालू राहिली, आर्थिक वर्ष 2022 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 2.25 लाख कोटी रुपयांचे शेअर्स विकले. गेल्या आठवड्यात, देशांतर्गत बाजारात 19,843.52 कोटी रुपयांची विक्री झाली तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 21,511.79 कोटी रुपयांची खरेदी केली. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत FII ने एकूण 41,771.60 कोटी रुपयांची तर DII ने 37,941.25 कोटी रुपयांची विक्री केली आहे.

फोन टॅपिंग प्रकरणी IPS रश्मी शुक्ला यांच्याविरोधात FIR दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी रश्मि शुक्ला यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शुक्ला यांच्या विरोधात अवैध पद्धतीने फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या समितीने अहवाल दिल्यानंतर राज्य सरकारच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झालाय. रश्मी शुक्ला राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर फोन टॉपिंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग करून पोलिसांच्या बदल्या-नियुक्त्यांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे उघड केल्याचा ठपका आहे. नाना पटोले यांचे बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅप केल्या प्रकरणात एफआयआऱ दाखल झाली आहे. भाजप सरकारच्या काळातील हे फोन टॅपिंग प्रकरण आहे.

याआधीच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या घोषणेनुसार फोन टॅपिंग प्रकरणात चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्रिसदस्यीय समितीने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेत समितीची नेमणूक करण्यात आली होती

रशिया – युक्रेनच्या युद्धामुळे भारताचेही होणार एक लाख कोटींचे नुकसान; कसे ते जाणून घ्या

inflation

नवी दिल्ली । युद्ध म्हणजे नुकसान. सर्व प्रकारच्या संकटांसह युद्ध येते. यामध्ये लढणाऱ्या देशांबरोबरच त्यांच्याशी संबंधित देशांचेही मोठे नुकसान होते. रशिया आणि युक्रेन हे लढत आहेत मात्र हजारो किमी दूर असलेल्या आपल्या देशाचेही यामुळे मोठे नुकसान होणार आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाची किंमत झपाट्याने वाढून $100 प्रति बॅरल झाली आहे. त्यामुळे भारताचे एक लाख कोटी रुपयांपर्यंत नुकसान होणार आहे.

रिपोर्टनुसार, जर युद्ध वाढत गेले तर पुढील आर्थिक वर्षात सरकारचा महसूल 95 हजार कोटी रुपयांनी कमी होऊन एक लाख कोटींवर येऊ शकतो. त्याचबरोबर देशांतर्गत चलनवाढही वाढेल. कारण सर्व वस्तू आणि उत्पादनांच्या किंमतींवर परिणाम होऊ शकतो.

दरमहा 8,000 कोटी रुपयांचा महसूल बुडेल
जपानी रिसर्च कंपनी नोमुरानेही दावा केला आहे की,”या संकटात आशियामधील भारताला सर्वाधिक फटका बसेल.” SBI च्या गट प्रमुख आर्थिक सल्लागार सौम्यकांती घोष यांच्या रिपोर्ट नुसार, नोव्हेंबर 2021 पासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढत आहे.”

भारतात असले तरी सरकारने ते नियंत्रणात ठेवले आहे. जर ही किंमत 100 ते 110 डॉलरच्या दरम्यान राहिली तर व्हॅट स्ट्रक्चरनुसार, पेट्रोल आणि डिझेलची किंमत सध्याच्या दरापेक्षा 9 ते 14 रुपये प्रतिलिटर जास्त असणे आवश्यक आहे. सरकारने किंमत वजा अबकारी करातील वाढ रोखली तर दरमहा आठ हजार कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे.

थेट परिणाम महागाईवर
पुढील आर्थिक वर्षात पेट्रोल आणि डिझेलची मागणी आठ ते दहा टक्क्यांनी वाढली तर वर्षभरात तोटा एक लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. या किंमतींचा थेट परिणाम महागाईवर होणार आहे. तेलाच्या किंमती एप्रिल 2021 मध्ये असलेल्या $63.4 वरून जानेवारी 2022 मध्ये $84.67 वर पोहोचल्या, यात सुमारे 33.5 टक्के वाढ झाली. जर ही वाढ $100 वर गेली तर महागाई आणखी वाढेल.

या युद्धाशी भारताचे सामरिक हितसंबंध जुळलेले नसले तरी त्याचा आर्थिक परिणाम होणार आहे. याचा युरोपमधील सेवांवर नकारात्मक परिणाम होईल. रशियावरील निर्बंधांमुळे भारतातून निर्यात होणाऱ्या चहा आणि इतर नियमित उत्पादनांवरही परिणाम होऊ शकतो.

युक्रेन हा कृषी उत्पादनांचा मोठा निर्यातदार आहे
सोने, प्लॅटिनम आणि पॅलेडियम या मौल्यवान धातूंच्या किंमती वाढतील. युक्रेन हा कृषी उत्पादनांचा प्रमुख निर्यातदार आहे. जर आयात थांबली तर गहू, मका यासारख्या धान्यांच्या किंमती वाढू शकतात. जानेवारीमध्ये महागाई दर 6.01 टक्क्यांवर होता, जो गेल्या 7 महिन्यांतील उच्चांक आहे.

नवीन आव्हाने
“दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच युक्रेन-रशिया युद्धाने जागतिक शांततेसमोर मोठी आव्हाने आणली आहेत. ही परिस्थिती भारताच्या विकासासमोर नवी आव्हानेही उभी करेल. महामारीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानानंतर आता कुठे सुधारणा होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणारे युद्ध केवळ जागतिक शांततेसाठीच नव्हे तर आपल्यासाठीही नवीन आव्हाने निर्माण करत आहेत असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हंटले

लग्नाची मागणी जीवावर बेतली; तरुणानं प्रेयसीला लॉजवर बोलावले अन्…

rape

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील तुर्भे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लग्नाची मागणी केल्याच्या कारणातून येथील एका तरुणाने आपल्या प्रेयसीची गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पाळण्याच्या तयारीत असणाऱ्या आरोपी प्रियकराला अटक केली. तसेच बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणीला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र त्या अगोदरच तिचा मृत्यू झाला होता.

काय आहे नेमके प्रकरण ?
घटनेच्या दिवशी 23 फेब्रुवारी रोजी संबंधित प्रेमीयुगुलाने मुंबईतील तुर्भे परिसरातील साई प्रणव लॉजमध्ये एक रुम बुक केली होती. यावेळी रात्रीच्या सुमारास या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या दोघांच्या भांडणाचा आवाज रूमच्या बाहेर येत होता. त्यामुळे हॉटेलच्या स्टाफने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असता, तरुणी बेशुद्धावस्थेत आढळली. यानंतर पोलिसांनी तिला तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले मात्र त्याअगोदरच तिचा मृत्यू झाला होता.

यादरम्यान मृत तरुणीसोबत असलेला तरुण पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आपणच गळा आवळून तिची हत्या केल्याचं आरोपी प्रियकराने पोलिसांसमोर कबुल केले. यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एपीएमसी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

या कारणामुळे केला खून
आरोपी तरुण हा खडकपाडा कल्याण येथील रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून आरोपीचे आणि मृत तरुणाचे प्रेमसंबंध होते. यामुळे काही दिवसांपासून मृत तरुणीने लग्नासाठी तगादा लावला होता. पण आरोपीला लग्न करायचे नव्हते. घटनेच्या दिवशी लॉजमध्ये देखील याच कारणामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि आरोपीने गळा आवळून प्रेयसीचा खून केला.

SBI ग्राहकांनो लक्ष द्या… आज रात्री 7 तासांसाठी ‘या’ सर्व्हिस बंद होतील

Bank

नवी दिल्ली । जर तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. SBI आपल्या ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी वेळोवेळी आपले पोर्टल अपडेट करत असते. या एपिसोडमध्ये बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक अलर्ट जारी केला आहे.

बँकेने म्हटले आहे की,”कंप्लेंट सर्व्हिस पोर्टल 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी काही तासांसाठी उपलब्ध नसेल.” SBI ने ट्विट करून ही माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणतेही महत्त्वाचे डिजिटल ट्रान्सझॅक्शन करायचे असतील तर ते लवकर पूर्ण करा.

SBI ने अधिकृत ट्विटर खात्याद्वारे ग्राहकांना कळवले आहे की,”आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना आमच्यासोबत राहण्याची विनंती करतो कारण आम्ही अधिक चांगला बँकिंग अनुभव देण्याचा प्रयत्न करतो.”

बँकेने म्हटले आहे की, बँकेच्या http://crcf.sbi.co.in या कंप्लेंट पोर्टलची सर्व्हिस 26 फेब्रुवारी रोजी रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत ग्राहकांसाठी उपलब्ध होणार नाही. बँकेच्या म्हणण्यानुसार, या काळात ग्राहक कोणत्याही प्रकारची कंप्लेंट, इक्वायरी इत्यादींसाठी बँकेच्या टोल फ्री क्रमांक 1800112211/18001234/18002100 वर संपर्क साधू शकतात.

SBI ही देशातील सर्वात मोठी बँक आहे
SBI च्या वेबसाइटनुसार, ही एक चतुर्थांश मार्केट शेअर असलेली देशातील सर्वात मोठी बँक आहे. याने आपल्या 11 उपकंपन्यांद्वारे SBI जनरल इन्शुरन्स, SBI लाइफ इन्शुरन्स, SBI म्युच्युअल फंड, SBI कार्ड इत्यादीसारख्या विविध व्यवसायांमध्ये यशस्वीरित्या विविधता आणली आहे.

इलेक्शन फिव्हर 2022 : “हैप्पी बर्थ डे भावा” प्रभागात मतदारांचे भावी नगरसेवकांकडून वाढदिवस जल्लोषात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आगामी काही दिवसात होणाऱ्या नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून “हैप्पी बर्थ डे भावा” म्हणत प्रभागात तरूणांचे भावी नगरसेवकांकडून वाढदिवस जल्लोषात साजरे केले जावू लागले आहेत. पालिकेत प्रशासक नेमल्याने निवडणुकीच्या तोंडावर इलेक्शन फिव्हर सर्वत्र दिसू लागला आहे. गेल्या 18 वर्षात पहिल्यांदाच आपला बड्डे असा साजरा केला असल्याचा फिलही नव मतदारांना येवू लागला आहे.

सातारा जिल्ह्यात 8 तर राज्यात 208 पालिकेची निवडणूकीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून येणाऱ्या काही दिवसात निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अशातच नगरपालिकेत प्रशासक नेमल्याने आता भावी नगरसेवक फिल्डींग लावू लागले आहेत. निवडणुकीची तयारी म्हणून आतापासूनच इच्छुक कार्यकर्त्यांना खूश करू लागले आहेत. यामध्ये प्रभागातील मतदार राजाचा बड्डे या निमित्ताने जोरदार व जल्लोषात साजरा होवू लागला आहे. भावी इच्छुक नगरसेवकांमुळे पहिल्यादाच मतदानाचा हक्क बजावणाराला असा वेगळा बड्डे साजरा केल्याचा वेगळाच फिल अनुभवायला मिळू लागला आहे.

मतदार राजा आपलाच माणूस आहे, असा प्रभागातील प्रत्येक भावी इच्छुक नगरसेवक करू लागला आहे. त्यामुळे आता आगामी निवडणुका असलेल्या शहरात रात्री प्रभागात नगरसेवक फिरताना दिसत आहेत. तसेच 5 वर्षात जेवढे फिरले नसतील तेवढे आता फिरून आपल्या मतदार राजापर्यंत जात आहेत. सातारा जिल्ह्यात सातारा, कराड, वाई, पाचगणी, फलटण, महाबळेश्वर, रहिमतपूर आणि म्हसवड या 8 पालिकेची निवडणूक लागणार आहे.

“सत्तेतून बाहेर पडल्यावर ते सावरकरांचा घरीच पुतळा लावतील”; चंद्रकांतदादांचा शिवसेनेला टोला

Chandrakant Patil Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात चांगलेच राजकारण तापले आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महाविकास आघाडीत असेपर्यंत शिवसेनेचे मतपरिवर्तन होऊ शकत नाही. शिवसेना महाविकास आघाडी सरकारच्या सत्तेत आहे. त्या सत्तेतून बाहेर पडल्यावर ते सावरकरांचा घरीच पुतळा लावतील, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाचे नेते हुशार आहेत. संजय राठोडांच्यावेळी भाजपने जरा आंदोलन केले तर राठोडांचा राजीनामा घेतला. अनिल देशमुखांची चौकशी सुरू होताच त्यांचा राजीनामा घेतला.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाही? शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा होतो, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा का होत नाही? याचा शिवसेनेने विचार करावा. महाविकास आघाडीत असेपर्यंत शिवसेनेचं मतपरिवर्तन होऊ शकत नाही. किमान समान कार्यक्रमात एकमेकांच्या निष्ठा दुखवायच्या नाहीत हे त्यांनी ठरवलं आहे. शिवसेना त्या सत्तेत आहेत. त्या सत्तेतून बाहेर पडल्यावर ते सावरकरांचा घरीच पुतळा लावतील, असेही पाटील यांनी म्हंटले.

शिवसेना प्रमुख ठाकरे यांची भाषणे ऐकवणार – चंद्रकांत पाटील

माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना प्रमुखांबद्दल महत्वाचे व्हिधान केले. यावेळी ते म्हणाले की, 1993 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काय भाषणं केली ती सर्वांना माहीत आहे. येत्या काळात आम्ही ही भाषणं ऐकवणार आहोत. शिवसेनेने नेहमीच हिंदुत्वाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. आताही शिवसेना हीच भूमिका घेणार का हा प्रश्न आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.