Friday, December 26, 2025
Home Blog Page 2734

चांगल्या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे विद्यार्थ्यांसह आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रतिमेश गोंधळे

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी ते गांधीनगर या रस्त्याचे आत्तापर्यंत कोणतेही काम करण्यात आलेले नाही. देशाच्या स्वातंत्र्यापासून दुर्लक्षित असलेला रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. खंडेराजुरी ते गांधीनगर मोरे वस्ती हा अडीच किलोमीटरचा रस्त्यासाठी गेल्या 40 वर्षापासून नागरीक मागणी करीत आहेत.

रस्ता हा शासन दप्तरी नोंद आहे. डांबरीकरणाठी नागरिक, शेतकर्‍यांचा अडथळा नाही. देश स्वातंत्र्यात येवून इतकी वर्षे होवूनही अद्यापपर्यंत सोयी सुविधा मिळालेल्या नाहीत. आदिवासी भागासारखी अवस्था झाली आहे. वाडी वस्तीपर्यंत येण्यास रस्ता नाही. अत्यावश्यक काळात रुग्णसेविका सुध्दा येवू शकत नाही. त्यामुळे गरोदर महिला, वयोवृध्द रुग्णांना नाहक त्रास करावा लागतो. येथील गांधीनगर या ठिकाणी 700 ते 800 इतकी लोकसंख्या आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी असून येथे सुमारे 40 ते 50 हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. तसेच शाळेला जाणार्‍या विद्यार्थ्याचेही नुकसान होत आहे.

पावसाळ्यात खंडेराजुरी गावासोबतचा संपर्क तुटतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परिक्षा देत आली नाही. गेल्या 2 वर्षांच्या पावसाळ्याच्या कालावधीत रूग्नवाहीका आत येऊ शकत नसलेमुळे येथील रुग्णांचा उपचाराविना जागेवरच मृत्यु झालेच्या घटना घडल्या आहेत. या सर्व बाबींचा विचार करता हा रस्ता डांबरीकरण होणे गरजेचे आहे. आंदोलनाची दखल घेवून तात्काळ रस्त्यांचे काम सुरु करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या आंदोलनात विनोद मोरे, गजानन रुकडे, रंगराव पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वाभिमानीकडून तहसीलदार कार्यालयासमोर ‘एफआरपी’ अध्यादेशाची होळी

सांगली प्रतिनिधी । प्रतिमेश गोंधळे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने एफआरपीचे तुकडे पाडणाऱ्या शासन आदेशाची होळी येथील तहसीलदार कार्यालयासमोर करण्यात आली. मंत्रालय सचिव व राज्य शासनाने काढलेल्या दोन टप्प्यांतील अध्यादेशाची होळी करून जोरदार घोषणाबाजीसह राज्य शासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रदीप उबाळे यांना निवेदन देण्यात आले.

स्वाभिमानीचे नेते भागवत जाधव म्हणाले, सरकार कारखानदारांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या एकरकमी एफआरपी मिळण्याच्या हक्कावर दरोडा टाकण्याचे काम करीत आहे. एकरकमी एफआरपी कायदा केंद्र सरकारने मंजूर केला आहे. राज्य शासनाला या कायद्यात मोडतोड करण्याचा अधिकार नाही. याची किंमत राज्य सरकारला मोजावी लागेल.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अप्पासाहेब पाटील, प्रभाकर पाटील, प्रवासी वाहतूक संघटनेचे तानाजी साठे, शहराध्यक्ष अनिल करळे, प्रताप पाटील, राजाराम परीट, रमेश पाटील, जयवंत पाटील, अशोक बल्लाळ, एकनाथ निकम, लक्ष्मण डुके, रवींद्र रोकडे उपस्थित होते.

कंपनीतील युवतीला देवाची आळंदीला पळवून नेवून विवाह केला अन्…

सातारा | विवाह करण्याच्या उद्देशाने एका युवतीला देवाची आळंदी येथे पळवून नेले. तेथे गेल्यानंतर युवतीसोबत हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह केला. याप्रकरणी युवतीला पळवून नेणाऱ्या चाैघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरात वास्तव्य करणारी एक युवती औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत काम करते. दि. 19 ते दि. 20 फेब्रुवारी 2022 दरम्यान संबंधित कंपनीच्या जवळ रस्त्यावर, आणि देवाची आळंदी येथून शुभम नवनाथ बरकडे (वय 21, रा. लिंब, ता. सातारा) याने तिला समक्ष व फोनवरून ‘तू मला सोडून गेलीस अथवा तू माझ्याशी विवाह केला नाहीतर तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करून घेईन’, अशी धमकी दिली.

दरम्यान, मंगेश खंडझोडे, गौरव बरकडे (दोन्ही रा. लिंब) व अनोळखीने तिला दुचाकीवर बसवून (देहू आळंदी, जि. पुणे) या ठिकाणी नेऊन शुभम नवनाथ बरकडे याने तिच्याशी जबरदस्तीने हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे विवाह केला. यानंतर याबाबतची तक्रार संबंधित युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर संबंधित चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक एस. जी. जाधव हे करत आहेत.

“कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का?” ; भाजप नेत्यांचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली. आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने निषेध करत धरणे आंदोलन केले जात आहे. दरम्यान, आता भाजपाचे केशव उपाध्याय यांनी ट्विट करत राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. “कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का? एक मातोश्रीवरून कारण मुख्यमंत्री कायमच ऑनलाईन असतात. आता काय दुसरी स्क्रीन थेट मलिक यांच्या कोठडीतून लावणार का?,” असा सवाल उपाध्याय यांनी केला आहे.

भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी आज ट्विट करीत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. केशव उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले की, “अटकेत असलेले नबाब मलिक यांना राजीनामा द्यायची गरज नाही असा सूर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लावला मग कॅबिनेट बैठकीला आता दोन स्क्रीन असणार का? एक मातोश्रीवरून कारण मुख्यमंत्री कायमच online असतात. आता काय दुसरी स्क्रीन थेट मलिक यांच्या कोठडीतून लावणार का?, असा सवाल उपाध्ये यांनी केला आहे.

दरम्यान, भाजपच्यावतीने पत्रकार परिषदही घेण्यात आली. यावेळी उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, एकेकाळी बाळासाहेब ठाकरे यांचा ठाकरी बाणा सर्वपरिचित होता. मात्र, उद्धव ठाकरे सांगतात मी बाळासाहेबांचा मुलगा आहार. मात्र, सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने मलिक यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका जाहीरपणे सांगून टाकली.

मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे कोणाला नाही असा अधिकार हा मुख्यमंत्री पदावर बसलेला व्यक्तीला असतो. मात्र, मुख्यमंत्री ठाकरेंकडून काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्र्यानी नवाब मलिक यांना अटक केल्याने त्यांच्या मंत्रिपदाबाबत कारवाई करून आपला ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.

सोमय्यांनी 12 जणांची यादीच केली जाहीर; म्हणाले की घोटाळेबाजांना…..

Kirit somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेते किरीट सोमेय्या सरकार मधील एकामागून एक मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत. आज त्यांनी ट्विट करत 12 जणांची यादी जाहीर केली आहे.

किरीट सोमय्या यांनी जाहीर केलेल्या यादीमध्ये अनिल परब, अजित पवार, संजय राऊत यांच्यासाहित 12 नेत्यांचा समावेश आहे. घोटाळेबाज नेत्याना हिशोब द्यावाच लागेल अस सोमय्या म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप सोमय्या यांनी केले होते. त्यातच आता ही यादीच सोमय्या यांनी जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, कालच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक याना ईडीने अटक केली असून न्यायालयाने त्यांना 3 मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. भाजप कडून जाणून बुजून केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडी कडून केला जात आहे .

मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम बापास मरेपर्यंत जन्मठेप

सांगली प्रतिनिधी । प्रतिमेश गोंधळे

पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधम बापास आज जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदरची घटना हि तासगाव तालुक्यातल्या येळावी येथे 23 एप्रिल 2019 रोजी घडली होती. मुक्तार जाफर शेख असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डि. एस. हातरोटे यांनी शेख यास दोषी धरून बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच बायकोस मारहाण केली म्हणून सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा देखील सुनावली. फिर्यादी ही तिचा नवरा म्हणजेच आरोपी मुक्तार शेख व पिडीत मुलगी व मुलगा यांच्या सोबत तासगाव तालुक्यातल्या येळावी येथील जलशुध्दीकरण केंद्राचे पाठीमागे राहत होती. 23 एप्रिल 2019 रोजी मुलीची आई व तिचे कुटुंबिय झोपले होते. त्यावेळी आरोपीने स्वतःच्या पिडीत मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीच्या आईने आरोपीस प्रतिकार केला असता, तिला शिवीगाळ व मारहाण केली करून पिडीत मुलीवर अत्याचार केले. घडलेल्या या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक यु. एम. दंडिले यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याकामी सरकार पक्षातर्फे एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पिडीत मुलगी तसेच वैदयकिय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. उपलब्ध साक्षीपुराव्याचे आधारे यातील आरोपी मुक्तार जाफर शेख यास शिक्षा सुनावली.

‘नवाब मलिक राजीनामा द्या’; भाजपचे आंदोलन

औरंगाबाद – महाविकास आघाडीतील अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना तीन मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/925442141502616/

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज गुरुवारी औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंत्री मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रद्रोही नवाब मलिक मुर्दाबाद यासारख्या घोषणा देण्यात आल्या. तसेच दहशतवादी दाऊदचा हस्तक नवाब मलिक राजीनामा द्या, असं बॅनर पक्षा पदाधिकाऱ्यांनी झळकवले.

या आंदोलनात आमदार अतुल सावे, विजय औताडे, अनिल मकरिये, समीर राजूरकर, शिवाजी दांडगे, नितीन चित्ते यांच्यासह भाजप महिला पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या.

नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिकांना ईडीचा समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डी गॅंग संबंधित व्यक्तीसोबत जमीन व्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिकांना ईडीने समन्स पाठवल्याचे समोर आले आहे. पण कप्तान मलिक यांनी मात्र ही गोष्ट फेटाळली आहे.

मला ईडीने कुठलीही नोटीस बजावली नाही असे कप्तान मलिक यांनी स्पष्ट केले. मलिक कुटुंबियांना कितीही दाबलं तरी थांबणार नाही. आमचा अंडरवर्ल्ड शी कोणताही संबंध नाही. जर मलिकांवरील आरोप सिद्ध झाला, तर या गांधीच्या पुतळ्याच्या समोर उभे राहून लोकांना आम्ही बोलणार गोळी मारा. असेही कप्तान मलिक यांनी म्हंटल.

दरम्यान, न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी ची कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ राज्यातील महाविकास आघाडी कडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष असलेल्या भाजपने मलिक यांच्या राजीनाम्याचा जोर धरला आहे.

शहरातील हाउसिंग सोसायटीमध्ये चार्जिंग स्टेशन बंधनकारक; मनपाचा निर्णय

औरंगाबाद – शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. स्मार्ट सिटीसाठी पाच इलेक्ट्रिक कार खरेदी केल्या आहेत. महापालिका पदाधिकाऱ्यांसाठी लवकरच इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली जाणार आहेत. यापुढे गृहनिर्माण संस्थांना बांधकाम परवानगी देताना चार्जिंग स्टेशनची सोय बंधनकारक केली जाणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढणार असल्याने महापालिकेने शहरात 200 चार्जिंग स्टेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरांचे वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. त्यात स्वच्छ ऊर्जेचा वापर व्हावा यासाठी चालना दिली जात आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचा वापर कमी करून इलेक्ट्रिक व सौरऊर्जेचा वापर वाढावा यासाठी केंद्र व राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका, स्मार्ट सिटीसाठी इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार स्मार्ट सिटीसाठी पाच कार खरेदी केल्यानंतर महापालिका पदाधिकाऱ्यांसाठी देखील इलेक्ट्रिक कार खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार खरेदीकडे नागरिकांचा कलदेखील वाढला आहे. त्यामुळे शहरात 200 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासोबतच हौसिंग सोसायटीमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन करणे बंधनकारक राहील, असा निर्णय घेतला जाणार असल्याचे महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

दोन दिवसांत होणार कारवाई पूर्ण –

महापालिकेच्या नगररचना विभागाकडून शहरातील बांधकाम व्यावसायिक परवानगी घेऊन बांधकाम करतात. त्यांना आता इमारती बांधताना चार्जिंग स्टेशनचादेखील समावेश करावा लागेल. महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक ए. बी. देशमुख यांनी सांगितले

“ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या”; राजू शेट्टींचा अजितदादांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली. आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने निषेध करत धरणे आंदोलन केले जात आहे. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक इशारा दिला आहे. :ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या,” असा इशारा शेट्टी यांनी ट्विटद्वारे दिला आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बुधवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना 3 मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतीला सलग 10 तास दिवसा वीजपुरवठा करावा, या मागणीसाठी महावितरणच्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले जात आहे. यावेळी राजू शेट्टी यांनी ट्विट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिला.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी एक फोटो ट्विट केला असून त्या ट्विटमधील फोटोमध्ये ब्रम्हदेव आला तरी वीजबिल माफी नाही- अजित पवार, उपमुख्यमंत्री असे म्हटले आहे. त्यावर राजू शेट्टी यांनी, “एवढा अहंकार बरा नव्हे ईडी ब्रम्हदेवापेक्षाही प्रभावी ठरणार नाही याची काळजी घ्या,” असे म्हटले आहे.