Friday, December 26, 2025
Home Blog Page 2735

रशियाने युक्रेनवर हल्ला करताच गोल्ड-क्रूडसह ‘या’ वस्तू महागल्या

नवी दिल्ली । गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणावाचे आज अखेर युद्धात रूपांतर झाले. गुरुवारी सकाळी रशियाने युक्रेनची राजधानी कीववर मिसाईल डागण्यास सुरुवात केल्यावर कमोडिटी मार्केटमध्येही तेजी आली.

गुरुवारी सकाळी जागतिक बाजारात सोने-चांदी, डॉलर, क्रूड, नैसर्गिक वायू, निकेल, अ‍ॅल्युमिनियम यासह सर्वच वस्तूंच्या किंमती अचानक वाढल्या. दोन्ही देशांमधील युद्ध जर दीर्घकाळ चालले तर कमोडिटी मार्केटवरील संकट आणखी गडद होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्याचा परिणाम भारतासह जगभरातील रिटेल मार्केटवरही दिसून येईल.

सोने आणि चांदी
रशियाने कीववर मिसाईल डागताच सोन्या-चांदीच्या किंमती वाढू लागल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत 2.15 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर चांदीची किंमतही 2 टक्क्यांहून अधिकने वाढली आहे. सोन्याचा भाव सध्या $1,935 प्रति औंस आहे तर चांदी $25 प्रति औंस दराने विकली जात आहे. त्यामुळेच भारतीय सराफा बाजारातही सोन्याने 51 हजार आणि चांदीने 69 हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी तुटला
आंतरराष्ट्रीय बाजारात संकट वाढत असताना भारतीय चलनही डॉलरच्या तुलनेत घसरले. परकीय चलन बाजारात (फॉरेक्स) सकाळी 11.05 वाजता डॉलरच्या तुलनेत रुपया 0.59 टक्क्यांनी घसरून 75.23 वर आला. 23 फेब्रुवारी रोजी तो 74.63 रुपयांवर बंद झाला होता. म्हणजेच रुपया जवळपास 60 पैशांनी घसरला आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती $100 च्या पुढे
सर्वात मोठे संकट कच्च्या तेलावर दिसून येत आहे. रशियन मिसाईल्सनी कच्च्या तेलाच्या किंमतींना आग लावली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींनी आठ वर्षांत पहिल्यांदाच 100 डॉलर प्रति बॅरलचा आकडा पार केला. सकाळच्या ट्रेडिंगच्या वेळी, क्रूड 5.2 टक्क्यांच्या वाढीसह $100.04 प्रति बॅरलवर विकले जात होते.

नैसर्गिक वायूचे दरही गगनाला भिडले आहेत
आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किंमतीतही 6 टक्क्यांहून अधिकने वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी, अमेरिकन बाजारात नैसर्गिक वायू 6.32 टक्क्यांनी वाढून $4.88 प्रति घन सेंटीमीटर होता.

धातूंची चमकही वाढली
कमोडिटी मार्केटमध्ये निकेल आणि अ‍ॅल्युमिनियमसारख्या धातूंच्या किंमती ही अचानक वाढल्या. गुरुवारी सकाळी निकेलची किंमत 2.01 टक्क्यांनी वाढली, म्हणजे सुमारे 600 रुपये प्रति टन. एका दिवसापूर्वी तो 2.74 टक्क्यांनी घसरून 24,944 रुपयांवर बंद झाला होता. त्याचप्रमाणे, अ‍ॅल्युमिनियमचे दरही 2 टक्क्यांनी वाढले आहेत, म्हणजे सुमारे 64 रुपये प्रति टन.

वाईट काळात उपयोगी पडतो एमर्जन्सी फंड; भविष्यासाठी त्याची तयारी कशी करावी हे समजून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही एमर्जन्सी फंड तयार केला असेल तर कठीण प्रसंगातून सहजपणे बाहेर पडू शकता आणि तुमची भविष्यातील गुंतवणूकही कायम राहील. त्यामुळे सर्व बचत आणि गुंतवणुकीसोबतच अशी व्यवस्थाही करावी की, कोणत्याही आजारामुळे किंवा अपघातामुळे उत्पन्नाचे नुकसान, व्यवसायात किंवा अन्य कोणत्याही मार्गाने होणारे उत्पन्न कमी झाल्यास त्यातून सहजपणे बाहेर पडता येईल.

ज्याप्रमाणे तुम्ही भविष्यासाठी आर्थिक नियोजन करता आणि त्याचप्रमाणे एमर्जन्सी फंडही तयार केला पाहिजे. आता प्रश्न असा येतो की, एमर्जन्सी फंड किती असावा आणि तो कसा तयार करावा?

अशा प्रकारे प्लॅनिंग करा
ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कमाईचा काही भाग फ्युचर प्लॅनिंगमध्ये गुंतवता, त्याचप्रमाणे तुमच्या कमाईचा काही भाग आपत्कालीन परिस्थितीसाठीही जमा केला पाहिजे. एमर्जन्सी फंड तयार करताना हे लक्षात ठेवा की, हा फंड इतर कोणत्याही गरजांसाठी वापरला जाऊ नये.

मंथली सॅलरीच्या किमान 6 पट एमर्जन्सी फंड
एमर्जन्सी फंड मंथली सॅलरीच्या किमान 6 पट असावा. तुम्ही तुमची 6 महिन्यांची कमाई एमर्जन्सी फंडसाठी सेव्ह करावी. जर तुम्ही महिन्याला 50 हजार रुपये कमावत असाल तर तुमच्याकडे किमान 3 लाख रुपयांचा एमर्जन्सी फंड असावा. हा फंड तुमच्या बचत आणि गुंतवणुकीपासून वेगळा असावा.

याप्रमाणे एमर्जन्सी फंड जमा करा
एमर्जन्सी फंड अशा पर्यायात गुंतवावा जिथून तुम्ही सहज पैसे काढू शकता. एमर्जन्सी फंड रोख स्वरूपात किंवा बचत बँक खात्याच्या स्वरूपात असू शकतो. तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंडामध्ये इमर्जन्सी फंड देखील ठेवू शकता. तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) किंवा रिकरिंग डिपॉझिट्स (RD) मध्ये एमर्जन्सी फंड देखील तयार करू शकता.

तुम्ही तुमचा एमर्जन्सी फंड तीन भागात विभागू शकता. हे अल्ट्रा शॉर्ट टर्म, शॉर्ट टर्म आणि मिड टर्ममध्ये विभागले जाऊ शकते. तुम्ही डेट फंडातही गुंतवणूक करू शकता. कालांतराने तुम्ही तयार केलेला एमर्जन्सी फंड वाढवत राहा.

Russia Ukraine Crisis : रशियाच्या मॉस्को एक्सचेंजकडून सर्वप्रकारचे ट्रेडिंग स्थगित

नवी दिल्ली । रशियाच्या मॉस्को स्टॉक एक्सचेंजने गुरुवारी सांगितले की,” रशियाने युक्रेनवर संपूर्ण आक्रमण सुरू केल्यामुळे त्याने आपले सर्व ट्रेडिंग स्थगित केले आहेत.” आपल्या वेबसाइटवर एका छोट्या प्रकाशनात, एक्सचेंजने म्हटले आहे की, “मॉस्को एक्सचेंजने पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व ट्रेडिंग स्थगित केले आहेत.”

बुधवारी बाजारात फादरलँड डे 2022 च्या सुट्टीमुळे ट्रेडिंग होऊ शकले नाही. आपल्या प्रकाशनात, एक्सचेंजने म्हटले आहे की, “23 फेब्रुवारी आणि 8 मार्च, 2022 रोजी, त्या दिवशी ट्रेडिंग करणार्‍या सर्व सिक्युरिटीजचे स्वतःचे स्टॅण्डर्ड इंडीकेटर्स असतील – क्लोजिंग प्राईस, एडमिडेड कोट्स आणि मार्केट प्राइस यासह – सध्याच्या पद्धतीनुसार कॅल्क्युलेट केले जाईल आणि त्यानुसार डिस्क्लोज केले जाईल.

रशियन बाजारात प्रचंड विक्री होत असताना आणि मोठी घसरण होत असताना एक्सचेंजकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा परिणाम रशियन बँका आणि कर्जबाजारी श्रीमंत लोकांवरही झाला.

अमेरिकेपासून ते जर्मनीपर्यंत सर्वांनी रशियावर निर्बंध लादले
युनायटेड स्टेट्सने म्हटले आहे की, ते रशियन गवर्नमेंट डेट (Russian government debt) ट्रेडिंगवरील निर्बंध कडक करत आहेत. ब्रिटनने 5 रशियन बँकांवर आणि तीन अब्जाधीशांवर निर्बंध लादले आहेत. जपानने देशांतर्गत रशियन बॉन्ड इश्यू करण्यावर बंदी घातली आहे, तसेच काही रशियन व्यक्तींची मालमत्ता फ्रीज़ केली आहे.

याशिवाय जर्मनीने रशियाकडून नॉर्ड स्ट्रीम 2 गॅस पाइपलाइनचे सर्टीफिकेशन स्थगित करत असल्याचेही जाहीर केले. असे मानले जात होते की, रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांना लष्करी समर्थन देण्यासाठी आणि दोन युक्रेनियन प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता देण्याच्या रशियन हालचालींमुळे अधिक निर्बंध येऊ शकतात.

भारत रशियाकडून फक्त 1% कच्चे तेल घेतो
रशिया हा तिसरा सर्वात मोठा देश आहे, जो दररोज सुमारे 5 मिलियन बॅरल कच्च्या तेलाची निर्यात करतो, त्यापैकी निम्म्याहून अधिक युरोप आणि 42 टक्के आशियामध्ये जातो. भारत रशियन क्रूड निर्यातीपैकी 1 टक्काही खरेदी करत नाही, कारण बहुतेक भारतीय रिफायनरीज रशिया निर्यात करत असलेल्या जड क्रूडवर प्रक्रिया करू शकत नाहीत. याव्यतिरिक्त, दोन्ही देशांदरम्यान पाइपलाइनची कमतरता आहे, ज्यामुळे वाहतूक खर्च जास्त आहे. संरक्षण क्षेत्रात रशिया आणि भारत एकमेकांच्या अगदी जवळ आहे.

फडणवीसांविरोधात 3 वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार, मात्र अद्याप चौकशीला बोलावलं नाही

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडी ने अटक केल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय सूडबुद्धीने मलिक यांच्यावर कारवाई करण्यात आली असा आरोप महाविकास आघाडी कडून करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. फडणवीस यांच्या विरोधात 3 वर्षांपूर्वीच ईडीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र अद्याप चौकशीला बोलवण्यात आले नाही अस म्हणत ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय? असा सवाल त्यांनी केला.

4 सप्टेबर 2019 म्हणजे 3 वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मोहनिश जबलपुरे यांनी ॲक्सिस बँक नुकसानीचा सप्रमाण लेखाजोखा ED कडे सादर केला त्याचा हा पुरावा. या तीन वर्षात दोघांपैकी एकालाही ED ने बोलावले नाही. ED कुणाच्या इशाऱ्यावर नाचतेय?

दरम्यान, डी गॅंग संबंधित व्यक्तींशी जमीन व्यवहार केल्याचा आरोप नवाब मलिक यांच्या वर करण्यात आला असून कोर्टाने त्याना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी रस्त्यावर उतरली आहे. भाजपकडून सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना अडचणीत आणण्याच प्रयत्न सुरू आहे असा आरोप महाविकास आघाडी कडून करण्यात येत आहे.

स्मार्ट सिटी बसला लाखाचे उत्पन्न

smart city bus

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरातील स्मार्ट शहर बसही बंद होती. संपाचा तोडगा निघत नसल्याने स्मार्ट सिटी प्रशासनाने युद्धपातळीवर माजी सैनिकांची नियुक्ती करून बससेवा सुरू केली.

यामध्ये 11 शहर बस शहरातील प्रमुख मार्गावर धावत आहेत. प्रवाशांकडून नही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे मागील महिन्याभरात स्मार्ट सिटी ला एक लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.

स्मार्ट सिटी बसचे चालक समाधान चव्हाण आणि वाहक संदीप कोळगे यांचा काल सत्कार करण्यात आला. त्यांनी जास्त उत्पन्न प्रवाशांना चांगली सेवा दिली. या सोहळ्यास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुष्कल शिवम, राम पवनीकर मुकुंद देव, सिद्धार्थ बनसोड आदी उपस्थित होते.

“भाजपा विरोधात बोलणा-यांना ईडीची भिती दाखवले जाते”; बाळासाहेब थोरात यांची टीका

Balasaheb thorat

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करत अटक करण्यात आली. आज महाविकास आघाडी सरकारच्यावतीने निषेध करण्या आले. यावेळी मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली. “नवाब मलिक यांच्यावर अटक करण्याची कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे सरकारमधील मंत्री, नेत्यांना अटक करून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप विरोधात बोलणार्याना आदींची भीती दाखवली जाते,” अशी टीका थोरात यांनी केली.

मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपा विरोधात विरोधकांमधील एखादा नेता किंवा मंत्री बोलला तर त्याला ईडीची भिती दाखवली जाते. काही लोकांना मुद्दाम त्रास देण्यात येतो. कारण कोणीही विरोधात बोलले की त्याला अटकाव केल्याचे देशात पाहायला मिळते.

अशा प्रकारच्या ईडीसारख्या या यंत्रणा दुसरीकडे वापरायच्या असतात. परंतु भाजपाकडून चुकीचा वापर केला जात ज्या राज्यात भाजपाची सत्ता आहे तिथं भाजप सरकार त्रास देत असल्याचे दिसत आहे, असेही थोरात यांनी म्हंटले.

SBI की पोस्ट ऑफिस?? कोणत्या FD मध्ये व्याज दर चांगला आहे ते जाणून घ्या

post office

नवी दिल्ली । बाजारात अनेक प्रकारच्या गुंतवणूकीच्या योजना उपलब्ध आहेत, ज्यामध्ये चांगला रिटर्न तर असतोच मात्र त्याबरोबरच जोखीमही तितकीच जास्त असते. मात्र , गुंतवणुकीसाठी FD सर्वात सुरक्षित मानली जाते. यामुळे कोणताही धोका पत्करत नसलेल्या लोकांचा विश्वास आजही FD वर कायम आहे.

देशातील अनेक लहान, मोठ्या, खाजगी आणि सरकारी बँका FD करण्याची सुविधा देतात. याशिवाय, पोस्ट ऑफिस म्हणजेच पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट योजनेची सुविधा देखील देते. जी लोकांना खूप आवडली आहे. चला तर मग जाणून घेऊयात तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसपैकी जास्त फायदा कुठे मिळेल?

सर्वप्रथम SBI मधील FD बद्दल बोलूया :
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) गुंतवणुकीच्या आवश्यकतेनुसार 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसह FD दर ऑफर करत आहे. SBI FD व्याजदर सामान्य ग्राहकांसाठी 2.9% ते 5.5% दरम्यान आहेत. या FD वर SBI ज्येष्ठ नागरिकांना 50 bps जास्त देते.

SBI मधील FD वर किती व्याजदर आहेत ते जाणून घ्या (₹ 2 कोटी पेक्षा कमी)
7 दिवस ते 45 दिवस – 2.9%
46 दिवस ते 179 दिवस – 3.9%
180 दिवस ते 210 दिवस – 4.4%
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 4.4%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 5.1%
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 5.2%
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 5.45%
5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत – 5.5%

पोस्ट ऑफिसची FD योजना :
दुसरीकडे, जर आपण पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेबद्दल बोललो, तर ते एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी FD देतात. बँक FD प्रमाणे, गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस FD च्या कालावधीत गॅरेंटेड रिटर्न मिळवू शकतात.

पोस्ट ऑफिसमध्ये FD वर किती व्याजदर आहेत ?
1 वर्ष – 5.5%
2 वर्षे – 5.5%
3 वर्षे – 5.5%
5 वर्षे – 6.7%

सातारा : शेतात गेलेल्या वृध्दावर अस्वलाचा हल्ला, गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा तालुक्यातील सांडवली येथील एका वृध्दावर जंगली अस्वलाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात सिताराम सखाराम मोरे (वय- 65) हे हल्यात गंभीर जखमी झाले. आज गुरुवारी सकाळी 6. 30 च्या दरम्यान ही घटना घडली. उपचारासाठी सिताराम मोरे यांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, परळी खोरेऱ्यातील सांडवली येथे अस्वलाने वृध्दावर हल्ला केला. या भागात जंगलाचा भाग मोठा असल्याने वन्य प्राण्यांचा वावरही मोठा आहे. पण अलीकडे काही हिंस्र प्राण्यांचा वावरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यातच सांडवली येथील सिताराम सखाराम मोरे हे वृद्ध गुरुवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान झऱ्याचे वावर या शिवारात माकडे हाकलायला गेले होते. तेथून परतत असताना अचानकच अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या वृध्द जबर जखमी झाले.

संरपंच गणेश चव्हाण यांनी याबाबची माहिती सांगितली आहे. ते म्हणाले, सिताराम मोरे हे शेताकडे गेल्यानंतर त्यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत ते घराजवळील अंगणात आले. अस्वलाने गळ्यावर हल्ला केल्याने मोठा रक्तस्राव झाला होता. तात्काळ ग्रामस्थांनी 108 ला कॉल केला. मात्र रूग्णवाहिका येण्यासाठी काही कालावधी लागणार होता. म्हणून वारसवाडी येथील दुधाच्या गाडीला बोलावून सांडवली ते पळसावडे असा 5 किलोमीटरचा प्रवास दुधाच्या गाडीतून केला. नंतर रुग्णवाहिका पळसवडे येथे पोहोचल्यानंतर तेथून थेट जिल्हा शासकीय रुग्णालयात सिताराम मोरे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. ही घटना समजताच वनक्षेत्रपाल वन्यजीव बामनोलीचे बी. डी. हसबनीस, वनपाल वेळे डी. एम. जानकर, वनरक्षक पळसावडे ए.पी. माने, सरपंच गणेश चव्हाण यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.

पत्नीच्या मृत्यूनंतर डॉक्टर युवतीशी लगट; आरोपीला बेड्या

Crime

औरंगाबाद – शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कार्यरत महिला डॉक्टरचा रुग्णाच्या रुग्णाच्या नातेवाईकाने छेड काढत विनयभंग केला. हा प्रकार 3 ते 22 फेब्रुवारी या काळात शासकीय कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घडला. कन्हैया वसंतराव टाक असे विनयभंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

कन्हैया टाक याची पत्नी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. त्यावेळी एक प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर रुग्णसेवा देत होत्या. 8 फेब्रुवारी रोजी टाक याच्या पत्नीच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना घरी घेऊन गेला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा टाक रुग्णालयात आला आणि त्याने त्या महिला डॉक्टरला माझ्या पत्नीला वाचवण्यासाठी तुम्ही फार मेहनत घेतली तुम्हाला धन्यवाद म्हणायचे आहे असे सांगून पुढे मनास लज्जा वाटेल अशा भाषेत बोलून निघून गेला. त्यानंतर वारंवार टाक हॉस्पिटलमध्ये येऊन त्या डॉक्टरचा पाठलाग करू लागला. पुढे 20 फेब्रुवारीला टाक याने त्याच्या पत्नीच्या तेरवीच्या कार्यक्रमाची पत्रिका हॉस्पिटलमध्ये अन्य डॉक्टरांना आणून दिली. त्यानंतर त्या महिला डॉक्टरने त्यांच्या सोबत घडलेला प्रकार सुरक्षा एजन्सीचा इंचार्ज गायकवाड आणि डॉक्टर अरविंद गायकवाड यांना सांगितला. तसेच टाक याला हॉस्पिटलमध्ये येऊ देऊ नये अशी विनंती केली. त्यावर सुरक्षा एजन्सीचा इंचार्ज गायकवाड याने उलट त्या महिला डॉक्टरलाच शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या.

पुढे 22 फेब्रुवारीला रात्री नऊच्या सुमारास टाक आणि सुरक्षा रक्षक एस. एस. गायकवाड कॅन्सर हॉस्पिटलच्या गेटसमोर खुर्चीवर बसलेले होते. तेव्हा ती महिला डॉक्टर मैत्रिणीसोबत स्कुटीवरून हॉस्पिटलबाहेर पडत असताना टाक याने स्कुटी अडवून पुन्हा त्या महिला डॉक्टरला धमकावत व्हाट्सएपच क्रमांक देण्याची मागणी करू लागला. तसेच अंगलट करण्याचा प्रयत्न करू लागल्याने त्या महिला डॉक्टरने सुरक्षा रक्षक गायकवाडला आवाज दिला मात्र, त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर तेथून त्या महिला डॉक्टर व मैत्रिणीने घाबरून तेथून निघून गेल्या. याप्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महिला डॉक्टराने दिलेल्या माहितीनुसार, 3 फेब्रुवारीला कन्हैय्या टाक यांच्या पत्नीवर उपचार सुरू असताना, कन्हैय्या टाक आणि त्यांचा मुलगा हर्षद कन्हैय्या टाक यांनी महिला वॉशरूमध्ये धिंगाणा केला होता. याबाबतही सुरक्षा रक्षकाकडे तक्रार देण्यात आली होती.

Cryptocurrency Prices : रशिया युक्रेन संकटाने क्रिप्टो बाजारही कोसळला, सर्व मोठ्या करन्सी मध्ये झाली 10% घसरण

Cryptocurrency

नवी दिल्ली । रशिया आणि युक्रेनमधील स्फोटांचा आवाज जगभरातील शेअर बाजारांसाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. युरोपपासून आशियापर्यंत सर्वच बाजारपेठा घसरल्या आहेत. गुरुवारी क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्येही मोठी घसरण झाली आहे. आज सकाळी 10:00 वाजता, ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 8.27% ने घसरला होता. ते कालच्या $1.72 ट्रिलियनच्या तुलनेत आज ते $1.58 ट्रिलियन आहे.

गुरुवारच्या घसरणीत असे कोणतेही चलन नाही, ज्यामध्ये घसरण झालेली नाही. Bitcoin पासून Ethereum पर्यंत सर्व काही लाल आहे. Terra – LUNA वगळता, शीर्ष 10 चलनांमध्ये सुमारे 10 टक्के घसरण झाली आहे.

सर्वात मोठी करन्सी असलेले Bitcoin 7.99% घसरून $34,900.78 वर ट्रेड करत आहे, तर Ethereum ची किंमत गेल्या 24 तासांत 9.58% घसरून $2,384.04 वर आली आहे. गेल्या एका आठवड्याबद्दल बोलायचे झाल्यास, Bitcoin 19.88% कमी झाला आहे, तर Ethereum 22.34% कमी झाला आहे. बातमी लिहिण्याच्या वेळी, क्रिप्टो मार्केटमध्ये Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41.9% होते, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 18.1% होते.

कोणत्या करन्सी घसरल्या आणि कोणत्या वाढल्या ?

>>Solana – SOL – प्राइस: $76.94, घसरण : 12.02%
>>Dogecoin – DOGE – प्राइस: $0.1158, घसरण : 11.51%
>>Cardano – ADA – प्राइस: $0.7997, घसरण : 11.49%
>>XRP – प्राइस: $0.643, घसरण : 10.08%
>>Avalanche – प्राइस: $67.10, घसरण : 11.29%
>>Shiba Inu – प्राइस: $0.00002259, घसरण : 9.41%
>>BNB – प्राइस: $339.48, घसरण : 9.35%
>>Terra – LUNA – प्राइस: $54.92, घसरण : 1.79%