Friday, December 26, 2025
Home Blog Page 2733

Share Market : सेन्सेक्स 2700 अंकांनी घसरला तर निफ्टी 16250 च्या खाली बंद

Recession

नवी दिल्ली । युक्रेन आणि रशिया यांच्यातील तणावाची झळ सध्या संपूर्ण जगाला जाणवत आहे. कमकुवत जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजाराच्या विकली एक्स्पायरीवर वाईट परिणाम झाला आहे. 23 मार्च 2020 नंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 2702.15 अंक किंवा 4.72 टक्क्यांनी घसरून 54,529.91 वर बंद झाला. तर दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 815.30 अंकांनी म्हणजेच 4.78 टक्क्यांनी घसरून 16247.95 वर बंद झाला.

गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, यूपीएल, ग्रासिम इंडस्ट्रीज आणि अदानी पोर्ट्सला निफ्टीचा सर्वाधिक फटका बसला. BSE मिड आणि स्मॉलकॅप इंडेक्स 5 टक्क्यांनी घसरला आहे.

एका दिवसापूर्वी बाजार रेड मार्कमध्ये बंद झाला होता
याआधी बुधवारी सेन्सेक्स 68.62 अंकांच्या घसरणीसह 57232.06 वर बंद झाला. त्याच वेळी, NSE चा निफ्टी 28.95 अंकांनी घसरून 17063.25 वर बंद झाला.

मूडीजने जीडीपी वाढीचा अंदाज 9.5% केला आहे
रेटिंग एजन्सी मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने कॅलेंडर वर्ष 2022 साठी भारताचा विकास दर अंदाज 9.5% पर्यंत वाढवला आहे. मूडीजने यापूर्वी 7 टक्के विकास दराचा अंदाज दिला होता. 2023 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 5.5 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. मूडीजने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कोरोना महामारी आणि दुसऱ्या लाटेनंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने सावरत आहे.

रशियाची संपत्ती युद्धाच्या आगीत नष्ट झाली
विशेष म्हणजे रशिया-युक्रेन संकटाचा परिणाम केवळ बाजारपेठांवरच झाला नाही, तर श्रीमंतांच्या संपत्तीवरही परिणाम झाला आहे. रशियातील श्रीमंतांच्या संपत्तीत यंदा 32अब्ज डॉलरची घट झाली आहे. पूर्व युक्रेनमध्ये सैन्य पाठवल्यानंतर अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीने रशियावर निर्बंध लादले आहेत. रशियन श्रीमंत आणि कंपन्यांनाही लक्ष्य करण्यात आले आहे.

होम लोनवरील EMI चा भार कसा कमी करायचा ते जाणून घ्या

Home Loan

नवी दिल्ली । अनेक बँकांनी आपल्या होम लोनचे व्याजदर बदलले आहेत. बॅलन्स ट्रान्सफरवरही दर कमी करण्यात आले आहेत. जर तुम्ही घरावर जास्त व्याज देत असाल तर बॅलन्स ट्रान्सफर सुविधेचा पर्याय निवडून तुम्ही आपल्या EMI वरील भार कमी करू शकता. वास्तविक, जर तुमची बँक होम लोनवर जास्त व्याज आकारत असेल तर तुमच्याकडे दुसरी बँक निवडण्याचा पर्याय आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा होम लोन बॅलन्स ट्रान्सफर करू शकता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा पर्याय निवडून तुम्ही फक्त EMI चा भारच हलका करणार नाही तर परतफेडीचा कालावधीही वाढवू शकता.

टॉप-अप सुविधा देखील
इन्व्हेस्टमेंट ऍडव्हायझर स्वीटी मनोज जैन स्पष्ट करतात की,” या अंतर्गत कोणीही टॉप-अप घेऊ शकतो, ज्याच्या वापरावर सहसा कोणतेही बंधन नसते. होम लोन ट्रान्सफरमध्ये लोन रिस्ट्रक्चरिंग करण्याची सुविधा उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की, तुमच्या परतफेडीच्या क्षमतेनुसार तुम्हाला परतफेडीचा कालावधी आणि EMI कमी-जास्त प्रमाणात मिळू शकेल.”

सुविधेसाठी आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला होम लोनचा बॅलन्स ट्रान्सफर करायचा असेल तर यासाठी KYC डॉक्युमेंट्स जसे की, आयडेंटिटी प्रूफ आणि ऍड्रेस प्रूफ आवश्यक असेल. याशिवाय, स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांना आपल्या व्यवसायाची मागील दोन वर्षांची वित्तीय स्टेटमेंट आणि पाच वर्षांच्या व्यवसायातील सातत्य कागदपत्रे द्यावी लागतील. पगारदार अर्जदारांनी चालू सॅलरी स्लिप आणि सहा महिन्यांचे बँक अकाउंट स्टेटमेंट देणे आवश्यक आहे.

याप्रमाणे बचतीचा हिशोब समजून घ्या
समजा, तुमच्याकडे 12.5 लाख रुपयांचे होम लोन बाकी असेल, ज्याची परतफेड कालावधी 20 वर्षे आहे. सध्याची बँक तुमच्याकडून 6.70 टक्के दराने व्याज आकारत आहे. त्यानुसार, तुमचे EMI दायित्व दरमहा 9,467 रुपये होते. अशा परिस्थितीत, इतर कोणतीही बँक तुम्हाला 6.45 टक्के दराने होम लोन बॅलन्स ट्रान्सफरची सुविधा देते. तुम्ही हा पर्याय निवडल्यास, तुमचे EMI दायित्व दर महिन्याला 9,283 रुपयांपर्यंत खाली येईल. अशा प्रकारे, तुम्ही संपूर्ण होम लोनवर 44,286 रुपये वाचवू शकता.

जर ते 0.50 टक्क्यांनी स्वस्त असेल तर पर्याय निवडा
स्वीटी मनोज जैन सांगतात की,” नवीन होम लोन तुमच्या सध्याच्या दरापेक्षा 0.25-0.50 टक्के स्वस्त आहे, तरच होम लोन बॅलन्स ट्रान्सफरची निवड करा. याशिवाय बहुतांश बँका डिजिटल झाल्या आहेत. सर्व बँका आणि आर्थिक संस्था ग्राहकांना ऑनलाइन अर्जाचा पर्याय देतात. अशा परिस्थितीत, अर्जदारांनी टॉप-अप रक्कम, लवचिक परतफेड कालावधी, ट्रान्सफरपूर्वी फोरक्लोझर फी यासह इतर माहिती देखील घेणे आवश्यक आहे.

एक कोटीहून अधिक लोकांनी सोडली एलपीजी सबसिडी; जाणून घ्या किती लाख लोकांना मिळाला रोजगार

Cashback Offers

नवी दिल्ली । प्रधानमंत्री उज्ज्वला योजना- PMUY लागू झाल्यापासून देशातील एक कोटीहून जास्त लोकांनी एलपीजी सबसिडी सोडली आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले की,”या योजनेच्या अंमलबजावणीमुळे एलपीजी डिस्ट्रिब्युशन सिस्टीमद्वारे एक लाख लोकांना रोजगार मिळाला आहे.”

एका वेबिनारमध्ये ते म्हणाले की,”गेल्या पाच वर्षांत एलपीजीचा प्रवेश 61.9 टक्क्यांवरून जवळपास 100 टक्क्यांवर पोहोचला आहे.” प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजचा एक भाग म्हणून, महामारीच्या काळात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 14 कोटींहून अधिक भरलेले सिलिंडर मोफत देण्यात आले.”

सबसिडी सोडल्याचा लाभ गरजूंना मिळाला
वेबिनारमध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​संचालक राकेश मिसरी म्हणतात की,” एक कोटीहून जास्त लोक स्वतः पुढे आले आणि त्यांनी एलपीजीवरील सबसिडी सोडली. ज्याचा लाभ गरजूंना मिळाला आहे. उज्ज्वला योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री एलपीजी पंचायतींचे आयोजन करण्यात आले आहे. पंकज जैन, सचिव, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय, ऑइल मार्केटिंग कंपन्यांचे प्रतिनिधी, डिस्ट्रिब्युटर्सआणि सिलेंडर उत्पादक वेबिनारमध्ये सहभागी झाले होते.”

घरोघरी पोहोचवण्यासाठी सामान्य प्रयत्न आवश्यक आहेत
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन म्हणाले की,”योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. योजना प्रभावी करण्यासाठी SHGs चा समावेश करणे, सिलेंडर रीफिल करण्यासाठी मायक्रो फायनान्स म्हणून काम करण्यासाठी LPG बँकांची निर्मिती, सूक्ष्म वितरकांचे नेटवर्क आणि रिफिल”साठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्याच्या सोशल नेटवर्क्सची स्थापना आणि संस्थात्मक ज्ञानाचा फायदा घेण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे.

गरिबांसाठी प्रवेश वाढवला
संतोष कुमार, कार्यकारी संचालक (LPG), भारत पेट्रोलियम यांनी सांगितले की,”या योजनेपूर्वी LPG कनेक्शन हे शहरी उत्पादन म्हणजेच शहरे आणि गावांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी स्वयंपाकाचे इंधन म्हणून मानले जात होते. आता त्याची व्याप्ती ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे. खेड्यापाड्यात राहणाऱ्या गरिबांनाही ही सुविधा सहज उपलब्ध आहे.”

धक्कादायक ! महिला हेड कॉन्स्टेबलसह पतीची राहत्या घरी आत्महत्या

चंदिगढ : वृत्तसंस्था – हरियाणातील फरिदाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये महिला हेड कॉन्स्टेबल आणि तिच्या पतीचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सेक्टर-31 येथील पोलीस लाईनमधील घरी हे दाम्पत्य मृतावस्थेत आढळले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शव विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून पुढील तपास सुरु केला आहे. हि घटना घडली तेव्हा या दांपत्याचा 11 वर्षांचा मुलगा घरी नव्हता. तो परीक्षेसाठी शाळेत गेला होता, मात्र घरी येऊन पाहिल्यानंतर त्याला आई-वडील मृतावस्थेत दिसल्याने त्याला मोठा धक्का बसला.

काय आहे प्रकरण?
हेड कॉन्स्टेबल सरोज गेल्या काही दिवसांपासून फरिदाबाद शहरातील सेक्टर-31 येथील पोलिस लाईन्समध्ये आपल्या पती आणि मुलासह राहत होत्या. त्या एनआयटी पोलिस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या. पोलीस लाईनमध्ये राहणारी महिला हेड कॉन्स्टेबल सरोज यांची हत्या झाली आहे. तर त्यांच्या पतीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असल्याची माहिती पोलीस अधिकारी बलवंत सिंग यांनी दिली आहे.

पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या मृतदेहांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर हत्येमागची कारणे समोर येतील असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. महिला हेड कॉन्स्टेबलच्या नातेवाईकांच्या जबाबाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सरोज यांना 11 वर्षांचा मुलगा आहे. सरोज यांचा खून झाला त्या दिवशी तो परीक्षा देण्यासाठी गेला होता. मात्र घरी परत आल्यावर त्याने आपल्या आईवडिलांना मृत अवस्थेत पहिले. यामुळे त्याला मोठा धक्का बसला आहे.

“आम्हीपण कच्च्या गुरुचे चेले नाहीत”; चंद्रकांत पाटील यांचा इशारा

chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. या प्रकरणावरून आज महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी मुंबईत मंत्रालय परिसरात धरणे आंदोलन करीत निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपवर अनेक आरोप केले. या आरोपावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आम्हीही काही कच्च्या गुरुचे चेले नाही, आम्हाला २७ महिने त्रास दिला आहे,” असे पाटील यांनी म्हंटले.

सध्या टीकेत असलेल्या नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यास राष्ट्रवादीने नकार दिला आहे. त्याच्य निषेधार्थ आज भाजपच्यावतीनेही आंदोलन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पाटील म्हणाले की, 1993 च्या समितीची अहवाल का झाकलाय? तो अहवाल जाहीर झाला तर भल्या भल्यांना जेलमध्ये जावे लागेल. नवाब मलिक यांची चिठ्ठी उद्धव ठाकरे यांनी उचलली. कोण कुणाला शह काटशह देत आहे. पुन्हा उद्धव ठाकरे यांना रडारवर आणण्याचं काम सुरु झाले आहे.

संजय राऊत हे शरद पवारांशी एकनिष्ठ आहेत. उद्धव ठाकरेंचे आसन डळमळीत आणण्याचं काम सुरु आहे. यांच्या अशा कामांमुळे हे सरकार टिकणार नाही. राज्य तुमच्याकडे आहे आणि गृहमंत्री हि तुमचाच आहे. मागा आणा निदर्शनास, असेही यावेळी पाटील यांनी म्हंटले.

रशियासोबत चर्चा करून हे युद्ध थांबवा; युक्रेनची मोदींना विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया ने युक्रेन विरुद्ध युद्ध पुकारले असून युक्रेन मधील अनेक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले सुरू आहेत. रशियाच्या हल्ल्यात सात नागरिकांचा मृत्यू झाल्याचं युक्रेनने सांगितलं आहे. दुसरीकडे युक्रेननेही रशियाला प्रत्युत्तर दिलं असून त्यांची पाच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर पाडलं आहे. पण हे युद्ध थांबावं यासाठी युक्रेनने भारताकडे मदत मागितली आहे.

रशिया आणि युक्रेनच्या युद्धात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता हस्तक्षेप करावा. ते प्रभावशाली नेते आहेत. त्यांनी काहीही करून पुतीन आणि आमचे राष्ट्राध्यक्ष जेनेंस्की यांच्यात चर्चा घडवून आणावी. मोदींनी या प्रकरणी दखल घ्यावी, अशी मागणी भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ इगर पोलिखा यांनी केली आहे.

भारताचे रशियासोबत चांगले संबंध असून नवी दिल्ली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात महत्वाची भूमिका निभाऊ शकतं. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना तात्काळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन तसंच आमचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्यासोबत संपर्क साधण्याची विनंती करणार आहोत,” असं ते म्हणाले आहेत.

पोलिसांची मोठी कारवाई! तब्बल 37 लाखांचा गुटखा जप्त

Police,

औरंगाबाद – औरंगाबाद ग्रामीण पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी संयुक्त रित्या कारवाई करत अवैध गुटख्याचा साठा जप्त केला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीन येथे ही कारवाई करण्यात आली. या ठिकाणाहून पोलिसांनी तब्बल 37 लाख 59 हजार 384 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. विशेष म्हणजे छाप्यात पकडलेल्या आरोपींना यापूर्वीही अनेकदा गुटखा विक्री करताना पकडण्यात आल्याचं समोर आलं आहे. यावेळी मात्र पोलिसांनी सापळा रचून मोठी कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिडकीन येथील चार वेगवेगळ्या ठिकाणी औरंगाबाद गुन्हे शाखा आणि बिडकीन पोलिसांनी छापे मारले. बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांना छाप्याच्या ठिाकणी हिरापान मसाला, गोवा मसाला, विमल आणि राजनिवास अशा नावाच्या गुटख्याची पाकिटं जप्त करण्यात आली. या कारवाईनंतर गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी केलेल्या कारवाईत, असलम हनिफ पठाण, युसूफ याकुब पठाण, परवेज रशिद पठाण आणि रिजवान मुख्तार शेख यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या करावाईत अटक कऱण्यात आलेला एक आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याचंही समोर आलं आहे. एवढा मोठा गुटक्याचा साठा कुठून आला, या प्रकाराला कुणाचं पाठबळ आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

हर्सूल कारागृहात कैद्यांसाठी होणार मराठवाड्यातील पहिले रेडिओ केंद्र

harsul jail
harsul jail

औरंगाबाद – शहरातील हर्सूलच्या मध्यवर्ती कारागृहात नव्याने मराठवाड्यातील पहिले रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून 1 हजार 200 कैद्यी असणाऱ्या कारागृहातील चांगली वर्तणूक असणाऱ्या कलाकार कैद्यांमार्फत रेडिओचे काम पूर्ण करण्यात आले असून तीन विभागातील 48 बराकीमध्ये आता ध्वनिसंर्वधक बसविण्यात आले असून आता ‘कैदी आपकी फर्माईश’ सारखे कार्यक्रम पोहोचवतील.

यातील कोणत्या कार्यक्रमाचे प्रसारण करायचे व कोणत्या नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतील त्यानंतरच त्याचे प्रसारण केले जाणार आहे.
हर्सूल येथे कारागृहात कैद्यांची संख्या तशी नेहमीच अधिक असते. त्यात गुन्हा केल्यानंतरही चांगली वर्तणूक असणारे अनेक कैदी आहेत. त्यांना योग्य वातावरण मिळावे म्हणून गाण्यांसह प्रबोधनाचे कार्यक्रमही रेडिओवरून प्रसारित केले जाणार आहेत. सुरुवातीच्या काही दिवसात हा कालावधी एक तासाभराचा असावा असे प्रयत्न आहेत. दर्जा चांगला राहिला तर आणखी एखाद्या तासाची त्यात भर टाकली जाईल असे कारागृहाचे अधीक्षक अरुणा मुकुटराव यांनी सांगितले. कैद्यांमध्ये असणाऱ्या

कलागुणांना या उपक्रमातून वाव मिळेल असा दावाही केला जात आहे. दुपारी 12 वाजता कारागृहात कार्यक्रम प्रसाराची वेळ ठरविण्यात आली आहे. कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या उपक्रमास परवानगी घेण्यात आली असल्याचेही अधीक्षक मुकुटराव यांनी सांगितले.

“नवाब मलिक आणि दाऊद कनेक्शन थोतांड”; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

chhagan bhujbal

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. मलिक याच्या मनी लॉंड्री प्रकरणाचा दाऊदशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद प्रतिक्रिया दिली. “मलिक आणि दाऊद याचे कनेक्शन असल्याचे खोटे बोलले जात आहे. वास्तविक यांचा काही संबंधच नाही. मलिक प्रकरणात आम्ही कायदेशीर लढाई लढणार,” असे भुजबळ यांनी म्हंटले.

छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना काल ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्यावरील आरोप अजूनही सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे मलिक याचा दाऊदशी संबंध जोडून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम केले जात आहे. वास्तविक माहिती घेतल्यास मलिक यांच्यावर जे आरोप केले जात आहेत. त्यामागील सत्य हे आहे की, मुनिरा हिची जमीन आहे. त्यावर अतिक्रमण आहे.

नवाब मलिक यांचं छोट्या जागेत गोडाऊन आहे. सलीम पटेल हा स्थानिक रहिवासी आहे. या प्रकरणात दाऊद अँगल येत नाही. स्थानिक पातळीवरील हे प्रकरण आहे. दाऊदचं नाव जोडून विधानसभा सदस्य निवडून आले आहेत ते दहशतवाद्यांशी जोडण्याचा प्रयत्न आहे. केवळ मुस्लीम आहे म्हणून दाऊदचा संबंध लावताय का? हे सर्व प्रकरण कोर्टात आहे. जामीन मिळेपर्यंत कायदेशीर लढाया लढाव्या लागतात, असे भुजबळ यांनी म्हंटले.

योगींच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची डरकाळी; भाजपवर जोरदार टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सध्या उत्तरोत्तर दौऱ्यावर असून यावेळी एका जाहीर भाषणात त्यांनी भाजपवर घणाघाती टीका केली. शेतकरी आंदोलन, कोरोना काळातील अपयश या मुद्द्यांवरून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजप कडून फक्त दंगे आणि द्वेषाची भाषा पसरवली जात आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

चार वर्षांपूर्वी महाराष्ट्रात भाजपसोबत शिवसेना सत्तेत असताना शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. तेव्हा या शेतकऱ्यांना नक्षलवादी म्हटलं गेलं, आमच्यातीलच काही लोकांनी शेतकऱ्यांना असं म्हटल्याबद्दल आम्हाला अजूनही खंत वाटते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. उत्तर प्रदेशातील शेतकरी आंदोलनाचीही हीच स्थिती झाली असून आता यात बदल आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं.

कोरोना काळात लॉकडाउनमध्ये मुंबईत असणाऱ्या उत्तर प्रदेशातील नागरिकांना पुन्हा गावी जायचे होते. त्यांच्यासाठी विशेष ट्रेन सोडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली. मात्र, केंद्राने या मागणीकडे दुर्लक्ष करत दोन महिन्यांनी ट्रेन सोडल्या. मात्र, त्यासाठीदेखील तिकिट आकारणी केली. या तिकिटांचे पैसे राज्य सरकारने मुख्यमंत्री निधीतून भरले असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले

दरम्यान, उत्तर प्रदेशात शिवसेनेचे ३९ उमेदवार रिंगणात आहेत. उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया १० फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. हे मतदान सात टप्प्यांमध्ये पार पडणार असून ७ मार्च रोजी अखेरच्या टप्प्यातलं मतदान होणार आहे.