Wednesday, October 5, 2022

Buy now

“वेळ आली कि माकडीण पिल्लालाही पायाखाली घेते हि यांची संस्कृती”; चंद्रकांतदादांची पवारांवर नाव न घेता टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नवाब मलिक यांच्या कारवाई प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर टीका केली आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “गेल्या 50 वर्षापासून शरद पवारांकडून राजकारण केले जात आहे. त्यांचे हे राजकारण सर्वांना माहीत आहे. समाजात जातीयवाद निर्माण करण्याचा प्रयत्न पवारांकडून केला जात आहे. “वेळ आली कि माकडीण पिल्लालाही पायाखाली घेते हि तर याची संस्कृती आहे,” अशी टीका पाटील यांनी पवार यांच्यावर नाव न घेता केली.

चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “ईडीच्या नोटिसीला महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घाबरू नये. राज्य सरकावरही टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, सध्या जेलमध्ये असलेले अनिल देशमुख यांनी नुकतेच एक विधान केले आहे की, “मला तोंड उघडायला लावू नका. मी जर तोंड उघडले तर…,” असे देशमुख यांनी म्हंटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा त्यांना भेटायलाही कोणी गेले नाही. एक कथा आहे कि माकडीण आपल्या पिल्लाना कवटाळून घेत असते. मात्र, जेव्हा एखादे सक्त येते आंही पाण्यात गेल्यावर आपण आता मरू असे वाटते तेव्हा ती माकडीण त्याच पिल्लाना पायाखाली घेते, अशीच याची संस्कृती आहे, अशी टीका पाटील यांनी केली.