Friday, December 26, 2025
Home Blog Page 2741

“केंद्र सरकारकडून ईडीचा दडपशाहीसाठी वापर हे दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार आणि ईडीवर निशाणा साधला आहे. “नवाब मलिक यांनी भाजप नेत्याची नावे घेत काल गंभीर आरोप केले. यामुळे त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. कदाचित भाजपच ईडी चालवत असेल. जाणीवपूर्वक ठरवून या गोष्टी केल्या जात आहेत. विरोधात बोलणाऱ्यांवर दडपशाहीसाठी केंद्र सरकार कडून ईडीचा वापर केला जात आहे हे दुर्दैवी,” अशी टीका सुळे यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज पुणे येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, भाजपच्या लोकांकडून ट्विटरच्या माध्यमाचा धमकवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, मलिक यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे आम्हाला काही आश्चर्य वाटत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीमधील नेते, मंत्री यांना नोटीस देण्याचे काम केले जात आहे.

केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी सरकार असो किंवा इतर विरोधी पक्षातील नेता असो तो काही बोलल्यास त्याच्यावर त्या ठिकाणी चौकशी करीत ईडीच्या नोटीसा देण्यात आलेल्या आहेत. ईडीच्या अशा पद्धतीच्या प्रकाराबद्दल मी संसदेतही अनेकवेळा आवाज उठवला असल्याचे सुळे यांनी म्हंटले आहे. नवाब मलिक यांनी अनेक भाजपाच्या नेत्यांचे सत्य जनतेपुढे मांडत आले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न होत असल्याची शक्यता आहे. नवाब मलिक या चौकशीला संपूर्ण सहकार्य करतील, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे.

NPS च्या ‘या’ सेवांसाठीचे शुल्क वाढले, त्याविषयी जाणून घ्या

Pension

नवी दिल्ली । नॅशनल पेन्शन सिस्टीम: पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने प्रेझेंट्स ऑफ पॉइंट्सचे सर्व्हिस चार्ज वाढवले ​​आहे. ही वाढ सर्व नागरिकांना आणि महामंडळांना लागू असेल.

नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत POP आउटलेटवर ऑफर केलेल्या NPS शी संबंधित सर्व्हिस चार्ज 1 फेब्रुवारी 2022 पासून वाढले आहे. PFRDA ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की, NPS आणि उत्तम कस्‍टमर सर्व्हिसला प्रोत्साहन देण्यासाठी ही फी वाढवण्यात आली आहे.

NPS अंतर्गत POP साठी रिवाइज्ड चार्जेस
>> इनिश‍ियल कस्‍टमर रजिस्‍ट्रेशन: 200 रुपये ते 400 रुपये (Negotiable with slab only; collected upfront)
>> इनिश‍ियल आणि त्यानंतरचे ट्रान्सझॅक्शन : काँट्रीब्युशन च्या 0.50 टक्के पर्यंत (किमान 30 रुपये, कमाल 25,000 रुपये (Negotiable with slab only; नॉन फाइनेंश‍ियल 30 रुपये )
>> पर्सिस्टंसी : आर्थिक वर्षात 6 महिन्यांपेक्षा जास्त आणि किमान काँट्रीब्युशन रुपये 1,000 ते रुपये 2,999 : प्रति वर्ष 50 रुपये
1. 3000 रुपये ते 2999 रुपयांच्या किमान काँट्रीब्युशनसाठी: 50 रुपये प्रतिवर्ष
2. 3000 रुपये ते 6000 रुपयांच्या किमान काँट्रीब्युशनसाठी: 75 रुपये प्रतिवर्ष
3. 6000 रुपयांवरील किमान काँट्रीब्युशनसाठी: 100 रुपये प्रतिवर्ष
>> ENPS द्वारे त्यानंतरचे काँट्रीब्युशन : काँट्रीब्युशन च्या 0.20% (किमान 15 रुपये, कमाल 10,000 रुपये) (एकरकमी जमा)
>> निर्गमन आणि पैसे काढण्याच्या सर्व्हिससाठी प्रोसेसिंग चार्ज: किमान रु. 125 आणि कमाल 500 रुपयांसह 0.125 टक्के रक्कम आगाऊ आकारली जाईल.

‘हे’ शुल्कही वाढले आहे
15 फेब्रुवारी 2022 पासून, ENPS द्वारे त्यानंतरच्या सर्व योगदानांवरील शुल्क 0.20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे, किमान शुल्क 15 रुपये आणि कमाल 10,000 रुपये आहे. ENPS मध्ये रजिस्‍टर्ड असलेल्या ग्राहकांसाठी हा सर्व्हिस चार्ज लागू होणार नाही. NPS हे मार्केट लिंक्‍ड, डिफाइन काँट्रीब्युशन परिभाषित-काँट्रीब्युशन प्रॉडक्ट आहे ज्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीच्या फंडामध्ये नियमितपणे गुंतवणूक करावी लागते.

घाटीमध्ये परिचारिकांचा संप; रुग्णसेवेवर परिणाम

ghati

औरंगाबाद – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) परिचारिका दोन दिवशीय संपात सहभागी झाल्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. संपामुळेच नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विविध मागण्यांसाठी बुधवारी घाटीत संप पुकारण्यात आला आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची नियुक्ती घाटी रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे. तसेच अधिकाधिक निवासी डॉक्टर व वैद्यकीय शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, घाटी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारीही संपात सहभागी झाले आहेत.त्यामुळे साफसफाईच्या कामावर परिणाम झाला आहे.

संपाच्या पार्श्वभूमीवर घाटी परिसरात बुधवारी सकाळी घोषणाबाजी झाली. या वेळी परिचारिका संघटनेच्या इंदुमती थोरात, शुभमंगल भक्त, महेंद्र सावळे, मकरंद उदयकार आदींची यावेळी उपस्थिती होती.

म्हैसाळमध्ये दहशत माजविणारी धुमाळ टोळी तडीपार, पोलीस अधीक्षकांनी दिला दणका

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ येथील सावकारी करून दहशत माजविणाऱ्या धुमाळ टोळीवर अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. या टोळीविरुद्ध २०१० व २०२१ मध्ये बेकायदेशीरपणे खाजगी सावकारी करुन पैशावर भरमसाठ व्याज लावुन लोकांकडुन पैसे तसेच जागा, जमीन, इमारत अशा मालमत्ता बळकावुन कुटुंबियांना जिवे ठा मारण्याची धमकी देणे, लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारामारी करणे असे गुन्हे दाखल आहेत.

धुमाळ टोळीतील सहा जणांना पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम यांनी सांगली जिल्हयातुन सहा महिने तडीपार केले. शैलेश रामचंद्र धुमाळ, अशिष शैलेश धुमाळ, जावेद बंडु कागवाडे, अमोल आनंदा सुतार, सुरेश हरी शिंदे आणि बाबासो हेरवाडे अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत. म्हैसाळ येथे राहणाऱ्या शैलेश धुमाळ व त्याचा मुलगा आशीष हे दोघे दहा वर्षापासून म्हैसाळ परिसरात बेकायदा सावकरीत करतात. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर विशेष पथकाने त्याच्या विश्रामबाग व सांगलीतील घरावर छापा टाकून कोरे धनादेश, मुद्रांक व रोकड जप्त केली होती.

धुमाळ हा व्याजाने पैसे देऊन त्याबदल्यात घर, हॉटेल व इतर मालमत्ता हडप करीत होता. मालमत्ता बळकावुन कुटुंबियांना जिवे ठा मारण्याची धमकी देणे, लोकांना आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारामारी करणे असे शरिराविरुद्ध मालमत्तेविरुद्धचे गंभीर स्वरुपाचे सहा दखलपात्र व दोन अदखलपात्र गुन्हे व तक्रारी अर्ज दाखल झाले होते.

सातबार्‍यावरील नाव बदलासाठी लाच मागणारे नायब तहसीलदार अन् महसूल सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

गोटखिंडी येथील एका शेतकर्‍याकडे सातबारा उतार्‍यावर राजपत्राप्रमाणे नावामध्ये बदल करून देण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना येथील अप्पर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार बाजीराव राजाराम पाटील व महसूल सहाय्यक, सुधीर दीपक तमायचे यांना सांगलीतील लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले.

गोटखिंडी येथील एक शेतकरी यांनी त्यांच्या जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर राजपत्राप्रमाणे नावामध्ये बदल करून देण्याबाबत अपर तहसीलदार कार्यालय आष्टा या ठिकाणी अर्ज केला होता. तक्रारदार यांचे सातबारा उतार्‍यावर राजपत्राप्रमाणे नावामध्ये बदल करून देण्याच्या कामामध्ये सही करून प्रकरण तहसीलदार यांच्याकडे पाठवण्यासाठी नायब तहसीलदार पाटील व लिपिक तमायचे यांनी तक्रारदार यांच्याकडे एक हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

याबाबतचा तक्रारी अर्ज तक्रारदारांनी सोमवारी दिला होता. त्यानुसार ब्युरोच्या कार्यप्रणालीप्रमाणे लोकसेवक पाटील व लोकसेवक तमायचे यांची पंचा समक्ष पडताळणी केली असता पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक पाटील व लोकसेवक तमायचे यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपये लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवार 22 रोजी त्यांच्या विरुद्ध अपर तहसीलदार कार्यालय आष्टा या ठिकाणी सापळा लावला असता महसूल सहायक लोकसेवक सुधीर दीपक तमायचे यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून एक हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर त्यांना पकडण्यात आले.

“मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….!”; मलिकांच्या कारवाई प्रकरणी आशिष शेलारांचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने आज कारवाई करण्यात आली आहे. यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करीत मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. “मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….! ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच !,: असे शेलार यांनी म्हंटले आहे.

आशिष शेलार यांनी मलिकांवर कारवाई करण्यात आल्यानंतर ट्विट केले आहे. आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी….! असं म्हणताना, ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही. पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच !”, असे शेलार यांनी म्हंटले आहे.

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून मलिक यांच्यावर निशाणा साधला आहार. तत्पूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनीही मलिक यांच्यावर टीका केली आहार. त्यांनी डुक्करांचा जाळ्यात अडकल्याची फोटो ट्विट केला आहे. आज मलिक यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप केले जात आहेत.

Cryptocurrency prices : क्रिप्टो मार्केटमध्ये गोंधळ, 2 मोठ्या करन्सीमध्ये झाली 10% पेक्षा जास्तीने वाढ

Online fraud

नवी दिल्ली । मंगळवार, 22 फेब्रुवारी रोजी मोठ्या घसरणीनंतर, आज क्रिप्टोकरन्सी बाजारात मोठी वाढ झाली आहे, जरी कालच्या घसरणीच्या तुलनेत ही वाढ निम्मी आहे. सकाळी 10:10 वाजता ग्लोबल क्रिप्टो मार्केट कॅप 3.96% ने वाढून $1.72T ($1.72 ट्रिलियन) वर पोहोचली आहे, काल त्याच वेळी $1.65 ट्रिलियन वरून 6.91% कमी आहे.

बुधवारी Bitcoin, Ethereum सह सर्व प्रमुख करन्सीमध्ये वाढ झाली आहे. टॉप कॉईन्समध्‍ये सर्वाधिक वाढ नोंदवणार्‍यांमध्ये Terra – LUNA, Avalanche, Cardano – ADA यांचा समावेश होतो. याशिवाय Solana – SOL आणि Shiba Inu मध्येही 6 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे.

आज सर्वात मोठी करन्सी असलेले Bitcoin $37,938.09 वर 3.22% वाढीसह ट्रेड करत आहे, तर Ethereum ची किंमत गेल्या 24 तासांत 4.31% ने वाढून $2,637.10 वर आहे. बातमी लिहिण्याच्या वेळी, क्रिप्टो मार्केटमध्ये Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41.9% होते, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 18.4% होते.

कोणत्या करन्सीमध्ये किती वाढ झाली ?
>> Terra – LUNA – प्राइस: $55.84, वाढ : 13.43%
>>Avalanche – प्राइस: $75.98, वाढ : 11.25%
>> Cardano – ADA – प्राइस: $0.9062, वाढ : 8.67%
>> Solana – SOL – प्राइस: $87.43, वाढ : 6.18%
>> Shiba Inu – प्राइस: $0.00002494, वाढ : 6.18%
>> XRP – प्राइस: $0.7154, वाढ : 4.85%
>> Dogecoin – DOGE – प्राइस: $0.131, वाढ : 3.91%
>> BNB – प्राइस: $374.29, वाढ : 5.38%

24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सी
या काळात सर्वात मोठ्या वाढ झालेल्या करन्सी बद्दल बोलायचे झाल्यास, Meta Dragon City (DRAGON), Doge Rise Up आणि Gems मध्ये जबरदस्त उडी मारली गेली. Meta Dragon City (DRAGON) नावाच्या टोकनने गेल्या 24 तासांत सर्वात मोठी उडी घेतली. हे टोकन 323.75% वाढले आहे. Doge Rise Up मध्ये 302.26% आणि Gems मध्ये 264.53% ची वाढ झाली आहे.

“केंद्राच्या विरोधात स्पष्ट भूमिका मांडल्यामुळे ईडीकडून कारवाई”; शरद पवारांचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ईडीच्यावतीने आज सकाळी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरी जाऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “मलिक यांच्यावरील कारवाईच्या या संपूर्ण प्रकरणी कोणतेही आश्चर्य वाटलेले नाही. कोणतेतरी प्रकरण काढून मलिकांना अडकवले जाण्याचा प्रयत्न होईल, याची आम्हाला खात्री होती, जे लोक केंद्राच्या विरोधात भूमिका स्पष्ट आणि थेट भूमिका मांडतात, त्यांना त्रसा देण्याचा प्रयत्न आहे,’ असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

शरद पवार यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आम्हाला मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती होती. आज ना उद्या हे घडेल, काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल याची कल्पना होती. त्यामुळे याबद्दल अधिक भाष्य करायची गरज नाही. साधा कार्यकर्ता असला, की दाऊदचे नाव घ्यायचे आणि अडकवायचे, असले प्रकार सुरु असल्याचे पवार यांनी म्हंटले.

मलिकांच्या आरोपानंतर पवार यांनी स्वतःवरही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी ते म्हणाले की, त्या काळात माझ्यावरही असाच आरोप झाला होता. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. याला आता 25 एक वर्ष झाली. तरी आता तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणे, त्रास देणे, जे लोक केंद्राच्या विरोधात भूमिका स्पष्ट आणि थेट भूमिका मांडतात, त्यांना  त्रास देण्याचा प्रयत्न आहे,’ असा थेट हल्लाबोल शरद पवार यांनी

धुमशान : सातारा जिल्ह्यात 8 पालिकांचा बिगुल वाजला

State Election Commission

सातारा | निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या प्रारुप रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुदत संपलेल्या सातारा, कराड, फलटण, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या 8 पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.2 मार्चपासून प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.

प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 8 पालिकांच्या निवडणुकींच्या हालचाली अधिक गतीमान होणार आहेत. यामध्ये अ वर्गातील सातारा, ब वर्गातील कराड व फलटण, तसेच क वर्गात महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, रहिमतपूर, वाई या नगरपालिकांचा समावेश होत आहे. या मुदत संपलेल्या पालिकांवर प्रशासकांची नियुक्ती आहे. पालिकांच्या अ, ब, क व ड वर्गवारीनुसार 208 सदस्यांसाठी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना केली जाणार आहे. त्यानुसार दोन मार्चपासून प्रभाग रचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे 7 मार्च, प्रारुप प्रभाग रचना जिल्हाधिकारी कार्यालय व पालिकांच्या कार्यालयात तसेच वेबसाईटवर प्रसिध्द करणे 10 मार्च, या कच्च्या प्रारुपावर हरकती, आक्षेप मागविण्यासाठी 10 ते 17 मार्च मुदत राहणार आहे. दाखल झालेल्या हरकती, आक्षेपांवर सुनावणी घेण्यासाठी 22 मार्चपर्यंत मुदत असेल. हरकती व आक्षेपावर अभिप्राय देऊन राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविण्याची मुदत 25 मार्च असेल. राज्य निवडणूक आयोग अंतिम प्रभाग रचनेस 1 एप्रिलपर्यंत मान्यता देणार आहे. 5 एप्रिलला जिल्हाधिकारी अंतिम अधिसूचना प्रसिध्द करणार आहे.

Gold Price : सोन्याचे दर पुन्हा घसरले, आजची किंमत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीनंतर आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा दर आज 0.31 टक्क्यांनी घसरला तर चांदीचा दरही 0.23 टक्क्यांनी घसरला आहे. काल सोन्याचा भाव 0.76 टक्क्यांनी मजबूत होत होता तर चांदीच्या दरात 1.10 टक्क्यांची वाढ झाली आहे.

जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते लवकर खरेदी करा. 2022 मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 52,000 रुपयांच्या वर जाऊ शकतो, असा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत.

सोन्या-चांदीचा भाव
एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.31 टक्क्यांनी घसरून 50,170 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये 0.23 टक्क्यांच्या घसरणीसह चांदी 64,200 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,950 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,130 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,000 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,180 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,330 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,000 रुपये
पुणे – 45,950 रुपये
नागपूर – 46,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,180 रुपये
पुणे – 50,130 रुपये
नागपूर – 50,330 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4615.00 Rs 4605.00 -0.217 %⌄
8 GRAM Rs 36920 Rs 36840 -0.217 %⌄
10 GRAM Rs 46150 Rs 46050 -0.217 %⌄
100 GRAM Rs 461500 Rs 460500 -0.217 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5035.00 Rs 5015.00 -0.399 %⌄
8 GRAM Rs 40280 Rs 40120 -0.399 %⌄
10 GRAM Rs 50350 Rs 50150 -0.399 %⌄
100 GRAM Rs 503500 Rs 501500 -0.399 %⌄