Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2748

नागपुरात मोबाइलमुळे विवाहितेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल; संसाराची झाली राख-रांगोळी

mobile use

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 31 वर्षीय विवाहित महिलेनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मोबाइलवर कुणाशी बोलत होती? याबाबत विचारणा केल्यानंतर पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला होता. या वादानंतर पती झोपी जाताच संबंधित महिलेने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. शनिवारी सकाळी साडे सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पूनम मनोज मेहता असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित महिलेचे नाव आहे. त्या नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरातील सद्गुरू नगरात पती मनोज शिवप्रसाद मेहता आणि मुलासोबत राहत होत्या. मृत पूनम यांचे पती मनोज यांचे किराण्याचे दुकान आहे. या दोघां पती पत्नींमध्ये सर्वकाही सुरळीत सुरू होते. मात्र मागच्या काही काळापासून मृत पूनमला मोबाइलचे व्यसन जडले होते. ती आपल्या पतीपासून लपवून सतत मोबाईलवर कोणाशीतरी बोलायची. पती जवळ येताच ती पटकन मोबाईल बंद करायची.

यानंतर पतीने याबाबत विचारणा केली असता ती काहीच सांगत नव्हती. यामुळे पती मनोजच्या मनात तिच्या विरुद्ध संशय निर्माण झाला. त्यामुळे मनोजने पत्नी पूनमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण पूनमचे फोनवरचे बोलणे काही कमी झाले नाही उलट वाढतच गेले. घटनेच्या दिवशीसुद्धा पूनम रात्री अकराच्या सुमारास मोबाइलवर गप्पा मारत होती. त्यावेळी मनोजने कुणासोबत बोलतेस हे सांग, असा हट्ट धरला. पण पूनमने काहीच सांगितलं नाही. यानंतर मनोजने पत्नीच्या कृत्याला कंटाळून तिच्या घरच्यांना फोन करून संबंधित प्रकाराची माहिती दिली. यानंतर मोबाइलवर संभाषण सुरू असल्याची माहिती माहेरी कळाल्यामुळे पूनम अस्वस्थ झाली आणि तिने आपला पती झोपी गेल्यानंतर राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली.

डॉक्टरी पेशाला काळीमा ! डॉक्टरने दारू पिऊन 50 वर्षीय महिलेसोबत रुग्णालयात केले ‘हे’ कृत्य

doctor

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये डॉक्टरच्या पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या 50 वर्षीय महिलेसोबत डॉक्टरने अश्लील वर्तन केले आहे. बीडच्या नेकनूर या ठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर या नराधम डॉक्टरावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
बीड तालुक्यातील नेकनूर येथील कुटीर रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेल्या महिलेला तपासणी करण्याच्या बहाण्याने घेऊन जात आतून कडी लावून अश्लील वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. या आरोपी वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव डॉ.अशोक बांगर असे आहे. त्याने दारूच्या नशेत हे दुष्कृत्य केले आहे. या महिलेने तिच्या सोबत घडलेला प्रकार वैद्यकीय अधीक्षक डॉ शिंदे यांना सांगितला. यानंतर या महिलेने आरोपी डॉक्टराविरोधात जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार केली असल्याचे डॉक्टर शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

यापूर्वी देखील या डॉक्टरने दारू पिऊन अनेक महिलांसोबत गैरवर्तन केले होते. मात्र आपली बदनामी होईल या भीतीने महिला पुढे आल्या नाहीत. तर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्स आणि परिचारक यांच्यामध्ये देखील या डॉक्टराची दहशत आहे. आरोपी डॉ.अशोक बांगर हे कंत्राटी तत्वावर नेकनूरच्या कुटीर आणि स्त्री रुग्णालयामध्ये गेल्या काही महिन्यांपासून कार्यरत आहेत. पीडित महिला पायाला खाज सुटली म्हणून डॉ.बांगर यांच्याकडे उपचारासाठी आली होती. त्यावेळी डॉ.बांगर याने या महिलेला तपासणीच्या बहाण्याने रूममध्ये नेले तसेच रूमची कडी लावून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. यानंतर या पीडित महिलेने याबाबतची तक्रार वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिंदे यांच्याकडे केली. यानंतर डॉ . शिंदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे या प्रकरणाचा अहवाल पाठवला आहे. या आरोपी डॉक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी या पीडित महिलेने केली आहे.

ह्रदयद्रावक! शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू

औरंगाबाद – वाळूज जवळील शेकापूर शिवारातील शेततळ्यात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. प्रतिक आनंद भिसे (14) , तिरुपती मारुती कुडाळकर (14), शिवराज संजय पवार (16) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. तिघेही रविवारी दुपारी सायकल सफरीवर गेले होते. त्यानंतर आज ही घटना उघडकीस आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सारा संगम सोसायटीमध्ये राहणारी प्रतिक, तिरुपती आणि शिवराज हे तिघे मित्र रविवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान भांगासी माता गडाकडे सायकल सफरीवर गेले होते. सायंकाळी परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी तिघांचाही खूप शोध घेतला. कुठेच मिळून न आल्याने नातेवाईकांनी रविवारी रात्री उशिरा पोलिसात तक्रार दिली.

त्यानंतर आज सकाळी शेकापूर शिवारातील नारायण वाघमारे यांच्या शेताजवळ दोन सायकल आढळून आल्या. पुढे पाहणी केली असता शेत तळ्यात तिघांचे मृतदेह आढळून आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

विवाहित कॉन्स्टेबल पत्नीचा नायब तहसीलदारावर जडला जीव अन्…

Ruchi Singh

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता हा मृतदेह पोलीस कॉन्स्टेबल रुची सिंह हीचा असल्याचे समोर आले. यामुळे संपूर्ण पोलीस दल हादरला आहे. हि हत्या प्रेम प्रकरणातून झाली असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. पोलीस कॉन्स्टेबल रुची सिंह हिची फेसुबकच्या माध्यमातून एका नायब तहसीलदारांसोबत ओळख झाली होती. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे दोघेही विवाहित आहेत आणि पाच वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र मृत कॉन्स्टेबल रुची सिंह लग्नासाठी नायब तहसीलदारावर दबाव टाकत होती. त्यातूनच हि हत्या झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

काय आहे प्रकरण?
महिला कॉन्स्टेबल रुची सिंह 13 फेब्रुवारीपासून ड्युटीवर आली नव्हती. त्यामुळे तिच्या सहकाऱ्यांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र रुची सिंहचा फोन सतत बंद येत होता. यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला.

नाल्यात आढळून आला मृतदेह
काली माता परिसरातील एका नाल्यामध्ये रुची सिंहचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर लखनऊच्या पीजीआय पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी सुशांत गोल्फ पोलिस स्टेशनला याची माहिती दिली. यानंतर कॉन्स्टेबल रुचीसोबत काम करणारे सहकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली. यानंतर बिजनौरमधील महिला कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांनाही याची माहिती देण्यात आली. लेडी कॉन्स्टेबल रुचीचे लग्न एका कॉन्स्टेबलसोबतच झाले होते. ते सध्या कुशीनगर या ठिकाणी तैनात आहेत.

पाच वर्षांपासून होते रिलेशनशिप
प्रतापगडमधील राणीगंज येथे तैनात असलेल्या नायब तहसीलदाराने फेसबुकच्या माध्यमातून रुचीशी मैत्री केली होती. यानंतर हळूहळू यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. हे दोघेही गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. संबंधित नायब तहसीलदारही विवाहित असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र महिला कॉन्स्टेबल त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. पोलीस या प्रकरणी आरोपी नायब तहसीलदाराची चौकशी करत आहेत. या सर्व प्रकरणाचा लवकरच खुलासा होईल असे लखनऊ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

शिवसेनेच्या माजी शाखाप्रमुखाच्या मुलाची दादागिरी; मुलासमोरच वडिलांना केली बेदम मारहाण

वसई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईजवळील वसईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शिवसेनेच्या माजी शाखा प्रमुखाच्या मुलाने रिक्षाची धडक का दिली याचा जाब विचारल्याच्या रागातून एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
नालासोपारा पूर्व नगीनदास पाडामधील माजी शिवसेना शाखा प्रमुख गणेश मेधेकर यांचा मुलगा सागर मेधेकर याने एका व्यक्तीला शुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. किरकोळ वादातून आरोपी सागर मेधेकर याने अब्दुल हाफिज नावाच्या व्यक्तीला बेदम मारहाण केली. माजी शिवसेना शाखा प्रमुख यांचा मुलगा सागर हा रिक्षाचालक आहे.

जखमी अब्दुल हाफिज हे आपल्या मुलाला ट्युशन क्लास मधून घरी परत घेऊन जात असताना सागर मेधेकर याने हाफिज यांना रिक्षाने धडक दिली. त्यामुळे अब्दुल हाफिज यांनी सागर मेधेकर याला धडक का दिली म्हणून विचारणा केली. त्यामुळे रागाच्या भरात सागर मेधेकर याने हाफिज यांना बेदम मारहाण केली आहे. या हल्ल्यात अब्दुल हाफिज यांना गंभीर दुखापत झाली असून विरार महापालिकेच्या तुळींज रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी आरोपी सागर मेधेकर याला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

गडचिरोलीत राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस शिपायाने स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. प्रमोद शोकोकर असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव होते. मृत प्रमोद शोकोकर हे अहेरी उपविभागीय अंतर्गत ताडगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते मूळ बुलडाणा येथील रहिवासी होते. ते ताडगाव पोलीस स्टेशन येथून काही दिवसांपूर्वीच आमदार धर्मराव आत्राम आमदार यांच्याकडे सुरक्षा गार्ड म्हणून रुजू झाला होता. कुटुंबातील तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजत आहे.

काय आहे प्रकरण?
गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत तैनात पोलीस शिपायाने स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मृत सुरक्षारक्षक प्रमोद शोकोकर हे अहेरी उपविभागीय अंतर्गत ताडगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जवान म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच ते आमदार धर्मराव आत्राम यांच्याकडे सुरक्षा गार्ड म्हणून रुजू झाले होते. मृत प्रमोद शोकोकर यांनी कौटुंबिक ताण तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती सापडली आहे.

धर्मराव बाबा आत्राम कोण आहेत?
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम चार वेळा निवडून आले आहेत. आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीसुद्धा होते. अहेरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र या मतदारसंघात खिंडार पडल्यानंतर धर्मराव बाबांचा एकदा अपक्ष दीपक आत्राम आणि दुसऱ्यांदा पुतणे आणि भाजप उमेदवार अंबरीश आत्राम यांनी पराभव केला होता. मात्र 2019 मध्ये धर्मराव बाबांनी जोरदार कमबॅक करत पुन्हा निवडणूक जिंकली.

भयानक : अल्पवयीन, मतिमंद मुलीवर बलात्कार प्रकरणी 9 जणांना पोलीस कोठडी

पाटण | पाटण येथील अल्पवयीन व मतीमंद मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे. पुण्यातील सर्व आरोपींना कोर्टात हजर केले असता 8 जणांना 10 दिवसाची तर महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण येथील एका महीलेने दि. 27/01/2022 रोजी ते 18/2/2022 या दरम्यान तिच्या परीचयाच्या एका अल्पवयीन व मतीमंद मुलीचा गैरफायदा घेवून तिला बाहेर फिरायला नेण्याचे बाहेर खाऊ खायला देण्याचे व पैसे देण्याचे आमीष दाखवुन तिला बाहेर घेवून गेली. मुलीला पाटण व आजुबाजुचे परीसरातील लोकांशी ओळख करून देवुन त्यांचेशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. सदर पाटण व आजुबाजुचे परीसरातील 8 लोकांनी सदर अल्पवयीन व मतीमंद पिडीत मुलीवर वेळोवेळी व वेगवेळ्या ठिकाणी नेवुन वारंवार बलात्कार केला आहे.

याबाबत यातील पिडीत अल्पवयीन मतीमंद मुलीचे आईने दिले तक्रारीवरून पाटण पोलीस सदर गुन्हयातील सर्व 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक पाटण पोलीस ठाणे यांनी केला असून. पोलीस अधिक्षक सातारा यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा पुढील तपास महीला पोलीस अधिकारी करीत आहेत. त्यांना आज कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात रिमांड कामी हजर करण्यात येणार आले होते. न्यायालयाने 8 आरोपींना 10 दिवस तर महिलेस 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मित्रांचा आग्रह नडला ! नवरदेवाला हळदीच्या दिवशी तलवार नाचवून डान्स करणे पडले महागात

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एका नवरदेवाला आणि त्याच्या मित्रांना लग्नाचा अतिउत्साह महागात पडला आहे. या नवरदेवाच्या हळदीच्या कार्यक्रमात हातात तलवारी घेऊन नाचणे नवरदेव आणि त्याच्या मित्रांना चांगलेच महागात पडले आहे. हातात तलवार आणि कोयते घेऊन नाचणाऱ्या नवरदेव आणि त्याच्या मित्रांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये पाच जणांना अटकसुद्धा करण्यात आली आहे. मात्र नवरदेव फरार झाला आहे. लातूर पोलिसांकडून फरार नवरदेवाचा शोध सुरु आहे.

नेमकं काय घडलं?
लातूर शहरातल्या एलआयसी कॉलनी भागात हळदीचा कार्यक्रम सुरु होता. यामध्ये काही तरुण मोठ्या कर्कश्श आवाजत डीजे लावून हातात तलवारी घेऊन धिंगाणा घालत होते.

हळदीच्या धिंगाण्यात पोलिसांची एन्ट्री
पोलिसांना हळदी समारंभाच्या नावाखाली धिंगाणा सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलीस आल्याचे पाहून या सगळ्यांची धावपळ सुरु झाली.

सात जणांवर गुन्हा दाखल
यानंतर पोलिसांनी तलवारी ताब्यात घेऊन सात जणांवर गुन्हा दाखल केला. त्यातल्या पाच जणांना विवेकानंद पोलिसांनी अटकसुद्धा केली. मात्र या दरम्यान नवरदेव शुभम तुमकूटे हा फरार झाला आहे. ऐन लग्नाच्या दिवशीच पसार होण्याची वेळ नवरदेवावर त्याच्या मित्रांमुळे आली आहे. विवेकांनद चौक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

IRCTC ने Tatkal App मध्ये केला मोठा बदल, आता कन्फर्म रेल्वे तिकीट मिळवणे सोपे होणार !

नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने तत्काळ तिकीट कन्फर्म करण्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेत तत्काळ तिकीट मिळणे आधीपेक्षा सोपे होणार आहे. IRCTC ने आपल्या जुन्या अ‍ॅपमध्ये अनेक बदल केले आहेत. IRCTC च्या या निर्णयामुळे लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना ट्रेनमध्ये कोटा शोधण्याची गरज भासणार नाही. IRCTC ने हे अ‍ॅप कन्फर्म तिकीट नावाने दाखवले आहे. तत्काळ कोट्यातील उपलब्ध जागांची माहिती या अ‍ॅपवर देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता वेगवेगळे ट्रेन नंबर टाकून तत्काळ कोट्यातून उपलब्ध जागा शोधण्याची गरज भासणार नाही.

या अ‍ॅपद्वारे, तुम्ही कोणत्याही मार्गावर धावणाऱ्या ट्रेनमध्ये आज, उद्या आणि परवा यासाठी तत्काळ कोट्यात उपलब्ध असलेल्या जागांची माहिती मिळवू शकता. आता तुम्हाला वेगवेगळ्या ट्रेनचे नंबर टाकून उपलब्ध जागा शोधण्याची गरज नाही. तुम्ही त्या मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये उपलब्ध असलेल्या तिकिटांची संपूर्ण माहिती एकाच वेळी मिळवू शकता. तुम्ही हे अ‍ॅप Google Play Store किंवा IRCTC अ‍ॅपवरूनही डाउनलोड करू शकता.

तुम्ही आता याप्रमाणे तत्काळ तिकिटे बुक करू शकता
तत्काळ तिकिटांचे बुकिंग सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होते. एसी कोचच्या डब्यासाठी सकाळी 10 वाजल्यापासून आणि नंतर स्लीपर किंवा नॉन एसी कोच किंवा क्लाससाठी 11 वाजल्यापासून तिकीट कापले जाते. तत्काळमध्ये तिकीट मिळवणे सोपे नाही. तत्काळमध्ये तिकीट काढायचे म्हणजे त्या दिवशी काढायचे. देशभरातील हजारो आणि लाखो लोकं एकत्रितपणे तत्काळ तिकिटे मिळविण्याचा प्रयत्न करतात, मात्र केवळ काही लोकांनाच तिकिटे मिळतात. त्यामुळे तत्काळमध्ये कन्फर्म तिकीट मिळविण्यासाठी वेळेची महत्त्वाची भूमिका असते.

वेळेची बचत करून तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल
तत्काळद्वारे तिकीट मिळवण्यात वेळेची भूमिका महत्त्वाची असते. अनेक प्रवाशांना डिटेल्स भरण्यासाठी वेळ लागतो. त्यानंतर कॅप्चा कोड टाकण्यास वेळ लागतो. त्यामुळे तिकीट काढण्यात बराच वेळ जात असून वेटिंग लिस्टसह तिकिटे उपलब्ध आहेत. हे टाळण्यासाठी आता IRCTC एक पर्याय देते. हा त्रास टाळण्यासाठी आता IRCTC अ‍ॅप किंवा वेबसाइटवरून प्रवाशांचे डिटेल्स सेव्ह करण्याचा पर्याय देते. तुम्ही त्या डिटेल्स आधीच भरून सेव्ह करा, ज्यामुळे बुकिंगच्या वेळी तुमचा वेळ वाचेल, ज्यामुळे तत्काळमध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. तिकीट बुक करताना, फक्त Add existing वर क्लिक करा.

तत्काळ तिकिटांसाठी, IRCTC तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, वॉलेट किंवा UPI च्या मदतीने बिल पेमेंट किंवा पेमेंट करण्याचा पर्याय देते. जर तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने तिकीट बुकिंगचे पेमेंट केले तर त्याचे सर्व डिटेल्स भरावे लागतील. खूप वेळ जातो आणि तिकीट काढले जात नाही. हे टाळण्यासाठी, आता तुम्ही IRCTC वॉलेटमध्ये आधीच पैसे ठेवावे. यामुळे तिकीट बुक करताना तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळेल.

आता गॅरेंटीशिवाय मिळू शकेल पर्सनल लोन, त्यासाठीचे व्याज दर आणि प्रोसेसिंग फी किती आहे हे जाणून घ्या

FD

नवी दिल्ली । तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पर्सनल लोन घेऊ शकता. यामध्ये घराची कागदपत्रे, सोने इत्यादी गहाण ठेवण्याची गरज नसते. इतर कर्ज प्रॉडक्ट्स च्या तुलनेत ही प्रक्रिया सोपी आहे जसे घर खरेदी किंवा शिक्षणासाठी कर्ज अर्ज करणे.

तुमचे आधीपासूनच कोणत्याही बँकेत खाते असल्यास, तुम्हाला पर्सनल लोन सहज मिळू शकते. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास बँका तुम्हाला परवडणाऱ्या दरात पर्सनल लोन देतात. मात्र, इतर कर्जांच्या तुलनेत त्याचे व्याजदर जास्त आहेत कारण त्यात जोखीम आहे. तुम्हाला एक लाख रुपयांचे पर्सनल लोन पाच वर्षांसाठी घ्यायचे असेल, तर जाणून घ्या कोणत्या बँकेचे व्याजदर आणि प्रोसेसिंग फी आहे.

पंजाब नॅशनल बँक
व्याज दर: 7.90-14.45%
EMI: 2023-2350 रुपये
1 जानेवारी 2022 ते 31 मार्च 2022 पर्यंत प्रोसेसिंग फी माफ

इंडियन बँक
व्याज दर: 9.05-13.65%
EMI: 2078-2309 रुपये
प्रोसेसिंग फी: एकूण कर्जाच्या रकमेच्या 1%

युनियन बँक ऑफ इंडिया
व्याज दर: 9.30-13.49%
EMI: 2090-2296 रुपये
प्रोसेसिंग फी: कर्जाच्या रकमेच्या 0.05 % आणि GST

बँक ऑफ महाराष्ट्र
व्याज दर: 9.45-12.80%
EMI : 2098-2265 रुपये
प्रोसेसिंग फी: कर्जाच्या रकमेच्या 1% आणि GST

IDBI बँक
व्याज दर : 9.50-14.00%
EMI: 2100-2327 रुपये
प्रोसेसिंग फी: कर्जाच्या रकमेच्या 1%

पंजाब आणि सिंध बँक
व्याज दर: 9.50-11.50%
EMI : 2100-2199 रुपये
प्रोसेसिंग फी: कर्जाच्या रकमेच्या 0.50 ते 1%

एसबीआय
व्याज दर: 9.60-13.85%
EMI: 2105-2319 रुपये
प्रोसेसिंग फी: 31 मार्च 2022 पर्यंत शुल्क माफ

सेंट्रल बँक ऑफ इंडिया
व्याज दर : 9.85-10.05%
EMI : 2117-2149 रुपये
प्रोसेसिंग फी : कर्जाच्या रकमेच्या 1%

इंडियन ओव्हरसीज बँक
व्याज दर : 10.00-12.05%
EMI : 2125-2227 रुपये
प्रोसेसिंग फी: कर्जाच्या रकमेच्या 0.40 ते 0.75%

बँक ऑफ इंडिया
व्याज दर : 10.35-12.35%
EMI : 2142-2242 रुपये
प्रोसेसिंग फी : कर्जाच्या रकमेच्या 2% पर्यंत