Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2747

निविदा घ्या म्हणत अंगावर ओतून घेतले रॉकेल

petrol

औरंगाबाद – घनसावंगी तालुक्यातील रांजणी ते कुंभार पिंपळगाव ते राजाटाकळी या रस्त्याच्या 200 कोटींतून दुपदरीकरण व मजबुतीकरणाच्या कामासाठी ऑनलाईन व ऑफलाइन निविदा भरण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. कंत्राटदाराची निविदा घेण्यास नकार देताच त्याने अंगावर रॉकेल ओतून घेण्याचा प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांच्या दालनात घडल्याने एकच गोंधळ उडाला.

ऑफलाइन निविदा स्वीकारली जात नसल्याचे बघून नाशिकचे कंत्राटदार पवन पाटील यांनी मुख्य अभियंता यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतून घेताच विभागातून निघून गेलेल्या अधिकारी-कर्मचारी पळत आले आणि त्यांनी निविदा स्वीकारली. नाशिकच्या जे. एम. म्हात्रे आणि एस.ए. सावंत फर्म कडून पाटील हे ऑफलाईन तांत्रिक निविदा सादर करण्यासाठी बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंता कार्यालयात सकाळी आले होते.

आवक-जावक विभागाकडे त्यांनी विनवणी केली नकार मिळाल्यानंतर ते मुख्य अभियंता दिलीप उर्कीडे यांच्या दालनात गेले. निविदा स्वीकारली नाहीतर आत्मदहन करीन असा इशारा देत त्यांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले.

“भाजप-शिवसेना युतीसाठी प्रयत्न करणार, राऊतांची घेणार भेट”; रामदास आठवलेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना युतीबाबत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेनेने आता अडीच वर्ष सत्ता भोगली आहे तेव्हा त्यांनी भाजपला संधी द्यावी. शिवसेनेने भाजप सोबत येऊन पुन्हा एकदा युती करावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार आहे. यासाठी मी संजय राऊत यांची भेट घेणार असल्याचे मोठे विधान आठवले यांनी केले आहे.

रामदास आठवले यांनी औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप शिवसेना युतीबाबत मोठे विधान केले. यावेळी ते म्हणाले की, “महविकास आघाडीत शिवसेनेचे मोठे नुकसान होत आहे. आता खरी वेळ आली आहे की शिवसेनेने भाजपसोबत युती करावी. शिवसेनेने अडीच वर्षे सत्ता भोगली आहे. आता भाजपसोबत युती करून शिवसेनेने भाजपला संधी द्यावी.”

राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार आहे. महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेऊन भाजपसोबतचे भांडण मिटवावे. आम्हाला काही सत्तेची आवश्यकता नाही. महाविकास आघाडी सरकारला आता अडीच वर्ष होत आलेली आहेत. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना विचार करत असेल आणि भाजपही त्या फॉर्म्युल्यावर तयार होऊ शकेल. शिवसेना भाजप युती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी मी संजय राऊत यांना भेटून युतीसाठी आग्रह धरणार असल्याचे आठवले यांनी म्हंटले.

“मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही”; आठवलेंचे प्रकाश आंबेडकरांबाबत सूचक वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सोमवारी औरंगाबादचा दौरा केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर काही मते मांडले. तसेच बहुजन वंचित आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनाही सल्ला दिला. “प्रकाश आंबेडकरांनी गांभीर विचार करावा कि मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही, जिंकून येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा मात्र यापूर्वी त्यांनी जागा निवडणून आणल्या नाहीत,” असे सूचक वक्तव्य आठवले यांनी केले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी औरंगाबाद येथे बहुजन वंचित आघाडीच्यावतीने निवडणुक लढवली जात असल्याने याबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्ष स्थापन केला.

डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेल्या या पक्षाला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाची, व्यापक करण्याची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. एकच लक्ष रिपलिकन पक्ष असा निरा दिला पाहिजे, प्रकाश आंबेडकर सोबत आल्याशिवाय ऐक्य शक्य नाही,” असेही आठवले यांनी म्हटले.

सत्ता गेल्यापासून फडणवीस नैराश्यात, त्यांच्यावर बोलून वेळ वाया घालवणार नाही

Aditya thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजलमधील वाद विकोपाला गेला आहे. त्याच दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर निशाणा साधला आहे. सत्ता गेल्यापासून फडणवीस हे नैराश्यात आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. ते कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलून मी माझा वेळ वाया घालवणार नाही. कारण त्यांना सत्ता गेल्यापासून खूप नैराश्य आले आहे. त्यामुळे ते बोलत असतात. त्यांच्यावर बोलण्यासारखं काही नाही,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना केली.

ते पुढे म्हणाले, गेले दोन महिने बघत असाल, उत्तर प्रदेशातील बेरोजगारी, तिथल्या समस्या तसेच तेथील कोरोना परिस्थिती हाताळण्यात भाजप अपयशी ठरले आहे. त्यामुळे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी विरोधी पक्ष वाटेल ते आरोप करत आहे.

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक यांचे निधन

कराड | शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, महाराष्ट्र एसटी सेनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष, कराडचे माजी नगरसेवक रामचंद्र विष्णुपंत रैनाक ऊर्फ रामभाऊ रैनाक (वय-62)  यांचे सोमवारी दि. 21 रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. रामभाऊ रैनाक हे शिवसैनिक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कराडमध्ये 1980 च्या दशकात सात नगरसेवक निवडून आले होते. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रामभाऊ रैनाक हे संघटन कौशल्य, उपक्रमशीलता व मनमिळावू स्वभावाच्या रामभाऊ रैनाक यांनी कराड शहर तसेच तालुक्यामध्ये शिवसेनेचा प्रसार आणि आणि प्रचार सुरू केला. संपूर्ण तालुक्यांमध्ये शिवसेनेचा विचार रुजवण्यामध्ये आणि वाढविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. शिवसैनिक तशी भावना व्यक्त करत असतात. गेल्या तीन दशकाहून अधिक काळ कराड तालुक्यामध्ये शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यावर सातारा उपजिल्हा प्रमुख पदाची धुरा जबाबदारी पडली होती. त्यासह एस. टी कामगार सेनेच्या कार्यात देखील त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवला होता.

कराड तालुक्यातील सर्वात ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या रामभाऊ रैनाक यांच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कराड येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये कराड तालुक्यातील शिवसैनिकांवर एकापाठोपाठ एक असे दुःखाचे प्रसंग सुरू आहेत. शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत पवार, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख अशोक भावके, माजी शहर प्रमुख राजेंद्र जाधव, उपतालुका प्रमुख भिमराव कळंत्रे, कराड उपशहरप्रमुख कुलदीप जाधव या पदाधिकारी शिवसैनिकांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातन सावरणाऱ्या शिवसेनेवर रामभाऊ रैनाक यांच्या अकाली निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला. कराड नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा श्रीमती छाया रैनाक यांचे पती होत.

पुण्यातील मटका व्यावसायिकाचा खून : सातारा पोलिसांकडून 12 तासात 6 जणांना अटक

खंडाळा | शिरवळ, (ता. खंडाळा) येथील एका इमारतीच्या टेरेसवर रविवारी दि. 20 रोजी डोक्यात गोळी झाडून एकाचा खून केल्याप्रकरणी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिरवळ पोलिसांनी 6 जणांना 12 तासाच्या आतच  जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांना गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले असून प्राथमिक तपासात आर्थिक देवाणघेवाणीच्या कारणावरून हा खून झाला असल्याचे दिसून येत आहे.

शिरवळ येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने उपस्थित होते.

अजय बन्सल पुढे म्हणाले, रविवारी दि. 20 फेब्रुवारी रोजी 7.10 वाजण्याच्या सुमारास अजित सुरेश भटे (रा. लेक पॅलेस, फुल मळा, शिरवळ) यांनी शिरवळ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक पाटणकर यांना लेक पॅलेस टेरेसवर एक इसम रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती दिली होती. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता अज्ञात इसमाने एका व्यक्तीचा गोळी मारून खून केला असल्याचे दिसून आले. याबाबत पोलिस निरीक्षक सतीश आंदेलकर यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर अज्ञात इसमावर गुन्हा दाखल झाला होता. या घटनेतील संशयितांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि शिरवळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या होत्या.

या घटनेचा तपास सुरू असताना सर्वप्रथम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खून प्रकरणात एक संशयित इसमाचा सहभाग असल्याची माहिती प्राप्त झाली. तो पुणे येथे असल्याचे समजतात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ पुणे येथे रवाना होऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मोक्कामधील फरारी व त्याच्या पाच साथीदारांनी आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणावरून संबंधितचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यातील तिघांना पुणे येथून तर दोघांना फलटण शहरात नाकाबंदी करून जेरबंद केले. तरबेज महंमद सुतार (वय-31, रा. ओमसाई अपार्टमेंट वरखडेनगर, कात्रज, पुणे), विकी राजेंद्र जाधव (रा. वानवडी केदारीनगर, पुणे), शंकर अश्रुबा पारवे उर्फ तात्या (पारवे रा. अंबामाता मंदिर सुखसाखर नगर, बिबेवाडी पुणे), नितीन संषीत पतंगे (रा. अप्पर कोंडवा रोड, साईनगर बिबेवाडी पुणे), राकेश सुरेश गायकवाड (रा. आनंदनगर, मार्केटयार्ड पुणे), किरण बबनराव साळने (रा.आंबेगांव पठार पुणे) अशी जेरबंद केलेल्या संशयितांची नावे आहेत, अशी माहिती अजय बन्सल यांनी यावेळी दिली.

दिशा सॅलियनला रात्री पार्टीतून घरी घेऊन गेलेली ‘ती’ कार सचिन वाझेची? ; नितेश राणेंचे ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. नुकतीच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुशांत सिंहची मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूसंबंधी गंभीर आरोप केले होते. यादरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट असून या प्रकरणात सचिन वाझेचा सहभाग होता का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच दिशा सॅलियनला रात्री पार्टीतून घरी घेऊन गेलेली ती कार सचिन वाझेची? असल्याचे खळबळजनक ट्विटही त्यांनी केले आहे.

नितेश राणेंनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “मुंबईच्या महापौरांनी महिला आयोग आणि त्यानंतर मालवणी पोलिसांना पत्र लिहून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ राज्य सरकारकडून ८ जूनच्या रात्री काहीच झाले नाही अंस दाखवण्यासाठी मोठी तयारी सुरु आहे. चला किमान ते आपली कबर खोदत आहेत याचा आनंद आहे.

आम्हाला मालवणी पोलिसांची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद राहिली आहे. आणि आता त्यांना दिशा सॅलियन प्रकरणात अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिशासोबत राहणारा आणि ८ तारखेच्या रात्री उपस्थित असणाऱा रोहित राय पुढे येऊन काहीच का बोलत नाही?,” असा सवाल नितेश राणेंना विचारला आहे.

वास्तविक पाहता दिशाला ८ तारखेच्या रात्री काळ्या मर्सिडीजमधून तिच्या मालाडच्या घरी नेण्यात आले. सचिन वाझेकडेही काळी मर्सिडीज आहे जी सध्या तपास यंत्रणांकडे आहे. ही तीच कार आहे का? ९ जूनला त्याला पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आलं. संबंध?,” .

आमदार बोरनारे यांचे प्रकरण विधानसभेत आणणार

औरंगाबाद – भावजयीला मारहाण करणारे वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजप महिला आघाडी व तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची औरंगाबादेत भेट घेतली. संबंधित प्रकरणाचे गांभीर्य समजून घेत फडणवीस यांनी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

भाजपच्या कार्यक्रमात हजेरी लावली म्हणून रमेश बोरनारेसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी भावजयीसह भावाला बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर जखमी भाऊजी वरच सत्तेचा गैरवापर करून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. यासाठी आमदार बोरणारे यांनी खाजगी सचिव यांचा वापर केला. बोरणारे कुटुंबियांनी महिलेला मारहाण केल्याची ही तालुक्यातील दुसरी घटना समोर आली. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या आमदारांवर कडक कारवाईची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने फडणवीसांकडे केली.

बोरनारे कुटुंबीय तसेच त्यांचे समर्थक काही दिवसांपासून मस्तवालपणे वागत आहेत. महिला मारहाण प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप पदाधिकारी यांना देखील आमदार बोरनारे यांनी एका एकाला पाहून घेतो अशी धमकी दिल्याचे शिष्टमंडळाने देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. सर्व प्रकार गंभीरतेने समजून घेत फडणवीस यांनी विधानसभेत उठवणार असून मस्तवालपणे वागणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाईची मागणी केली जाईल, असे त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.

रोजगाराच्या ‘हमीत’ औरंगाबाद अव्वल

Samrudhi bogada work
Samrudhi bogada work

औरंगाबाद – कोरोना काळात रोजगाराची हमी दिल्यामुळे राज्यात औरंगाबाद जिल्ह्याने नंबर वन बाजी मारण्याचा बहुमान मिळविला आहे. सोलापूर दुसऱ्या क्रमांकावर असून नाशिक सर्वात मागे पडले आहे.

रोहयो अभियानात मनुष्यदिवस निर्मिती म्हणजेच जास्त दिवस काम उपलब्ध करुन देण्यात जिल्ह्याने 252 टक्के उद्दिष्ट साध्य केले. द्वितीय क्रमांकावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात 187 टक्के, तर मराठवाड्यातील लातूरने 158 तर नांदेड 149 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली व्यवसाय बंद झाले. या काळात रोहयोने मदतीचा हात देत रोजगार दिला.

शासनाने उद्दिष्टांत मागे असलेल्या जिल्ह्यातील तालुक्यातील गटविकास अधिकारी, तहसीलदार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. भंडारा, नंदुरबार, धुळे, रत्नागिरी आणि नाशिक हे जिल्हे सर्वात मागे आहेत.

शिवसेना-भाजप एकत्र आले पाहिजे; आठवलेंचा पुनरुच्चार

ramdas aathwale

औरंगाबाद – कालच केसीआर आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर टीका केल्यानंतर आज पुन्हा आठवलेंनी महाविकास आघाडीला टार्गेट केले आहे. महाविकास आघाडीवर टीका करताना रामदास आठवले म्हणले, हे सरकार मॅनेजमेंट चांगलं करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहेत. सरकारकडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात नाही. सरकार पाडण्याचा आमचा मानस नाही, त्यामुळे संजय राऊत यांचे आरोप निरर्थक आहेत. तसेच केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीचा होत नाही, मोदी सरकारला अशा छोट्या चौकशी करण्याची गरज नाही. केंद्र विकास आराखडा घेऊन पुढे जात आहे.आमचे सरकार मुद्दाम कोणाला त्रास देणार नाही, असे म्हणत त्यांनी मोदी आणि भाजपची पाठराखण केली आहे. राज्यात सध्या जे जोरदार तू तू मै मै सुरू आहे, त्यावर केंद्रीय मंत्री रामदार आठवले बोलत होते.

राज्यात सध्या सुरू असलेले भांडण मिटलं पाहिजे असे आम्हाला वाटतं, उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा आणि संजय राऊत यांना समज द्यावा, असा सल्लाही यावेळी आठवलेंनी दिला आहे. तसेच शिवसेना-भाजप एकत्र आले पाहिजे. दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. जुन्या फार्मुल्यावर एक असल्यास भाजप देखील तयार होईल, असे पुनरुच्चार आठवलेंनी केलाय. ठोस पुरावे नसताना आरोप करू नये, राणे यांच्या घरावर कारवाई करणारे अधिकारी इतके वर्ष झोपले होते का? सूडाची भूमिका असू नये. कंगना रानावत यांचे कार्यालय देखील तोडण्यात आले होते. आरोप शिवसेनेकडून होत आहेत त्याला भाजप उत्तर देत आहेत, असेही आठवले म्हणाले.

सध्या पाच राज्यात निवडणुका आहेत यावर बोलताना आठवले म्हणाले, उत्तर प्रदेश मध्ये भाजपाला तीनशेपेक्षा जास्त जागा मिळतील. आम्ही उमेदवार उभे केले नाही. आमचा भाजपलं पाठिंबा आहे. दलित मतांवर मायावतीनाच फक्त अधिकार नाही. ऐक्यासाठी पुढे आले पाहिजे, दलित पँथरची स्थापना नव्याने करण्याची गरज आहे, सत्तेत येणाची इच्छा प्रत्येकला असते मात्र तशी ताकद निर्माण झाली पाहिजे. विखूरलेला समाज एकवटण्याची गरज आहे, असे मत आठवलेंनी व्यक्त केले आहे. तसेच बसपाचा जनाधार कमी होत आहे.असेही आठवले म्हणाले. तसेच प्रकाश आंबेडकरांनी गांभीर विचार केला पाहिजे. मत खाण्याच्या राजकारणात समाजाचं भलं होणार नाही, जिंकून येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा मात्र जागा निवडणून आणल्या नाहीत, बाबासाहेबांनी सुरु केलेला रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्याची गरज आहे. एकच लक्ष रिपलिकन पक्ष असा निरा दिला पाहिजे, प्रकाश आंबेडकर सोबत आल्याशिवाय ऐक्य शक्य नाही, असेही ते म्हणाले.