Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2749

Share Market : सेन्सेक्स 149 अंकांनी घसरला, निफ्टी 17207 वर बंद झाला

Stock Market

नवी दिल्ली । आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंगच्या दिवशी म्हणजेच सोमवारी शेअर बाजाराचे दोन्ही इंडेक्स रेड मार्कवर उघडले. आठवड्याच्या पहिल्या दिवशी बाजारात अस्थिरता होती. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स 149.38 अंकांनी किंवा 0.26 टक्क्यांनी घसरून 57,683.59 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स (NSE) निफ्टी 69.60 अंकांनी म्हणजेच 0.40 टक्क्यांनी घसरून 17,206.70 वर बंद झाला.

सोमवारच्या ट्रेडिंगमध्ये कोल इंडिया, हिंदाल्को, यूपीएल, ओएनजीसी आणि अदानी पोर्ट्स निफ्टीमध्ये टॉप लुझर ठरले. दुसरीकडे, विप्रो, इन्फोसिस, श्री सिमेंट्स, पॉवर ग्रिड कॉर्प आणि आयसीआयसीआय बँक निफ्टीमध्ये टॉप गेनर ठरले.

एका दिवसापूर्वी बाजार रेड मार्कवर बंद झाला होता
याआधी शुक्रवारी सेन्सेक्स 59.04 अंकांनी किंवा 0.10 टक्क्यांनी घसरून 57,832.97 वर बंद झाला. यासह NSE चा निफ्टी देखील 33.90 अंकांनी किंवा 0.20 टक्क्यांनी घसरून 17,270.70 वर बंद झाला.

DGCA सर्व विमान कंपन्यांना चाइल्ड सेफ्टी सीट बसवण्याचा सल्ला देते
2020 मध्ये कोझिकोड येथे एअर इंडिया एक्सप्रेस दुर्घटनेनंतर स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीच्या शिफारशींचे पालन करून नागरी विमान वाहतूक महासंचालक (DGCA) यांनी सर्व विमान कंपन्यांनी सुरक्षितता आणि नियंत्रणासाठी चाइल्ड रेस्ट्रेंट सिस्टम (CRS) अवलंबण्याची शिफारस केली. अंमलबजावणी करण्यासाठी सल्लागार पाठवण्यात आला आहे जेणेकरून फ्लाईट्सच्या आत मुलांच्या सुरक्षिततेची खात्री करता येईल.

‘या’ कारणामुळे कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या

Harsha Sucide

बंगळुरु : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकातील शिमोगामध्ये रविवारी रात्री हि धक्कादायक घटना घडली आहे. हर्षा असे हत्या झालेल्या 26 वर्षीय मृत कार्यकर्त्याचे नाव आहे. मृत हर्षावर चाकूने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यामुळे सध्या शिमोगामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हर्षा हा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता होता.हर्षाच्या हत्येनंतर शिमोगा जिल्ह्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हर्षाने हिजाब विरोधी पोस्ट केल्यामुळे त्याची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आला आहे. यादरम्यान हर्षाच्या हत्येमुळे शिमोगा शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहने जाळण्यात आली.

नेमकं काय घडलं?
बजरंग दलाच्या 26 वर्षीय कार्यकर्त्याची रविवारी संध्याकाळी चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर हर्षाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हा हल्ला कोणी केला हे अजून समजू शकलेले नाही पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हिजाब वादाची पार्श्वभूमी
कर्नाटकात हिजाबवरुन वाद सुरु झाल्यापासून बजरंग दलाने सक्रिय भूमिका बजावली आहे. या हत्येनंतर अनेक चर्चाना उधाण आले आहे. काही जण या हत्येला हिजाबच्या वादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या हल्ल्याबाबत पोलिसांकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सध्या हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयात 14 फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी सुरु आहे.

पुरणपोळी, मिसळ अन् बिल; रोहित पवारांकडून फडणवीस -दानवेंना चिमटे??

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यानी एके ठिकाणी मिसळ खातानाच फोटो शेअर केला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना अप्रत्यक्षपणे जोरदार टोला लगावला आहे.

मतदारसंघात असताना भूक लागल्याने माही जळगावमधील राहुल हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत मिसळ खाल्ली…एकाच मिसळमध्ये पोट भरल्याने ‘३५’ मिसळ खाण्याच्या केवळ कल्पनेनेच कसंतरी झाले. आणि हो… मिसळ खाल्ल्यानंतर पैसे न देताच उठून गेलो नाही तर नेहमीप्रमाणे बिलही पेड केले.” असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

नेमकं काय आहे प्रकरण-
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच वेळी 30-35 पुरणपोळी आणि पातेलं भरून तूप खायचे अस विधान त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं होतं. त्यातच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांसह एका ठिकाणी दोनशे वडापाव आणि भज्यावर ताव मारून बिल न देताच निघून गेले होते. या दोन्ही नेत्यांवर रोहित पवारांनी एकाच ट्विट मधून निशाणा साधला.

“राज्य हे काही दलाली खाण्यासाठी नसतं तर ते…”; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर सध्या भाजप नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. दरम्यान, आज भाजप नेते तथा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार व विरोधकांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात कोण राज्यकर्ते आहेत हेच समजत नाही. सरकारचं अस्तित्व नाही. राज्य दलाली खाण्यासाठी नसतं, ते मुंबईच्या बाहेर देखील असतं, हे यांना माहीत नाही, अशी जोरदार टीका फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून मला जो महापालिकेचा दोन-अडीच वर्षांचा काळ मिळाला. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मी मेट्रो सुरू करावी, ही नाशिककरांची इच्छा होती. नाशिकचा नियो प्रकल्प पथदर्शी ठरला. आता हेच नियो मेट्रोचे नाशिक मॉडेल देशभरात लागू होणार आहे. हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी आहे. येत्या निवडणुकीत आपल्या सगळ्यांना पूर्ण ताकतीने उतरावं लागेल. हे तिघे काहीही बोलले, तरी आपल्या तिघांच्या विरोधात लढण्यासाठी हे एकत्र येतील. भाजपला पराभूत करण्यासाठी हे एकत्र येतील.

कोरोनाच्या काळात राज्य सरकारकडून नाशिककरांवर मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. मात्र, महापालिकेने ही जवाबदारी स्वीकारली. राज्याने एक नव्या पैशाची मदत केली नाही. शेवटी मी आलो आणि त्यानंतर ऑक्सिजन मिळालं. हे जर जाऊन बसले नसते, तर नाशिकला ऑक्सिजन मिळालं नसते, असाही टोला यावेळी फडणवीस यांनी लगावला आहे.

तांबवे ग्रुप विकास सेवा सोसायटीत भैरवनाथ पॅनेल विजयी

कराड | तांबवे ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीत भैरवनाथ पॅनेलने सर्वच्या सर्व 13 जागांवर एकहाती विजय मिळवत सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले आहे. अटीतटीच्या लढतीत सत्ताधारी पॅनेलने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.

सत्ताधारी पॅनेलमधील विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ः संदीप पाटील, भगवान बाबर, महादेव बाबर, रघुनाथ मोगरे, प्रविण पाटील, भरत पाटील, अण्णासो पाटील, अनिल पाटील, विजया पाटील, वंदना शेळके, शंकर वाडते, शंकर काटवटे, संजय राऊत यांचा समावेश आहे.

विजयी भैरवनाथ पॅनेलचे नेतृत्व माजी उपसरपंच धनजंय उर्फ रवि ताटे यांनी केले. विजयी उमेदवारांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर, तात्यासो बाबर यांनी अभिनंदन केले.

“नारायण राणे यांच्या रक्त अन् घामातून शिवसेना राहिली उभी”

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याकडून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान टीका करताना राणेंकडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतीत नेहमी आदर राखला जातो. नारायण राणे यांच्यावर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांना त्यांच्याच पक्षातील माजी खासदार शिवाजी माने यांनी घरचा आहेर दिला आहे. शिवसेना राणेंसोबत योग्य वागत नाही. राणे यांच्या घामामधून शिवसेना पुढे आली आहे, हे विसरता कामा नये, असे माने यांनी म्हंटले.

शिवाजी माने यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेने आता बोलू नये, त्यांनी काय केले आणि किती खून पाडले यावर बोलू नये. तसेच राणेंनीही मातोश्रीविरोधात बोलण्याचे काही कारण नाही. ईडीचा घोटाळा जरूर काढा परंतु राज्यसभेत व लोकसभेत ही जनतेचे प्रश्नं मांडा. ईडीच काय वाकड होणार  हे ही आम्हाला माहीत आहे. आजपर्यंत अधिकाऱ्यांचे काय झालं ते आत्ताचं होणारं आहे हे सर्वांनाच माहीत आहे . ही नविन समाजकारणाची पध्दती पहावयास मिळते आहे.

ज्याला आपण सुडाचे राजकारण म्हणु शकतो. बरं आम्ही कुणाशी भांडत आहोत ( आपल्याशीचं )नं,  काँग्रेस व राष्ट्रवादीं रिंगणाच्या बाहेरून मजा घेत आहे. अजितदादा वगळता या विषयावर कुणी भाष्य केल आहे हे एकविण्यात किंवा वाचण्यात नाही. गोर – गरीबांना घरे देण्याचं सोडून आम्ही आमचीचं पाडापाडी करत आहोत, अशाने काय साध्य होणार आहे? संपुर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.

https://www.facebook.com/photo.php?fbid=4369089556526037&set=a.257400557694978&type=3

 

कुणी किती कष्टाने कमाई केलीं आहे ते संजय राऊत कोण होते त्यांचा पगार किती होता ते , किंवा नारायण राणेंचे व्यवसाय कोणते ? बरं राणे आता एवढ्या उशिरा खुनी दिसू लागलेतं त्यांना मुख्यमंत्री पदी बसविले होते त्या वेळी ते कायं धुतल्यां तांदळा सारखे होते कायं ? बरं साहेबांना संरक्षण देण्यासाठीं त्यांनीच त्याच्या जिवाचीं पर्वा केली नव्हतीं हे विसरलात कां ?

एक व्हिडिओही व्हायरल

मुबंईत जी शिवसेना वाढली ज्यांत मोजून काही मंडळी होती त्यांत राणे होतेचं नं . ऊगाचं शिळ्यां कढीला ऊत काय आणतं आहात मग कॅा. दत्ता सामांतापासूनच्या हत्येचां शोध घेत बसां कोण कोण गुन्हेगार व गुन्हां करण्यास मदतं केली ते सर्व बाहेर येईलं शेवटी तुम्ही आम्ही सर्वचं जण फाटक्या शिवसैनिकांच्या जीवावर मोठे झाले आहोतं हे विसरून चाललोतं हे मात्र नक्की , फाटक्यांचे राज्यं कधी येणारं त्यांच स्वप्न कधी पुर्ण होणारं ? एक गोष्ट विसरू नकां मुबंईला वाचविणारी मंडळीचं आपआपसात भिडते आहे व ती कशी संपेल याचीचं वाट काँग्रेस पहात आह, असेही माने यांनी लिहले आहे.  दरम्यान, त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांनी नारायण राणे यांचे समर्थन केले आहे.

हर्बल वनस्पतीमुळे संजय राऊतांचे संतुलन बिघडले; मोहित कंबोज यांची टीका

sanjay raut mohit kamboj

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात भ्रष्ट्राचारा वरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच दरम्यान संजय राऊत यांचे हर्बल वनस्पती आणि बारामतीच्या वनस्पतीनं संतुलन बिघडले अशी टीका मोहित कंबोज यांनी केली

“१६ फेब्रुवारी रोजी संजय राऊत किरीट सोमय्या यांच्याबद्दल पत्रकार परिषद घेतात आणि अनेक आरोप लावतात. १७ फेब्रुवारी रोजी जेव्हा मीडिया संजय राऊत यांना प्रश्न विचारते, तेव्हा म्हणतात कोणत आहे किरीट सोमय्या? मला त्यांच्याबाबत कधी प्रश्न विचारायचा नाही. १८ फेब्रुवारी रोजी संजय राऊत ट्वीट करून किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा आरोप करतात. १९ फेब्रुवारी रोजी जेव्हा सकाळी विचारलं जातं, जेव्हा आरोपाला उत्तर किरीट सोमय्यांकडून दिलं जातं, तेव्हा संजय राऊत किरीट सोमय्या यांच्याबद्दल अपशब्द उच्चारतात आणि मीडियाला धमकवतात की मला किरीट सोमय्या यांच्याबद्दल नाही विचारायचं.

त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत किरीट सोमय्यांबद्दल अनेक अपशब्द बोलतात आणि नंतर किरीट सोमय्यांबद्दल ट्वीट करतात. संध्याकाळी म्हणतात किरीट सोमय्यांबद्दल काहीच बोलायचं नाही, पत्रकाराने विचारलं तर त्याला बोट दाखवून धमकावलं जातं. २१ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सकाळी किरीट सोमय्यांवर ते आरोप करत ट्वीट करतात.”

संजय राऊत यांच्या स्वप्नात किरीट सोमय्या येतात आणि किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांची झोप उडवली आहे. ज्या प्रकारे ते एकदिवस काही बोलतात दुसऱ्यादिवशी वेगळं काही बोलतात. त्यामुळे संजय राऊत यांचं बारामतीची हर्बल वनस्पती घेऊन, मानसिक संतूलन बिघडलं आहे. त्यांना किरीट सोमय्यांची भीती वाटत आहे असंही मोहित कंबोज यांनी म्हंटल.

येवल्यात दोन गटांत तुंबळ हाणामारी; एकमेकांना केली लाकडी दांडक्याने गुरासारखी मारहाण

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणीचा दोन गटांतील मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील लोकं अक्षरशः एकमेकांना गुरासारखी मारहाण करत आहेत. ह्या लोकांची भांडणे बघून काही लोक ते सोडवण्यासाठी गेले असता त्यांनासुद्धा या लोकांनी बेदम मारहाण केली. यामध्ये काही लोकांना मुक्का मार लागला तर काहीजण जखमी झालेत. पोलिसांनी या प्रकरणी येवला शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींची धरपकड सुरु केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आठ जणांना घेतले ताब्यात
येवला तालुक्यातील कोटमगाव बुद्रुक या ठिकाणची हि घटना आहे. यामध्ये गावातल्या दोन गटामध्ये किरकोळ कारणावरून तुंबळ हाणामारी झाली. या घटनेतील बहुतांश सहभागी हे तिशीच्या आतील तरुण आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की लोक घरात सरपणासाठी ठेवलेली मोठ-मोठी लाकडे उचलून आणत एकमेकांच्या डोक्यात घालत आहेत. हा प्रकार किती भयंकर होता हे तुम्ही या व्हिडिओमधून पाहू शकता.

महिलांनासुद्धा केली बेदम मारहाण
हे दोन्ही गट एवढे बेभान झाले होते कि त्यांनी रागाच्या भरात महिलांनासुद्धा गुरासारखी मारहाण केली. यामुळे त्या परिसरात फक्त आरडाओरडा आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. हा सगळा प्रकार पाहून अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र या लोकांनी त्या लोकांनासुद्धा मारहाण केली. या व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास सुरु केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. तर बाकीच्यांचा शोध सुरु आहे.

पाटणला अल्पवयीन मुलीवर 8 जणांकडून वारंवार बलात्कार : गुन्ह्यात महिलेचाही सहभाग

Patan Police Staion

पाटण | पाटण येथील अल्पवयीन व मतीमंद मुलीला बाहेर फिरायला आणि खायला देण्याच्या बहाण्याने नेवून बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाटण पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून याप्रकरणी 9 आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे. या संतापजनक घटनेमुळे पाटण तालुका हादरला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पाटण येथील एका महीलेने दि. 27/01/2022 रोजी ते 18/2/2022 या दरम्यान तिच्या परीचयाच्या एका अल्पवयीन व मतीमंद मुलीचा गैरफायदा घेवून तिला बाहेर फिरायला नेण्याचे बाहेर खाऊ खायला देण्याचे व पैसे देण्याचे आमीष दाखवुन तिला बाहेर घेवून गेली. मुलीला पाटण व आजुबाजुचे परीसरातील लोकांशी ओळख करून देवुन त्यांचेशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. सदर पाटण व आजुबाजुचे परीसरातील 8 लोकांनी सदर अल्पवयीन व मतीमंद पिडीत मुलीवर वेळोवेळी व वेगवेळ्या ठिकाणी नेवुन वारवार बलात्कार केला आहे.

याबाबत यातील पिडीत अल्पवयीन मतीमंद मुलीचे आईने दिले तक्रारीवरून पाटण पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 32 / 2022 भा.द.वि.स.कलम 366अ, 376 (2) (एल) (जे), (एन) 376(3), 376 (डी) 376 (डी. ए).370 (4), 34 लैगीक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 17 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील सर्व 9 आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांचा शोध घेवून त्यांना 12 तासात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास पोलीस निरीक्षक पाटण पोलीस ठाणे यांनी केला असून. पोलीस अधिक्षक सातारा यांचे आदेशाने सदर गुन्हयाचा पुढील तपास महीला पोलीस अधिकारी करीत आहेत. त्यांना आज कराड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात रिमांड कामी हजर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही; राणेंचं टीकास्त्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत देशपातळीवरील राजकारणाबाबत चर्चा झाल्याचे दोन्ही नेत्यांकडून सांगण्यात आले. याच भेटीवरून भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर टिका केली आहे.

नारायण राणे यांनी ट्विट करत म्हंटल की , सारख्या पाण्याचे वेगवेगळे डबके एकत्र आले तर त्याचा समुद्र तयार होत नाही. दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात शिवसेना पूर्वी एक घोषणा देत होती. हटाव लुंगी बजाव पुंगी! आता आम्ही (शिवसेना) व तेलंगणा भाऊ भाऊ काय.. अजब परिवर्तन!

तुम्ही (तेलंगणा) आम्ही (शिवसेना) भाऊ भाऊ मिळेल ते मिळून खाऊ! महाराष्ट्र म्हणजे शिवसेना नाही व तेलंगणा म्हणजे भारतही नाही. भारतीय जनता पक्षाचे केंद्रात सरकार आहे व भाजपचे ३०१ खासदार आहेत असे नारायण राणे यांनी म्हंटल.

दरम्यान, चंद्रशेखर राव आणि उद्धव ठाकरे भेटीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य करत याबाबत जास्त काही फरक पडणार नाही अस म्हंटल आहे. या सगळ्या मंडळींनी मागील लोकसभेतही हातात हात घालून मोठी आघाडी तयार केली. पण त्याचा काही परिणाम झाला नाही फडणवीस यांनी म्हंटल.