Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2750

SBI, HDFC बँकेसह अनेक बँका वाढवत आहेत FD चे व्याजदर; हे आहे कारण

FD

नवी दिल्ली । अलीकडच्या काळात देशातील अनेक बँकांनी FD दरात वाढ केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी बँकेने FD वरील व्याजदरात वाढ केली आहे.

SBI FD दर (15 फेब्रुवारी 2022 पासून प्रभावी)
SBI ने 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठीचे FD वर व्याजदर वाढवले ​​आहेत. 2-3 वर्षांसाठीचे व्याजदर 5.10 टक्क्यांवरून 5.20 टक्के करण्यात आले आहेत. त्याच वेळी, 2-5 वर्षांच्या FD वरील दर 15 बेस पॉंईटसनी 5.45 टक्क्यांनी वाढवले ​​आहेत. 5-10 वर्षांच्या मुदतीच्या FD साठीचा व्याजदर 5.50 टक्के करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे सुधारित व्याजदर 15 फेब्रुवारी 2022 पासून लागू आहेत.

HDFC बँक FD दर (14 फेब्रुवारी 2022 पासून प्रभावी)
अलीकडेच, एचडीएफसी बँकेने एका वर्षाच्या मुदतीच्या FD वरील व्याजदर 10 बेस पॉइंट्सवरून 5 टक्के केला आहे. 3-5 वर्षांच्या मुदतीच्या FD वरील दर 5 बेस पॉइंट्सने वाढवून 5.45 टक्के केले आहेत. HDFC बँकेचे सुधारित व्याजदर 14 फेब्रुवारी 2022 पासून लागू आहेत.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युको बँकेनेही व्याजदरात वाढ केली आहे
RBI MPC ने रेपो आणि रिव्हर्स रेपो दर अपरिवर्तित ठेवण्याची घोषणा केल्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि UCO बँकेनेही FD वरील व्याजदर सुधारित केले. या दोन्ही बँकांचे नवे व्याजदर 10 फेब्रुवारी 2022 पासून लागू झाले आहेत.

महागाई दर जास्त उंचीच्या दिशेने वाढत आहे
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बँकांनी FD दर वाढवण्याची घोषणा केली आहे कारण भारतातील महागाई दर उच्च मार्गावर आहे. मिंटच्या रिपोर्टमध्ये, GCL सिक्युरिटीजचे रवी सिंघल म्हणाले, “व्याजदराच्या पातळीवर परिणाम करणारे प्रमुख घटक म्हणजे चलनवाढ आहे. महागाईचा दर जितका जास्त असेल तितके व्याजदर वाढण्याची शक्यता जास्त असते. भारतातील महागाई दर उच्च पातळीवर वाढत असल्याने, भविष्यातील महागाईपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी बहुतांश बँका FD दर वाढवत आहेत.

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना दुहेरी भेट; कापलेला पगार परत मिळणार आणि पगारात वाढही होणार

नवी दिल्ली । एअर इंडियाच्या पायलट आणि क्रू मेंबर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. महामारीच्या काळात त्याच्या पगारात आणि इतर भत्त्यांमध्ये केली गेलेली कपात लवकरच परत केली जाईल. यासोबतच पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. खरेतर, एअर इंडियाचे नवे मालक असलेल्या टाटा ग्रुपने पगार आणि भत्त्यांच्या रिस्ट्रकिचरिंग अंतर्गत आपल्या तीन विमान कंपन्यांच्या पायलट आणि क्रू यांच्या पगाराचे रिस्ट्रकिचरींग करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात एअर इंडियाच्या कमाईवर परिणाम झाला होता, ज्यामुळे पायलट आणि क्रू मेंबर्सची बेसिक सॅलरी, फ्लाइंग अलाउंस आणि लेओव्हर अलाउंस (आंतरराष्ट्रीय) कापला गेला. या प्रकरणाशी संबंधित टाटा ग्रुपच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,”कंपनी कर्मचाऱ्यांसाठी भत्ते, लीव्ह पॉलिसी आणि इतर उपाययोजनांवर विचार करत आहे.”

एअर इंडियामध्ये अनेक गुंतागुंत
अधिकाऱ्याने सांगितले की,”सरकारी कंपनी असल्याने एअर इंडियामध्ये या व्हेरिएबल्सबाबत अनेक गुंतागुंत आहेत. आता ते टाटा ग्रुपच्या विमान कंपन्यांच्या पॉलिसीशी जोडण्याची गरज आहे.” टाटा ग्रुपने अलीकडेच सरकारकडून एअर इंडियाचे अधिग्रहण केले आहे. विमान कंपनीत 12,085 कर्मचारी आहेत, त्यापैकी 8,084 पर्मनंट आहेत.

पगार आणि भत्त्यांची माहिती नाही
एअर इंडियाच्या दोन वैमानिकांनी सांगितले की,” पगार आणि भत्त्यांचे रिस्ट्रक्चरींग अद्याप लागू झालेले नाही.” या वैमानिकांमध्ये कॅप्टन आणि फर्स्ट ऑफिसरचा समावेश आहे. त्यापैकी एकाने सांगितले की,”पगारातील कपात पुन्हा सुरू करण्याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, नवीन व्यवस्थापनात लवकरच पगार देण्यात येणार आहे.”

फ्लाईंग अलाउन्स मिळणार
पायलटने पुढे सांगितले की,”जानेवारीचा फ्लाईंग अलाउन्स फेब्रुवारीमध्ये देण्यात आला आहे. या आधी ते किमान तीन महिन्यांनी मिळायचे.” एका अधिकाऱ्याने सांगितले की,”एअर इंडियामधील पगार टाटा ग्रुपच्या इतर विमान कंपन्यांच्या स्ट्रक्चरनुसार असण्याची शक्यता आहे.” टाटा ग्रुपकडे एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस व्यतिरिक्त एअर एशिया इंडिया आणि विस्तारा मध्ये मेजॉरिटी स्टेक (बहुसंख्य स्टेक) आहे.

सॅलरी स्ट्रक्चर एकसारखे असेल
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे सॅलरी स्ट्रक्चर गुंतागुंतीचे आहे. टाटा ग्रुप हे सुलभ करेल आणि त्यांच्या इतर एअरलाइन्सप्रमाणेच एक फ्रेमवर्क डेव्हलप करेल. या ग्रुपने एअर इंडियाचे परिचालन आणि सेवा दर्जा सुधारण्यासाठी 100 दिवसांची योजना सुरू केली आहे.

साथीच्या रोगाच्या काळात कापले गेले
महामारीच्या काळात एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांच्या लेओव्हर अलाउन्स मध्ये 60-70 टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. फ्लाईंग अलाउन्समध्ये 40 टक्के कपात करण्यात आली होती. यासाठी, जानेवारीमध्ये एअर इंडिया टाटा ग्रुपकडे सोपवण्यापूर्वी, त्यांच्या वैमानिकांनी एअरलाइनच्या माजी मॅनेजमेंटला पत्र लिहून कापलेला पगार परत करण्याची मागणी केली होती. कोविड-19 काळात करण्यात आलेली असमान वेतन कपात सुलभतेने परत आणावी, असे सांगण्यात आले.

कराड उत्तरमधील नडशीत काॅंग्रेसचा विजय

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील उत्तर विधानसभा मतदार संघातील नडशी गावच्या वि. का. स. सेवा सोसायटी निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य निवासराव थोरात यांनी त्यांचे नेतृत्वातील सिद्धेश्वर विकास पॅनेलने माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली 13 जागापैकी 11 जागा जिंकून सोसायटीवर आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. यावेळी सिद्धेश्वर विकास पॅनेलचे प्रमुख जिल्हा परिषद सदस्य निवास थोरात यांच्यासह सर्व सदस्यांचा माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सर्व उमेदवारांनी आज माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी आण्णा थोरात, निवृत्ती घोलप, आनंदराव थोरात, शंकर थोरात, भीमराव थोरात, विठ्ठल रविढोणे, हिंदुराव थोरात, आनंदराव थोरात, आनंदराव थोरात, लक्ष्मण थोरात, उत्तम कदम, युवराज थोरात, भीमराव थोरात, संपत थोरात, शशिकांत थोरात, शंकर थोरात, आप्पासो थोरात, भीमराव थोरात, अशोक कदम, गणेश थोरात, अनिल थोरात, अधिकराव थोरात, अनिल थोरात, सुहास थोरात आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी विजयी उमेदवारांना मार्गदर्शन करताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, नडशी गावाने युवक व अनुभवी या सर्वाना सोबत घेऊन निवास थोरात यांच्या नेतृत्वात पॅनेल उभा केले व ते निवडूनही आणले, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. गावची सहकारी सोसायटी हा गावाचा आर्थिक कणा असतो त्याची जबाबदारी योग्य व निपक्षपाती लोकांकडे असेल तर सर्व कारभार सुद्धा पारदर्शी राहतो. म्हणूनच नडशी सोसायटी च्या सर्व विजयी उमेदवारांनी अत्यंत पारदर्शकपणे सोसायटी चालवावी व त्याचे काम आदर्शवत करावे.

“भाजपच्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे वाटतात, म्हणून…”; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी संसदेतील भाषणावेळी कोरोना हा महाराष्ट्र काँग्रेसमुळे वाढला, अशी टीका केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदींवर टीका करीत देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर मोर्चा काढला. दरम्यान भाजप नेत्यांनी संसदेत महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरु असताना बाक वाजवले. यावरून काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजपवर टीका केली. राज्यातल्या भाजप नेत्यांना महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोदी मोठे वाटतात, असे विधान त्यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत टीका केल्यानंतर त्याच्या टिकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांनीही मोदींना काही तिखट प्रश्न विचारत जहरी टीका केली होती. भाजपकडूनही सुप्रिया सुळेंना उत्तर देण्यात आले होते. मोदींनी संसदेत बोलताना फक्त कोरोना आणि महाराष्ट्रच नव्हे अन्य काही मुद्द्यावरूनही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता, असे म्हणण्यात आले होते. दरम्यान काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र व काँग्रेसवर टीका केल्यानांतर त्याच्या या वक्तव्याचा निषेध काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्यावतीने नोंदवला जात आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याच्यानंतर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनीही भाजप नेत्यांवर टीका केली आहे.

IRCTC ला मिळाला दुप्पट नफा मिळूनही शेअर बाजारातील तज्ञ याची विक्री करण्यास का सांगत आहेत?

Railway

नवी दिल्ली । डिसेंबर 2021 ला संपलेल्या तिमाहीच्या आधारावर, जर आपण गेल्या 1 वर्षाबद्दल बोललो तर BSE 500 कंपन्यांच्या लिस्टमधील काही कंपन्या अशा आहेत ज्यांनी आपला नफा दुप्पट केला आहे. वर्षभरात दुप्पट नफा मिळवणाऱ्या या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी का? या कंपन्यांचे शेअर्स तुम्हाला आगामी काळात चांगला नफा देऊ शकतील का? याबाबत बाजारातील विविध तज्ञांची मते आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

या बातमीत आम्ही तुम्हाला फक्त त्या एका कंपनीबद्दल सांगणार आहोत जिला सर्वाधिक नफा झाला आहे. ती आहे IRCTC. वर्षभरातील नफ्याबद्दल बोलायचे झाल्यास, IRCTC ने 167.39 टक्के वाढीसह 208.81 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. कंपनीच्या विक्रीतही 140.76% वाढ झाली असून ती 540.2 एक कोटीवर पोहोचली आहे. कंपनीने अपेक्षेपेक्षा चांगले निकाल सादर केल्याचे मार्केट एक्सपर्टचे म्हणणे आहे. तरीसुद्धा, त्यांचा असा विश्वास आहे की कंपनीचे मूल्यांकन सध्या विस्तारित आहे, याचा अर्थ स्टॉक सध्या महाग आहे आणि आगामी काळात त्यात थोडीशी घट होऊ शकेल.

IRCTC शेअर 701 रुपयांपर्यंत येऊ शकतो
इकॉनॉमिक्स टाइम्समधील एका बातमीनुसार, 5 वेगवेगळ्या विश्लेषकांनी या स्टॉकसाठी 776.40 रुपयांचे टार्गेट दिले आहे, जे या स्टॉकच्या सध्याच्या पातळीपेक्षा 5 टक्के कमी आहे. ब्रोकरेज फर्म IIFL ला देखील हा स्टॉक महाग वाटतो, म्हणून त्यांनी विक्री रेटिंग देताना 722 चे टार्गेट दिले आहे.

Dalal & Broacha स्टॉक ब्रोकिंगला देखील असे वाटते की, या स्टॉकचे प्रीमियम व्हॅल्युएशन अन्यायकारक आहे, म्हणजे ते योग्य नाही. वरून रेग्युलेटरी रिस्क आहेच आणि आता ते वर जाणे थोडे अवघड आहे. ज्यांच्याकडे हे स्टॉक आहेत त्यांनी नफा बुक करण्याचा सल्ला या फर्मने दिला आहे. हा शेअर 701 रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो, असे या फर्मला वाटते.

आता ‘या’ बँकेतील हिस्सा विकण्यासाठी सरकार एप्रिलपर्यंत मागवू शकते अर्ज

Banking Rules

नवी दिल्ली । LIC IPO मुळे, आता IDBI बँकेची निर्गुंतवणूक योजना जोर धरत आहे. IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्यासाठी सरकार वेगाने काम करत आहे. CNBC-TV18 च्या रिपोर्ट्स नुसार, सरकार या वर्षी एप्रिलपर्यंत IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्यासाठी अर्ज आमंत्रित करू शकते. रिझर्व्ह बँकेने IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्याच्या प्रक्रियेची यापूर्वीच चौकशी केली आहे. आता IDBI बँकेतील हिस्सेदारी विकण्याचे काम येत्या 9 महिन्यांत पूर्ण होऊ शकते.

रिपोर्ट नुसार, देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी असलेली LIC, IDBI बँकेतील आपला संपूर्ण हिस्सा सरकार विकणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, कोणत्याही बँकेतील प्रमोटरची हिस्सेदारी 26% पेक्षा जास्त असू शकत नाही.

चांगल्या कोटची आशा आहे
या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याने CNBC TV18 ला सांगितले की, “खासगी बँकेत प्रमोटर होल्डिंग केल्यामुळे IDBI बँकेतील स्टेक विकण्याचा कोणताही दबाव नाही. आम्हाला खात्री आहे की, आम्हाला IDBI बँकेला चांगला प्रतिसाद मिळेल.”

LIC चा 49.24% हिस्सा
सध्या, सरकारकडे IDBI बँकेत 45.58% आणि LIC ची 49.24% हिस्सेदारी आहे. LIC ही बँकेची प्रमोटर आहे आणि व्यवस्थापकीय नियंत्रण तिच्याकडे आहे. 21 जानेवारी 2019 पासून, IDBI बँक इन्शुरन्स कंपनी LIC ची सब्सिडियरी बनली. त्यानंतर LIC ने बँकेचे 827,590,885 इक्विटी शेअर्स खरेदी केले होते. या अधिग्रहणानंतर, LIC ची बँकेतील भागीदारी 51% पर्यंत वाढली.

मार्चमध्ये LIC चा IPO
मात्र, डिसेंबर 2020 मध्ये, IDBI बँकेने क्वालीफाइड इंस्टीट्यूशनल प्लेसमेंटद्वारे अतिरिक्त इक्विटी शेअर्स जारी केले, ज्यामुळे बँकेतील LIC चा हिस्सा 49.24% पर्यंत कमी झाला. यानंतर LIC चे असोसिएट कंपनी म्हणून रीक्लासीफाइड करण्यात आले.

LIC ची या वर्षी मार्चमध्ये लिस्टिंग होणार आहे. आपल्या अर्जात, कंपनीने असे लिहिले आहे की असोसिएट कंपनीत केलेल्या गुंतवणुकीचा कंपनीच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. IDBI बँकेचे शेअर्स सकाळी 11.30 वाजता 0.95% खाली 46.85 रुपयांवर ट्रेड करत होते. तर सेन्सेक्स 21 अंकांनी घसरून 57,811 वर ट्रेड करत आहे.

महामारीमुळे देशात करोडपतींची संख्या वाढली तर आनंदी लोकांची संख्या घटली

SIP

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात मोठ्या संख्येने लोकांच्या नोकऱ्या गेल्या तर अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. मात्र दुसरीकडे, अशीही अनेक लोकं होती ज्यांच्या संपत्तीत प्रचंड वाढ झाली. हुरुन रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे की, कोविड-19 महामारीमुळे प्रभावित झालेल्या 2021 मध्ये भारतात ‘डॉलर मिलियनेअर’ म्हणजेच सात कोटी रुपयांहून जास्त वैयक्तिक संपत्ती असलेल्या व्यक्तींची संख्या 11 टक्क्यांनी वाढून 4.58 लाख झाली आहे.

मात्र, या कालावधीत वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात स्वत: ला आनंदी असल्याचे सांगणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. या रिपोर्टमध्ये असेही म्हटले गेले आहे की, स्वतःला आनंदी म्हणणाऱ्या लोकांची संख्या गेल्या वर्षी 66 टक्क्यांवर आली आहे, जी 2020 मध्ये 72 टक्के होती.

श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढती असमानता
हुरुन रिपोर्टचे हे निष्कर्ष अशा वेळी आले आहेत जेव्हा भारतात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढत्या असमानतेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. नुकत्याच आलेल्या ऑक्सफॅमच्या रिपोर्टमध्येही या विषमतेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अतिश्रीमंतांकडून जास्त टॅक्स आकारण्याच्या वाढत्या कॉलमध्ये, सर्वेक्षण केलेल्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा कमी लोकांचा असा विश्वास आहे की, जास्त टॅक्स भरणे हा सामाजिक जबाबदारीचा एक परिभाषित घटक आहे.

2026 पर्यंत डॉलर मिलियनरी 6 लाखांपर्यंत वाढेल
हुरुन रिपोर्टनुसार, 2026 सालापर्यंत भारतातील ‘डॉलर करोडपती’ची संख्या 30 टक्क्यांनी वाढून सहा लाखांपर्यंत पोहोचेल. मुंबईत सर्वाधिक $20,300 करोडपती असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे. यानंतर दिल्लीत 17,400 करोडपती कुटुंबे आहेत आणि कोलकात्यात 10,500 करोडपती आहेत.

मुलांच्या शिक्षणासाठी अमेरिकेला पहिली पसंती आहे
सर्वेक्षण केलेल्या दोन तृतीयांश डॉलर करोडपतींनी सांगितले की, ते आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यास प्राधान्य देतील, यूएस ही त्यांची पहिली पसंती आहे. एक चतुर्थांश डॉलर करोडपतींची आवडती कार मर्सिडीज बेंझ आहे आणि ते दर तीन वर्षांनी त्यांच्या कार बदलतात. इंडियन हॉटेल्सचा हॉटेल ताज हा सर्वाधिक पसंतीचा ब्रँड म्हणून उदयास आला, तर तनिष्क हा दागिन्यांचा पसंतीचा ब्रँड आहे.

लक्झरी ब्रँडसाठी सर्वोत्तम संधी
हुरुन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य संशोधक अनस रहमान जुनैद म्हणाले की,”पुढील दशक हे लक्झरी ब्रँड आणि सर्व्हिस प्रोव्हाडर्सना भारतात प्रवेश करण्याची उत्तम संधी आहे. येत्या काळात डॉलर करोडपतींची संख्या आणखी वाढणार आहे. मात्र, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील वाढती दरी हा चिंतेचा विषय आहे.”

नगरपरिषदेला “आगाशिवनगर-मलकापूर नगरपरिषद” असे नाव द्या, अन्यथा आंदोलन करू

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

मलकापूर शहरातील महत्वाचा भाग असलेल्या आगाशिवनगरला महत्व देण्या संदर्भात आज आगाशिवनगर येथील नागरिकांनी मलकापूर नगरपरिषदेच्या मुख्यधिकाकरी व नगराध्यक्षांची आज भेट घेतली. यावेळी मलकापूर नगरपरिषदेला आगाशिवनगर मलकापूर नगरपरिषद असे नाव द्यावे,” अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली. तसेच सध्या सुरू असलेल्या अभियानात आगाशिवनगर या नावाचा समावेश ठळकपणे करावा. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपात आंदोलन करू, असा इशारा आगाशिवनगर येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला.

आगाशिवनगर येथील नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, आपले शहरातून आशियाई मार्ग जुना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ गेला आहे. आगाशिवनगर हा तलाठी सज्जा स्वतंत्र आहे. शिवाय आगाशिवनगर भागातून शहराला मिळणा महसूल जास्त आहे. याचा विचार करता नगरपरिषदेला “आगाशिवनगर-मलकापूर” नगरपरिषद ते नाव द्यावे.

मलकापुरचा उल्लेख करताना आगाशिवनगर या नावाला डावलले जात असल्याची जनभावना तयार होत आहे. त्यामुळे कोणताही सेल्फी पॉईंट किंवा नाव असलेला उपक्रम राबवताना प्राधान्याने आगाशिवनगर या नावाचा उल्लेख करावा. आपल्या शहरात सध्या मलकापूर नगरपरिषदेच्यावतीने लोकसहभागातून माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध संकल्पना राबवल्या जात आहेत. 15 दिवसाच्या मुदतीमध्ये योग्य तो निर्णय न घेतल्यास आम्ही सर्व नागरिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा आगाशिवनगर नागरिकांच्यावतीने करण्यात आला आहे.

खून प्रकरणातील संशयिताने नशेमध्ये रुग्णालयात घातला धिंगाणा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

खंडणी, चोरीसारखे गुन्हे नावावर असलेल्या नवनाथ ज्ञानू लवटे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या खूनप्रकरणी पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. योगेश दिलीप शिंदे असे संशयिताचे नाव असून घटनेवेळी तो पूर्णपणे नशेत होता. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यास रूग्णालयात दाखल केले असलेतरी तो नशेतच असल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. त्यामुळे या खूनाचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

शनिवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास कॉलेज कॉर्नरजवळील एका कॅफे हाऊससमोर नवनाथ ज्ञानू लवटे याचा धारदार हत्याराने आठ वार करून खून करण्यात आला होता. लवटे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याच्यावर खंडणी, चोरीसारखे गुन्हे होते. शनिवारी सायंकाळी कॉलेज कॉर्नरजवळील गुरूदत्त रानडे अपार्टमेंटमधील एका कॉफी हाऊससमोर संशयित व मृत लवटे समोरासमोर आले. तिथे लवटे याच्यावर संशयिताने वार करून त्यास गंभीर जखमी केले होते. शासकीय रूग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सुत्रे हालवत यातील संशयित योगेश शिंदे या संशयितास ताब्यात घेतले होते. खूनाच्या घटनेवेळी व पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून तो पूर्णपणे नशेत आहे. पोलिसांनी त्यास उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल केले. याठिकाणीही त्याने गोंधळ घातला. त्याची प्रकृती स्थिर झाल्यानंतरच पोलीस त्याचा तपास करणार आहेत. त्यामुळे अद्यापतरी या खूनाचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांनी दुसऱ्या सुत्रांच्या आधारे खूनाच्या कारणाचा तपास सुरू ठेवला आहे.

द्राक्ष बागायतदारांच्या फसवणुकी प्रकरणी सहा परप्रांतीय दलालांवर गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

तासगाव तालुक्यातल्या चिंचणी येथील 18 द्राक्ष बागायतदारांची द्राक्षे उधारीवर खरेदी करून त्याची 31 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सहा दलालांवर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनीष गुप्ता, हरिशचंद्र वर्मा, शेख बागवान, शेखर मोहन, चिराग अविनाश पाटील व राजकुमार रामगोपाळ अशी गुन्हा दाखल झालेल्या दलालांची नावे आहेत.

तर फसवणूक झालेल्यात अंकुश बाबासो बोबडे, प्रल्हाद पांडुरंग जाधव, अरुण पांडुरंग पाटील, विष्णू महादेव चव्हाण, महादेव चव्हाण, चंद्रकांत माळी, सचिन भूपाल जाधव, मनोज अनिल शिंदे, संजय रामचंद्र जाधव, पांडुरंग निवृत्ती काळे, सुरेंद्र देशमुख, लक्ष्मणशंकर पाटील, विकास विलास शिंदे, प्रतीक बाबासो काळे, उत्तम रामचंद्र पाटील, शिवाजी मंडले, प्रदीप दशरथ चव्हाण व प्रवीण तानाजी पाटील या द्राक्ष बागायतदारांचा समावेश आहे.

गेल्या आठ दिवसांत संशयितांनी या बागायतदारांची उधारीवर द्राक्षे खरेदी केली होती. त्या बागायतदारांना त्याचे पैसे देण्याबाबत टोलवाटोलवी करीत होते. बागायतदारांना हे दलाल आपली फसवणूक करत असल्याचा संशय आला. त्यामुळे दलाल राहत असलेल्या लॉजवर शेतकऱ्यांनी धडक मारली होती. त्यावेळी हे दलाल पळून जाण्याच्या तयारी होते. काहीजण पळाले होते. शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठलाग करून पकडले होते. त्यानंतर त्या दलालांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अखेर शनिवारी त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.