Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2764

बामणोलीमध्ये झाली सहा लाखांच्या विजेची चोरी, फॅब्रिकेटर्स चालकावर गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगलीतल्या बामणोली मध्ये असणार्‍या शिवराज फॅब्रिकेटर मध्ये मीटर मध्ये छेडछाड करून 15 हजार 846 युनिट वीज मोफत वापरून 5 लाख 96 हजारांच्या विजेची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. ऑक्टोबर 2019 ते नोव्हेंबर 2021 या कालावधीत वीज चोरीचा प्रकार सुरु होता. या प्रकरणी महावितरणचे अधिकारी महेशकुमार श्रीरंग राऊत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांच्या फिर्यादीवरून वीज चोरी प्रकरणी कोंडीबा शांताराम चिंचकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित कोंडीबा चिंचकर यांचे मिरज तालुक्यातील बामणोली मध्ये शिवराज फॅब्रिकेटर्स या नावाने कारखाना आहे. सदरच्या कारखान्यात महावितरण विभागाने वीजपुरवठा केला होता. चिंचकर यांनी 2019 ते 2021 या दोन वर्षांच्या कालावधीत मीटर मध्ये छेडछाड करून तब्बल 15 हजार 846 युनिट वीज मोफत वापरली. त्याचे बिल 5 लाख 96 हजार रुपये इतके होते.

सदरचा प्रकार महावितरण विभागाच्या वायरमन यांना निदर्शनास येताच त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार केली. त्यावेळी ग्राहकाला नोटीस देण्यात आली. या निटिसीला चिंचकर जुमानत नव्हते अखेर महावितरणचे अधिकारी महेशकुमार राऊत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी वीज चोरी प्रकरणी चिंचकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

चिंचणीत द्राक्ष शेतकर्‍यांना घातला 30 लाखांचा गंडा, पळून जाणाऱ्या व्यापाऱ्यांना फिल्मी स्टाईलने पकडले

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

तासगाव तालुक्यातील चिंचणी येथील द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांना पुणे व दिल्लीच्या व्यापार्‍याने 30 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. द्राक्षे उधारीवर खरेदी करून पैसे न देताच पळून जाणार्‍या व्यापारी व कामगारांना शेतकर्‍यांनी फिल्मी स्टाइल पाठलाग करून पकडले. चिंचणी येथील शेतकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील सात ते आठ शेतकर्‍यांची द्राक्षे विशाल रामचंद्र पाटील, आतिष धिंग्रा, मनीषकुमार, हरीश वर्मा व मनोज या पुणे व दिल्ली येथील द्राक्ष व्यापार्‍यांनी एका दिवसाच्या उधारीवर खरेदी केली.

हे व्यापारी तासगाव येथील एका लॉज वर राहण्यास होते. द्राक्षे खरेदी केल्यानंतर आत्ता देतो मग देतो अशी त्यांची उत्तरे सुरू झाली. बुधवारी सकाळी 11 च्या दरम्यान या व्यापाऱयांचा शेतकर्‍यांना संशय आला. यानंतर त्यांनी लॉज मालकास दिलेली आधारकार्ड चेक केली असता ही बोगस आधारकार्ड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. माहिती मिळताच शिवसेना तालुकाध्यक्ष प्रदीप माने, लखन पाटील,दिलीप पाटील, संजीव लुगडे यांच्यासह शेतकर्‍यांनी पोलिसांना याची कल्पना दिली.

पोलिसांना पैसे देण्यासाठी लॉजवर जातो. असे सांगून टाटा सुमोतून पळून जाताना तीन व्यापारी व्यापार्‍यांना शेतकर्‍यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.तर लॉजवरून पळण्याच्या तयारीत असणार्‍या एकालाही शेतकर्‍यांनी पकडले. मात्र या सारयांचा सूत्रधार व आणखी एक व्यापारी पुण्याला पळून निघाले असल्याची माहिती शेतकर्‍यांना मिळाली. यानुसार सातारा जिल्ह्यातील पुणे बेंगलोर महामार्गावरील किणी टोल नाक्यावर एकास पकडले तर एक पळून गेला.

“ठाकरे कुटुंबाबद्दल बोलताना राणेंनी थोडीतरी लाज बाळगावी”; दीपक केसरकरांची राणेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर टीका केली. त्यानंतर शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला. “संजय राऊत आणि किरीट सोमय्यांच्या वादात तुम्ही कशाला पडता, तुम्ही राज्यसभेत बोलावे. तुम्ही राज्यसभेचे खासदार, तुम्ही लोकसभेत निवडून येऊ शकत नाहीत. जी कोकणाची संस्कृती आहे, त्याचा तरी विचार करा. ठाकरे कुटूंबाबद्दल बोलताना थोडी तरी लाज बाळगा ,” असे केसरकर यांनी म्हंटले आहे.

दीपक केसरकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, “नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल व ठाकरे कुटूंबाबद्दल बोलताना विचार करावा. ज्या कुटुंबामुळे नारायण राणे घडले, राजकीय जीवनात येऊ शकले, मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकले, त्या कुटुंबाबद्दल बोलताना नारायण राणेंची जीभ थोडीतरी चाचरली पाहिजे. पण तेवढीही माणुसकी त्यांनी दाखवलेली नाही. तुम्ही अशा कुटुंबाबद्दल बोलताय, ज्या कुटुंबानं महाराष्ट्रासाठी आपल्या आयुष्याची होळी केली.

राणे यांच्याकडून राऊतांवर टीका केली जात आहे. मला राणेंना एवढंच सांगणे आहे की, संजय राऊत तुमच्याबद्दल बोलले होते का? मग तुम्ही का बोलता? लोकसभेत तुम्हाला उत्तर देता येत नाहीत. मग इथे येऊन का बोलता? सोमय्या कोणाबद्दल बोलले, राऊत कोणाबद्दल बोलले त्यात तुम्ही का उडी घेता?”असा सवाल केसरकर राणेंना विचारला.

शिवजन्मोत्सवाचा उत्साह; 10 हजार स्क्वे. फुटांच्या रांगोळीतून साकारली शिवछत्रपतींची प्रतिमा

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे

शिवजन्मोत्सवा निमित्य परभणी जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून विविध उपक्रम व कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यासाठी शिवभक्त सज्ज झाले आहेत . यावेळी सेलू मध्ये हेलीकॉप्टर मधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पाथरी शहरामध्ये ज्ञानेश्वर बर्वे व इतर कलाकारांचा संचाने मिळून शहरातील देवनांद्रा शाळेच्या मैदानावर सुमारे 10 हजार 392 स्क्वेअर फुट अशी भव्य शिवछत्रपतींची रांगोळीतून प्रतिमा साकारली आहे तर मानवत शहरांमध्येही भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यामध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे सर्व करत असताना कोरोना संसर्गाच्या नियमांचे काटेकोर पालन केले जाणार असल्याचे ठिकठिकाणच्या शिवजयंती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

सेलू मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व छत्रपती संभाजीराजे भोसले ट्रस्टच्या वतीने १९ फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळी १० वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे यांनी दिली. दरवर्षी भव्य दिव्य व आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरा होणारा सेलूतील शिवजन्मोत्सव सोहळा यंदा देखील आकर्षित ठरणार आहे. यंदाच्या शिवजन्मोत्सव सोहळ्यावर कोव्हीड १९ संकट असुन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून हा सोहळा पडणार आहे.

आयोजकांनी मिरवणुकीला फाटा देत शिवछत्रपतींना अभिवादन सोहळा करुन शिवजन्मचा पारंपरिक पाळणा होईल व त्यानंतर स्टेशन रोडवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व माजी आ. विजय भांबळे यांच्या शुभहस्ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. हा दिमाखदार सोहळा यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सर्जेराव लहाने, राम मैफल इंजि. भास्करराव कोलते, रामराव बोबडे, शरद मगर, शरद ठाकर, वसंत बोराडे रामराव गायकवाड, गोविंद काष्टे , राजेंद्र हुलसुरे, बाबासाहेब पावडे, दामोधर काकडे, बजरंग आरकुले, राम शेरे, विशाल गव्हाडे, शशांक टाके, महेश मुसळे, कृष्णा रोडगे, संतोष शिंदे, सचिन रोडगे, निलेश शिंदे, अर्जुन चव्हाण, माधव गव्हाणे शरद घोरपडे आदी परिश्रम घेत आहेत.

या मान्यवरांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी …

हेलिकॉप्टरच्या तीन राऊंड मधून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, माजी आ . विजयराव भांबळे, लक्ष्मी नृसिंह साखर कारखान्याचे चेअरमन संजय धनकवडे, उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार, कंत्राटदार आर . बी . घोडके, संभाजी ब्रिगेडचे राज्य उपाध्यक्ष छगन शेरे, तहसीलदार दिनेश झापले, डॉ . बाळासाहेब जाधव, मराठा सेवा संघाचे तालूकाध्यक्ष सर्जेराव लहाने, सचिव रामराव मैफल आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

शिवजयंतीमुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल

औरंगाबाद – शिवजयंतीमुळे क्रांती चौक परिसरातील चार प्रमुख मार्ग बंद करण्यात येणार असून, पर्यायी तीन रस्त्याने वाहतूक वळवण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वानखेडे यांनी सांगितले.

18 फेब्रुवारीच्या रात्री 9 ते 12 तसेच 19 फेब्रुवारीच्या सकाळी 6 ते रात्री 12 वाजेच्या दरम्यान सिल्लेखाना ते क्रांती चौकापर्यंत गोपाल टी ते क्रांती चौक हे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत.

तसेच क्रांती चौक उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील दोन्ही बाजूंचा सर्विस रस्ता आणि पश्चिमेकडील दोन्ही बाजूंचे सर्विस रस्ते देखील बंद ठेवण्यात येणार आहेत.

NSE SCAM : हिमालय बाबाच्या शिफारशीवरून नियुक्ती करण्यात आलेले आनंद सुब्रमण्यम आता इनकम टॅक्सच्या जाळ्यात

नवी दिल्ली । नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) चे माजी MD आणि CEO चित्रा रामकृष्ण यांच्यासोबत आता एक्सचेंजचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यन हे देखील इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या जखडात आले आहेत. हे तेच आनंद सुब्रमण्यम आहेत, ज्यांची नियुक्ती हिमालय बाबाच्या शिफारशीवरून NSE मध्ये झाली होती.

यासोबतच बाबाच्या सांगण्यावरून नियुक्ती आणि इतर निर्णय घेणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांच्या मुंबई आणि चेन्नई येथील ठिकाणांवरही इनकम टॅक्स डिपार्टमेंटने छापे टाकले आहेत. या दोघांविरोधातील करचोरी आणि आर्थिक हेराफेरीच्या आरोपांची चौकशी करणे आणि पुरावे गोळा करणे हा या कारवाईचा उद्देश असल्याचे इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोघांनी एक्सचेंजची गोपनीय माहिती थर्ड पार्टीसोबत शेअर करून बेकायदेशीर आर्थिक फायदा मिळवला असावा असा संशय होता.

अधिकाऱ्यांनी काही कागदपत्रे ताब्यात घेतली
चेन्नईतील रामकृष्ण यांच्या आवारातही छापा टाकण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शोध पथकाने त्या सर्व परिसरातून काही कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. बाजार नियामक सेबीने नुकताच एक आदेश जारी केला तेव्हा रामकृष्ण चर्चेत होते. त्यात म्हटले गेले आहे की, चित्रा रामकृष्ण यांनी योगींच्या प्रभावाखाली आनंद सुब्रमण्यम यांना ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक यांचे सल्लागार म्हणून नियुक्त केले.

सेबीने ठोठावला दंड
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने रामकृष्ण आणि इतरांवर सुब्रमण्यम यांची मुख्य धोरणात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती आणि नंतर त्यांची समूह परिचालन अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार म्हणून पुनर्नियुक्ती करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. यानंतर सेबीने रामकृष्ण यांना 3 कोटी रुपये, NSE ला प्रत्येकी 2 कोटी रुपये, त्यांचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि सुब्रमण्यम आणि मुख्य नियामक अधिकारी व्हीआर नरसिंहन यांना 6 लाख रुपयांचा दंड ठोठावला.

बाबांसोबत गुप्तचर माहिती शेअर केल्याचा आरोप
सेबीने आपल्या आदेशात म्हटले होते की, रामकृष्ण यांनी योगी यांच्याशी विभागीय गुप्तचर माहिती शेअर केली होती. यामध्ये NSE च्या आर्थिक आणि व्यावसायिक योजनांचा समावेश आहे. रामकृष्ण एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 पर्यंत NSE चे MD आणि CEO होते. रामकृष्ण आणि सुब्रमण्यम यांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी कोणत्याही मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थेशी किंवा सेबीमध्ये ऱ्हिस्टर्ड कोणत्याही मध्यस्थांशी संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. नारायणसाठी हे बंधन दोन वर्षांचे आहे.

श्वेतपत्रिका आणण्याची काँग्रेसची मागणी
सेबीने NSE ला रामकृष्ण यांना अतिरिक्त रजेच्या बदल्यात दिलेले 1.54 कोटी रुपये आणि स्थगित बोनसचे 2.83 कोटी रुपये जप्त करण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच नियामकाने NSE ला सहा महिन्यांसाठी कोणतेही नवीन उत्पादन सादर करण्यास मनाई केली आहे. या खुलाशानंतर काँग्रेसने NSE च्या कामकाजावर श्वेतपत्रिका आणण्याची मागणी सरकारकडे केली होती.

अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरण! 38 जणांना फाशीची शिक्षा; कोर्टाचा मोठा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 24 जुलै 2008 रोजी अहमदाबाद येथील बॉम्बस्फोट प्रकरणी 36 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या13 वर्षांपासून याप्रकरणी सुनावणी सुरू होती. अखेर आज अहमदाबाद विशेष न्यायालयाने याबाबत निकाल देत 49 पैकी 38 आरोपींना फाशीची शिक्षा दिली आहे.

एकाचवेळी 49 आरोपींना दहशतवादाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी नऊ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. तसेच या प्रकरणी सुनावणीत आतापर्यंत नऊ न्यायाधीश बदलले आहेत. त्याचबरोबर 1117 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.

 

आयपीसी, यूएपीए, स्फोटक पदार्थ कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या प्रत्येक कलमांतर्गत प्रत्येक 49 दोषींना सुनावण्यात आलेली शिक्षा एकाच वेळी चालेल. शिवाय, न्यायालयाने ४८ दोषींना प्रत्येकी २.८५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अगरबत्तीवाला, शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत त्याच्या अतिरिक्त शिक्षेसह, २.८८ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

शिवजागर महोत्सवात शिवरायांचा अभिषेक सोहळा; परिसरात भक्तिमय वातावरण

औरंगाबाद – शिवजयंतीनिमित्त क्रांतीचौक येथे शिवसेना आयोजित “शिवजागर महोत्सव” सुरू असून या निमित्ताने 3 दिवसापासून दररोज छत्रपती शिवरायांना अभिषेक सुरू आहे.

350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. त्यावेळी 21 नद्यांचे पाणी व दुधाने अभिषेक करून 16 सुवासिनींनी औक्षण केले होते. त्याच धर्तीवर तीन दिवसापासून “शिवजागर” महोत्सवात परिसरातील 21 नद्यांचे पाणी, दुधाने व 16 सपत्नीक जोडप्यांच्या हस्ते औक्षण केले जात आहे. राष्ट्रपुरुष आणि संत हे ईश्वरी अवतार मानले जातात त्यांचे स्मरण केल्याने आपल्या जीवनात स्फूर्ती व चैतन्य निर्माण होत असते याच उद्देशाने या ठिकाणी शिवरायांच्या कार्याचे स्मरण व्हावे, शिवरायांच्या विचारांचे स्मरण व्हावे व आजच्या तरुण पिढीने छत्रपतींनी शिवाजी महाराजांनी केलेले कार्य स्मरणात ठेवून नुसते स्मरणार्थ न ठेवता ते आत्मसात ही करावे. आजच्या तरुण पिढीला याची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. यासाठीच याठिकाणी दररोज शिवरायांचाअभिषेक सोहळा होत आहे असे यावेळी शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.

या अभिषेक सोहळ्यात शहरातील 16 सपत्नीक जोडप्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण पूजन करून, दुग्धाभिषेक संपन्न झाला. यानंतर शिवरायांची सामुहिक आरती करण्यात आले यामुळे परिसरात एक भक्तिमय वातावरण तयार झाले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र दानवे,प्रा.सुधाकर कापरे, प्रा.संतोष बोर्डे,प्रा. संतोष आढाव, प्रा.सचिन वाघ, प्रवीण शिंदे, विशाल गायके, नंदू लबडे आदींचे सहकार्य लाभले.

महागाईचा फटका !!! दोन महिन्यांत दुसऱ्यांदा वाढल्या साबण, सर्फ आणि पावडरच्या किंमती

नवी दिल्ली | दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई लोकांच्या अडचणीत वाढ करत आहे. पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेल महागल्यानंतर आता साबण, सर्फ, डिशवॉश या पदार्थांच्या किंमतीही वाढल्या आहेत. खरं तर, देशातील सर्वात मोठी FMCG कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने फेब्रुवारीमध्ये या उत्पादनांच्या किंमती 3 ते 10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

कंपनीने दोन महिन्यांत सलग दुसऱ्यांदा किंमती वाढवल्या आहेत. वाढलेल्या कच्च्या मालाच्या किंमतींचा परिणाम कमी करण्यासाठी या उत्पादनांच्या किंमती दुसऱ्यांदा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे HUL म्हणणे आहे. डिसेंबर तिमाहीच्या कमाईनंतर व्यवस्थापनाने जे सांगितले होते त्याच्याशी सुसंगत किंमतीतील वाढ आहे.

या मुळे वाढल्या किंमती
कच्च्या मालाची महागाई डिसेंबर तिमाहीपेक्षा जास्त असल्यास किंमती टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा विचार करणार असल्याचे कंपनीने डिसेंबरमध्ये सूचित केले होते. HUL चे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) रितेश तिवारी म्हणाले की,” वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर, आमचे पहिले प्राधान्य अत्यंत कठोरपणे बचत करणे आणि नंतर टप्प्याटप्प्याने किंमती वाढवणे आहे.”

या मागणीवर कंपनीनेच चिंता व्यक्त केली आहे
ब्रोकरेज फर्म एडलवाइज सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की,” FMCG कंपनीने फेब्रुवारीमध्ये साबण, सर्फ, डिशवॉश आणि इतर उत्पादनांच्या किंमती 3-10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.” सर्फ एक्सेल इझी वॉश, सर्फ एक्सेल क्विक वॉश, विम बार अँड लिक्विड, लक्स आणि रेक्सोना सोप्स आणि पॉन्ड्स टॅल्कम पावडरच्या किंमती वाढल्याचे तपासात उघड झाले आहे. कंपनीने अशा वेळी ही वाढ केली आहे जेव्हा तिने स्वतः मागणीच्या वातावरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

जानेवारीमध्ये किंमती 20 टक्क्यांनी वाढल्या होत्या
या वर्षी जानेवारीमध्येही, HUL ने त्यांच्या व्हील, रिन, सर्फ एक्सेल आणि लाइफबॉय श्रेणीतील उत्पादनांच्या किंमती 3-20 टक्क्यांपर्यंत वाढवल्या होत्या. चहा, क्रूड पामतेल आणि इतर वस्तूंच्या किंमती वाढल्यामुळे कंपनीने डिसेंबर आणि सप्टेंबर तिमाहीतही किंमती वाढवल्या होत्या. यामुळे ती FMCG कंपन्यांपैकी एक बनली ज्यांचे ऑपरेटिंग उत्पन्न डिसेंबर तिमाहीत वर्षानुवर्षे वाढले.

इतर कंपन्या देखील उत्पादने महाग करू शकतात
डिसेंबर तिमाहीत हिंदुस्तान युनिलिव्हरचा बाजार हिस्सा त्याच्या उत्पादनांच्या आधारे 10 वर्षांतील सर्वात मोठा विस्तार झाला. अशा परिस्थितीत, सर्वात मोठ्या FMCG कंपनीने आवश्यक उत्पादनांच्या किंमती वाढवल्याने देशातील किरकोळ महागाईवर परिणाम होण्याची चिंता निर्माण झाली आहे. येत्या आठवड्यात इतर कंपन्याही उत्पादनांच्या किंमती वाढवू शकतात.

“…अन् किरीट सोमय्यांनी स्वतः च्याच थोबाडीत मारली”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अन्वय नाईक यांच्याकडून रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी जमीन खरेदी केली होती. असे सांगत असताना किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक खोटं बोलत होते का? असे सुरुवातीला म्हंटले. मात्र, आपण एका मृत्यू झालेल्या व्यक्तीबद्दल बोलत असल्याचे सोमय्या यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत: च्या थोबाडीत मारुन घेतली.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून आज कोर्लई येथील रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवरील १९ बंगल्यांचा शोध घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयास भेट दिली जाणार आहे. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यापूर्वी केलेल्या तक्रारींबाबत पोलीस प्रशासनाकडे विचारणा करणार आहेत.

नेमके किरीट सोमय्या काय म्हणाले?

आज सकाळी सोमय्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सप्टेंबर 2020 पासून पाठपुरावा करत आहे. गावातील लोकांनाही समजून घ्यायचे आहे. आज कोर्लई या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी बंगले आहेत की नाहीत हे समजून घ्यायचे आहे. मुख्यमंत्री आणि ठाकरे परिवार खोटे बोलू शकत नाही. तिथला सरपंच काय बोलतो ते महत्त्वाचे नाही. जानेवारी त्यांच्या कुटुंबीयांनी अर्ज भरला होता. अन्वय नाईक 2009 पासून कर भरत आहेत. अन्वय नाईक खोट बोलत होते. अन्वय नाईक चिटिंग करत होते, असे किरीट सोमय्यांनी म्हंटले.