Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2765

सर्व LIC पॉलिसीधारकांनी ताबडतोब करावे ‘हे’ काम अन्यथा…

LIC

नवी दिल्ली । जर तुम्हीही LIC पॉलिसी घेतली असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. LIC ने पॉलिसीसोबत पॅन कार्ड लिंक करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. LIC ने आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती दिली आहे. सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली आहे.

बाजार नियामक सेबीनेही असाच नियम बनवला आहे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पॅन आधारशी लिंक करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे LIC लाही पॅन लिंक करण्यास सांगितले आहे.

जर तुम्ही अद्याप पॉलिसी पॅनशी लिंक केली नसेल, तर तुम्ही ते घरबसल्या ऑनलाइन करू शकता. जाणून घेऊया त्याचे स्टेप्स…

1. LIC च्या साइटवर पॉलिसींच्या लिस्ट सह पॅन डिटेल द्या.
2. आता तुमचा मोबाईल नंबर टाका. त्या मोबाईल नंबरवर LIC कडून एक OTP येईल, तो एंटर करा.
3. फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुम्हाला यशस्वी रजिस्ट्रेशन रिक्वेस्टचा मेसेज मिळेल.
4. आता तुम्हाला कळेल की तुमचा पॅन पॉलिसीशी जोडला गेला आहे.

घरबसल्या पॉलिसीचे स्टेट्स तपासा
>> LIC पॉलिसीचे स्टेट्स ऑनलाइन जाणून घेण्यासाठी तुम्हाला पहिले अधिकृत वेबसाइट https://www.licindia.in/ वर जावे लागेल. येथील जाणून घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.
>> रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख, नाव, पॉलिसी क्रमांक टाकावा लागेल. एकदा नोंदणी केल्यानंतर, तुम्ही तुमचे स्टेट्स कधीही तपासू शकता.
>> तुम्हाला काही माहिती हवी असल्यास तुम्ही 022-6827-6827 वर कॉल करू शकता. याशिवाय, तुम्ही 9222492224 या क्रमांकावर LICHELP <पॉलिसी नंबर> लिहून मेसेज पाठवू शकता. यामध्ये मेसेज पाठवल्यास तुमचे पैसे कापले जाणार नाहीत.

SMS द्वारे माहिती कशी मिळवायची ?
>> तुम्ही मोबाईलवरून SMS पाठवून पॉलिसीच्या स्टेट्सची माहिती देखील मिळवू शकता. यासाठी तुम्हाला 56677 या क्रमांकावर SMS पाठवावा लागेल.
>> जर तुम्हाला पॉलिसीचा प्रीमियम जाणून घ्यायचा असेल, तर तुम्ही ASKLIC PREMIUM टाइप करून 56677 क्रमांकावर SMS पाठवू शकता.
>> पॉलिसी लॅप्स झाली असेल, तर ASKLIC REVIVAL टाइप करून SMS करावा लागेल.

LIC चे जॉईंट पॉलिसीधारक IPO साठी अर्ज करू शकतात का? त्याविषयी जाणून घ्या

LIC

नवी दिल्ली | भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चा IPO पुढील महिन्याच्या 10 तारखेला सबस्क्रिप्शनसाठी उघडू शकतो. हा इश्यू 14 मार्च रोजी बंद होण्याची शक्यता आहे. LIC IPO मधील 10% हिस्सा पॉलिसीधारकांसाठी राखीव असेल. LIC पॉलिसीधारकांना इश्यू प्राईसमध्ये 5 टक्के सूट मिळू शकते. मात्र LIC चे जॉईंट पॉलिसीधारक या IPO साठी अर्ज करू शकतात की नाही…

LIC च्या IPO मध्ये सहभागी होऊ इच्छिणारे LIC पॉलिसीधारक त्यांचे पॅन डिटेल्स अपडेट केल्यानंतर आणि त्यांच्याकडे डीमॅट खाते असल्यासच ते अर्ज करू शकतात.

जॉईंट पॉलिसीमध्ये कोण अर्ज करू शकतो ते जाणून घ्या
LIC च्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यानुसार, जॉईंट LIC पॉलिसीमध्ये, दोन्ही पॉलिसीधारकांपैकी फक्त एकच व्यक्ती आरक्षणाच्या भागांतर्गत IPO साठी अर्ज करू शकते. ऑफरमध्ये बोली लावणाऱ्या अर्जदाराचा (तुम्ही किंवा तुमचा जोडीदार) पॅन क्रमांक पॉलिसी रेकॉर्डमध्ये अपडेट केला जावा. त्या अर्जदाराच्या नावावर डिमॅट खाते असले पाहिजे आणि जर ते डिमॅट खाते देखील जॉईंट असेल तर अर्जदार हा डीमॅट खात्याचा पहिला/प्राथमिक धारक असावा.

तुम्ही IPO साठी अर्ज करू शकता
त्याचप्रमाणे, LIC चे सर्व पॉलिसीधारक या राखीव श्रेणीतील IPO मधील शेअर्ससाठी बोली लावण्यासाठी पात्र नाहीत. ज्या पॉलिसीधारकांनी LIC पॉलिसीसाठी अर्ज केला आहे, मात्र त्यांना अद्याप पॉलिसी डॉक्युमेंट्स मिळालेले नाहीत, त्यांना पॉलिसीधारक आरक्षण भाग श्रेणी अंतर्गत आरक्षणासाठी पात्र होण्यासाठी DRHP मध्ये नमूद केले आहे, ही DRHP पॉलिसी दाखल केल्याच्या तारखेला किंवा सरेंडर, मॅच्युरिटी किंवा मृत्यूच्या दाव्याच्या खात्यावर बोली/ऑफर उघडण्याच्या तारखेच्या आधी किंवा आधी जारी केली गेली असावी.

‘या’ गोष्टींची विशेष काळजी घ्या
IPO घेण्यासाठी, डीमॅट खाते आणि पॅन अपडेट करणे अनिवार्य आहे. तुम्ही तुमच्या डीमॅट खात्यातून तुमच्या जोडीदारासाठी, मुलांसाठी किंवा नातेवाईकांसाठी अर्ज करू शकत नाही. पॉलिसीधारक 2 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही. प्रत्येक सदस्याला किती शेअर मिळणार हे शेअरच्या इश्यू प्राईसवर अवलंबून असेल. अनिवासी भारतीयांना भारतात IPO मध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी आहे.

सोमय्यांना स्वप्नातील बंगले दिसतात, हा तर भुताटकीचा प्रकार

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 19 बंगले खरेदी केल्याचा आरोप केल्यानंतर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांना याबाबत विचारले असता त्यांनी सोमय्यावर कडक शब्दात निशाणा साधला. किरीट सोमय्या याना स्वप्नातही बंगलेच दिसतात, हा तर भुताटकीचा प्रकार असा टोला त्यांनी लगावला.

ठाकरे कुटुंबाच्या 19 बंगल्यांबाबत तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या कोर्लईला जाणार आहेत. त्यावरून संजय राऊत याना विचारले असता राऊत म्हणाले, सोमय्याच्या स्वप्नात बंगले येतात, वेडा झालाय तो. त्याला स्वत:चे बंगले स्वप्नात दिसत आहेत. त्या जमिनीवर एकही बंगला नाही. बांधकाम नाही. याला स्वप्नात बंगले दिसतात. हा काही तरी भुताटकीचा प्रकार आहे.

दरम्यान, किरीट सोमय्यांनी देखील नाईक यांना धमक्या दिल्या आहेत. अर्णबला बिल पाठवायचं नाही, त्यांना पैसे मागायची नाही अशा प्रकारे त्यांना बोलावून सोमय्यांनी धमक्या दिल्या. यानंतरच अन्वय नाईकांनी आत्महत्या  केली, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

शरद पवारांनी 22 नेते कोट्यावधींना विकत घेतले होते : आ. जयकुमार गोरे

Jaykumar Gore

दहिवडी | माणच्या जयकुमार गोरेंनी मला माढा मतदार संघातून घालवून देशात माझी अब्रू घालवली. काहीही करून सगळे एकत्र या आणि त्यांना पाडा,’ असा आदेश पवार यांनी सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत दिला होता. तसेच मतदारसंघातील 22 नेते कोट्यवधींना विकत घेण्यात आले होते, असा आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी शरद पवारांवर केला आहे.

दिवड येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि तालुक्यातील भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, ज्येष्ठ नेते अर्जुन काळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, सभापती विलासराव देशमुख, रंजना जगदाळे, सरपंच जाकीर सय्यद, उपसरपंच किरण सावंत आदी उपस्थित होते.

जयकुमार गोरे पुढे म्हणाले, बारामती, फलटण, कराड, साताऱ्यातून माझ्यावर राष्ट्रवादीकडून मिसाईलचा मारा केला जातो; पण माझ्याकडे त्यांच्या सगळ्या मिसाईलला पुरून उरणारे माझ्यावर विश्वास असणाऱ्या जनतेचे हुकमी मिसाईल आहे. पवारांचा आदेश आणि मिळालेले पैसे घेऊन सगळी फौज माझ्याविरोधात लढली. पैशांचा पूर आणि जातीपातीचे राजकारण केले; पण जयकुमारने त्यांना हिसका दाखवला. मला पाडायची संधी हुकल्याने आता पुढील 15 वर्षे ‘त्यांनी’ आमदारकीची स्वप्नेच बघू नयेत, असा टोलाही आमदार गोरेंनी राष्ट्रवादीला लगावलाय.

Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण, आजची किंमत पहा

Gold Price Today

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय सराफा बाजारात आज म्हणजेच 18 फेब्रुवारीला पुन्हा एकदा सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण झाली. मात्र, त्यानंतरही सोन्याचा भाव 50 हजारांच्या वरच राहिला. त्याचबरोबर आज चांदीच्या दरातही घसरण नोंदवण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घट होत आहे.

सोन्या-चांदीचा भाव
एप्रिल मधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव आज 0.36 टक्क्यांनी घसरून 50,210 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. त्याच वेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये 0.03 टक्क्यांच्या घसरणीसह चांदी 63,840 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,400 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,300 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,510 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,400 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,300 रुपये
पुणे – 46,200 रुपये
नागपूर – 46,200 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,510 रुपये
पुणे – 50,400 रुपये
नागपूर – 50,400 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4576.00 Rs 4615.00 0.845 %⌃
8 GRAM Rs 36608 Rs 36920 0.845 %⌃
10 GRAM Rs 45760 Rs 46150 0.845 %⌃
100 GRAM Rs 457600 Rs 461500 0.845 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4990.00 Rs 5056.00 1.305 %⌃
8 GRAM Rs 39920 Rs 40448 1.305 %⌃
10 GRAM Rs 49900 Rs 50560 1.305 %⌃
100 GRAM Rs 499000 Rs 505600 1.305 %⌃

कंपनीत भागीदार करण्याचे अमिष दाखवुन 6 कोटी 78 लाखाची फसवणूक; वर्षभरानंतर आरोपी जेरबंद

औरंगाबाद – ऑर्बिट इलेक्ट्रोमेट इंडिया कंपनीत भागीदार करण्याचे अमिष दाखवुन कंपनीच्या एमडीने सोनालिका मेटल कॉर्पोरेशन कंपनीकडून वारंवार मालाची खरेदी केली. मात्र, त्याबदल्यात स्वतःच्या कंपनीत 50 टक्के भागीदारी देण्याचे अमिष दाखवून 6 कोटी 78 लाखाची फसवणूक करून पसार झाला. याप्रकरणी 23 फेब्रुवारी 2021 रोजी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वर्षभरानंतर आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी ऑर्बिट कंपनीच्या एमडीला छत्तीसगडच्या भिलाई येथून अटक केली. अनिल राजदयाल राय असे अटकेतील भामट्याचे नाव आहे.

देवराम संताराम चौधरी यांची सोनालीका मेटल कार्पोरेशन नावाची वाळूज एमआयडीसीत कंपनी आहे. 2017 मध्ये वाळूज एमआयडीसी भागातील ऑर्बिट इलेक्ट्रोमेट इंडिया प्रा.लि. कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर अनिल राय याने चौधरी यांच्या सोनालिका मेटल कॉर्पोरेशन कंपनीकडून वेळोवेळी स्टेनलेस स्टिल मालाची खरेदी केली. मात्र, राय याने खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता त्या मोबदल्यात चौधरी यांना ऑर्बिट कंपनीत 50 टक्के भागीदारी आणि कंपनीचे 1 लाख 25 हजार शेअर्स देण्याची थाप मारली. तसेच डायरेक्टर पदाच्या नियुक्तीचे पत्र दिले. त्यानंतर अनिल राय याने चौधरी यांना डायरेक्टर पदाची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने ती पूर्ण होण्यास दोन-तीन दिवसांचा वेळ लागेल. त्यामुळे तुम्हाला मुंबईहुन येथे प्रत्येकवेळी येणे शक्य होणार नाही. असे सांगुन ऑर्बिट इलेक्ट्रोमेक इंडिया प्रा.लि. कंपनीच्या दहा कोऱ्या लेटरपॅडवर व चेकवर चौधरी यांच्या स्वाक्ष-या घेतल्या.

त्यानंतर राय याने कोऱ्या लेटर पॅडवर केलेल्या स्वाक्षऱ्यांचा दुरुपयोग करुन चौधरी यांना ऑर्बिट कंपनीचे डायरेक्टर पदावरुन परस्पर काढुन टाकले. तसेच चौधरी यांचे नावे असलेले 35 लाख रुपये किंमतीचे 1 लाख 25 हजार शेअर्स परस्पर स्वतःचे नावे ट्रान्सफर करुन घेतले. राय याने चौधरी यांच्या स्टेनलेस स्टिल मालाचे 6 कोटी 43 लाख रुपये व शेअर्सचे 35 लाख असे एकुण 6 कोटी 78 लाख रुपयांची फसवणुक करून फरार झाला होता.

विनापरवाना छ. शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याने 28 जणांना पोलिस कोठडी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील केंजळ गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे बसवल्या प्रकरणी 36 तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांना अटक केली आहे. त्यातील 22 जणांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता बसवल्याने पोलिस आणि महसूल प्रशासन गावात दाखल झाले होते. शासनाची परवानगी न घेता पुतळा बसविल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी बसवलेला पुतळा सन्मानाने काढून स्थलांतरित केला होता. परंतु विना परवाना पुतळा बसवल्या प्रकरणी 36 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

गुन्हा दाखल केल्यापैकी 6 जणांना रविवारी आणि सोमवारी तर 22 जणांना मंगळवारी अटक करण्यात आली होती. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून यामध्ये वाई, खंडाळा आणि केंजळ येथील युवकांचा समावेश आहे. या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा वाईच्या पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी दिला आहे.

“अलिबागचे जावई आहात ना तर मग जावयासारखे या, अन्यथा…”; शिवसेना नेत्याचा सोमय्यांना इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते किरीट सोमय्या आज सकाळी रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास रवाना झाले. त्यांच्याकडून त्या ठिकाणी जाऊन तिथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांच्या जमिनीची पाहणी केली जाणार आहे. दरम्यान सोमय्यांना शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी गंभीर इशारा दिला आहे. “सोमय्या हे अलिबागचे जावई आहेत, त्यांनी जावयासारखे यावे. उन्माद करू नये अन्यथा शिवसेना योग्य उत्तर देईल,” असा इशारा दिला आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून अलिबाग तसेच रायगड जिल्ह्यातील कोर्लाई गावास भेट दिली जाणार आहे. तत्पूर्वी शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, सोमय्या हे अलिबागचे जावई आहेत, त्यांनी जावयासारखे यावे. उन्माद करू नये अन्यथा शिवसेना योग्य उत्तर देईल,” असा इशारा शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. कोर्लई गावच्या सरपंचानी कालच वस्तुस्थिती सांगितली आहे. त्यामुळे सोमय्यांनी उगाच खोटेनाटे आरोप करू नयेत असही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सोमय्या यांनी पेन येथील भाजप आमदाराच्या घरास भेट दिली. यावेळी त्याचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.किरीट सोमय्या यांच्याकडून आज कोर्लई येथील रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवरील १९ बंगल्यांचा शोध घेण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयास भेट देणार आहेत. त्यानंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यापूर्वी केलेल्या तक्रारींबाबत पोलीस प्रशासनाकडे विचारणा करणार आहेत.

Stock Market : बाजाराची सुरुवात कमकुवतपणाने, सेन्सेक्स 400 अंकांच्या घसरणीने उघडला

Share Market

नवी दिल्ली | शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात विक्रीचे वर्चस्व राहिले. ट्रेडिंग सुरू होताच गुंतवणूकदारांनी नफा बुक करण्यास सुरुवात केली. जागतिक बाजाराच्या दबावाखाली सेन्सेक्स 400 अंकांच्या घसरणीने उघडला.

यूएस आणि आशियाई बाजारातील घसरणीचा भारतीय गुंतवणूकदारांच्या भावनांवर मोठा परिणाम झाला. सुरुवातीच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 403 अंकांनी किंवा 0.70 टक्क्यांनी घसरून 57,488 च्या पातळीवर उघडला. NSE चा निफ्टी 68 अंकांनी घसरून 17,236 च्या पातळीवर उघडला. मात्र, नंतर थोडी सुधारणा झाली आणि सकाळी 9.24 वाजता सेन्सेक्स 75 अंकांनी आणि निफ्टी 19 अंकांच्या घसरणीसह ट्रेड करत होता.

गुंतवणूकदारांचे डोळे कुठे आहेत
आजच्या बाजारात गुंतवणूकदार मेटल आणि एनर्जी शेअर्सवर लक्ष केंद्रित करत आहेत. बाजारातील सर्वात मोठी घसरण विप्रो, टेक महिंद्रा, सिप्ला, नेस्ले आणि एचडीएफसी बँक यांसारख्या शेअर्समध्ये दिसून येत आहे. दुसरीकडे, कोल इंडिया, एनटीपीसी, यूपीएल, टाटा स्टील आणि आयओसी शेअर्सबाबत गुंतवणूकदारांची भावना सकारात्मक आहे.

जागतिक बाजारपेठेची स्थिती
रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या तणावाचा अमेरिकेच्या शेअर बाजारावर सर्वाधिक परिणाम दिसून येत आहे. वॉल स्ट्रीटवर, डाऊ जोन्स गुरुवारी 622.24 खाली आला आणि 34,312.03 च्या पातळीवर बंद झाला. त्याचप्रमाणे S&P 500 देखील 94.75 अंकांच्या घसरणीसह 4,380.26 वर बंद झाला. प्रमुख स्टॉक एक्स्चेंज Nasdaq Composite वर 407.38 अंकांची मोठी घसरणही झाली. फ्रान्स, जर्मनीसह युरोपीय बाजारही गुरुवारी घसरणीवर बंद झाले.

गायींची चोरी करणारी 5 जणांची टोळी तडीपार

सातारा | लोणंद परिसरात मारहाण करून लूटमार व गायींची चोरी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील तीन व सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.

टोळीप्रमुख पप्पू सर्जेराव जाधव (वय- २४) व संजय ऊर्फ दादा बारीकराव जाधव (वय- ३७, दोघे रा. मुळीकवाडी, ता. फलटण), अजित महादेव बोडरे (वय- २८) व अनिल अशोक तुपे (दोघेही रा. तांबवे, ता. फलटण) आणि तुषार बाळासो पाटोळे (वय- २०, रा. तरडगाव, ता. फलटण) अशी त्यांची नावे आहेत. या पाच जणांना वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुधारण्याची संधी देण्यात आली होती; परंतु त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती. त्यांच्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांना तडीपार करण्याबाबत लोणंद पोलिसांनी पोलिस अधीक्षकांकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठविला होता. त्यावर सुनावणी घेऊन अधीक्षक बन्सल यांनी पाचही जणांना संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती, भोरे व पुरंदर, तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले.

हद्दपार प्राधिकरणाकडे सरकारच्या वतीने अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, उपनिरीक्षक मधुकर गुरव, हवालदार प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस, तसेच लोणंद पोलिस ठाण्याचे हवालदार नाळे यांनी पुरावे सादर केले. अशांतता पसरविण्याविरुद्ध यापुढेही अशी कडक कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा अधीक्षक बन्सल यांनी दिला आहे.