Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2767

फक्त एका मोबाईल नंबरवरून ऑर्डर करता येईल संपूर्ण कुटुंबाचे आधार पीव्हीसी कार्ड

Aadhar Card

नवी दिल्ली । आधार कार्डची प्रिंट घेऊन खुल्या बाजारातून प्लॅस्टिक कार्ड बनवल्यास ते चालणार नाही आणि ते व्हॅलिडही राहणार नाही, असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने म्हटले आहे. त्यामुळे आधार PVC कार्डची सुविधा सुरू करण्यात आली आहे. याद्वारे तुम्ही फी भरून PVC कार्डची प्रिंट घेऊ शकता.

सरकारी एजन्सीने म्हटले आहे की,”खुल्या बाजारातून आधारचे प्लास्टिक कार्ड बनवणे टाळा. अशा कार्डाने कोणीही तुमच्या बायोमेट्रिक सिक्योरिटीशी खेळू शकतो. हे टाळण्यासाठी, आधार बनवल्यानंतर, तुम्ही UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवरून आधार PVC कार्डसाठी अर्ज करू शकता. विशेष बाब म्हणजे एकाच रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावरून तुम्ही संपूर्ण कुटुंबाचे आधार PVC कार्ड ऑर्डर करू शकता.

50 रुपये द्यावे लागतील
UIDAI नुसार, PVC कार्डसाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील. यासाठी तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकता. ऑर्डर दिल्यानंतर काही दिवसात ते तुमच्या पत्त्यावर पोहोचेल. UIDAI ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, तुमच्या आधारमध्ये कोणताही मोबाइल नंबर रजिस्टर्ड असेल, तुम्हाला कोणत्याही मोबाइल क्रमांकावरून व्हेरिफिकेशनसाठी OTP मिळू शकेल. त्यामुळे एकच व्यक्ती त्याच्या संपूर्ण कुटुंबासाठी आधार PVC कार्ड ऑर्डर करू शकते.

तुम्ही अशाप्रकारे ऑनलाइन ऑर्डर करू शकता
सर्वप्रथम UIDAI लिंक http://myaadhaar.uidai.gov.in/genricPVC वर जा.
येथे तुमचा आधार क्रमांक टाका.
यानंतर कॅप्चा कोड टाकल्यानंतर Send OTP वर क्लिक करा.
OTP टाकल्यानंतर चेक बॉक्स बटणावर क्लिक करा. हे टर्म्स अँड कंडीशनसाठी आहे.
Submit बटणावर क्लिक केल्यानंतर, OTP व्हेरिफाय पूर्ण करा.
आता आधार डिटेल्सचे प्रीव्यू पहा. ते तुमच्या कॉम्प्युटरच्या मॉनिटरवर दिसेल.
यानंतर Make Payment वर क्लिक करा.

तुम्ही ‘या’ मार्गांनी पैसे देऊ शकता
मेक पेमेंट वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंट गेटवे पेजवर रीडायरेक्ट केले जाईल. तेथे तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्ड, नेटबँकिंग आणि UPI द्वारे पेमेंट करू शकता. यानंतर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरी असलेली पावती मिळेल. ते PDF स्वरूपात डाउनलोड करता येते. तुम्हाला एसएमएसद्वारे सेवा विनंती क्रमांक देखील मिळेल.

Google Pay वर अवघ्या काही मिनिटांतच उपलब्ध होईल 1 लाखांपर्यंतचे कर्ज; कसे ते जाणून घ्या

Google Pay

नवी दिल्ली । आता तुम्हाला पर्सनल लोन घेण्यासाठी बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही Google Pay वापरत असल्यास, पर्सनल लोन (Google Pay Personal Loan) घेणे तुमच्यासाठी एक चुटकीसरशी काम होईल. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, Google Pay वरून ताबडतोब लोन घेतले जाऊ शकते. वास्तविक, Google Pay ने DMI Finance Limited सह भागीदारी केली आहे. या भागीदारीत दोन्ही कंपन्या संयुक्तपणे डिजिटल पर्सनल लोन ऑफर करत आहेत.

Google Pay च्या ग्राहकांना DMI द्वारे दिलेली जास्तीत जास्त कर्जाची रक्कम 1 लाख रुपये असेल. तुम्ही ते जास्तीत जास्त 36 महिन्यांच्या हप्त्यांमध्ये परत करू शकता. ही भागीदारी देशभरात 15,000 पिन कोडवर सुरू करण्यात आली आहे.

लोन घेण्यासाठी ‘ही’ अट आवश्यक आहे
या लोन सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी तुम्ही Google Pay ग्राहक असणे आवश्यक आहे. जर तुम्ही Google Pay चे युझर असाल आणि तुमची क्रेडिट हिस्ट्री चांगली असेल तर तुम्हाला लगेच लोन मिळेल. तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंतचे लोन मिळू शकते. यासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.

हे इन्स्टंट लोन Google Pay वापरणाऱ्या प्रत्येकासाठी उपलब्ध होणार नाही. तुम्हाला लोन मिळेल की नाही हे तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीवर अवलंबून असेल. या सुविधेअंतर्गत, केवळ प्री-क्वालिफाइड एलिजिबल यूजर्सच DMI फायनान्सने ठरवलेल्या निकषांनुसार लोन मिळवू शकतील. अशा ग्राहकांना Google Pay वरून लोन दिले जाईल.

जर तुम्ही प्री-अप्रूव्ड कस्टमर असाल तर तुमच्या इन्स्टनर लोन अर्जावर रिअल टाइममध्ये प्रक्रिया केली जाईल. प्रक्रियेनंतर काही मिनिटांतच पैसे तुमच्या बँक खात्यात येतील.

होम लोनवर उपलब्ध आहे ओव्हरड्राफ्टची सुविधा; त्याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या x

home

नवी दिल्ली । बहुतेक लोकं स्वतःचे घर घेण्यासाठी बँकांकडून होमलोन घेण्यास प्राधान्य देतात. यामध्ये मोठी रक्कम उपलब्ध असल्याने आणि त्याची परतफेड करण्यासही बराच कालावधी मिळत असल्याने फारसा बोझा पडत नाही. आजकाल अनेक बँकांनी ओव्हरड्राफ्टची सुविधाही देऊ केली आहे.

वास्तविक, होमलोनवरील ओव्हरड्राफ्टची सुविधा म्हणजे कर्जदाराच्या हातात एक प्रकारे अतिरिक्त रक्कम देणे होय. जर तुम्ही देखील होमलोन घेतले असेल आणि तुम्हाला अल्प कालावधीसाठी आणखी काही आर्थिक मदत हवी असेल तर तुम्ही बँकेत ओव्हरड्राफ्टसाठी अर्ज करू शकता. मात्र, या सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी काही बेसिक गोष्टी जाणून घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

जास्त व्याजदर हे ओझे बनू नये
होमलोनवरील अल्प मुदतीच्या क्रेडिटच्या स्वरूपात बँकांद्वारे ऑफर केलेल्या ओव्हरड्राफ्टच्या सुविधेवर सामान्य दरापेक्षा जास्त व्याजदर असतो. हे तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत तर पैसे देते मात्र ते तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे ओव्हरड्राफ्टची किंमत किती असेल हे आधी बँकेकडून जाणून घेतले पाहिजे. या सुविधेचा लाभ घेताना होमलोन घेणाऱ्यांनी त्याचे फायदे आणि तोटे समजून घेतले पाहिजेत.

फ्लेक्सिबल री-पेमेंट
बँका अशा कर्जदारांना ही सुविधा देतात, जे त्यांचे उत्पन्न वाढल्यावर EMI ची रक्कम देखील वाढवतात. तुम्ही तुमच्या खात्यात टाकलेले अतिरिक्त पैसे तुमचे एकूण थकित मुद्दल आणि व्याज कमी करतात. होमलोनचे री-पेमेंट लवकर करण्याची ही पद्धत दीर्घकाळासाठी पैसे वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

गरज पडेल तेव्हा लगेच पैसे मिळतील
होमलोन मधील ओव्हरड्राफ्टची ही सुविधा प्री अप्रुव्हड लोन सारखीच असते, जिथे तुम्हाला आवश्यक असलेले पैसे लगेच मिळतात. यामध्ये देखील तुम्ही वापरलेल्या रकमेवरच व्याज भरावे लागेल. उदाहरणार्थ, जर बँक तुम्हाला 5 लाख ओव्हरड्राफ्टची सुविधा देत असेल आणि तुम्ही फक्त 2 लाख रुपये खर्च केले, तर तुम्हाला त्याच दोन लाख रुपयांचे व्याज द्यावे लागेल.

सुविधेचा लाभ घेण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या
या सुविधेचा योग्य वापर केल्यास, तुम्ही तुमच्या होमलोनच्या प्रीपेमेंटसाठी अतिरिक्त पैसे वापरू शकता. हे तुम्हाला प्री-पेमेंट दंडापासून देखील वाचवेल. यावर बँका नियमित होमलोनपेक्षा 0.60 टक्के जास्त व्याज आकारतात. ज्या लोकांकडे जास्तीची रक्कम आहे त्यांच्यासाठी ही सुविधा जास्त चांगली आहे.

शिवसेनेचा पुढाकार : मेढा – बोंडारवाडी मार्गावर पुन्हा धावू लागली लालपरी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

जावली तालुक्यामध्ये मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीनंतर बोंडारवाडी व आसपासच्या गावांना वाहतुकीचा प्रचंड मोठा सामना करावा लागत होता. त्यामुळे खाजगी वाहतुकीचा मार्गाने प्रवास करावा लागत होता. खासगी वाहन चालकांकडून मनमानी पध्दतीने पैसे वसूल केले जात होते. शालेय विद्यार्थ्यांना दररोज आठ किलोमीटर चालत ये- जा पायपीट करावी लागत होती. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे मेढा ते बोंडारवाडी मार्गावर पुन्हा लालपरी धावू लागली आहे.

बोंडारवाडी व आसपासच्या गावातून शालेय विद्यार्थी, अबालवृद्ध नागरिकांची होणारी परवड लक्षात घेऊन या मार्गावर एस. टी वाहतुक सुरु व्हावी. यासाठी माजी आमदार सपकाळ, विधानसभा संपर्कप्रमुख एकनाथदादा ओंबळे, क्षेञप्रमुख एस. एस. पार्टे (गुरुजी), तालुकाप्रमुख विश्वनाथजी धनावडे, केळघर शहरप्रमुख बाळासाहेब शिर्के, नंदु चिकणे यांनी यासाठी यशस्वी पाठपुरावा व प्रयत्न केला.

शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या एस.टीमुळे नागरिक व शालेय विद्यार्थ्यांनी शिवसेनेचे आभार मानले. बाहुळे या गावी शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने एस. टीचे पूजन करुन वाहक व चालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने संपर्कप्रमुख एकनाथदादा ओंबळे, तालुकाप्रमुख विश्वनाथजी धनावडे, केळघर शहरप्रमुख बाळासाहेब शिर्के, माजी विभागप्रमुख नंदु चिकणे, वैद्यकिय कक्ष समन्वयक प्रशांत जुनघरे, युवासेना उपतालुकाप्रमुख दिपक पवार, शाखा प्रमुख राजाराम जाधव, जगन्नाथ जाधव आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवारांनी रोहित पवारांवर सोपवली ‘हि’ मोठी जबाबदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वात पॉवरफुल नेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांना मानले जाते. त्यांच्या कुटुंबातील त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे, पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार, नातू पार्थ पवार आणि आमदार रोहित पवार हेही राजकारणात आहेत. आता शरद पवार यांनी नगर पंचायत निवडणूक गाजवणाऱ्या रोहित पवार यांच्यावर नवीन आणि मोठी जबाबदारी सोपवली आहे. “भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पार पडण्यास पवार यांनी सांगितले आहे.

आमदार रोहित पवार यांनी आज ट्विट केले असून यांनी आजोबा शरद पवार यांनी आपल्यावर मोठी आणि महत्वाची जबाबदारी सोपवली असल्याचे सांगितले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.

पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

तरडगावला विकास सेवा सोसायटीत राजे गटाची सत्ता

Ramraje

फलटण | तरडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीत राजे गट पुरस्कृत ग्रामदैवत भैरवनाथ पॅनलचे सर्व 13 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. या निवडणूकीत 1168 सभासदांनी मतदान केले त्यापैकी 1085 वैध आणि 83 मते अवैध ठरली.

राजे गट पुरस्कृत भैरवनाथ पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते कंसात खालीलप्रमाणे –

सर्वसाधारण मतदार संघ : किसन गेनबा गायकवाड (५८७), लक्ष्मण परमेश्वर गायकवाड (६०७), विजय संपत गायकवाड (५०५), संतोष यशवंत पवार (६६४), दशरथ घमाजी बनकर (६५७), महावीर प्रफुल्लकुमार शहा (६८३), वसंत शंकर शिंदे (६४९), मधुकर सदाशिव सुळ (६२८). महिला राखीव मतदार संघ : श्रीमती मधुमती सुरेश खलाटे (६७७), सौ. विजया पांडुरंग शिंदे (६२२). अनुसूचीत जाती जमाती राखीव मतदार संघ : गोविंद एकनाथ गायकवाड (६४५). विमुक्त जाती भटक्या जमाती राखीव मतदार संघ : पांडुरंग नबाजी कुलाळ (६६५). इतर मागास वर्ग राखीव मतदार संघ : मोहन गंगाराम अडसूळ (६७२).

महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती वसंतराव गायकवाड, विद्यमान पंचायत समिती सदस्या सौ. विमलताई वसंतराव गायकवाड, सरपंच सौ. जयश्री अनिल चव्हाण यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था फलटण सुनिल धायगुडे यांनी काम पाहिले.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे अत्यंत जवळचे सहकारी अशी सुधीर जोशी यांची ओळख होती. सुधीर जोशी यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच ते कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते परंतु अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात पक्षबांधणीसाठी सुधीर जोशी यांचे मोठे योगदान मानले जाते. सुधीर जोशी १९६८ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडून येऊन नगरसेवक बनले. त्यानंतर १९७३ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश प्राप्त झाले. या टर्मला जोशी यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद देखील भूषवले.

१९८६ ते १९९९ पर्यंत त्यांनी विधानपरिषदेचे आमदार म्हणून कारकीर्द गाजवली होती. १९९२ ते १९९५ दरम्यान ते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देखील होते. सेना-भाजप युती सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपद भूषवले. आजारपणामुळे त्यांनी १९९९ मध्ये सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते फारसे सार्वजनिक जीवनातही दिसत नव्हते.

संजय राऊतांनी घेतली गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; तब्बल दीड तास केली चर्चा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यासह इतर भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक गंभीर आरोप केले. त्यानंतर आज राऊत यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याचीही उपस्थिती होती. यावेळी राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना दिली. यावेळी तिघांच्यात तब्बल दीड तास चर्चा केली.

संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या याच्यावर केलेल्या कोट्यवधी रुप्याच्या आरोप प्रकरणाचे पुरावे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना देणार आहे, असे सांगितले. दरम्यान संजय राऊत यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत तिघांमध्ये तब्बल तासभर कमराबंद चर्चाही झाली.

संजय राऊत यांनी काय केले आहेत आरोप?

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरही वसुली केली आहे. 300 कोटी रुपयांची वसुली फडणवीसांच्या नावाने केली आहे. हा घोटाळा 400 कोटींहून अधिकचा आहे. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सुद्धा शेकडो कोटी गोळा केल्याची प्रकरण माझ्याकडे आली आहेत, असे राऊत यांनी म्हंटले.

‘हिंदुस्थानी भाऊ’ला जामीन मंजूर; विद्यार्थ्यांना भडकावल्या प्रकरणी झाली होती अटक

hindusthani bhau

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी भडकावल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊ ला एक फ्रेब्रुवारी रोजी धारावी पोलिसांनी अटक केली होती. अखेर आज त्यांना जामीन मंजूर झाला असून एकप्रकारे दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील सत्र न्यायालयाने अटी व शर्तींसह विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला 30 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे.  त्यामुळे, गेल्या 17 दिवसांपासून तुरुंगात असलेला हिंदुस्थानी भाऊ आता जेलमधून बाहेर येईल.

हिंदुस्थानी भाऊ ला का अटक झाली?

राज्यात 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात यावे, या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येत विद्यार्थी एकवटले आणि आंदोलन सुरू केले होते. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकरणात विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप हिंदुस्थानी भाऊ वर करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली होती.

पुणे- बंगळूर महामार्गावर प्रविण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

पुणे- बंगलोर महामार्गावर भाजपचे नेते व विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर याच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला आहे. ताफ्यातील पोलीस गाडीला अपघात झाल्याने ताफा जागेवरच थांबविण्यात आला आहे. स्वतः प्रविण दरेकर यावेळी अपघात झालेल्या गाडीच्या पाठीमागे असणाऱ्या गाडीत होते.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा जिल्हा दाैऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे पुणे- बंगलोर महामार्गावर प्रवास करत होते. या मार्गावरील पारगांव- खंडाळा येथे ताफा आला असता, ताफ्यातील पोलिस गाडीचा (क्रमांक- एमएच-20- ईई- 1951) अपघात झाला. या पोलिस गाडीच्या पाठीमागे प्रविण दरेकर यांची गाडी (क्रमांक एमएच- 47- एएम- 0011) ही होती. अपघातानंतर ताफा जागेवर थांबवून परिस्थितीची स्वतः दरेकर यांनी पाहणी केली.

ताफ्यातील पोलिस गाडीचे पुढील भागाच्या डाव्या बाजूचे नुकसाने झाले आहे. गाडीच्या डावीकडील बाजूच्या टायरवरील भाग तुटलेला आहे. तसेच गाडीला थटलेले सुरक्षित आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा जीवितहानी या अपघातात झालेले नाही.