Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2776

रतन टाटांची कंपनी पुढील आठवड्यात शेअर्स बायबॅक करणार, छोट्या गुंतवणूकदारांनी ‘या’ गोष्टी जाणून घ्याव्यात

नवी दिल्ली । टाटा ग्रुपची दिग्गज आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने शेअर बायबॅकची घोषणा केली आहे. याचा अर्थ कंपनीला आपल्या भागधारकांकडून भरीव प्रीमियमवर शेअर्स परत खरेदी करायचे आहेत. TCS ने 18,000 कोटी रुपयांची बायबॅक ऑफर आणली आहे. यामध्ये कंपनी आपल्या भागधारकांकडून 4500 रुपये प्रति शेअर दराने 4 कोटी इक्विटी शेअर्स खरेदी करणार आहे.

23 फेब्रुवारी ही रेकॉर्ड डेट आहे
अशा प्रकारे, शेअरच्या सध्याच्या किंमतीनुसार, गुंतवणूकदार अल्पावधीतच सुमारे 20 टक्के नफा कमवू शकतील. TCS च्या शेअर बायबॅक ऑफरमध्ये भाग घेण्यास पात्र असलेल्या इक्विटी भागधारकांची रेकॉर्ड तारीख बुधवार, 23 फेब्रुवारी अशी निश्चित करण्यात आली आहे. अशा प्रकारे, TCS च्या बायबॅक ऑफरमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे गुंतवणूकदार रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतात.

जाणून घ्या काय म्हणाले मोतीलाल ओसवाल
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालच्या मते, किमान स्वीकृती प्रमाण 30-50% दरम्यान असू शकते. याचाच अर्थ असा की, तुम्ही ऑफर केलेल्या प्रत्येक 10 शेअर्सपैकी कंपनी किमान 3 ते 5 शेअर्स खरेदी करेल. मोतीलाल ओसवाल म्हणाले, “किरकोळ गुंतवणूकदार ज्यांना अल्पावधीत पैसे कमवायचे आहेत ते खुल्या बाजारातून TCS चे शेअर्स (विक्रमी तारखेपर्यंत रु. 2 लाख) खरेदी करू शकतात आणि बायबॅक ऑफरमध्ये त्यांना निविदा देऊ शकतात.”

TCS ने बायबॅक ऑफरमध्ये ऑफर केलेल्या 4500 रुपये प्रति शेअरच्या किमतीनुसार, किरकोळ भागधारकांद्वारे जास्तीत जास्त 44 शेअर्स ऑफर केले जाऊ शकतात.

टाटा सन्स आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (TICL) कंपन्या देखील TCS च्या या बायबॅक ऑफरमध्ये सहभागी होऊ इच्छित आहेत. TCS ने गेल्या महिन्यात ही माहिती दिली होती. टाटा सन्सने बायबॅकसाठी 2.88 कोटी शेअर्स आणि TICL चे 11,055 शेअर्स ऑफर करण्याची योजना आखली आहे. TCS ची मागील बायबॅक किंमत सुमारे ₹16,000 कोटी होती जी 18 डिसेंबर 2020 रोजी उघडली आणि 1 जानेवारी 2021 रोजी बंद झाली.

क्रिकेटवर ऑनलाइन बेटिंग करणारी टोळी गजाआड

औरंगाबाद – क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटिंग करून सट्टारॅकेट चालविणाऱ्या टोळीचा गुन्हेशाखेच्या पथकाने भांडाफोड करीत आठ आरोपीच्या वाळूज औधोगिक परिसरातून मुसक्या आवळल्या त्यांच्या ताब्यातून अनेक मोबाईल रोख पोलिसांनी जप्त केली असून या रॅकेट मध्ये सामील असलेल्याच्या बँक खात्याची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी पत्रकारांना संवाद साधताना दिली.

विविध क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन पद्धतीने बेटिंग करून सट्टा घेतला जात असल्याची माहिती गुन्हेशाखेच्या पथकाला मिळाली होती.या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून वाळूज औधोगिक वसाहतीत छापा टाकत आठ आरोपीच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून अनेक मोबाईल, रोख रक्कम, पोलिसांनी जप्त केली आहे. वृत्तदेईपर्यंत या प्रकरणाची आरोपींची नावे समोर आली न्हवती. जुगार खेळविणारे आणि खेळणारे दोघेही कायद्याच्या दृष्टीने तेवढेच दोषी आहे.

या प्रकरणाची व्याप्ती तपासात आहोत.ज्या बँक खात्यावर देवाण घेवाण होत होती. त्या खात्याची माहिती घेऊन दोषी आढळणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता यांनी दिली.

गरवारे कंपनीत नेटमध्ये पाय अडकला अन् महिला कामगाराचा जीव गेला

वाई | येथील औद्योगिक वसाहतीतील एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिला कामगारांचा मशीनमध्ये अडकल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सकाळी साडे सातच्या सुमारास घडली. छाया संतोष बोधे (वय- 38) असे मशीनमध्ये अडकून मृत्यू झालेल्या महिला कामगाराचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, छाया बोधे या गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीत मागील दहा वर्षांपासून काम करीत आहेत. मंगळवारी सकाळी त्या कामावर गेल्या. रोप-वेचे काम करण्यासाठी मशीन सुरु करत असताना त्याचा पाय नेटमध्ये अडकल्याने त्यांचे संपूर्ण शरीर वेगाने दोरीसोबत गुंडाळले गेले. यावेळी कामावर असलेल्या अन्य कामगारांनी त्वरित मशीन बंद केले.

दरम्यान त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना तातडीने वाईतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच छाया बोधे यांचा मृत्यू झाला. त्यांचे पती संतोष तान्याबा बोधे हे देखील कंपनीत काम करीत आहेत. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. या घटनेची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन; तहसिलदारांनी ठोठावला 294 कोटींचा दंड

सोलापूर |  नागपूर – रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी तब्बल पावणे तीन लाख ब्रास मुरूमाचे बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या जी.आर. इन्फ्रा या बांधकाम कंपनीसह संबधित शेतकऱ्याला सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी तब्बल २९४ कोटी ४२ लाख ३५ हजार ३५० रुपयांच्या दंड केला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ही आता पर्यंतची सर्वात मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते ‌दादासाहेब चव्हाण यांनी तक्रार केली होती. दंडाची रक्कम तात्काळ भरावी यासाठी महसूल विभागाने बांधकाम कंपनी व संबंधीत शेतकऱ्याला नोटीस बजावण्यात आली आहे .

सांगोला तालुक्यातील शिवणे येथे अवैधरित्या मुरूमाचे उत्खनन केले आहे. येथील गावकामगार तलाठ्याने १६ डिसेंबर २०२१ पंचनामा केला होता . पंचनामा अहवालात २ लाख ७७ हजार ७५८ ब्रास इतक्या मोठ्या प्रमाणात गौणखनिज ( मुरुमाचे ) बेकायदेशीर उत्खनन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे .

Gold Price : स्वस्तात सोने खरेदीची संधी, आजचे दर पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या सोन्याच्या दरात सतत चढ-उतार होत आहेत. काल सोन्याच्या दरात जोरदार वाढ झाली होती, त्यानंतर सोन्याचा दर 50,000 च्या पुढे गेला होता. दुसरीकडे, एकाच दिवसात सोन्याचा दर थेट 850 रुपयांनी खाली आला. जर तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज एक चांगली संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.07 टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड करत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.

सोन्या-चांदीचा भाव
एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.07 टक्क्यांनी घसरून 49,350 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. दुसरीकडे, आजच्या ट्रेडिंग चांदी 0.15 टक्क्यांच्या घसरणीसह 62,892 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,560 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,200 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,500 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 50,560 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,200 रुपये
पुणे – 46,150 रुपये
नागपूर – 46,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 50,500 रुपये
पुणे – 50,560 रुपये
नागपूर – 50,560 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4625.00 Rs 4676.00 1.091 %⌃
8 GRAM Rs 37000 Rs 37408 1.091 %⌃
10 GRAM Rs 46250 Rs 46760 1.091 %⌃
100 GRAM Rs 462500 Rs 467600 1.091 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4675.00 Rs 4625.00 -1.081 %⌄
8 GRAM Rs 37400 Rs 37000 -1.081 %⌄
10 GRAM Rs 46750 Rs 46250 -1.081 %⌄
100 GRAM Rs 467500 Rs 462500 -1.081 %⌄

“सोमय्याकडून ईडीच्या नावाखाली धमक्या देण्याचे काम”; संजय राऊतांचा पलटवार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर नवीन आरोप केले. त्यानंतर त्यांच्या प्रश्नांना राऊतांनी प्रत्युत्तर दिले. “किरीट सोमय्या आणि मित्र अमित देसाई या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन 100 कोटीचा प्लॉट मातीमोल किमतीत स्वत: च्या नावावर करुन घेतला. 110 कोटीची जमीन मातीमोल किमतीला घेतली. ईडीच्या नावावर काय चाललेय हे देशाला कळायला पाहिजे. सोमय्यांकडून ईडीची भीती दाखवून धमक्या देण्याचे काम केले जात आहे. त्यातील 15 कोटी रुपये ईडीच्या अधिकाऱ्याला दिले आहेत. ईडीने त्याची दखल घ्यावी, अन्यथा ईडीने अधिकाऱ्याची नावं जाहीर करेन, असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला.

दिल्लीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्याच्या आरोपांना संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत पलटवार केला. ते म्हणाले कि, ईडीच्या नावावर धमक्या , क्रिमिनल सिंडिकेट, ईडीला पैसे द्यावे लागतात, याचा लवकरच भांडाफोड होईल. काल मी 19 बंगले दाखवा म्हणलं दाखवलं का? अर्जून खोतकर यांना किती त्रास दिला. मुंबईतील बिल्डरांकडून पैसे घेतले गेले. आठ जेवीपीडी स्कीम, सुजीत नवाब नावाचा प्लॉट आहे.

किरीट सोमय्या आणि मित्र अमित देसाई या दोघांनी मूळ मालकाला ईडीची धमकी देऊन 100 कोटीचा प्लॉट मातीमोल किमतीत स्वत: च्या नावावर करुन घेतला. 110 कोटीची जमीन मातीमोल किमतीला घेतली. ईडीच्या नावावर काय चाललेय हे देशाला कळायला पाहिजे, असेही राऊत यांनी यावेळी म्हंटले.

शेंद्रा ते वाळूजपर्यंत होणार उड्डाणपूल, मेट्रोचा डीपीआर

bridge

औरंगाबाद – शेंद्रा एमआयडिसी ते वाळूज पर्यंत एकच उड्डाणपूल मेट्रोसाठी डीपीआर तयार करण्यात येणार आहे. नॅशनल हायवे सोबत यासंदर्भात अंतिम चर्चा झाली केंद्र आणि राज्य शासनाचे निगडित महामेट्रो कंपनीच डीपीआर तयार करणार असल्याचे महापालिका प्रशासन अस्तिक कुमार पांडेय यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद शहरातील उड्डाणपुलासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत चार दिवसांपूर्वी बैठक घेण्यात आली. या बैठकीत चिकलठाणा ते वाळुज डीपीआर तयार करण्यावर चर्चा झाली होती. औरंगाबाद स्मार्ट सिटीने डीपीआर तयार करण्यासाठी अगोदरच महामेट्रो कंपनीची नियुक्ती केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण डीपीआर तयार करणार नाही.

याविषयी अधिक माहिती देताना पांडेय यांनी सांगितले की, उड्डाणपुलाचा डीपीआर महामेट्रो तयार करणार आहे. गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने डीपीआर तयार करावा असे ठरले असले, तरी महामेट्रोने हे काम सुरू केल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले.

Share Market : शेअर बाजारात तेजी, बाजारात पैसे कुठे गुंतवायचे जाणून घ्या

Stock Market

नवी दिल्ली । युद्धाच्या भीतीनंतर भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या तेजीनंतर बुधवारीही बाजार वाढीसह उघडले. सेन्सेक्स सुमारे 40 अंकांच्या वाढीसह 580000 च्या वर ट्रेड करत आहे. दुसरीकडे, निफ्टी सुमारे 40 अंकांनी वाढल्यानंतर 17400 च्या आसपास ट्रेड करत आहे.

रशिया-युक्रेन संकट टाळण्याच्या आशेने जागतिक चिन्हे चांगली दिसत आहेत. आशियाई बाजारपेठांमध्ये हिरवाई दिसून आली. SGX NIFTY किरकोळ वर ट्रेड करत आहे. काल US INDICES मध्ये 2% पर्यंत उसळी होती. कच्चे तेल आणि सोने नरमले.

बाजार पातळी
चॉईस ब्रोकिंगचे पलक कोठारी म्हणतात की,” निफ्टीने डेली चार्टवर 200 DMA चा आधार घेतला आहे. निफ्टी ओव्हरली चार्टवर 21*50-HMA वर सकारात्मक क्रॉस ओव्हरसह बंद झाला आहे. जे पुढील ट्रेडिंग सत्रांमध्ये तेजीचे लक्षण आहे. सध्या निफ्टीला 16800 वर सपोर्ट आहे तर 17500 वर रेझिस्टन्स दिसत आहे. दुसरीकडे, बँक निफ्टीला 37300 वर सपोर्ट आहे आणि 39000 वर रेझिस्टन्स दिसत आहे.”

कोटक सिक्युरिटीचे श्रीकांत चौहान म्हणतात की,” निफ्टीने डेली चार्टवर एक लांबलचक तेजीची कॅण्डल तयार केली आहे जी नजीकच्या काळात पुलबॅक रॅली सुरू ठेवण्याचे संकेत देते. 17450-17550 वर निफ्टीसाठी तात्काळ अडथळा दिसत आहे, जोपर्यंत निफ्टी 17200 च्या वर राहील तोपर्यंत तो 17450-17550 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जर निफ्टी 17200 च्या खाली घसरला तर आपण त्यात 17100- 17,050 ची पातळी देखील पाहू शकतो.”

NSE वर F&O बंदी अंतर्गत येणारे स्टॉक
16 फेब्रुवारी रोजी NSE वर 4 स्टॉक्स F&O बंदी अंतर्गत आहेत. यामध्ये BHEL, एस्कॉर्ट्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स आणि सेलच्या नावांचा समावेश आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर सिक्योरिटीजच्या पोझिशन्सने आपल्या मार्केट वाइड पोझिशन मर्यादा ओलांडल्या तर F&O सेगमेंटमध्ये समाविष्ट असलेले स्टॉक्स बंदी श्रेणीमध्ये ठेवले जातात.

15 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 2,298.76 कोटी रुपयांची विक्री केली. त्याच वेळी, या दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 4,411.60 कोटी रुपयांची खरेदी केली.

दुःखद निधन : जेवणाचे ताट करायला सांगितले अन् अशोकराव भावकेंना कारने उडविले

कराड | तालुक्यातील घोगाव येथील संतकृपा शिक्षण संस्था आणि मातोश्री सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अशोकराव जग्गनाथ भावके (वय-52) यांचे मंगळवारी रात्री अपघातात निधन झाले. घोगाव गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर उभे असताना त्याना कारने 11 वाजण्याच्या सुमारास धडक दिली. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, घोगाव येथील संतकृपा काॅलेज समोर अशोक भावके यांचे मातोश्री हाॅटेल आहे. तेथे जेवणाचे ताट तयार करायला सांगून रस्त्यावर फोनवरती बोलत आले असता अज्ञात चारचाकीने जोराची धडक दिली. यामध्ये ते डांबरी रस्त्यावर पडले, तेव्हा हाॅटेलमध्ये असलेल्या लोकांनी त्यांना उपचारासाठी तातडीने कृष्णा हाॅस्पीटल, कराड येथे आणले. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अशोक भावके यांच्या कन्या आॅस्ट्रेलिया येथे असल्याने कन्या आल्यानंतर उद्या गुरूवारी दि. 17 रोजी जन्मगाव घोगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अशोकराव भावके यांनी 1995 ला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून स्व. विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांच्या विरोधात शिवेसनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. तेथून त्यांच्या राजकारणाची सुरूवात झाली. त्यानंतर त्यानी संतकृपा शिक्षण संस्था स्थापन केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली होती. मातोश्री सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरजूंना मदत केली होती. काही वर्षांपासून राजकारणापासून अलिप्त राहून त्यानी पुणे आणि मुंबई येथे बांधकाम व्यवसायात जम बसवला होता. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते. काल (मंगळवारी) रात्री ते घोगाव येथे आले होते. रस्त्याच्याकडेला उभे राहिले असताना त्यांना कारने धडक दिली त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

“संजय राऊत तुम्ही कोणाला जोडे मारणार, मला कि रश्मी ठाकरेंना?”; किरीट सोमय्यांचे उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या हे दलाल आहेत, असा आरोप केला होता. “ठाकरे सरकारचे अलिबागजवळ 19 बंगले असल्याचे मुलुंडच्या दलालाने सांगितले. राऊतांच्या आरोपांवर किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषद घेतली. “१९ बंगले कोणाच्या नावावर आहेत? रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० रोजी या १९ बंगल्यांचा मालमत्ता कर कोलराई ग्रामपंचायतला भरला. संजय राऊत तुम्ही कोणाला जोड्याने मारणार आहात?,”मला कि रश्मी ठाकरे यांना? असा सवाल सोमय्या यांनी केला.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेली. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्याच्यावरआणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत स्पष्टीकरण दिले. यावेळी ते म्हणाले की, काळ राऊतांनी मला जोडे मारण्याची भाषा केली. हि भाषा मला नाही तर रश्मी ठाकरेंना संबोधून केली आहे. १९ बंगले कोणाच्या नावावर आहेत? रश्मी उद्धव ठाकरे यांनी १२ नोव्हेंबर २०२० ला या १९ बंगल्यांचा मालमत्ता कर कोलराई ग्रामपंचायतला भरला. रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे.

एवढेच नाही तर रश्मी ठाकरे यांनी आधीच्या दोन वर्षांचा मालमत्ता कर भरला असून त्याआधीच्या सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईकच्या नावे आहे. हा कर किरीट सोमय्यांनी भरलेला नाही. त्यामुळे राऊत तुम्ही कोणाला जोड्याने मारणार आहात? १ एप्रिल ते २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंतचा १९ बंगल्याचा कर यांच्या खात्यातूनच गेला आहे.

११ नोव्हेंबर २०२० ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जमिनीचे तसंच व्यवसायिक संबंध मी उघड केले होते. २००९ पासून दरवर्षी या बंगल्याचा कर भरला जात आहे. आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे, मनिषा वायकर हा कर भरत होत्या,” असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.