Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2775

LIC चे पॉलिसीधारक असाल तर IPO खरेदी करण्यापूर्वी ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा

LIC

नवी दिल्ली । LIC चा IPO 31 मार्चपूर्वी येणार आहे. LIC च्या निर्गुंतवणुकीसाठी सरकारने सेबीकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस सादर केला आहे. ड्राफ्ट मसुद्यानुसार, LIC आपला 5 टक्के हिस्सा विकणार आहे. LIC च्या पॉलिसीधारकाला राखीव कोट्याचा लाभ मिळेल.

एक किंवा दोन पॉलिसी घेणारे ग्राहक देखील IPO मध्ये सहभागी होऊ शकतात. IPO मध्ये प्रति ग्राहक 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. तुम्ही LIC चे पॉलिसीधारक असाल आणि IPO खरेदी करू इच्छित असाल तर ‘या’ पाच गोष्टी नक्की जाणून घ्या.

स्वतःचे डीमॅट खाते आवश्यक आहे
IPO साठी अर्ज करण्यासाठी, पॉलिसीधारकाचे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. कोणताही पॉलिसीधारक त्याच्या जोडीदाराच्या, मुलाच्या किंवा नातेवाईकांच्या डिमॅट खात्यातून अर्ज करू शकणार नाही. सवलतीनंतर, कोणत्याही पॉलिसीधारकाला 2 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे शेअर्स मिळणार नाहीत. पॉलिसीधारक अनिवासी भारतीयांना (NRIs) राखीव श्रेणीचा लाभ मिळणार नाही.

जॉईंट पॉलिसीमध्ये फक्त एक संधी
जर एखाद्याने जॉईंट पॉलिसी घेतली असेल तर दोन पॉलिसीधारकांपैकी फक्त एकच आरक्षित श्रेणीमध्ये अर्ज करू शकेल. IPO साठी अर्जदाराचा पॅन नंबर पॉलिसी रेकॉर्डमध्ये अपडेट केला पाहिजे. जर डिमॅट खाते देखील जॉईंट असेल तर अर्जदार हा पहिला किंवा प्राथमिक खातेदार असावा. यामध्ये पॉलिसीधारकाचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास, प्रस्तावक आरक्षित श्रेणी अंतर्गत अर्ज करू शकतो.

LIC कडे रेकॉर्ड असला पाहिजे
IPO खरेदी करण्यासाठी तुमच्या पॉलिसीचा रेकॉर्ड LIC कडे असणे आवश्यक आहे. जर एखाद्याने ड्राफ्ट पेपर सबमिट करण्यापूर्वी पॉलिसी खरेदी केली असेल आणि नंतर त्याला बाँड लेटर मिळाले असेल तर तो IPO देखील खरेदी करू शकतो. जे 13 फेब्रुवारीनंतर पॉलिसी खरेदी करतील ते पात्र असणार नाहीत.

कर्मचाऱ्यांकडे अनेक पर्याय आहेत
LIC ने IPO चा काही भाग आपल्या कर्मचार्‍यांसाठी राखून ठेवला आहे. जर एखाद्याकडे LIC पॉलिसी असेल तर तो कर्मचारी, पॉलिसी रिझर्वेशन आणि रिटेल गुंतवणूकदार म्हणून स्वतंत्रपणे अर्ज करू शकतो. अशा गुंतवणूकदारांनी केलेले तीनही अर्ज व्हॅलिड असतील, असे LIC ने स्पष्ट केले आहे.

लॉक-इन पिरियड नाही
IPO साठी अर्ज करणाऱ्या पॉलिसीधारकांसाठी कोणताही लॉक-इन पिरियड असणार नाही. IPO स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टिंग झाल्यानंतर पॉलिसीधारक त्यांचे इक्विटी शेअर्स विकू शकतील. साधारणपणे, IPO मध्ये गुंतवणूक करणारे काही गुंतवणूकदार लॉक-इन पिरियडच्या अटीच्या अधीन असतात.

… अन् पंतप्रधान मोदी झाले किर्तनामध्ये दंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे संत गुरु रविदास विश्रामधाम मंदिराला भेट दिली. यावेळी मोदींनी कीर्तनात सहभागी होत मंजिरा वाजवला. विशेष म्हणजे कीर्तनावेळी पंतप्रधान मोदी यांनी हातात मंजिरा घेतला व तो वाजवला. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

नरेंद्र मोदी यांनी संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त त्यांना दिल्लीतील करोल बाग येथील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात दर्शन घेतले. याबाबतचा व्हिडीओही मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी संत रविदासांचा जन्म झाल्याचे मानले जाते. आज 16 फेब्रुवारीला माघ पौर्णिमा साजरी होत असल्याने आजचा दिवस संत रविदासांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी उपस्थिती लावत शबद किर्तनात सहभाग घेतला. त्यांनी कीर्तन कार्यक्रमावेळी उपस्थित राहिलेल्या महिला आणि भाविकांची विचारपूस देखील केली.

सोन्याची आवड असलेल्या बप्पी दा यांच्याकडे एकूण किती सोने होते जाणून घ्या

नवी दिल्ली । मिथुन चक्रवर्तीच्या डान्सला आवाज (संगीत) देणारे बप्पी लाहिरी यांचे नाव समोर येताच एक रोमँटिक गायक म्हणून त्यांचे पहिले चित्र आपल्या मनात येते. वयाच्या 69 व्या वर्षी बप्पी दा यांनी बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला.

सोन्याचे दागिने घालण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बप्पी दा यांनी किती संपत्ती मागे ठेवली याचा विचार आमच्याप्रमाणेच तुम्हीही केला असेल. त्याबरोबरच त्यांच्याकडे किती सोने आहे हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असेल. प्रत्येकाला बप्पी दाच्या सोशल स्‍टेटसबद्दल माहिती असेलच, मात्र आज आम्ही तुम्हांला त्यांच्या फायनान्शिअल स्‍टेटसची माहिती देत ​​आहोत.

3.5 कोटींचे घर आणि 55 लाखांची कार
बप्पी दा यांचे मुंबईत एक आलिशान घर आहे, जे त्यांनी 2001 मध्ये खरेदी केले होते. या घराची बाजारातील किंमत सध्या सुमारे साडेतीन कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांना लगझरी गाड्यांचीही आवड होती. त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम 5 कार होत्या. BMW आणि Audi व्यतिरिक्त यामध्ये टेस्लाची 55 लाख रुपयांची कार देखील सामील आहे.

सोने घालणे लकी असल्याचे मानायचे
बप्पी दा यांना आपण नेहमीच 7-8 सोन्याच्या चैनी घातलेल्या पाहिले आहे. त्यांचे सोन्यावरील प्रेम सर्वश्रुत आहे. सोनं घालणे आपल्यासाठी लकी असल्याचे बप्पी दा यांनी अनेकदा सांगितले होते. त्यांच्याकडे वैयक्तिकरित्या अनेक सोन्याचे दागिने आहेत. 2014 च्या निवडणुकीदरम्यान झालेल्या खुलाशानुसार, बप्पी दा यांच्याकडे 750 ग्रॅम सोन्याचे दागिने होते. मात्र, आतापर्यंत त्यात आणखी वाढ झाली असण्याची दाट शक्यता आहे.

22 कोटींची एकूण मालमत्ता
बप्पी दा यांच्या संपत्तीवर नजर ठेवणाऱ्या वेबसाइट caknowledge नुसार, बप्पी लाहिरी यांच्याकडे डिसेंबरपर्यंत 3 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 22 कोटी रुपयांची संपत्ती होती. एका चित्रपटातील गाण्यासाठी ते 8-10 लाख रुपये घेत असत. एखाद्या कॉन्‍सर्टमध्ये एक तासाचा कार्यक्रम करण्यासाठी बप्पी दा 20 ते 25 लाख रुपये घेत असत. त्यांचे मासिक उत्पन्न 20 लाख आणि वार्षिक उत्पन्न सुमारे 2.2 कोटी होते तर 11.3 कोटींची वैयक्तिक गुंतवणूक झाली आहे.

“विलासराव जगताप यांच्याकडून वैयक्तिक बदनामी सुरू आहे”- आमदार विक्रम सावंत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी आपली भूमिका स्वच्छ आहे. तथापि समितीचे अध्यक्ष व माजी आमदार विलास जगताप हे माझी वैयक्तिक बदनामी करीत आहेत त्यांच्या या प्रवृत्तीचा मी जाहीर निषेध याठिकाणी करीत आहे. अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रकरणी आपण आमदार या नात्याने प्रशासनावर दबाव टाकत आहे. असा आरोप विलासराव जगताप यांचा चुकीचा आहे. गेल्या १५ दिवसांपासून जत शहरात घाणेरडे राजकारण सुरू आहे. पुतळा समितीच्या निमित्ताने विलासराव जगताप आपले स्वत चे राजकीय पुनर्वसन करीत आहेत. गेली सात वर्षे पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप आहेत. त्यांचा सर्वसामान्य जनतेस वेठीस धरण्याचा उद्योग सुरू आहे.

पुतळा समितीने शासनाच्या नियमांची पूर्तता करावी आपण पुतळा बसविण्यासाठी सहकार्याची भावना ठेवून पुढे येऊ अशी भूमिकाही आमदार विक्रम सावंत यांनी यावेळी मांडली. यावेळी जत संस्थानचे श्रीमंत शार्दुलाराजे डफळे, सरदार पाटील, महादेव पाटील, इत्यादी मंडळी व नेते उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणाचा संघर्ष टोकाला, पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तामुळे ‘या’ शहरास छावणीचे स्वरूप

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जत येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाने वेगळेच वळण घेतले आहे दिवसेंदिवस प्रकरण चिघळत आणि संघर्ष वाढत चालल्याने प्रशासनाने मोठी दखल घेत जतमध्ये मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जत शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाचा संघर्ष टोकाला गेला आहे. शिव जयंतीपूर्वी हा पुतळा कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवाजी पेठेतील चबुतऱ्यावर बसवण्याचा घाट घातला आहे अशी टोकाची भूमिका पुतळा समितीने घेतली आहे.

आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ट्रकमधून खाली उतरवण्यात आला आहे गेल्या चार दिवसांपासून छत्रपती शिवरायांची सकाळ संध्याकाळ आरती केली जात आहे. पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप यांच्या पेट्रोल पंपावर हा पुतळा असला तरी या ठिकाणीसुद्धा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जत शहरात छत्रपती शिवाजीराजे पुतळा प्रकरणामुळे वातावरण तापले आहे.

जत शहरात 1300 पोलिस बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी राखीव दलाच्या चार तुकड्या सुद्धा जत मध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या मोठ्या बळामुळे जत शहरास पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

शब्द पाळला ! अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीत घोडीवर बसून मारली बारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैलगाडा शर्यतीवरून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे खुले आव्हान दिले होते. शर्यतींमध्ये घाटात गाड्यासमोर घोडीवर बसायचे असेल तर लांडेवाडीला या, असे पाटील यांनी म्हंटल्यावर त्यांना कोल्हे यांनी मी शब्द पाळणार असे आव्हान दिले होते. ते आज त्यांनी पाळले. पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बारीत खासदार कोल्हे यांनी घोडीवर बसून बारी मारली.

पुण्यातील निमगाव दावडी येथे आज बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले. यावेळी शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी घोडीवर बसून, बैलजोडी समोर बारी मारली.

डिसेंबर 2021 च्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने विविध अटी व शर्ती घालत बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली. बैलगाडा शर्यत सुरु करण्याबाबत आढळराव आणि कोल्हे यांच्यात द्वंद्व सुरु असते. या पार्श्‍वभुमीवर आढळराव यांनी कोल्हे यांना उपरोधिक आव्हान दिले होते.ते आज कोल्हे यांनी पूर्ण केले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/630007774771881

बैलगाडा शर्यतीवरुन घेरणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं – कोल्हे

पुण्यातील निमगाव दावडी येथील घाटातील बारीत खासदार कोल्हे यांनी घोडीवर बसून बारी मारली. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,  “पहिली शर्यत सुरु झाली तेव्हा संसद अधिवेशन सुरु होते. ज्यांनी बैलगाडा शर्तीबाबत आक्षेप घेतला त्यांची 50 टक्के उपस्थिती होती. त्यांना त्रास होऊ नये म्हणून मी तिकडे नव्हतो. आज बैलगाडा शर्यतीबाबत जो निकाल दिला आहे. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि महाविकास आघाडी सरकारचे मी आभार मानत आहे. शर्तीच्या आयोजनामुळे ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळतेय. मात्र, आता मी बैलगाडा शर्यतीवरुन घेरणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे,” असा टोलाही यावेळी कोल्हे यांनी पाटील यांना लगावला.

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर इंधन 5 ते 6 रुपयांनी महागणार ?

नवी दिल्ली । जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असतानाही देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत नाहीत. याचा परिणाम तेल कंपन्यांच्या उत्पन्नावर होत आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करत नाहीत. निवडणुकीनंतर तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे 5-6 रुपयांनी वाढ करू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ न झाल्याने कंपन्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा स्थितीत सर्वसामान्यांना मार्जिन राखण्यासाठी प्रतिलिटर पाच ते सहा रुपयांनी दरवाढ करणे आवश्यक झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती चढ्या राहिल्या तर, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नक्कीच वाढतील.

किंमतींवर कसा परिणाम होतो ते जाणून घ्या
आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे विश्लेषक प्रबल सेन यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीतील चढ-उताराचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल एक डॉलरने वाढली, तर देशांतर्गत बाजारात किंमत प्रतिलिटर 45-47 पैशांनी वाढते. मात्र परदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असल्या तरी दिवाळीपासून देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. नोव्हेंबरपासून कच्चे तेल प्रति बॅरल $25 वर पोहोचले आहे.

क्रूड दिवसेंदिवस महाग होत आहे
रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम असल्याने आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती मंगळवारी 94 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. 2014 नंतर पहिल्यांदाच क्रूडची किंमतीने एवढी पातळी गाठली आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव कायम राहिल्यास कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 125 डॉलरपर्यंत पोहोचू शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळानिहाय कौशल्य चाचणी आयोजन

हॅलो महाराष्ट्र | परभणी प्रतिनिधी

सरळ व क्रीडा कौशल्य चाचण्याद्वारे प्रवेश महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करून शास्त्रोक्त प्रशिक्षण शिक्षण भोजन, निवास अद्यावत क्रीडा सुविधा , क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत खेळाडूंना देण्यात येत आहेत राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश व खेळानिहाय कौशल्य चाचण्याद्वारे निवासी व अनिवासी खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे.

यामध्ये 01. अमरावती- अर्चरी ज्युदो 02. नागपूर हॅण्डबॉल , अथलेटिक्स 03 , अकोला बॉक्सींग 04. गडचिरोली अथलेटिक्स 05 , ठाणे – बॅडमिंटन 06. नाशिक शुटिंग , अथलेटिक्स 07. कोल्हापुर शुटिंग , कुस्ती 08. औरंगाबाद अथलेटिक्स , हॉकी 09 , पुणे टेबल टेनिस , वेटलिफटींग , जिमनॅस्टीक या प्रबोधिनीनिहाय या खेळाचा समावेश असून याकरीता अर्हता खालीलप्रमाणे असणार आहे.

सरळ प्रवेश प्रक्रिया क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीयस्तरावर राज्याचे प्रतिनिधीत्व केलेले खेळाडू ज्यांचे वय 19 वर्ष आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चीत केला जाईल. खेळनिहाय कौशल्य चाचणी क्रीडा प्रबोधिनीतील असलेल्या संबंधित खेळात राज्यस्तरावर सहभागी खेळाडूनी ज्यांचे वय 19 वर्षाच्या आतील आहे अशा खेळाडूंना संबंधित खेळाच्या खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करून गुणानुक्रमे प्रवेश निश्चीत केला जातो.

अनिवासी प्रवेश प्रक्रिया अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशाकरिता अधिकृत राज्य, राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय स्थान प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. इतर खेळाडूंची त्यांच्या क्रीडा प्रकारानुसार विविध कौशल्याची चाचणी घेऊन त्याआधारे खेळाडूंना प्रवेश देण्यात येईल याकरीता क्रीडा कार्यालयामार्फत जिल्हास्तरावर प्रसिध्दी व अर्ज संकलन करण्याकरीता जिल्हयातील खेळाडूंनी विहित नमुन्यातील अर्ज, जन्म दिनांकाबाबत व क्रीडा कामगिरीबाबत आवश्यक कागदपत्रे  (क्रीडा प्रमाणपत्रे / आधारकार्ड / जन्मदाखला इत्यादी ) माहितीसह अर्ज दि. 11 ते 17 फेब्रुवारी 2022 या कालावधीत क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, स्टेशन रोड, परभणी यांच्याकडे सादर करावेत व अधिक माहितीकरीता चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा मार्गदर्शक मो.नं. 7972953141 यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

स्टाईल इज स्टाईल : साताऱ्यात गृहराज्यमंत्री RX हंड्रेडवरून काॅलजेला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरात काॅलेजमध्ये तरूण- तरूणींना अनेकदा समस्या येतात, तेव्हा पोलिस त्यावर नजर ठेवून असतात. परंतु आज चक्क राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आपल्या आरएक्स 100 या दुचाकीवरून शहरातील काॅलेजना भेट दिली. तसेच विद्यार्थी- विद्यार्थींनींशी संवादही साधला. काॅलेज परिसरात चालत जावून पाहणीही केली.

पाटण विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे नेहमीच आपल्या हटके स्टाईलसाठी प्रसिध्द आहेत. अनेकदा दाैऱ्यात असणाऱ्या त्याचा ताफा असो की कोरोना काळात शहतील चालत फेरफटका असो किंवा आवडत्या आरएक्स 100 या दुचाकीवरून फिरणे यासाठी नेहमीच शंभूराज देसाई यांची चर्चा होत असते. आजही शहरातील काॅलेजमध्ये आरएक्स 100 वरून गृहराज्यमंत्री काॅलेजमध्ये दाखल झाल्याने तरूण- तरूणींच्यात एकच चर्चा सुरू होती, ती मंत्री महोदय दुचाकीवरून काॅलेजमध्ये आल्याचीच.

सातारा शहरातील पोवई नाका येथील आपल्या निवासस्थावरून कोणताही शासकीय लवाजमा न घेता भेटी दिल्या. यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कोव्हिडनंतर महाविद्यालय सुरू झाले आहेत. विद्यार्थींनीशी मी संवाद साधला. तेव्हा पोलिस कर्मचारी योग्य ती काळजी घेत असून निर्भया पथकाचे कर्मचारी योग्य ते सहकार्य करत असल्याचे सांगितले. काॅलेज परिसरात चुकीच्या पद्धतीने कोणी वर्तणूक करत असतील, तर त्यांना योग्य ते शासन केले जाईल. पोलिस कर्मचारी विद्यार्थ्यांना त्रास देणाऱ्या कधीही सोडणार नाहीत, यांची गैरवर्तणूक करणाऱ्यांनी समजून घ्यावे.

“10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय”; चंद्रकांतदादांनंतर आता नाना पटोलेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाजप नेत्यांकडून भाकीत केले जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्चनंतर सरकार बदलणार,असे विधान केले होते. त्याच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार बदलाबाबत सूचक असे मोठे विधान केले आहे. “हे जे काही सरकार मध्ये सुरु आहे, त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. 10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय, असे पटोले यांनी म्हंटले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथे काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या बदलाबाबत मोठे विधान केले. यावेळी ते म्हणाले की, सध्या पाच राज्याच्या निवडणुका आहेत. त्याबाबत माझे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे.

सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही चालले आहार. ज्या घडामोडी सुरु आहेत. त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली असल्याचेही पटोले यांनी म्हंटले. पटोले यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहार. आता दहा मार्चनंतर नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे.