Wednesday, December 24, 2025
Home Blog Page 2777

नेपाळच्या चॅम्पियनशिप स्पर्धेत साक्रीच्या लाडे अन् रामोळे यांची सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई

साक्री : हॅलो महाराष्ट्र – नेपाळ मधील पोखरा येथे 6 वी राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नॅशनल युथस्पोर्ट अँड एज्युकेशन फेडरेशन ऑफ इंडियातर्फे साक्रीतील रोहन रामोळे याने 200 आणि 800 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. तर अजय लाडे याने 1500 आणि 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावले. अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या या खेळाडूंचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.

स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या रोहन रमोले आणि अजय लाडे यांना माणगाव तालुका रायगड येथील जवाहर नवोदय विद्यालयाचे शिक्षकवृंद आणि डॉ. राहुल खरात यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे त्यांना स्पर्धेसाठी सकल भोई समाज व मित्रमंडळाचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे.

आज ग्रामीण भागातील अनेक खेळाडू आपल्या कौशल्याच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात नाव उंचावत आहेत. मात्र, त्यांना आर्थिक पाठबळाची कमतरता भासते. अशाच प्रकारे ग्रामीण भागवून सर्वसामान्य कुटुंबातील रोहन आणि अजय यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर नेपाळ येथील चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक प्राप्त केली आहेत.

“कोठडी सॅनिटाईझ करतायत, बाप बेटे जेलमध्ये जाणार”; पत्रकार परिषदेनंतर राऊतांचे नवे ट्विट

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह इतर नेत्यांवर हल्लाबोल केला. दरम्यान आता राऊतांनी पुन्हा ट्विट करीत सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “बाप बेटे जेल मधे जाणार ! Wait and watch ! कोठडीचे sanitization सुरू आहे.. जय महाराष्ट्र !,” असे ट्विट राऊतांनी केले आहे.

काल पत्रकार परिषद घेत राऊतांनी किरीट सोमय्या यांचे पीएमसी घोटाळ्यातील आरोपीशी संबंध असल्याचा आरोप यांनी केला होता. घोटाळ्याची सर्व कागदपत्रे आपण आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. त्यानंतर आज राऊतांनी सूचक असे ट्विट केले आहे.

खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केले होते. सन २०१७ साली सामनातून अशाच प्रकारे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये माझी पत्नी प्रा डॉ. मेधा सोमय्या यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता माझा मुलगा नील याचे नाव घेतले जात आहे. माझ्या विरुद्ध आणखी तीन खटले दाखल करण्याच्या ते तयारीत आहेत. मला त्यांची स्थिती समजू शकतो. मी आणखी एका प्रकरणाचे, चौकशीचे स्वागत करतो. आम्ही काहीही चुकीचे केलेले नाही. कोणत्याही भ्रष्टाटारात गुंतलेलो नाही, असे सोमय्या यांनी म्हटले होते.

संजय राऊत यांनी सोमय्यांवर काय आरोप केले?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पीएमसी बँक घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान याचे किरीट सोमय्यांशी आर्थिक संबंधअसल्याचा आरोप त्यांनी केला. वाधवान हा सोमय्यांचा पार्टनर असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राकेश वाधवाने भाजपला २० कोटी रुपयांचा निधी दिला होता असा खळबळजनक आरोप करत या पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांना अटक करा अशी मागणी खासदार राऊत यांनी केली होती.

मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार ! पोलीस उपनिरीक्षकाने ठाण्यासमोरच घेतली ‘लाच’

औरंगाबाद – काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघाताचा पंचनामा आणि अन्य कागदपत्रे देण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना दौलताबाद पोलीस ठाण्यात समोरच पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून काल रंगेहात पकडले. दौलताबाद पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वर्षभरातील ही तिसरी कारवाई आहे. रविकिरण आगतराव कदम (39) असे उपनिरीक्षकाचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, दौलताबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या अपघातात तक्रारदाराच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणी तक्रारदारास मोटार वाहन अपघात न्यायालयात नुकसान भरपाईचा दावा दाखल करायचा आहे. याकरिता त्यांना अपघात स्थळाचा पंचनामा, शवविच्छेदनाला पूर्वीचा पंचनामा, एफआयआरची प्रत आणि अन्य कागदपत्रांची आवश्यकता होती. अपघाताचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविकिरण कदम कडे होता. यामुळे कदमकडे अपघात संबंधी कागदपत्रांची मागणी केली. कदमने 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदारांनी वडिलांच्या मृत्यूमुळे खूप दु:खी असल्याचे तसेच आर्थिक परिस्थिती पैसे देण्यासारखे नसल्याचे सांगितले. मात्र पैसे दिल्याशिवाय कागदपत्रे मिळणार नाहीत असे कदम यांनी बजावले.

तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाचेचा मागणीचे पडताळणी केली तेव्हाही कदमने 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. काल एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दौलताबाद पोलीस ठाण्याच्या परिसरात सकाळपासून सापळा रचला. कदमने पोलीस ठाण्या समोरच तक्रार दाराकडून लाचेचे 10 हजार रुपये घेताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी, अंमलदार विलास चव्हाण, मिलिंद इप्पर, सुनील बनकर, चंद्रकांत बागल यांच्या पथकाने केली.

महसूल राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेला खांद्यावर

औरंगाबाद – जिल्ह्यातील सोयगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने फर्दापूर येथील एका मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी आलेल्या नातेवाइकांना चक्क मृतदेह खांद्यावर घेऊन शवविच्छेदन गृहाकडे जाण्याची वेळी आली. या प्रकाराबाबत नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. या मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार हे राज्याचे महसूल राज्यमंत्री आहेत तरीदेखील नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फर्दापूर येथे आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह रविवारी रात्री सोयगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. परंतु आरोग्य विभागाच्या नियमानुसार रात्रीच्या अंधारात शवविच्छेदन होत नसल्याने या मृतदेहावर सोमवारी सकाळीच शवविच्छेदन करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. परंतु सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाची खिडक्या, दरवाजे पडक्या अवस्थेत असल्याने हा मृतदेह ठेवावा कसा असाही प्रश्न उपस्थित झाला.

यानंतर सोयगाव ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाच्या दुरवस्थेसोबतच शवविच्छेदन गृहाकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने सोमवारी हा मृतदेह चक्क नातेवाइकांना खांद्यावर उचलून शवविच्छेदन गृहाकडे आणावा लागला होता. सोयगाव ग्रामीण रुग्णालयाकडे जाण्यासाठी रुग्णवाहिकेलाही रस्ता नाही. पायी जाणाऱ्यांना काट्यातून व कुपाटीतून वाट काढावी लागते. त्यामुळे खांद्यावर उचललेला मृतदेहाला शवविच्छेदन गृहाकडे आणण्यासाठी चक्क काट्यातून वाट काढावी लागली. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त होत आहे.

अमरावतीमध्ये मध्यरात्री मद्यधुंद टोळक्याची रेस्टॉरंटमध्ये तोडफोड

amrawati crime

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावतीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका टोळक्याने रेस्टॉरंटमध्ये तोडफोड केली आहे. अमरावती शहरातील सरोज चौक परिसरामध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरात असलेल्या कन्हैया रेस्टॉरंटमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी हॉटेल मालकाशी हूज्जत घालून रेस्टॉरंटची तोडफोड केली आहे. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हि घटना काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली. या आरोपी टोळक्यांनी रेस्टॉरंटमधील कम्पुटरसह इतर साहित्यांची तोडफोड केली आहे. तसेच आरोपी दुकानातुन पैसे चोरून पसार झाले आहेत. तोडफोडीची हि घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे पोलीस त्या आरोपींचा शोध घेत आहेत.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत आहे. हे आरोपी कोण होते आणि वाद झाल्याने त्यांनी रेस्टॉरंटमध्ये तोडफोड केली की चोरीच्या उद्देशाने ही तोडफोड केली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे ‘या’ दिवशी होणार अनावरण

Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj
Kranti chouk , Chatrapati Shivaji Maharaj

 

औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील क्रांती चौक परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याचे अनावरण १८ फेब्रुवारी रोजी रात्री बारा वाजता करण्यात येणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे (Online) उपस्थित राहणार आहेत. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसेच पालकमंत्री सुभाष देसाई हे प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवप्रेमी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

देशातील सर्वाधिक उंचीचे हे शिवछत्रपतींचे शिल्प असून त्याची निर्मिती पुण्यातील सुप्रसिद्ध शिल्पकार दीपक थोपटे यांनी केली आहे. तर चबुतऱ्याचे व परिसराचे सौदर्यींकरण महानगरपालिकेने पूर्ण केले असल्याचे पालकमंत्री कार्यालयाने कळविले आहे.

वाहनांसाठी नवीन मालिका सुरु; आकर्षक व राखीव क्रमांकासाठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

RTO

परभणी : हॅलो महाराष्ट्र – उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी एवाय ही नवीन मालीका सुरु करण्यात आली असून आकर्षक व राखीव क्रमांकासाठी 16 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावेत.

एका पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लिलाव पध्दतीने अर्ज निकाली काढून पसंती क्रमांक जारी करण्यात येईल. तसेच नोंदणी क्रमांक वितरकाच्या स्तरावर मान्यता होत असल्याने काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास लिलाव मागील किंवा पुढील दिनांकास करण्याचे सर्व अधिकार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे राहतील याची सर्व अर्जदारांनी नोंद घ्यावी व जास्तीत जास्त वाहनधारकांनी पसंती क्रमांकासाठी अर्ज करावे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

कॅनडाच्या नवीन इमिग्रेशन प्लॅनचा भारतीयांना मोठा फायदा, सहजपणे मिळेल नागरिकत्व

नवी दिल्ली । कॅनडामध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅनडाच्या सरकारने सोमवारी आपला इमिग्रेशन लेव्हल प्लॅन 2022-2024 जाहीर केला. यामध्ये कॅनडाच्या सरकारने इमिग्रेशन टार्गेट वाढवले ​​आहे. कोविड-19 महामारीमुळे अर्थव्यवस्थेतील मंदीवर मात करण्यासाठी आणि कामगारांची तीव्र कमतरता पूर्ण करण्यासाठी असे केले गेले आहे. पुढील तीन वर्षांत सुमारे 13 लाख स्थलांतरितांना आमंत्रित करण्याचा कॅनडाचा मानस आहे. हे 2024 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 1.14 टक्के असेल.

2015 पर्यंत, दरवर्षी कॅनडामध्ये सुमारे 25 लाख स्थलांतरित होते. 2016 मध्ये कॅनडाच्या सरकारने हा कोटा 3 लाखांपर्यंत वाढवला. कोरोना महामारीपूर्वी सरकारने 3 लाख 40 हजार स्थलांतरितांना कॅनडामध्ये येण्याची परवानगी दिली होती, मात्र 2020 मध्ये कोरोनामुळे ही संख्या 2 लाखांपेक्षा कमी झाली. सन 2021 मध्ये कॅनडात 405,000 हून जास्त लोकांना कायमस्वरूपी नागरिकत्व देण्यात आले. कॅनडाने एका वर्षात दिलेली ही सर्वाधिक नागरिकत्वे होती. कोविड-19 मुळे कॅनडामध्ये सुमारे 18 लाख व्हिसा किंवा नागरिकत्व अर्ज प्रलंबित आहेत.

मंत्री म्हणाले – “उत्तम टॅलेंट डेस्टिनेशन बनवू”
कॅनडाचे इमिग्रेशन, निर्वासित आणि नागरिक मंत्री सीन फ्रेझर म्हणाले की,” 2022-2024 इमिग्रेशन लेव्हल प्लॅन देशाला जगातील सर्वोत्कृष्ट टॅलेंट डेस्टिनेशन बनवेल, साथीच्या रोगानंतर मजबूत आर्थिक विकासाचा पाया घालेल. इतकेच नाही तर आम्हांला मदत करेल. हे कुटुंबांना पुन्हा एकत्र करण्यात मदत करेल आणि कॅनडाची मानवतेची वचनबद्धता पूर्ण करण्यात मदत करेल.”

2022 मध्ये कॅनडामध्ये स्थलांतरित झालेल्यांपैकी सुमारे 56 टक्के लोकं एक्स्प्रेस एंट्री, प्रांतीय नॉमिनी प्रोग्राम आणि टेम्पररी टू पर्मनंट रेसिडेन्स (TR2PR) फ्लो यासारख्या आर्थिक वर्ग मार्गाने आले. सीन फ्रेझर म्हणतात की,”कॅनडामध्ये येणाऱ्या स्थलांतरितांचा देशाच्या प्रगतीत मोठा वाटा आहे. आजचा कॅनडा त्यांच्यामुळेच आहे.”

कॅनडा स्थलांतरितांवर अवलंबून आहे
फ्रेझर म्हणतात की,” कॅनडा शेती, मासेमारी, उत्पादन, आरोग्य आणि वाहतूक या क्षेत्रांत स्थलांतरितांवर अवलंबून आहे. अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि हे प्रयत्न स्थलांतरितांच्या मदतीनेच पूर्ण होऊ शकतात.” फ्रेझर पुढे म्हणाले की,”आमची इमिग्रेशन लेव्हलची योजना कॅनडाचा विकास आणि गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.”

प्रसिध्दीपत्रक : मलकापूर नगरपरिषदेच्या 7 लाख 76 हजारांच्या शिल्लकी अंदाजपत्रकास एकमताने मंजुरी

Malkapur

कराड | मलकापूर नगरपरिषदेचे सन 2022-23 या सालाचे अंदाजपत्रक विशेष सभेमध्ये एकमताने मंजुर करणेत आली. सदर अंदाजपत्रकामध्ये सन 2022-23 या सालाकरीता कोणतीही कर वाढ न करण्यात आलेली नाही. सन 2022-23 सालची एकूण महसुली व भांडवली एकूण जमा 69 कोटी 59 लाख 49 हजार 702 एवढी गृहीत धरली असून खर्च 69 कोटी 51 लाख 73 हजार 703 एवढा अंदाजीत असून रक्कम रु. 7 लाख 75 हजार 999 शिल्लकीचे अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी सांगितले आहे. विशेष सभा नगराध्यक्षा निलम येडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, नगरपरिषद् अंदाजपत्रकातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे मलकापुर नगरपरिषदेने लोकसहभागाच्या माध्यमातून यापूर्वी विविध नाविण्यपुर्ण योजना हाती घेऊन यशस्वीरित्या सुरु ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 24×7 नळ पाणीपुरवठा योजना, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, राजमाता जिजाऊ सदृढ माता बालक योजना, महात्मा गांधी दिव्यांग पेंशन योजना या योजनांचा समावेश आहे. गेली 2 वर्षे कोविङ-19 च्या प्रादुर्भावामुळे नगरपरिषदेने कोणत्याही नविन योजना हाती घेतल्या नव्हत्या. तथापि, कोविङ-19 चा प्रादुर्भाव कमी होत असलेने नगरपरिषदेने सिंधुताई सपकाळ, महिला आरोग्य योजना राबविणेचा निर्णय घेतला असून, या योजनेमध्ये मलकापूर शहरातील महिलांची आरोग्य तपासणी करणेत येणार असून, यामध्ये प्रामुख्याने रक्तदाब, रक्तातील साखर तपासणी, हिमोग्लोबीन करणेत येणार आहे. यासाठी रक्कम रु. 5.00 लक्ष तरतुद केलेली आहे. त्याचबरोबर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले विद्या वेतन योजनेअंतर्गत कॉविड 19 मुळे निराधार झालेल्या विद्याथ्र्यांना शैक्षणिक सुविधेसाठी मदत व्हावी या हेतूने व मुलींच्या शिक्षणासाठी रक्कम रु. 5.00 लक्षची तरतुद करणेत आलेली आहे. कोविड-19 मुळे अडचणी आलेली शेतीची सुधारणा होणेसाठी व पशुधन विकासासाठी रक्कम रु. 5.00 लक्षची तरतुद करणेत आलेली आहे.

त्याबरोबरच नगरपरिषदेने यापूर्वी सुरु ठेवलेल्या आनंदराव चव्हाण शैक्षणिक सहायता निधी, स्वा.से. मा.आ. भास्करराव शिंदे आरोग्य जीवनदायी सहायता योजना, दिव्यांग पेंशन योजना, आजी माजी सैनिक व त्यांच्या कुटूंबीयांच्या कल्याणासाठी शौर्य सन्मान योजना, ई-लायब्ररी इत्यादी करीता रक्कम रु. 71.00 लक्षची तरतुद केलेली आहे. शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत योजनेचा लाभ देणेसाठी रक्कम रु.1.21 कोटी ची तरतुद केलेली आहे. गेली 2 वर्षे कोविड-19 मुळे मलकापूर सोलर सिटी योजनेमध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत नागरिकांना देण्यात आली नव्हती. सन 2022-23 या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य शासनाच्या (अपारंपारिक उर्जा विभाग) व मलकापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून सोलर वॉटर हिटर, सौर दिवे तसेच नेट मीटरींग इत्यादीसाठी अनुदान उपलब्ध करुन देणेत येणार आहे. तसेच आजी माजी सैनिक यांना घरपट्टी व इतर सुविधा मिळणेकामी 10.00 लक्ष तरतुद करणेत आली आहे. मलकापूर नगरपरिषदेने सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये अंदाजपत्रकामध्ये कोणत्याही प्रकारची नव्याने करवाढ प्रस्तावित केलेली नाही व कोणत्याही प्रकारचा आर्थिक बोजा नागरिकांच्यावर टाकलेला नाही.

“त्या दिवशी मी अमित शहांना फोन केला अन्…”; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी आज दादर येथील शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक गौप्यस्फोटही केला. “ज्या दिवशी माझ्या नातेवाईकांच्या घरावर ईडीचे छापे सुरु होते, त्याच दिवशी रात्री मी अमित शाह यांना फोन केला होता. जे सुरु आहे, ते चांगलं नाही म्हटले. तुमची माझ्याशी दुश्मनी आहे तर मला टॉर्चर करा. पण तुम्ही माझ्या जवळच्या लोकांना टार्गेट करत आहात. हे चुकीचं आहे, असे म्हंटले,”. असा गौप्यस्फोट राऊत यांनी केला.

संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप व त्यातील नेत्यांनी केलेल्या घोटाळ्याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, माझावर अनेक घोटाळ्याचे आरोप केले गेले. माझ्या नावे असणाऱ्या अलिबाग येथील संपत्तीही चौकशी केली गेली. ज्यावेळी माझ्या घरावर ईडीने छापेमारी केली. माझ्या नारवाईकाची चौकशी केली त्या रात्री मी गृहमंत्री अमित शहा यांना फोन केला. त्यांना विचारले हा प्रकार काय चालला आहे.

जी काही कारवाई करायची आहे ती माझ्यावर करावी. परंतु माझ्या मित्र, मंडळींना, नातेवाईकांना कशाला त्रास देत आहात, असे मी केंद्रीयमंत्री अमित शहा यांना विचारले. या ईडीवाल्याने लहान मुलांनाही सोडले नाही, त्यांच्याकडेही चौकशी केली असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी पत्रकार परिषदेद्वारे दिली.