Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2782

Gold Price : सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ, आजचे भाव तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीच्या दरातही तेजी आहे. आजच्या दरवाढीनंतर सोन्याचा दर 50,000 रुपयांच्या जवळ पोहोचला आहे. MCX वर सोने 0.87 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. त्याचवेळी चांदीचा भाव आज 64 हजार रुपये प्रति किलोच्या जवळ पोहोचला आहे.

सोन्या-चांदीचा भाव
0.87 टक्क्यांच्या वाढीसह एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव 50 हजारांच्या जवळ पोहोचला आहे. आज सोन्याचा दर 49,540 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. त्याचवेळी, आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदी 1.29 टक्क्यांच्या वाढीसह 64,799 रुपये प्रति किलोच्या पातळीवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,000 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,800 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,050 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,000 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 46,800 रुपये
पुणे – 46,750 रुपये
नागपूर – 46,750 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 51,050 रुपये
पुणे – 51,000 रुपये
नागपूर – 51,000 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4625.00 Rs 4676.00 1.091 %⌃
8 GRAM Rs 37000 Rs 37408 1.091 %⌃
10 GRAM Rs 46250 Rs 46760 1.091 %⌃
100 GRAM Rs 462500 Rs 467600 1.091 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 5045.00 Rs 5071.00 0.513 %⌃
8 GRAM Rs 40360 Rs 40568 0.513 %⌃
10 GRAM Rs 50450 Rs 50710 0.513 %⌃
100 GRAM Rs 504500 Rs 507100 0.513 %⌃

मुंबईत पुन्हा ईडीची धाड ; अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसोबतच्या नेत्यांमधील कराराबाबत कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या साहाय्याने त्याच्या गैरवापरातून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर कारवाई केली जात आहार. असा शिवसेणेश इतर पक्षांकडून केला जात आहे. त्यामुळे आज सकाळी ईडीच्यावतीने मुंबईत धडक कारवाई करण्यात आली आहे. ईडीने अंडरवर्ल्ड डाऊन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचे घर आणि इतर मालमत्तांवर छापे टाकले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात काही नेत्यांनी केलेल्या कराराशी निगडीत ईडीच्यावतीने छापे मारी करण्यात आली आहे.

ईडीच्यावतीने आज सकाळी मुंबईसह परिसरात छापा टाकण्यात आला. मुंबईच्या सी-वॉर्डमध्ये टाकण्यात आलेल्या छापेमारीत दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेतले आहे. ईडीच्यावतीने आज करण्यात आलेल्या या छापेमारीमुले काही राजकीय नेत्याचे धाबे दणाणले आहे. दरम्यान आज सकाळी टाकण्यात आलेल्या छापेमारीमुळे राजकीय वर्तुळात मात्र, चर्चा होऊ लागली आहे.

राऊतांची आज पत्रकार परिषद

आज शिवसेना आणि शिकसेना खासदार संजय राऊत यांच्यावतीने पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. यापूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना राष्ट्रीय एजन्सीकडून वारंवार त्रास दिला जात आहे, असा आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केला आहे. दरम्यान आज घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेत त्या साडेतीन लोकांची नाव जाहीर करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं असल्याने सगळ्यांचं लक्ष पत्रकार परिषदेकडे लागले आहे.

बायोमेडिकल संशोधनाला चालना : कृष्णा अभिमत विद्यापीठाचा ‘सी-मेट’शी सामंजस्य करार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (सी-मेट) या स्वायत्त वैज्ञानिक संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे बायोमेडिकल संशोधनाला चालना मिळणार आहे. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे व ‘सी-मेट’चे महासंचालक डॉ. बी. बी. काळे यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

या करारामुळे नॅनोटेक्नॉलॉजी, बायोसेन्सर, बायोइमेजिंग आणि बायोइलेक्ट्रॉनिक्स डोमेनमधील सहयोगी संशोधन, नवोपक्रम, विद्यार्थी प्रशिक्षण आणि उत्पादन विकास उपक्रमांना चालना मिळणार आहे. यानंतर कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाच्या पुढाकाराने आणि कृष्णा कॉलेज ऑफ फार्मसी व कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ अलाईड सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बायोमेडिकल डोमेनमध्ये नॅनोमटेरिअल्स आणि इलेक्ट्रॉनिक्स वापरण्याच्या संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले.

यावेळी डॉ. बी. बी. काळे यांनी मार्गदर्शन केले. अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अग्रवाल यांनीही उपस्थितांना संबोधित केले. संशोधन शास्त्रज्ञ डॉ. जयंत पवार यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ. मनिष शिंदे, डॉ. सुधीर अर्बुज, डॉ. हर्षराज जाधव, ऋषिकेश काळे, डॉ. अमोल शेटे, प्रा. स्नेहल मसूरकर, डॉ. अमर मोहिते, डॉ. रोहन फाटक, धीरज माने यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

Share Market : कालच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची चांगली सुरुवात, सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला

नवी दिल्ली । सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यानंतर मंगळवारी चांगली सुरुवात झाली आहे. सेन्सेक्स निफ्टी आज ग्रीन मार्कमध्ये उघडला आहे. सेन्सेक्स जवळपास 300 अंकांनी वर आहे. दुसरीकडे, निफ्टी 140 हून जास्त अंकांच्या वाढीसह 16990 च्या आसपास दिसला. सेन्सेक्स 56940 च्या आसपास दिसत आहे.

14 फेब्रुवारी रोजी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात 4,253.70 कोटी रुपयांची विक्री केली. त्याच वेळी, या दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 2,170.29 कोटी रुपयांची खरेदी केली.

NSE वर F&O बंदी अंतर्गत येणारे स्टॉक
15 फेब्रुवारी रोजी, 5 स्टॉक्स NSE वर F&O बंदी अंतर्गत आहेत. यामध्ये BHEL, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, पंजाब नॅशनल बँक, सेल आणि टाटा पॉवर या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जर सिक्योरिटीजच्या पोझिशन्सने त्यांच्या मार्केट वाइड पोझिशन लिमिटओलांडल्या तर F&O सेगमेंटमध्ये समाविष्ट असलेले स्टॉक्स बंदी श्रेणीमध्ये ठेवले जातात.

वेदांत फॅशन्सचा IPO
वेदांत फॅशन्सचे शेअर्स बुधवार 16 फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात सूचिबद्ध होतील. Manyavar आणि Mohey सारख्या एथनिक वेअर ब्रँडचे मालक वेदांतने 4 फेब्रुवारी रोजी 3,149 कोटी रुपयांची इनीषाही पब्लिक ऑफर (IPO) आणली होती. वेदांत फॅशन्सच्या IPO च्या सुरुवातीच्या पहिल्या दोन दिवसात त्याला अतिशय कमकुवत प्रतिसाद मिळाला.

क्रूड आणि सोन्याचे भाव स्थिर
रशिया आणि युक्रेन संकटामुळे कच्चे तेल स्थिर आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 7 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ब्रेंटची किंमत $96 च्या जवळपास आहे. तर सोन्याची चमकही वाढली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याने 50 हजारांचा पल्ला गाठला आहे. COMEX GOLD देखील $1870 च्या जवळ दिसत आहे.

जागतिक बाजारातून संमिश्र संकेत
जागतिक बाजारातून संमिश्र संकेत आहेत. आशियातील NIKKEI वर हलका दाब दिसून येत आहे मात्र SGX NIFTY अर्धा टक्का वर ट्रेड करत आहे. युक्रेनच्या गंभीर संकटाच्या मध्यभागी, DOW काल यूएस मध्ये घसरणीसह बंद झाला, जरी NASDAQ मध्ये फ्लॅट क्लोजिंग होते.

पुणे मुंबई हायवेवर मोठा अपघात! दोन ट्रकच्या धडकेत कारचा चक्काचूर; 4 जण ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात झाला असून यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खोपोलीजवळ बोरघाटात हा भीषण अपघात झालाय. या अपघातात कार चा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली. यात ट्रक आणि टेम्पोच्या दरम्यान आल्याने स्विफ्ट कारचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण अपघातामध्ये दोन मोठ्या वाहनांच्यादरम्यान चिरडल्या गेलेल्या कारमधील चौघेही जागीच ठार झालेत असून मृतामध्ये सोलापूर काँग्रेस युवा नेता गौरव खरातचा ही समावेश आहे.  सर्व मृतदेह खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

दरम्यान, या अपघातानंतर महामार्ग पोलीस , डेल्टा फोर्स , देवदूत यंत्रणानी घटनास्थळी धाव घेत वेगाने मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली आहेत. महामार्गावरील  वाहतूक सुरळीत आहे. मुंबई कडे जाणाऱ्या एका ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यामुळं हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मणिपूरमध्ये

औरंगाबाद – औरंगाबादेतील नेत्यांना शिवसेनेचा सर्वात मोठा नेता मीच आहे, बाकीच्यांशी माझी तुलनाच होऊ शकत नाही, असे ठणकावून सांगणाऱ्या चंद्रकांत खैरे यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी टाकलेली दिसून येत आहे. औरंगाबादचे शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे सध्या मणिपूरमध्ये शिवसेनेच्या प्रचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अन्य काही पदाधिकारी आणि शिवसैनिकदेखील आहेत.

मणिपूर विधानसभेच्या प्रचार दौऱ्यासाठी 13 फेब्रुवारी रोजी चंद्रकांत खैरे दाखल झाले असून पुढील चार दिवस ते तेथील उमेदवारांचा प्रचार करतील. मणिपूर विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणूक असून या ठिकाणी शिवसेनेने पाच जागांवर उमेदवार उभा केला आहे. यंदा उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि मणिपूरमध्येही निवडणूक लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला असून या चारही ठिकाणच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेने मातब्बर नेत्यांची फौज लावली आहे.

उमेदवारांच्या प्रचारासाठी युवासेनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासह दिग्गज नेते मैदानात उतरवले आहते. मणिपूर राज्यात शिवसेना उमेदाराच्या प्रचाराची जबाबदारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यासाठी औरंगाबादचे नेते थेट मणिपूरमध्ये दाखल झाले असून पुढील काही दिवस त्यांचा मुक्काम मणिपूरमध्ये असेल.

मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला मनसेची गरज नाही- रामदास आठवले

Athawale fadanvis thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार असताना त्यांना शह देण्यासाठी मनसे आणि भाजप एकत्र येणार का अशा चर्चा सातत्याने रंगत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आरपीआय चे अध्यक्ष रामदास आठवले यांना विचारले असता आरपीआय असताना भाजपला मनसेची गरज नाही असा दावा त्यांनी केला आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआय सोबत असताना भाजपला मनसेची गरज नाही असे आठवले म्हणाले.  त्यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे. तर मुंबईत शिवसेनेला हरवणं फार अवघड नाही असेही ते म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप 120 पेक्षा अधिक जागा मिळवून सत्तेत येणार आहे असे भाकीत त्यांनी केलं.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच पडेल असा दावा भाजप नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे याबाबत विचारले असता आठवले म्हणाले, आम्हाला राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची इच्छा नाही. त्यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे ते आपोआप पडेल.

ज्यांना महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही ते कर्मदरिद्रीच; शिवसेनेची अण्णांवर टीकेची झोड

raut anna

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्य सरकारच्या वाईन विक्री वरून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त करत याविरोधात उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच तुमच्या राज्यात जगण्याची माझी इच्छा नाही असेही ते बोलले होते. यानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून अण्णा हजारे यांच्या वर सडकून टीका केली आहे. महाराष्ट्रात जगण्याची ईच्छा नसणारे कर्मदारिद्री आहेत अस म्हणत शिवसेनेनं अण्णांवर टीका केली आहे.

काँग्रेसचे राज्य दिल्लीत व महाराष्ट्रात असताना अण्णा ऊठसूट उपोषणे व आंदोलने करीत. पण आता अण्णा हजारे (Anna Hazare) भाजपचीच भाषा बोलतात, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली. अण्णांचे वैफल्य हे आहे की, अण्णांच्या प्रत्येक आंदोलनातली हवा निघून गेली आहे व मोदी-शहांचे सरकार केंद्रात आल्यापासून त्यांना कोणी फारसे विचारत नाही. रामलीला मैदान, जंतर मंतरवर त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकले, त्या रणशिंगात हवा फुंकणारे आज दिल्लीतील सत्ताधीश आहेत, पण ज्या ‘लोकपाल’साठी अण्णांनी लढाई केली तो लोकपाल आज गुजरात राज्यातही नेमला गेला नाही, दिल्ली तो बहोत दूर है! ”मी इतका मर मर मेलो, उपोषणे केली, पण कर्मदरिद्री भाजपवाले एक लोकपाल नेमायला तयार नाहीत. आता जगायचे कशाला?” असा त्रागा खरे तर अण्णांनी करायला हवा होता, असा  टोला शिवसेनेने लगावला.

ज्यांना महाराष्ट्रात जगायची इच्छा नाही ते कर्मदरिद्रीच म्हणायला हवेत. वाईन विक्रीसंदर्भातील निर्णयानंतर अण्णा हजारे महाराष्ट्रावर कसल्या गुळण्या टाकत आहेत आणि कोणाच्या प्रेरणेने टाकत आहेत, हे त्यांनाच माहिती आहे. अण्णा म्हणतात मला जगायचे नाही. वयाची ८४ वर्षे झाली, खूप झाली. मी जगून घेतले. म्हणजे ते खूप जगून घेतल्याचा आनंद व्यक्त करत आहेत. राळेगणच्या यादवबाबाने तुम्हाला जेवढे आयुष्य दिले तेवढे तर जगावेच लागेल. पण त्यासाठी महाराष्ट्राची बदनामी का करता असा सवाल शिवसेनेनं केला.

पुलवामात आपले ४० जवान सरकारच्या बेपर्वाईमुळे शहीद झाले. तेव्हाही अण्णांना आता जगायचे कशाला असा प्रश्न पडला नाही. करोना काळात गंगेत हजारो प्रेते वाहून जाताना जगाने पाहिली. मनुष्य हळहळला, पण गंगेतील प्रेतं पाहूनही अण्णा हजारे यांना नैराश्य आले नाही व आता जगायचे कशाला हा पांचट प्रश्न पडला नाही. दोनेक दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. पण अण्णांनी हा अपमान गिळला व वाईन वाईनचा गजर करत आता जगणे नाही, असा सूर लावला अस म्हणत शिवसेनेनं अण्णा हजारे यांचा समाचार घेतला.

दारुच्या नशेत डोक्यात दगड घालून जाळले; ‘त्या’ खुन प्रकरणातील आरोपी जेरबंद

औरंगाबाद – सीसीटीव्ही फुटेज मध्ये आलेल्या दोघांपैकी एका मित्राला बोलते करण्यास सिडको पोलिसांना यश मिळाल्यामुळे तब्बल चोवीस दिवसानंतर टीव्ही सेंटर येथील खुनाचा उलगडा झाला. आरोपी अयाज खान बशीर खान (36) यास अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

टीव्ही सेंटर येथील व्यापारी संकुलाच्या पाठीमागील स्टेडियमच्या पायऱ्या खाली 20 जानेवारीच्या मध्यरात्री सिद्धार्थ भगवान साळवे याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळला होता. खुनाचा उलगडा करण्यासाठी सिडको ठाणे, गुन्हे, सायबर शाखा कामाला लागल्या होत्या. तरीही उलगडा होत नसल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी ठाण्याला भेट देत आढावा घेतला. घटनेच्या रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास सीसीटीव्ही फुटेज मिळाले. त्यात अयाज खान बशीर खान असल्याची पुष्टी मिळाली.

मृत सिद्धार्थने जेसीबी चालक अयाज याच दारू पिऊन शिवीगाळ केली. त्यावरून वाद झाले. अयाजने सिद्धार्थला दांड्याने मारले. सिद्धार्थ स्टेडियमच्या पायऱ्यांच्या खालील मोकळ्या जागेकडे पळाला. अयाजही तेथे गेला. त्याने सिद्धार्थच्या डोक्यात दगड घातला. पहिल्या फटक्यात मेल्यामुळे त्याने मृतदेह जाळण्यासाठी पेटवला. त्यानंतर तो निघून गेला. हा सर्व प्रकार मध्यरात्री अडीचच्या सुमारास घडला. ही सर्व घटना स्टेडियमच्या पायाखाली झोपणाऱ्या अयाजच्या मित्राने पाहिली. तो घाबरून पळून घरी गेला. शेवटी त्यानेच दिलेल्या माहितीमुळे खुनाचा उलगडा झाला.

शहराची कचराकुंडी तात्पुरती टळली

औरंगाबाद – किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करावी, यासह इतर मागण्यांसाठी शहरात साफसफाईचे काम करणाऱ्या पी. गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या सुमारे 1100 कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे दिवसभर शहरातील एकाही भागात घंटागाडी गेली नाही. जागोजाग कचऱ्याचे ढीग पडून होते. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेत आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शिवजयंतीनिमित्त उत्साहाचे वातावरण असताना, शहराची कचराकोंडी करणे योग्य नाही, त्यामुळे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. या प्रश्‍नावर आता 21 फेब्रुवारीला बैठक आयोजित करण्यात आली आहे.

महापालिकेने शहरात घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे व त्याची कचरा प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहतूक करण्याच्या कामासाठी पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला काम देण्यात आले आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले. महापालिका प्रतिटन 1687 रुपये भाव देत आहे. मात्र शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचत असल्याने महापालिकेने कंपनीला वारंवार दंड केला आहे. तसेच सफाई कामगारांना किमान वेतन व सोयी सुविधा मिळत नसल्याने कंपनी वादात सापडली आहे. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगार शक्ती संघटनेतर्फे तीन दिवसांपूर्वी महापालिका व कंपनीला दिला होता. पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सोमवार सकाळपासून कामगारांनी आंदोलन सुरू केले. घंडागाड्याचे चालक त्यावर काम करणाऱ्या कामगारांनी वाहने थांबवून ठेवली. काही भागात घंटागाड्या आल्या. त्यांनी कचरा उचलण्याच्या पॉइंटपर्यंत कचरा नेला पण पुढे ट्रक चालकांनी प्रक्रिया केंद्रापर्यंत कचरा नेलाच नाही. त्यामुळे शहराच्या अनेक भागात कचरा तसाच पडून होता. दरम्यान दुपारी महापालिकेत अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्या दालनात आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

यावेळी कामगार शक्ती संघटनेचे गौतम खरात, माजी उपमहापौर किशोर थोरात, उपायुक्त सौरभ जोशी, संतोष टेंगळे उपस्थित होते. यावेळी शिवजयंतीचा उत्सव तोंडावर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण देखील याच दरम्यान होणार आहे. त्यामुळे कामगारांनी आंदोलन स्थगित करावे. महापालिकेचे प्रशासक शहरात आल्यावर त्यांच्यासोबत सोमवारी संबंधितांची बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.