Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2781

“झोप नक्की कोणाची उडणार ते चार वाजण्याच्या आधीच कळेल”; भाजप नेत्याचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती दिली आहे. यावरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. “राऊत यांना एकच गोष्ट सांगतो की, भाजप असल्या खोट्या धमक्यांना घाबरणारा पक्ष नाही. ईडीचे कारवाईच्या बाबतीत जे धाडसत्र चालू आहे, त्यामध्ये अनेक राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. कोणाची झोप उडणार ते चार वाजण्याच्या आधीच राऊत यांना कळेल, असा टोलाही यावेळी लाड यांनी लगावला.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यामुळे राऊत यांनी स्व:ताची झोप वाचवावी असा टोला देखील लाड यांनी राऊतांना लगावला. तसेच राऊत साडेतीन नावाचा चित्रपट काढणार का? हे बघावं लागेल. भारतीय संविधानामध्ये जे तपास यंत्रणांना अधिकार दिले आहेत, त्यानुसार त्या यंत्रणा काम करत आहेत.

दिलेल्या अधिकारानुसार यंत्रणा काम करत असतील. जर ती यंत्रणा एखाद्या राजकीय पक्षांपर्यंत पोहोचत असेल तर ती तपास यंत्रणा चुकीचे काम करते का? राज्यातील पोलीस भाजपच्या लोकांना त्रास देते. तुम्ही जर चुकीची कृत्ये करत नसाल तर तुम्हाला घाबरायची कारण काय? आम्ही घाबरत नाही, असेही यावेळी लाड यांनी म्हंटले.

काय म्हणाले आहेत संजय राऊत

आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या साडेतीन नेत्यांना जेलमध्येही जावे लागणार असे म्हंटले आहे. आम्ही खूप सहन केल्यामुळे आता बरबादही आम्हीच करू, असा इशारा राऊत यांनी दिला. आज दुपारी चार वाजता शिवसेना भवनात संजय राऊत यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी नावे जाहीर करणार आहेत.

रस्ता ओलांडताना दुचाकीच्या धडकेत प्राचार्य ठार

जालना – शहरातील अंबड मार्गावरील यशवंत नगर येथील निवासस्थान आवरून मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयाकडे जात असताना, एटीएम मधून पैसे काढून रस्ता ओलांडताना दुचाकीने धडक दिल्याने प्राध्यापकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात काल सकाळी 11 वाजेच्या दरम्यान घडला. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी औरंगाबादेत हलवण्यात आले आहे.

मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदाचा भार संभाजी रामभाऊ वारंगुळे पाटील (56) यांच्याकडे होता. ते नेहमीप्रमाणे दुचाकीवरून महाविद्यालयात जात होते. न्यायालयासमोर दुचाकी उभी करून ते एटीएम मध्ये जाण्यासाठी रस्ता ओलांडत होते. एटीएम मधून 20 हजार रुपये काढून ते परत दुचाकी कडे येत असताना जालन्याकडून जिंतूर कडे जाणाऱ्या विकी जैन या दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे प्राचार्य रस्त्यावर कोसळले. तेथे उपस्थित नागरिकांनी लगेचच त्यांना उचलून प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले. परंतु नंतर त्यांची प्रकृती आणखी चिंताजनक होत असल्याने त्यांना मंठा चौफुली येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. परंतु उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या लिव्हरला जोरदार धडक बसल्याने शरीरात मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होऊन त्यांच्या हृदयावर ताण आल्याने त्यांचे हृदयही निकामी झाल्याचे सांगण्यात आले.

राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून ते तेव्हाच्या मत्स्योदरी महाविद्यालयातील रुजू झाले होते. ते मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तोंडवळी येथील रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असून, एका मुलीचा विवाह झाला आहे. पाटील यांच्या अपघाती निधनामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेश टोपे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

“केंद्र सरकारकडून लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न”; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. तसेच धडक छापेमारी करीत कारवाईही केली जात आहे. यावरून राष्ट्रवंडी काँग्रेस नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकावर निशाणा साधला आहे. “केंद्रानं 7 वर्षात काय केलं? सध्या राज्यात आणि देशात ICE चा गैरवापर सुरु आहे, लोकांना भीती दाखवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असल्याचा आरोप करीत सुळे याणी हल्लाबोल केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सध्या ज्या नोटिसा पाठविल्या जाताहेत. विरोधी पक्षातच नोटीशी कशा येतात, याचाही सगळ्यांनी विचार केला पाहिजे, विरोधात असल्या की नोटीस येतात? भाजपमध्ये गेल्या की नोटीस कशा विरघळतात हा प्रश्नच आहे.

या देशात कुठल्याही राज्यात घोटाळा असेल, तर त्यांची जबाबदारी केंद्राने घ्यावी, इतक्या वर्षाचा हिशोब नको का द्यायला? 7 वर्षाचा हिशोब सांगा, मग चेक्स आणि बँलन्से एकाच कंपनीत कशा राहून केल्या. त्याचे स्पष्टीकरण केंद्राने द्यावे, असे सुळे यांनी म्हंटले आहे.

एअर इंडियाला मिळाला नवा एमडी-सीईओ; आता ‘या’ दिग्गजाच्या हाती आली महाराजाची कमान

नवी दिल्ली । टाटा सन्सने तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 1 एप्रिल 2022 पासून ते आपली जबाबदारी स्वीकारतील. टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन हेही बोर्डाच्या बैठकीत उपस्थित होते. बोर्डाने त्यांच्या नावावर चर्चा करून मान्यता दिली.

इल्कर आयसीच्या नियुक्तीसाठी सर्व नियामक संस्थांकडून मंजुरी घेणे बाकी आहे. टाटा ग्रुपने अलीकडेच एअर इंडियामधील 100 टक्के भागभांडवल 18,300 कोटी रुपयांना विकत घेतले. हा करार 27 जानेवारीला पूर्ण झाला आणि त्या दिवसापासून टाटा सन्स मालक झाले.

आयसी पॉलिटिकल सायन्सचे विद्यार्थी होते
51 वर्षीय इल्कर आयसी हे तुर्कीतील बिलकेंट यूनिवर्सिटीच्या पॉलिटिकल सायन्स आणि पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटच्या 1994 च्या बॅचचे माजी विद्यार्थी आहेत. 1995 मध्ये त्यांनी इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात पॉलिटिकल सायन्सवर एक रिसर्च प्रोजेक्ट केला. 1997 मध्ये त्यांनी इस्तंबूलमधील मारमारा विद्यापीठातून इंटरनॅशनल रिलेशंस मास्टर्स प्रोग्राम पूर्ण केला.

जगातील सर्वोत्तम एअरलाईन्स बनवणार
द वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, IC तुर्की फुटबॉल फेडरेशन, तुर्की एअरलाइन्स स्पोर्ट्स क्लब आणि टीएफएफ स्पोर्टिफ एनोनिम सिरकेटीचे बोर्ड मेंबर आहेत. ते कॅनेडियन तुर्की व्यवसाय परिषद आणि यूएस-तुर्की बिझनेस काउंसिलचे देखील मेंबर आहेत. आयसी यांनी सांगितले की,” आघाडीच्या आयकॉनिक एअरलाइन्सचे नेतृत्व करताना आणि टाटा ग्रुपमध्ये सामील होताना मला खूप आनंद होत आहे. एअर इंडियाचा मजबूत वारसा आम्ही वापरणार आहोत. जगातील सर्वोत्तम विमान कंपनी बनवण्याचा प्रयत्न करणार आहे.

“मी जेलमध्ये जायला तयार, पण… “; किरीट सोमय्यांचे राऊतांना थेट चॅलेंज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना खासदार राऊत यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. दरम्यान त्यांनी आज आझाद नगर पोलिस स्थानकात 89 पानांची तक्रार आझाद नगर पोलिस स्थानकात दिली. यावेळी त्यांनी सुजीत पाटकरला एकूण 13 कॉन्ट्रॅक्ट दिले असून पाटकर विरोधात फौजदारी कारवाई करा, अशी मागणी सोमय्यांनी केली आहे. तसेच “संजय राऊतांना मी मूर्ख वाटलो काय? आता मी जेलमध्ये जायला तयार आहे, पण त्याआधी मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या,”असे थेट चॅलेंज सोमय्यांनी राऊतांना दिले.

भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज आझाद नगर पोलीस ठाण्यात संजय राऊतांसह इतर सहकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. सुजीत पाटकरला एकूण 13 कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहेत. त्यामुळे याची चौकशी करून पाटकर विरोधात फौजदारी कारवाई करा.वी, अशी मागणी केली आहे. सात दिवसांत एफआयआर दाखल केला नाहीतर आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये केस फाईल करणार आहोत.

यावेळी सोमय्या यांनी प्रश्नही उपस्थित केले. ते म्हणाले की, आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये 89 पानी पोलिस तक्रार केली आहे. राऊतांच्या जवळच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला तरी मुख्यमंत्र्यांनी यांच्यावर कारवाई का केली नाही? सुजीत पाटकरला अटक का केली नाही? संजय राऊतांनी नौटकी बंद करावी. चहावाल्याची नीट चौकशी करा सुजीत पाठकरला अटक करा, अशी मागणी या निमित्ताने मी करत असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले.

PLI Scheme : ऑटो सेक्टरला मिळणार गती; 7.5 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार

नवी दिल्ली । वाहने आणि त्याचे पार्ट बनवणाऱ्या कंपन्यांसाठी सुरु करण्यात आलेली प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) स्कीममुळे देशात भरपूर नोकऱ्या उपलब्ध होतील. पुढील पाच वर्षांत 7.5 लाख अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. अवजड उद्योग मंत्रालयाचे सचिव अरुण गोयल यांनी याबाबत माहिती देत म्हंटल की , या योजनेमुळे महामारीतून बाहेर पडलेल्या ऑटो क्षेत्रालाही चालना मिळेल. तसेच उत्पादनाबरोबरच विक्रीतही वाढ होईल.”

गोयल म्हणाले की,”PLI योजनेंतर्गत रोजगारासोबतच उत्पादन आघाडीलाही वेग येईल. यामुळे उत्पादन मूल्य 2,31,500 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे.” ते पुढे म्हणाले की,” या योजनेसाठी निवडलेल्या 20 वाहन कंपन्यांनी 45,000 कोटी रुपयांहून अधिकची गुंतवणूक करण्याचे वचन दिले आहे. ही योजना 25,938 कोटी रुपयांची आहे, त्यामुळे आम्हाला आशा आहे की, यामुळे 2,31,500 कोटी रुपयांचे उत्पादन वाढेल.”

पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केल्यासही दिलासा मिळेल
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात PLI योजनेद्वारे पाच वर्षांत देशभरात 60 लाख नोकऱ्या निर्माण केल्या जातील असे सांगितले होते. गोयल म्हणाले की,”PLI योजनेव्यतिरिक्त सरकार पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरही भर देत आहे. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्याची योजना आहे. त्यामुळे रोजगाराच्या आघाडीवरही मोठा दिलासा मिळणार आहे.”

एकूण 115 अर्ज मिळाले
अवजड उद्योग मंत्रालयाचे म्हणणे आहे की,” या योजनेसाठी अर्जाची विंडो 60 दिवसांसाठी खुली होती. 9 जानेवारीपर्यंत एकूण 115 अर्ज आले होते. यापैकी 87 वाहने ऑटो कंपोनंट कॅटेगिरीमध्ये आणि 38 वाहने OEM वाहन कॅटेगिरीमध्ये आली. यापैकी दोन्ही कॅटेगिरीसाठी 5 अर्ज आले आहेत. OEM कॅटेगिरी अंतर्गत 28 अर्जांपैकी, 20 पात्र मानले गेले आहेत.”

भारत ई-वाहनांना सर्वाधिक इन्सेन्टिव्ह देत आहे
इलेक्ट्रिक वाहनांसाठी मिळणाऱ्या इन्सेन्टिव्ह बद्दल गोयल म्हणाले की,”भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात सर्वोत्तम इन्सेन्टिव्ह देत आहे. याचाच परिणाम म्हणून आगामी काळात बॅटरी इलेक्ट्रिक वाहनांची वाढ रस्त्यांवर पाहायला मिळणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या इको-सिस्टीमला चालना मिळण्यास मदत होईल. ऑटोमोबाईल्स आणि ऑटो कंपोनंट साठी PLI स्कीम (25,938 कोटी रुपये), ACC साठी PLI (18,100 कोटी रुपये) आणि FAME योजना (रु. 10,000 कोटी) भारताला पर्यावरणदृष्ट्या स्वच्छ, टिकाऊ, प्रगत आणि उत्तम EV बेस्ड सिस्टीम बनवण्यासाठी मदत करेल.”

 सुरेश रैनाला संघात का नाही घेतलं? CSK ने दिले ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2022 साठी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत मिस्टर आयपीएल म्हणून ओळखला जाणारा सुरेश रैना अनसोल्ड राहिला. रैनाला 2 कोटी या बेस प्राईझ वर देखील कोणी घेतलं नाही. विशेष म्हणजे ज्या चेन्नई सुपर किंग्स कडून रैना अनेक वर्षांपासून खेळला त्यांनी देखील रैनाला संघात घेण्यात रस दाखवला नाही. दरम्यान, रैनाला संघात का घेतलं नाही याबाबत चेन्नईने स्पष्टीकरण दिले आहे.

चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथ यांनी याबाबत खुलासा करताना सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्ससाठी सलगपणे चांगला परफॉर्मन्स दिला असला तरी, संघ बांधताना खेळाडूचा फॉर्म आणि टीम रचना याकडे विशेष लक्ष दिले जाते. यंदाही आम्ही यावरच भर दिला. सुरेश रैना याला वगळणे सीएसकेसाठी खूपच कठीण निर्णय होता. मात्र, टीम बांधणी आणि रचना यासाठी काय महत्त्वाचे याकडेही तुम्हाला लक्ष द्यायला हवे. यंदाच्या संघावर नजर टाकली, तर तो टीममध्ये कुठेच फिट बसत नव्हता, असे काशी विश्वनाथ यांनी सांगितले.

दरम्यान, रैनाला आयपीएल मध्ये कोणीच न घेतल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. रैनाच्या समर्थकांनी यासाठी चेन्नई सुपर किंग्स ला जबाबदार धरले. रैनाने आत्तापर्यंत आयपीएल चे 205 सांमने खेळले असून त्यात 5528 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 39 अर्धशतके केली आहेत. रैना ने चेन्नई ला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत.

आता शेअर्सप्रमाणेच सोन्याची देखील खरेदी-विक्री करता येणार; कसे ते जाणून घ्या

Sovereign Gold Bond

नवी दिल्ली । आता आपल्याला शेअर्सप्रमाणेच सोन्याची देखील खरेदी आणि विक्री करता येईल. त्याचे ट्रेडिंग सोमवार ते शुक्रवार असेल. बाजार नियामक सेबीने नुकतेच यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या अंतर्गत, स्टॉक मार्केट इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स सेगमेंटमध्ये सकाळी 9 ते रात्री 11.55 पर्यंत ट्रेडिंग टाइम फ्रेम निश्चित करू शकतो.

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड (सेबी) ने आपल्या परिपत्रकात, शेअर बाजारातील EGR च्या ट्रेडिंगशी संबंधित विविध पैलू, ट्रान्सझॅक्शनवर आकारले जाणारे चार्ज, घाऊक सौदे, प्राईस कॅटेगिरी आणि इन्वेस्टर प्रोटेक्शन फंड अँड इन्वेस्टर सर्विस फंड निश्चित केला आहे.

सोने जमा केल्यावर इलेक्ट्रॉनिक रिसीट दिली जाईल
या परिपत्रकानुसार, गुंतवणूकदारांच्या हिताला बाधा पोहोचू नये म्हणून EGR ट्रान्सझॅक्शनवर स्टॉक एक्स्चेंजद्वारे आकारले जाणारे शुल्क वाजवी स्वरूपात ठेवणे ही एक्सचेंजची जबाबदारी असेल. सेबीने तयार केलेल्या गोल्ड एक्स्चेंजच्या ब्लू प्रिंटनुसार, फिजिकल गोल्ड जमा केल्यावर इलेक्ट्रॉनिक रिसीट दिली जाईल. या रिसीटचे गोल्ड एक्सचेंजवर ट्रेडिंग केले जाईल. ही इलेक्ट्रॉनिक रिसीट सबमिट करून फिजिकल गोल्डची डिलिव्हरी देखील घेता येते.

…अशाप्रकारे खुला झाला गोल्ड एक्सचेंज चालवण्याचा मार्ग
बाजार नियामकाने 28 सप्टेंबर 2021 रोजी गोल्ड एक्सचेंज SEBI विनियम 2021 च्या फ्रेमवर्कला मान्यता दिली. त्यानंतर EGR ला सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट, 1956 अंतर्गत डिसेंबर 2021 मध्ये सिक्युरिटी म्हणून अधिसूचित करण्यात आले. यामुळे भारतात गोल्ड एक्सचेंज चालवण्याचा मार्ग मोकळा झाला. यानंतर, भारतातील गोल्ड एक्सचेंजच्या कामासाठी फ्रेमवर्क देखील जारी करण्यात आले.

EGR ट्रेडिंग बद्दल आणखी माहिती जाणून घ्या
या परिपत्रकात असे म्हटले गेले आहे की, स्टॉक एक्स्चेंज सकाळी 9:00 ते 11:30 pm/11:55 या वेळेत त्यांच्या ट्रेडिंगचे तास निश्चित करू शकतात.
सर्व स्टॉक एक्स्चेंज संयुक्तपणे ट्रेडिंग सुट्टीचा निर्णय घेतील. जर बाजार आंतरराष्ट्रीय स्तरावर खुले असतील तर एक्सचेंजेस संध्याकाळी 5:00 नंतर सेशन ट्रेडिंग करण्यास परवानगी देऊ शकतात.
प्री-ओपन सेशन सकाळी 8:45 ते सकाळी 9:00 पर्यंत 15 मिनिटांसाठी असेल. यामध्ये ऑर्डर एंट्री, ऑर्डर फेरफार, ऑर्डर रद्द करण्यासाठी 8 मिनिटे आणि ऑर्डर मॅचिंग आणि ट्रेडसाठी 4 मिनिटे दिली जातील. प्री-ओपन सेशन पासून उर्वरित 3 मिनिटे सामान्य बाजारपेठेतील ट्रांसमिशन सुविधेसाठी बफर कालावधी असेल.
ऑर्डर एंट्रीच्या शेवटच्या एका मिनिटात सत्र रँडमपणे बंद केले जाईल. याचा ऑर्डर एंट्रीच्या 7व्या ते 8व्या मिनिटाच्या दरम्यान कधीही ऑर्डर बंद केली जाईल.

शिवसेनेच्या पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी दिला ‘हा’ सूचक इशारा; म्हणाले की…

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट करणार आहेत. त्यापूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत सूचक इशारा दिला. “दोन वर्षापासून गुजरातमध्ये 25 हजार कोटीचा झालेला घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. कोण होते हे लोक? सौ सोनार की एक लोहार की आज करणार आहोत,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोणत्याही राजकीय पक्षासाठी यंत्रणा नाही. गुजरातमध्ये 25 हजार कोटीचा घोटाळा झाला आहे. हा देशातील सर्वात मोठा बँक फ्रॉड आहे. आता ईडी तिथे काय करते ते पाहायचे आहे. त्या ठिकाणी ईडी का जात नाही? दोन वर्षापासून हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. कोण होते हे लोक? घोटाळा दाबण्यासाठी कुणीकुणी प्रयत्न केले? आरोपी कसे पळाले? हा संशोधनाचा विषय आहे.

 

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संबंधित ठिकाणांवर आज छापेमारी सुरू आहे. त्याबाबत राऊतांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “आज ईडीच्या वतीने टाकण्यात आलेल्या छाप्या संदर्भात माझ्याकडे माहिती नाही. राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील, काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य केले पाहिजे. दाऊदवर काही बोलू नये. काही कारवाई सुरू असेल तर राज्य आणि केंद्राने एकत्रित कामे केलं पाहिजे, असे यांनी म्हंटले.

UPI Transaction : सायबर फसवणूक टाळण्यासाठी 6 मार्गांचा अवलंब करा

UPI

नवी दिल्ली | केंद्र सरकारने अलीकडेच डिजिटल ट्रान्सझॅक्शनना प्रोत्साहन देण्यासाठी UPI च्या वापरावर प्रोत्साहन जाहीर केले आहे. यासह, ट्रान्सझॅक्शनच्या प्रतिपूर्तीसाठी 1,300 कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. जर तुम्ही ट्रान्सझॅक्शनसाठी UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) वापरत असाल तर फसवणूक टाळण्यासाठी काळजी घ्या.

सायबर सुरक्षेच्या सतत वाढत चाललेल्या आव्हानांच्या दरम्यान, स्मार्टफोनद्वारे केलेल्या ट्रान्सझॅक्शनमध्ये जास्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण असे केल्याने तुमचा मोबाइल फोन एक व्हर्चुअल मनी वॉलेट बनतो. ट्रान्सझॅक्शनदरम्यान निष्काळजीपणा दाखवल्यास आर्थिक फसवणूक करणे हे सोपे होते. अशा परिस्थितीत, मोबाइलअ‍ॅप वापरताना सावधगिरी बाळगणे आणि आर्थिक ट्रान्सझॅक्शन सुलभ करण्यासाठी सुरक्षिततेशी संबंधित उपायांचे पालन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही UPI ट्रान्सझॅक्शन करताना खालील सहा गोष्टी लक्षात ठेवल्या तर फसवणूक होण्याची शक्यता कमी होते.

UPI अ‍ॅक्सेस ब्लॉक करा
BankBazaar.com चे CEO आदिल शेट्टी म्हणतात की,” UPI ट्रान्सझॅक्शनसाठी UPI अ‍ॅड्रेस शेअर केला जातो. हा तुमचा मोबाईल नंबर असू शकतो. तुमच्या अ‍ॅपद्वारे कोणीही UPI खात्यात प्रवेश करू शकत नाही. यासाठी, तुम्ही मजबूत स्क्रीन लॉक पासवर्ड आणि पेमेंट पिन सेट करू शकता. काही शंका असल्यास, तुमचा पासवर्ड आणि पिन बदला.

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्सपासून दूर राहा
पासवर्ड, पिन, ओटीपी लीक होण्याचा धोका असल्याने स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपला UPI अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस देऊ नका. हे टाळण्यासाठी, तुम्ही सेटिंग्जमध्ये जाऊन स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपसाठी ओपन रिलॅक्सेशन डिसेबल्ड करू शकता.

रजिस्टर्ड असलेले नाव व्हेरिफाय करा
UPI ट्रान्सझॅक्शन करण्यापूर्वी लाभार्थीची व्हेरिफिकेशन करा. UPI अ‍ॅपवरून QR कोड स्कॅन करून किंवा मॅन्युअली नंबर टाकल्यास, त्याचे/तिचे रजिस्टर्ड नाव स्क्रीनवर दिसून येते. ट्रान्सझॅक्शन करण्यापूर्वी त्या व्यक्तीला विचारा की रजिस्टर्ड नाव बरोबर आहे.

मोबाईल नंबरवर पैसे पाठवू नका
पैसे पाठवताना, पैसे मिळवणाऱ्याकडून UPI ​​आयडी किंवा QR कोड विचारा, मोबाइल नंबरवर पैसे पाठवताना, चुकीचा नंबर टाइप करण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पहिले हे खाते देखील व्हेरिफाय करते.

अ‍ॅप अपडेट करत रहा
सुरक्षित व्यवहारांसाठी तुम्ही तुमचे UPI अ‍ॅप नियमितपणे अपडेट केले पाहिजे. यामध्ये सिक्योरिटी अपग्रेड समाविष्ट आहेत जे तुमचे अ‍ॅप वापरण्यास सुरक्षित बनवतात. तसेच, सुरक्षिततेशी तडजोड टाळा.

जास्त अ‍ॅप्स वापरू नका
आदिल शेट्टी सांगतात की, पेमेंट किंवा ट्रान्सझॅक्शनबाबत कोणतीही अडचण आल्यास मदत केंद्राच्या मदतीने ही समस्या UPI अ‍ॅपवर ताबडतोब मांडा. UPI सुरक्षित ट्रान्सझॅक्शनसाठी एकापेक्षा जास्त अ‍ॅप्स वापरा. इंटर-ऑपरेबिलिटीमुळे सर्व डिजिटल व्यवहारांसाठी एक UPI अ‍ॅप पुरेसे आहे. विविध प्लॅटफॉर्म, बँक किंवा अ‍ॅप्सवर पेमेंटमध्ये कोणताही व्यत्यय नाही.