Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2783

वायफायसाठी आई-वडिलांसह भावावर केला गोळीबार; 3 दिवस मृतदेहांसोबत राहिला अल्पवयीन मुलगा अन्…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकालच्या जगात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या इंटरनेटचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेदेखील आहेत. याच संदर्भात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका 15 वर्षाच्या मुलाने वाय-फाय कनेक्शन बंद झाल्याने रागाच्या भरात आपल्या आई, वडील आणि लहान भावाची गोळी झाडून हत्या केली. एवढेच नाहीतर तो तीन दिवस त्यांच्या मृतदेहांसोबत घरातच बंद राहिला. हि घटना स्पेनमध्ये घडली आहे. या घटनेतील आरोपी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

स्पेनच्या एल्श शहरात घडलेल्या या तिहेरी हत्यांकाडामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ माजली आहे. या आरोपी अल्पवयीन मुलाने आपला गुन्हा मान्य केला आहे. शाळेत कमी मार्क्स मिळाल्याने आणि घरातील कामात मदत करत नसल्याने या मुलाच्या आईने त्याचं वाय-फाय कनेक्शन बंद केलं होतं. याचा आरोपी मुलाला राग आला आणि त्याने रागाच्या भरात शॉटगनने आपली आई, वडील आणि 10 वर्षांचा भाऊ यांची गोळी मारून हत्या केली.

आपल्या परिवाराची हत्या केल्यानांतर आरोपी तीन दिवस या मृतदेहांसोबत घरातच बसून राहिला आणि नंतर त्याने आपल्या नातेवाईकांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. यानंतर आरोपीने एल्श पोलीस ठाण्यात जाऊन आपला गुन्हा मान्य केला आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

होळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकार देऊ शकते भेट, वाढू शकतो महागाई भत्ता

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होळीपूर्वी महागाई भत्त्यात वाढ करून सरकार त्यांना मोठी भेट देऊ शकते. DA मध्ये वाढ झाल्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.

केंद्र सरकारचे कर्मचारी देखील महागाई भत्ता, महागाई सुटका (DR) थकबाकी आणि घरभाडे भत्ता (HRA) मध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत. DA सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिल्या जाणाऱ्या राहणीमान भत्त्याची किंमत जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा वाढवली जाते.

DA 34 % असेल
मिळालेल्या माहितीनुसार, सरकार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांपर्यंत वाढ करू शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता दिला जात आहे. होळीपूर्वी महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ केल्यानंतर एकूण महागाई भत्ता 34 टक्के होणार आहे. DA वाढवण्याची सरकारची घोषणा 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर आधारित असेल. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 3 टक्क्यांनी वाढ केल्यास त्यांच्या पगारात मोठी वाढ होईल.

2021 मध्ये दोनदा वाढ झाली आहे
गेल्या वर्षी जुलै आणि ऑक्टोबरमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये दोनदा वाढ करण्यात आली होती. 47.14 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 68.62 लाख पेन्शन धारकांना 31 टक्के DA देण्यात आला. जुलै 2021 मध्ये, सरकारने महागाई सवलत 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवली. या वाढीमुळे जानेवारी आणि जुलै 2020 आणि जानेवारी 2021 मध्ये कोणत्याही थकबाकीशिवाय फ्रीझची भरपाई झाली.

अशा प्रकारे महागाई भत्ता ठरवला जातो
कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या आधारे महागाई भत्ता दिला जातो. शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वेगळा असतो. महागाई भत्ता बेसिक सॅलरीवर मोजला जातो. महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी एक सूत्र निश्चित केले आहे, जे ग्राहक किंमत निर्देशांकाद्वारे निर्धारित केले जाते.

अदानी विल्मारला झाला 211 कोटींचा मजबूत नफा, शेअर्सनेही दिला ​​आहे 70 टक्के रिटर्न; पुढे अंदाज काय?

SIP

नवी दिल्ली | अलीकडेच शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या अदानी विल्मारने सोमवारी चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर-डिसेंबर) निकाल जाहीर केले. कंपनीने 211 कोटी रुपयांचा मजबूत नफा कमावल्याचे सांगितले.

एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये, कंपनीने खुलासा केला आहे की, तिसऱ्या तिमाहीत तिची वाढ 66 टक्के होती आणि कंपनीला 211 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 127.39 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. या दरम्यान, कंपनीचा वार्षिक महसूल देखील 40.6 टक्क्यांनी वाढून 14,378.7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. हा अदानी ग्रुप आणि सिंगापूरचा विल्मार यांचा जॉईंट व्हेंचर आहे. कंपनी फॉर्च्युन ब्रँड अंतर्गत तेल आणि इतर खाद्यपदार्थ विकते.

नफा पाहून शेअर्स पळून गेले
अदानी विल्मारच्या शेअर्सनी सकाळच्या ट्रेडिंगमध्ये सुरुवात कमकुवतपणाने केली होती आणि 8 टक्के कमजोरीसह ट्रेड करत होते. कंपनीच्या निकालानंतर शेअर्सनी पुन्हा जोर धरला आणि 2 टक्क्यांपर्यंत वाढ केली. बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, खाद्यतेलाचा वापर जितक्या वेगाने वाढेल तितके कंपनीचे शेअर्सही वाढतील आणि गुंतवणूकदार भविष्यात आणखी नफा कमवू शकतात.

शेअर्स 70 टक्क्यांनी वाढले आहे
अदानी विल्मारचा शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये 227 रुपयांवर लिस्ट झाला होता. तेव्हापासून तो वाढतच आहे. तसे, IPO ची अप्पर प्राईस 230 रुपये होती, जी सध्या 390 रुपयांवर ट्रेड करत आहे. अशा प्रकारे, शेअर्सनी IPO किंमतीच्या तुलनेत सुमारे 70 टक्के जोरदार रिटर्न दिला आहे.

धक्कादायक ! एक लाख लोकं फेडू शकले नाहीत गोल्ड लोन, लवकरच होणार अशा सोन्याचा लिलाव

gold loan

नवी दिल्ली । गोल्ड लोन घेणे जेवढे सोपे आहे, तेवढेच ते न फेडणेही वेदनादायक आहे. बँका आणि NBFC अशा सुमारे 1 लाख कुटुंबांच्या सोन्याचा लिलाव करणार आहेत जे वेळेवर पैसे देऊ शकलेले नाहीत.

खरं तर, मुथूट फायनान्स आणि मणप्पुरम फायनान्स, ज्यांची गोल्ड लोन मार्केटमध्ये सर्वात मोठी हिस्सेदारी आहे, त्यांनी कर्जाची परतफेड करताना डिफॉल्टर्सच्या सोन्याचा लिलाव करण्यास सांगणाऱ्या नोटिसा जारी केल्या आहेत. या बुधवारपासून लिलावाचा पहिला टप्पा सुरू होईल, असा अंदाज आहे. NBFC आणि बँका दर महिन्याला अशा गोल्ड लोनच्या सोन्याचा लिलाव करतात. आता एक लाखाहून जास्त थकबाकीदारांच्या सोन्याचा लिलाव 16 फेब्रुवारीला होणार आहे.

आर्थिक मंदीचे काही लक्षण आहे का?
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,” गोल्ड लोन आणि सोन्याच्या लिलावाची वाढती थकबाकी देशाच्या आर्थिक मंदीकडे निर्देश करते. कोरोनाच्या काळात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या किंवा त्यांचा व्यवसाय कोलमडला. अशा लोकांनी सोने गहाण ठेवून कर्ज घेतले, मात्र पुन्हा उत्पन्न न मिळाल्याने ते फेडणे शक्य झाले नाही. ही अशी आर्थिक कोंडी आहे जी दिसत नाही आणि त्याचा फायदा बँका घेत आहेत.:

वरुण गांधी

वरुण गांधींचा टोमणा… हा नवा भारत आहे
भाजप नेते वरुण गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ‘आपल्या पत्नीचे दागिने गहाण ठेवताना पुरुषाचा स्वाभिमानही गहाण ठेवला जातो. शेवटचा पर्याय म्हणजे कोणत्याही भारतीयाचे दागिने किंवा घर गहाण ठेवले जाणे. या असंवेदनशीलतेमुळे महामारी आणि महागाई या दुहेरी त्रासाचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य भारतीयांचे कंबरडे मोडेल. नवीन भारत घडवण्याची हीच दृष्टी आहे का?’

गोल्ड लोनची मागणी झपाट्याने वाढत आहे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, कोरोनाच्या काळात देशात गोल्ड लोनचा कल झपाट्याने वाढला आहे. जानेवारी 2020 म्हणजेच कोविडच्या अगदी आधी, देशातील व्यावसायिक बँकांचे एकूण गोल्ड लोन साईज फक्त 29,355 कोटी रुपये होते. दोन वर्षांत ते अडीच पटीने वाढून 70,871 कोटींवर पोहोचला. देशातील सर्वात मोठी गोल्ड लोन कंपनी असलेल्या मुथूट फायनान्सचा एकूण डेट पोर्टफोलिओ या कालावधीत 39,096 कोटी रुपयांवरून 61,696 कोटींवर पोहोचला आहे.

रिकामटेकड्या तरुणाने अल्पवयीन मुलांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडलं अन्…

अमरावती : हॅलो महाराष्ट्र – अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी तीन जणांनी गावातील अल्पवयीन मुलांना अश्लील कृत्य करायला भाग पाडून, त्यांचे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडित अल्पवयीन मुलांच्या पालकांनी तिवसा पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलं आपल्या घराच्या आवारात खेळत होती. यादरम्यान विकृत मानसिकतेचे तीन तरुण याठिकाणी आले. त्यांनी व्हिडीओ बनवण्याची थाप मारत अल्पवयीन मुलांना अश्लील कृत्य करण्यास भाग पाडले. यानंतर या आरोपींनी याचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. यानंतर विकृत आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी संबंधित व्हिडीओ सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकांना शेअर केले.

या मुलांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित मुलांच्या पालकांनी हा व्हिडिओ पहिला. आपल्या मुलांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पोलिसांनी आपल्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांची विचारपूस केली असता, त्यांनी घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला. त्यानंतर पालकांनी तिवसा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या सगळा प्रकार ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’ प्रकरणात मोडत असल्याने पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत आरोपीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिवसा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नाना पटोलेंना आता आंदोलन मागे घेण्याची उपरती सुचली का?; प्रवीण दरेकरांचा सवाल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानावरून आक्रमक झालेल्या काँग्रेस कडून मुंबईमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा घराबाहेर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, मुंबईकरांची गैरसोय होऊ नये म्हणून आंदोलन रद्द करतोय, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला.

दरेकर म्हणाले, आता नाना पटोले सात आहेत कि मला मुंबईकरांना त्रास नको म्हणून मी आंदोलन मागे घेतोय. म्हणजे नाना आता उपरती झाली का? काल ज्यावेळी आंदोलने केली त्यावेळी हा विचार आला नाही का? उद्याच्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होणार आहे. ज्यादिवशी आम्ही ठोशास ठोसा देण्याची भूमिका घेतली. जर चाल करून भाजपवर कोणी येणार असेल तर तुमचा समज असेल तर कुणी अंगावर आल्यास आम्हीही त्याला शिंगावर घेऊ, हि जेव्हा आम्ही एक्शनला रिएक्शनची भूमिका घेतली. तेव्हा ते जमिनीवर आले.

मला वाटते महाविकास आघाडी सरकारकडे काय चांगले काम केले. हे दाखवता येत नाही. हे पूर्णपणे अपयशी झाले आहेत. म्हणून भावनिक वाद विवाद निर्माण करायचे काम केले जात आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये वाद उभा करायचा. राज्यपाल आणि राज्य सरकारमध्ये, भाजपशी वाद उभा करायचा. अशा प्रकारे संघर्षाचे वातावरण निर्माण करीत लोकांचे लक्ष येथील मूळ प्रश्नांपासून विचलित करायचे. हि यांची धोरनात्मक भूमिका आहे, अशी टीकाही यावेळी दरेकर यांनी केली.

किरीट सोमय्यांच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही – शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कोव्हीडच्या घोटाळ्यावरून आरोप केले जात आहेत. दरम्यान सोमय्यांच्या आरोपांबाबत शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “किरीट सोमय्या हे दररोज नवनवीन आरोप करत असतात. त्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा निर्वाळा मंत्री देसाई यांनी दिला आहे.

मंत्री शंभूराज देसाई यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “भाजप नेते किरीट सोमय्या हे दररोज नवनवीन आरोप करत असतात. त्यांनी पक्षाचे प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या वरही कोव्हीड काळात अनेक घोटाळे केले असे आरोप केले आहेत. वास्तविक पाहता सोमय्या यांच्याकडून केल्या जात असलेल्या आरोपांना किती महत्व द्यायचं हे माध्यमांनी ठरवावं.”

“सोमय्या यांच्याकडून केल्या जात असलेल्या आरोपांविषयी कोठेही तक्रार करावी. मात्र, त्यांना एवढंच सांगणे आहे की, कोव्हीड काळात जे काही सर्व निर्णय झालेले आहेत. ते सर्व निर्णय हे पारदर्शक झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नाही,” असेही मंत्री देसाई यांनी यावेळी म्हंटले.

सेना आमदारांच्या निधी वितरणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देऊ –  देसाई 

सेना आमदारांनी निधी वितरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत मला कल्पना नाही. मात्र, निधी वितरणाबाबत सेना आमदारांची काही भुमिका असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन ही बाब मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निदर्शनास आणून देऊ, असे मंत्री देसाई यांनी म्हंटले.

शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र, आणि उद्या महाराष्ट्रच बोलणार आहे; संजय राऊतांचा इशारा

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि उद्या महाराष्ट्रच बोलणार आहे असं संजय राऊत यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, आमची उद्याची पत्रकार परिषद केंद्रीय तपास यंत्रणेने जरूर ऐकायला हवी. उद्या शिवसेना हा पक्ष नाही तर महाराष्ट्र आणि मराठी माणूस बोलणार आहे. मला वाटतं उद्या त्यांना कळेल महाराष्ट्र काय आहे ते असे म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

केंद्रातून कोणी उठतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो आणि इकडले भाजपावाले गांडुळासारखे बसून असतात. नाही, महाराष्ट्र उठेल, महाराष्ट्र उसळेल, महाराष्ट्र अन्यायाविरोधात प्रतिकार करेल, महाराष्ट्र खोटारडेपणा विरुद्ध लढेल आणि नुसता लढणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत हा वंश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे दाखवू.

आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला लढण्याची जी मर्दानगी शिकवली आहे ती उद्या दिसेल उद्या काय आहे ते. आमच्या रक्तातच धाडस आहे आम्ही गांडूळ नाही आहोत. कुणी महाराष्ट्रवार उठावं बाहेरची लोक यावेत आणि मराठी माणसांना इकडे दमदाट्या कराव्यात, असं नाही होणार, आम्ही लढू. असे संजय राऊत यांनी म्हंटल.

आईला शिवी दिल्याच्या रागातून 21 वर्षीय तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मुंबईतील अंधेरी पूर्व भागात आईला शिवी दिल्याच्या रागातून एका तरुणाने आपल्या वर्गमित्राची हत्या केली आहे. या प्रकरणी 22 वर्षीय आरोपी तरुणाला अटक करण्यात आली आहे. या घटनेत 21 वर्षीय तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. महिन्याचा पगार झाल्यामुळे आरोपीने मित्राला पार्टीसाठी बोलावले होते. यावेळी या दोघांनी मद्यपान केले. यादरम्यान मृत तरुणाने आरोपीला त्याच्या आईवरुन शिवी घातली. याचा राग सहन न झाल्यामुळे आरोपीने मित्राची हत्या केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरोपी आणि मृत तरुण दोघेही शाळेपासूनचे वर्गमित्र आहेत.

काय आहे प्रकरण?
रागाच्या भरात मुंबईतील अंधेरी भागात 21 वर्षीय शाळकरी मित्राची हत्या केल्याच्या आरोपाखाली एका 22 वर्षीय तरुणाला रविवारी अटक करण्यात आली. आरोपी आणि मृत तरुण मद्यधुंद अवस्थेत असताना मृत तरुणाने आरोपीच्या आईला शिवीगाळ केली. यामुळे आरोपीला राग आला आणि त्याने आपल्या मित्राची हत्या केली. मृत तरुणाचे नाव राहुल गायकवाड आणि आरोपी तरुणाचे सुशांत घोटकर असे आहे.

पगाराच्या पार्टीनंतर झाला वाद
11 फेब्रुवारीला म्हणजेच घटनेच्या दिवशी सुशांतला पगार मिळाल्याने दोघांनी पार्टी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी अंधेरी येथे तीन ठिकाणी मद्यपान केले. यानंतर मद्यधुंद अवस्थेत मरोळ मरोशी या ठिकाणी फिरत असताना दोघांमध्ये वाद झाला. यावेळी राहुलने सुशांतच्या आईला शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या सुशांतने रागाच्या भरात राहुलला पेव्हर ब्लॉकने मारहाण केली. यावेळी राहुलच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे पाहून सुशांत घाबरला आणि तो राहुलला त्याच अवस्थेत सोडून घटनास्थळावरून पसार झाला.

उपचारादरम्यान मृत्यू
डोक्याला मार लागल्याने एक व्यक्ती रस्त्यात बेशुद्ध पडली असल्याची माहिती एका पादचाऱ्याने पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी राहुल गायकवाड याला कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र डोक्याला अधिक मार लागल्याने राहुलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.राहुल गायकवाडच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांना तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संजय गायकवाड या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

विद्यार्थ्यांचा नुकसान भरून काढण्यासाठी मनपाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

 

औरंगाबाद – कोरोना काळात शाळा ही ऑनलाइन पद्धतीने सुरू होती. आता ऑफलाइन पद्धतीनं शाळा सुरू झाल्या आहेत. अनेक शाळांना रविवारी सुट्टी दिली जाते. औरंगाबाद महापालिकेने शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी औरंगाबाद महापालिकेच्या शाळा आता शनिवारी आणि रविवारी देखील सुरू राहणार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेचे शिक्षणाधिकारी अध्यक्षतेखाली रविवारी महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक झाली. या बैठकीत महापालिकेच्या शाळा शनिवारी आणि रविवारीही सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता विद्यार्थी हे वीकेंडला देखील शाळेत जाणार आहेत.

औरंगाबाद महापालिकेच्या 71 शाळा आहेत यात 13 हजार 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शनिवार आणि रविवारी शाळेला सुट्टी न देण्याचा निर्णय औरंगाबाद महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत घेण्यात आला.