शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र, आणि उद्या महाराष्ट्रच बोलणार आहे; संजय राऊतांचा इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्या शिवसेनेकडून पत्रकार परिषद आयोजित केली आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनी भाजपला इशारा दिला आहे. शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र आहे आणि उद्या महाराष्ट्रच बोलणार आहे असं संजय राऊत यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, आमची उद्याची पत्रकार परिषद केंद्रीय तपास यंत्रणेने जरूर ऐकायला हवी. उद्या शिवसेना हा पक्ष नाही तर महाराष्ट्र आणि मराठी माणूस बोलणार आहे. मला वाटतं उद्या त्यांना कळेल महाराष्ट्र काय आहे ते असे म्हणत संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

केंद्रातून कोणी उठतो आणि महाराष्ट्राची बदनामी करतो आणि इकडले भाजपावाले गांडुळासारखे बसून असतात. नाही, महाराष्ट्र उठेल, महाराष्ट्र उसळेल, महाराष्ट्र अन्यायाविरोधात प्रतिकार करेल, महाराष्ट्र खोटारडेपणा विरुद्ध लढेल आणि नुसता लढणार नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही वंशज आहोत हा वंश छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, हे दाखवू.

आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला लढण्याची जी मर्दानगी शिकवली आहे ती उद्या दिसेल उद्या काय आहे ते. आमच्या रक्तातच धाडस आहे आम्ही गांडूळ नाही आहोत. कुणी महाराष्ट्रवार उठावं बाहेरची लोक यावेत आणि मराठी माणसांना इकडे दमदाट्या कराव्यात, असं नाही होणार, आम्ही लढू. असे संजय राऊत यांनी म्हंटल.