Monday, December 22, 2025
Home Blog Page 2794

आरोग्य सेतू अ‍ॅपवर मिळणार ‘युनिक हेल्थ आयडी नंबर’, तो कसा मिळवायचा ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली । राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आयुष्मान भारत डिजिटल मिशनला आरोग्य अ‍ॅप – आरोग्य सेतूशी जोडण्याची घोषणा केली आहे. याद्वारे, आरोग्य सेतूचे युझर्स 14 अंकी युनिक आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांकाचा लाभ घेऊ शकतील.

राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण- NHA ने त्यांच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन-ABDM या प्रमुख योजनेअंतर्गत आरोग्य सेतू सह करण्याची घोषणा केली आहे. हे एकत्रीकरण 14 अंकी युनिक ABHA-आयुष्मान भारत आरोग्य खाते क्रमांकचा लाभ आरोग्य सेतू युझर्सना वाढवेल.

ABDM अंतर्गत, युझर्स आपला युनिक ABHA क्रमांक तयार करू शकतो. युझर्स डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, लॅब रिपोर्ट्स, हॉस्पिटल रेकॉर्ड इत्यादींसह आपले सध्याचे आणि नवीन मेडिकल रेकॉर्ड लिंक करण्यासाठी ABHA नंबर वापरू शकतात आणि हे रेकॉर्ड डॉक्टर किंवा हॉस्पिटलसह शेअर करू शकतात.

Aarogya Setu App, ABHA Scheme 2022, Arogya Bharat Health Account Scheme,

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की, 21.4 कोटींहून जास्त आरोग्य सेतू युझर्स आता अ‍ॅपवरून 14-अंकी युनिक आयुष्मान भारत आरोग्य खाते (ABHA) क्रमांक तयार करू शकतील. हे एकत्रीकरण डिजिटल आरोग्य परिसंस्था मजबूत करेल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण-NHA मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.एस. शर्मा म्हणाले की,”कोविड महामारीमध्ये आरोग्य सेतूने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. महामारीच्या काळात या मोबाईल अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे.”

आरोग्य सेतूचा वापर
त्यांनी सांगितले की,”आता परिस्थिती सामान्यतेकडे जात असल्याने हे डिजिटल अ‍ॅप पुन्हा वापरणे गरजेचे होते. आरोग्य सेतूचे ABDM सोबत एकत्रीकरण केल्याने, आम्ही आता आरोग्य सेतूच्या युझर्सना ABDM चे फायदे देऊ शकू. युझर्सना त्यांच्या संमतीने डिजिटल हेल्थ इकोसिस्टममध्ये सामील होण्यास सक्षम करू शकू. ABHA ची निर्मिती ही फक्त सुरुवात आहे आणि आम्ही लवकरच तुमच्या डिजिटल आरोग्य नोंदी पाहण्याची सुविधा सुरू करणार आहोत.”

आरोग्य सेतू अ‍ॅप मध्ये प्रचंड ऍक्टिव्ह युझर्स आधार आहे आणि कोविड-19 संबंधित कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळवण्यापासून ते जोखीम शोधण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी त्याचा वापर केला जात आहे. कोविड-19 लस बुक करणे, सर्टिफिकेट डाउनलोड करणे आणि ई-पास तयार करणे यासाठी देखील याचा वापर केला जात आहे.

या अ‍ॅप द्वारे, कोविड चाचणी सुविधा, हेल्पलाइन कॉन्टॅक्ट आणि इतर COVID-19 डेटा आणि अपडेट्स देणार्‍या लॅब्स देखील शोधल्या जात आहेत. आता ABDM सह हे एकत्रीकरण आरोग्य अ‍ॅप युझर्ससाठी ABHA नंबर जनरेट करण्यासाठी आणखी एक वैशिष्ट्यफिचर जोडेल.

अशाप्रकारे नंबर तयार करा
ABHA क्रमांक तयार करणे अगदी सोपे आहे. युझर्स आपला आधार क्रमांक आणि काही आवश्यक तपशील जसे की नाव, जन्म वर्ष, लिंग आणि पत्ता वापरून त्यांचा ABHA क्रमांक तयार करू शकतात. जर युझर्सना आपला आधार क्रमांक वापरायचा नसेल, तर ते त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मोबाइल नंबर वापरून ABHA क्रमांक तयार करू शकतात. युझर्स abdm.gov.in किंवा ABHA App  किंवा ABDM च्या इतर अ‍ॅप्सवरून आपला ABHA क्रमांक तयार करू शकतात.

किरीट सोमय्यांवर कायदेशीर कारवाई होणार?; संजय राऊतांचे सूचक ट्विट

raut somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यांच्या आरोपांना आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्वीट करीत उत्तर दिले आहे. “गेल्या काही दिवसांपासून, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप होत आहेत. अपप्रचार करणाऱ्यांमुळे केंद्रीय यंत्रणांचा केवळ गैरवापर केला जात नसून त्यांची बदनामीही होत आहे. या अट्टल खोटारड्यांना लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.” असे सूचक ट्विट राऊतांनी केले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतेच आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहार की, “गेल्या काही दिवसांपासून, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर निंदनीय आरोप होत आहेत. अपप्रचार करणाऱ्यांमुळे केंद्रीय यंत्रणांचा केवळ गैरवापर केला जात नसून त्यांची बदनामीही होत आहे. या अट्टल खोटारड्यांना लवकरच कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.”

त्याचबरोबर त्यांनी ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, “आणि लक्षात ठेवा आमचे सरकार पडणार नाही आणि मी झुकणारही नाही ! जय महाराष्ट्र!” असा इशाराही राऊतांनी आपल्या ट्विटद्वारे दिला आहे.

अमरावती नंतर आता सातारा जिल्ह्यात छत्रपतींच्या पुतळ्यावरून वाद सुरू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

अमरावती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याने राज्यात मोठे वादंग निर्माण झाले आसताना आता सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील केंजळ येथेही असाच प्रकार समोर आला आहे. केंजळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविल्याच्या कारणावरून पोलीस महसूल प्रशासन गावात दाखल झाले आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे- बंगळूर महामार्गावरून सुरूर फाटा येथून काही अतंरावर वाई- महाबळेश्वर रस्त्याला केंजळ हे गाव आहे. या गावात आज शनिवारी दि. 12 रोजी छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याने वादंग निर्माण झाला. शिवाजी महाराजाचा पुतळा बसविण्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे.

केंजळ येथे विनापरवाना पुतळा बसविल्याची माहिती मिळताच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भैरवनाथ मंदिर व ग्रामपंचायत परिसरात हा पुतळा बसविण्यात आला आहे. शासनाची कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसविल्याने प्रशासन दाखल झाले आहे. पोलिस प्रशासन केंजळ गावात आल्याने तणावाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी गावात दाखल झाले असून अधिक माहिती घेत आहेत.

भाजपने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला; आदित्य ठाकरेंचा सनसनाटी आरोप

Aditya thackeray fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला. आदित्य ठाकरे हे शिवसेनेच्या प्रचारार्थ गोव्यात आले आहेत. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या पाच वर्षात भाजप कडून फक्त आम्हांला च नव्हे तर संपूर्ण एनडीएच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला. त्यामुळे ते सर्व मित्र पक्ष भाजपला सोडून गेले. त्यामुळे ज्या ठिकाणी आमचं अस्तित्व होतं तिथं आम्ही लढायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लढत आहोत. मणिपूरमध्ये लढत आहोत. बिहार आणि बंगालमध्ये लढलो. सिल्वासामध्ये विजय मिळाला असे आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, विधानसभा, लोकसभा, जिल्हापरिषद आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार आहोत अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली. शिवसेना गोव्याला नवीन नाही.. तसेच इतर राज्यातही शिवसेनेची गरज आहे असे आदित्य ठाकरे यांनी म्हंटल.

CIBIL स्कोअर वाढवण्यासाठीचे ‘असे’ 5 नियम ज्यामुळे कर्ज मिळण्यात कधीही येणार नाही अडचण

Credit Score

नवी दिल्ली । जेव्हापासून बँकांनी कर्ज वितरणासाठी CIBIL स्कोअर पाहण्यास सुरुवात केली आहे. तेव्हापासून ग्राहकांना कर्ज मिळण्यात अनेक अडचणी येत आहेत. अशा स्थितीत ग्राहकांचा सिबिल स्कोअर बँकांसाठी इतका महत्त्वाचा का झाला आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.

CIBIL स्कोअर हा नंबर किंवा रेटिंग आहे जे सांगते की, तुम्ही तुमचे कर्ज फेडण्यात किंवा इतर आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात किती गंभीर आहात. तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल किंवा इतर कर्ज वेळेवर भरले नाही, तर तुमच्या CIBIL स्कोअरवर थेट परिणाम होतो. खराब CIBIL स्कोअर पाहून, बँका कर्ज देण्यास किंवा व्याजदर वाढवण्यास नकार देतात. चांगला CIBIL स्कोअर करण्यासाठी 5 खात्रीपूर्वक मार्ग जाणून घ्या.

क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी ठेवा
कंपन्या तुमच्या क्रेडिट युटिलायझेशन रेशोवर जास्तीत जास्त लक्ष देतात. म्हणजे तुम्हाला मिळालेल्या क्रेडिट लिमिटपैकी किती रक्कम वापरली जाते. 30 टक्क्यांपर्यंत रेशो राखणाऱ्याला कंपन्या चांगले मानतात. जर तुम्ही 50 % किंवा त्याहून जास्त वापरत असाल, तर तुम्ही तुमचे खर्च भागवण्यासाठी कर्जावर अवलंबून आहात हे दाखवते.

वेळेवर आणि पूर्ण पैसे देण्याची सवय लावा
तुमचा फोन, पाणी, वीज, क्रेडिट कार्ड बिल किंवा इतर कोणत्याही प्रकारचे पेमेंट वेळेवर भरण्याची सवय लावा. तसेच, पूर्ण पेमेंट करण्याचा प्रयत्न करा, कारण किमान रक्कम भरल्यास, तुमची ताबडतोब सुटका होईल, मात्र भविष्यात ते तुमचे कर्ज केवळ महागच करणार नाही तर CIBIL स्कोअर देखील खराब करू शकते.

जॉईंट अकाउंटवरही लक्ष ठेवा
जर तुमचे जॉईंट अकाउंट असेल तर त्यावरही लक्ष ठेवा. तुमच्या जॉईंट अकाउंटहोल्डरने वेळेवर कोणतीही थकबाकी भरली नाही आणि तुम्ही डिफॉल्ट व्हाल. यामुळे तुमचा CIBIL स्कोअर देखील खराब होऊ शकतो.

वर्षातून तीनदा क्रेडिट हिस्ट्री रिव्ह्यू करा
तुम्ही तुमच्या CIBIL रिपोर्टवर सतत लक्ष ठेवावे आणि दर 4 महिन्यांनी त्याचे पुनरावलोकन करावे. क्रेडिट हिस्ट्री पाहून तुम्हाला कळेल की सर्व पेमेंट रेकॉर्ड योग्य रीतीने राखले जात आहेत. जर तुम्ही कोणतेही खाते किंवा कार्ड बंद केले असेल तर ते देखील तपासा.

एकाच वेळी अनेक ठिकाणी कर्जासाठी अर्ज करू नका
जर तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड घ्यायचे असेल किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर एकाच वेळी अनेक ठिकाणी अर्ज करू नका. याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर वाईट परिणाम होतो. तसेच, तुम्ही तुमचा CIBIL स्कोअरपुन्हा पुन्हा तपासू नये. यामुळे कंपन्यांना असे वाटते की, तुम्हाला तुमच्या आर्थिक स्थिरतेबद्दल शंका आहे.

राजू शेट्टींचे पवारांना पत्र; व्यक्त केली ‘ही’ खदखद

shetty pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांचे सरकार अस्तित्वात आले असल तरी त्यांच्यातील अंतर्गत कुरघोडी आणि वारंवार समोर आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट पत्र लिहीत आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांकडून कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतला आमच्या सारख्या छोट्या पक्षांचे मतही विचारात घेतले नाही हे दुर्दैव आहे असे त्यांनी म्हंटल.

संकटाच्या काळात तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहिला. त्यामुळेच बहुमताच्या दिशेने घौडदौड करणारा भाजपचा अश्वमेध रोखला गेला. अनेक नाट्यमय घडामोडीनंतर तुमच्या अथक परिश्रमामुळे महाविकास आघाडीची निर्मिती झाली मी स्वत: त्याचा साक्षीदार आहे.
साहेब महाराष्ट्रातील शेतक-याच्या महाविकासआघाडीकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या पण हळूहळू त्या अपेक्षांना तडे जाऊ लागले आहेत.

कर्जमाफीचा एक मुद्दा सोडला तर कुठल्याच गोष्टी शेतक-यांच्या मनासारखे होत नाहीत महाविकास धर्मनिरपेक्ष आघाडीला पाठिंबा देणारे समाजवादी पक्ष , बहुजन विकास आघाडी , शेतकरी कामगार पक्ष , स्वाभिमानी पक्ष , लोकभारती व इतर छोटे मोठे पक्ष यांना काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते आजकाल कवडीचीही किंमत देत नाहीत.

महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून या छोट्या पक्षाबरोबर एकही बैठक झालेले नाही मात्र त्याच काळामध्ये काही धोरणात्मक निर्णय घेतले गेले ते घेत असताना ज्या विषयावर या छोट्या पक्षांनी हयातभर संघर्ष केला त्यांचे मतही विचारात घेतले नाही हे दुर्दैव.वैचारिक बांधिलकीमुळे हे छोटे पक्ष भाजपला पाठिंबाही देऊ शकत नाहीत व तिसरी आघाडीही करू शकत नाहीत या त्यांच्या आगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांना ग्रहीत धरले गेले.

गेल्या दोन वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने खालील काही निर्णय घेत असताना आमच्यासारख्या छोट्या मोठ्या पक्षांचा विरोध असणार हे माहित असतानाही जाणीवपुर्वक सदरचे निर्णय रेटून घेतले गेले.

1) ऊस दर नियंत्रण समिती :- ही समिती ऊस उत्पादक शेतकर्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे पृथ्वीराज चव्हाण व देवेंद्र फडणवीस सरकारने हि समिती बनवित असताना ऊस दरासाठी संघर्ष करणा-या संघटनाच्या प्रतिनीधीचा समावेश या समितीमध्ये केलेला होता. महाविकास आघाडी सरकारने मात्र चळवळीची कुठलीही पार्श्वभुमी नसेलेले आणि स्थानिक कारखानदारांच्या दबावात येणा-या कार्यकर्त्याचा यामध्ये समावेश केला.

2) आपण स्वत: कृषी व अन्न नागरी पुरवठा मंत्री असताना २०११ साली एक रक्कमी एफ आर पी देण्यासंदर्भातील दुरूस्ती ऊस दर नियंत्रण अध्यादेशात केली होती. त्याला छेद देऊन निती आयोगाने तुकड्या तुकड्याने एफ. आर. पी देण्याच्या घाट घातला व अभिप्रायासाठी सदरचा प्रस्ताव राज्याकडे पाठविला महाविकास आघाडी सरकारने कसलीही चर्चा न करता तत्परतेने निती आयोगाच्या प्रस्तावाचे समर्थन करणारा अभिप्राय कळविला.

3) महापूर व अतिवृष्टीमध्ये प्रचंड नुकसान झालेल्या शेतक-यांना तुटपुंजी मदत जाहीर करून वा-यावर सोडले गेले.

4) २०१३ च्या भुमि अधिग्रहण कायद्यामध्ये दुरूस्ती करून चौपट नुकसान भरपाईचा शेतकर्यांचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न मोदी सरकारने २०१५ साली केलेला होता. त्यावेळेस संसदेच्या दोन्ही सभाग्रहात कॉंग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांनी कडाडून विरोध केलेला होता. मात्र याच तीनही पक्षांचा समावेश असलेल्या मविआ सरकारने त्यापेक्षाही भयानक नुकसान करणारे २१ सप्टेंबर २०२१ व ६ ऑक्टोबर २०२१ या शासन निर्णयाने निर्णय घेतले आहेत. सदर शासन निर्णयामुळे २०१३ च्या कायद्यानुसार मिळणा-या जमिनीच्या मोबदलाच्या केवळ तीस टक्के मोबदला मिळेल असा कायदा करून ठेवला आहे.

5) राज्यात सध्या विजेची टंचाई तर आहेच शिवाय विजेचे दरही इतर राज्याच्या तुलनेने प्रचंड आहेत. अशा परिस्थीतीमध्ये जलसंपदा विभागाने त्यांच्या ताब्यात असणा-या जलाशयातील विज निर्मीतीची केंद्रे महाजनको कडे असलेली मुदत संपल्यानंतर खासगी कंपन्यांना भाड्याने देण्याचा घाट घातलेला आहे. अर्थात खाजगी कंपन्या म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्याच कंपन्या व त्यात तयार होणारी वीज जी १ रूपये ६० युनिटप्रमाणे महाजनको ला तयार होत होती तीच वीज ६ रूपये प्रमाणे महाजनको ला विकत घ्यावे लागणार. या धोरणामुळे नेमके कोणाचे कल्याण होणार आहे हे महाविकास आघाडीच्याच नेत्यानाच माहिती असेल. मात्र एक नक्की महाजनको , महापारेषण , महावितरण या कंपन्याची एकदिवस एस. टी. महामंडळासारखी गत होणार आहे हे नक्की.

6) महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्या वाईन निर्मीती प्रकल्पांना राज्य सरकारचे अनुदान व कर्जाला सरकारची हमी हवी होती म्हणून किराणा दुकानामध्ये वाईन विक्रीस परवानगी देण्याचे धोरण जाहीर करून विनाकारण शेतक-याला बदनाम केले गेले.

7) नियमीत कर्ज भरणा-या शेतकर्यांना प्रोत्साहनत्नक अनुदान देण्याची घोषणा होऊन २ वर्षे उलटून गेली तरीही ती शेतक-यांना मिळाली नाही.

आपण स्वत: २०१८ -१९ च्या काळात महाराष्ट्राभर फिरून आपण महावितरणचे देणे लागत नसून तेच आपले देणे लागतात १८ टक्के पठाणी व्याज लावत असल्याचा आरोप करून १ रूपयाही वीजबिल न भरण्याचे आवाहन केले होते. आज तीच थकबाकी शेतक-च्या उरावर बसलेली आहे. वसुलीसाठी महावितरणने धडाधड वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतक-यांच्या डोळ्यांसमोर पाण्याअभावी पिके करपून जात आहेत.

वरील महाराष्ट्रातील शेतक-यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणा-या विषयावर सर्व घटकांशी सखोल चर्चा करून निर्णय घेण्याऐवजी महाविकास आघाडी सरकार हे सचिन वाझे प्रकरण , आरोग्य भरती घोटाळा , म्हाडा पेपर फुटी , टीईटी घोटाळा , कोरोना काळातील जंबो कोविड सेंटर व औषध खरेदी घोटाळा यातच गुरफटून गेले असल्यामुळे जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ नाही. सरकारमधील मंत्री आपापल्या मतदारसंघातील व व्यवसायातील विश्वात व्यस्त आणि मस्त आहेत.२०१४ साली आम्ही स्वामिनाथन यांचे सुत्राप्रमाणे हमीभाव देणेचे अटीवर भाजपला पाठिंबा दिला होता पण त्यांनी शेतक-याला फसविले हे समजता क्षणी आम्ही त्यांची संगत सोडली. तीन काळे कृषी कायदे आणून सुमारे ७०० शेतक-यांचा बळी घेऊन भाजप सरकार हे शेतकरी विरोधी आहे हा आमचा निर्णय बरोबर होता हे सुध्दा सिध्द केले. अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडून शेतक-यांना फार मोठ्या अपेक्षा होत्या परंतु दुर्देवाने १९९९ साली जशी स्वर्गीय एन. डी. पाटील व स्वर्गीय गणपतराव देशमुख यांची जी अवस्था झाली कि ज्यामुळे त्यांना आपल्या बरोबरच्या आघाडीशी फारकत घ्यावी लागली दुर्देवाने तशीच वेळ आमच्यावर आली कि काय असे वाटू लागले. सर्वसामान्य जनतेचा सरकारवरील विश्वासास तडा जात आहे.

आपण महाविकास आघाडीचे प्रमुख या नात्यांने या सर्व गोष्टी वेळीच सावरले नाहीत तर महाविकास आघाडीचा डोलारा ढासळायला वेळ लागणार नाही. आम्ही या महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहोत म्हणून या सर्व गोष्टी आपल्या निदर्शनास आणून द्यावे असे वाटले म्हणून या सर्व गोष्टी आपल्या लक्षात आणून दिल्या. बाकी निर्णय आपण व आपल्या सहका-यांनी घ्यायचा आहे. अशी मागणी राजू शेट्टी यांनी या पत्रात केली.

“आमच्यावर आरोप करणाऱ्यांचा नक्कीच इलाज करू”; मुख्यमंत्र्यांचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन वास्तुचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली. यावेळी “कोरोना काळात आपण केलेल्या कामामुळे आपले झालेले कौतुक काही जणांना परवडत नाही. त्यामुळे त्यांच्या पोटात मळमळ होते. त्याच्याकडून आरोप केले जातातायत. त्याचा नक्की इलाज करू,” असा इशारा मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज जालना येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या नवीन वास्तुचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, कोविड काळात केलेल्या कामाबद्दल माझा उल्लेख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून केला जातो. काही जणांना आपले कौतुक परवडत नाही आणि पोटात मळमळ होते. मग त्यांच्याकडून भ्रष्टाचार खणून काढण्याचे बोलले जाते.

माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी एवढत सांगतो कि, काय काढायचे ते काढा पण आपण जास्तीत जास्त सेवा देऊ शकलो. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचले. ज्यांचे प्राण वाचले त्यांची संख्या ही आरोप करणाऱ्यांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. म्हणून आरोप करणाऱ्यांना किंमत देण्याची गरज नाही. आरोप करणाऱ्यांनाचा सरकारी आरोग्य केंद्रात अगदी फुटक तपासणी करुन देऊ. विरोधक आहेत म्हणून त्यांचा इलाज करायचा नाही अशातला भाग नाही.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी एका डायलॉगची आठवण करून दिली. सलमान खानच्या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाने थप्पड से डर नही लगता असे म्हटले आहे. आम्हा राजकारणातल्या लोकांचे नेहमी थप्पड देणे आणि खाणे हे आमचे आयुष्य आहे. त्यात कौतुक केलं की थोडी धडधड होते, असेही यावेळी ठाकरे याणी म्हटले.

अवघ्या काही पैशांमध्ये उपलब्ध आहे रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्स; अपघात झाल्यास मिळणार 10 लाख रुपये

Railway

नवी दिल्ली । तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक करता तेव्हा रेल्वे आपल्याला फक्त 35 पैशांमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स मिळवण्याचा पर्याय देते. या इन्शुरन्समुळे इन्शुरन्स कंपनी रेल्वे प्रवासातील नुकसान भरून काढते. यामध्ये 10 लाख रुपयांपर्यंतचे कव्हर उपलब्ध आहे. यामध्ये अपघातातील वेगवेगळ्या पात्रतेनुसार प्रवाशाला इन्शुरन्सची रक्कम दिली जाते.

त्यामुळे, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रेल्वे तिकीट ऑनलाइन बुक कराल तेव्हा रेल्वे ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय नक्कीच निवडा. जेव्हा तुम्ही इन्शुरन्सचा पर्याय निवडता, तेव्हा तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरवर एक लिंक पाठवली जाईल. ही लिंक इन्शुरन्स कंपनीची आहे. या लिंकला भेट देऊन, तुम्ही तेथे नॉमिनी डिटेल्स भरणे आवश्यक आहे. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये नॉमिनी असल्यासच इन्शुरन्स क्लेम उपलब्ध होतो.

अपघात झाल्यास ही रक्कम दिली जाईल
त्यामुळे रेल्वे अपघातात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात मदत होते. रेल्वे अपघातात तुम्हाला किती नुकसान झाले आहे, त्यानुसार तुम्हांला इन्शुरन्सची रक्कम मिळते. रेल्वे अपघातात प्रवाशाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची इन्शुरन्सची रक्कम उपलब्ध आहे. रेल्वे प्रवासी अपघातात पूर्णपणे अपंग झाल्यास त्याला 10 लाख रुपये मिळतात. अंशतः कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपये, दुखापत झाल्यास 2 लाख रुपये रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय रेल्वे प्रवाशाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाच्या वाहतुकीसाठी इन्शुरन्स कंपनी 10 हजार रुपये देते.

अशा प्रकारे करा क्लेम
रेल्वे अपघात झाल्यास, ती व्यक्ती, नॉमिनी किंवा त्याचा वारसदार इन्शुरन्सचा क्लेम करू शकतात. यासाठी तो इन्शुरन्स कंपनीच्या जवळच्या ऑफिसमध्ये जाऊन इन्शुरन्स क्लेम करू शकतो. आधार कार्ड, पॅनकार्ड आदी कागदपत्रे जमा करावी लागतात. रेल्वे अपघातानंतर 4 महिन्यांच्या आत इन्शुरन्स क्लेम करता येतो.

मराठवाड्यातून ओमायक्रॉन हद्दपार

Corona

औरंगाबाद – मराठवाड्यात दीड महिन्यात ओमायक्रोनचे एकूण 51 रुग्ण आढळले होते. त्या सगळ्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. ते सर्व बरे झाले असून सध्या विभागात व मायक्रॉनचा एकही रुग्ण नाही. मराठवाड्यातून ओमायक्रोनची रुग्णसंख्या शून्यावर आली आहे.

सोबतच कोरोनाची रुग्ण संख्या देखील कमी होत असल्यामुळे मराठवाड्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. मराठवाड्यात मागील 24 तासात कोरोनाचे 570 रुग्ण आढळले असून, सध्या एकूण 7 हजार 506 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना आणि ओमायक्रोनच्या रुग्ण संख्येमुळे 400 कोटींची मागणी प्रशासनाने शासनाकडे केली होती. आजवर डीपीसी दोनच उपचार खर्च करावा लागला.

रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे संस्थात्मक अलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या 1 हजार 62 रुग्ण क्वारंटाईन आहेत. तर घरी 7 हजार 659 रुग्ण उपचार घेत आहेत. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण संख्या जास्त आहे.