Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2793

गॅरेज शेडमधील पहिल्या स्कूटरपासून ते ‘हमारा बजाज’ पर्यंतच्या राहुल बजाज यांच्या आयुष्याशी संबंधित रंजक किस्से

नवी दिल्ली । भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींपैकी एक असलेले राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते आणि दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. एकेकाळी भारताची शान असलेली चेतक स्कूटर बनवणाऱ्या बजाज समूहाचे ते अध्यक्षही होते.राहुल बजाज यांना 2001 मध्ये भारत सरकारने उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील कामगिरीमुळे पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 1938 मध्ये जन्मलेले राहुल राज्यसभेचे सदस्य आणि देशातील आघाडीच्या दुचाकी कंपनी बजाज ऑटोचे अध्यक्ष आहेत. राहुल बजाज यांना ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मानही देण्यात आला आहे.

10 जून 1938 रोजी कोलकाता येथील मारवाडी व्यापारी कमलनयन बजाज यांच्या घरी जन्मलेल्या राहुल बजाज यांच्या निधनाने व्यापारी जगतापासून समाजाच्या विविध स्तरांवर शोककळा पसरली आहे. राहुल बजाज यांनी 1960 च्या दशकात बजाज समूहाचे नेतृत्व स्वीकारले आणि 2005 मध्ये अध्यक्षपद सोडले. त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा राजीव बजाज यांनी ही जबाबदारी स्वीकारली. बजाज समूहाला पाच दशकांहून अधिकच्या उंचीवर नेण्यात राहुल यांचा मोठा वाटा होता.

राजकीय वर्तुळात प्रवेश
राहुल बजाज यांचा उद्योग तसेच राजकीय वर्तुळात चांगलाच प्रवेश झाला. वास्तविक, राहुलचे वडील कमलनयन बजाज आणि इंदिरा गांधी यांनी काही काळ एकाच शाळेत शिक्षण घेतले होते. त्यामुळे बजाज घराण्याशी गांधी घराण्याचे चांगले संबंध होते.

जेव्हा बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली
राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोने अनेक विक्रम केले आहेत. त्यांच्या कार्यकाळात कंपनीची उलाढाल 7.2 कोटींवरून 12 हजार कोटींवर पोहोचली आणि लवकरच बजाज ऑटो ही स्कूटर विकणारी देशातील सर्वात मोठी कंपनी बनली.

‘हमारा बजाज’ मागची मनोरंजक कथा
बजाज ऑटोच्या स्थापनेपासून त्याच्या यशाची कथाही मनोरंजकपणे वाढली आहे. बजाज ऑटो 1960 मध्ये अस्तित्वात आली. पूर्वी ही कंपनी बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशन होती.

वास्तविक जमनालाल बजाज हे त्यांच्या काळातील एक प्रस्थापित उद्योगपती होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही भाग घेतला होता. 1926 मध्ये त्यांनी व्यवसाय करण्यासाठी बच्छराज अँड कंपनीची स्थापना केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे जावई रामेश्वर नेवातिया आणि दोन मुले कमलनयन आणि रामकृष्ण बजाज यांनी बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनची स्थापना केली.

1948 मध्ये, स्वातंत्र्यानंतर वर्षभरात, बच्छराज ट्रेडिंगने परदेशातून कंपोनंन्टस आयात करून दुचाकी आणि तीनचाकी वाहने बाजारात आणली. असे म्हटले जाते की, पहिली बजाज व्हेस्पा स्कूटर गुडगावमधील गॅरेज शेडमध्ये बनवण्यात आली होती. यानंतर बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनने स्वतःचा मॅन्युफॅक्चरींग प्लांट उभारला. येथे बजाज कुटुंबाने फिरोदियाझसोबत भागीदारी करून दुचाकी आणि तीनचाकी वाहने बनवण्यासाठी स्वतंत्र प्लांट उभारला. त्यानंतर बजाज ऑटो अस्तित्वात आली.

आला रे !! ईशान किशन मुंबईकडेच; 15.25 कोटींची विक्रमी बोली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन मुंबई इंडियन्स ने आपल्या संघात कायम ठेवले. किशन ला तब्बल 15.25 कोटींची बोली लागली. तरीही मुंबईने अखेरपर्यंत माघार न घेत त्याला आपल्याच ताफ्यात घेतलं. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईने एका खेळाडूवर 10 कोटींहून अधिक बोली लावली आहे.

ईशान किशन साठी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद मध्ये जोरदार चुरस लागली होती. 15 कोटींपर्यंत त्याची किंमत गेल्यानंतरही दोन्ही संघ माघार घेत नव्हते. अखेर या लढाईत मुंबई इंडिअन्स ने बाजी मारत १५.२५ कोटींच्या बोलीसह ईशान किशन ला आपल्या संघात ठेवले. ईशान किशन आक्रमक डावखुरा सलामीवीर आहे. फलंदाजी सोबतच तो यष्टीरक्षकाची भूमिका योग्य प्रकारे पार पडतो

2018 मध्ये ईशान किशनला 6.40 कोटींची बोली लागली होती. ईशानने मुंबईसाठी अनेक अविस्मरणीय खेळ्या खेळून आपली योग्यता सिद्ध केली आहे. 2020 मध्ये, ईशानने आयपीएलमध्ये 30 षटकार मारले होते, जे त्या हंगामात एका फलंदाजाने मारलेले सर्वाधिक षटकार होते. यावेळी ईशानचा समावेश आयपीएलमधील सर्वाधिक महागड्या खेळाडूंमध्ये होऊ शकतो.

केरळच्या प्रश्नाला तामिळनाडूचे दिले उत्तर; नारायण राणे पुन्हा गडबडले

Narayan Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेत केलेल्या एका भाषणाची सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे. ती म्हणजे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केरळच्या खासदाराला चक्क तामिळनाडूचे उत्तर दिले. शेवटी सभापतींनी त्यांच्या चूक लक्षात आणून दिल्यानंतर राणेंना समजले. मात्र, याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

लोकसभेत नुकतेच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना केरळचे खासदार सुरेश कोडीकुन्नील यांनी एक प्रश्न विचारला त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राणेंची मात्र, फसगत झाली. यावेळी कोडीकुन्नील यांनी कोरोना काळात उद्योगांचे प्रचंड नुकसान झाले. या काळात सरकारने काय मदत केली. याचे सविस्तर उत्तर देण्याचे आवाहन मंत्री राणेंना केले. त्यावर मंत्री राणे यांनी “कोरोनाच्या महामारीचा गेल्या दोन वर्षांत उद्योग क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला.

त्यामुळे अनेक उद्योग बंद पडले. काही सुरूही झाले. मात्र, आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रमांतर्गत अनेक योजना सुरू केल्या आहेत. उद्योगांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. त्यातून आम्हाला तामिळनाडू मध्येही अनेक उद्योगकांना त्यांचे उद्योग सुरू करण्यासाठी मदत झाली आहे. त्यांना कर्ज दिले, असे म्हंटले.

मंत्री राणे यांनी एका प्रश्नाला दुसऱ्याच प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सुरेश कोडीकुन्नील हे केरळचे आहेत. आणि त्यांच्या प्रश्नाला तामिळनाडूतील कामाचे कारण सांगत उत्तर दिले आहे. त्यामुळे तुम्ही तामिळनाडू समजून घ्या, असा सल्ला सभापतींनी राणेंना दिला. त्यानंतर राणेंच्या लक्षात त्यांनी केलेली चूक आली.

आ. शिवेंद्रसिंहराजेच्या नगरसेवकांसह तिघांवर ॲट्रासिटीचा गुन्हा

Satara Municipal

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

सातारा शहरातील मंगळवार पेठेत असणाऱ्या जागेत खोदकाम करत जमिनीचे नुकसान केल्‍याप्रकरणी शाहुपूरी पोलिस ठाण्‍यात सातारा पालिकेतील आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नगरसेवक रविंद्र निवृत्ती ढोणे (वय- 43, रा.रामाचा गोट, सातारा) यांच्‍यासह तीन जणांवर ॲट्रासिटीतंर्गत गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा शहरातील मंगळवार पेठेत विक्रांत बाळकृष्‍ण दुबळे हे राहण्‍यास असून त्‍यांची त्‍याच परिसरात वडिलोपार्जित जागा आहे. श्री. दुबळे यांच्या वडिलोपार्जित जागेत संभाजी वायदंडे, पुष्‍पा संभाजी वायदंडे यांनी ती जागा स्‍वत:ची असल्‍याचा दावा करत वाद घालत दमदाटी केली. याबाबतची अदखलपात्र तक्रार दि. 4 रोजी शाहूपुरी पोलिस ठाण्‍यात केली होती. काल विक्रांत दुबळे यांच्या वडिलोपार्जित जागेत खुदाई केल्‍याचे तसेच त्‍याठिकाणी संभाजी वायदंडे, पुष्‍पा वायदंडे, रविंद्र ढोणे हे उभे असल्‍याचे दिसले. वडिलोपार्जित जागेत खुदाई करत जमिनीचे नुकसान केल्‍याची तक्रार काल (शुक्रवारी) विक्रांत दुबळे यांनी शाहुपूरी पोलिस ठाण्‍यात नोंदवली.

यात त्‍यांनी संभाजी वायदंडे, पुष्‍पा वायदंडे यांच्‍याशी संगनमत करत नगरसेवक रविंद्र ढोणे यांनी मी मागासवर्गीय असल्‍याचे माहित असूनही माझ्‍या मालकीच्‍या मोकळ्या जागेत खुदाई करत नुकसान केल्‍याचे नमुद केले आहे. यानुसार रविंद्र ढोणे, संभजी वायदंडे, पुष्‍पा वायदंडे यांच्‍यावर गुन्‍हा नोंदविण्‍यात आला असून तपास अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक आंचल दलाल या करीत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय : कामात गडबड केल्याने बँक कर्मचाऱ्यांची जाऊ शकेल नोकरी

Supreme Court

नवी दिल्ली । देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात म्हटले आहे की,”बँक कर्मचाऱ्याचे पद हे अत्यंत विश्वासार्ह आणि जबाबदार असते. एखाद्या कर्मचाऱ्याने कामात चुकीचे काम केल्यास त्याची नोकरीही काढून घेतली जाऊ शकते.”

न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि न्यायमूर्ती अभय एस ओका यांच्या खंडपीठाने एका प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान बँकेच्या क्लार्कच्या बडतर्फीचा आदेश कायम ठेवला. बँकेत काम करण्यासाठी प्रामाणिकपणा आणि सचोटी या अत्यावश्यक अटी आहेत, असे खंडपीठाने म्हटले आहे. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीकडून झालेली कोणतीही अनियमितता (Irregularity by bank employees) कठोरपणे हाताळली गेली पाहिजे.

सर्वोच्च न्यायालय कठोर झाले
केवळ याच दरम्यान कर्मचारी रिटायर झाल्यामुळे त्याच्या ड्यूटी दरम्यान झालेल्या गैरप्रकारांना माफ करता येणार नाही, असे खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले. आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप लक्षात घेता त्याला कोणतीही सूट मिळू शकत नाही. अशा परिस्थितीत उदारतेचा सल्ला दिला जाऊ शकत नाही.

असे होते संपूर्ण प्रकरण
हे प्रकरण 1973 मध्ये नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याशी संबंधित आहे, ज्याची बँकेत क्लार्क-टायपिस्ट पदावर भरती झाली होती. आपल्या कार्यकाळात, त्याने ड्यूटी दरम्यान गंभीर अनियमितता केली ज्यामुळे त्याला 7 ऑगस्ट 1995 रोजी निलंबित करण्यात आले. 2 मार्च 1996 रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रात तपास अधिकाऱ्यांना त्याच्यावरील आरोप खरे असल्याचे आढळून आले. यानंतर 6 डिसेंबर 2000 रोजी त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानेही अखेर त्याच्या बडतर्फीवर शिक्कामोर्तब केले आहे.

सोलापुरात ‘मुळशी पॅटर्न’ची पुनरावृत्ती; गुंडांकडून ऑन कॅमेरा खंडणी वसुली

बार्शी : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी खंडणीची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन खंडणीखोरांनी एका व्यापाऱ्याला लुटले आहे. या आरोपींनी खडी क्रॅशरवर जाऊन व्यापाऱ्याला धक्काबुक्की करत त्याच्याकडून 50 हजार रुपये रुपये उकळले आहेत. हा सगळा धक्कादायक प्रकार पीडित व्यापाऱ्याच्या जवळच्या एका कर्मचाऱ्याने धाडस करून आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या प्रकरणी पीडित व्यापाऱ्याने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, पीडित व्यापाऱ्याचा खडी क्रॅशरचा व्यवसाय आहे. दोन खंडणीखोरांनी या व्यापाऱ्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी व्यापाऱ्याने खंडणी देण्यास विरोध केला. यानंतर या आरोपींनी या व्यापाऱ्याला धक्काबुक्की केली. आरोपींनी धमकी देत या व्यापाऱ्याकडून 50 हजार रुपये वसूल केले आहेत. तसेच ‘दर महिन्याला 50 हजार रुपये द्यावे लागतील. तू पैसे कसे देत नाही, ते बघून घेतो’ अशी धमकी देखील आरोपींनी दिल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा सगळा प्रकार पीडित व्यापाऱ्याच्या एका कर्मचाऱ्यांनं मोठ्या हिमतीने आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि, आरोपी कशाप्रकारे व्यापाऱ्याला धमकावत आहेत.आरोपींनी यावेळी व्यापाऱ्याच्या कॉलरला पकडून त्यांना धक्काबुक्कीसुद्धा केली आहे. तर अजून एका खंडणीखोराने हातात घातक वस्तू घेऊन मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने या धक्काबुक्कीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी आरोपींने माझ्या पाठीशी चार-पाच पत्रकार आहेत. त्यामुळे तू माझं काही करू शकत नाही, अशी धमकी देखील दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस आरोपींवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

जेजुरी हुल्लडबाजीप्रकरणी पडळकरांवर कारवाई का नाही केली? विक्रम ढोणे यांचा सवाल

पुणेः जेजुरी गडावर वर्षभरापुर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व कार्यकर्त्यांनी घातलेल्या धुडगूस प्रकरणात वर्षभरात पोलिस कारवाई झालेली नाही. त्यामुळे दंगेखोर प्रवृत्तींना बळ मिळत असल्याची भुमिका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मांडली आहे.

संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असा अहिल्यादेवींचा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम १३ फेब्रुवारी २०२१ रोजी जेजुरी देवस्थान ट्रस्टतर्फे नियोजित होता. सायंकाळच्या सत्रात हा कार्यक्रम होण्यापुर्वीच पहाटेच्या वेळेला जेजुरीत येऊन आमदार पडळकरांनी काही भाजप कार्यकर्त्यांसह पुतळ्याच्या ठिकाणी हुल्लडबाजी केली. पडळकर आणि त्यांचे कार्यकर्ते इतके उन्मत्त झाले होते की पुतळ्याभोवतीचा लोखंडी चबुतरा हलत होता. त्यांनी तिथे मारामारी करून कार्यक्रमाला गालबोट लावले.

भाजपच्या नेत्यांना खूश करण्यासाठी पडळकर यांनी खालची पातळी गाठली. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. त्याप्रमाणे पुढे चौकशी करून कारवाई होणे गरजेचे होते. या प्रकरणाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चिथावणी आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे होते, मात्र तशी चौकशी झाली नाही. केलेल्या गुन्ह्याचे सर्व पुरावे उपलब्ध असताना गुन्ह्याचा तपासही झालेला नाही.

पुणे पोलिसांच्या उदासीन भुमिकेमुळे महाराष्ट्रात चुकीचा संदेश गेला आहे. पडळकर यांचे काही सहकारी अनेक ठिकाणी दहशत पसरवत आहेत. त्यांना कायद्याचा धाक बसणे आवश्यक आहे. महत्वाची बाब म्हणजे अहिल्यादेवी यांच्या व्यतीरीक्त अन्य महापुरूषाच्या पुतळ्याच्या ठिकाणी हा प्रकार झाला असता तर पोलिस असेच गप्प बसले असते कां, असा सवाल करत याप्रश्नी आंदोलनाची भुमिका घेणार असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.

गतवर्षीच्या हुल्लडबाजीचे भाजप नेते भुषणसिंह होळकर यांनीही समर्थन केले होते. त्यावेळी त्यांनी पवार घराण्याचा होळकरांच्या संपत्तीवर डोळा आहे, असा आरोप केला होता. त्यासंबंधीची अधिक माहितीही ते जाहीर करणार होते. मात्र वर्षभर झालेतरी त्यांनी अशी माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे त्यांनी अजूनही त्यासंबंधीची माहिती महाराष्ट्रासमोर जाहीर करावी, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

सरकारच्या ‘या’ योजनेअंतर्गत तुम्ही दरमहा 3000 रुपये घेऊ शकाल; कसे ते जाणून घ्या

Business

नवी दिल्ली । केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकीच एक म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मान धन योजना. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी आर्थिक मदत केली जाईल.

या योजनेअंतर्गत सरकार कामगारांना पेन्शनची गॅरेंटी देते. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 2 रुपये वाचवून वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळवू शकता. चला तर मग त्याबद्दल जाणून घेऊयात …

एका महिन्यात 55 रुपये जमा करावे लागतील
ही योजना सुरू केल्यावर, तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच दररोज 2 रुपयांपेक्षा कमी. यामध्ये, 18 व्या वर्षी दररोज सुमारे 2 रुपये वाचवून, तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकेल.

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.

‘या’ कागदपत्रांची आवश्यकता असेल
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँकेचे बचत खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तससह व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करावे लागेल
यासाठी तुम्हांला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये योजनेसाठी रजिस्ट्रेशन करावे लागेल. कामगार CSC केंद्रात पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.

ही माहिती देणे आवश्यक आहे
रजिस्ट्रेशनसाठी, तुम्हांला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असेल. याशिवाय संमतीपत्र द्यावे लागेल जे कामगाराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेतही द्यावे लागेल, जेणेकरून त्याच्या बँक खात्यातून पेन्शनसाठी वेळेत पैसे कापता येतील.

दिग्गज उद्योगपती राहुल बजाज यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  बजाज ग्रुपचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचं आज पुण्यात निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते कर्करोगाने त्रस्त होते. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा होता.

राहुल बजाज हे भारतीय अब्जाधीश आणि प्रसिद्ध उद्योगपती होते. ते बजाज समूहाचे चेअरमन होते. त्यांचा जन्म 10 जून 1938 रोजी झाला होता. 2001 मध्ये त्यांना तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण प्रदान करण्यात आला होता.

राहुल बजाज यांनी हॉवर्ड विद्यापीठातून ‘एमबीए’चेही शिक्षण घेतले. राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले. बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे.

गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पाच दशकांपासून त्यांनी बजाज ऑटोची धुरा यशस्वीरित्या सांभाळली होती. बजाज ऑटोला आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांना महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांच्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती.

साताऱ्यात तरुणांच्या दोन गटांत तुफान राडा

Satara crime

सातारा : हॅलो महाराष्ट्र – साताऱ्यामध्ये दोन गटांमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. साताऱ्यातील करंजे या ठिकाणी हा राडा झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या दोन गटांत झालेल्या हाणामारीत काहीजण जखमीसुद्धा झाले आहेत. सातारा शहरालगत असणाऱ्या करंजे गावामध्ये शुक्रवारी रात्री दोन गटात हि तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत काहीजण जखमी झाल्याचे समोर आले आहे.

या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन गटातील युवक आमने-सामने आले आणि त्यानंतर जोरदार राडा झाला. जवळपास 20 ते 25 युवकांमध्ये हि हाणामारी सुरू होती. यावेळी दोन्ही बाजूने दगडफेकसुद्धा करण्यात आली. या घटनेचा जो विडिओ समोर आला आहे त्यामध्ये काही लोकांच्या हातात धारदार शस्त्रसुद्धा आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

सोलापुरात गुंडांकडून ऑन कॅमेरा खंडणी वसुली
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या ठिकाणी खंडणीची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन खंडणीखोरांनी एका व्यापाऱ्याला लुटले आहे. या आरोपींनी खडी क्रॅशरवर जाऊन व्यापाऱ्याला धक्काबुक्की करत त्याच्याकडून 50 हजार रुपये रुपये उकळले आहेत. हा सगळा धक्कादायक प्रकार पीडित व्यापाऱ्याच्या जवळच्या एका कर्मचाऱ्याने धाडस करून आपल्या मोबाइलमध्ये शूट केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.