Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2813

केंद्राकडून ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या ; सुळेंच्या टीकेला चंद्रकांतदादांचे प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी काल पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारने परप्रांतियांसाठी रेल्वे गाड्या सोडल्याचा पुरावा देत जोरदार टीका केली. त्यांच्या टीकेवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्राने रेल्वे सोडल्या तरी त्या रिकाम्या जातील ही तुमची जबाबदारी होती. ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या. पण लोकांना आत्मविश्वास देऊन त्या रिकाम्या जायला हव्या होत्या,” असे चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले.

चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल काही टीका केली. त्यांना सांगतो कि केंद्राने रेल्वे सोडल्या तरी त्या रिकाम्या जातील ही तुमची जबाबदारी होती. लॉकडाउन झाला तरी लोकांना आम्ही तुमची काळजी करु हा आत्मविश्वास सरकारने लोकांमध्ये निर्माण करायला हवा होता. ट्रेन तुमच्या दबावामुळे सोडण्यात आल्या. पण लोकांना आत्मविश्वास देऊन त्या रिकाम्या जायला हव्या होत्या,” असे पाटील यांनी म्हटले आहे.

काय केली होती सुप्रिया सुळे यांनी टीका

कोरोनाच्या पहिल्या लाटेत श्रमिक रेल्वेगाडय़ा सोडल्याबद्दल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांचे आभार मानले होते. रेल्वेगाडय़ांची व्यवस्था केली असून प्रवाशांची यादी देण्याची विनंती गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली होती. श्रमिक रेल्वेगाडय़ा राज्यांनी नव्हे, केंद्राने सोडल्या होत्या. सर्वाधिक रेल्वेगाडय़ा गुजरातमधून सोडल्या गेल्या, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.

नितेश राणेंची तब्बेत बिघडली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे सध्या अटकेत आहेत. दरम्यान त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव कोल्हापुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना रात्री उलट्या झाल्याने त्यांची आज अचानकपणे तब्बेत बिघडली आहे.

सध्या कोल्हापुरातील रुग्णालयात नितेश राणे यांच्यावर उपचार सुरु आहेत. रुग्णालय परिसरात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे यांच्यामागे कारवाईचा ससेमिरा लागला आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला घडवून आणल्याचा नितेश राणे यांच्यावर आरोप आहे.

नितेश राणेंना मानेचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोल्हापुरातील डॉक्टरांकडून राणेंच्या तपासणी केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना रक्तदाबाचा त्रास झाला होता. दरम्यान त्याची काल रात्री अचानक तब्बेत बिघडली आहे.

शाहुपुरी डीबीची कारवाई : दोन मोटार सायकल चोरांना अटक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोपनिय माहिती प्राप्त करुन त्याव्दारे दोन मोटार सायकल चोरांना ताब्यात घेवून त्यांचेकडुन हिरो प्लेजर व स्पलेंडर प्लस अशा एकुण 32,000/- रुपये किंमतीच्या 02 मोटार सायकली हस्तगत करुन शाहुपूरी व कराड शहर पोलीस ठाणेचे 02 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 07/02/2022 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना सदर पथकास खास बातमीदाराने एका मुलाचे वर्णन सांगुन बातमी दिली की, सोमवार पेठ, सातारा येथे राहणाऱ्या त्या मुलाकडे लाल रंगाची चोरीची प्लेजर मोटार सायकल असुन तो वापरत आहे व तो आता सदरची मोटार सायकल घेवून समर्थ मंदिर परिसरात फिरत आहे. अशी बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेने समर्थ मंदिर परिसरात जावुन सापळा लावला. सायंकाळचे सुमारास मिळाले बातमी प्रमाणे वर्णनाचा मुलगा त्याचे ताब्यातील लाल रंगाची प्लेजर मोटार सायकल घेवून येताना दिसला. सदर इसमांचा संशय आल्याने व तो सोमवार पेठ बाजुकडे जावु लागल्याने त्याचा गुन्हे प्रकटीकरण शाखेने पाठलाग करुन त्यास पकडले तो वापरत असले मोटार सायकल बाबत विचारणा केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. म्हणून त्यास पोलीस ठाणेस आणुन त्याचेकडे कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता त्याने सदरची मोटार सायकल हि तो व त्याचा शनिवार पेठेतील साधिदार असे दोघांनी मिळुन सातारा शहरातील राधिका रोड परिसरातुन चोरुन आणल्याची कबुली दिली.

संशयित आरोपीच्या साथीदाराचा शोध घेत असताना, तो शनिवार पेठेत त्याचे घराचे परिसरात एका मोटार सायकलसह मिळुन आला. त्यास ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता, त्याचेकडे असलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस ही त्या दोघांनी कराड शहरातून चोरुन आणल्याची कबुली दिली. तसेच राधिका रोड येथील मोटार चोरीचे गुन्हयात देखील त्याचा सहभाग असल्याची त्याने कबुली दिली. दोन्ही आरोपींना शाहुपूरी पोलीस ठाणेचे मोटार सायकल चोरीचे गुन्हयात अटक करणेत आली असुन त्यांचेकडुन प्लेजर व स्पलेंडर प्लस अशा चोरीच्या दोन्ही मोटार सायकल जप्त करणेत आलेल्या आहेत. सदर गुन्हयाचा अधिक तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा बोराटे ह्या करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत यादव , गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पो.हेड.कॉ, हसन तडवी, लैलेश फडतरे, पो.ना. अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, महिला पोलीस नाईक सुवर्णा बोराटे यांनी केली आहे.

पोलिसकाकाने स्वतःच्या खिशातून भरला जवानाच्या वाहनाचा दंड !

सोलापूर । अनेकवेळा वाहतूक पोलिसांकडून नागरिकांना अनेक कारणांवरून दंड केला जातो. मात्र, पोलिसांनी कधी स्वतः एखाद्याचा दंड भरला आहे असे ऐकण्यातही किंवा पाहण्यातही आले नसेल. मात्र, असा प्रकार तुळजापूर या ठिकाणी घडला आहे. तुळजापूर मंदिर परिसरातील वाहतूक पोलिस वाहतूकीचे नियमन करत असताना त्यांनी एका जवानाच्या वाहनाला दंड ठोठावला. हा प्रकार त्या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसकाकाच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ स्वतःच्या खिशातून जवानांचा दंड भरला.

याबाबत अधीक माहिती अशी की, तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात वाहतूक पोलिस अनुप गायकवाड आणि जी. आर. माने हे वाहतूक सुरळीत करत होते. यावेळी त्यांनी वाहतूकीला अडथळा आणणाऱ्या संबंधित वाहनचालकांना सूचना देण्यास सुरुवात केली. शिवाय, नियमाप्रमाणे त्यांना दंडही ठोठावला. यावेळी त्या ठिकाणी पाकिस्तानमधून सुखरूप परतलेले जवान चंदू चव्हाण यांच्याही वाहनाला पोलिसांनी दंड ठोठावला.

जवान चंदू चव्हाण यांच्या वाहनालाही दंड ठोठावला असल्याचे समजल्यानंतर संबंधित वाहतूक पोलिसांनी जवान चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी पोलिसांनी त्यांना नियम सर्वांना समान असल्याचे सांगितले. जवानांबद्दल नागरिकांमध्ये आपुलकी आहे, तशीच आमच्यामध्येही आहे. वाहतूकीस अडथळा आणल्यामुळे तुमच्या वाहनालाही दंड ठोठावला पण ते पैसे आम्ही ऑनलाईन स्वरूपात भरला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर त्यांना काही सेंकदातच मोबाईवर पैसे भरल्याचा एसएमएसही आला. यामुळे जवान चंदू चव्हाण हे जवानांवरील प्रेम पाहून भारावून गेले.

यावेळी भारावून गेलेल्या जवान चंदू चव्हाण यांनी संबंधित वाहतूक पोलिसांना त्यांच्या पाकिस्तानमधील अनुभवावर लेखक संतोष धायबर यांनी लिहलेले (पाकिस्तानमधील छळाचे तीन महिने २१ दिवस) हे पुस्तक दिले. संबंधित पुस्तक जवान चंदू चव्हाण यांनी पोलिसकाकांना भेट म्हणून दिले. यावेळी पुस्तकाचे लेखक संतोष धायबर उपस्थित होते.

थरार | तलवारी घेवून शेतात दरोडेखोर अन् पोलिसांचा पाठलाग

खटाव | दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पुसेगाव पोलिसांनी राजापूर फाटा (ता. खटाव) येथे अटक करून त्यांचेकडून चोरीच्या 5 मोटारसायकली, नऊ मोबाईल, दोन तलवारी, व दरोडा टाकण्याचे साहित्य असे मिळून 2 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील काही दिवसापासून वाढत्या मोटारसायकली चोरी, घरफोड्या सत्राचे प्रमाण वाढले होते.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 6/2/2022 रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सपोनि. संदीप शितोळे, सुनील अबदागिरे , वैभव वसव, पुष्कर जाधव, उमेश देशमुख, व आशोक सरक हे पेट्रोलिंग करत असताना, बुध (ता. खटाव) हद्दीत राजापूर फाट्यावर संशयित इसम दिसून आले. त्यांना विचारपूस केली असता, ते उडवाउडवीची उत्तरे देत शेतीकडे पळून जाऊ लागले. त्यांच्यावरील संशय बळावल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलो असल्याचे सांगितले. संशयिताजवळ त्यांचे ताब्यातील 2 पल्सर मोटरसायकल, 2 तलवारी, 5 मोबाइल, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, गजविल पाना असे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून विश्वासात घेऊन विचारपूस केली असता फलटण, पुणे, बारामती, पाटस, भिगवण चोऱ्या केले बाबत सांगितले.

यामध्ये सापडलेले आरोपी, विक्रम तुकाराम आगवणे (वय- 28 रा. निंभोरे ता. फलटण), रवींद्र भरत शिरतोडे (वय- 20 सध्या रा. बोरखळ, मुळगाव निंबोरे ता. जि. सातारा), दीपक शंकर मदने (वय- 19, रा. गुरसाळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), आदित्य लाला जाधव (वय- 20 रा. ठाकुरकी, ता. फलटण), राजेश बापूराव पाटोळे (वय- 19 रा. धर्मपुरी ता. माळशिरस, सोलापूर) यांचेवर पुसेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून,अधिक तपास केला असता, चोरीच्या पाच मोटारसायकली 9 मोबाईल व मुद्देमाल जप्त करण्यात पुसेगाव पोलिसांना यश आले, त्यांना अटक करून पोलिस कस्टडी घेण्यात आलेले आहे. अधिक तपास सपोनि संदीप शितोळे व सहकारी करीत आहेत.

“मदत करा, अन्यथा माजी केंद्रीय मंत्र्यांप्रमाणे तुम्हालाही…”; संजय राऊतांचे नायडूंना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. तसेच या पत्रातून “विरोधकांचा छळ करण्यासाठी केंद्र सरकारकडून सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) वापर केला जात आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक व्हाव्यात यासाठी सरकार पाडण्याच्या हेतूने काही लोकांनी माझी भेट घेतली होती. तसेच महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी मदत करावी, अन्यथा माजी केंद्रीय मंत्र्यांप्रमाणे तुम्हालाही परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी सांगितले असल्याची माहिती राऊतांनी नायडूंना दिली आहे.

संजय राऊत नायडू यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, एक महिन्यापूर्वी काही लोकांनी माझी भेट घेत राज्यातील सरकार पाडण्यासाठी मदत मागितली होती. राज्यात मध्यावधी निवडणुका होतील यासाठी मदत करावी असा त्यांचा हेतू होता. मी नकार दिला अता मला खूप मोठी किंमत मोजावी लागेल, अशी धमकी देण्यात आली. जेलमध्ये राहावे लागलेल्या माजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांप्रमाणे मलाही परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्या लोकांनी माझ्यासोबत कॅबिनेटमधील इतर दोन वरिष्ठ मंत्री आणि याशिवाय इतर दोन मंत्र्यांनाही पीएमएलए अंतर्गत जेलमध्ये टाकणार आहोत अशी धमकी दिली. महत्वाचे नेते जेलमध्ये गेल्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका होतील, असे त्यांचे म्हणणे होते,” असे राऊत यांनी नायडूंना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे.

आजपासून निर्बंधांना ‘बाय-बाय’

Unlock

औरंगाबाद – कोरोनाचा नवा व्हरिएंट ओमायक्रोनचा धोका वाढल्यामुळे केंद्र व राज्य शासनाने गर्दीवर नियंत्रण आणले होते. त्यामुळे हॉटेल्स 50 टक्के टेबल क्षमतेने सुरू ठेवण्यासाठी परवानगी होती. ही बंधने मागे घेत आजपासून जिल्ह्यातील हॉटेल्स च्या वेळा वाढवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मंगळवारी हॉटेल असोसिएशनची बैठक मुंबई झाल्यानंतर जिल्ह्यात पर्यटन वाढीस उद्योगवृद्धी व बेरोजगारी कमी करण्यासाठी हॉटेल्सच्या वेळा रात्री अकरा वाजेपर्यंत वाढवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला.‌ हॉटेल्सच्या वेळा वाढवण्याची मागणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे 26 जानेवारी रोजी केली होती.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले की, अकरा वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी देण्याच्या निर्णयावर स्वाक्षरी झाली. 50 टक्के टेबलवरच फुड सर्विस देण्याचे निर्बंध कायम ठेवले आहेत. वेळ वाढविण्यात आल्या मुळे गर्दी कमीच राहील तसेच अकरा वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्याची परवानगी जरी असली तरी त्यानंतर फक्त अर्धा तास कर्मचारी सोडणे, साफसफाईच्या कामासाठी शिथिल म्हणून ग्राह्य धरला जाईल. त्यानंतर नियमांचे उल्लंघन झाले तर कारवाई केली जाईल.

विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा सुरू! मागील परीक्षेत सव्वालाख विद्यार्थी झालेत नापास

bAMU
bAMU

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने घेतलेल्या मागील ऑनलाइन परीक्षेत तब्बल 1 लाख 27 हजार विद्यार्थी नापास झाल्याची बाब समोर आली आहे. एकीकडे ऑनलाईन परीक्षात विद्यार्थ्यांची प्रचंड गुणवत्ता वाढली आहे, तर दुसरीकडे नापासांची संख्याही भरमसाठ आहे. याबद्दल पालक आणि विद्यार्थी संघटनांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.

विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर 2021 सत्र परीक्षेसाठी प्राप्त आवेदन पत्रांचे अवलोकन केले असता, तब्बल 1 लाख 27 हजार विद्यार्थी राहिलेल्या पेपर साठी परीक्षा देणार असल्याची बाब समोर आली. या संदर्भात परीक्षा विभागाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी सांगितले की, यापैकी काही विद्यार्थी नापास झालेली असून अनेक जणांनी परीक्षा दिली नव्हती त्यामुळे हा आकडा फुगवलेला वाटतो. एरवी ऑफलाइन परीक्षांमध्ये नापासांची प्रमाण 40 टक्के असते तर ऑनलाइन मध्ये हे प्रमाण 25 टक्के असते. त्यामुळे ही आकडेवारी मोठी आहे असे समजणे चुकीचे आहे.

तथापि कालपासून हिवाळी सत्र परीक्षा सुरू झाली आहे. या ऑनलाइन परीक्षेत पहिल्याच दिवशी जवळपास अर्धा तास प्रश्नपत्रिका ओपन होत नसल्यामुळे कला शाखेच्या विद्यार्थ्यांची भंबेरी उडाली. ही बाब विद्यापीठाच्या आयटी समन्वयकांना समजताच त्यांनी तात्काळ विद्यार्थ्यांची अडचण दूर केली.

सोयगाव नगरपंचायतीवर ‘महिलाराज’

औरंगाबाद – सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदासाठी पिठासन अधिकारी संजीव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली. यावेळी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या आशाबी तडवी यांचा, तर उपनगराध्यक्ष पदासाठी सुरेखा काळे यांचे दोघांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने सोयगाव नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या आशाबी तडवी, तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्याच सुरेखा काळे यांची बिनविरोध निवड झाली. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी विरोधी एकही अर्ज प्राप्त न झाल्याने नगराध्यक्ष आशाबी तडवी आणि उपनगराध्यक्ष सुरेखा काळे यांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासन अधिकारी संजीव मोरे यांनी केली.

यावेळी भाजपचे दोन्ही सदस्य सभागृहात गैरहजर होते. सोयगाव नगरपंचायत निवडणुकीसोबत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकहाती बाजी मारल्याने राज्यात सोयगाव नगरपंचायत निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. सोयगावात नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सपाटून पराभवाचा दणका बसला आहे.

सोयगाव नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदी शिवसेनेच्या दोन्ही महिलाच विराजमान झाल्या असून सभागृहात आठ महिला नगरसेविका राहणार असून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष या दोन्ही पदांवर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांनाच बहुमान दिला आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत पिठासन अधिकारी संजीव मोरे, तहसीलदार रमेश जसवंत, मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी आदींनी कामकाज पाहिले.

आता लोखंड आणि पोलाद निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा वापर करण्यासाठी तयार करण्यात येणार रोडमॅप

नवी दिल्ली । लोखंड आणि स्टीलच्या निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याच्या वापराबाबत केंद्र सरकार लवकरच रोडमॅप तयार करणार आहे. केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंह यांनी अधिकाऱ्यांना लोह आणि पोलाद निर्मितीमध्ये प्लास्टिक कचऱ्याचा वापर करण्याच्या शक्यतेवर वेगाने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी महिनाभरात रोडमॅप तयार केला जाईल, असा दावा आरसीपीने केला आहे.

देशात प्लास्टिक कचरा ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. प्लास्टिक कचऱ्याचा वापर आणि विल्हेवाट लावण्याबाबत पर्यावरण तज्ज्ञही केंद्र सरकारला इशारा देत आहेत. प्लास्टिक कचरा ही देशातील मोठी समस्या आहे. अशा परिस्थितीत पोलाद मंत्रालयाने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे.

प्लास्टिक कचऱ्याबाबत असा रोडमॅप तयार करण्यात येणार आहे
पोलाद मंत्रालयाचा असा विश्वास आहे की, जगभरातील अनेक देश प्लास्टिक कचऱ्याच्या प्रभावी वापराचा पर्याय शोधत आहेत. काही देश लोखंड आणि पोलाद उद्योगात याचा वापर करत आहेत. अशा परिस्थितीत भारत सरकारचे पोलाद मंत्री आरसीपी यांनीही पोलाद मंत्रालयाला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रोडमॅप तयार करण्यास सांगितले आहे.

सोमवारी नवी दिल्लीत पोलाद मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आरसीपी सिंग यांनी ही माहिती दिली. या बैठकीत पोलाद मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. बैठकीत ते म्हणाले की,”प्लास्टिक कचऱ्याचा वापर/विल्हेवाट हा पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.”