Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2814

औरंगाबादचे आगामी खासदार चंद्रकांत खैरेच असणार

औरंगाबाद – औरंगाबादचे आगामी खासदार म्हणून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेच असणार असून यापुढील जिल्ह्यात सर्वच निवडणुका माजी खासदार खैरे यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील. जिल्ह्याचे पक्षांच्या धोरणे आणि ध्येयचे निर्णयही तेच घेतील, अशी थेट घोषणा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांमध्ये खळबळ उडाली असल्याच्या चर्चेला वेग घेतला आहे. सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील शिवसेनेचे राजकारण ढवळून निघाल्याचे मंगळवारी पाहावयास मिळाले असून जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीचा सत्तार गटाच्या उमेदवाराचा परभव चांगलाच जिव्हारी लागल्याचे या दरम्यान आढळून आले आहे.

मंगळवारी सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सोयगावात आले होते. निवडीच्या घोषणेनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची थेट पेढेतुला करून जिल्ह्याचा आगामी खासदार चंद्रकांत खैरेच असतील अशी थेट घोषणा करून टाकली. आणि यापुढील निवडणुकांमध्ये पक्षाच्या बाबतीत सर्वच निर्णय माजी खासदार खैरे हे घेवून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्यात येतील असेही उद्गार सत्तार यांनी काढल्याने शिवसेनेत नवीन बदल होतो कि काय अशी राजकीय चर्चा जिल्हाभर सुरु झालेली आहे.

औरंगाबाद जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत झालेल्या सत्तार-भुमरे यांच्या वादाचे हे पडसाद असल्याच्या चर्चेलाही वेग आला होता. या घोषणे सोबतच सत्ता स्थापनेच्या पहिल्याच दिवशी सोयगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच सोयगावात छत्रपतींचा पुतळा उभारण्यात येईल. सोबतच सोयगावला स्वच्छ पाणी तसेच पायाभूत सुविधा व सोयगावच्या सर्वांगीण विकास साधण्यात नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवक कमी पडणार नाही, असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.

2016 मध्ये जारी केलेले सॉव्हरेन गोल्ड बाँडने गुंतवणूकदारांना दिला 85% जबरदस्त रिटर्न

Sovereign Gold Bond

नवी दिल्ली । 2016 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड (SGBs) ने गुंतवणूकदारांना 85% रिटर्न दिला आहे. जानेवारी 2016 मध्ये जारी केलेल्या या बॉड्सची रिडेंप्शन प्राइस आता 4,813 रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्याची इश्यू प्राईस 2,600 रुपये होती. अशाप्रकारे, गुंतवणूकदारांना प्रति युनिट सुमारे 85 टक्के नफा देण्यात आला आहे.

एका प्रसिद्धीपत्रकात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की, 8 फेब्रुवारी 2022 रोजी देय असलेल्या प्री-मॅच्युअर सॉव्हरेन गोल्ड बाँडची रिडेंप्शन प्राइस 31 जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत बंद झालेल्या सोन्याच्या किमतीच्या साध्या सरासरीच्या आधारे निर्धारित केली जाईल. SGBs सरकारी सिक्युरिटीज आहेत, ज्यांचे मूल्य सोन्याच्या संदर्भात आहे. हे खरे तर सोन्याला पर्याय आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मदतीने नोव्हेंबर 2015 मध्ये सॉव्हरेन गोल्ड बॉण्ड पहिल्यांदा जारी करण्यात आले.

8 वर्षात मॅच्युर होते
सॉव्हरेन गोल्ड बॉण्डचा कालावधी आठ वर्षांचा असतो. यामध्ये, पुढील व्याज भरण्याच्या तारखेला पाच वर्षांनी ते रिडीम केले जाऊ शकते. प्री-मॅच्युअर रिडेम्पशनची सुविधा दर सहा महिन्यांनी उपलब्ध आहे. सॉव्हरेन गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणूकदाराला किमान एक ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करावी लागते. कोणतीही व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब जास्तीत जास्त चार किलोपर्यंतचे गोल्ड बॉण्ड खरेदी करू शकतात. तर, ट्रस्ट आणि तत्सम घटकांसाठी जास्तीत जास्त खरेदी मर्यादा 20 किलो आहे.

डिव्हीडंड किंवा ग्रोथ ऑप्‍शन यापैकी तुमच्यासाठी कोणता म्युच्युअल फंड चांगला आहे ‘ते’ जाणून घ्या

Mutual Funds

नवी दिल्ली । म्युच्युअल फंड आजकाल गुंतवणूकदारांसाठी सर्वात वेगाने वाढणारा पर्याय बनत आहे. यामध्ये भरपूर पर्याय असल्याने गुंतवणूकदार इच्छित ध्येयासाठी म्युच्युअल फंड निवडू शकतात. मात्र, त्यांच्यासाठी डिव्हीडंड आणि ग्रोथ या दोन म्युच्युअल फंड पर्यायांपैकी कोणता पर्याय जास्त चांगला असेल, याबाबतीत संदिग्धता कायम आहे.

वास्तविक, डिव्हीडंड म्युच्युअल फंडामध्ये, फंड मॅनेजर्स त्यावरील रिटर्न गुंतवणूकदारांमध्ये निश्चित अंतराने डिलिव्हरी करतो. हे अंतर डेली, मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक असू शकते. याउलट, वाढीच्या पर्यायामध्ये, म्युच्युअल फंडावरील रिटर्न पुन्हा गुंतवला जातो आणि ही प्रक्रिया योजनेतून पैसे काढेपर्यंत चालू राहते. गुंतवणूकदार आपल्या सोयीनुसार आणि गरजेनुसार दोन पर्यायांपैकी एक निवडू शकतात.

डिव्हीडंड म्युच्युअल फंडाचे फायदे आणि तोटे
नावाप्रमाणेच, या ऑप्‍शनमध्ये, गुंतवणूकदाराला निश्चित वेळी डिव्हीडंड दिला जातो. अशा परिस्थितीत त्याच्या हातात सतत पैशांचा ओघ सुरू असतो, मात्र दीर्घकालावधीत त्याच्याकडे मोठा फंड तयार होत नाही. या ऑप्‍शनमुळे तुम्हाला तात्काळ आर्थिक मदत तर मिळते मात्र याद्वारे दीर्घकालीन लक्ष्य गाठता येत नाही.

ग्रोथ ऑप्शनचे फायदे काय आहेत ?
या म्युच्युअल फंड पर्यायांतर्गत मिळालेला रिटर्न पुन्हा गुंतवला जातो. यामध्ये, गुंतवणूकदार जोपर्यंत योजनेतून पैसे काढत नाही तोपर्यंत त्याला व्याज दिले जात नाही. मात्र, रिटर्नची पुनर्गुंतवणूक केल्याने दीर्घकालावधीत मोठा फंड तयार होतो आणि चक्रवाढ व्याजामुळे एकूण रिटर्न मध्येही भर पडते.

कोणता ऑप्‍शन कोणासाठी चांगला आहे ?
तुमच्याकडे कमाईचे कोणतेही साधन नसेल किंवा निश्चित उत्पन्न मिळत नसेल, तर तुम्ही डिव्हीडंड ऑप्‍शन निवडावा. रिटायर्ड व्यक्ती ज्याला दैनंदिन खर्चासाठी पैशांची गरज असते त्यांनीही डिव्हीडंडऑप्‍शन निवडला पाहिजे. याउलट, जर तुमच्याकडे दीर्घकालीन ध्येय पूर्ण करायचे असेल आणि तुम्ही तरुण किंवा अविवाहित असाल तर ग्रोथ ऑप्‍शन हा उत्तम पर्याय असेल.

दोन्ही पर्यायांवर टॅक्स कसा द्यावा लागतो ?
तुम्हाला डिव्हीडंड ऑप्‍शन निवडून मिळणाऱ्या रिटर्नवर तुम्हाला Dividend Distribution Tax (DDT) भरावा लागेल. अशा परिस्थितीत, जे गुंतवणूकदार 20 किंवा 30 टक्क्यांच्या हाय टॅक्स ब्रॅकेटमध्ये येतात, त्यांच्यासाठी हा पर्याय फायदेशीर ठरेल कारण DDT त्यांच्या स्लॅबपेक्षा कमी आहे. याउलट, ग्रोथ ऑप्‍शन निवडणाऱ्या गुंतवणूकदारांना 12 महिन्यांपूर्वी इक्विटी फंडातून काढलेल्या रकमेवर 15 टक्के शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स आणि त्यानंतर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावर 10 टक्के लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल. जर हा डेट फंड असेल तर 36 महिन्यांपूर्वी पैसे काढल्यास स्लॅबनुसार टॅक्स आकारला जाईल. त्यानंतर, पैसे काढल्यास 20 टक्के दराने लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल.

चांगला नफा मिळवण्यासाठी FD करण्यापूर्वी समजून घ्या ‘या’ 4 गोष्टी

FD

नवी दिल्ली । फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD हा बऱ्याच काळापासून सर्वात पसंतीचा गुंतवणूकीचा पर्याय मानला जात आहे. साधारणपणे, लोकं घर बांधणे, कार खरेदी करणे, लग्न आणि उच्च शिक्षण यासारखी आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी FD मध्ये गुंतवणूक करतात. याशिवाय रिटायरमेंटनंतरच्या खर्चासाठी FD मध्ये गुंतवणूक करणेही चांगले मानले जाते. मात्र, FD खाते उघडण्यापूर्वी, गुंतवणूकदारांनी ‘या’ 4 गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जेणेकरून आपली आर्थिक उद्दिष्टे सहज साध्य करता येतील.

किती कालावधीसाठी FD करावी लागेल ?
FD मिळवण्यापूर्वी, तुम्हाला कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे, कारण जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी तुमची FD बंद केली तर काही रक्कम दंडाच्या स्वरूपात भरावी लागेल. यासोबतच तुम्हाला FD वर मिळणारा नफाही कमी होतो. त्यामुळे पहिले तुम्ही तुमच्या FD चे पैसे किती काळ सोडू शकता ते ठरवा.

FD टर्म कालावधी
तुम्ही तुमच्या गरजेनुसार FD करू शकता. जर तुमच्याकडे आता गरजेपेक्षा जास्त पैसे असतील आणि तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्हाला 5 किंवा 10 वर्षांनी या पैशांची गरज असेल, तर तुम्ही त्याच वेळेसाठी FD मिळवू शकता. साहजिकच, 10 वर्षांच्या FD वरील रिटर्न हे एक वर्षाच्या FD पेक्षा खूप जास्त असेल. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार FD चा कालावधी निवडू शकता.

FD वर मिळणाऱ्या व्याजावर एक नजर टाका
रिटर्न मिळवण्यात हा सर्वात मोठा घटक आहे, ज्यावर प्रत्येकजण लक्ष ठेवतो. RBI वेळोवेळी व्याजदर बदलत असते. तसेच, FD चे व्याजदर देखील वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे असतात. एवढेच नाही तर FD वर सर्व बँकांचे व्याजदर देखील वेगवेगळे असू शकतात. अशा परिस्थितीत, FD करताना, तुम्हाला विशेषतः हे लक्षात ठेवावे लागेल की, कोणत्या बँकेतून आणि किती काळासाठी FD वर जास्त फायदा मिळेल.

कर्जाची सुविधा आहे की नाही
जरी FD असलेली बहुतेक लोकं त्यावर कर्ज घेण्याचा विचार करत नाहीत, मात्र जेव्हा पैशाची गरज भासते तेव्हा इतर पर्यायांपेक्षा त्यावर कर्ज घेणे सोपे आणि फायदेशीर होईल. या अंतर्गत, FD च्या एकूण रकमेच्या 75% पर्यंत कर्ज घेता येते आणि FD च्या व्याजदरापेक्षा 2% जास्त दराने त्यावर व्याज द्यावे लागेल. या कर्जाची मुदत FD च्या कालावधीइतकीच आहे. त्यामुळे, जर तुम्ही 10 वर्षांची FD घेतली आणि दुसऱ्या वर्षी कर्जासाठी अर्ज केला, तर तुमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी आठ वर्षे असतील.

वारकऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात झालेल्या भीषण अपघातात 2 ठार तर 5 जण गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी ।  प्रथमेश गोंधळे

रस्त्यावरून चालत जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवताना भरधाव कारवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात कारमधील दोघे ठार झाले तर पादचारी वारकऱ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात रत्नागिरी- नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ आज सकाळी झाला. अपघातातील मृत हे सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावचे असून ते बीडमधील नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनासाठी निघाले होते. या अपघातात पृथ्वीराज दौलतराव चव्हाण आणि पत्नी प्रियांका पृथ्वीराज चव्हाण असे ठार झालेल्यांची नावे आहेत तर विलास महादेव माने, अनिता विलास माने, विजया विवेके चव्हाण आणि विवेक बुधाजी चव्हाण असे अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील चव्हाण आणि माने कुटुंबीय मिळून असे सहाजण कारमधून बीडमधील नातेवाईकांच्या रक्षाविसर्जनासाठी पहाटेच्या सुमारास फॉर्च्युनर कार (क्र. के. ए. २३ एम ७०७४) मधून निघाले होते. रत्नागिरी- नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावाजवळ पोहोचताच एक वारकरी रस्ता ओलांडत होता. अचानक समोर आलेल्या वारकऱ्याला वाचवण्याच्या नादात चालकाचा भरधाव कारवरील ताबा सुटला. त्यानंतर कार उलटून झालेल्या भीषण अपघातात कारमधील पृथ्वीराज चव्हाण आणि प्रियांका चव्हाण दोघे पति-पत्नी जागीच ठार झाले, तर पादचारी वारकऱ्यासह पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव कार महामार्गावरील दुभाजकाला धडकल्यानंतर पाच वेळा पलटली. यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

या भीषण अपघातानंतर पोलिस आणि परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी कवठेमंकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींमध्ये विलास माने, अनिता माने, विजया चव्हाण, विवेक चव्हाण यांचा समावेश आहे. या अपघातानंतर कसबेडिग्रज गावावर शोककळा पसरली होती. अपघातात गाडीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे काम सुरु असल्याने ठिकठिकाणी रस्ते अरुंद आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने या रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत.

जर तुमचेही ‘या’ बँकेत खाते असेल तर 5 मार्चपासून लागू होणार ‘हा’ नियम समजून घ्या

Share Market

नवी दिल्ली । जर तुमचेही खाते इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. जर तुम्हीही या पोस्ट ऑफिस बँकेत बचत खाते उघडले असेल तर एक नवीन नियम 5 मार्च 2022 पासून लागू होणार आहे. म्हणून, IPPB ने डिजिटल बचत खाते बंद करण्याचे शुल्क लागू केले आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) ने याबाबत नोटीस जारी केली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक हा इंडिया पोस्टचा एक विभाग आहे, जो पोस्ट विभागाच्या मालकीचा आहे.

5 मार्चपासून नवीन नियम लागू होणार आहेत
या नोटीसमध्ये असे म्हटले गेले आहे की, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने डिजिटल बचत बँक खाते बंद करण्याचे शुल्क लागू केले आहे. हे शुल्क 150 रुपये + GST ​​असेल. बँकेने पुढे सांगितले की, केवायसी अपडेट न केल्यामुळे डिजिटल बचत बँक खाते 1 वर्षाच्या शेवटी बंद झाले तरच हे शुल्क लागू होईल.

डिजिटल बचत बँक खाते
18 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती ज्याच्याकडे आधार आणि पॅन कार्ड आहे ते डिजिटल बचत बँक खाते उघडू शकते. यामध्ये मंथली ऍव्हरेज बॅलन्स ठेवण्याची गरज नाही. हे खाते झिरो बॅलन्स ठेवूनही उघडता येते. 1 फेब्रुवारी 2022 पासून या खात्यावरील व्याजदर 2.25 टक्के आहे.

व्याजदरात कपात
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने 1 फेब्रुवारीपासून व्याजदरात 25 बेसिस पॉइंट्सपर्यंत कपात केली आहे. यापूर्वी बँकेकडून ग्राहकांना 2.75 टक्के दराने व्याज दिले जात होते, मात्र 1 फेब्रुवारीपासून ग्राहकांना 2.5 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

तुम्हाला किती व्याज मिळेल ते जाणून घ्या
बँकेने बचत बँक खात्यांवरील 1 लाख ते 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजदरात कपात केली आहे. याआधी ग्राहकांना 1 लाख रुपयांपर्यंतच्या बँक खात्यांवर 2.50 टक्के दराने व्याज मिळत होते, मात्र 1 फेब्रुवारीपासून या ग्राहकांना 2.25 टक्के दराने व्याज मिळणार आहे.

मसाल्यांच्या वाढत्या किंमतीने खाद्यपदार्थांची चवच बिघडली, एका महिन्यात भाव कितीने वाढले जाणून घ्या

Business Idea

नवी दिल्ली । वाढत्या महागाईमुळे आपल्या स्वयंपाकघराचे बजट आधीच विस्कळीत झाले आहे. अशातच मोहरी, रिफाइंडसह खाद्यतेल गेल्या वर्षभरापासून महागले असून आता मसाल्यांच्या वाढत्या महागाईने खाद्यपदार्थांची चवच बिघडली आहे. यावर्षी आतापर्यंत हळद, जिरे, धणे या प्रमुख मसाल्यांच्या किंमती 25 टक्क्यांहून जास्तीने वाढल्या आहेत.

केडिया एडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की, वर्षभरापूर्वीच्या तुलनेत या मसाल्यांच्या किंमतीत सुमारे 71 टक्के वाढ झाली आहे. 2022 च्या पहिल्या महिन्यात त्यांच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 15 जानेवारीनंतर तुरीचा पुरवठाही सुरू झाला, मात्र त्याची किंमत कमी होण्याऐवजी 5 टक्क्यांनी वाढली. यावर्षी आतापर्यंत जिरे 25 टक्क्यांहून जास्त तर कोथिंबीरीत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कोथिंबिरीत सर्वाधिक 70.82 टक्के वाढ झाली आहे
एका वर्षातील भावावर नजर टाकली तर दरांमध्ये सर्वात मोठी उडी कोथिंबिरीच्या भावात आली आहे. 7 फेब्रुवारी रोजी कोथिंबिरीचा प्रति क्विंटल भाव 10,814 रुपये होता, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 70.82 टक्क्यांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे 7 फेब्रुवारी रोजी जिऱ्याचा प्रतिक्विंटल भाव 20,370 रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 54.60 टक्के जास्त आहे. हळदीचा भावही गतवर्षीच्या तुलनेत 41.54 टक्क्यांनी वाढून 10,070 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.

2022 मध्ये मसाल्यांच्या किंमतीत दिलासा मिळण्याची आशा नाही
अजय केडिया सांगतात की,” मार्चपासून जिरे आणि कोथिंबिरीची डिलिव्हरी वाढणार आहे, त्यानंतर काही काळ दिलासा मिळू शकेल. मात्र, 2022 मध्ये मसाल्यांच्या किंमतींमध्ये फारसा दिलासा मिळण्याची अपेक्षा नाही. पुढील सहा महिन्यांत हळद 12,500 रुपये प्रति क्विंटल आणि जिरे 25 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचू शकतात. कोथिंबीरही 18,000 रुपयांच्या पातळीवर पोहोचेल आणि ती सर्वात वेगाने वाढेल. अशाप्रकारे पाहिल्यास या मसाल्यांच्या किंमतीत 24 ते 66 टक्क्यांनी जोरदार वाढ होऊ शकते.”

Share Market : दिवसभर चढउतार होऊन शेअर बाजार ग्रीन मार्कवर बंद

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजारात मंगळवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 57,799 वर उघडला आणि तो 800 अंकांच्या घसरणीसह बंद होईपर्यंत 800 हून जास्त अंकांनी सावरला. निफ्टी 50 मध्येही काहीसे असेच दिसून आले. सकाळी जेवढी घसरण झाली तेवढी संध्याकाळपर्यंत चढली. आजचा बाजार श्वास रोखून धरणाऱ्या रोमांचक क्रिकेट सामन्यापेक्षा कमी नव्हता.

आज निफ्टी 53.20 अंकांच्या किंवा 0.31 टक्क्यांच्या उसळीसह 17266.80 च्या पातळीवर बंद झाला तर BSE सेन्सेक्स 187.39 अंकांच्या किंवा 0.33 टक्क्यांच्या वाढीसह 57808.58 वर बंद झाला. बँक निफ्टी 38028.40 वर बंद झाला. त्यामध्ये 32.95 अंकांची वाढ झाली.

वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल बोलायचे झाल्यास, मेटल आणि PSU बँकांमध्ये अनुक्रमे 0.80% आणि 0.82% ची सर्वाधिक वाढ झाली आहे. एनर्जी, रिएलिटी आणि आयटी सेक्टर्स रेड मार्कमध्ये बंद झाले. यामध्ये अनुक्रमे 1.31%, 0.84% ​​आणि 0.29% ची घट नोंदवली गेली.

शेअर बाजारात खळबळ उडाली आहे
सकाळी 9:35 वाजता BSE सेन्सेक्स 57,905 वर ट्रेड करत होता. यानंतर तो 11 वाजता 57,058 वर आला. म्हणजे 2 तासांपेक्षा कमी कालावधीत 800 पेक्षा जास्त पॉइंट्सची घसरण झाली. यावरून निर्देशांकाने रिकव्हरी सुरू केली आणि पुढच्या 2 तासात सकाळी 12.45 पर्यंत पुन्हा 57,820 च्या पातळीवर पोहोचला. याचा अर्थ, सुमारे 800 गुणांची वाढ 2 तासांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण झाली. यानंतरही अशीच अस्थिरता कायम राहिली.

निफ्टी 50 चे टॉप 5 गेनर्स
1. Tata Steel : क्लोजिंग प्राइस 1,219.60, वाढ 3.09%
2. Divis Labs : क्लोजिंग प्राइस 4,277.55, वाढ 1.81%
3. Bajaj Finance : क्लोजिंग प्राइस 7,055.00, वाढ 1.79%
4. Bajaj Finserv : क्लोजिंग प्राइस 15,989.15, वाढ 1.77%
5. Reliance : क्लोजिंग प्राइस 2,356.05, वाढ 1.68%

निफ्टी 50 चे टॉप 5 लुझर्स
1. ONGC : क्लोजिंग प्राइस 166.95, घसरण -2.99%
2. Power Grid Corp : क्लोजिंग प्राइस 210.05, घसरण -1.68%
3. IOC : क्लोजिंग प्राइस 121.35, घसरण -1.26%
4. SBI Life Insura : क्लोजिंग प्राइस 1,131.15, घसरण -1.12%
5. TATA Consumer Products : क्लोजिंग प्राइस 697.10, घसरण -1.09%

Cryptocurrency Price : शिबा इनूमध्ये झाली वाढ, एका आठवड्यात 53% पेक्षा जास्त रिटर्न

Online fraud

नवी दिल्ली । मंगळवार, 8 फेब्रुवारी 2022 रोजी, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये देखील लक्षणीय वाढ झाली. 1:45 pm पर्यंत, जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅप कालच्या $1.96 ट्रिलियनच्या तुलनेत 3.99% ने वाढून $2.04 ट्रिलियन झाली. काल प्रमाणेच, शिबा इनू (SHIB) आजही सर्वाधिक वाढ होणाऱ्या क्रिप्टोकरन्सीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर XRP आणि Litecoin मध्येही बरीच वाढ पाहायला मिळाली.

मंगळवारी बातमी लिहिपर्यंत, सर्वात मोठी करन्सी असलेल्या Bitcoin ने 4.05% ची वाढ नोंदवली. ही करन्सी $44,429.12 वर ट्रेड करत होती. जर आपण एका आठवड्याबद्दल बोललो तर त्यात 15.34% ची जबरदस्त वाढ झाली आहे. त्याच वेळी, Ethereum गेल्या 24 तासांमध्ये 2.16% आणि 14.62% च्या साप्ताहिक वाढीसह $3,145.36 वर ट्रेड करत होता. Bitcoin चे मार्केट वर्चस्व 41.6 टक्के आहे तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 18.6 टक्के आहे.

गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढ झालेल्या प्रमुख करन्सीबद्दल बोलायचे झाले तर शिबा इनूमध्ये 18.70% ची वाढ झाली आहे. ही करन्सी $0.00003319 वर ट्रेड करत होती. XRP 17.37% टक्क्यांनी वाढून $0.8835 वर, Litecoin 7.63 टक्क्यांनी वाढून $ 138.02 वर तर Dogecoin 5.53% टक्क्यांनी वाढून $0.1654 वर ट्रेडिंग करत आहे.

शिबा इनूमध्ये एका आठवड्यात 53.09% वाढ झाली
शिबा इनू या अत्यंत स्वस्त करन्सीने आठवडाभरात जबरदस्त झेप घेतली आहे. एका आठवड्यात ही करन्सी 53% वाढली आहे. म्हणजे एका आठवड्यापूर्वी जर एखाद्याने शिबा इनूमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आतापर्यंत त्याचे पैसे 1 लाख 50 हजार रुपये झाले असतील. त्याला 50,000 रुपयांपेक्षा जास्त निव्वळ नफा झाला असेल.

24 तासांत सर्वाधिक वाढ झालेली करन्सी
गेल्या 24 तासांत सर्वाधिक वाढणाऱ्या करन्सीमध्ये एका चलनात 2 हजार टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. त्याचे नाव SWAK आहे. मंगळवारी बातमी लिहिपर्यंत, SWAK मध्ये 2122.55% ची जबरदस्त वाढ झाली होती. MetaPay ने 707.66% आणि WEB3Land (WEB3) ने 286.56% ची वाढ पाहिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची पेन्शन वाढणार, किती वाढ होणार हे समजून घ्या

SIP

नवी दिल्ली । कर्मचाऱ्यांच्या किमान पेन्शनमध्ये लवकरच मोठी वाढ होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये (EPS) वाढ होऊ शकते. आत्तापर्यंत, पेन्शनची गणना करण्यासाठी बेसिक सॅलरी निश्चित केली जाते, जी किमान मंथली बेसिक सॅलरी 15,000 रुपये आहे.

वास्तविक, एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 15,000 रुपयांपेक्षा जास्त असली तरी, पेन्शनची गणना केवळ 15,000 रुपयांवर केली जाते. हा अडथळा दूर झाला तर पेन्शन निश्चितीचे गणितही बदलेल. म्हणजेच, जर एखाद्याची बेसिक सॅलरी 20,000 रुपये असेल आणि त्यावर पेन्शन काढली तर किमान पेन्शन सुमारे 1,000 रुपयांनी वाढेल आणि ते 8,571 रुपयांपर्यंत पोहोचेल.

पेन्शनचे गणित अशा प्रकारे समजून घ्या
तुमची बेसिक सॅलरी 15,000 रुपयांपेक्षा जास्त असली तरीही पगारावरील पीएफ केवळ 15,000 रुपये मोजला जाईल. म्हणजेच, जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 40,000 रुपये असेल आणि त्याला त्याची पेन्शन 40,000 एवढीच मोजायची असेल तर तो करू शकत नाही, कारण सध्याच्या कायद्यात त्याला त्याची परवानगी नाही. सुप्रीम कोर्टाने पगाराची ही मर्यादा हटवली तर कर्मचाऱ्यांना कितीतरी पट जास्त पेन्शन मिळेल.

असे आहे संपूर्ण प्रकरण आहे
केंद्र सरकारने 1 सप्टेंबर 2014 रोजी अधिसूचनेद्वारे कर्मचारी पेन्शन संशोधन योजना लागू केली होती. याला खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता. यावर EPFO ने सर्वोच्च न्यायालयात SLP दाखल केली. 1 एप्रिल 2019 रोजी, EPFO ​​च्या SLP वर सुनावणी करताना, सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की पेन्शनसाठी 15 हजार रुपये सॅलरी निश्चित करण्याचे कोणतेही औचित्य नाही. 17 ऑगस्टपासून या प्रकरणावर सातत्याने सुनावणी सुरू असून यावर अद्याप निर्णय येणे बाकी आहे.

तुमची पेन्शन वाढू शकते
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार (बेसिक सॅलरी +DA) 20 हजार रुपये आहे. बदललेल्या पेन्शनच्या फॉर्म्युल्यानुसार, त्यांची पेन्शन 7,500 रुपयांवरून 8,571 रुपये होईल. तुम्ही सूत्र = मंथली पेन्शन = (पेन्शनपात्र सॅलरी x EPS योगदान) या सूत्रासह EPS गणना तपासू शकता. अशा प्रकारे, पेन्शनमध्ये थेट 300% वाढ होऊ शकते.