Sunday, December 21, 2025
Home Blog Page 2812

शाब्बास रे पठ्ठ्या ! आठ लाख मुलांच्यातून गोटेवाडीच्या पंकज आमलेची बाजी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

लहरों से डर कर नौका पार नही होती… कोशिश करने वालों की कभी हार नही होती, असं म्हटलं जातं. परंतु प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अनंत अडचणींचा सामना करत एखादं यश मिळतं. त्याला ते तावून-सुलाखून मिळाल्या सारखं असतं गोटेवाडीच्या पंकज आमले यांनी पहिल्याच प्रयत्नात सेंट्रल पोलीस उपनिरीक्षकपदी बाजी मारली आहे.

पंकजने नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही चांगला अभ्यास करून वर्गातील प्रथम क्रमांक सोडला नाही. पैशाअभावी इंजिनीअरिंगचा प्रवेश नाकारून बीएला प्रवेश घेऊन प्रसंगी वर्कशॉपमध्ये हेल्पर, कुरियरचे काम करत डबल ग्रॅज्युएशन केले. कोरोनावर मात करत तीन वर्ष एमआर म्हणून काम करून घरच्यांना हातभार लावला. त्यानंतर पहिल्याच प्रयत्नात सीआयएसएफमध्ये सेंट्रल पोलीस उपनिरीक्षकपदी बाजी मारली.

आर्थिक तांत्रिक या सर्वच अडचणींचा सामना पंकजला करावा लागला. सत्याला सिद्ध करण्यासाठी प्रसंगी झगडावं लागलं. लॉकडाऊनमध्ये सराव करण्यासाठी मैदान उपलब्ध नव्हते. तेव्हा आगाशिव डोंगर, कासेगाव, बेलवडे या ठिकाणी जाऊन सात महिने सराव करून सोळाशे मीटर रनिंगमध्ये पहिला आला. मुख्य परीक्षेला जाताना प्रचंड पावसामुळे गाड्या बंद होत्या. चार किलोमीटर गुडघाभर पाण्यातून चालत जाऊन मिळेल, त्या गाडीने मुंबई गाठली आणि 200 पैकी 185 गुण मिळवून देशात गुणवत्ता यादीत आला.

या त्याच्या यशात आई-वडील, बहीण यांचा खूपच मोठा हातभार आहे. वडिलांनी माथाडी कामगार म्हणून तर आई -बहिणीने काम करून त्याला हातभार लावला. आईने पुस्तकासाठी दागिने मोडले अशा परिस्थितीतून आई-वडिलांच्या कष्टाचे सार्थक करण्याची जिद्द मनात घेऊन पंकज आमले यांनी सेंट्रल पोलीस उपनिरीक्षक पदी झेप घेतली आहे. तब्बल 8 लाख 623 मुलांमधून पंकजची झालेली निवड ही कराड तालुकाच नव्हे तर सातारा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र; उपोषणाचा दिला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णयराज्य सरकारने नुकताच घेतला. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. तसेच 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की,
राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे लहान मुले तरुण व्यसनाधीन होऊ शकतो.

युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे हेही आश्वचर्यकारक आहे. गेल्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून वाईन विक्रीच्या निर्णयाला कडाडून विरोध होत आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे संघटन आहे.

त्या सर्व कार्यकर्त्यांनी आपणाकडे निवेदन पाठवून जाहीर विरोध दर्शविलेला आहे. या सर्वांची या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन करण्याची तयारी आहे. तरीही सरकारला जाग येत नसेल तर आंदोलनाशिवाय पर्याय दिसत नाही, असे अण्णा हजारे यांनी पत्रातून म्हंटले आहे.

आता फाटलेल्या नोटा बँकेत सहजपणे बदलता येणार, त्यासाठीचे नियम जाणून घ्या

torn note

नवी दिल्ली । एटीएममधून पैसे काढताना अनेक वेळा फाटलेल्या, खराब झालेल्या जुन्या नोटा बाहेर येतात. एटीएमशिवाय ट्रान्सझॅक्शन दरम्यानही अशा नोटा मिळू शकतात. या फाटलेल्या नोटांचा काही उपयोग नाही आणि त्याद्वारे तुम्ही कोणाला पैसेही देऊ शकत नाही. एटीएममधून फाटलेल्या नोटा बाहेर आल्या असतील तर त्या बदलण्याचा पर्यायही आपल्याकडे नाही. मात्र, त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही.

ही फाटलेली नोट कोणत्याही बँकेत जाऊन बदलता येईल असा अधिकार RBI आपल्याला देते. विशेष बाब म्हणजे बँका या नोटा बदलून घेण्यास नकार देऊ शकत नाहीत. RBI च्या नियमांनुसार, जर एखाद्या बँकेने तुमच्या फाटलेल्या नोटा बदलून देण्यास नकार दिला तर त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते.

फाटलेल्या नोटा बदलण्यापूर्वी त्यासाठीच्या काही अटी जाणून घ्या
अशा नोटा बदलून देण्यासाठी RBI ने काही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. फाटलेल्या चलनी नोटा देशातील कोणत्याही बँकेत बदलता येतात. मात्र, यासाठी काही अटी आहेत. नोट जितकी वाईट स्थितीत असेल तितकी तिची किंमत कमी होईल. तुमच्याकडे 5, 10, 20, 50 सारख्या कमी मूल्याच्या चलनी नोटा फाटलेल्या अवस्थेत असतील तर त्यातील किमान 50 टक्के भाग तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. असे असेल तरच तुम्हाला त्या चलनी नोटेचे संपूर्ण मूल्य मिळेल. तुमचा हिस्सा 50 % पेक्षा कमी असल्यास तुम्हाला काहीही मिळणार नाही.

ट्रान्सझॅक्शन चार्ज भरावा लागेल
नियमांनुसार, जर तुमच्याकडे 20 पेक्षा जास्त फाटलेल्या नोटा असतील आणि त्यांची एकूण किंमत 5,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्या बदलण्यासाठी तुम्हाला ट्रान्सझॅक्शन चार्ज भरावा लागेल. नोट बदलण्यासाठी जाण्यापूर्वी, त्यावर गांधीजींचे वॉटरमार्क, गव्हर्नरचे चिन्ह आणि सीरियल नंबर यांसारखे सिक्योरिटी सिंबल्‍स दिसत आहेत का हे जरूर पहा. जर तुमच्याजवळ फाटलेल्या जाळ्यात ही सर्व सिंबल्‍स असतील तर बँकेला चलनी नोट बदलून द्यावीच लागेल.

अनेक तुकडे झाल्यावरही बदलण्याची सुविधा
RBI ने अनेक तुकड्यांमध्ये विभागलेल्या चलनी नोटा बदलण्याचे नियमही बनवले आहेत. त्या बदलून नवीन नोटा मिळण्याच्या प्रक्रियेला थोडा वेळ लागू शकतो. यासाठी तुम्हाला या नोटा RBI च्या शाखेत पोस्टाद्वारे पाठवाव्या लागतील. यामध्ये तुम्हाला तुमचा खाते क्रमांक, शाखेचे नाव, IFSC कोड, नोटची किंमत याविषयी माहिती द्यावी लागेल.

RBI फाटलेल्या नोटांऐवजी नवीन चलन छापले जाते
वास्तविक, RBI तुमच्याकडून काढलेल्या फाटलेल्या चलनी नोटा चलनातून काढून टाकते. त्याऐवजी नवीन नोटा छापल्या जातात. यापूर्वी या फाटलेल्या नोटा जाळण्यात येत होत्या. मात्र, आता ते लहान तुकड्यांमध्ये विभागून त्याचा पुनर्वापर केला जातो. या नोटांपासून कागदी वस्तूही तयार करून बाजारात विकल्या जातात.

“राज्यसभेच्या सदस्याची उंची कशी नसावी याचं हे एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राऊत”; मुनगंटीवारांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत भाजपा नेत्यांना जाहीर इशारा दिला. त्यांच्या इशाऱ्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला असून राऊतांवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रातील जनता राऊत यांना गांभीर्याने घेत नाही. त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहिती नाहीत. ज्या पद्धतीने ते भाष्य करतात त्यामुळे ते राज्यसभेचा गौरव वाढवत नाहीत. राज्यसभेच्या सदस्याची उंची कशी नसावी याचं हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे,” अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.

सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राऊत यांनी म्हंटले आहे की, “आम्ही जेलमध्ये गेल्यास तुम्हालाही टाकू” राऊत यांनी म्हंटलेले हे वाक्यच घटनेच्या चौकटीत गांभीर्याने घेतले पाहिजे. याचा अर्थ आम्ही चुका करतो, तुम्ही दुर्लक्ष करा आम्ही करतो, असा होतो.

देशाच्या स्वातंत्र्याचा मंगलकलश हा गुंडाराजसाठी दिला आहे का? उद्या कोणीही कोणत्या पक्षाचा चुकत असेल तर आमची चौकशी थांबवा आम्ही तुमची करणार नाही ही वाटाघाडी जनतेला कशी पटेल? एकमेकांच्या चुका पोटात घालायच्या आहेत का?,” असा उलट सवाल यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांना केला आहे.

शिवसेनेचा जो दबदबा आता राहिलेला नाही – मुनगंटीवार

यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले की, शिवसेनेचा जो यापूर्वी दबदबा होता, तो आता राहिलेला नाही. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण म्हणणारी शिवेसना आता 100 टक्के राजकारणात गेली आहे. बाळासाहेबांची शिवसेना संपवण्यासाठीची ही पत्रकार परिषद होती,” असंही सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकला

Exam

औरंगाबाद – कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा चालू-बंदचा खेळ सुरु आहे. या काळात तांत्रिक अडचणींमुळे बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पाहिजे तेवढा वेळ मिळालेला नाही. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत विभागीय मंडळाचे सचिव यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, कोरोनामुळे 2021-22 मध्ये शाळा, कॉलेज बंद होते. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांनी ऑनलाईन सत्र सुरु केले असले तरी, ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे शिक्षण घेता आले नाही. मध्यंतरीच्या काळात शाळा, कॉलेज खुली करण्यात आली. त्यावेळी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळा, शिक्षकांमध्ये स्पर्धा चालल्याचे चित्र होते. त्यामुळे काहीच समजले नसल्याचा विद्यार्थ्यांचा सूर आहे.

दरम्यानच्या काळात सुरु करण्यात आलेल्या शाळा ओमिक्रॉनमुळे पुन्हा बंद करुन ऑनलाईन सुरु झाल्या. या ऑनलाईन-ऑफलाईनच्या खेळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यातच बोर्डाने आता दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे जाहीर केले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी शैक्षणिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत. परीक्षांसाठी पुरेसा वेळ अभ्यासासाठी मिळाल्या नसल्यामुळे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे विभागीय मंडळाला निवेदन दिले आहे.

प्रमुख मागण्या –
– दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यांपर्यंत पुढे ढकलाव्यात,
– जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये समजला नाही,
– त्यासाठी प्रत्यक्ष अधिकचे तास घेवून पूर्ण करुन घ्यावा
– विद्यार्थी हितासाठी शाळा, कॉलेजमध्ये समुपदेशकांची नेमणूक करा

संपामुळे ‘या’ दिवशी खासगी आणि सरकारी बँका राहणार बंद

Bank Strike

नवी दिल्ली । वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये बँकांना 12 दिवस सुट्ट्या असतील. फेब्रुवारीच्या या सुट्ट्यांमध्ये दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवारच्या सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर या महिन्यात दोन दिवस संपामुळे बँकेच्या शाखेत कोणतेही कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बँकेने (RBI) जारी केलेल्या सुट्ट्यांच्या लिस्ट नुसार, फेब्रुवारी महिन्यात बँका आता 9 दिवस बंद राहणार आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी संपूर्ण भारतात बँका बंद आहेत तर काही राज्यांमध्ये प्रादेशिक सुट्ट्यांमुळे बँक शाखा बंद राहतील.

संप कोणत्या दिवशी आहे ते जाणून घ्या

नवीन वर्षाच्या सुरुवातीला सेंट्रल ट्रेड युनियन (CTU) आणि इतर काही संघटनांनी संयुक्तपणे 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी बँक संपाची घोषणा केली आहे. ज्यामध्ये 23 आणि 24 फेब्रुवारीला देशभरातील सर्व सरकारी आणि खाजगी बँकांचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या सरकारच्या योजनेच्या निषेधार्थ बँक संघटनांनी 16 आणि 17 डिसेंबर रोजी संप केला. त्यानंतर बँक संपाचा परिणाम स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), सेंट्रल बँक आणि आरबीएल बँकेच्या कामकाजावर झाला. चेक क्लिअरन्स, फंड ट्रान्सफर, डेबिट कार्ड यासंबंधीचे कामही रखडले होते.

सुट्ट्यांची लिस्ट पहा

15 फेब्रुवारी: मोहम्मद हजरत अली/लुई नागाई नी यांच्या वाढदिवसानिमित्त इंफाळ, कानपूर आणि लखनऊ येथील बँक शाखा बंद राहतील.

16 फेब्रुवारी: गुरु रविदास जयंती त्याच दिवशी येते. चंदीगडमध्ये बँका बंद राहतील.

18 फेब्रुवारी : डोलजत्रेमुळे कोलकाता येथील बँक शाखा बंद राहतील.

19 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त बेलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये बँका बंद राहणार आहेत.

23 फेब्रुवारी, बुधवार बँक संप

24 फेब्रुवारी, गुरुवार बँक संप

‘या’ तारखांनाही बँका बंद राहतील

‘या’ सुट्ट्यांव्यतिरिक्त 13, 20 आणि 27 फेब्रुवारीला रविवार आणि 12 आणि 26 फेब्रुवारीला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील.

ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रात कसे?, सरकार पाडण्यासाठीचा हा डाव

SANJAY RAUT

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून गौप्यस्फोट केला तसेच केंद्र सरकावर गंभीर आरोपही केले. दरम्यान, यावेळी त्यांनी ईडीचे सर्वाधिक खटले महाराष्ट्रात कसे? असा सवाल उपस्थित करीत सरकार पाडण्यासाठी हा सर्व डाव असल्याचा आरोपही केला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत आज माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यासाठी डाव टाकण्यात आलेला आहे. त्यासाठीच हे षडयंत्र सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत. बदनाम करण्याचे काम सुरू आहे. ते भ्रमात आहेत. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. तुमची दादागिरी खपवून घेणार नाही.

मुंबईत शिवसेनाच दादा

यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून विरोधकांना इशाराही दिला. ते म्हणाले की, मुंबईत कोण दादा असेल तर तो शिवसेना आहे. तसेच यांनी यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना देखील गंभीर इशारा दिला. जर आम्हाला तुरुंगात जावे लागले तर बाजूच्या कोठडीत तुम्ही असाल, असा इशारा राऊतांनी दिला आहे.

Gold Price : सोने-चांदी महागले, आजचा सोन्याचा दर तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीच्या दराने पुन्हा एकदा भारतीय सराफा बाजाराची चमक वाढवण्यास सुरुवात केली आहे. आज सलग तीन दिवस सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याच वेळी, चांदीचे दर देखील आज वाढीने ट्रेड करत आहेत. चांदीचे भाव आज 0.29 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहेत.

जाणून घ्या आज सोन्याचा भाव किती आहे ?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमधील डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.02 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 48,438 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

आज चांदीची किंमत किती झाली ?
त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंगमध्ये चांदीच्या दरातही जोरदार वाढ झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 0.29 टक्क्यांनी वाढून 62,549 रुपये झाला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,360 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,510 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,690 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,550 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,690 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,550 रुपये
पुणे – 45,360 रुपये
नागपूर – 49,690 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,260 रुपये
पुणे – 49,510 रुपये
नागपूर – 49,690 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

 

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4535.00 Rs 4510.00 -0.554 %⌄
8 GRAM Rs 36280 Rs 36080 -0.554 %⌄
10 GRAM Rs 45350 Rs 45100 -0.554 %⌄
100 GRAM Rs 453500 Rs 451000 -0.554 %⌄

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4950.00 Rs 4910.00 -0.815 %⌄
8 GRAM Rs 39600 Rs 39280 -0.815 %⌄
10 GRAM Rs 49500 Rs 49100 -0.815 %⌄
100 GRAM Rs 495000 Rs 491000 -0.815 %⌄

पोलिस पाटील निलंबित : पोक्सोचा गुन्हा दाखल झाल्याने कारवाई

फलटण | राजुरीच्या पोलीस पाटलाच्या विरोधात पोलीसांत पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर राजुरी येथील पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यास पोलीस पाटील पदावरून निलंबित करण्यात आले. याबाबतचा आदेश उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी काढला असून निलंबनाची कारवाई केली आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील राजुरी गावचे पोलीस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यांचे विरुद्ध अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अटक करण्यात आलेली होती. त्यास दिनांक 3 फेब्रुवारी रोजी जिल्हा सत्र न्यायालय सातारा येथे हजर केले असता, त्यांना 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली होती.

यानंतर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 चे कलम 11 अन्वये उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी राजुरी गावचे पोलिस पाटील लक्ष्मण सुहास बागाव यास पोलीस पाटील पदावरून तात्काळ निलंबित करण्याचा आदेश काढला आहे.

Share Market : सेन्सेक्सची दमदार सुरुवात, बाजाराने उघडताच घेतली 500 अंकांची धाव

Stock Market Timing

नवी दिल्ली । सकारात्मक जागतिक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारानेही बुधवारी जोरदार सुरुवात केली. सकाळी ट्रेडिंग सुरु होताच सेन्सेक्स आणि निफ्टीने वेगाने धाव घेतली. गुंतवणूकदारांनी बाजाराबद्दल सकारात्मक पाहिले आणि लगेचच खरेदी सुरू केली.

गुंतवणूकदारांनी भारती एअरटेल, पॉवर ग्रीड आणि आयआरसीटीसीवर जोरदार सट्टा लावला. सुरुवातीच्या सत्रातच, सकाळी 9.27 वाजता सेन्सेक्स 499 अंकांनी वधारला होता, तर निफ्टी 141 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता. अशाप्रकारे सेन्सेक्स सुरुवातीलाच 58 हजारांच्या वर पोहोचला होता, तर निफ्टी 17,400 च्या वर धावत होता. पीएसयू बँक वगळता सर्वच क्षेत्रांत सुरुवातीच्या ट्रेडिंग मध्ये तेजी दिसून आली.

FII ने पैसे काढले मात्र देशांतर्गत गुंतवणूकदारांनी सांभाळले
विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) 8 फेब्रुवारी रोजी भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री केली आणि 1,967.89 कोटी रुपयांचे शेअर विकले. मात्र, देशांतर्गत गुंतवणूकदारांनी पुढे जाऊन बाजाराचा ताबा घेतला. भारतीय गुंतवणूकदारांनी मंगळवारी बाजारात 1,115 कोटी रुपयांची गुंतवणूक केली, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी ग्रीन मार्कवर बंद झाले.

आशियाई बाजार अजूनही चमकत आहेत
भारतीय वेळेनुसार बुधवारी सकाळी 7 वाजता जपानचा NIKKEI सुमारे 240 अंकांच्या वाढीसह ट्रेड करत होता. याशिवाय दक्षिण कोरियाचे कोस्पी स्टॉक एक्स्चेंज देखील सकाळी 7 वाजता 24 अंकांच्या वाढीसह ग्रीन मार्कवर चालू होते. याशिवाय सिंगापूरचा SGX निफ्टी 0.24 टक्क्यांनी आणि तैवानचा स्टॉक एक्स्चेंज 0.65 टक्क्यांनी वधारत होता. याआधी मंगळवारी चीनचा शांघाय कंपोझिट 0.67 टक्क्यांच्या उसळीसह बंद झाला.