Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2851

मालवाहतूक गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत माहिती अधिकार कार्यकर्ता अन् नगरपालिकेचा कर्मचारी ठार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

तासगाव-पलूस मार्गावर तासगाव नजीक एस मालवाहतूक या गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत तासगाव येथील दोन जण ठार व दोन जण जखमी झाले ही घटना रविवारी रात्री घडली. या अपघातात माहिती अधिकार कार्यकर्ता समितीचे राहुलकुमार शिंदे व तासगाव नगरपरिषदेतील कर्मचारी दीपक स्वामी हे दोघे ठार झाले आहेत तर सचिन बाबर व छोटा हत्ती चालक देशमाने हे दोघे जखमी झाले आहेत.

राहुल, दीपक व सचिन हे तिघेजण तासगाव नजीक असलेल्या एका हॉटेल मध्ये जेवण्यासाठी गेले होते. जेवण करून ते बाहेर येऊन रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत बोलत उभे होते. याच दरम्यान निमणीकडून तासगाव कडे येत असलेल्या मालवाहतूक छोटा हत्ती गाडीने रस्त्याचे विरूध्द बाजूस येऊन या तिघांना जोराची धडक दिली. यामध्ये दीपक स्वामी जागीच ठार झाले. तर गंभीर जखमी झालेले राहुल शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच ते मयत झाले. तर सचिन बाबर व छोटा हत्ती चालक हे जखमी झाले.

सदर अपघाताचे वृत्त समजताच मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, अभियंता ए.सी.औताडे, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक विठ्ठल शेळके, संदीप गुरव, तसेच राष्ट्रवादी चे कार्यकर्ते, नगरपरिषदेतील कर्मचारी, नागरिक यांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालय येथे धाव घेतली. या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हे तर मोदी सरकारचे झिरो बजेट; राहुल गांधींचा हल्लाबोल

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. केंद्राकडून आज विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या अर्थसंकल्पानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील सरकार वर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी ट्विट करत म्‍हटलं आहे की, या अर्थसंकल्पात पगारदार वर्गासाठी, मध्यम– मध्यमवर्गासाठी, गरीब, वंचित, तरुण, शेतकरी, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी काेणतीही तरतूद करण्‍यात आलेली नाही. मोदी सरकारचा हा झिरो सम बजेट आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

दरम्यान, आजच्या अर्थसंकल्पात सरकार कडून विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. सरकारने 5 नदीजोड प्रकल्पाची घोषणा केली आहे. लघु आणि मध्यम उदयोग साठी 2 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. देशातील राज्यांसाठी 1 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सहकार क्षेत्राला दिलासा मिळाला आहे. मात्र नोकरदार वर्गाची मात्र निराशा झाली आहे. जुनी कर रचनाच यापुढेही सुरू असल्याने नोकरदार वर्गाला दिलासा मिळू शकलेला नाही.

अखेर वासोटा किल्ला अन् बोटींग आजपासून सुरू

Vasota Fort

सातारा | कोरोनामुळे दोन महिन्यांपासून वासोटा किल्ल्यावरील पर्यटन बंद होते. त्यामुळे बामणोली परिसरातील बोटमालक, चालक व अन्य व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वनसंरक्षक (वन्यजीव) समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधून वासोट्यावरील पर्यटन, बोटिंग तातडीने पुन्हा सुरू करण्याची सूचना सोमवारी केली. त्यांनतर चव्हाण यांनी आज मंगळवार दि. 1 पासून वासोट्यावरील पर्यटन सुरू करण्याचा निर्णय घेतला.

बामणोलीतील भैरवनाथ बोट क्‍लबचे अध्यक्ष धनाजी संकपाळ, उपाध्यक्ष संजय शिंदकर, सचिव नीलेश शिंदे, सुभाष शिंदकर, राजेंद्र संकपाळ, राजेंद्र कांबळे, गोविंद शिंदकर, किसन भोसले, पदाधिकारी व सदस्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन पर्यटन व बोटिंग सुरू करण्याची मागणी केली.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वनसंरक्षक (सह्याद्री व्याघ्र प्रकल्प) समाधान चव्हाण यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. बामणोली भागातील बोटिंग व इतर व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहेत. करोनाचा प्रादुर्भाव असूनही महाबळेश्‍वरमध्ये पर्यटन सुरु आहे. इतर ठिकाणीही सर्व व्यवसाय सुरू असताना, वासोट्यावरील पर्यटन बंद ठेवल्याने बामणोली परिसरातील बोटचालक, मालक व इतर व्यावसायिकांवर अन्याय होत आहे. त्यामुळे पर्यटनाची परवानगी त्वरित द्यावी, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.

त्यानंतर चव्हाण यांनी मंगळवारपासून पर्यटन सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे सांगितले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशीही संपर्क साधला. वासोटा पर्यटन आणि बोटिंग सुरू होत असून महसूल विभागाने व्यावसायिकांना सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले. शेखर सिंह यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने वासोट्यावरील पर्यटन आणि बोटिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल बोट क्‍लबच्या सदस्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले.

भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा हा अर्थसंकल्प आहे – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी राज्यांना मोठा दिलासा दिला. दरम्यान या अर्थसंकल्पाबाबत राज्यातील राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प हा भारताला आत्मनिर्भर आणि अधिक बलशाली बनविणारा असल्याचे मत विकत केले आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी आज संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सर्वसामान्य माणूस, शेतकरी-कष्टकरी अशा सर्वच घटकांना दिलासा देत, भविष्याचा वेध घेणारा हा अर्थसंकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांनी मांडला आहे. याबद्दल या दोघांचेही आम्ही आभार मानतो.

अर्थमंत्री सीतारामनजी यांनी जो आज अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात देशातील सर्व घटकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कार्य अर्थाने आत्मनिर्भर भारत तयार करणारा हा अर्थसंकल्प म्हणावा लागेल, असे फडणवीस यांनी म्हंटले.

शेती क्षेत्रात २सहकार आणि खासगी संस्थामधील करामध्ये मोठी तफावत होती. सहकारी संस्थांवर 18.5 टक्के टॅक्स तर दुसरीकडे खासगी संस्थांना मात्र, 15 टक्केच टॅक्स होता. त्यामुळे विकास कामात अडथळा आणि सहकारी संस्थांना पाहिजे तसे पाठबळ मिळत नव्हते मात्र, अर्थसंकल्पातील निर्णयामुळे आता ही तफावत दूर होणार असल्याचे फडणवीस यांनी म्हंटले.

आमच्यातील गद्दारांमुळे राष्ट्रवादीला निसटते यश मिळताच मस्तीची भाषा : आ. जयकुमार गोरे

MLA Jaykumar Gore

सातारा – एक दोन निवडणूकांमध्ये आमच्यातीलच काही गद्दारांमुळे राष्ट्रवादीला निसटते यश मिळताच हुरळून जात मस्तीची भाषा सुरु झालीय. पण मस्ती उतरविण्यात माझी पीएचडी झालीय हे विसरु नका. मी तीन वेळा आमदार होवूनही जमिनीवर आहे. माझ्या विरोधात अनेकांनी पैसा ओतलाय. पैसा संपेपर्यंत त्यांना मी बसू दिले नाही. मतदारसंघातील राष्ट्रवादीवालेही म्होरक्याला पैसा संपेपर्यंत खाली बसू देत नाहीत. सध्या काय काय आणि किती मिळतेय याकडेच राष्ट्रवादीवाल्यांचे लक्ष आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुणाकडे किती पैसा आहे याचा हिशोबही लवकरच होणार आहे. त्यामुळे,जरा सबूरीने घ्या असा सल्ला माण-खटावचे आमदार जयकुमार गोरेंनी विरोधकांना दिला आहे.

कुळकजाई येथे 11 कोटींच्या घाटरस्त्यांच्या कामाच्या भूमिपूजनानंतर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी आ. जयकुमार गोरे, अर्जुमनतात्या काळे, जयकुमार शिंदे, सोमनाथ भोसले, सरपंच विक्रम जगताप, विलासराव देशमुख, किसनराव सस्ते, बाळासाहेब कदम, गोरख मदने, सदाशिव खाडे, भिवाजी कापसे, आनंद पवार, चंदू सुर्यवंशी, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच, जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीदरम्यान मी आणि रामराजेंनी जुळवून घेतल्याच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र, त्यांच्यासारख्या पापी माणसाचे आणि माझे कधीच जुळणार नाही. मंत्रीपदावर असताना त्या माणसाने प्रयत्न केले असते तर माण आणि खटाव हा दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम झाला असता. त्यांनी या भागाला पाण्यापासून कायम वंचीत ठेवण्याचाच प्रयत्न केला अशी टीका जयकुमार गोरेंनी केली आहे.

Budget 2022: काय स्वस्त अन् काय महाग; चला जाणून घेऊया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांचा हा चौथा तर मोदी सरकारचा १० वा अर्थसंकल्प आहे. देशात कोरोना महामारीतुन देश आत्ता कुठे बाहेर पडत असून अर्थमंत्र्यांनी आज अनेक घोषणा करत सर्वसामान्याना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी केंद्र सरकारने काही वस्तू स्वस्त करून मोठा दिलासा दिला आहे. मोबाईल फोन आणि त्याचा चार्जर स्वस्त होणार आहे. देशांतर्गत मोबाईल निर्मिताला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क देखील कमी करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे परदेशी छत्र्या, शेतीसाठी उपकरणे, जेम्स अँड ज्वेलरी, चामड्याच्या वस्तू, चपला आणि बूट, स्वस्त करण्यात आले आहेत.

तर दुसरीकडे नोकरवर्गाला मात्र कोणताही दिलासा मिळाला नाही. जुनी कर रचनाच इथून पुढेही चालु राहील. त्यामुळे नोकरदारांची निराशा झाली आहे. क्रिप्टो करन्सीमधील गुंतवणूक महाग झाली आहे. छत्र्या महाग होणार आहेत तसेच आयात होणाऱ्या सर्व वस्तूंसाठी अधिक रक्कम मोजावी लागणार आहे.

Budget 2022 : अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सोशल मीडियावर आला मीम्सचा महापूर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात करताच इंटरनेट युझर्ससाठी मंगळवार व्यस्त झाला आहे. याचे कारण म्हणजे ट्विटर सोशल मीडिया युझर्सच्या बजट मीम्सने भरले आहे. भारतीय मध्यमवर्ग न्यूज चॅनेल्समध्ये अडकलेला आहे आणि प्रत्येक अपडेट तपासून तो या अर्थ संकल्पातून काही चांगली बातमी मिळण्याची आशा करतो आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2022 च्या घोषणेच्या दरम्यान, इंटरनेटवर काही मीम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत. चला तर मग त्याविषयी पाहूयात…

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. अर्थमंत्र्यांनी घोषणा केली की, इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरेंटेड स्कीम मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गॅरेंटेड कव्हर ​​50 हजार कोटींपर्यंत वाढवण्यात आले असून एकूण कव्हर आता 5 लाख कोटी होईल.

Budget 2022 : क्रिप्टोकरन्सीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर द्यावा लागणार 30 टक्के टॅक्स

Cryptocurrency

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | डिजिटल करन्सीच्या व्यवसायाबाबतच्या संभ्रमाची स्थिती दूर करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्हर्चुअल मालमत्तेवर कर आकारणी योजनेची घोषणा केली. व्हर्च्युअल इस्टेटवरील टॅक्सची घोषणा करताना त्या म्हणाल्या की,”कोणत्याही प्रकारच्या व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स आकारला जाईल. व्हर्च्युअल डिजिटल मालमत्तेच्या ट्रान्सझॅक्शनवर 1 टक्के दराने TDS कपात करण्याबाबतही त्यांनी सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी लोकसभेत 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यादरम्यान अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्कम स्लॅबमध्ये कोणताही बदल केला नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) डिजिटल करन्सी जारी करेल, असे बजटमध्ये म्हटले आहे. ते ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित असेल.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की,”कोणत्याही प्रकारच्या व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेच्या ट्रान्सफर किंवा विक्रीवर 30 टक्के दराने टॅक्स आकारला जाईल.

– व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेच्या ट्रान्सफर द्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर 30% टॅक्स भरावा लागेल
– गिफ्ट्स म्हणून व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता मिळवणाऱ्यांनाही टॅक्स आकारला जाईल

Budget 2022 : नोकरदारांना दिलासा नाहीच; जुनीच कररचना लागू

Tax Rules On FD 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प 2022 मध्ये करदात्यांची सर्वाधिक निराशा केली. थेट कर भरणा-या देशातील सुमारे 6 कोटी करदात्यांना या महामारीमुळे बसलेल्या धक्क्यावर मात करण्यासाठी अर्थसंकल्पात काही दिलासा मिळेल, अशी आशा होती.

नवीन टॅक्स स्लॅबमध्ये करदात्यांना थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. वास्तविक, अर्थसंकल्प 2020 मध्ये आलेल्या नवीन टॅक्स स्लॅबमध्ये, सरकारने 70 प्रकारच्या कर सवलती काढून टाकून त्याचे दर कमी केले होते. मात्र , त्याचे फायदे केवळ 20 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्यांनाच मिळतात. यामुळेच 2021-22 मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या केवळ 5 टक्के करदात्यांनी नवीन स्लॅबची निवड केली. सध्या सरकारने नवीन आणि जुने टॅक्स स्लॅब पूर्वीप्रमाणेच कायम ठेवले आहेत.

वर्क फ्रॉम होमवर सूट अपेक्षित आहे
महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होममुळे (WFH) वाढलेल्या खर्चावर करदात्यांना टॅक्स सूट मिळणे अपेक्षित होते, मात्र अर्थमंत्र्यांनी ते नाकारले आणि पगारदार व्यक्तीला वाऱ्यावर सोडले. याशिवाय ऑफिसमधून मिळणाऱ्या अनेक प्रकारच्या भत्त्यांवर करमाफीची आशा लोकांनी ठेवली होती, ती देखील झाली नाही.

नवीन टॅक्स स्लॅबमध्ये होम लोन आणण्यास वाव होता
इन्कम टॅक्स एक्सपर्ट आणि करदात्यांना आशा होती की, सरकार नवीन टॅक्स स्लॅबमध्ये होम लोनवरील टॅक्स सूट समाविष्ट करेल. सध्या, इन्कम टॅक्सच्या कलम 24B अंतर्गत 2 लाख रुपये आणि होम लोनवर भरलेल्या व्याजावर 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची टॅक्स सूट आहे. जर ही 3.5 लाख कर सवलत नवीन स्लॅबमध्ये समाविष्ट केली गेली तर मोठ्या संख्येने करदात्यांनी नवीन टॅक्स सिस्टीम स्वीकारण्याच्या दिशेने वाटचाल करू शकेल.

अर्थमंत्र्यांनी करदात्यांना दिला दिलासा
कॉर्पोरेट सरचार्ज 12 टक्क्यांवरून 7 टक्के करण्यात आला आहे.
व्यावसायिक खर्चावरील आरोग्य आणि शिक्षण सरचार्ज मधून सूट.
लाँग टर्म कॅपिटल गेन्स (LTCG) स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नावर सरचार्ज 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल.
दोन वर्षांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न मधील दुरुस्तीसाठी सूट असेल आणि थकबाकीदार कर भरता येईल.
1 ते 10 कोटींच्या सहकारी संस्थांवरील सरचार्ज 12 टक्क्यांवरून 7 टक्के करण्यात आला आहे.
नवीन पेन्शन स्कीम NPS मध्ये नियोक्त्याच्या योगदानावरील कर सवलत योगदानाच्या 10 टक्क्यांवरून 14 टक्के करण्यात आली आहे.

LTCG वर टॅक्स आता 15% पर्यंत असेल
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हिरे आणि दागिन्यांवरची कस्टम ड्युटी 5 टक्क्यांवर आणली आहे. 3 वर्षांपर्यंतच्या स्टार्टअपसाठी आणखी 1 वर्षासाठी टॅक्स सवलत उपलब्ध असेल. नवीन उत्पादन युनिटसाठी उत्पादन सुरू करण्याची मर्यादा 31 मार्च 2024 पर्यंत वाढवण्यात आली. रॉयल्टी, जहाजांचे भाडे आणि पोर्टफोलिओ व्यवस्थापन यावर कोणताही टॅक्स नसेल. LTCG वर जास्तीत जास्त टॅक्स आता 15 टक्के असेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत वित्त विधेयक 2022 सादर केले. संसदेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आली.

व्हर्च्युअल डिजिटल असेट्सच्या असेट्सच्या किंवा विक्रीवर 30 टक्के टॅक्स
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, कोणत्याही प्रकारच्या व्हर्च्युअल डिजिटल असेट्सच्या असेट्सच्या किंवा विक्रीवर 30 टक्के दराने टॅक्स आकारला जाईल.

Budget 2022 : करदात्यांना मोठा दिलासा, आता 2 वर्षांपर्यंत ITR मधील चूक सुधारता येणार

Income Tax

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता करदाते आपले वार्षिक रिटर्न दोन वर्षांपर्यंत अपडेट करू शकतील आणि काही चूक असल्यास त्यामध्ये बदलही करू शकतील. याद्वारे ते त्यांचा थकित करही भरू शकतील. यासाठी सरकार लवकरच नवीन आयटी रिटर्न पोर्टल जारी करणार आहे.सहकारी संस्थांवरील करही 15 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. यावरील सरचार्जही 7.5 टक्के करण्यात आला आहे.

अपंग व्यक्तीच्या पालकांसाठी इन्शुरन्सवर मिळालेल्या लंपसम वरील कर वगळण्यात आला आहे. त्यात ए न्युइटीचाही समावेश आहे. हे वयाच्या 60 वर्षापर्यंत लागू असेल.
याशिवाय, नियोक्त्याच्या सहभागावर NPS वर 14 टक्के कर सूट मिळेल, जी आतापर्यंत 10 टक्के आहे.

स्टॉक आणि म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना धक्का
शेअर्स आणि म्युच्युअल फंडात पैसे गुंतवून मिळणाऱ्या रिटर्न्सवरील टॅक्स दरही अर्थमंत्र्यांनी वाढवला ​​आहे. आता गुंतवणूकदारांना लाँग टर्म कॅपिटल गेन्स (LTCG) वर 15 टक्के दराने टॅक्स भरावा लागेल. आतापर्यंत यावर 10 टक्के LTCGआकारले जात होते. याचा अर्थ असा की, जर तुम्ही एक वर्षापेक्षा जास्त काळ स्टॉक ठेवला तर तुम्हाला रिटर्नवर 15 टक्के टॅक्स भरावा लागेल. त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडात तीन वर्षांहून जास्त काळ गुंतवणूक केल्यानंतर मिळालेल्या रिटर्नवरही 15 टक्के LTCG लागू होईल.