Monday, December 22, 2025
Home Blog Page 2850

…तरच मिळणार उपचार; औरंगाबादेत नवीन नियम

sunil chavhan

औरंगाबाद – जिल्ह्यासह मराठवाड्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी सोमवारी आणखी कमी झाल्याचे नोंदवले गेले. मराठवाड्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1471 वर पोहोचली. तर कोरोनामुळे 14 जणांचा मृत्यू झाले. औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाल्याने काहीशी चिंता वाढली तर कोरोना रुग्णसंख्या तीनशेच्या आतच रोखली गेल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला. जिल्ह्यात सोमवारी 290 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर जिल्ह्यात 5814 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असली तरीही कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सक्ती कायम राहिल, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात आता कोणते नवे नियम?
– जे नागरिक लस घेणार नाहीत, त्या कुटुंबाला फेब्रुवारी महिन्याचे रेशन न देण्याचा निर्णय सोमवारी टास्क फोर्सच्या बैठकीत घेण्यात आला.
– घाटी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांनी लस घेतलेली असेल तरच उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लस घेतलेली नसेल तर जागेवरच लसीकरण करून उपचाराचा मार्गही मोकळा करुन दिला जाईल.
– 03 फेब्रुवारीपासून या नियमाची अंमलबजावणी सुरु होईल.
– घाटी रुग्णालयातील आतररुग्ण विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांनाही लसीची विचारणा करण्यात येईल. लसीचा किमान एक डोस बंधनकारक आहे.
– अपघात विभागात येणाऱ्या गंभीर रुग्णांसाठी मात्र लसीची सक्ती करण्यात येणार नाही. तसेच लस घेतलेल्या नातेवाईकांनाच रुग्णांना भेटण्याची परवानगी असेल.

– जिल्ह्यात ज्या भागात लसीकरण कमी आहे, त्या भागातील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
– व्हॅक्सिनेशन ऑन व्हील अंतर्गत ज्या भागात लसीकरण कमी आहे, त्या भागात हे वाहन नेण्यात यावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
– जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी होत असून, एकूण रुग्णांपैकी जे रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर होते, अशा रुग्णांची केस स्टडी करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिले आहेत.

रक्तरंजित राजकारणाची सुरुवात यांनीच केल्याने आज कोर्टाने निर्णय दिला; राणेंच्या निकालाबाबत केसरकरांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. मात्र सत्र न्यायालयानेही राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांच्या अटकेबाबतचे संकेत दिले. याबाबत शिवसेना नेते दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली. “जे राजकारणासाठी गुन्हेगारीचा वापर केला जातो. अशा प्रकारचे रक्तरंजित राजकारण या आदी कोकणात कधीच झाले नव्हते. त्याची सुरुवात या लोकांनी केली आहे. त्यामुळे आज कोर्टाने चांगला निकाल दिला आहे, असे केसरकर यांनी म्हंटले.

भाजप आमदार नितेश राणे यांनी संतोष परब हल्ला प्रकरणात वॉरंट निघाल्यानंतर अटकपूर्व जामीनासाठी शेवटचा पर्याय म्हणून सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. दरम्यान आज कोर्टाने त्याचा अर्ज फेटाळून लावला. राणेंना दहा दिवस अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यानंतर राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने दिलेल्या निकालाबाबत शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नितेश राणेंवर करण्यात आलेले आरोप हे काय राजकीय नाहीत. राणेंची पार्श्वभूमी बघितली तर त्यांच्यावर खंडणी गोळा करणे, गोळीबार करण्याचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे हे गुन्हे काय राजकीय असू शकत नाहीत.

दरम्यान, नितेश राणेंचा जामीन कोर्टाने फेटाळल्यानंतर सिंधुदुर्ग कोर्टासमोर हायव्होल्टेज ड्रामा रंगला. राणेंंना जामीन फेटाळल्यानंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनीही आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी त्यांनी पोलिसांना मला कायदा शिकवू नका अशी आक्रमक दिली आहे.

Stock Market : अर्थसंकल्पाच्या दिवशी सेन्सेक्स 848 अंकांनी वाढला तर निफ्टी 17550 च्या वर बंद झाला

Recession

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर केला. अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये ग्रीन मार्कवर सुरू झाले. अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सेन्सेक्सने 900 अंकांची उसळी घेतली. त्याचवेळी निफ्टीने 17,600 ची पातळीही ओलांडली. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 848.40 अंकांच्या म्हणजेच 1.46 टक्क्यांच्या वाढीसह 58,862.57 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 237.00 अंकांच्या किंवा 1.37 टक्क्यांच्या वाढीसह 17,576.85 वर बंद झाला.

शुक्रवारी सेन्सेक्स 57200 वर बंद झाला
याआधी शुक्रवारी, सेन्सेक्स ट्रेडिंगच्या शेवटी 76.71 अंकांनी किंवा 0.13 टक्क्यांनी घसरून 57200.23 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 5.50 अंकांनी किंवा 0.03 टक्क्यांनी घसरून 17104.70 च्या पातळीवर बंद झाला.

सोमवारी सेन्सेक्स 58014 वर बंद झाला
याआधी सोमवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार वाढ नोंदवली होती. सेन्सेक्स 813.94 अंकांच्या वाढीसह 58014.17 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 237 अंकांच्या वाढीसह 17,339.85 वर बंद झाला.

5G सर्व्हिस सुरू करण्यासाठी स्पेक्ट्रमचा लिलाव केला जाईल
देशात 5G सर्व्हिस सुरू करण्यासाठी यावर्षी स्पेक्ट्रम लिलाव होणार आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सरकारच्या प्राधान्यक्रमांची रूपरेषा मांडत ही घोषणा केली. ते म्हणाले की, PLI योजनेंतर्गत 5G मध्ये डिझाइन-आधारित मॅनुफॅक्चरिंग योजना सुरू केली जाईल.”

क्रिप्टो करन्सी द्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स आकारला जाईल
व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता उत्पन्नावर 30% टॅक्स आकारला जाईल. आभासी डिजिटल मालमत्तेचे नुकसान सेटऑफ केले जाणार नाही.Virtual Digital Assets ट्रान्सफर वर 1% TDS देखील आहे. म्हणजेच, क्रिप्टोच्या उत्पन्नावर 30% टॅक्स आकारला जाईल. तुम्हाला क्रिप्टो गिफ्ट मिळाले तरीही हा टॅक्स लागू होईल. LTCG सरचार्ज 15% वर मर्यादित असेल. LTCG वर सरचार्ज १५% पेक्षा जास्त नसेल. छाप्यात मिळालेल्या रकमेचा कोणताही सेट ऑफ होणार नाही.

औरंगाबादेत ‘स्पेशल 26’; मंत्रालयात ओळख सांगून हॉटेल मालकाला 41 लाखांचा चुना

Money

औरंगाबाद – कोरोना काळात तुम्हाला जेवण पुरवण्याचे कंत्राट देऊ त्यासाठी 70 ते 80 लाख डिपॉझिट म्हणून द्यावे लागतील असे म्हणत दोघांनी शहरातील हॉटेल चालकाची 41 लाखांची फसवणूक केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात रजनी रानमारे आणि संदीप बाबुलाल वाघ या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भक्तबंधु रामचंद्र पाढी हे शहरात शहरात एक हॉटेल चालवतात. पाढी यांना जानेवारी 2021 पासून रजनी आणि संदीप यांनी आर. बी. केटरर्स व फुड सप्लायर्स या नावाने 12 स्वरूप निकेतन, बामणवाडा, अंधेरी येथे फुड सप्लाय ची फर्म आहे. त्याद्वारे महाराष्ट्रभर मोठ-मोठ्या सरकारी कार्यालय तसेच रुग्णालयांच्या कॅन्टिनला फुड सप्लायचे टेंडर घेऊन त्यांना जेवण पुरवण्याचे काम करतो, तुम्ही जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे चार हजार लोकांना जेवण पुरवण्याचे काम करणार का ? तसेच कोरोना काळात आम्ही तुम्हाला जेवण पुरवण्याचे काम देऊ असे आश्वासन दिले होते. तसेच यासाठी डिपॉझिट म्हणून तुम्हाला 70 ते 80 लाख रुपये द्यावेल लागतील, असे सांगत पाढी यांचा विश्वास संपादन केला. तेव्हापासून 30 जानेवारी पर्यंत दोन्ही आरोपींनी 41 लाख पाच हजारांची फसवणूक केली.

पाढी यांनी दोघांकडे पैशांची मागणी केली असता पैसे देण्यास टाळाटाळ करत त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील दिली. यामुळे पाढी यांना आपली फसवणुक झाल्याचे समजल्यानंतर त्यांनी एमआयडीसी सिडको पोलिसांकडे धाव घेत रजनी आणि संदीप यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

Budget 2022 : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केल्या ‘या’ 10 मोठ्या घोषणा, जाणून घ्या कोणत्या क्षेत्राला काय मिळाले

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी आणि तरुणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.. तसेच निर्मला सीतारामन म्हणाल्या की,”सर्वांचे कल्याण हेच आमचे ध्येय आहे. आतापर्यंतच्या अर्थसंकल्पात केलेल्या मोठ्या घोषणांबद्दल थोडक्यात जाणून घ्या …

1. तरुणांना 60 लाख नोकऱ्या दिल्या जातील.

2. पुढील 3 वर्षांत 400 नवीन पिढीच्या वंदे भारत गाड्या चालवल्या जातील.

3. 3 वर्षात 100 PM गति शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील.

4. 1.5 लाख पोस्ट ऑफिस कोअर बँकिंग अंतर्गत येतील. पोस्ट ऑफिसमध्येही आता ऑनलाइन ट्रान्सफर शक्य होणार आहे.

5. 2022-23 मध्ये 80 लाख नवीन घरे बांधली जातील.

6. देशात डिजिटल यूनिव्हर्सिटी तयार केले जाईल.

7. 20,000 कोटी रुपये खर्चून 25 हजार किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले जातील.

8. देशातील 5 मोठ्या नद्यांना जोडण्यासाठी जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीनेही काम केले जाईल.

9. 75 जिल्ह्यांमध्ये डिजिटल बँकिंग सुरू करण्यात येणार आहे.

10. 2022-23 मध्ये ई-पासपोर्ट लागू केला जाईल.

11. शहरांच्या विकासासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली जाईल.

12.वन नेशन, वन रजिस्‍ट्रेशन योजना सुरू केली जाईल. त्यामुळे व्यवसाय करणे सोपे जाईल.

13. इलेक्ट्रिक वाहन इकोसिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन दिले जाईल.

Health Budget 2022 : मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत यावेळी आरोग्य क्षेत्राला किती बूस्टर डोस मिळाला हे जाणून घ्या

नवी दिल्ली । आज 2022-23 चा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील विशेषतः कोरोनाच्या काळात केलेल्या अनेक घोषणांचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की,”आपल्या समोर ओमिक्रॉन लाटेचे आव्हान आहे. देशातील लसीकरणाच्या गतीने याला सामोरे जाण्यास खूप मदत झाली आहे. आत्मनिर्भर आरोग्य योजनेची भेट देत अर्थमंत्र्यांनी हेल्थ बजटमध्ये 135 टक्के वाढ करण्याची घोषणा केली आहे. ते 94 हजारांवरून 2.38 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. यासोबतच केंद्र सरकार पुढील 6 वर्षात हेल्थ सेक्टरमध्ये सुमारे 61 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.

आता प्राथमिक स्तरापासून उच्च स्तरापर्यंत आरोग्य सेवांवर सरकारचे लक्ष असेल, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. विशेषत: नवीन आजारांबाबत विशेष काळजी घेतली जाईल आणि त्यावर होणारा खर्च नॅशनल हेल्थ मिशनपेक्षा वेगळा असेल.

75 हजार ग्रामीण हेल्थ सेंटर्स सुरू होणार आहेत
या अर्थसंकल्पानुसार देशात आणखी 75 हजार ग्रामीण हेल्थ सेंटर्स उघडण्यात येणार आहेत. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये चाचणी केंद्रे आणि 602 जिल्ह्यांमध्ये गंभीर काळजी घेणारी रुग्णालये उघडली जातील. यासोबतच पोषणावर देखील भर देण्यात येणार असून जल जीवन मिशन (अर्बन) देखील लाँच करण्यात येणार आहे. 500 अमृत शहरांमध्ये स्वच्छता करण्यावर भर दिला जाणार आहे. स्वच्छतेसाठी सुमारे 2 लाख 80 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. शहरी स्वच्छ भारत मिशन 2.0 वर पुढील 5 वर्षांत एक लाख 41 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. यासोबतच 2 हजार कोटी रुपये फक्त स्वच्छ हवेसाठी केले जाणार आहेत.

गेल्या अर्थसंकल्पात काय होते ?
विशेष म्हणजे, 2021-22 च्या शेवटच्या अर्थसंकल्पात कोविड-19 लसीसाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. गेल्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरसाठी प्रतिबंध, उपचार आणि काळजी या तीन गोष्टींवर भर देण्यात आला होता. 2022-23 च्या अर्थसंकल्पातही याची दखल घेण्यात आली आहे.

कोरोना संदर्भात कोणता विशेष आरोग्य कार्यक्रम
या अर्थसंकल्पात कोरोनापासून मानसिक आजारांसाठी नॅशनल टेलीमेंटल हेल्थ प्रोग्रॅम लाँच करण्याची घोषणा करण्यात आली आहे. टेलीमेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आजारांच्या बाबतीत आरोग्य सेवांसाठी टेलिकॉम किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग टेक्नॉलॉजीचा वापर. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मानसिक रुग्णांसाठी टेलीमेंटल हेल्थ खूप प्रभावी आहे. कोविड महामारीमुळे त्याची गरज आणखी वाढली आहे.

मेंटल हेल्थ प्रोग्रॅम सुरु होतील
त्याचबरोबर नॅशनल डिजिटल हेल्थ इकोसिस्टमसाठी खुले प्लॅटफॉर्म लाँच केले जाईल. यामध्ये, आरोग्य पुरवठादार आणि आरोग्य सुविधांची डिजिटल रजिस्ट्रेशन, आरोग्याची विशिष्ट ओळख, संमती फ्रेमवर्क आणि आरोग्य सुविधांमध्ये सहज प्रवेश सुनिश्चित केला जाईल. यासोबतच नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्रॅमही सुरू करण्यात येणार आहे. कोरोना महामारीमुळे सर्व वयोगटातील लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. दर्जेदार मानसिक आरोग्य समुपदेशन आणि काळजी सेवा मिळण्यासाठी ‘नॅशनल टेली मेंटल हेल्थ प्रोग्रॅम’ सुरू केला जाईल.

या बजटमध्ये ईशान्य भारतातील गुवाहाटी येथे 129 कोटी रुपये खर्चून बालरोग आणि कर्करोग रुग्णालय उभारले जाणार आहे. 2022-23 च्या आरोग्य बजटमध्ये 86 हजार 606 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 2021-22 या वर्षासाठी 85 कोटी 915 रुपये वाटप करण्यात आले.

नितेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला; राणे बंधू आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत असलेले भाजप आमदार नितेश राणे याना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणे यांचा जमीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे याना अटक होणार का अशी शक्यता वाढली आहे.

नितेश राणे याना अद्याप कोणत्याही न्यायालयाचा दिलासा मिळालेला नाही. आधी जिल्हा सत्र न्यायलय, मग उच्च न्यायलय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जमीन फेटाळला आहे. मात्र १० दिवस नितेश राणे याना अटक करू नये असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते

दरम्यान, कोर्टाच्या आवारात नितेश राणे यांची गाडी पोलिसांनी अडवल्यानंतर राणे समर्थक आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे याना १० दिवसाचा दिलासा दिला आहे त्यामुळे तुम्ही नितेश राणे याना अटक करू शकत नाही, तुम्ही मला कायदा शिकवू का असे निलेश राणे यांनी पोलिसांना ठणकावून सांगितले.

बिबट्याची आता इस्लामपुर मध्ये ‘एन्ट्री’, शहरातील उपनगरांमध्ये दहशतीचे वातावरण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

वाळवा तालुक्यातील डोंगर परिसरात निदर्शनास येणारा बिबट्या सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास इस्लामपूर शहरातील जिजाईनगर परिसरात दाखल झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे. शहराच्या उपनगरातील वस्तीवरील नागरिकांनी रात्रीच्या वेळी दक्षता घेेण्याच्या सूचना वन विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. इस्लामपूर शहराच्या जिजाऊनगर येथे अभिनंदन पाटील कुुटुंबीयांसह भाड्याच्या घरात वास्तव्यास असून शेजारीच त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी पहाटे 2.30 च्या सुमारास परिसरातील कुत्र्यांनी दंगा सुरू केला. त्यांनी बांधकामासाठी सळी आणली होती.

लोखंडी वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार होत असल्याने त्यांनी बाहेर पाहिले तर कोणीच नव्हते. कुत्री मात्र बांधकाम सुरू असणार्‍या इमारतीच्या दिशेने भुंकत होते. दरम्यान नव्याने बांधकाम सुरू असणार्‍या इमारतीच्या बांधकामावर एक प्राणी बसलेला आढळून आला. त्या प्राण्याची मोठी शेपटी पाहिल्याने त्यांना बिबट्या असल्याचे दिसले. अभिनंदन पाटील यांनी बिबट्याच असल्याची खात्री करण्यासाठी लाईट लावली. लाईट सुरू होताच बिबट्याने बांधकामावरून उडी मारून शेताच्या दिशेने पलायन केले.

सकाळी पाहणी केली असता इमारतीच्या बांधकामावर बिबट्याचे केस आणि पायाने ओरखडलेले तर बांधकामाशेजारी पायाचे ठसे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक अमोल साठे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. परिसरातील पायाच्या ठश्यावरून बिबट्याचे ठसे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी परिसरातील नागरिकांची भेट घेत वस्तीवरील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले.

“अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प”; केंद्रीय अर्थसंकल्पावर जयंत पाटील यांची टीका

jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. दरम्यान या अर्थसंकल्पावरून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून निशाणा साधण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारामन यांनी सर्वसामान्य करदात्यांना कोणताही नव्याने दिलासा देणारी घोषणा केली नाही. हा अर्थसंकल्प ‘अर्थसंकल्प नव्हे तर निवडणूक संकल्प!’ आहे, अशी टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत आजच्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, ‘अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प!, असे ट्विट पाटील यांनी केले आहे.

दरम्यान यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधत टीका केली. देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. येत्या काही दिवसांत निवडणुकीसाठी मतदान सुद्धा होणार आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हा अर्थसंकल्प सादर केला असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी म्हंटले.

लसीकरण कमी असेल तर डॉक्टरांवर गुन्हे

औरंगाबाद – जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटर लावण्यात आले होते, त्यांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी. तसेच ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरण करा, ज्या भागात लसीकरण कमी आहे, तेथील डॉक्टरावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी आढावा बैठकीत सांगितले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक सोमवारी पार पडली. ज्या भागात लसीकरण कमी आहे त्या भागातील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे देखील दाखल करण्यात येतील. ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हिल’ अंतर्गत ज्या भागात लसीकरण कमी आहे त्या भागात वाहने नेण्यात यावे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर लावण्यात आले होते अशा रुग्णांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात यावी.

हा गट अशा रुग्णांपैकी किती रुग्णांनी पहिला, दुसरा डोस घेतला होता तसेच किती रुग्णांनी एकही डोस घेतला नाही अशा रुग्णांचा अभ्यास करेल असेही जिल्हाधिकारी म्हणाले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पासाहेब शिंदे, पोलिस उपायुक्त उज्वला बनकर, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सुधाकर शेळके उपस्थित होते.