Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2853

Budget 2022 : “मध्यम आणि लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटींची तरतूद” – अर्थमंत्री

नवी दिल्ली । देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केला. बजेट मध्ये मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकार कडून सुरूच आहे. त्याचाच भाग म्हणून मध्यम आणि लघु उद्योगांसाठी 2 लाख कोटींची तरतूद सरकार कडून करण्यात आला आहे.

पुढील 3 वर्षांत 400 वंदे भारत ट्रेन धावणार, 100 कार्गो टर्मिनल बांधणार: FM
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की,”पुढील तीन वर्षांत 400 नवीन वंदे भारत ट्रेन चालवल्या जातील. 100 PM गती शक्ती कार्गो टर्मिनल्स बांधले जातील आणि पुढील तीन वर्षात मेट्रो सिस्टीम तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब केला जाईल.”

हा अर्थसंकल्प पुढील 25 वर्षांसाठी अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट असेल: अर्थमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की,”हा केंद्रीय अर्थसंकल्प पुढील वर्षासाठी म्हणजे पुढील वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेचा आधार तयार करेल आणि अर्थव्यवस्थेची ब्लू प्रिंट देईल. या माध्यमातून भारत स्वातंत्र्याच्या 75 वर्षापासून ते 100 वर्षांपर्यंतचा प्रवास करेल.”

पुढील 5 वर्षात 40 लाख नवीन रोजगार निर्माण होतील : अर्थमंत्री
आत्मनिर्भर भारत योजनेची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यामुळे 60 लाख नवीन रोजगार निर्माण होतील आणि पुढील 5 वर्षात 30 लाख कोटींची अतिरिक्त निर्मिती होईल.

कृषी क्ष्रेतासाठी काम करणाऱ्या स्टार्ट अप्सना नाबार्डच्या माध्यमातून मदत केली जाणार, ९ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली जाणार. उत्तम फळे आणि भाजीपाल्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या मदतीने योजना लागू करणार आहे.

जिल्हा परिषद निवडणूका घ्या, अन्यथा मुदतवाढ द्या

aurangabad mahanagar

औरंगाबाद – राज्यातील 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका मुदतीत घ्याव्यात निवडणुका घेणे शक्य नसेल तर विद्यमान सभागृहाला एक वर्षाची मुदतवाढ द्या, अशी विनंती करणारा हस्तक्षेप अर्ज राज्यातील पाच वेगवेगळ्या जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. या अर्जावर 8 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

औरंगाबाद जिल्हा परिषदेसह राज्यातील 26 जिल्हा परिषदांची मुदत 20 मार्च रोजी समाप्त होत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आणि ग्रामपंचायत अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत निवडणूक घेऊ नयेत, अशी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घेतली आहे. याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे.

या याचिकेत जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती अविनाश गलांडे, राहुल वाघ (पुणे), पांडुरंग पवार (पुणे), ज्ञानेश्वर सांबरे (पालघर), संजय गजपुरे (चंद्रपूर) आणि शरद बुट्टे (पुणे) यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. या अर्जात त्यांनी न्यायालयास विनंती केली की राज्यात सध्या कोरोना, ओमायक्रॉनची साथ आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभागृहाला एक वर्षाची मुदतवाढ देऊन काम करण्याची संधी द्यावी.

Budget 2022 : अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषण वाचण्यास सुरुवात केली, म्हणाल्या,”भारताचा विकास दर 9.27 टक्के अपेक्षित आहे

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी औपचारिक बैठक घेतल्यानंतर संसद भवनात पोहोचल्या आहेत. दरम्यान, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील संसद भवनात पोहोचले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर अर्थमंत्री लोकसभेत अर्थसंकल्प सादर करायला केली. अर्थमंत्री सुमारे तीन वाजता अर्थसंकल्पाशी संबंधित पत्रकार परिषद घेऊ शकतात.

भारताचा विकास दर 9.27 टक्के अपेक्षित: अर्थमंत्री
लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की भारताचा विकास दर 9.27 टक्के असेल.

लसीकरणामुळे आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे: अर्थमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की,”आम्ही कोरोनाच्या ओमिक्रॉन लाटेच्या मध्यभागी आहोत. लसीकरणाच्या गतीने आम्हाला खूप दिलासा मिळाला आहे. मला आशा आहे की, सर्वांच्या प्रयत्नाने सशक्त विकासासाठी आमचे प्रयत्न सुरू राहतील.”

तरुण, महिला आणि शेतकऱ्यांसोबतच एससी-एसटीलाही अर्थसंकल्पाचा फायदा : अर्थमंत्री
अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की,”सार्वजनिक गुंतवणुकीत झपाट्याने वाढ झाली आहे आणि भांडवली खर्चातही वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पामुळे एससी-एसटीसोबतच तरुण, महिला आणि शेतकऱ्यांचाही फायदा होणार आहे. पीएम गति शक्ती मास्टर प्लॅन या अर्थसंकल्पात मार्गदर्शन करेल.”

ओबीसींना आरक्षणा शिवाय निवडणुका न घेण्याच्या निर्णयावर राज्यपालांचा सही करण्यास नका – छगन भुजबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाच्या अशा ओबीसी आरक्षण मिळावे आणि त्याशिवाय निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. त्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारमधी ओबीसी आरक्षणाबाबतच्या शिष्टमंडळाने राज्यपालांकडे ओबीसींना आरक्षण शिवाय निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली होती. या मागणीच्या प्रस्तावावर राज्यपालांनी सही करण्यास नकार दिला आहे, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मंत्री छगन भुजबळ यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. मंत्री भुजबळ म्हणाले की, राज्यपालांनी 8 कोटी ओबीसींच्या भवितव्याचा विचार केला पाहिजे. राज्यपालांचा गैरसमज झालेला दिसतोय. त्यांनी सही करायला नकार दिला आहे. मी मुख्यमंत्री आणि पवार साहेबांशी बोललो आहे. देवेंद्र फडणवीसांसोबतही बोलतो. हा राज्यातील 7 ते 8 कोटी ओबीसींचा प्रश्न आहे. मुंबईला गेल्यानंतर दोन तीन मंत्री राज्यपालांना भेटणार आहेत.

मुंबईला गेल्यानंतर दोन तीन मंत्री राज्यपालांना भेटणार आहेत, राजकारणाच विषय 12 आमदार, इकडे तिकडे तो भाग वेगळा आहे. हा सार्वत्रिक विषय आहे. ओबीसींचं नुकसान होईल असे अडथळे निर्माण करता कामा नये. ओबीसींवर अन्याय होईल असं करू नका. या विषयात राजकारण करू नये, असं भुजबळ म्हणाले.

Gold Price : अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सोन्याची चमक वाढली, आजचा दर तपासा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्थसंकल्पाच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, एप्रिलमध्ये डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव 0.04 टक्क्यांनी वाढला आहे, तर चांदीच्या किमती 0.08 टक्क्यांनी वाढल्या आहेत. आज 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 सादर करणार आहेत. ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

सोन्याचे ट्रेडिंग 48,000 च्या खाली
एप्रिल डिलिव्हरीसाठीचा सोन्याचा भाव आज 0.04 टक्क्यांनी वाढून 47,650 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या ट्रेडिंग मध्ये चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. आज 1 किलो चांदीचा भाव 0.08 टक्क्यांनी वाढून 61,025 रुपये झाला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,990 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,990 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 44,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 44,900 रुपये
पुणे – 44,850 रुपये
नागपूर -44,850 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 48,980 रुपये
पुणे -48,980 रुपये
नागपूर – 48,980 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4485.00 Rs 4500.00 0.333 %⌃
8 GRAM Rs 35880 Rs 36000 0.333 %⌃
10 GRAM Rs 44850 Rs 45000 0.333 %⌃
100 GRAM Rs 448500 Rs 450000 0.333 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4899.00 Rs 4915.00 0.326 %⌃
8 GRAM Rs 39192 Rs 39320 0.326 %⌃
10 GRAM Rs 48990 Rs 49150 0.326 %⌃
100 GRAM Rs 489900 Rs 491500 0.326 %⌃

अर्थिक फसवणुकीतून 26 वर्षीय युवकाची आत्महत्या : एका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह भावावर गुन्हा दाखल

sucide

सातारा | आर्थिक व्यवहारात फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून एका 26 वर्षीय युवकाने विषारी औषध पिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. युवकाच्या आत्महत्येस कारणीभूत असल्या प्रकरणी रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह त्याच्या भावास पोलिसांनी अटक केली आहे. जितेंद्र रविंद्र शिंदे (वय- 26, रा. पाटखळ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तर रयत क्रांती शेतकरी संघटनेचा पदाधिकारी शंकर शिंदे व त्याचा भाऊ अमर शिंदे (दोघे रा. पाटखळ ता. सातारा) अशी संशयित आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी रविंद्र शिंदे (वय ५८, रा.पाटखळ) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मृत जितेंद्र शिंदे यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जितेंद्र शिंदे, शंकर शिंदे व अमर शिंदे यांनी 3 वर्षापूर्वी भागीदारीमध्ये जलयुक्त शिवार योजनेत खटाव येथे बंधारे बांधण्याचे काम घेतले होते. संबंधित कामासाठी 6 लाख रुपयांचा खर्च झाला होता. त्यातील 3 लाख रुपये संशयित आरोपी शंकर व अमर शिंदे या भावांकडून जितेंद्र शिंदे याला येणे होते.

तीन लाख रुपयांपैकी केवळ 50 हजार रुपये संशयितांनी दिले. उर्वरीत 2 लाख 50 हजार रुपये येणे होते. जितेंद्र शिंदे राहिलेली रक्कम दोन्ही भावांना वेळोवेळी मागत होता. मात्र संशयित आरोपींनी ‘आमचेच नुकसान झाले आहे. पैसे देणार नाही. तुम्हाला कायद्याने कोणाकडून पैसे घ्यायचे ते घ्या,’ असे म्हणत दमदाटी करत होते. पैसे मिळत नसल्याने जितेंद्र शिंदे याला नैराश्य आले होते. यातूनच त्याने दि. 22 जानेवारी रोजी सायंकाळी गावात विषारी औषध प्राशन केले. या घटनेनंतर त्याला उपचारासाठी सिव्हील व पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दि. 30 रोजी जितेंद्र याचा उपचारावेळी मृत्यू झाला.

या घटनेनंतर वडिलांनी पोलिस ठाण्यात झालेल्या घटनेची माहिती देवून तक्रार असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी शंकर व अमर शिंदे या भावांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली. त्यांना न्यायालयात असता त्यांना हजर केले पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Stock Market : सेन्सेक्स 800 अंकांच्या वर तर निफ्टी 17,500 च्या वर गेला

Share Market

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. महामारीच्या काळात आगामी अर्थसंकल्प 2022 मध्ये सरकारचा पूर्ण भर अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर असू शकतो. अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळते. निफ्टी 200 हून जास्त अंकांनी वाढताना दिसत आहे. बाजारात तेजी कायम आहे. निफ्टी 17,500 च्या वर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, बँक निफ्टी 500 हून अधिक अंकांच्या वाढीसह 38,500 च्या वर ट्रेड करत आहे.

निफ्टी 200 अंकांनी वाढला
निफ्टीच्या 50 पैकी 42 शेअर्समध्ये खरेदी होत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 27 शेअर्समध्ये खरेदी होत आहे. निफ्टी बँकेचे सर्व 12 शेअर्समध्ये तेजी आहे. याशिवाय रियल्टी, हाऊसिंग फायनान्स शेअर्समध्येही प्रचंड उत्साह आहे.

सिमेंट शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. बँकिंग शेअर्समधील उत्साहाचा परिणाम म्हणजे बँक निफ्टी जवळपास 2 टक्क्यांच्या उसळीसह 38702 च्या आसपास दिसत आहे. यानंतर सर्वात मोठी वाढ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये दिसून येत आहे.

खत कंपन्या: अर्थमंत्र्यांनी आजच्या अर्थसंकल्पात खतांवरील सबसिडी वाढवण्याचा निर्णय घेतल्यास, कोरोमंडल इंटरनॅशनल, पीआय इंडस्ट्रीज, यूपीएल आणि रॅलिस इंडिया यांसारख्या शेअर्समध्ये वाढ होताना दिसू शकते.

Nifty 50 चे टॉप लूजर 
BPCL
TATAMOTORS
IOC 121.80
ONGC
DRREDDY
Nifty 50 चे टॉप गेनर 
 ICICIBANK
BRITANNIA
INFY 1,769.85
INDUSINDBK
SUNPHARMA

हिंदूस्तानी भाऊला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपच्या संबंधित लोकांची

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आंदोलना साठी विद्यार्थ्यांना भडकावल्याच्या आरोपाखाली हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला अटक करण्यात आली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी हिंदुस्थानी भाऊ आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपाचा डाव आहे असा आरोप सचिन सावंत यांनी केला.

हिंदूस्तानी भाऊ याला सोशल मीडिया वर प्रस्थापित करुन त्याला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपा/संघाच्या संबंधित लोकांची होती. अनेक वेळा हा व्यक्ती द्वेषपूर्ण व शिवीगाळ युक्त धर्मांध वक्तव्य करीत असताना फेसबुक व इतर सोशल मीडिया त्यावर कारवाई करत नव्हते. कारण त्याला संरक्षण होते.

हल्ली ज्या पध्दतीने मुलांना भडकवण्याचे काम करत आहे व पध्दतशीरपणे आंदोलनं केली जात आहेत त्यामागे मविआ सरकारला अडचणीत आणण्याचा भाजपाचा डाव दिसतो. या सर्व प्रकाराची खोल चौकशी मविआ सरकारने करावी अशी मागणी सचिन सावंत यांनी केली.

राज्य सरकारकडून मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी वाईन विक्रीचा निर्णय; अमृता फडणवीसांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून महाविकास आघाडी सरकावर वारंवार टीका केली जात आहे. दरम्यान त्यांनी आता पुन्हा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात आहे. सुपरमार्केटमध्ये वाईन विक्री करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. वाईन हि दारूच आहे. दुकानात वाईन ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

अँड्रूता फडणवीस यांनी पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे तो काही लोकांच्या फायद्यासाठी घेतलेला आहे. वाईन ही दारूच आहे. लहान मुले, महिला या किराणा दुकान तसेच सुपर मार्केट या ठिकाणी जात असतात. वाईन दुकानात ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे.

“राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विध्यार्थी आक्रमक झाले आहेत. याचा परिणाम ते रस्त्यावर उतरले. वास्तविक पाहता महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या नेत्यांना महाराष्ट्रात काय चालले आहे, हेच माहीत नसते. हे राज्य सरकार विद्यार्थी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे,” असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

हिंदुस्थानी भाऊला अटक; विद्यार्थ्यांना भडकवल्याचा आरोप

hindusthani bhau

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला आज पोलिसांनी अटक केली आहे. हिंदुस्थानी भाऊ याने एक विडिओ शेअर केल्यानंतर राज्यातील विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहतापाहता हिंसक झाले.त्यामुळे अखेर हिंदुस्थानी भाऊ ला अटक करण्यात आली आहे.

आज हिंदुस्थानी भाऊ ला 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे.  दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली आहे.

धारावी पोलीस ठाण्यात विकास जयराम पाठक (हिंदुस्थानी भाऊ), (41 वर्षे रा. ठि.19/बी प्यारीनगर गोविंद पाटील खार दांडा,खार पश्चिम मुंबई.) विरोधात रजिस्टर क्रमांक ३७/२०२२ कलम ३५३,३३२,४२७,१०९, ११४,१४३,१४५,१४६,१४९,१८८,२६९,२७० भा.द.वि सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 37 (३),१३५ जमाव बंदी आदेश भंगसह कलम 3 महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.