Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2854

राज्य सरकारकडून नवी नियमावली जारी; पहा कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळाली सूट

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असून त्याच पार्श्वभूमीवर सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. एक फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू होणार आहे. नव्या नियमावलीचा फायदा लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांना होणार आहे. मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांना सूट नव्या आदेशानं फायदा होणार आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचं 90 टक्के आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचं 70 टक्के लसीकरण झालंय याशिवाय 15 ते 18 वयोगटातील मुलांचं राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाण लसीकरण झालं आहे, अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत

स्विमिंग पूल,वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेनं सुरु

हॉटेल,थिएटर 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार

सलून, स्पा 50 टक्के क्षमतेनं सुरु

लग्नासाठी 200 जणांना परवानगी

अंत्ययात्रामध्ये उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आल्या नाहीत. किती लोक उपस्थित राहू शकतात.

उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेने.

सर्व कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेनं परवानगी

सर्व पर्यटनस्थळे नियमीत वेळेवर सुरु होतील. ऑनलाईन तिकिट खरेदी करावे लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्याचे लसीकरण झालेलं असावे.

स्थानिक प्रशासनाच्या वेळेनुसार बीचेस, गार्डन, पार्क खुली होणार

वॉटर पार्क, स्विमिंग पूल 50 टक्के उपस्थितीत सुरू होणार

भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के उपस्थितीत हॉलमध्ये घेता येणार

जिल्ह्यात आजपासून शाळांची घंटा वाजणार तर शहरात प्रतीक्षा

औरंगाबाद – ग्रामीण भागातील पहिली ते सातवीच्या शाळा आज पासून सुरू करण्याची परवानगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. यामुळे आता ग्रामीण भागातील पहिली ते बारावीचे वर्ग पूर्ण वेळ नियमित सुरू होतील अशी माहिती शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी दिली. शहरातील शाळा संदर्भात मात्र पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल.

राज्यात पहिली ते बारावीच्या शाळांतील प्रत्यक्ष शिक्षण 24 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने 20 जानेवारी रोजी जाहीर केला. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठवी ते बारावी चे वर्ग सुरू करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत 24 जानेवारी रोजी झाला. त्यानंतर आठवड्याभरातच पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश कटनी यांनी घेतला. त्यामुळे ग्रामीण भागातील पहिली ते बारावीचा नियमित शिक्षणाचा मार्ग खुला झाला आहे.

शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती व पूर्णवेळ शाळा सुरू राहिल्याने विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे शिक्षण आता प्रत्यक्ष घेता येणार असल्याचे परीक्षांची तयारी करणे सोपे होणार आहे. विद्यार्थ्यांची संमती पत्र घ्यावे, दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करून पूर्णवेळ शाळेत वर्गात शिकवण्यावर शिक्षकांनी लक्ष देण्याच्या सूचनाही देशमुख यांनी दिल्या आहेत.

ऊस तोडणी सुरु असताना सापडली बिबट्याची 3 पिल्लं; जवळपासच होती मादी बिबट्या

 कराड : तारुख येथिल पांढरीची वाडी येथील धरे शिवारात शेतकरी शंकर तुकाराम ढेरे यांच्या शेतात आज सोमवार दि. 31 जानेवारी रोजी दुपारी ऊस तोडणी सुरू असताना ऊस शेतात बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत. बिबट्याचा वावर, मानवी वस्तीत शिरकाव, प्राणी व माणसांवर होत असलेले हल्ले यामुळे किरपे, येणके नंतर आता तारूख व कूसूरू भागात शेतकरी, गावकरी चांगलेच धास्तावले आहेत.

तारुख येथे आज ऊसाच्या शेतात बिबट्याची दीड महिन्यापूर्वी जन्मलेली तीन पिल्ले सापडल्याने बिबट्याचा वावर या भागात कायमचा असल्याचे स्पष्ट होत आहे. आज दूपारी पिल्ली दृष्टीस पडताच शेतकऱ्यांनी पोलीस पाटील सतीश भिसे यांना याबाबतची माहिती दिली. भिसे यांनी घटनेचे गांर्भिय ओळखून वनाधिकारी व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना माहिती दिली.

वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याची पिल्ली ताब्यात घेतली. मादी बिबट्या ही जवळपासच होती व ती चिडून आक्रमक होऊ नये म्हणून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार सदर तीन पिलांचे आई सोबत भेट घडवून आणण्यांचे योजना आखण्यात आली, त्यानूसार सायंकाळी 6.30 वाजता सदर शिवारात पुन्हा तीन पिल्ले एका कॅरेट मध्ये घालून त्याच्या आजू बाजूस कॅमेरे लावून ठेवण्यात आले. कॅमेरा लावत असतानाच बिबट्याची मादी निदर्शनास आली, ती त्याच परिसरात घुटमळत होती. त्यामुळे पिल्ले कॅरेट मध्ये ठेवून कर्मचारी व अधिकारी जागेवरून निघून गेले.

यासाठी वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, हेमंत केंजळे, वनपाल बाबुराव कदम, सावखंडे, वनरक्षक रमेश जाधवर, भारत खटावकर, राठोड, व इतर वनकर्मचारी उपस्थित होते. सापडलेले तीन पिल्लं 1 नर जातीचे असून 2 माद्या आहेत. त्यांचे वजन 2.500 किलो, 2.400, व 2.300 असे अनुक्रमे आहे

धुळे- सोलापूर महामार्गावर कंटेनरच्या धडकेत पोलीस पाटलाचा मृत्यू

औरंगाबाद – धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पांढरी पिंपळगाव परिसरात स्कुटीला कंटेनर वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी-पिंपळगाव शिवारात दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. नारायण पंडितराव राऊत (वय 70, रा.हर्षी खुर्द ता. पैठण) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलिस पाटलाचे नाव आहे.

या अपघाताविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील हर्षी खुर्द येथील पोलिस पाटील नारायण राऊत हे त्यांच्या औरंगाबाद शहरामध्ये राहत असलेल्या घरी पत्नी व मुलाला भेटण्यासाठी घरून हर्षीहुन (आडूळ मार्गे) औरंगाबादकडे एकटेच आपल्या स्कूटीने (एमएच 20 ईक्यु 5404 ) जात असताना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी-पिंपळगाव शिवारात बीडहुन औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनर वाहनाने ( एचआर 38 एबी 9477 ) त्यांच्या स्कूटी दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की राऊत हे कंटेनरच्या धडकेत चिरडले गेले. राऊत यांच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. ते घटनास्थळीच जागीच ठार झाले. हा भीषण अपघात घडताच कंटेनर चालकाने वाहन घटनास्थळी न थांबविता तसेच राऊत यांची अपघातग्रस्त स्कूटी दुचाकी अपघातग्रस्त कंटेनरला जाम गुंतुन जवळपास तब्बल सात किलोमीटर अंतरापर्यंत निर्दयीपणे फरफटत आणली. मात्र घटनास्थळी असलेल्या काही युवकांनी पाठलाग करत चित्तेपिंपळगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने त्या वाहनाचा पाठलाग करून वाहनासह चालकाला चित्तेपिंपळगाव येथे पकडले.

या अपघाताची माहिती मिळताच चिकलठाणा पोलिस, चित्तेपिंपळगाव येथे व करमाड पोलिस घटनास्थळी लगेचच दाखल झाले होते. या अपघाताची नोंद करमाड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास करमाड पोलिस करीत आहेत. मृत नारायण राऊत यांच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी हर्षी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

 

इंस्टाग्रामवरील मैत्री पडली महागात ! गुंगीचं औषध पाजून 22 वर्षीय तरुणाने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य

भोपाळ : वृत्तसंस्था – इन्स्टाग्राम झालेली मैत्री एका तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. आरोपीने पीडित मुलीला हॉटेलमध्ये बोलावून कोल्ड ड्रिंकमधून गुंगीचे औषध दिले. यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिच्यासोबत मद्यधुंद अवस्थेत लैंगिक अत्याचार केले. हि घटना मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये भंवरकुआं पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे. पीडित मुलीची आरोपीशी इन्स्टाग्रामवरुन ओळख झाली होती. आरोपीने पीडित तरुणीला भेटायच्या बहाण्याने बोलावून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला आहे. पीडित मुलगी हि अकरावीची विद्यार्थिनी आहे. यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?
मध्य प्रदेशातील इंदौर शहरातील भंवरकुआं पोलीस स्टेशन परिसरात हि पीडित तरुणी राहते. ती अकरावीची विद्यार्थिनी आहे. यादरम्यान तिची विनायक गिडवानी नावाच्या तरुणाशी इन्स्टाग्राम ओळख झाली. हा आरोपी तरुण बेराठी कॉलनी या ठिकाणी राहतो. या पीडित तरुणीशी ओळख करण्याचा त्याचा हेतू वेगळाच होता.

मैत्रीच्या जाळ्यात अडकवले
आरोपीने सर्वात आधी अल्पवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर मैत्रीच्या जाळ्यात अडकवले. यानंतर तिच्या मैत्रीचा फायदा घेत तिला हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. याठिकाणी तिला कोल्ड ड्रिंक प्यायला दिले. या कोल्ड ड्रिंकमध्ये त्याने गुंगीचे औषध मिसळले होते. यामुळे कोल्ड ड्रिंक प्यायल्यामुळे हि तरुणी बेशुद्ध झाली. यानंतर आरोपी तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

लातूरमध्ये भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू

Accident

लातूर : हॅलो महाराष्ट्र – लातूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये जिल्ह्यातील शिवणी- पेठ येथून लातूरकडे मुलीला शाळेत सोडण्यासाठी मोटरसायकलवर येणाऱ्या बाप-लेकीला हायवाने चिरडले आहे. हि घटना बाभलगाव नाका परिसरामध्ये घडली आहे. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
शिवणी- पेठ येथील रहिवासी असलेले शिक्षक दत्तात्रय कोंडीबा पांचाळ आणि प्रतीक्षा दत्तात्रय पांचाळ हे दोघेजण लातूरमधील जिजामाता विद्यालयात आपल्या मोटारसायकलवरून निघाले होते. यादरम्यान लातूर शहरानजीक म्हाडा कॉलनी, बाभळगाव नाका परिसरात त्यांच्या मोटारसायकलला भरधाव हायवा वाहनाने चिरडले.

या भीषण अपघातात बाप लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. प्रतीक्षा ही इयत्ता आठवीत शिकत होती. वडील दत्तात्रय कोंडीबा पांचाळ हे तिला शाळेत सोडण्यासाठी येत होते. मृत दत्तात्रय कोंडीबा पांचाळ हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. या अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांकडून हायवा चालकाचा शोध घेण्यात येत आहे.

पेट्रोलने भरलेल्या ट्रक शेजारी चालती दुचाकी पेटलीे अन् त्यानंतर.. पहा CCTV फुटेज

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहरातील पोवई नाक्यावरील रेणूका पेट्रोल पंपावर एका दुचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. त्यावेळी तेथील कर्मचारी जावेद शेख याने घटनेचे गार्भिय ओळखून फायरचा सिलेंडर फोडून आग विझविली‌. कर्मचाऱ्यांच्या प्रसंग सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला.

त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. कर्मचारी जावेद शेख याच्या धाडसाचे कौतुक करीत पंपाचे मालक रितेश रावखंडे यांनी सत्कार केला. घटना पूर्ण पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्हीत कैद झालेली आहे.

सातारा शहरातील मुख्य रहदारीच्या ठिकाणी आग लागल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पेट्रोल पंपावर दुचाकी पेटलेल्या ठिकाणी शेजारीच अगदी काही फुटांवर ती पेट्रोलचे भरलेला ट्रक उभा होता. या आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला होता.

गर्भवती महिलेसोबत डॉक्टरचे ‘हे’ घृणास्पद कृत्य; तपासणीसाठी नेले अन्…

hingoli crime

हिंगोली : हॅलो महाराष्ट्र – हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ याठिकाणी वैद्यकीय पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका डॉक्टरने त्याच्याकडे तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेसोबत लैंगिक चाळे केले. यानंतर पीडित महिलेने याची माहिती आपल्या कुटुंबियांना दिल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी डॉक्टरला ताब्यात घेतले. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण ?
गणेश बंडेवार असे गुन्हा दाखल झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 24 वर्षीय पीडित महिला चार महिन्यांची गरोदर होती. शनिवारी अचानक तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे ती रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आपल्या एका नातेवाईकाला घेऊन, औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. या ठिकाणी गेल्यानंतर पीडित महिलेने रुग्णालयातील एका परिचारिकेला होणारा त्रास सांगितला.

यानंतर संबंधित परिचारिकेनं पीडितेच्या पोटात दुखत असल्याची माहिती आरोपी वैद्यकीय अधिकारी गणेश बंडेवार याला दिली. त्यानंतर आरोपी बंडेवार याने तपासणी करण्यासाठी पीडित महिलेला प्रसूतीगृहात नेले. याठिकाणी आरोपीने तपासणी करण्याच्या बहाण्याने पीडित महिलेसोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. यानंतर घाबरलेल्या महिलेने आपल्यासोबत असलेल्या नातेवाईकाला याची माहिती दिली. त्यानंतर पीडित महिलेच्या नातेवाईकानं थेट औंढा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संशयित डॉक्टरच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. औंढा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

बाबा माझा चेहरा शेवटचा बघून घ्या असे म्हणत मॉडेलचा आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचला, मात्र…

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील जोधपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बहुमजली हॉटेलच्या इमारतीतून तरुणीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव गुनगुन उपाध्याय असे आहे. गुनगुन उपाध्याय हि एक मॉडेल आहे. गुनगुनने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गुनगुनने आत्महत्या करण्याअगोदर फक्त माझा चेहरा पहा, असे वडिलांना सांगितले होते. मात्र तिने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून स्पष्ट झाले नाही. जोधपूर शहरातील रातानाडा भागामध्ये हि घटना घडली आहे. गुनगुन ही थान भागात राहणाऱ्या व्यापारी गणेश उपाध्याय यांची मुलगी आहे. रविवारी रात्री ती हॉटेल लॉर्ड्समध्ये थांबली असताना हि धक्कदायक घटना घडली आहे.

काय आहे प्रकरण?
गुनगुन उपाध्याय हि एक मॉडेल आहे. ती शनिवारी उदयपूरहून जोधपूरला आली होती. जोधपूरला आल्यानंतर तिने वडिलांना फोन करुन आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. यावेळी तिने फक्त माझा चेहरा पहा, असे तिने आपल्या वडिलांना सांगितले. यानंतर गुनगुनचे वडील गणेश उपाध्याय यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी
गणेश उपाध्याय यांच्या सांगण्यावरून एसीपी देरावर सिंह यांनी फोन नंबरच्या आधारे गुनगुनचे लोकेशन शोधून काढले.यानंतर पोलीस रातानाडा परिसरातील हॉटेलवर पोहोचले पण त्यागोदरच गुनगुनने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली होती. तिला उपचारांसाठी तातडीने मथुरादास माथूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मॉडेल गुनगुनची प्रकृती गंभीर
गुनगुनच्या छातीसोबतच तिच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. सध्या तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मात्र तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. गुनगुन उंचावरुन खाली पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे अशी माहिती गुनगुनवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे. गुनगुनचे वडील जोधपूरमधील बाजारात व्यापारी आहेत. गुनगुन शुद्धीवर आल्यानंतरच तिने टोकाचे पाऊल का उचलले हे समजणार आहे.

अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण रिपोर्टमधील सर्व महत्त्वाच्या गोष्टी 10 पॉइंट्सद्वारे समजून घ्या

Economic Survey

नवी दिल्ली । केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट 2022 चे डॉक्युमेंट संसदेत सादर केले. आर्थिक सर्वेक्षणाने 2022-23 मध्ये 8 टक्के ते 8.5 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. या रिपोर्ट द्वारे अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेचा पुढचा रस्ता मांडला. आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट मधील मुख्य मुद्दे समजून घेऊ.

1- आर्थिक सर्वेक्षण रिपोर्ट नुसार, आर्थिक वर्ष 2021-22 साठी विकास दर 9.2 टक्के असेल. त्याच वेळी, पुढील वर्षासाठी (आर्थिक वर्ष 2022-23) वाढीचा अंदाज 8-8.5 टक्के ठेवण्यात आला आहे.

2- रिपोर्ट नुसार, यावर्षी शेतीने दमदार कामगिरी केली. याशिवाय औद्योगिक उपक्रमांनाही वेग आला आहे. कृषी क्षेत्राची वाढ 3.9 टक्के आणि औद्योगिक क्षेत्राची वाढ 11.8 टक्के राहण्याचा अंदाज आहे. चालू आर्थिक वर्षासाठी सर्व्हिस सेक्टरच्या वाढीचा अंदाज 8.2 टक्के ठेवण्यात आला आहे. 2020-21 मध्ये औद्योगिक क्षेत्रात नकारात्मक (-7%) वाढ झाली. गेल्या वर्षी म्हणजे 2020-21 मध्ये सर्व्हिस सेक्टरमध्ये 8.6% ची घसरण झाली.

3- सरकारच्या उत्पन्नात झपाट्याने सुधारणा झाल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. यासह सरकार आर्थिक उपाययोजना जाहीर करण्याच्या स्थितीत आहे. जीएसटी कलेक्शन उत्कृष्ट झाले आहे. याशिवाय टॅक्स कलेक्शन मध्येही वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2021-22 च्या तिसऱ्या हप्त्यासाठी ऍडव्हान्स टॅक्स कलेक्शन 53.5 टक्क्यांनी वाढले आहे तर 2021-22 या आर्थिक वर्षासाठी नेट डायरेक्ट टॅक्स कलेक्शन वेगाने वाढले आहे. 60 टक्क्यांपेक्षा जास्त.

4- रिझर्व्ह बँकेकडे पुरेसा परकीय चलनाचा साठा असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. सध्या RBI च्या तिजोरीत $635 अब्ज एवढा राखीव निधी आहे. हा राखीव 13 महिन्यांपेक्षा जास्त आयात आणि भारत सरकारच्या विदेशी कर्जाचा आहे. याशिवाय निर्यातही झपाट्याने वाढत आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर दरम्यान देशाची निर्यात जवळपास 50 टक्क्यांनी वाढून $302 अब्ज झाली आहे. याशिवाय FDI मध्येही तेजी आहे. त्यामुळे, लिक्विडिटी टॅम्परिंग (बॉन्ड्सची खरेदी कमी करणे आणि सिस्टीममधील लिक्विडिटीचा पुरवठा कमी करणे) भावनांवर जास्त नकारात्मक परिणाम करणार नाही.

5- आर्थिक सर्वेक्षणात शेअर बाजारातील वाढत्या गुंतवणुकीवर समाधान व्यक्त करण्यात आले आहे. आपत्ती असतानाही, नोव्हेंबर 2021 पर्यंत IPO द्वारे 89 हजार कोटींहून जास्त रक्कम जमा झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात IPO च्या माध्यमातून जास्त पैसा जमा झाला आहे.

6- आर्थिक मंदीबाबत आर्थिक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मागणी जोर धरत नाही. ANI ने आर्थिक सर्वेक्षण रिपोटचा हवाला देत म्हटले आहे की, चालू आर्थिक वर्षात कन्झम्पशनमध्ये 7 टक्के वाढ होईल. मात्र, या मागणीत सरकारचा मोठा वाटा आहे. जोपर्यंत सार्वजनिक मागणी जोर धरत नाही, तोपर्यंत ही स्थिती चिंताजनक आहे. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर वार्षिक आधारावर 5.6 टक्के होता, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. मात्र, घाऊक महागाईचा दर दुहेरी अंकात आहे.

7- बँकिंग क्षेत्राबाबत असे सांगण्यात आले की, बँकिंग क्षेत्रात लिक्विडिटीची कमतरता नाही. याशिवाय बुडीत कर्जातही घट झाली आहे. एकूणच, भारताची अर्थव्यवस्था 2022-23 या आर्थिक वर्षात वाढीचा वेग वाढवण्यास सज्ज आहे.

8- कोरोनामुळे भारतात पुरवठ्याची समस्या जास्त गंभीर असल्याचेही सर्वेक्षणात म्हटले आहे. मागणी नेहमीच होती. अर्थव्यवस्था कोरोनापूर्व पातळीपर्यंत पोहोचली आहे.

9- सर्वेक्षण रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की PLI योजना सध्या 13 क्षेत्रांसाठी लागू करण्यात आली आहे. यामध्ये ऑटोमोबाईल आणि ऑटो कॉम्पोनंट्स, फार्मास्युटिकल्स, स्पेशॅलिटी स्टील, टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स, व्हाईट गुड्स, फूड प्रॉडक्ट्स, टेक्सटाईल प्रॉडक्ट्स यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.

10- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जीएसटी कलेक्शनवर मर्यादित परिणाम झाल्याचे सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे. जुलै 2021 पासून, सतत जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींच्या पुढे गेले आहे.