Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 2856

शेअर मार्केटमधील चढ उतारा दरम्यान ‘हे’ 10 शेअर्स देत आहेत जोरदार रिटर्न

Stock Market

नवी दिल्ली । सर्वसाधारण अर्थसंकल्पाच्या अवघ्या एक दिवस आधी भारतीय शेअर बाजारात हिरवाई पाहायला मिळाली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. गेल्या 10 वर्षात पहिल्यांदाच प्री-बजेट मार्केटमध्ये एवढी मोठी तेजी पाहायला मिळत आहे. मात्र, 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प येण्यापूर्वीच्या शेवटच्या दोन आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टी 6 टक्क्यांहून जास्तीने घसरला होता.

गेल्या आठवड्यात, निफ्टी 16,836 पर्यंत खाली आला, मात्र अस्थिरतेच्या दरम्यान 17000 राखण्यात यशस्वी झाला. येत्या काही दिवसांत 16800 ची पातळी निफ्टीसाठी महत्त्वाचा आधार म्हणून काम करेल, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर निफ्टीने ही पातळी केंद्रीय अर्थसंकल्पापर्यंत राखली, तर शॉर्ट कव्हरिंगमुळे चांगली रॅली येऊ शकते.

जरी बाजारात रिकव्हरी असली तरी, बजेटपूर्वी 17,350-17,500 अडथळा ओलांडण्याची शक्यता नाही. आता जे काही ब्रेकआऊट व्हायचे ते बजेटच्या दिवशी की नंतर दिसेल. तोपर्यंत बाजार आपल्याला बांधलेला दिसेल. अशा परिस्थितीत आपण केवळ निवडक शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे.

Cadila Healthcare : Buy | LTP: Rs 396 | कॅडिला हेल्थ 378 रुपयांच्या स्टॉपलॉससह खरेदी करा, 432 रुपयांचे टार्गेट. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 9 टक्के रिटर्न देऊ शकतो.

Maruti Suzuki : Buy | LTP: रु 8,550.95 | मारुती सुझुकीला 8,240 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करा आणि 9,000 रुपयांचे टार्गेट ठेवा. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 5 टक्के रिटर्न देऊ शकतो.

JB Chemicals and Pharmaceuticals : Buy | LTP: Rs 1,759.10 | 1,625 रुपयांच्या स्टॉप लॉससह JB केमिकल्स खरेदी करा, 1,970 रुपयांचे टार्गेट ठेवा. 2-3 आठवड्यात हा स्टॉक 12 टक्के रिटर्न देऊ शकतो.

IDFC : Buy | LTP: रु. 64.05 | IDFC ला 58 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदी करा, 74 रुपयांचे टार्गेट. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 15 टक्के रिटर्न देऊ शकतो.

Polyplex Corporation : Buy | LTP: रु. 1,815.55 | 1,700 रुपयांच्या स्टॉप लॉससह पॉलीप्लेक्स खरेदी करा आणि 2,000 रुपयांचे टार्गेट ठेवा. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 10 टक्के रिटर्न देऊ शकतो.

Tata Power : Buy | LTP: रु 244.05 | या शेअर्ससाठी 280 रुपयांच्या टार्गेटसाठी रु. 220 च्या स्टॉप लॉससह खरेदीचा सल्ला दिला जाईल. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 23 टक्के रिटर्न देत आहे.

LIC Housing Finance : Buy | LTP: रु 383.15 | 445-465 रुपयांच्या टार्गेटसाठी 360 रुपयांच्या स्टॉप लॉससह या शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला जाईल. हा स्टॉक 3-4 आठवड्यात 21 टक्के रिटर्न देत आहे.

Tata Motors : Buy| LTP: रु 497.30 | 535-550 रुपयांच्या टार्गेटसाठी 460 रुपयांच्या स्टॉप लॉससह या शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला जाईल. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 11 टक्के रिटर्न देत आहे.

Gujarat Ambuja Exports : Buy | LTP: रु 208.65 | या शेअर्ससाठी 232-255 रुपयांच्या टार्गेटसाठी 188 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदीचा सल्ला दिला जाईल. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 22 टक्के रिटर्न देत आहे.

PSP Projects : Buy | LTP: रु 575.35 | 640-685 रुपयांच्या टार्गेटसाठी 520 रुपयांच्या स्टॉप लॉससह या शेअर्समध्ये खरेदीचा सल्ला दिला जाईल. हा स्टॉक 3-4 आठवड्यात 37 टक्के रिटर्न देत आहे.

Maruti Suzuki : Buy | LTP: रु 8,550.95 | या शेअर्समध्ये 9,050-9,250 रुपयांच्या टार्गेटसह 8,300 च्या स्टॉप लॉससह खरेदीचा सल्ला दिला जाईल. हा स्टॉक 3-4 आठवड्यांत 8 टक्के रिटर्न देत आहे.

Bank of Baroda : Buy | LTP: रु 103.30 | या शेअर्समध्ये 120-135 रुपयांच्या टार्गेटसाठी 90 च्या स्टॉप लॉससह खरेदीचा सल्ला दिला जाईल. या 3-4 आठवड्यांत 31 टक्के रिटर्न देत आहे.

गोव्यात भाजपने आत्मपरीक्षण करणे गरजेचे; एकनाथ शिंदे यांचा टोला

Eknath Shinde

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आज मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद आदी ठिकाणी दहावी आणि बारावीमधील विध्यार्थ्यानी ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात आंदोलन केले जात आहे तर दुसरीकडे गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्पल पर्रीकर यांची उमेदवारी नाकारली आहे. यावरून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. विद्यार्थी आंदोलनामुळे लॉ अँड ऑडर बिघडणार नाही याची संबंधित मंत्री काळजी घेत आहेत. असे सांगत गोव्यात शिवसेनेला यश मिळेल . मात्र, आता भाजपने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असा टोला मंत्री शिंदे यांनी लगावला.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज मुंबईसह इतर ठिकाणी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षेबाबत आंदोलन केले आहे. विद्यार्थी आंदोलनामुळे लॉ अँड ऑडर बिघडणार नाही याची संबंधित मंत्री काळजी घेत आहे.

दरम्यान, गोवा निवडणूक शिवसेनेने उमेदवारी मागे घेतली आहे. तरी देखील या ठिकाणी शिवसेनेला यश मिळेल. तसेच उत्पल परिकर हे मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव आहेत. त्यांना थांबल्यामुळे गोव्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता भाजपवाल्यानी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असा टोला मंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला.

गायीला वाचवण्याच्या नादात पिक अप व्हॅनचा भीषण अपघात

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये गायीला वाचवण्याच्या नादात पिक अप व्हॅनचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये पिक अप व्हॅनमधील क्लीनर गंभीर जखमी झाला आहे.संबंधित पिक अप व्हॅन वरोऱ्याच्या दिशेने निघाली असताना वाटेत गाय आडवी आली, त्यावेळी गायीला धडकण्यापासून वाचवण्याच्या नादात पिक अप व्हॅन चालकाने जोरदार ब्रेक मारला. त्यामुळे ड्रायव्हरचे वाहनावरुन नियंत्रण सुटले आणि पिक अप गाडी रस्त्याच्या दुभाजकावर चढून पलटी झाली. या भीषण अपघातात पिक अप व्हॅनचा वाहक जखमी झाला आहे, तर चालक सुखरुप आहे.

नेमका कशा प्रकारे घडला अपघात ?
वणी-घुग्गुस मार्गावरून एम एच 34 ए व्ही 3135 या नंबरची पिकअप गाडी वरोऱ्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी अचानक रस्त्यात गाय आडवी आल्याने तिला वाचवण्यासाठी चालकाने ब्रेक लावला. यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हि पिक अप गाडी रस्त्याच्या दुभाजकावर चढून पलटी झाली. या अपघातात वाहक जखमी झाला आहे तर चालक सुखरूप वाचला आहे.

जखमी वाहकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे मोकाट गुरा-ढोरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. त्यावर काहीतरी उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी लोकांकडून करण्यात येत आहे.

मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सध्या गोवा विधानसभा निवडणुकीमुळे अनेक पक्षांकडून गोव्यात प्रचाराचा धडाका लावला जात आहे. दरम्यान आज काँग्रेसच्यावतीने गोव्यात महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप सरकारवनिशाणा साधला. “भाजपने देशाच्या आणि राज्याच्या जनतेची लूट सुरू केली आहे. मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली.

पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पणजीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी गोव्याचे प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेसच्या प्रवक्त्या अलका लांबा, महिला अध्यक्ष बीना नाईक, सुनिल कवठणकर आणि नौशाद चौधरी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले की, “महागाईवर मात करायची असेल तर भाजपचा पराभव करावा लागणार आहे. नोटबंदी, तसेच वस्तू आणि सेवाकर (GST) लागू करणे हे मोदी सरकारची मोठी चूक होती. यंदा भाजपला आमदार पळवून सरकार स्थापन करण्याची संधी गोव्यातील जनता देणार नाही.’’

‘‘सध्या देशाची आर्थिक परिस्थिती खुपच वाईट आहे. पण मोदी सरकार ती फुगवून दाखवत आहे.’’ मोदी सरकारचे अर्थव्यवस्थेवरचे नियंत्रण सुटलेले आहे आणि सद्याची स्थिती खुपच गंभीर आहे. या वर्षाच्या अंदाजपत्रकात मोदी कसे आकडे दाखवतात त्याच्यावर देशातील लोकांची नजर आहे. “मोदी सरकारने महागाई वाढवून गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या भावनांशी खेळ केला आहे. लोकांना त्रास दिला आहे. असे असताना, त्यांच्या भांडवलदार मित्रांचे उत्पन्न दिवसेंदिवस हजारो कोटींनी वाढत आहे.” असे चव्हाण म्हणाले.

पाच राज्यात महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन

यावेळी काँग्रेसने महागाईवरील पुस्तिकेचे प्रकाशन करीत लोकार्पण केले. या पुस्तिकेचे प्रकाशन देशात एकाचवेळी पाच राज्यातील 7 ठिकाणी करण्यात आले. यामध्ये गोव्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, लखनऊ येथे रणदिप सुरजेवाला, चंदीगड येथे छत्तीसगड चे मुख्यमंत्री भूपेश बघेल, जलंधर येथे दिग्विजय सिंह, डेहराडून येथून सचिन पायलट, मेरठ येथून हार्दिक पटेल आदींनी महागाई वरील पुस्तिकेचे प्रकाशन केले.

LIC Policy : चांगल्या रिटर्नसाठी ‘या’ पॉलिसीमध्ये करा गुंतवणूक

LIC

नवी दिल्ली । भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने एक नवीन योजना आणली आहे. LIC च्या या नवीन पॉलिसीचे नाव धन रेखा आहे. LIC ची नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग पर्सनल सेव्हिंग लाईफ इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला 125% पर्यंत इन्शुरन्स रक्कम देईल. LIC च्या म्हणण्यानुसार या पॉलिसीमध्ये महिलांसाठी विशेष प्रीमियम दर ठेवण्यात आला आहे. याशिवाय त्यात तृतीय लिंगाचीही तरतूद करण्यात आली आहे.

यासोबतच सिंगल आणि लिमिटेड प्रीमियम असे दोन प्रकारचे प्रीमियम भरण्याचा पर्यायही यात देण्यात आला आहे. शेअर बाजाराशी संबंध नसल्यामुळे त्यात धोकाही कमी असतो. या पॉलिसीशी संबंधित सर्व महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या.

‘या’ पॉलिसीची वैशिष्ट्ये जाणून घ्या
धनरेखा योजना पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत पुरवते. पॉलिसी टर्म दरम्यान नियमित अंतराने ‘सर्व्हायव्हल’ लाभ म्हणून मूलभूत सम एश्युअर्डचा एक निश्चित भाग देण्याची तरतूद आहे. मात्र पॉलिसी कार्यरत स्थितीत असावी, अशी अट आहे.

पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला आधीच मिळालेली रक्कम वजा न करता संपूर्ण विमा रक्कम दिली जाईल. त्याच वेळी, पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारक जिवंत असल्यास, त्याला गॅरेंटेड एकरकमी रक्कम दिली जाते.

डेथ बेनिफिट
डेथ बेनिफिट एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये 5 वर्षांपर्यंत मिळू शकतो. हे हप्ते मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकतात. किमान हप्ता मासिक आधारावर रुपये 5000, त्रैमासिक आधारावर रुपये 15000, सहामाही आधारावर रुपये 25000 आणि वार्षिक आधारावर 50000 रुपये आहे.

किमान विमा रक्कम
धन रेखा पॉलिसी ही मनी बॅक योजना आहे. यामध्ये, पैसे परत करण्याव्यतिरिक्त, तुम्हाला शेवटी गॅरंटेड बोनस देखील मिळतो. या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 2,00,000 रुपये आहे. यासाठी कमाल मर्यादा नाही.

किमान वय किती आहे ?
पॉलिसीच्या अटींनुसार, ही योजना 90 दिवसांपासून ते 8 वर्षे वयापर्यंत मुलाच्या नावावर घेतली जाऊ शकते. त्याचप्रमाणे 35 ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्तीही याचा लाभ घेऊ शकतात.

कोरोनाचा रोजगारावर प्रभाव; सर्व्हिस सेक्टर वर झाला सर्वाधिक प्रभाव

नवी दिल्‍ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण 2022 सादर करताना सांगितले की,”कोविड 19 महामारीचा रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. सर्व्हिस सेक्टरच्या PMI मध्येही मोठी घसरण होती, विशेषत: अशा सेक्टरमध्ये जिथे लोकं एकमेकांच्या संपर्कात येतात.

देशाच्या 60 टक्के रोजगारामध्ये सर्व्हिस सेक्टरचे योगदान असून निर्यात क्षेत्रातही सर्व्हिस सेक्टरचा मोठा वाटा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. या महामारीचा विशेषतः अशा भागांवर परिणाम झाला ज्यामध्ये लोकं एकमेकांच्या संपर्कात आले. हॉटेल, विमान वाहतूक यांसारख्या क्षेत्रातील रोजगारावर मोठा परिणाम झाला. आता आमचे लक्ष या क्षेत्रात अधिकाधिक रोजगार निर्मितीवर असेल. दुसऱ्या लाटेनंतर बेरोजगारीचा दर 15 टक्क्यांवर पोहोचला.

आत्मनिर्भर भारत अभियानाने देश जगाचा कारखाना बनेल
अर्थमंत्री म्हणाल्या कि,” देशांतर्गत उद्योगांना चालना देण्यासाठी आणि उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत उत्पादन आधारित प्रोत्साहन (PLI) सारखी योजनाही आणण्यात आली आहे. आता भारताला जगाचा कारखाना बनवण्याचे ध्येय आपण साध्य करू. उद्योगांना तांत्रिक आणि आर्थिक मदत देऊन देशांतर्गत उत्पादन वाढवणार. मेक इन इंडिया अंतर्गत भारतात उत्पादन करण्यासाठी जगभरातील कंपन्यांना आमंत्रित करण्यावर आमचा भर आहे. यासाठी व्यवसाय करण्याची सुलभता वाढवण्यासोबतच कॉर्पोरेट टॅक्सही कमी करण्यात आला आहे.” राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) 202-22 मध्ये औद्योगिक क्षेत्रात 11.8 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.

चिप टंचाईमुळे 169 उद्योगांवर परिणाम झाला
आर्थिक सर्वेक्षणात असे सांगण्यात आले आहे की, सेमीकंडक्टर म्हणजेच चिपच्या कमतरतेचा परिणाम केवळ वाहन आणि इलेक्ट्रॉनिक्स सेक्टरवरच नाही तर 169 उद्योगांवर दिसून येत आहे. चिपची पुरवठा साखळी जगभरात बिघडली आहे. हे पाहता केंद्र सरकारने PLI योजनेंतर्गत 76 हजार कोटी रुपयांचे इन्सेन्टिव्ह देण्याची चर्चा केली आहे. याद्वारे 100 देशांतर्गत कंपन्यांना मदत दिली जाईल, ज्यामुळे 1.35 लाख रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. सेमीकंडक्टर बनवण्यासाठी उद्योगाला मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गरज असून ही योजना सुरू होण्यासाठी 6 ते 9 महिने लागतील, असे सर्वेक्षणात म्हटले गेले आहे.

सात वर्षांतील सर्वाधिक गुंतवणूक
आर्थिक सर्वेक्षणानुसार, देशात गुंतवणुकीचा वेग वाढत आहे आणि हा कोरोना पूर्व पातळीच्याही पुढे पोहोचला आहे. ग्रॉस फिक्स्ड कॅपिटल फॉर्मेशन (GFCF) या वर्षी 15 टक्क्यांनी तीव्र झेप दाखवत आहे. सरकारच्या धोरणांमुळे खाजगी गुंतवणूक आणि भांडवली खर्चात सातत्याने वाढ होत आहे. भांडवल ते GDP रेश्यो 29.6 टक्क्यांपर्यंत वाढला आहे, जी गेल्या सात वर्षांतील सर्वोच्च पातळी आहे.

कर्जाची रक्कम वाढली पण खर्च कमी झाला
अर्थमंत्र्यांनी आर्थिक सर्वेक्षणात सांगितले की,”2021-22 मध्ये महामारीमुळे प्रभावित झालेल्या केंद्र आणि राज्य सरकारांना त्यांचा खर्च भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावे लागले. यामुळेच चालू आर्थिक वर्षात बाजारातील एकूण कर्जात 141 टक्क्यांहून अधिकने वाढ झाली, मात्र सरकारने उचललेल्या पावलांमुळे क्रेडिट खर्च कमी ठेवण्यात आला. सरकारी सिक्योरिटीजच्या मदतीने, कर्जाची किंमत 5.79 टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवली गेली, जी 17 वर्षांची नीचांकी आहे.

…म्हणून उत्पल पर्रिकरांनी भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या पाठींब्याबाबत उदय सामंतांची प्रतिक्रिया

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात उत्पल पर्रिरकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या अर्ज भरल्यानंतर शिवसेनेकडून पर्रिरकरां विरोधातील उमेदवार अर्ज मागे घेण्यात आला असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. केवळ मनोहर पर्रिकर यांचे पुत्र असल्यामुळे उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्याचा शिवसेनेला नक्की फायदा होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी जे विधान केलेले आहे ते योग्य आहे. शिवसेनेची हि प्रथा आणि परंपरा आहे कि ती दिलेला शब्द पाळते. मनोहर पर्रिकर यांच्या रूपाने भाजपला एक संजीवनी देणारे नेतृत्व गोव्यात होते. ते आता पडद्याआड गेल्यानंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी न देणे हा काय राजकीय प्रकार आहे.

हे गोवा वासीयांच्या लक्षात आलेला आहे. देशाच्याही लक्षात आलेला आहे. उत्पल पर्रिकर हे पर्रिकर यांचे पुत्र असल्यामुळे भाजपने त्यांची उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेच्या मनात भाजपबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्याचा शिवसेनेला नक्की फायदा होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊचा हात?? त्या व्हिडिओ नंतर विद्यार्थी रस्त्यावर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात याव्या म्हणून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलयामागे हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास पाठक यांचा हात असल्याची शक्यता समोर येत आहे. हिंदुस्थानी भाऊचा चार दिवसांपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतरच विद्यार्थी आक्रमक झाल्याचं बोललं जातंय.

सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊनं त्याच्या व्हिडिओमधून केला. सरकारने विद्यार्थ्यांसोबत खेळू नये. त्यांच्या करिअरसोबत खेळू नका. तेव्हा मी एकटा रस्त्यावर उतरलो होतो आता लाखो विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरणार, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर आज विद्यार्थ्यांनी आज ठिकठिकाणी आंदोलन केले.

दरम्यान, या संपूर्ण घटनेनंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. ज्या ज्या लोकांची नावे याप्रकरणात समोर येतील त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हिंदुस्थानी भाऊ च्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे

Stock Market : अर्थसंकल्पापूर्वी बाजारात जोरदार वाढ, सेन्सेक्स 800 अंकांच्या वाढीसह बंद

Stock Market Timing

नवी दिल्ली । अर्थसंकल्पापूर्वी सोमवारी भारतीय शेअर बाजाराने जोरदार वाढ नोंदवली. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी मजबूतीसह बंद झाले. सेन्सेक्स 813.94 अंकांच्या वाढीसह 58014.17 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 237 अंकांच्या वाढीसह 17,339.85 वर बंद झाला. निफ्टी बँकेत 285.94 अंकांची वाढ दिसून आली.

गेल्या अनेक दिवसांपासून विक्री सुरू असलेल्या बाजारात आज आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंगच्या दिवशी जोरदार तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 500 हून अधिक अंकांच्या वाढीसह उघडला. निफ्टी 50 च्या 45 हून जास्त शेअर्समध्ये दिवसभर वाढ दिसून आली.

गेल्या 10 वर्षात अर्थसंकल्पापूर्वीचा सर्वाधिक वेग यावेळी पाहायला मिळाला. अर्थसंकल्पापूर्वी विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे बाजारात घसरण पाहायला मिळत होती. मात्र अर्थसंकल्पाच्या एक दिवस अगोदरच बुलने बाजारात पुनरागमन केले आहे.

आर्थिक सर्वेक्षण 2022
आर्थिक सर्वेक्षण 2021-22 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 8 महिन्यांत कंपन्यांनी IPO द्वारे उभारलेल्या भांडवलाची रक्कम या दशकाच्या शिखरावर पोहोचली आहे. आज, 31 जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या पूर्व-अर्थसंकल्पीय आर्थिक सर्वेक्षणात असे सांगण्यात आले आहे की, एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत 75 कंपन्यांनी प्रायमरी मार्केटमधून IPO द्वारे 89,066 कोटी रुपये उभे केले आहेत, तर या कालावधीत IPO द्वारे 14,733 कोटी रुपये उभे केले आहेत.

आर्थिक सर्वेक्षणात असेही म्हटले आहे की, या कालावधीत IPO द्वारे उभारलेले भांडवल गेल्या दशकातील कोणत्याही एका वर्षात उभारलेल्या भांडवलापेक्षा जास्त आहे. या सर्वेक्षणात सेबीच्या आकडेवारीचा हवाला देऊन असे सांगण्यात आले आहे की, 2021 मध्ये 8 IPO 100 पेक्षा जास्त वेळा भरले गेले तर 11 IPO 50 ते 100 वेळा भरले गेले.

Naaptol IPO
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, Naaptol ऑनलाइन शॉपिंग प्रा. लिमिटेड IPO द्वारे 1000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. Naaptol ची स्थापना 2008 मध्ये झाली. टीव्हीचे हे पहिलेच प्लॅटफॉर्म होते ज्यावर प्रोडक्ट डिस्कवर केला जाऊ शकतो. Naaptol हिंदी, तमिळ, तेलगू आणि कन्नड सारख्या अनेक भाषांमध्ये टीव्ही चॅनेलद्वारे प्रोडक्ट विकते. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, कंपनी आधीच या IPO च्या मसुद्यावर काम करत होती.

Google सोबतच्या भागीदारीमुळे ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये 30 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकेल !

Share Market

नवी दिल्ली । भारतात आपली पकड मजबूत करण्यासाठी, Google ने टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलमध्ये 10 कोटी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या डीलचा भारती एअरटेलला खूप फायदा होईल, असे बाजार विश्लेषकांचे मत आहे. ब्रोकरेज फर्म मोती लाल ओसवाल म्हणतात की,” यामुळे कंपनीचे शेअर्स 30 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.” ब्रोकरेज हाऊसने स्टॉकसाठी 920 रुपयांचे टार्गेट दिले आहे. कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 716 रुपये आहे.

या डीलद्वारे (Google- Bharti Airtel Deal) गुगल एअरटेलमधील 1.28 टक्के स्टेक 734 प्रति शेअर या दराने खरेदी करेल. ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांना विश्वास आहे की,” ही डील दोन्ही कंपन्यांसाठी चांगली ठरणार आहे.” लाइव्ह मिंटमधील एका रिपोर्ट नुसार, भारती एअरटेल आपल्या डिजिटल ऑफरिंगच्या कमाईचा शोध घेण्यासाठी Google च्या टेक प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊ शकते. एअरटेल क्लाउड सर्व्हिसेस सह इतर काही सर्व्हिसेससाठी Google च्या 5G टेक्नोलॉजी सॉल्यूशंसचा लाभ घेऊ शकते.

कंपनीला फायदा होईल
एअरटेलबद्दल बोलायचे झाले तर, FY24E बेसिस वर 5.6x कंसोलिडेटेड EV/EBITDA वर ट्रेड करत आहे. ब्रोकरेज हाऊसने FY22-24E साठी EBITDA मध्ये 20% CAGR वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. मोतीलाल ओसवाल यांचा विश्वास आहे की, या डील नंतर भारत आणि आफ्रिकेच्या व्यवसायात संभाव्य रीरेटिंग अपेक्षित आहे. दोन्ही क्षेत्रांमध्ये कमाईची वाढ चांगली आहे आणि दरवाढीचाही फायदा होईल. ARPU मध्ये सुधारणा झाली असून बाजारातील हिस्साही वाढला आहे. कंपनीमध्ये एकूणच मजबूत कमाई वाढ अपेक्षित आहे.

त्याच वेळी, Ambit Capital ने Bharti Airtel ला खरेदी रेटिंग देखील दिले आहे आणि त्याची टार्गेट प्राईस 931 रुपये ठेवली आहे. अँबिट कॅपिटलने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की,Google सोबतच्या भागीदारीमुळे एअरटेल नॉन-टेलिकॉम महसूल वाढवू शकेल. क्लाउड सर्व्हिस, डेटा सेंटर आणि इंडस्ट्री 4.0 अंमलबजावणी यासारख्या कामांद्वारे कंपनी चांगली कमाई करण्यास सक्षम असेल.