…म्हणून उत्पल पर्रिकरांनी भरला अपक्ष अर्ज; शिवसेनेच्या पाठींब्याबाबत उदय सामंतांची प्रतिक्रिया

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

गोवा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशात उत्पल पर्रिरकर यांनी पणजीतून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांच्या अर्ज भरल्यानंतर शिवसेनेकडून पर्रिरकरां विरोधातील उमेदवार अर्ज मागे घेण्यात आला असल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. केवळ मनोहर पर्रिकर यांचे पुत्र असल्यामुळे उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्याचा शिवसेनेला नक्की फायदा होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, खासदार संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. त्यांनी जे विधान केलेले आहे ते योग्य आहे. शिवसेनेची हि प्रथा आणि परंपरा आहे कि ती दिलेला शब्द पाळते. मनोहर पर्रिकर यांच्या रूपाने भाजपला एक संजीवनी देणारे नेतृत्व गोव्यात होते. ते आता पडद्याआड गेल्यानंतर त्यांच्या मुलाला उमेदवारी न देणे हा काय राजकीय प्रकार आहे.

हे गोवा वासीयांच्या लक्षात आलेला आहे. देशाच्याही लक्षात आलेला आहे. उत्पल पर्रिकर हे पर्रिकर यांचे पुत्र असल्यामुळे भाजपने त्यांची उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे गोव्यातील जनतेच्या मनात भाजपबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्याचा शिवसेनेला नक्की फायदा होईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.