Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2873

पृथ्वीराज चव्हाणांच्या खांद्यावर काॅंग्रेसकडून तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून या पाचही राज्यात काँग्रेस पक्ष मोठ्या तयारीने उतरलेला दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाने पक्षाचे जेष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे या पाच राज्यांपैकी तीन राज्यांच्या प्रचार रणनीतीची जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सूचनेनुसार हा निर्णय झाला असून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे उत्तरप्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊला रवाना झाले आहेत. तिथे त्यांच्या पत्रकार परिषदा होणार असून प्रचार यंत्रणेत सुद्धा ते सहभागी असणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने व्हर्चुअल पद्धतीने प्रचार यंत्रणेला परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे सर्व पक्षांचा प्रचार या पाचही राज्यात सुरु आहे. व्हर्चुअल प्रचार तसेच पत्रकार परिषदा अश्या काही तंत्रानुसार प्रचार सुरु आहे.

यानुसार तीन राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका मांडण्याचे महत्वपूर्ण काम काँग्रेस पक्षाने पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सोपविले आहे. आ. चव्हाण उत्तरप्रदेश, उत्तराखंड व गोवा या राज्यांमध्ये पत्रकार परिषदा घेऊन पक्षाची भूमिका मांडणार आहेत.

वाईन बनवणाऱ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली?? फडणवीसांनी उपस्थित केली शंका

Devendra Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आता दुकानात आणि सुपरमार्केटमध्येही वाईन मिळणार आहे. त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सरकार कडून सांगण्यात येत आहे. द्राक्षापासून वाईन तयार होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हंटल होत त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर टीका केली आहे. शेतकऱ्यांचे नाव फक्त पुढे केलं आहे, मात्र यामागील अर्थकारण मात्र वेगळंच आहे असा आरोप फडणवीसांनी केला आहे.

फडणवीस म्हणाले, ‘काही लोकं गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करत आहेत. पण हा निर्णय शेतकऱ्यांसाठी नाही. काही लोकांनी नव्याने दारुच्या कंपन्या आणि एजन्स्या घेतल्या आहेत. या लोकांच्या भल्यासाठीचा हा निर्णय घेण्यात आला आहे. वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकं कोणाची बैठक झाली?? ती कुठे नेमकी झाली??ती बैठक विदेशात झाली का, अशी एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती करत या निर्णयामागे मोठं अर्थकारण आहे असे फडणवीसांनी म्हंटल.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच जे राज्यात वाइन विक्रीला विरोध करत आहेत ते शेतकऱ्यांचे शत्रू आहेत अस म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. द्राक्षापासून वाईन तयार होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. भाजपला शेतकऱ्यांच्या हिताची चिंता नाही. विरोध करणे हे त्यांचे काम आहे. शेतकऱ्यांना वाईनरी उद्योगाकडून आर्थिक मदत मिळत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे असे राऊत म्हणाले.

अर्थसंकल्पानंतर स्वस्त होऊ शकतील मोबाईल आणि गॅजेट्स, सरकार काय पाऊल उचलणार ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली । 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार अशी काही पावले उचलू शकते, ज्यामुळे मोबाईल आणि गॅजेट्सच्या किमती कमी होतील. या प्रकरणाशी संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले की,” सरकार कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि मोबाईल फोनच्या कंपोनंटवर आणि काही पार्टवरील सीमाशुल्क कमी करण्याचा विचार करत आहे.”

लोकल मॅन्‍युफॅक्‍चरिंगला प्रोत्साहन देणे आणि कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स संबंधित उत्पादनांची निर्यात वाढवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. आयातदारांवरील कम्‍प्‍लायंसचा भार कमी करण्यासाठी सीमाशुल्क प्रक्रिया देखील सुलभ केल्या जातील. अर्थसंकल्पात, ऑडिओ डिव्हाइसेस आणि स्मार्टवॉच, स्मार्टबँड्स यांसारख्या वेअरेबलच्या कंपोनंटवरही सीमा शुल्क कमी केले जाऊ शकते. त्यामुळे देशांतर्गत कंपन्यांचे मॅन्‍युफॅक्‍चरिंग वाढण्यास मदत होणार आहे. इलेक्ट्रॉनिक इंडस्‍ट्रीनेही त्यावरील सीमाशुल्क कमी करण्याची विनंती केली होती.

इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यात दुप्पट होऊ शकते
कम्‍युनिकेशन्स अँड इन्‍फॉर्मेशन टेक्‍नोलॉजी मिनिस्‍टर अश्विनी वैष्‍णव यांनी अलीकडेच सांगितले होते की,”भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटच्या क्षेत्रात वेगाने उदयास येत आहे. मोबाईल फोनची मॅन्‍युफॅक्‍चरिंग आणि निर्यात झपाट्याने होत आहे.” असा अंदाज आहे की, इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंटची निर्यात 2025-26 पर्यंत $8 अब्जपर्यंत पोहोचेल, जी 2020-21 मध्ये जवळजवळ काहीच नव्हती. एवढेच नाही तर इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यातही दुप्पट होऊन त्याच कालावधीत 17.3 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते.

भारत 2026 पर्यंत मॅन्‍युफॅक्‍चरिंग पावरहाउस बनणार आहे
आयटी मंत्र्यांच्या मते, आपण आपल्या सध्याच्या क्षमतेद्वारे बॅटरी पॅक, चार्जर, यूएसबी केबल्स, कनेक्टर, इंडक्टिव कॉइल, मॅग्नेटिक्स आणि फ्लेक्सिबल पीसीबीए (Printed Circuit Board Assembly) निर्मितीच्या क्षेत्रात वेगाने पुढे जाऊ शकतो. अशाप्रकारे, 2026 पर्यंत, $300 अब्ज किमतीच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे मॅन्‍युफॅक्‍चरिंग करून भारत जगातील पॉवरहाऊस बनू शकतो. सध्या आपण आली उत्पादन क्षमता सुमारे $75 अब्ज आहे.

घटक उत्पादन क्षमता $25 अब्ज
प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत, भारत दरवर्षी $25 अब्ज किमतीचे कंपोनंट बनवू शकतो, जे जगभरात वापरल्या जाणार्‍या कंपोनंटपैकी 12 टक्के आहे. यासाठी 2023-24 या आर्थिक वर्षासाठी सीमाशुल्क सध्याच्या 20 टक्क्यांवरून 5 टक्के, 2024-25 साठी 10 टक्के, 2025-26 साठी 15 टक्के केले जाऊ शकते. इतर कंपोनंटवर 2024-25 साठी 5 टक्के आणि 2025-26 साठी 10 टक्के केले जाऊ शकतात.

खुशखबर !!! आता लवकरच येणार 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन, TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना दिल्या सूचना

Internet

नवी दिल्ली । मोबाईल युझर्ससाठी मोठी दिलासादायक बातमी म्हणजे आता लवकरच ते 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या प्रीपेड प्लॅनसह रिचार्ज करू शकतील. टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने सर्व टेलिकॉम कंपन्यांसाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये संपूर्ण महिन्याच्या टॅरिफ प्लॅनसह अनेक मोठे निर्णय आहेत. Telecom Tariff (66th Amendment) Order, 2022 अंतर्गत, TRAI ने असे अनेक निर्णय दिले आहेत, ज्याबद्दल युझर्सना खूप आनंद होईल.

TRAI ने टेलिकॉम कंपन्यांना असा किमान एक टॅरिफ प्लॅन ऑफर करण्याचे आदेश दिले आहेत, ज्याची व्हॅलिडिटी 30 दिवस असेल.

गुरुवारी एका आदेशात TRAI ने सांगितले की,”सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ऑफर करावे.” TRAI ने सांगितले की,” कंपन्यांनी किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ऑफर केले पाहिजे जे दर महिन्याला त्याच तारखेला रिन्यू केले जाऊ शकतील.”

Telecom Tariff (66th Amendment) Order, 2022 जारी केल्यानंतर, मोबाईल फोन युझर्सना अनेक रिचार्ज प्लॅन ऑप्शन मिळतील. युझर्सना या प्लॅनमध्ये पूर्ण 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा पर्याय देखील मिळेल.

आतापर्यंत टेलिकॉम कंपन्या 28 आणि 24 दिवसांचे रिचार्ज प्लॅन देतात. टेलिकॉम कंपन्या महिनाभर पूर्ण रिचार्ज देत नाहीत, अशी युझर्सची तक्रार होती. त्यामुळे युझर्सना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच, त्यासाठी जास्त पैसे खर्च होतात. TRAI ने सांगितले की, युझर्सकडून त्यांना मंथली प्लॅनसाठी वर्षातून 13 वेळा रिचार्ज करावे लागत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची फसवणूक झाल्याचे वाटते.

TRAI च्या म्हणण्यानुसार, नवीन बदलांचा युझर्सना खूप फायदा होईल आणि त्यांना त्यांच्या सोयीनुसार योग्य व्हॅलिडिटीसह प्लॅनचे आणखी पर्याय देखील मिळतील.

टेलिकॉम कंपन्यांचा निषेध
TRAI च्या या आदेशाला टेलिकॉम कंपन्यांनी विरोध केला आहे. टेलिकॉम कंपन्यांचे म्हणणे आहे की, 28 दिवस, 54 दिवस किंवा 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कोणताही प्लॅन बदलल्यास बिल सायकलमध्ये खूप त्रास होईल. कंपन्यांचे म्हणणे आहे की, पोस्टपेड प्लॅन्ससाठी दरमहा त्याच तारखेसाठी आणि त्याच रकमेसाठी रिचार्ज रिन्यू ऑफर करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही.

मलकापूरात नववीत शिकणाऱ्या मुलीने घेतला गळफास

Sucide Crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

मलकापूर हद्दीतील लक्ष्मी कॉलनीजवळ एका नववीत शिकणा- याने मुलीने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. पायल लोंढे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी धाव घेतलेली असून अधिक माहिती घेत आहेत.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मलकापूर येथील गोकाक पाणीपुरवठा परिसरातील लक्ष्मी काॅलनीत एका घरात नववीत शिकणाऱ्या मुलीने आत्महत्या केलेली आहे. आज शुक्रवारी दि. 28 रोजी सकाळी ही घटना समोर आली आहे. पायलचे आई व आजी – अजोबा काल लग्नाला बाहेरगावी गेलेले होते, त्यानंतर आज सकाळी लग्नाहून आल्यानंतर आजोबांना पायलने गळफास घेतल्याचे दिसून आले. राहत्या घरात कोणी नसताना पायलने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पायल हिचे आई-वडिल मजूरीचे काम करतात. तसेच लोंढे कुटुबिंय हे परजिल्ह्यातील असल्याचे समजत आहे. सध्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पायल हिने आत्महत्या केल्याचे समजत आहे.

एकाच राजकीय पक्षाला न्यायालयाचे दिलासे कसे मिळतात? संजय राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. एकाच राजकीय पक्षाला न्यायालयाचे दिलासे कसे मिळतात असा थेट सवाल संजय राऊतांचा केला आहे.

आमचे राज्यपालनियुक्त १२ आमदार दोन वर्षांपासून वाट पाहत आहेत, राज्यपालांकडे फाईल पडून आहे आणि ते काही निर्णय घेत नाहीत. हा पण त्यांचा अधिकार आहे. त्याच्यात सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करण्यास तयार नाही,” अशी नाराजी संजय राऊत यांनी जाहीर केली.

ते पुढे म्हणाले, राज्यसभेतील आमदारांचंही निलंबन केलं. मागच्या अधिवेशनातील गोंधळाची शिक्षा या अधिवेशनात दिली. हे नियमबाह्य असतानाही त्या खासदारांना कोर्टाने दिलासा दिला नाही. इथे मात्र दिला. यात राजकारणच आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला

जोधा अकबर दंगल प्रकरण : संभाजी भिडे, नितीन शिंदे, बजरंग पाटील सह 70 जणांचे अटक वारंट रद्द

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सन २००९ मध्ये जोधा-अकबर सिनेमावरून सांगलीत झालेल्या दंगल प्रकरणातील संशयित आरोपी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे, माजी आमदार नितीन शिंदे, शिवसेनेचे नेते बजरंग पाटील यांच्यासह सुमारे ७० जणांचे अटक वॉरंट मुख्य न्यायदंडाधिकारी पी. पी. केस्तीकर यांनी गुरुवारी रद्द केले. यामुळे न्यायालय परिसरात काही काळ गर्दी व तणाव निर्माण झाला होता.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सन २००९ मध्ये सांगलीसह संपूर्ण राज्यामध्ये जोधा अकबर सिनेमा प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा हिंदुविरोधी व हिंदूंच्या भावना दुखावणारा असल्याच्या कारणावरून काही हिंदुत्ववादी संघटनांनी सांगली शहरात दंगल घडवली होती. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री कृष्ण प्रकाश यांच्यावर खुनी हल्ला देखील झाला होता. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात संभाजी भिडे, नितीन शिंदे, बजरंग पाटील, सुनिता मोरे यांच्यासह सुमारे ९७ जणाविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरु आहे. वारंवार सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल मुख्य न्याय दंडाधिकारी पी. पी. केस्तीकर यांनी काही संशयितांविरुद्ध पकड वॉरंट,तर काही जणांविरुद्ध जामीनपात्र वारंट काढले होते. पकड वारंट काढलेल्या पैकी दोघांना पोलिसांनी बुधवारी अटक केली होती.

ही बातमी अन्य संशयितांना कळताच संभाव्य अटक टाळण्यासाठी सुमारे ६५ ते ७० संशयित आरोपी न्यायालयामध्ये स्वतःहून हजर झाले व त्यांचा वारंट रद्दसाठीचा अर्ज न्यायालयात दिला. ॲड. शैलेंद्र पाटील ॲड. नामदेव पाटील आदी वकिलांनी संशयिताला तर्फे अर्ज दाखल केले. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील म्हणून नीलिमा साबळे यांनी काम पाहिले. न्यायालयाने संभाजी भिडे यांना १५ हजार रुपये जातमुचलक्यावर वॉरंट रद्द केले, माजी आमदार नितीन शिंदे यांना २०० रुपये दंड केला तर बजरंग पाटील व सुनीता मोरे व इतर दोघांना प्रत्येकी १५००० रुपयांची कॅश सिक्युरिटी भरण्याचे आदेश न्यायाधीश केस्तीकर यांनी दिले.

गॅस दरवाढी विरोधात सिलेंडर दारात ठेवून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अन किसान सभेचे आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

महागाईच्या विरोधात घरगुती सिलेंडर घराच्या दारात ठेवुन आज जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो महिला पुरुष सहभागी होउन या दरवाढीस विरोध दर्शविला. केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासुन घरगुती सिलेंडरच्या किंमती दुपटीपेक्षा जास्त झाल्या आहेत. 2014 साली 450 रुपयांना मिळणारा सिलेंडर आज 920 ला झाला आहे. शिवाय त्यावर मिळणारी सबसिडी देखील बंद झाली आहे.

तेच पेट्रोल डिझेलच्या बाबतीत आहे. यावरुन सरकार जनतेच्या डोळ्यात धुळफेक करत आहे हेच यावरुन सिद्ध होत आहे. अशा सरकारचा निषे:ध करावा तेवढा थोडाच आहे. पेट्रोल डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्यामुळे, वाहतुकीच्या दरात वाढ झाली, पर्यायाने डाळी, खाद्यतेल, अन्नधान्य, भजीपाला या सगळ्या गरजेच्या वस्तु महागल्या आहेत. यावर सरकार कोणताही मार्ग काढताना दिसत नाही.

उलट देशाचे पंतप्रधान, मंत्री हे निवडणूक जिंकण्यामध्ये व्यस्थ असल्याचे दिसत आहे. म्हणुन आज जिल्हाभर या गगनाला भिडलेल्या महागाईच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मर्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, लाल बावटा आशा व गटप्रवर्तक युनियन इ. संघटनांचे कर्यकर्ते सहभागी झाले होते. कॉ. उमेश देशमुख, रेहाना शेख, हणमंत कोळी, तुळशीराम गळवे, मिना कोळी, जोहरा नदाफ, दिलशाद टिनमेकर, सुरेखा जाधव, रियाज जमादार, दिलीप कांबळे, सुधिर गावडे, नितीन पाटील, जावेद मुजावर नेतृत्व केले.

मद्यधुंद अवस्थेत ३०० फूट दरीत कोसळलेल्या वृद्धाला दिले जीवनदान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यातील येडेनिपाणी गावानजीक असणाऱ्या मल्लिकार्जुन डोंगर परिसरात बुधवारी रात्री ८० वर्षीय वृद्ध मद्यधुंद अवस्थेत डोंगरावरील देवस्थान परिसरात गोटखिंडीकडे जाणाऱ्या मार्गावर ३०० फूट खोल दरीत पाय घसरून पडल्याची घटना घडली. ग्रामस्थ व रेस्क्यू टीमच्या मदतीने तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या वृद्धाला बाहेर काढण्यात यश आले.

येडेनिपाणी जवळ मल्लिकार्जुन डोंगर आहे. या डोंगर परिसरात बुधवारी रात्री एक ८० वर्षीय वृद्ध मद्यधुंद अवस्थेत निघाला होता. त्या वृद्धाचा पाय घसरल्याने ३०० फूट खोल दरीत तो कोसळला. त्याठिकाणी असणाऱ्या कुत्र्याच्या भुंकण्याने मंदिरातील सर्व पुजाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली असता सदर वृद्धाची चप्पल टोपी व त्या इसमाची पिशवी सापडली.

सदर इसम दरीत पडल्याची शंका आल्याने पुजाऱ्याने सरपंच सचिन पाटील व पोलिस पाटील बाबासाहेब गुरव यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मध्यरात्री बारा ते दोन वाजेपर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करून सात ते आठ जणांच्या मदतीने सदर व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. सदर इसम मालेवाडीतील असल्याचे सांगत आहे परंतु मालेवाडी येथे त्याचा पत्ता सापडत नाही. त्या वृद्धांची ओळख पटविण्याचे काम आता ग्रामस्थ व सरपंच करत आहेत.

ऊसतोडणी सुरु असतानाच मशीनला लागली आग, मशीनसह तब्बल तीस एकर ऊस जळून खाक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

गेल्या आठवड्यात बागणी येथे ऊसतोडणी मशीन जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच आज आष्टा येथे ऊसतोडणी मशीन जळाले. आष्टा येथे श्री दत्त इंडिया वसंतदादा कारखाना यांच्याकडून परिसरात ऊस तोडणी सुरू होती. ऊस तोडणी मशीनला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याने मशीन संपूर्ण मशीन जळून खाक झाले. यामध्ये सुमारे साठ लाखाचे नुकसान झाले. शेतातच तोडणी मशीन ला आग लागल्याने या वेळी परिसरातील सुमारे तीस एकर तोडणीयोग्य ऊस जळून खाक झाले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

आष्टा परिसरातील हाबळ वाट या परिसरात वसंतदादा कारखाना दत्त इंडिया यांच्यावतीने ऊस तोडणी मशीनचा करार करून आष्टा परिसरात असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीचे काम सुरू आहे. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास राजकुमार श्रीपाल थोटे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना ऊस तोडणी मशीन मालक गोरख नामदेव शेंबडे रा. कोठेवाडी ता. सांगोला हे चालक म्हणून काम करीत होते. ऊस तोडणी मशीन मध्ये शॉर्टसर्किट झाले. न्यू हॉलंड कंपनीच्या या मशीनने अचानक पेट घेतला. यात मशीन जळून खाक झाले.

सुमारे सव्वा कोटीचे मशीन असून शॉर्ट सर्किट मध्ये सुमारे ६० लाखापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. पेट घेतलेल्या मशीनच्या परिसरातील आप्पासाहेब वग्याणी, आनंदराव सव्वाशे यांच्यासह नजीकच्या शेतकऱ्यांचे पंचवीस ते तीस एकरमधील ऊस पेटून लाखो रुपयांचे नुकसान झाले. आष्टा नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी तातडीने येऊन आग आटोक्यात आणली. सततच्या पावसाने शेतात ऊसतोडणी मशीन चालू न शकल्याने या धंद्यात मंदीचे सावट असताना सध्या शेतात घात आल्याने मशीन तोडणीस सुरवात झाली होती. तो पर्यंतच ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.