Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2874

सत्तास्थापनेत ट्विस्ट : दहिवडी नगरपंचायतीच्या अपक्ष नगरसेवकाचे अपहरण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दहिवडी येथे नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी नाट्यमय घडामोडींनी वेग घेतला आहे. यातूनच पुणे येथे खळबळजनक घटना घडल्यानंतर आज माणचे राजकारण ढवळून निघाले. पुन्हा एकदा माणमध्ये अपहरण नाट्य रंगले. परंतु पुण्यातील चाकण पोलिसांनी अपहरणाचा डाव काही तासातच हाणून पाडला. या घडामोडीमुळे राष्ट्रवादीने विरोधकांना आम्हीही काही कमी नसल्याचा प्रत्यय दिला.

दहिवडी नगरपंचायत निवडणुकीत सध्या अपक्षासह राष्ट्रवादीकडे 9 सदस्यांची बेरीज आहे. त्यामुळे प्रभाकर देशमुख म्हणतील तोच नगराध्यक्ष होईल, अशी परिस्थिती आहे. मात्र, अशा परिस्थितीतसुध्दा हे पद मिळविण्यासाठी विरोधकांकडून हालचाली सुरू आहेत. यातूनच अपहरणाची नाट्यमय घटना घडली. प्रभाग क्रमांक 12 मधून निवडून आलेले अपक्ष राजेंद्र साळुंखे हे राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांसह सहलीवर आहेत. तेव्हा काही लोकांनी राजेंद्र सांळुखे यांचे अपहरण केले. ही बातमी समजताच शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सावंत, नगरसेवक महेश जाधव कार्यकर्ते यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुणे जिल्ह्यातील एका ठिकाणी एका बेसावध क्षणी राजेंद्र साळुंखे यांना उचलण्यात आले.

सदरची बातमी प्रभाकर देशमुख यांना समजताच त्यांनी अतिशय जलद गतीने हालचाली केल्या. राजकारणातील वजन वापरून वरिष्ठ पातळीवरून सर्व पोलिस यंत्रणा हलवली. वजनदार नेतेमंडळी तसेच अधिकाऱ्यांची फोनाफोनी झाल्यावर पोलिस यंत्रणा झपाट्याने कामाला लागली. अवघ्या काही तासातच राजेंद्र साळुंखे व अपहरणकर्त्यांना पोलिसांनी जेरबंद केले. तोपर्यंत दहिवडी पोलिस ठाण्यात राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी श्री. साळुंखे यांच्या कुटुंबीयांसह धाव घेतली होती. मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांसह जमाव पोलिस ठाण्यात जमा झाला होता. परंतु, प्रभाकर देशमुख यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. तसेच दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर यांनी अतिशय शिताफीने सर्व परिस्थिती हाताळून जमाव शांत केला.

नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाला शरण

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या नंतर आज नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात शरण आले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र ते पहिल्याच दिवशी न्यायालयात हजर झाले आहेत.

नितेश राणे यांच्या सोबतच वकील माणशिंदे आणि बंधू निलेश राणे उपस्थित आहेत. नितेश राणे आज जिल्हा सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करतील. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे हे तातडीने सिंधुदुर्गात दाखल झाले होते. आज सकाळी राणेंच्या घरी बैठक पार पडली. त्यानंतर नितेश राणे हे न्यायालयाला शरण गेले.

नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयातही नितेश राणेंना जामीन नाकारण्यात आला. त्यानंतर नितेश राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडूनही नितेश राणे यांना दिलासा मिळालेला नाही. कोर्टाने नितेश राणेंना योग्य कोर्टात दाद मागावी असा सल्ला दिला

Budget 2022: ‘या’ मोबाइल अ‍ॅपवर मिळणार संपूर्ण बजटची माहिती, ‘अशा’ प्रकारे करा डाऊनलोड

नवी दिल्ली । अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी म्हणजेच मंगळवारी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करतील. सर्वसामान्यांना अर्थसंकल्पाची माहिती सहज उपलब्ध व्हावी यासाठी सरकारने मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. संपूर्ण बजट या अ‍ॅपवर हिंदी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल. अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर लवकरच या अ‍ॅपवर बजट उपलब्ध होईल.

मोबाईल अ‍ॅपवर युझर्स आपल्या सोयीनुसार बजट हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पाहू शकतील. युनियन बजट मोबाईल अ‍ॅप असे या अ‍ॅपचे नाव आहे. हे बजट अ‍ॅप http://indiabudget.gov.in वरून डाउनलोड करता येईल.

संसद अ‍ॅप वर बजट लाईव्ह पहा
बजट-2022 लाईव्ह मोबाईलवर पाहता येईल. यासाठी डिजिटल संसद नावाचे अ‍ॅप लॉन्च करण्यात आले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की,” डिजिटल संसद अ‍ॅप वर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण, सभागृहांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती, तसेच सभागृहाच्या पटलावर ठेवण्याच्या पत्राबरोबरच 1947 पासून आतापर्यंत अर्थसंकल्पावर झालेली चर्चा देखील उपलब्ध आहेत. या अ‍ॅपवर तुम्ही सर्वसाधारण बजट लाईव्ह पाहू शकाल.”

पहिल्यांदाच हलवा सोहळा रद्द
दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी होणारा ‘हलवा सोहळा’ यावेळी ओमिक्रॉनमुळे रद्द करण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ही प्री-बजट परंपरा पाळली जात नाही. दिल्लीतील साथीच्या आजाराची धोकादायक परिस्थिती पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. अर्थसंकल्प 2022 ची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत संसर्गाचा धोका आणि हेल्थ प्रोटोकॉल लक्षात घेऊन यावेळी मुख्य कर्मचाऱ्यांना मिठाई वाटण्यात आली आहे. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच ‘लॉक इन’ मोडमध्ये ठेवण्यात आले आहे.

आमदारांचे निलंबन रद्द होताच आशिष शेलारांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल; म्हणाले की…

Ashish shelar uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकारने निलंबित केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकार वर कडाडून टीका करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा ऐतिहासिक फैसला असून लोकशाहीतला अंजन टाकणारा निर्णय असल्याचं आशीष शेलार यांनी म्हटलंय.

ठाकरे सरकारने अहंकारामुळे शहाणपण गमावलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या ऐतिहासिक निर्णयात एका पार्श्वभूमी असलेल्या विधीमंडळाला, सरकारला आणि महाराष्ट्राला या ठाकरे सरकारच्या तर्कहीन, अवैध आणि असैविधानिक अशा ठरावामुळे इजा पोहोचलेली आहे. ही इजा आणि अवास्तव महाराष्ट्रामध्ये होणारी चर्चा देशात रोखता आली असती. परंतु ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च कोटीला गेलेला आहे. आम्हाला कुठल्याही व्यवस्था मान्य नाहीत.

आशिष शेलार म्हणाले, कोर्टानं दिलेल्या ऑपरेटीव्ह ऑर्डरमध्ये कोर्टानं स्पष्ट केलंय जो ठाकरे सरकारनं निलंबनाचा निर्णय केला होता, तो घटनाबाह्य, बेकायदेशीर आणि तर्कहीन आहे, असं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय. त्याहून गंभीर बाब म्हणजे तुम्ही जो केलेला ठराव आणि निर्णय आहे, हा लोकशाहीला धोका आहे, असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं.

सवादे येथील शंकर चव्हाण यांना राज्यपालाच्या हस्ते पुरस्कार प्रदान

कराड | महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्यावतीने आरोग्य सेवेसाठी देण्यात येणारा पुरस्कार सवादे (ता.कराड) येथील शंकर चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

मुंबई येथे राजभवनात हा कार्यक्रम झाला. शंकर चव्हाण यांनी कोरोना काळात आपल्या ऐरोली येथील इंद्रावती हॉस्पिटलच्या माध्यमातून शेकडो लोकांना मदत केली. त्यानी केलेल्या कार्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनीही शंकर चव्हाण यांच्या कार्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला.

यावेळी ठाणेचे आमदार संजय केळकर, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष एकनाथ बिरवटकर, ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंगळे, उपजिल्हाधिकारी डॉ. पदसिंह बैनाडे, मनोज परब, सौ. शुंभागी चव्हाण उपस्थित होते.

Budget 2022: ओमिक्रॉनने खाल्ला सरकारचा ‘हलवा’, संसर्गाच्या भीतीने पहिल्यांदाच मोडली गेली परंपरा

नवी दिल्ली । दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी होणारा ‘हलवा सोहळा’ यावेळी ओमिक्रॉन संसर्गाच्या भीतीने स्थगित करण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा ही प्री-बजट परंपरा पाळली गेली नाही. दिल्लीतील साथीच्या आजाराची धोकादायक परिस्थिती पाहता हे पाऊल उचलण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

सरकारने म्हटले आहे की, राजधानी दिल्लीत कोविड संसर्गाची संख्या कमी झाल्यामुळे ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएन्टची प्रकरणे वाढू लागली आणि हा एक मोठा स्ट्रेन म्हणून घोषित करण्यात आला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी देखील अंतिम टप्प्यात असून संसर्गाचा धोका आणि हेल्थ प्रोटोकॉल लक्षात घेऊन यावेळी मुख्य कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले आहे. अर्थसंकल्प तयार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणीच ‘लॉक इन’ मोडमध्ये ठेवण्यात आले आहे. गेल्या वेळेप्रमाणेच याही वेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला पेपरलेस ग्रीन बजट सादर करणार आहेत.

निर्मला सीतारामन यांना हलवा बनवावा लागला
अर्थसंकल्पाला अंतिम रूप देण्यापूर्वी, अर्थ मंत्रालय दरवर्षी नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या तळघरात हलवा समारंभ आयोजित करते. या दरम्यान अर्थमंत्री पारंपारिक कढईत हलवा शिजवण्यासाठी उलतणं चालवतात. सध्या हे काम सध्याच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन करणार होत्या आणि हलवा शिजवून बजट बनवण्यात गुंतलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये परंपरेप्रमाणे त्याचे वाटप केले जाणार होते.

त्यामुळे अधिकाऱ्यांना दालनात कोंडले आहे
अर्थसंकल्प तयार करणाऱ्या सर्व अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरुवातीपासून ते अर्थसंकल्प सादर होईपर्यंत एकाच ठिकाणी बंद ठेवण्यात आले आहे. अर्थसंकल्पाची गुप्तता राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असून ते सार्वजनिक केल्यानंतरच या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांना किंवा अन्य नातेवाईकांना भेटण्याची परवानगी दिली जाते. बजट छापण्यासाठी नॉर्थ ब्लॉकमध्ये प्रेस देखील आहे.

Gold Price : सोने-चांदी पुन्हा महागले, आजचे नवीन दर पहा

Gold Price

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज पुन्हा एकदा सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही झपाट्याने वाढ झाली आहे. आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचा भाव 0.06 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत आहे. तर दुसरीकडे, चांदीच्या दरातही 0.17 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काल सोन्याच्या दरात 1.12 टक्क्यांची जोरदार घसरण झाली.

आज सोने किती स्वस्त झाले जाणून घ्या
आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोन्याचा भाव 0.06 टक्क्यांनी वाढून 47,939 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 0.17 टक्क्यांनी घसरून 62,049 रुपये प्रति किलोवर आला आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,230 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,150 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,250 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 45,150 रुपये
पुणे – 45,150 रुपये
नागपूर -45,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,250 रुपये
पुणे -49,230 रुपये
नागपूर – 49,250 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4550.00 Rs 4576.00 0.568 %⌃
8 GRAM Rs 36400 Rs 36608 0.568 %⌃
10 GRAM Rs 45500 Rs 45760 0.568 %⌃
100 GRAM Rs 455000 Rs 457600 0.568 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4965.00 Rs 4991.00 0.521 %⌃
8 GRAM Rs 39720 Rs 39928 0.521 %⌃
10 GRAM Rs 49650 Rs 49910 0.521 %⌃
100 GRAM Rs 496500 Rs 499100 0.521 %⌃

शहरात इलेक्ट्रिक डबलडेकर बस सुरू करा

औरंगाबाद – मुंबईच्या धर्तीवर औरंगाबाद शहरात पर्यावरण पूरक डबल डेकर इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यास प्रवास क्षमता दुपटीने वाढून खर्चात कपात होईल. महापालिकेने पर्यावरण पूरक बस साठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.

क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती वन, सफारी पार्क, पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, स्मार्ट बस, नेहरू भवन पुनर्विकास, माझी वसुंधरा, लाईट हाऊस, शहर विकास योजना, गुंठेवारी विकास अधिनियम, ऐतिहासिक दरवाजे संवर्धन, डॉ. सलीम अली तलाव संवर्धन, आरोग्य इत्यादी संदर्भात संगणकीय सादरीकरण त्यांनी पाहिले.

स्मार्ट सिटी कार्यालयात मनपाच्या विकास कामांचा आढावा बैठकीत आदित्य ठाकरे बोलत होते.

तुम्हांला मुख्यमंत्री म्हणू की पक्षप्रमुख; टिपू सुलतान वादावरून भाजप नेत्याचे खरमरीत पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आक्रमक झाली असून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्यानाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर आता अमित साटम यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तुम्हांला मुख्यमंत्री म्हणू की शिवसेना पक्षप्रमुख असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे.

अमित साटम यांनी याआधी पत्रात म्हटलंय की, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि मंत्री अस्लम शेख यांच्याकडून एक पत्र व्हायरल केले जात आहे. ज्यामध्ये २७ डिसेंबर २०१३ रोजी महापालिकेच्या सभेत एका रस्त्याला टिपू सुलतान मार्ग नाव देण्याच्या प्रस्तावाला मी अनुमोदन दिले होते. परंतु असा कुठलाही फॉर्मेट मुंबई महापालिकेचा नाही. व्हायरल झालेले पत्र हे नव्याने तयार करण्यात आले आहे असा आरोप त्यांनी केला.

त्याचसोबत अनुमोदकाच्या ठिकाणी खाडाखोड करुन माझे नाव अ. भा. साटम असं हाताने लिहिलेले दिसून येते. या पत्रावर खाली सही आणि मंजूर असे लिहिलंय. म्हणजेच सदर प्रस्तावावर खाडाखोड करुन माझं नाव लिहिलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्र पूर्णपणे खोटे व नव्याने तयार केलेले आहे. त्यामुळे याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्याचे मंत्री अस्लम शेख आणि मुंबई महापालिकेचे चिटणीस यांच्याविरोधात ४२०, ४९९, ५०० च्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी केली आहे.

आपल्या महापौर किशोरीताई पेडणेकर एका बाजुला जाहीर करतात की टिपू सुलतान क्रिडांगण नामकरणाचा फलक अवैध आहे आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल. दुसऱ्या बाजुला त्याचाच बचाव करण्यासाठी खोटी बनावटी दस्ताऐवज वापताहेत. वास्तविक जर टिपू सुलतान नामफलक अवैध असेल तर महापौरांनी ते उतरवले पाहिजे होते. पण पालकमंत्र्यांच्या बचाव कार्यतच त्या मग्न आहेत. असेही त्यांनी म्हंटल.

Stock Market : शेअर बाजाराची चांगली सुरुवात, सेन्सेक्स 725 तर निफ्टी 233 अंकांनी वाढला

नवी दिल्ली । संमिश्र जागतिक संकेतांच्या दरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. सध्या, सेन्सेक्स 725.22 अंकांच्या म्हणजेच 1.27% च्या वाढीसह 58,002.16 च्या पातळीवर दिसत आहे. त्याच वेळी, निफ्टी 233.40 अंक किंवा 1.41% च्या वाढीसह 17,352.40 च्या स्तरावर दिसत आहे.

काल बाजार रेड मार्कवर बंद झाला
गुरुवारी दिवसभर प्रचंड अस्थिरता असताना सेन्सेक्स-निफ्टी ट्रेडिंगच्या शेवटी रेड मार्कवर बंद झाले. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 581.21 अंकांनी म्हणजेच 1 टक्क्यांनी घसरून 57,276.94 वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी 167.80 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी घसरून 17,110.20 अंकांवर बंद झाला.

30 पैकी 27 शेअर्स वर आहेत
आज सेन्सेक्सच्या 30 पैकी 27 शेअर्स मध्ये वाढ दिसून येत आहे, तर निफ्टी निर्देशांकातील 50 पैकी 47 शेअर्स ग्रीन मार्कवर ट्रेड करत आहेत. आज एनटीपीसीचे शेअर्स 4.00 टक्क्यांच्या वाढीसह टॉप गेनर ठरले आहेत, यासह मारुतीच्या शेअरमध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली जात आहे.

निफ्टीच्या 4 कंपन्यांचे आज निकाल
चार निफ्टी कंपन्या L&T, DR REDDYS, कोटक बँक आणि BRITANIA आज तिसऱ्या तिमाहीचे निकाल सादर करतील. कोटकच्या नफ्यात 15% वाढ अपेक्षित आहे. त्याची मालमत्ता गुणवत्ता सुधारणे शक्य आहे. दुसरीकडे, L&T च्या नफ्यावर थोडासा दबाव असू शकतो. मार्जिन देखील दबलेले राहू शकतात.