Thursday, December 25, 2025
Home Blog Page 2872

जिथं तिथं मोदींच्या लुकचीच हवा; पंतप्रधानांचा नवा लूक वेधतोय सर्वांचे लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध ठिकाणाच्या कार्यक्रमांना वेगवेगळ्या पोशाखात दिसतात. आता तर NCC च्या कार्यक्रमातील मोदींच्या लूकची जोरदार चर्चा सगळीकडे सुरु आहे. शीख पगडी परिधान केलेल्या पंतप्रधान मोदींना एनसीसी कॅडेट्सनी गार्ड ऑफ ऑनर दिला. मोदींच्या या लूकने सर्वांचे लक्ष्य वेधले

दिल्लीच्या करिअप्पा ग्राऊंडवर आज एनसीसीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थित एनसीसी कॅडेट्सला मार्गदर्शन केलं. यावेळी मोदींनी गडद हिरव्या रंगाची पगडी डोक्यावर घातली होती. या पगडीवर लाल रंगाचा तुरा होता. एनसीसी कॅडेट्सच्या गडद हिरव्या रंगाच्या कॅपवर देखील अशाच प्रकारचा लाल रंगाचा तुरा असतो. त्यासोबतच पंतप्रधानांनी काळ्या रंगाचा चष्मा घातला होता.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी उत्तराखंडी ब्रह्म कमळसोबत काळी टोपी घातली होती. या टोपीसोबत कुर्ता पायजमामा आणि मणिपुरी गमछा घातला होता. त्यानंतर आज त्यांनी शीख पगडी घातली होती. आगामी ५ राज्यांच्या निवडणुका समोर असून त्यात पंजाब हेही एक राज्य आहे, त्यामुळे मोदींची पगडीचा संबंध आगामी निवडणुकांशी जोडला जात आहे

निवडणूक बिनविरोध : पाटण तालुका दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी सुभाषराव पवार, उपाध्यक्षपदी शांताराम सुर्यवंशी

पाटण | राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका दूध उत्पादक संघाच्या पदाधिकारी निवडी बिनविरोध पार पडल्या. नूतन चेअरमनपदी सुभाषराव पवार व व्हाइस चेअरमनपदी शांताराम सूर्यवंशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

पाटण तालुका दूध संघाच्या निवडणुकीत संचालक म्हणून मावळते चेअरमन शंकरराव जाधव, व्हा. चेअरमन शांताराम सूर्यवंशी, सुभाषराव पवार, आबासो सूर्यवंशी, सुरेशराव पाटणकर, अविनाश घाडगे ,सखाराम लुगडे, मनोहर संकपाळ, अशोकराव मोरे, विजय शिंदे, महिला प्रतिनिधी शोभा कदम, अक्काताई काळे, इतर इतर मागासवर्गीय मधून सुंदर गुरव (पुजारी), अनुसूचित जातीमधून विकास शिलवंत, भटक्या विमुक्त जातींमधून भागोजी लांबोर यांच्या बिनविरोध निवडी पार पडल्या. शुक्रवारी पदाधिकारी निवडीही बिनविरोध पार पडल्या व यात चेअरमनपदी सुभाषराव पवार यांची व व्हाईस चेअरमनपदी शांताराम सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.

नूतन पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार ,उपसभापती प्रतापराव देसाई, माजी जि. प. शिक्षण व अर्थ समिती सभापती राजेश पवार, पाटण अर्बन बँके चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, खरेदी-विक्री संघ चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, कोयना शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण, सचिव अमरसिंह पाटणकर ,शेती बाजार समिती सभापती रेखाताई पाटील , अर्बन बँक माजी चेअरमन दिनकरराव घाडगे आदी मान्यवर पदाधिकारी ,कार्यकर्ते व हितचिंतकांनी अभिनंदन केले .

भारत-बायोटेकच्या नोझल लसीच्या चाचणीला मिळाली मान्यता; आता बूस्टर डोस म्हणून वापरता येणार

नवी दिल्ली । ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने भारत बायोटेकच्या नोझल लसीच्या चाचणीला मान्यता दिली आहे. ही लस बूस्टर डोस म्हणून वापरली जाईल. सध्या 900 जणांवर त्याची चाचणी केली जाणार आहे. या लसीच्या तिसऱ्या डोसची ही चाचणी असेल. कंपनीने या चाचणीसाठीचा डेटा DCGI च्या विषय तज्ञ समितीकडे 3 आठवड्यांपूर्वी पाठवला होता. नाकावाटे देण्यात येणारी ही लस लोकांना ओमिक्रॉनपासून बचाव करण्यासाठी मदत करेल, असे सांगितले जात आहे.

असे म्हटले जात आहे की, भारत बायोटेकने बूस्टर डोस म्हणून नाकावाटे देण्यात येणारी लस वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. ज्यांनी यापूर्वी कोविशील्ड किंवा कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे त्यांना हा बूस्टर डोस दिला जाईल. या महिन्यापासून भारतात फ्रंटलाइन वर काम करणाऱ्या लोकांना कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जात आहे.

कोणावर घेतली जाणार चाचणी?
भारत बायोटेकने त्यांची नोझल लस BBV154 आधीच लसीकरण केलेल्या लोकांमध्ये बूस्टर डोस म्हणून वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. या लसीच्या क्लिनिकल चाचण्या अशा लोकांवर केल्या जातील ज्यांनी आधीच कोवाशिल्ड किंवा कोव्हॅक्सीन घेतली आहे.

नोझल लसीचे फायदे
सामान्य लसीपेक्षा नाकावाटे देण्यात येणारी लस अधिक प्रभावी असल्याचे बोलले जात आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा लस नाकावाटे दिली जाते तेव्हा पहिले नाकात अँटीबॉडीज तयार होतात. यामुळे श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांपर्यंत विषाणू पोहोचणे कठीण होईल. याचा परिणाम असा होईल की, नाकावाटे लस घेणाऱ्यांच्या फुफ्फुसात विषाणू पोहोचू शकणार नाहीत.

अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या विश्वनाथन यांनीही नाकावाटे देण्यात येणारी लस वापरण्यावर भर दिला. डॉ. सौम्या म्हणतात, ‘अशा प्रकारच्या लसीचा फायदा असा होईल की, ती घेण्यासाठी तुम्हाला दीर्घ प्रक्रियेतून जावे लागणार नाही. तुम्ही ते स्वतः वापरू शकता. यासाठी, तुम्हाला लस घेण्यासारख्या दीर्घ प्रक्रियेतून जावे लागणार नाही, तसेच तुम्हाला इंजेक्शनने वेदनाही होणार नाहीत.

साताऱ्यात शेकडो विद्यार्थ्यांचे ऑनलाइन परिक्षेसाठी ठिय्या आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परीक्षा या ऑनलाइन पद्धतीनेच व्हाव्यात यासाठी ठिय्या आंदोलन मांडले आहे. आंदोलन करणारे विद्यार्थी हे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे असून परीक्षा ऑनलाईन हव्यात अशी त्यांची मागणी आहे. एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यामुळे खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना मोठा सामना करावा लागत आहे.

महाविद्यालयातील परीक्षा या ऑफलाइन होणार असल्याचे खूप उशिरा सांगितल्याने विद्यार्थ्यांनी कॉलेज व्यवस्थापना विरोधात हा ठिय्या मांडला होता. कमी वेळात ऑफलाईन परीक्षेसाठी तयारी कशी करायची असा प्रश्न उपस्थित करीत ऑनलाईनच परीक्षा घ्याव्यात व त्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा या ऑनलाइन होणार असल्याचे सांगण्यात आले होते. पेपर सुरू होण्याचा दिनांक 1 फेब्रुवारी असून अवघ्या चार दिवसावर ती परीक्षा सुरू होणार असल्याने मध्ये विद्यार्थ्यांच्या नाराजी व्यक्त केली आहे. युनिव्हर्सिटी मधील सर्व कॉलेजचे पेपर हे ऑनलाइन झाले ते केवळ याच कॉलेजमध्ये ऑफलाइन पेपर होणार असल्याने त्यास विरोध करत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले

अखेर भय्यू महाराज प्रकरणातील आरोपींना कोर्टाकडून ‘एवढ्या’ वर्षांच्या कारावासाची शिक्षा जाहीर

bhayuu maharaj and palak

भोपाळ : वृत्तसंस्था – दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी आज इंदौर येथील सेशन्स कोर्टात अंतिम सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि ड्रायव्हर शरद यांच्यासह पलक नावाच्या महिलेला दोषी ठरवले आहे. या पलक नावाच्या महिलेने भय्यू महाराजांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवले होते अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यानंतर कोर्टाने या तिन्ही आरोपींना दोषी ठरवून सहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या तिन्ही आरोपींनी भय्यू महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कोर्टात सिद्ध झाला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि शरद यांना अटक केली होती. आरोपी पलकने भय्यू महाराजांसोबत अश्लील व्हिडीओ बनवले होते. यानंतर ती भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि ड्रायव्हर शरद यांच्यासह मिळून भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करायची. तसेच तिने भय्यू महाराजांवर लग्नासाठी देखील दबाव टाकला होता. पण भय्यू महाराजांनी आयुषीसोबत लग्न केले होते. यानंतर आरोपी पलक पुराणिक, विनायक दुधाले आणि शरद देशमुख यांच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून भय्यू महाराज यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

या प्रकरणी इंदूरच्या सेशन्स कोर्टात जवळपास साडेतीन वर्षांपासून सुनावणी सुरु होती. अखेर आज कोर्टात सेवादार शरद देशमुख, विनायक दुधाले आणि पलक पुराणिक यांनी पैशांसाठी भय्यू महाराजांना मानिसिकरित्या त्रास दिल्याचे कोर्टात सिद्ध झाले. ज्या सेवकांवर भय्यू महाराजांचा विश्वास होता, ज्यांच्यावर आपल्या आश्रम, कुटुंबाची जबाबदारी सोपवली होती त्याच सेवकांनी भय्यू महाराजांचा विश्वासघात केला होता. याप्रकरणी 19 जानेवारी रोजी सुमारे साडेपाच तास सुनावणी घेण्यात आली होती. त्यावेळी या प्रकरणाचा निकाल 28 जानेवारीला सुनावला जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. यानंतर अखेर आज या प्रकरणातील आरोपींना सहा वर्ष कारवासाची दंडात्मक शिक्षा सुनावण्यात आली.

Share Market: सेन्सेक्स 77 अंकांनी घसरला तर निफ्टी 17100 च्या वर बंद झाला

Stock Market

नवी दिल्ली । संमिश्र जागतिक संकेतांच्या दरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. ट्रेडिंगच्या शेवटी मुंबई शेअर बाजाराचा (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 76.71 अंकांनी म्हणजेच 0.13 टक्क्यांनी घसरून 57200.23 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 5.50 अंकांनी म्हणजेच 0.03 टक्क्यांनी घसरून 17104.70 वर बंद झाला.

गुरुवारी सेन्सेक्स 57,276 वर बंद झाला
याआधी गुरुवारी, सेन्सेक्स ट्रेडिंगच्या शेवटी 581.21 अंकांनी म्हणजेच 1 टक्क्यांनी घसरून 57,276.94 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 167.80 अंकांनी किंवा 0.97 टक्क्यांनी घसरून 17,110.20 वर बंद झाला.

डॉ. रेड्डी च्या तिसर्‍या तिमाहीचा नफा 707 कोटी रुपयांवर पोहोचला
विशेष म्हणजे, फार्मास्युटिकल कंपनी डॉ रेड्डीज लॅबोरेटरीजने शुक्रवारी सांगितले की,” 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत त्यांचा एकत्रित निव्वळ नफा अनेक पटींनी वाढून 706.5 कोटी रुपये झाला आहे. 2020-21 च्या याच कालावधीत कंपनीला 19.8 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की,” तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 5,319.7 कोटी रुपये होते, जे 2020-21 च्या याच कालावधीत 4,929.6 कोटी रुपये होते.”

Manyavar IPO : मान्यवरच्या पॅरेण्ट कंपनी Vedant Fashions साठी प्राईस बँड निश्चित केला आहे
एथनिक वेअर ब्रँड मान्यवरची पॅरेण्ट कंपनी असलेली वेदांत फॅशन्स लिमिटेड ने 3,149 कोटी रुपयांच्या IPO साठी प्रति शेअर 824-866 प्राईस बँड निश्चित केला आहे. हा IPO 4 फेब्रुवारीला उघडेल आणि गुंतवणूकदार 8 फेब्रुवारीपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकतील. कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग 16 फेब्रुवारीला होणार आहे.

जर डीलर तुम्हाला कमी रेशन देत असेल तर लगेच ‘या’ नंबरवर करा तक्रार

Free Ration

नवी दिल्ली । रेशन कार्ड हे असे डॉक्युमेंट आहे, ज्याद्वारे तुम्हाला स्वस्तात रेशन मिळते. रेशनकार्डधारकांना रेशन देण्यास डीलर्स नकार देतात किंवा वजन करून कमी रेशन देतात हे आपण अनेकदा पाहतो. असे काही तुमच्या बाबतीतही घडले तर आता अजिबात काळजी करू नका. सरकारने प्रत्येक राज्यवार हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. जर तुम्हालाही कमी रेशन मिळत असेल, तर तुम्ही या क्रमांकांवर संपर्क साधून डीलरविरुद्ध तक्रार नोंदवू शकता.

सरकारने भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि अन्नधान्याचे वितरण सुनिश्चित करण्यासाठी तक्रार हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत जेणेकरून अनुदानित रेशन गरिबांपर्यंत पोहोचेल. जर कोणत्याही रेशनकार्डधारकाला त्यांचा अन्न कोटा मिळत नसेल, तर ते टोल फ्री हेल्पलाइन नंबरवर कॉल करून त्याबाबत तक्रार नोंदवू शकतात.

‘या’ लिंकला भेट द्या
तुमच्या राज्याच्या टोल फ्री क्रमांक राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलच्या https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या लिंकला भेट देऊन तुम्ही सर्व राज्यांचे नंबर काढू शकता. रेशनकार्डसाठी अर्ज करूनही अनेकांना अनेक महिने रेशनकार्ड मिळत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. अशा परिस्थितीत, तो याद्वारे सहजपणे तक्रार करू शकतो.

येथे राज्यनिहाय तक्रार हेल्पलाइन क्रमांक तपासा
आंध्र प्रदेश – 1800-425-2977
अरुणाचल प्रदेश – 03602244290
आसाम – 1800-345-3611
बिहार- 1800-3456-194
छत्तीसगड- 1800-233-3663
गोवा- 1800-233-0022
गुजरात- 1800-233-5500
हरियाणा – 1800-180-2087
हिमाचल प्रदेश – 1800-180-8026
झारखंड – 1800-345-6598, 1800-212-5512
कर्नाटक- 1800-425-9339
केरळ- 1800-425-1550
मध्य प्रदेश – 181
महाराष्ट्र- 1800-22-4950
मणिपूर- 1800-345-3821
मेघालय- 1800-345-3670
मिझोराम- 1860-222-222-789, 1800-345-3891
नागालँड – 1800-345-3704, 1800-345-3705
ओडिशा – 1800-345-6724 / 6760
पंजाब – 1800-3006-1313
राजस्थान – 1800-180-6127
सिक्कीम – 1800-345-3236
तामिळनाडू – 1800-425-5901
तेलंगणा – 1800-4250-0333
त्रिपुरा- 1800-345-3665
उत्तर प्रदेश – 1800-180-0150
उत्तराखंड – 1800-180-2000, 1800-180-4188
पश्चिम बंगाल – 1800-345-5505
दिल्ली – 1800-110-841
जम्मू – 1800-180-7106
काश्मीर – 1800-180-7011
अंदमान आणि निकोबार बेटे – 1800-343-3197
चंदीगड – 1800-180-2068
दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव – 1800-233-4004
लक्षद्वीप – 1800-425-3186
पुडुचेरी – 1800-425-1082

अशा प्रकारे बनवता येते रेशन कार्ड
सर्वप्रथम, तुम्हाला तुमच्या संबंधित राज्याच्या अधिकृत साइटवर जावे लागेल. रेशनकार्ड मिळविण्यासाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट हे ओळखपत्र म्हणून दिले जाऊ शकतात. जर हे कार्ड नसेल तर सरकारने दिलेले कोणतेही आय कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देता येते. रेशन कार्डसाठी अर्ज करताना तुम्हाला पाच ते 45 रुपये द्यावे लागतील. अर्ज सबमिट केल्यानंतर, तो फील्ड व्हेरीफिकेशनसाठी पाठविला जातो. अधिकारी फॉर्ममध्ये भरलेल्या माहितीचे व्हेरीफिकेशन करतो.

बाप म्हणाला, ‘पोरांनो आईची काळजी घ्या,‌ कर्जाचे पैसे देऊन येतो’; अन्…

औरंगाबाद – पोरांनो तुमच्या आईची काळजी घ्या, मी कर्ज घेतलेले पैसे जमा करून घरी योतच, असं सांगून घरातून निघालेला बाप दोन दिवस झाले तरी आला नाही. तिसऱ्या दिवशी विहिरीत पडून त्याचा मृत्यू झाल्याचे कळल्याने शेतकरी कुटुंबावर आभाळच कोसळलं. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथील ही घटना आहे. घरातील एकमेव कर्त्या व्यक्तीच्या अशा प्रकारे निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असतानाही कर्जाचे पैसे चुकवण्यासाठी मोलमजुरी करणाऱ्या शेतकऱ्याच्या अशा आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडितराव सीताराम कळंब असे मृताचे नाव आहे. ते भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील रहिवासी आहेत. कशी बशी गुजराण होईल, एवढी शेतीही मालकीची नसल्याने पंडितराव मजुरी करत असत. या मजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. 2019 मध्ये त्यांच्या मुलीचे लग्न झाले. त्यावेळी कर्जाचा बोजा वाढला होता. त्यामुळे मोलमजुरी करून उसने पैसे फेडणे सुरु होते. मागील वर्षभरापासून औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात विहिरीवर काम करण्यासाठी जात होते. त्या ठिकाणी एका ठेकेदाराकडे ते कामाला होते.

विहिरीवर काम करण्यासाठी गेलेले पंडितराव घसरून विहिरीत पडले. त्यांना लगेच घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर मार लागला असल्याने ते बेशुद्ध अवस्थेत होते. मंगळवारी त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रियादेखील करण्यात आल्या. परंतु बुधवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला. रात्री साडेनऊ वाजता वडोद तांगडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे.

आता घरबसल्या पॅन कार्डमध्ये नाव आणि जन्मतारीख अपडेट करा; ‘ही’ आहे प्रक्रिया

PAN Card

नवी दिल्ली । आजच्या काळात पॅनकार्ड हा एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. फक्त बँक किंवा इन्कम टॅक्स रिटर्नशी संबंधित इतर ट्रान्सझॅक्शनमध्ये पॅन कार्ड आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला पॅन कार्ड, नाव, पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती अपडेट करायची असेल तर त्यासाठी बाहेरील कोणत्याही केंद्रात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या पॅनची सर्व माहिती सहजपणे अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला काय करावे लागेल हे जाणून घ्या.

येथे आम्ही तुम्हाला घरबसल्या पॅन कार्डमधील चुकीचे नाव आणि चुकीची जन्मतारीख कशी दुरुस्त करू शकता याबाबत माहिती देणार आहोत. यासोबतच आम्ही तुम्हाला ई-पॅन कसे डाउनलोड करू शकता हे देखील सांगणार आहोत. मात्र हे लक्षात असू द्या ही प्रक्रिया फ्रीमध्ये मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल.

पॅन कार्डमध्ये जन्मतारीख कशी बदलावी ?
सर्वप्रथम तुम्हाला NSDL पोर्टलवर जावे लागेल. त्यानंतर ऑनलाइन अ‍ॅप्लिकेशन फॉर करेक्शन किंवा पॅन डेटामधील बदलांवर क्लिक करा.
त्यानंतर अर्जदाराला कॅटेगिरीमध्ये जाऊन HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) किंवा पर्सनल ऑप्शन निवडावा लागेल.
ज्या फील्डवर ‘*’ चिन्ह असेल ती सर्व फील्ड भरणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. तसेच फोटो देखील अपलोड करा.
त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
त्यानंतर डिमांड ड्राफ्ट, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करा.
हे लक्षात घ्या की येथे एक पावती क्रमांक असेल. अर्जाची स्थिती तपासण्यासाठी ते आवश्यक असेल.

पॅन कार्ड मध्ये नाव कसे बदलावे ?
>> यासाठी सर्वप्रथम तुम्हाला NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
>> या वेबसाइटवर तुम्हाला सर्व्हिस टॅबवर जाऊन पॅनवर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर Changes or Correction in existing PAN Data / Reprint of PAN Card वर क्लिक करा. विनंती केलेली माहिती भरल्यानंतर, कॅप्चा कोड सबमिट करा.
>> त्यानंतर अ‍ॅप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा.
>> जेव्हा तुम्ही ई-केवायसीद्वारे डॉक्युमेंट सबमिट करू शकता. मात्र यासाठी आधार कार्ड आवश्यक असेल. तुम्ही स्कॅन केलेला फोटो ई-साइनद्वारे सबमिट करू शकता. सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला पेमेंट करावे लागेल, जे तुम्हाला ऑनलाइन भरावे लागेल.
>> पेमेंट करण्यासाठी तुम्हाला Pay Confirm वर क्लिक करावे लागेल. पेमेंट केल्यानंतर, तुम्हाला तुमचा बँक रेफरन्स नंबर आणि ट्रान्सझॅक्शन नंबर मिळेल. हे दोन्ही सेव्ह करा नंतर Contunue वर क्लिक करा.
>> यानंतर आधार कार्डच्या खाली असलेल्या बॉक्सवर टिक करा आणि त्यानंतर Authenticate वर क्लिक करा. यानंतर, जर तुमची माहिती आधार कार्ड मिळत असेल, तर तुम्हाला contunue with e-Sign आणि e-KYC वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला जनरेट OTP वर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला OTP टाकून सबमिटवर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. ज्यामध्ये तुम्हाला अर्जाचा फॉर्म दिसेल. जी पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाउनलोड करावी लागेल. तुम्हाला ते मेलद्वारे देखील मिळेल.
>> यानंतर तुम्हाला आयडी प्रूफ सर्व डॉक्युमेंट NSDL e-Gov च्या कार्यालयात पाठवावी लागतील.

येडीयुरप्पा यांच्या नातीची गळफास घेऊन आत्महत्या; कर्नाटकात खळबळ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांची नात सौंदर्या नीरज यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बंगळुरूच्या वसंतनगर येथील फ्लॅटमध्ये फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे 3 वर्षांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.

सौंदर्या ही येडियुरप्पांच्या पहिल्या पत्नीच्या मुलीची मुलगी होती. ती 30 वर्षांची होती. ती बंगळूरमधील एम.एस.रामय्या रुग्णालयात डॉक्टर होती. ती पतीसमवेत माऊंट कॅरमेल कॉलेजजवळील इमारतीत राहत होती. आज सकाळी राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बाऊरींग रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनुसार माहिती नुसार, सौंदर्या यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची शक्यता आहे. प्रथमदर्शनी सौदर्या यांनी आत्महत्या केल्याचे दिसत असल्याचे पोलीस म्हणाले. या घटनेनंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह मंत्रिमंडळातील सहकारी येडियुरप्पांच्या सांत्वनासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.