Friday, December 26, 2025
Home Blog Page 2884

किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल; नवाब मलिकांची जळजळीत टीका

Malik Somaiya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते किरीट सोमैय्या म्हणजे हे एखाद्या चित्रपटातील आयटम गर्ल असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. नवाब मलिक हे नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी किरिट सोमय्या यांच्यावर टीका केली.

चित्रपट जशी चालवण्यासाठी आयटम गर्लची गरज लागते. मला वाटतं राजकीय क्षेत्रामध्ये किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल सारखे राजकारण करत आहेत. बातमी कशी होईल त्यासाठी आयटर्म गर्लचा कार्यक्रम सुरु आहे,” असे नवाब मलिक यांनी म्हंटल.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून किरिट सोमय्या सातत्याने सरकार मधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत आहेत. कागदपत्रांच्या आधारे ते महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस नेत्यांविरोधात कारवाई साठी प्रयत्नशील असतात.

PM KISAN SCHEME : खुशखबर!! या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 2000 रुपये

PM Kisan

नवी दिल्ली ।  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM KISAN योजना) अंतर्गत केंद्र सरकार देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर करते. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये ट्रान्सफर केले आहेत. मात्र सध्या काही शेतकरी असे आहेत की, जे या सरकारकडून सुरू असलेल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

जर तुम्ही देखील त्यापैकीच एक असाल तर हे लक्षात घ्या की, सरकार लवकरच 11 व्या हप्त्यासाठीचे पैसे जारी करणार आहे. 11व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही ताबडतोब रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

पीएम किसानचा हप्ता ‘या’ महिन्यांत येतो
प्रत्येक आर्थिक वर्षात, पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या कालावधीत येतो. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतो.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रिया
या योजनेत रजिस्ट्रेशन करणे अगदी सोपे आहे. ही प्रक्रिया तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी पंचायत सचिव किंवा पटवारी किंवा स्थानिक कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अर्ज करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेसाठी स्वतःचे रजिस्ट्रेशन देखील करू शकता.

तुम्ही अशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता
>> तुम्हाला सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
>> आता Farmers Corner वर जा.
>> येथे तुम्हाला ‘New Farmer Registration’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
>> यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
>> यासोबतच कॅप्चा कोड टाकून राज्य निवडावे लागेल आणि त्यानंतर ही प्रक्रिया पुढे करावी लागेल.
>> या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण पर्सनल माहिती भरावी लागेल.
>> यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे.
>> त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

जाणून घ्या कोणत्या शेतकऱ्यांना फायदा होतो ?
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, ज्यांच्याकडे 2 हेक्टर म्हणजे 5 एकर लागवडीयोग्य शेती आहे त्यांनाच त्याचा लाभ मिळतो. आता सरकारने जमिनीची मर्यादा रद्द केली आहे. मात्र जर कोणी इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल तर त्याला पीएम किसान सन्मान निधीमधून बाहेर ठेवले जाते. वकील, डॉक्टर, सीए आदीही या योजनेतून बाहेर पडले आहेत.

‘या’ चुकांमुळे अडकतात पैसे
काही वेळा सरकारकडून खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात, मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाहीत. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकातील चूक असू शकते.

अभिनास्पद : सातारचा सुमित दिल्लीत राजपथावर संचलनासाठी सर्वात पुढे

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

शहरातील रिक्षाचालकाचा मुलगा दिल्लीत राजपथावर संचलनासाठी सुमित धारासिंग साळुंखे याची निवड झाली आहे. सुमित साताऱ्यातील एलबीएस महाविद्यालयाचा हा विद्यार्थी एनसीसी रॅलीमध्ये महाराष्ट्र पथकाचा कमांडर म्हणून राज्याचा बॅनर घेऊन पंतप्रधान रॅलीत सर्वांत पुढे चालणार आहे. सुमितच्या या यशाने साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा सुमित साळुंखे हा विद्यार्थी आहे. या निवडीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून विविध आठ कॅम्पमधून अत्यंत खडतर प्रशिक्षण व निवड चाचणीमधून त्याची महाराष्ट्रातील अंतिम 34 सैनिकांमध्ये निवड झाली आहे. यावर्षी तो 22 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सातारा या बटालियनमधून तो ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा देत आहे.

सुमितच्या या यशासाठी बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल डी. एम. ठोंगे, कर्नल पराग गुप्ते तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र शेजवळ यांनी मार्गदर्शन केले. एन. सी. सी. अधिकारी प्रा. कॅप्टन डॉ. महेश गायकवाड, सुभेदार मेजर उदय पवार, ट्रेनिंग जेसीओ दीपक शिंदे, हवालदार यशवंत पवार यांनी सुमितच्या प्रशिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले.

पाकिस्तानी नागरिकांना धक्का; ‘या’ कारणामुळे कार खरेदी करणे होणार कठीण

नवी दिल्ली । पाकिस्तानातील लोकांना आता स्वतःची कार खरेदी करणे आता पूर्वीपेक्षा कठीण झाले आहे. देशात नवीन गाड्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ARY न्यूजनुसार, पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने सामान्यतः “मिनी-बजेट” म्हणून ओळखले जाणारे वादग्रस्त विधेयक मंजूर केले. याअंतर्गत कारवरील कर 100% वाढवण्यात आला आहे.

रिपोर्ट्स नुसार, देशाच्या सिंध एक्साइज अँड टॅक्सेशन डिपार्टमेंटने वित्त (पूरक) कायदा 2022 द्वारे टॅक्सवरील टॅक्स वाढवला आहे. यानंतर पाकिस्तानमध्ये वाहनांच्या किंमती वाढल्या आहेत. पाकिस्तानच्या विरोधी पक्षांच्या टीकेनंतरही हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता 1001cc ते 2000cc इंजिन क्षमतेच्या कारवरील टॅक्स 2 लाख रुपये करण्यात आला आहे, जो पूर्वी 1 लाख रुपये होता.

4 लाख रुपये टॅक्स भरावा लागेल
आता 2001cc पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या कार मालकांना 4 लाख रुपये टॅक्स भरावा लागेल. असे मानले जात आहे की, हा निर्णय पाकिस्तानच्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचे कंबरडे मोडेल. पाकिस्तानमधील एकूण विक्रीत या श्रेणीतील कारचा मोठा वाटा आहे. सामान्यतः, वाढीव किंवा कमी टॅक्ससह मागणी वाढण्याची आणि घटण्याची शक्यता जास्त असते.

देश अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे
पाकिस्तान सध्या प्रचंड कर्जात बुडाला असून देशातील महागाईही झपाट्याने वाढत आहे. याआधी पंतप्रधान इम्रान खान यांनीही देशात वस्तू आणि इंधनाच्या किंमती वाढल्याने देशातील लोकांना प्रचंड महागाईचा सामना करावा लागत असल्याची कबुली दिली होती.

विक्री 15 टक्क्यांनी कमी होईल
पाकिस्तानच्या इंडस मोटर कंपनीचे सीईओ अली असगर जमाली यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, “नवीन अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी टॅक्समध्ये काही बदल केले गेले तर त्याचा परिणाम स्थानिकरित्या असेंबल केलेल्या वाहनांच्या विक्रीत 10 -15 टक्के घसरण होऊ शकते.” यामुळे पाकिस्तान सरकारने स्थानिक उत्पादनाला चालना देण्याची आणि आयात वाहनांवरील टॅक्स वाढवण्याची शिफारस केली होती.

Share Market : निफ्टी आणि सेन्सेक्सने केली जोरदार रिकव्हरी, IT अजूनही रेड मार्कमध्ये

Stock Market Timing

नवी दिल्ली । मंगळवार, 25 जानेवारी 2022 रोजी भारतीय शेअर बाजाराने अनेक दिवसांच्या घसरणीनंतर जोरदार पुनरागमन केले. NSE निफ्टी 50 ने 17,200 ची पातळी ओलांडली आहे आणि BSE सेन्सेक्सने 57,800 ची पातळी परत मिळवली आहे.

जरी दिवसाचे अंतर कमी असले तरीही बाजाराने चांगली रिकव्हरी केली आणि निफ्टी 50 मध्ये 0.75% किंवा 128.85 अंकांची वाढ झाली. निफ्टीने 17200 ची पातळी ओलांडली आणि 17,277.95 वर बंद झाला. त्याचप्रमाणे, बीएसई सेन्सेक्स 0.64% किंवा 366.64 अंकांनी वाढला आणि 57,858.15 वर बंद झाला.

निर्देशांकांबद्दल बोलायचे झाल्यास, PSU बँकांमध्ये 4 टक्क्यांहून जास्तीची वाढ दिसून आली. यानंतर, ऑटो क्षेत्र 2 टक्क्यांहून अधिकने वाढले. मात्र, आयटी इंडेक्स अजूनही ग्रीन मार्कमध्ये बंद होऊ शकला नाही. त्यात 0.33% ची घसरण नोंदवली गेली.

Nifty 50 चे टॉप 5 गेनर
Maruti Suzuki India : +6.83 %
Axis Bank Ltd. :+6.76 %
SBI : +4.15 %
IndusInd Bank :  +3.88 %
UPL : +3.74 %

Nifty 50 चे टॉप 5 लूजर
Wipro : -1.75 %
Bajaj Finserv Ltd : -1.13 %
Titan Company :  -1.10 %
Infosys : -0.84 %
Tech Mahindra : -0.83 %

स्वार्थासाठी युतीमध्ये मिठाचे खडे कोणी टाकले? शेलारांचा संजय राऊतांना सवाल

Ashish Shelar & Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आमची 25 वर्ष युतीमध्ये सडली अस विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर राज्यातील भाजप आक्रमक झाले असून युतीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या स्थापने वरून भाजप नेत्यांचे कान टोचल्यानंतर आशिष शेलार यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. स्वार्थासाठी युतीमध्ये खडे टाकणारे टाकणारे कोण होते असा सवाल त्यांनी केला.

आमची बाळासाहेब यांच्याबरोबर असणारी युती ही वैचारीक युती होती. बाळासाहेब यांच्यासोबत असणाऱ्या युतीचा आम्हाला अभिमानाच आहे. मुंडे महाजन यांनी युती टिकवली, पुढच्या पिढीने स्वार्थासाठी मीठ टाकले, युतीमध्ये मिठाचे खडे कोणी टाकले ? असा सवाल आशिष शेलार यांनी केला.

संजय राऊतांचा जन्म हा १९६१ ला झाला. शिवसेनेची स्थापना १९६६ रोजी झाली. तुम्ही स्वतःला कधीपासून इतिहासाचार्य समजू लागलात ? असाही सवाल संजय राऊतांनी यावेळी केला. संजय राऊतांना खुल्या चर्चेला यावे असे आव्हान आशिष शेलार यांनी यावेळी दिले.

दरम्यान, संजय राऊत यांनी काल काढलेल्या व्यंगचित्रा वरूनही त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. प्रमोद महाजन यांचे व्यंगचित्र हे जून आहे. आत्ताच ते मुद्दामून प्रसारित करण्याचा राऊतांचा नेमका हेतू काय ? तुमच्या विषयातल कार्टून काढले तर नेव्हीच्या अधिकाऱ्याचा डोळा फोडला जातो. आता तुम्ही दुटप्पी भूमिका घेऊ नका, असाही टोला राऊतांनी लगावला.

Cryptocurrency Prices : क्रिप्टो बाजारातील घसरणही थांबली, बिटकॉइनमध्ये झाली वाढ

नवी दिल्ली । आज, मंगळवार, 25 जानेवारी 2022 रोजी मोठ्या घसरणीनंतर क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये मोठी वाढ झाली आहे. ग्लोबल क्रिप्टो मार्केट गेल्या 24 तासांमध्ये 2 टक्क्यांहून अधिकने वाढले आहे. भारतीय वेळेनुसार, 2:00 PM वाजता जागतिक क्रिप्टो मार्केट कॅप $1.64 ट्रिलियन पर्यंत वाढले आहे, जे काल त्याच वेळी $1.60 ट्रिलियन होते. सर्वात मोठे चलन असलेले बिटकॉईन 3 टक्क्यांहून अधिकने वाढले आहे.

बातम्या लिहिण्याच्या वेळी, Bitcoin $36,231.90 वर 3.25% च्या उसळीसह ट्रेड करत आहे. Bitcoin ने गेल्या 24 तासात $33,184.06 ची नीचांकी आणि $37,247.52 चा उच्चांक केला. मात्र, इथरियममध्ये 0.36% ची घसरण झाली आहे आणि हे कॉइन $2,391.66 वर ट्रेड करत आहे. इथरियमने त्याच कालावधीत $2,172.30 ची नीचांकी आणि $2,463.59 ची उच्च पातळी गाठली. Bitcoin चे मार्केट वर्चस्व 42.1 टक्के आहे, तर Ethereum चे मार्केट वर्चस्व 17.5 टक्के आहे.

आज कोणत्या करन्सीची किंमत किती आहे जाणून घ्या
बिटकॉइन व्यतिरिक्त, सोलाना, टेरा आणि पोल्काडेट यांनी मंगळवारी किंचित उडी घेतली. खालील तक्त्यामध्ये, आम्ही तुम्हाला सकाळी 2:05 ते दुपारी 2:10 पर्यंतचे दर देत आहोत.

क्रिप्टो / कॉइन  बदल (% मध्ये ) प्राइस
BNB – 0.79% $362.55
Cardano – 2.38% $1.02
Solana + 3.38% $91.08
XRP – 1.27% $0.5945
Terra LUNA + 1.88% $64.94
Dogecoin – 1.11% $0.1345
Polkadot + 2.80% $17.87
Shiba Inu – 2.65% $0.00002064
TRON – 0.46% $0.05507

स्टॉक मार्केट ट्रेडिंगसाठी आता KYC अनिवार्य; अंतिम मुदत इथे तपासा

Stock Market

नवी दिल्ली । तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आता तुम्हाला तुमच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे KYC करावे लागेल. अन्यथा, तुमचे खाते बंद केले जाईल आणि तुम्ही शेअर बाजारात ट्रेड करू शकणार नाही.

1 जून 2021 नंतर उघडलेल्या सर्व खात्यांसाठी सहा डिटेल्स देणे अनिवार्य करण्यात आले आहे. KYC अपडेट करण्यासाठी गुंतवणूकदारांना 31 मार्च 2022 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. ही माहिती अपडेट न केल्यास तुमचे डीमॅट खाते इनऍक्टिव्ह केले जाईल. त्यानंतर ही माहिती अपडेट केल्यानंतरच ती पुन्हा ऍक्टिव्ह होईल.

KYC प्रक्रिया कशी पूर्ण करावी ?
NSDL नुसार, डीमॅट आणि ट्रेडिंग खाती असणार्‍या गुंतवणूकदारांनी तुमच्या KYC प्रक्रियेचे 6 डिटेल्स देणे आवश्यक आहे. यामध्ये नाव, पत्ता, पॅन डिटेल्स , मोबाईल नंबर, ई-मेल आयडी आणि वार्षिक उत्पन्न यांचा समावेश आहे. डिमॅट खातेधारकाने उत्पन्न, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी अपडेट न केल्यास त्याचे खाते इनऍक्टिव्ह केले जाईल.

खात्यात असलेल्या शेअर्सचे काय होणार?
खाते इनऍक्टिव्ह केल्यावर, सध्याचे शेअर्स किंवा पोर्टफोलिओ खात्यातच राहतील. मात्र, तुम्ही कोणत्याही नवीन प्रकारची खरेदी आणि विक्री करू शकणार नाही. KYC डिटेल्स अपडेट केल्यावरच हे खाते पुन्हा ऍक्टिव्ह केले जाईल. सीडीएसएल आणि एनडीएसएल ने यापूर्वीच यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे.शेअर बाजाराचे काम पारदर्शक व्हावे आणि शेअर होल्डिंगची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी KYC वर भर देण्यात येत आहे. KYC सह, सेबीकडे शेअर खरेदी आणि विक्रीचे संपूर्ण खाते असेल. यामुळे करचुकवेगिरीलाही आळा बसेल.

तहसिलदारांचा चालक लाच लुचपतच्या जाळ्यात

दहिवडी | वाळू, माती, मुरूम वाहतुकीसाठी माणचे तहसीलदार यांना सांगून सुरू करून देण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी राणंद (ता. माण) येथील कोतवाल व तहसीलदार यांच्या शासकीय वाहनावरील चालक कृष्णदेव ऊर्फ किसन दत्तात्रय गुजर (वय – 34) याच्यावर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली असून, गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी, तक्रारदार याचा वाळू, माती, मुरूम वाहतुकीचा व्यवसाय तहसीलदारांना सांगून सुरू करून देण्यासाठी कोतवाल किसन गुजर याने तक्रारदार याच्याकडे प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार 28 डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांच्याकडे केली. तक्रारदार तक्रारीनुसार याने दिलेल्या विभागाच्या कार्यप्रणालीप्रमाणे पडताळणी केली असता पडताळणी कारवाईमध्ये किसन गुजर याने या तक्रारदाराकडे 25 हजार रुपयांची मागणी करून चर्चेअंती 20 हजार रुपये मागणी करून वाळू, मुरूम, माती वाहतुकीचा व्यवसाय सुरू करण्यास सांगितले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर किसन गुजर यांना तक्रारदार यांच्यावर शंका आल्याने त्याने लाच रक्कम स्वीकारली नाही.

किसन गुजर याच्याविरुद्ध दहिवडी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सूरज गुरव व सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस कर्मचारी अविनाश सागर, प्रीतम चौगुले, संजय संकपाळ, भास्कर भोरे, चालक बाळासाहेब पवार यांनी केली

Budget 2022: ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी होणार खास घोषणा; स्टार्टअप्सना मिळू शकते टॅक्स सूट

Repo Rate

नवी दिल्ली । कोविड-19 च्या कासध्याच्या ळात ऑनलाइन शिक्षण हा विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार बनला आहे. ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेता सरकार 2022 च्या अर्थसंकल्पात याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठी पावले उचलू शकते. यामध्ये या क्षेत्रासाठी स्वतंत्र निधीची तरतूद तसेच ऑनलाइन एज्युकेशन स्टार्टअपसाठी दीर्घकालीन टॅक्स सूट यांचा समावेश असू शकतो.

तांत्रिक सुविधांचा अभाव हा प्रत्येक मुलापर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचवण्यात मोठा अडथळा आहे. यावर मात करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन गावांमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात काही महत्त्वाच्या उपाययोजनांची घोषणा करू शकतात. याअंतर्गत गरीब घटकातील मुलांनाही मोबाईल किंवा टॅब देण्याचा विचार सुरू आहे.

तंत्रज्ञान अपग्रेडवर भर द्या
कोरोनाने शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सरकारलाही याची जाणीव आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या अपग्रेडेशनवर भर देण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळा निधी जाहीर केला जाऊ शकतो. सर्व सरकारी शाळांना इंटरनेटशी जोडण्यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणाही केली जाऊ शकते. देशातील ग्रामीण भागात डिजिटल पायाभूत सुविधांच्या अभावावर मात करण्यासाठी सरकार खास पावले उचलणार आहेत. त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांना माफक दरात मोबाईल किंवा टॅब देण्याचाही सरकार विचार करत आहे.

स्टार्टअपला टॅक्स सूट मिळू शकते
सरकार स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी खूप रस घेत आहे. अर्थसंकल्पातील शिक्षण क्षेत्रातील काम स्टार्टअप्स आणि छोट्या संस्थांना दीर्घकालीन टॅक्स सवलत देऊ शकते. यासोबतच त्यांना सुलभ अटींवर कर्ज देण्याची घोषणाही अर्थसंकल्पात केली जाऊ शकते. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात अनेक स्टार्टअप सुरू झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना घरबसल्या अभ्यास सुरू ठेवण्यास मदत तर केलीच शिवाय अभ्यासक्रमाचे साहित्यही मोठ्या प्रमाणावर डिजिटल केले. याचा विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनाही खूप फायदा झाला आहे.

स्वतंत्र नियामक संस्था
ऑनलाइन शिक्षणाच्या लोकप्रियतेबरोबरच त्याच्या नियमनासाठी स्वतंत्र नियामक संस्था स्थापन करण्याची मागणीही होत आहे. शिक्षण जगताशी निगडित अनेक जण म्हणतात की,” ऑनलाइन शिक्षणाचा विस्तार खूप झाला आहे. त्यामुळे त्याच्या कामकाजाबाबत नियम आणि कायदे केले पाहिजेत. तसेच, संपूर्ण यंत्रणेवर देखरेख ठेवणारी स्वतंत्र नियामक संस्था असावी. स्वतंत्र नियामक संस्था निर्माण करण्याची घोषणाही अर्थसंकल्पात अपेक्षित आहे.