Friday, December 26, 2025
Home Blog Page 2885

विराटच्या जागी मी असतो तर लग्नच केलं नसत; शोएब अख्तरचे वादग्रस्त वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली हा गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वोत्तम फॉर्मात नाही. त्याच्या बॅट मधून हव्या तशा धावा निघत नाही. यावरून पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब आखतर ने विराट कोहली वर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. विराट कोहलीने खूप लवकर लग्न केलंय. ज्याचा परिणाम त्याच्या खेळावर होत आहे असे विधान त्याने केलं.

शोएब म्हणाला, जर तो विराटच्या जागी असता तर त्याने कधीच लग्न केले नसते. लग्न केल्यानंतर तुमच्यावर आणखी जबाबदारी येते. शोएबच्या मते  क्रिकेट करिअर संपल्यानंतर लग्न करणे योग्य असते. शोएब म्हणाला, मी जर त्याच्या जागी असतो तर लग्न केले नसते.

विराट कोहलीने 120 शतके मारल्यानंतर लग्न करायला हवं होतं. जर मी भारतासारख्या देशात असतो आणि मोठा स्टार असतो तर मी माझ्या खेळावरच फोकस केला असता. आणि 400 विकेट्स घेतल्या असत्या. मी माझ्या जबाबदाऱ्या कधीच वाढवल्या नसत्या. हा माझा वैयक्तिक निर्णय असता”, असंही शोएब अख्तरनं म्हटलंय.

संजय राऊत म्हणजे खुशामतगीर; भाजप आमदाराचे टीकास्त्र

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील राजकारणात दिवसेंदिवस भाजप आणि शिवसेनेतील वैर वाढत चालले असून भाजप आमदार राम सातपुते यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांचे इतिहासातलं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं अशी टीका त्यांनी केली आहे.

जनाब संजय राऊत,तुमचं इतिहासातलं नाव खुशामतगिर म्हणून नेहमीच अव्वल राहिलं,त्यामुळे आपल्याला ‘प्राईड व्ह्युल्यु ‘काय असते ? हे समजण्याची तुमची कुवत नाही..
महाराष्ट्रातील बार्टी संस्थेचं वाटोळं तुमच्या सरकारने केलंय त्यावर पण बोला कधी तरी असे ट्विट राम सातपुते यांनी केलं आहे.

प्राईड व्ह्युल्यु ‘काय असते ? हे समजण्याची संजय राऊत यांची कुवत नाही. त्यामुळेच पंतप्रधान मोदी बांधत असलेलं सेंट्रल व्हीस्टा हे नव संसद भवन असो की नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा असो की काशीचं भव्य दिव्य मंदीर असो. हे सर्व तुमचा जळफळाट करणारच आहे.’ अस सातपुते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, वंचित घटकातील विद्यार्थ्यांचा टक्का उच्चशिक्षण व संशोधनात वाढावा या साठी बार्टीसारख्या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. परंतु या आघाडी सरकारच्या कामचुकार धोरणामुळे तिचा उद्देशच नष्ट होतोय. यामुळे ५१८ विद्यार्थ्यांच्या मुलाखती होऊन वर्ष उलटून गेलं तरी त्यांना शिष्यवृत्ती मिळालेल्या नाहीत. यावर आपण कधी बोलणार की, वंचीत नेहमी वंचीतच राहिले पाहिजे, हे काँग्रेसचच धोरण आपण राबवणार आहात असा सवालही सातपुते यांनी राऊतांना विचारला आहे

एका अफवेमुळे गुंतवणुकदारांचे बुडाले कोट्यवधी रुपये; कसे ते जाणून घ्या

Recession

नवी दिल्ली । एखाद्या अफवेमुळे गुंतवणुकदारांनी कष्टाने कमावलेला पैसा डोळ्यांसमोर क्षणात कसा नष्ट होतो. याचे मोठे उदाहरण सोमवारी भारतीय शेअर बाजारातील घसरणीत पाहायला मिळाले. बाजार विश्लेषकांचे म्हणणे आहे की, LTCG टॅक्स बाबतची अफवा गुंतवणूकदारांमध्ये पसरली आणि विक्रीत घबराट पसरली.

केडिया एडव्हायझरीचे संचालक अजय केडिया यांनी सांगितले की,”लॉन्ग टर्म कॅपिटल गेन (LTCG) टॅक्स बाबत बाजारात अफवा पसरली होती की सरकार येत्या अर्थसंकल्पात मोठे बदल करू शकते. याचा थेट परिणाम गुंतवणूकदारांच्या कमाईवर आणि कर दायित्वावर होईल. या गोष्टीने देशांतर्गत गुंतवणूकदारांसह परदेशी गुंतवणूकदारांनाही धक्का बसला आणि त्यांनी भारतीय भांडवली बाजारातून आपले पैसे काढण्यास सुरुवात केली. परकीय गुंतवणूक पोर्टफोलिओ (FPI) मध्ये घट झाल्यामुळे बाजारभावावर परिणाम झाला, ज्याचा परिणाम मोठ्या घसरणीच्या रूपात दिसून आला.”

याबाबत अफवा पसरली होती
सरकार बजेटमध्ये LTCG मध्ये सुधारणा करून टॅक्सचा दर सध्याच्या 10 टक्क्यांवरून 15 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते, असे बेअर्सच्या वतीने सांगण्यात आले. यासोबतच त्याचा कालावधी 1 वर्षावरून 3 वर्षांपर्यंत वाढवण्याचा विचार आहे. यामुळे बाजारात भीती पसरली आहे. विदेशी गुंतवणूकदारही काहीही विचार न करता उलटे धावू लागले आणि बघता बघता जवळपास 9 लाख कोटी रुपये बाजारात बुडाले.

येथे गुंतवणूकदार टॅक्स हटवण्याची मागणी करत आहेत
शेअर बाजारातील गुंतवणूकदार सरकारकडे बजेटमध्ये LTCG टॅक्स रद्द करण्याची मागणी करत आहेत. गुंतवणूकदार आधीच सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन (STT) भरत असताना LTCG टॅक्स लावण्याबाबत काय तर्क आहे? असे ते म्हणतात. शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”भारतात ट्रेडिंग टॅक्स खूप जास्त आहे. अशा परिस्थितीत LTCG चा बाजारातील भावावर विपरीत परिणाम होतो.”

गुंतवणूकदारांना दुहेरी फटका
गुंतवणूक सल्लागार बळवंत जैन म्हणतात की STT पूर्णपणे काढून टाकला पाहिजे किंवा तो थोडासा कमी केला पाहिजे. सुरुवातीला हे LTCG ऐवजी लागू करण्यात आले होते परंतु आता LTCG आणि STT दोन्ही लागू आहेत. यामुळे गुंतवणूकदारांवर दुहेरी बोजा पडतो, जो भारतीय भांडवली बाजाराच्या दृष्टीकोनातून योग्य नाही.

पालकमंत्री नवाब मलिक यांचा आजपासून परभणी जिल्हा दौरा; असे असतील दोन दिवसीय कार्यक्रम

nawab malik

परभणी प्रतिनिधी |

राज्याचे अल्पसंख्याक विकास, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे मंत्री आणि परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक हे आज 4 वाजता परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दोन दिवस त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत .

मंगळवार 25 जानेवारी 2022 रोजी दुपारी 04.00 वाजता परभणी येथे आगमन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परभणी जिल्हा शहर कार्यकारणीची बैठक, स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी सायंकाळी 5.00 वाजता महानगरपालिका परभणी नगरसेवकांची बैठक, स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी सायंकाळी 06 ते 08 दरम्यान राखीव आणि सोईनुसार मुक्काम करतील.

बुधवार दि.26 जानेवारी रोजी सकाळी 9.05 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमकडे प्रयाण. सकाळी 9.15 वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम, परभणी येथे आगमन व भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.45 वाजता जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगर पालिका आयुक्त जिल्हा कृषी अधिकारी आणि इतर सबंधीत अधिकाऱ्यांसमवेत जिल्हयातील महत्वाच्या प्रश्नांसदर्भात आढावा बैठक, स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी.

सकाळी 10.30 वाजता दैनिक धर्मयोध्दा या दैनिकाच्या प्रथमअंक प्रकाशन सोहळयास उपस्थिती स्थळ बी. रघुनाथ सभागृह, वसमत रोड, परभणी. सकाळी 11.00 वाजता विजय गव्हाणे माजी आमदार यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी. दुपारी 12.00 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, परभणी ग्रामीण कार्यकारीणीची बैठक स्थळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय, परभणी दुपारी 1 ते 3.30 दरम्यान राखीव. दुपारी 3.30 वाजता परभणी येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण करतील.

अबब… !!! एका मेंढीला मिळाली तब्ब्ल सव्वा दोन लाखांहून जास्त किंमत. सहा मेंढ्याची झाली 14 लाख रुपयांना विक्री

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

एका मेंढीला सव्वा दोन लाखांहून अधिक किंमत मिळू शकते हे कोणाला सांगूनही पटणार नाही. मात्र सांगलीच्या माडग्याळ बाजारात एक मेंढी तब्ब्ल दोन लाख 33 हजाराला विकली गेली आहे. त्यामुळे आनंदित झालेल्या शेतकऱ्याने मेंढीची हलगीच्या निनादात भव्य मिरवणूक काढली आणि आनंद साजरा केला.

जत तालुक्यातील माडग्याळ येथील मय्याप्पा चौगुले या शेतकऱ्याची सहा मेंढ्याची तब्बल 14 लाखाला विक्री करण्यात आली. मेंढ्याना लाखो रुपयात भाव मिळाल्याने गावात मिरवणूक काढण्यात आली. माडग्याळ मधील मेंढीचे चांगले रुबाबदार नाक, विशिष्ट चव आणि स्वाद असलेले मांस प्रसिद्ध आहे.

त्यामुळे माडग्याळ मेंढीची दर वाढलेले आहेत. माळ रानावर आणि दुष्काळी भागात कमीत कमी चारा खाऊन शेतकऱ्याला चांगला भाव ही मेंढी मिळवून देत आहे. माडग्याळचा बाजार मेंढ्यासाठी प्रसिद्ध आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात मेंढ्या विक्रीसाठी येत आहेत. मेंढ्याना मिळालेल्या भावामुळे मागणीही वाढू लागली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून अखंडपणे ‘या’ गावात सकाळी वाजते राष्ट्रगीत, ९ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्रगीत वाजताच सर्वजण होतात स्तब्ध…

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

प्रबळ इच्छाशक्ती, दृढनिश्चय आणि दृढ संकल्प असेल तर प्रत्येक प्रयत्न यशस्वी होऊ शकतो. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी गावच्या गावकऱ्यांनी असेच काहीसे केले आहे, ज्यानंतर भिलवडी हे गाव देशातील सहावे गाव आणि महाराष्ट्रातील पहिले नियमित राष्ट्रगीत वाजविणारे गाव बनले आहे. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडी या गावातील व्यापारी संघटनेने सुरु केलेली राष्ट्रगीताची परंपरा गेल्या दोन वर्षांपासून अखंडीतपणे सुरु आहे. रोज सकाळी दिनविशेष.. त्यावर आधारित एक प्रेरणादायी गाणं.. आणि बरोबर ९ वाजून दहा मिनिटांनी राष्ट्गीत..

व्यापारी संघटनेच्या पब्लिक ऍड्रेस सिस्टिमवरून हे राष्ट्रगीत लावलं जातं आणि सर्व व्यापारी आणि ग्रामस्थ त्याचा मान राखतात. धार्मिक स्थळांमध्ये नियमितपणे भजन कीर्तन होणे ही काही नवीन गोष्ट नसली तरी गावात जन गण मन नियमितपणे ऐकायला मिळाले तर गाव देशासारखे भासू लागते. सांगली जिल्ह्यातल्या भिलवडीच्या व्यापाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी टोन सेट केला, सकाळचे ९ वाजले आहेत आणि अचानक सायरन वाजतो, त्यानंतर पब्लिक ऍड्रेस सिस्टीममधून राष्ट्रगीत वाजते. लोक थांबतात, लक्ष वेधून घेतात आणि काही कालावधीसाठी स्तब्ध उभे राहतात.

नवख्या व्यक्तीसाठी हे आश्चर्यचकित होण्यासारखेच आहे. मात्र, इथल्या ग्रामस्थांकसाठी हा एक आपल्या देशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयोग आहे. १५ ऑगस्ट २०२० पासून भिलवडी मध्ये PA सिस्टीमद्वारे ‘जन गण मन’ हे राष्ट्रगीत दररोज वाजवण्यास सुरुवात केली तेव्हा काहींना वाटले की देशभक्तीचा उत्साह काही दिवसांत किंवा आठवड्यातून कमी होईल. मात्र, सर्व निष्कर्ष खोटे ठरले. दहा हजार लोकसंख्या असलेल्या छोट्या शहरातील नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह जागृत करून, दररोज राष्ट्रगीत वाजवून, स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाला दोन वर्ष पूर्ण झाले. महाराष्ट्रातील या छोट्याशा गावाने खूप सकारात्मक संदेश दिला आहे.

अखेर आनंद महिंद्रा यांनी खरा केला आपला शब्द, देवराष्ट्रेतील दत्तात्रय लोहार यांना दिली बोलेरो गाडी भेट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी असलेल्या देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांनी भंगारात पडलेल्या वस्तूंपासून अफलातून मिनी जिप्सी गाडी बनवली होती. गाडीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर पसरल्यानंतर या गाडीचे लाखो दिवाने झाले होते तर खुद्द महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा हे सुद्धा या चाहते झाले आहेत. ही गाडी बनवणाऱ्या दत्तात्रय लोहार यांच्यावर ते इतके खुश झाले की त्यांनी दत्तात्रय लोहार यांना बोलेरो गाडी भेट देण्याचे घोषित केले होते.

त्यानुसार युवा नेते विशाल पाटील, माजी खासदार प्रतिक पाटील युव नेते जितेश कदम व कंपनीचे अधिकारी मुनाफ काझी यांच्या उपस्थितीत घोषणेची पुर्तता करण्यात आली. देवराष्ट्रे येथील दत्तात्रय लोहार यांची परिस्थिती बेताचीच आहे, थोडीसी शेती व छोटासा फॅब्रीकेशनचा त्यांचा व्यवसाय आहे. याद्वारेच ते आपल्या आयुष्याची गुजरान करत आहेत. अशातच मुलाने चारचाकी घेण्याचा हट्ट केला मात्र आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला चारचाकी गाडी घेण्याचे शक्य नसल्याचे त्यांनी ओळखले.

परंतु त्यांनी परिस्थिती पुढे न झूकता आपल्या फॅब्रिकेशनच्या दुकानात पडलेल्या भंगारातील वस्तूंपासून चार चाकी गाडी बनवली. महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी गाडीचा व्हिडिओ बघितल्यानंतर ते इतके खुश झाले की, त्यांनी ही गाडी बनवलेल्या दत्तात्रय लोहार यांना आपल्या कंपनीची बोलेरो गाडी भेट देण्याचे घोषित केले व त्यांची मिनी जिप्सी आपल्या कंपनीच्या कार्यालयात ‘आवर्षणग्रस्त व्यक्ति कसे काम करतात याचे उदाहरण म्हणून ठेवणार असल्याचे घोषित केले होते.’ त्यानुसार आज आपन दत्तात्रय लोहार यांना बोलेरो गाडी भेट दिली.

‘या’ जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात दोन गटात तुफान राडा, साहित्याची केली तोडफोड

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जिल्हा परिषद सदस्यांना समान निधी वाटप आणि सर्वसाधारण सभा ऑफलाईन घेण्याचा वाद गेल्या काही दिवसांपासून धुसफूसत असतानाच वॉटर एटीएमच्या पाच कोटींच्या टेंडर वरून सांगली जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यात दोन गटात तुफान राडा झाला. सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली. बंगल्या मधील साहित्याची तोडफोड करण्यात आली. राड्या दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पती, दिर यांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

जिल्हा परिषदेत गेल्या काही दिवसांपासून सदस्यांना समान निधी वाटप आणि सभा ऑफलाईन घेण्याचा वाद धुसफूसत असतानाच सोमवारी रात्री वॉटर एटीएम टेंडर देण्याच्या करणातून तुफान राडा झाला. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ही मंगळवारी ऑनलाइन घेण्यात येणार होती. या सभेमध्ये वॉटर एटीएम टेंडरचा ठराव करण्यात येणार होता. या टेंडरच्या करणातून सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही सदस्य अध्यक्षांच्या बंगल्यात दाखल झाले. या ठिकाणी अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांचे दीर आणि पती होते. या दोन गटात टेंडरवरून वाद झाला आणि वादाचे पर्यावसान तोडफोडीत झाले.

या मारहाण प्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे पती नंदू कोरे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये जिल्हा परिषदेचे भाजपाचे समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, सुनील पवार ( सुनीता पवार पती माहीला बाल कल्याण सभापती भाजप, ) सुनील पाटील ( आशा पाटील पती शिक्षण व आरोग्य सभापती – घोरपडे गट)भाजपाचे अरुण बालटे, अपक्ष सदस्य संभाजी कचरे यांच्या विरोधात फिर्याद देण्यासाठी दाखल झाले तसेच पाच सदस्यांच्याकडून कोरे यांच्या विरोधातही तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू होती. जिल्हा परिषद अध्यक्षांचे पती व दीर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सभापती प्रमोद शेंडगे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल झाले. अध्यक्षांचे पती व दीर यांनीच आम्हाला मारहाण केली आहे आणि आमच्या विरोधात खोटी तक्रार दिल्याचा आरोप शेंडगे यांनी यावेळी केला.

धक्कादायक : अत्याचारातून 16 वर्षाच्या मुलीने दिला बाळाला जन्म

Malharpeth Police

पाटण | तालुक्यातील एका गावात राहणारी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीने अत्याचारातून एका मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथे दाखल झालेला गुन्हा पाचोरा पोलीस ठाण्यात झिरो नंबरने वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील जि. जळगाव एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलीचे आईवडील हे ऊस तोडणीचे काम करतात. यासाठी त्यांना जिल्ह्याबाहेर कामासाठी जावे लागते. पीडीत मुलगी व तिचे आईवडील हे सातारा जिल्ह्यातील कराड येथील साखर कारखान्यात लागणाऱ्या ऊस तोडणीसाठी सन – 2019 पासून वास्तव्यास होते. दरम्यान कुटुंबातील एका 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आले. या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली व तीने काही दिवसांपुर्वीच मुलाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

यासंदर्भात पाटण तालुक्यातील मल्हारपेठ (जि. सातारा) येथील पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी दिपक शांताराम सोनवणे, कल्पना शांताराम सोनवणे, शांताराम भगवान सोनवणे, शालिक सोनवणे, सिंधु भरत भिल, भरत भिल या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा गुन्हा शुन्य क्रमांकाने पाचोरा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्याने शनिवारी रात्री कलम 376 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहूल मोरे करीत आहे.

उद्धव ठाकरे उद्या शिवाजी पार्कवर; तब्बल अडीच महिन्यांनंतर जाहीर कार्यक्रमाला हजेरी लावणार

uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. आजारी पडल्यानंतर प्रथमच एका कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. जवळपास अडीच महिन्यानंतर उद्धव ठाकरे हे सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी शिवाजी पार्कवर मुंबई महापालिकेकडून तयारी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती पाहता महापालिकेकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंती निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे शिवसैनिकांना संबोधित केले होते.

उद्धव ठाकरे यांना मान आणि पाठीच्या मणक्याचा त्रास होत होता. अखेर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार १२ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांवर एच. एन. रिलायन्स फाऊन्डेशन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली त्यानंतर उद्धव ठाकरे घरीच असून घरातूनच आपलं कामकाज करत आहेत.