Friday, December 26, 2025
Home Blog Page 2899

शिक्षकाने स्वतः चा फोटो ग्रुपमध्ये टाकून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिले अन्…

लातूर – जिल्हा परीषद शाळेतील सहशिक्षकाने व्हाॅट्सअप ग्रुपवर स्वताचा फोटो व भावपूर्ण श्रध्दांजली ची पोस्ट टाकून आत्महत्या केल्याची घटना काल जिल्ह्यातील चाकूर येथे घडली आहे.

चाकूर येथील जिल्हा परीषद मुलांच्या शाळेत सचिन शिवराज अंबुलगे (40) हे शिक्षक म्हणून कार्यरत होते, शहरातील आदर्श काॅलनीतील एका भाड्याच्या खोलीमध्ये ते कुटुंबीयासह राहत होते. त्यांच्या पत्नी व मुलगा हे गावाकडे गेले असता गुरूवारी रात्री अंबुलगे यांनी शाळेतील शिक्षकांच्या व्हाट्सअप ग्रुपवर स्वताचा फोटो टाकून भावपुर्ण श्रध्दांजली असे लिहले होते. तसेच त्यांनी आत्महत्या करीत असल्याबाबत नातेवाईकांनाही सांगितले होते. शुक्रवारी सकाळी नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता साडीच्या साह्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीस हवालदार शिवाजी गुंडरे, बालाजी नाईक यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मयत अंबुलगे यांच्या जवळून चिठ्ठी आढळून आली आहे. अंबुलगे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. खाजगी सावकार पतीला त्रास देत असल्याची तक्रार काही दिवसापुर्वी त्यांच्या पत्नीने पोलीसांत दिली होती.

याबाबत भाऊ रविंद्र अंबुलगे यांच्या तक्रारीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवणी या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले असून, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा असा परीवार आहे.

औरंगाबादकरांसाठी खुशखबर! स्मार्ट शहर बससेवा उद्यापासून होणार सुरू; ‘या’ मार्गांवर धावणार बस

smart city bus

औरंगाबाद – औरंगाबाद स्मार्ट सिटी तर्फे प्रवाश्यांच्या सेवेसाठी स्मार्ट शहर बस सेवेच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त 23 जानेवारी म्हणजेच उद्यापासून शहर बससेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. यावेळी अनुभवी माजी सैनिक चालक आणि वाहक ह्यांचाद्वारे सेवेचा संचालन होईल. स्मार्ट शहर बस ही ए. एस. सी. डी. सी. एल. औरंगाबाद आणि रा. प. महामंडळात झालेल्या करारानुसार रा. प. महामंडळाच्या चालक आणि वाहक यांच्यामार्फत चालविण्यात येत आहे. पण मागील 77 दिवसांपासून चालक आणि वाहक कामावर हजर नसल्यामुळे स्मार्ट शहर बस वाहतूक बंद आहे.

नागरिकांना बस सेवेचा लाभ व्हावा म्हणून स्मार्ट शहर बस सुरू करण्यासाठी मनपा आयुक्त व प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी एक महत्वाचा निर्णय घेतला आबे. या निर्णयानुसार करार पध्दतीने माजी सैनिकांच्या 15 वर्षांच्या चालकांचा अनुभव बघता त्यांची नेमणूक चालक आणि वाहक म्हणून करण्यात येत आहे आणि त्यामुळे 11 बसेस दोन पाळीत बससेवा पुरवणार आहे. प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले की, या निर्णयामुळे नागरिकांना देशसेवेचा गौरव प्राप्त असलेल्या अनुभवी सैनिकांचे अनुशासन व कार्यक्षमतेचा लाभ होईल. येत्या काळात या सेवेचा विस्तार कसा होईल यावर कार्य सुरू आहे, असेही ते म्हणाले. मागच्या काही महिन्यात शहर बस विभागाचे मुख्य चालन व्यवस्थापक राम पवणीकर, उप व्यवस्थापक मुकुल देव आणि सिध्दार्थ बनसोड यांच्या देखरेखीखाली या 56 चालक आणि वाहकांचे प्रशिक्षण पूर्ण केले गेले.

पहिल्या टप्प्यात खालील मार्गांवर धावणार बस –

– मार्ग क्र. 4
सिडको ते रेल्वे स्टेशन
मार्गे – टीव्ही सेंटर

– मार्ग क्र. 5
औरंगपुरा ते रांजणगाव
मार्गे – मध्यवर्ती बस स्थानक

– मार्ग क्र. 12
सिडको ते घाणेगाव
मार्गे – रांजणगाव, मायलन

– मार्ग क्र. 13
सिडको ते जोगेश्वरी
मार्गे – रांजणगाव

– मार्ग क्र. 19
चिकलठाणा ते रांजणगाव
मार्गे – सिडको, महावीर चौक, मोरे चौक

आगारात उभ्या शिवशाहीच्या बॅटऱ्या चोरीला

Aurangabad

औरंगाबाद – मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे लालपरी सह शिवशाही बसची मोठी दुर्दशा झाली आहे. यातच सिडको बस आगारात उभ्या असलेल्या गाड्यांच्या महागड्या बॅटऱ्या चोरीला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवशाहीसह मालवाहतूक गाड्यांच्या 18 बॅटऱ्या चोरीला गेल्यामुळे एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

20 जानेवारी रोजी चार शिवशाही एक लालपरी आणि चार मालवाहतूक वाहनांचा बॅटऱ्या बस आगाराच्या पार्किंग मधून चोरीला गेल्याचे आगार व्यवस्थापक लक्ष्मण लोखंडे यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली आहे. लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पालघर, परभणी, अहमदनगर आणि औरंगाबाद विभागाच्या प्रत्येकी एक मालवाहतूक वाहनातून आठ बॅटऱ्या चोरीला गेल्या असून, शिवशाही बस क्रमांक एमएच 09 ईएम 9746, एमएच 06 बीडब्ल्यू 4368, एमएच 60 बीडब्ल्यू 4425 आणि एमएच 09 एफएल 0987 या बसच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. याशिवाय जालना विभागाच्या बसची ही बॅटरी चोरट्याने लंपास केली.

एकूण 9 वाहनातील 72 हजार रुपये किमतीच्या 18 बॅटऱ्या चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारामुळे एसटी महामंडळाचे एकच खळबळ उडाली आहे. अगोदरच संपामुळे महामंडळ प्रचंड तोट्यात असून अनेक दिवसांपासून बस जागेवरून हलले नाहीत. त्यात चोरीच्या प्रकाराची भर पडली आहे. याप्रकरणी अधिक तपास हवालदार बावस्कर करीत आहेत.

साताऱ्यात विवाहितेचा छळ करून खून, नातेवाईकांचा ठिय्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहर उपनगरातील संगमनगर येथील 24 वर्षीय विवाहितेचा छळ मृत्यू झाला. सासरच्या लोकांकडून तिला बेदम मारहाण झाल्याने त्यात तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला. त्यानंतर सासर असलेल्या अपार्टमेंट बाहेर माहेरच्या लोकांनी ठिय्या मांडला होता.  सातारा पोलिसांनी सासरच्या लोकांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

सातारा सिव्हील व पोलिस सहकार्य करत नसल्याने विवाहितेच्या कुटुंबियांनी पोलिस ठाण्यासमोरच शुक्रवारी रात्री ठिय्या मांडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, शवविच्छेदन पुणे येथे केल्याने त्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. पती शंकर काळूराम भोळे, सासू लिलाबाई काळूराम भोळे, दीर राजेंद्र काळूराम भोळे, जाउ स्वाती राजेंद्र भोळे (सर्व रा. संगमनगर, सातारा) या संशयित आरोपींवर खुनासह विविध कमलान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

यामध्ये सुजाता शंकर भोळे (वय 24, रा. संगमनगर, सातारा) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, सुजाताचे चुलते अतुल दत्तात्रय धुमाळ (वय 48, रा. घोरपडे पेठ, पुणे) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. सुजाताला आई व वडील नाहीत. तिचा लहानपणापासून तक्रारदार चुलत्यांनी सांभाळ केलेला आहे.

महापुरुषांच्या पुतळ्यातून तुम्हाला प्रेरणा मिळत नसावी; सेना-एमआयएम पुन्हा आमने-सामने

Danve

औरंगाबाद – शहरातील सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा न उभारता त्या पैशातून सैनिकी शाळा सुरु करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती. यावरून आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रतिउत्तर दिले आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष आ. अंबादास दानवे यांनी, महाराणा प्रताप देशाचा गौरव होते, कदाचित तुम्हाला महापुरुषांच्या पुतळ्यातून प्रेरणा मिळत नसावी अशी खरमरीत टीका केली आहे.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. अतुल सावे, अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याच्या कामास सुरुवात करण्याची मागणी केली होती. बैठकीतच त्यांच्या मागणीला जलील यांनी विरोध करून पुतळा उभारणीवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी केली होती. यानंतर गुरुवारी त्यांनी पत्राद्वारे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी केली. यामुळे उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे. यातच शिवसेनेने खासदार जलील यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.

शिवसेना जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून खा. जलील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आ.दानवे म्हणाले, ”महाराणा प्रताप यांचे एक वाक्य आहे, ‘शासक का पहला कर्तव्य अपने राज्य का गौरव और सम्मान बचाए रखना होता है।’ महाराणा प्रताप हे या देशातील ‘हिंदुत्वाचा’ गौरव आहेत…जलील साहेब महापुरुषांच्या पुतळ्यांकडून आपल्याला चांगल्या कामाला प्रेरणा मिळत नसावी कदाचित ती आम्हाला मिळते”. तसेच आठवण करून देतो, ”केंद्र सरकारने देशातील १०० शाळा यावर्षी संलग्नित करून त्यांना सैनिकी शाळेचा दर्जा द्यायचे ठरवले आहे. यातील एखादी शाळा दिल्लीत जाऊन जिल्ह्यासाठी आणावी, शहर वाढतंय, शहरातील केंद्रीय विद्यालयाच्या विस्तारासाठी दिल्लीत थोडे श्रम खर्ची पाडता आले तर पहा” असा टोलाही आ. दानवे यांनी लगावला.

आता Axis बँकेच्या FD वर मिळणार जास्त व्याज, बँकेने वाढवले FD चे दर

Axis Bank

नवी दिल्ली । जर तुमचे खाते खाजगी क्षेत्रातील अ‍ॅक्सिस बँकेत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, अ‍ॅक्सिस बँकेने FD चे व्याजदरही वाढवले ​​आहेत. 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर हे बदल करण्यात आले आहेत. FD वर अ‍ॅक्सिस बँकेचे वाढलेले दर 20 जानेवारी 2022 पासून लागू आहेत. बँकेने ठराविक कालावधीसाठीच व्याजदर वाढवले ​​आहेत. अलीकडे एसबीआय, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेनेही FD चे व्याजदर वाढवले ​​आहेत.

अ‍ॅक्सिस बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्‍या कालावधीच्‍या विविध मुदतींमध्ये FD ऑफर करते. अ‍ॅक्सिस बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक 7 दिवस ते 29 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 2.50 टक्के व्याज दर देत आहे. 30 दिवस ते 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 3 टक्के व्याज दर देत आहे, तर 3 महिने आणि 6 महिन्यांपेक्षा कमी मुदतीच्या FD साठी 3.5 टक्के व्याजदर आहे.

ज्येष्ठ नागरिकांना दिलासा
अ‍ॅक्सिस बँकेनेही ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदरात बदल जाहीर केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 2.5 ते 6.50 टक्के व्याजदर मिळेल.

आयसीआयसीआय बँकेनेही FD चे दर बदलले आहेत
खाजगी क्षेत्रातील ICICI बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर बँक दर वाढवण्याची घोषणा केली आहे. बँकेचे नवीन दर गुरुवारपासून (20 जानेवारी 2022) लागू झाले आहेत. बँकेच्या वेबसाइटनुसार, बँक आता 7 ते 29 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 2.50 टक्के आणि 30 ते 90 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 3 टक्के व्याजदर देत आहे. हे 91 दिवस ते 184 दिवसांच्या मुदतीच्या FD साठी 3.5 टक्के आणि 185 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD साठी 4.40 टक्के व्याजदर देत आहे. बँक एक वर्ष ते 389 दिवसांच्या FD वर 5 टक्के दर देत आहे.

SBI च्या देखरेखीखाली वाढला येस बँकेचा नफा, डिसेंबर तिमाहीत झाली 77 टक्के वाढ

Yes Bank

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या नेतृत्वाखालील उत्तम व्यवस्थापनामुळे येस बँकेने बंपर नफा कमावला आहे. बँकेने शनिवारी सांगितले की, “ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत वार्षिक आधारावर नफा 77 टक्क्यांनी वाढला आहे.”

येस बँकेच्या म्हणण्यानुसार, बुडीत कर्जाच्या तरतुदीत घट आणि कर्जाच्या वसुलीत वाढ झाल्यामुळे नफ्यात वाढ झाली आहे. यादरम्यान बँकेला 266 कोटी रुपयांचा नफा झाला. मात्र , गेल्या तिमाहीत कर्जावरील व्याजाच्या कमाईत 31 टक्क्यांनी घट झाली आहे, तर इतर उत्पन्नातही 32 टक्क्यांनी घट झाली आहे. व्याजातून एकूण कमाई रु. 1,764 कोटी आणि इतर स्त्रोतांकडून रु. 734 कोटी होती. बँकेची तरतूद आणि आकस्मिकता 82 टक्क्यांनी घसरून 375 कोटी रुपयांवर आली आहे. या दरम्यान बँकेने 610 कोटींची रिकव्हरी केली आहे. SBI ने 2020 मध्ये येस बँकेचे व्यवस्थापन ताब्यात घेतले.

NPA ही कमी झाला
येस बँकेचा सकळ NPA गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 0.7 टक्क्यांनी कमी झाला आणि एकूण कर्जाच्या 14.7 टक्के राहिला. सप्टेंबरच्या तिमाहीत तो 15 टक्के होता. निव्वळ NPA देखील मागील तिमाहीत 5.5 टक्क्यांवरून 5.3 टक्क्यांवर घसरला आहे. मात्र, निव्वळ व्याज उत्पन्न सप्टेंबरच्या तिमाहीत 2.2 टक्क्यांवरून 2.4 टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

ग्राहकांचाही आत्मविश्वास वाढला, पैसे जमा होऊ लागले
डिसेंबर तिमाहीत, येस बँकेचे कर्ज वितरण आणि डिपॉझिट घेण्याच्या दरातही वाढ झाली आहे. या दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्ज वितरणात 3.8 टक्क्यांनी वाढ झाली आणि कर्ज 1.76 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. एसबीआयने कमान हाती घेतल्यानंतर ग्राहकांचा आत्मविश्वासही वाढल्याने त्यांनी आपले पैसे बँकेत जमा करण्यास सुरुवात केली. गेल्या तिमाहीत बँकेच्या ठेवींमध्ये 26 टक्क्यांनी मोठी उडी झाली आणि एकूण ठेवी 1.84 लाख कोटी रुपयांवर गेल्या.

आता मिळू शकेल दीड लाखांची अतिरिक्त टॅक्स सूट, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

Tax Rules On FD 

नवी दिल्ली । सरकार 2021-22 या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स वाचवण्याच्या तयारीत गुंतलेल्या आयकरदात्यांना 31 मार्चपर्यंत 1.5 लाखांची अतिरिक्त सूट मिळविण्याची संधी देत ​​आहे. हा लाभ होम लोन घेणाऱ्यांना परवडणारे घर खरेदी करण्यासाठी दिला जाईल.

खरेतर, अर्थसंकल्प 2021 मध्ये, सरकारने आयकर कायद्याच्या कलम 80EEA अंतर्गत टॅक्स सूट मिळविण्याची अंतिम मुदत आणखी एक वर्ष वाढवली होती. ही मर्यादा 31 मार्च 2022 रोजी संपेल. यापूर्वी, परवडणारी घरे खरेदी करणाऱ्या करदात्यांना होम लोनवर 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त टॅक्स सूट दिली जात होती. सध्या, सरकार आयकर कलम 24B आणि कलम 80C अंतर्गत सर्व प्रकारच्या होम लोनवर 3.5 लाख रुपयांची टॅक्स सूट देते. यामध्ये 80EEA ची टॅक्स सूट देखील जोडल्यास एकूण 5 लाख रुपयांची सूट मिळेल. कलम 24B अंतर्गत होम लोनच्या व्याजावर वार्षिक 2 लाख रुपये आणि 80C अंतर्गत कर्जाच्या मूळ रकमेवर 1.5 लाख रुपयांची सूट दिली जात आहे. विशेष म्हणजे अतिरिक्त टॅक्स सूट मिळण्यासाठी तुम्हाला घराचा ताबा मिळेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही.

सूट मिळविण्यासाठी ही अट पूर्ण करणे आवश्यक आहे
करदात्याला 80EEA अंतर्गत 1.5 लाखांची अतिरिक्त वजावट मिळण्यासाठी होम लोन घेणे पुरेसे नाही, मात्र खरेदी केलेल्या घराची किंमत देखील 45 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. तसेच, करदात्याकडे आधीच दुसरी कोणतीही मालमत्ता नसावी. हे घर खरेदी केल्यापासून पाच वर्षांपर्यंत विकता येणार नाही. असे झाल्यास, घराच्या विक्रीच्या वर्षात मिळालेली ही सर्व कटॅक्स र सूट जोडली जाईल.

2019 मध्ये कायदा करण्यात आला, आता तारीख वाढू शकते
2019 च्या अर्थसंकल्पात सरकारने आयकर कायद्यात 80EEA चे नवीन कलम जोडले होते. त्यानंतर असे सांगण्यात आले की केवळ तीच लोंक याचा लाभ घेऊ शकतील ज्यांनी एप्रिल 2019 ते मार्च 2020 दरम्यान होम लोन घेतले आहे. यानंतर, अर्थसंकल्प 2020 मध्ये, सरकारने त्याची अंतिम मुदत मार्च 2021 पर्यंत वाढवली. त्यानंतर 2021 च्या अर्थसंकल्पात हा दिलासा आणखी एक वर्षासाठी वाढवण्यात आला. पुढील महिन्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात ही मुदत पुन्हा एकदा वाढू शकते, असा अंदाज आहे.

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना पत्र

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील किरपे येथील धनाजी देवकर या शेतकऱ्याच्या मुलावर गुरूवारी 20 जानेवारी रोजी बिबट्याने हल्ला केल्यावर त्याच्या वडिलांनी बिबट्याशी झुंज देत आपल्या मुलाला वाचविले. या धाडसाबद्दल माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी फोनवरून कौतुक करीत त्यांना धीरही दिला.

आ. चव्हाण काही कामानिमित्त मुंबईला असल्याने त्यांनी फोनवरून त्या पित्याची चौकशी केली व त्यांना धीर देत मुलाच्या उपचाराचा खर्च शासन करेल असे सांगितले. तसेच आ.चव्हाण यांनी वनअधिकाऱ्यांशी चर्चा करीत बिबट्याचा वारंवार होत असलेला उपद्रव टाळण्यासाठी वनविभागाने या भागात पिंजरे लावून बिबट्याना पकडून जंगलात सोडण्याची व्यवस्था करावी. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाच्या उपचाराचा खर्च शासनाने करावा तसेच या बाबत स्वतः आ.चव्हाण सुद्धा पाठपुरावा करणार आहेत. तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याचा वावर असलेल्या भागात जाऊन तेथील ग्रामस्थांचे भीतीचे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न करण्यासाठी चर्चा कराव्यात, तसेच पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे अश्या काही सूचना आ. चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

बिबट्याचा मानवी वस्तीत वाढत असलेला वावर यासाठी आ.चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करीत वनविभागाकडून योग्य उपाययोजना बिबट्याचा वावर असलेल्या भागात केल्या जाव्यात. तसेच वनविभागाच्या तालुका अधिकाऱ्यांना पिंजरे लावण्याचे अधिकार दिले जावेत तसेच कराड तालुक्यात संक्रमण उपचार केंद्र (Transit treatment center) उभारण्याचा वनविभागाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून त्यास तात्काळ मंजुरी मिळावी अश्या काही मागण्या या पत्रात आहेत.

नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’ भूमिकेत; बावनकुळेंची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर सडकून टीका केली आहे. नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’ भूमिकेत असून ते खोटं बोलण्याचे काम करत आहेत अशा शब्दांत त्यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. तसेच आपण नाना पटोले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे अस ते म्हणाले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नाना पटोले हे ‘मिस्टर नटवरलाल’ भूमिकेत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी गावातील गाव गुंडा बद्दल बोलल्याचं सांगत ते खोटं बोलत आहे. एवढेच नाही तर ते काँग्रेसची प्रतिमा घालवण्याचा काम करत आहेत. अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

नाना पटोले यांच्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची प्रतिमा यांच्यामुळे जाण्याची वेळ आली आहे. मी त्यांच्या विरोधात आंदोलन केलं तिथे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, पण ज्या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं तिथे चारशे लोकांची गरज होती आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही मी याविरोधात कोर्टात जाऊन गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न करणार आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.