Saturday, December 27, 2025
Home Blog Page 2900

साताऱ्यात पत्रकारास जीवे मारण्याची धमकी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

फलटण येथील पत्रकार सुमित चोरमले यास साताऱ्यात येऊन एक गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. या प्रकरणी सातारा जिल्हा पत्रकार संघटनेने या घटनेचा निषेध केला आहे. तसेच संबंधित गुंडावर पत्रकार हल्ला विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीचे निवेदन सातारा जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांना देण्यात आले.

यावेळी या निवेदनाची तात्काळ दखल घेत अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी संबधित संशयितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सातारा शहर पोलीस स्टेशनला दिले आहेत. सातारा जिल्ह्यातील पत्रकारांवर यापुढे अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून आरेरावी किंवा धमकावण्याचे प्रकार झाल्यास त्या प्रवृत्तीला ठेचून काढल्या शिवाय सातारा जिल्हा पत्रकार संघ शांत राहणार नाही, असा इशारा सातारा जिल्हा पत्रकार जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सचिव दीपक प्रभावळकर यांनी या वेळी बोलताना दिला आहे.

यावेळी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती सदस्य सुजित आंबेकर, मराठी पत्रकार परिषद सोशल मीडिया अध्यक्ष संतोष (सनी) शिंदे, प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे, प्रकाश शिंदे, संतोष नलावडे, प्रशांत जगताप, सचिन बर्गे, चंद्रकांत पवार यांच्यासह सातारा शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते.

मोदींच्या हुकूमशाही वाटचालीला काँग्रेसच रोखू शकतं- पृथ्वीराज चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर पुन्हा एकदा टीका केली आहे. मोदींची वाटचाल ही हुकूमशाही कडे असून या वाटचालीला फक्त काँग्रेस च रोखू शकत अस त्यांनी म्हंटल. ते नाशिक येथे बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था कोलमडलीय, लोकं बेरोजगार झाले आहेत. देशाची वाटचाल ही हुकूमशाही कडे चालली आहे. आणि मोदींची ही हुकूमशाही काँग्रेसच रोखू शकते.

दरम्यान, यावेळी त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार आहे असे सांगितले. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काही तडजोडी करून महाविकास आघाडी तयार केली. मात्र मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढेल अस ते म्हणाले.

वन प्लस मोबाईलचा खिशात स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

आटपाडी येथील प्रकाशवाडी परिसरात राहत असलेल्या प्राण रमेश चव्हाण या युवकाच्या मोबाईलचा खिशात अचानक स्फोट झाला असून त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यानंतर या घटनेबाबत सदर मोबाईल कंपनी विरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली गेली आहे. या घटनेमुळे आटपाडीत हळहळ व्यक्त होत असून युवा पिढीने मोबाईल हाताळण्याबाबत योग्य काळजी घेण्याची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आहे. मोबाईलच्या अशा अचानक स्फोट होण्यामुळे आटपाडीकर चांगलेच हादरले आहेत.

या घटनेबद्दल सांगायचे झाल्यास प्राण चव्हाण हा मोलमजूरी करून गुजराण करत आहे. काम करत असल्यामुळे त्याने आपला मोबाईल खिशात ठेवून दिला होता. मात्र मोबाईल गरम होऊन अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये त्याच्या हाताला आणि पायाला जखमा झाल्या. यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी सांगली सिव्हील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी व्यवस्थीत उपचार न मिळाल्याने त्याला पुन्हा आटपाडी येथे उपचारासाठी आणण्यात आले.

सुमारे 1 महिन्यापूर्वी प्राण याने सांगली येथून मोबाईल खरेदी केला होता. ज्याचा अचानक स्फोट झाल्यामुळे त्याने कंपनी विरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सदर घटना दि.19 जानेवारी सायंकाळच्या सुमारास घडली. दि.21 जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली असून सध्या तालुकाभर याची चर्चा होते आहे. प्राण चव्हाण हा मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे.

पुतळ्यावर करोडो रुपये खर्च करण्याऐवजी सैनिक शाळा सुरू करा – इम्तियाज जलील

imtiyaj jalil
imtiyaj jalil

औरंगाबाद – शहरातील सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च करण्याऐवजी त्यांच्या नावाने ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरू करण्याची मागणी खा. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांना योग्य ती कार्यवाही करणेबाबत पत्राद्वारे कळविले आहे.

पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. अतुल सावे, अंबादास दानवे यांनी सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्याच्या कामास सुरुवात करण्याची मागणी केली होती. बैठकीतच त्यांच्या मागणीला जलील यांनी विरोध करून पुतळा उभारणीवर खर्च करण्यात येणाऱ्या निधीतून ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरु करण्याची मागणी केली होती. यासंबंधी पत्राद्वारे मागणी केली.

जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई, जिल्हाधिकारी व मनपा प्रशासक यांना दिलेल्या पत्रात नमूद केले की, महाराणा प्रताप उदयपूर, मेवाड येथील शिशोदिया घराण्याचे महान राजा होते. त्यांच्या शौर्यामुळे आणि दृढनिश्चयामुळे त्यांचे नाव इतिहासाच्या पानावर अजरामर आहे. ते लहानपणापासूनच शूर, निर्भय, स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रेमी होते. अनेक युद्धांत त्यांनी पराक्रम दाखवून शत्रूंवर विजय प्राप्त केलेला आहे. अशा थोर, महान शूरवीर महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारुन काहीही साध्य होणार नाही. महाराणा प्रताप यांच्या प्रती खरा आदर व सन्मान सैनिकी शाळाच असेल; कारण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील युवक व युवती सैनिक शाळेतून देश संरक्षणासाठी प्रशिक्षण घेतील. सैनिक शाळेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना लष्कर, हवाई दल आणि नौदलात नोकरी उपलब्ध होईलच तसेच विविध इतर शासकीय आणि खासगी क्षेत्रामध्येसुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

कृष्णेच्या नदीपात्रात 12 फूट मगरीच्या दर्शनाने कृष्णाकाठ धास्तावला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

सांगली जिल्ह्यातील तुंग येथील कृष्णा नदीपात्रात गेले चार दिवस सुमारे १२ फूट लांबीच्या मगरीचे दर्शन होत आहे. ही मगर दुपारच्या सुमारास नदीकाठी असणाऱ्या पोटमळीमध्ये पडलेली असते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरामध्ये शेतीला पाणी देणाऱ्या तब्बल बाराहून अधिक मोटारी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोटारीच्या कामासाठी सातत्याने ये-जा करावी लागते.

परंतु, ही मगर त्याच परिसरात असल्याने भीतीपोटी त्या मोटारीकडे जाण्यास शेतकरी धजावत नाही. त्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. या पार्श्वभूमीवर मगरीचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांच्यामुळे मिरज पश्चिम भाग त्रस्त बनला आहे.

मगरींचे वारंवार दर्शन होत आहे. या मगरींनी नागरिक, महिलांवर अनेकदा हल्ले केले आहेत. आतापर्यंत भिलवडी ते डिग्रज बंधारा परिसरात 12 मगर बळींच्या घटना झाल्या आहेत.

छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात उंच पुतळा; अमोल कोल्हेंनी शेअर केला फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषाजवळ उभारण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्विट करत हि माहिती दिली आहे

अमोल कोल्हे यांनी ट्विट करत म्हंटल की, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजही तमाम भारतीयांचे प्रेरणास्रोत व आदर्श आहेत. देशाच्या उत्तरी भागात जम्मू काश्‍मीर येथे तैनात असलेल्या मराठा रेजिमेंटने मच्छलच्या खोऱ्यात नियंत्रण रेषेजवळ १४ हजार ८०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापित केला आहे.

जगात प्रथमच महाराजांचा पुतळा इतक्या उंचावर बसविण्यात आला आहे. महाराजांचा पुतळा पुण्यातील पंचवीस वर्षीय तरुण मूर्तिकार अजिंक्य लोहगावकर यांनी साकारला आहे, तर मच्छल बटालियनचे कर्नल प्रणव पवार यांनी सदर मच्छल या ठिकाणी स्थापित केला आहे.देशासाठी सीमेवर लढणाऱ्या तमाम जवानांना छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सदैव प्रेरणादायी ठरेल. सर्व जवानांना माझा सलाम! जय शिवराय असे ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं

थकीत बिलासाठी संतप्त शेतकर्‍यांचा तासगावात रस्ता रोको, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झाली जोरदार झटापट

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

तासगाव आणि नागेवाडी कारखान्याने थकविलेल्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या ऊस बिलांसाठी संतप्त शेतकर्‍यांनी तासगावात खासदारांच्या घरावर हल्लाबोल केला. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले. एकतर ऊसबिल द्या नाहीतर आम्ही सर्व शेतकरी तासगावातील चौकात सामुदायिक आत्महत्या करू, असा आक्रमक पवित्रा घेतला. घटनास्थळी खासदार संजयकाकांनी भेट देऊन 2 फेब्रुवारीपर्यंत बिले देतो, असा तोडगा काढण्याच्या प्रयत्न केला. मात्र परंतु वारंवार खोटी आश्वासने दिल्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या आश्वासनाकडे पाठ फिरवून तहसीलवर ठिय्या देत आंदोलन स्थगित केले.

सांगलीचे भाजपचे खासदार संजय पाटील हे गेल्या वर्षभरापासून ऊस बिलासाठी शेतकर्‍यांना खोटी आश्वासने देऊन फसवत आहेत. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची अजूनही कोट्यवधी रुपयांची बिले थकीत आहेत. ही बिले तातडीने द्यावीत, अशी शेतकर्‍यांची मागणी होती. यावेळी संजयकाका पाटील यांनी मोर्चातील शेतकर्‍यांची भेट घेऊन आपल्या अडचणी सांगितल्या. येत्या 2 फेब्रुवारीपर्यंत बिले देण्याचे आश्वासन दिले. मात्र शेतकर्‍यांना हे आश्वासन मान्य नव्हते. त्यामुळे शेतकर्‍यांनी जोपर्यंत ऊस बिले मिळत नाहीत तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर ठिय्या मारण्याचा निर्णय घेतला. तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची सुमारे 18 कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत.

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरुवात झाली. मात्र चिंचणी नाक्यात पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्याठिकाणी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. पोलीस खासदारांच्या घराकडे जाऊ देत नसल्याने शेतकर्‍यांनी रस्त्यावरच ठिय्या मारला. त्यामुळे सुमारे दीड तास वाहतूक ठप्प झाली. दरम्यान, जर खासदार आंदोलनाच्या ठिकाणी आले नाहीत तर शेतकरी सामुदायिक आत्महत्या करतील, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला. त्यानंतर काही वेळातच खासदार आंदोलनस्थळी आले. यावेळी आक्रमक शेतकर्‍यांनी खासदारांना फैलावर घेतले. अगदी एकेरीत शेतकरी बोलत होते.

मांज्यामध्ये अडकलेल्या पारवळाची अर्धा तासाच्या रेस्क्यूनंतर अग्निशमनकडून सुटका

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मांज्यामध्ये अडकलेल्या एका पारवळाची मनपा अग्निशमन विभाग, वीज मंडळ आणि प्राणी मित्रांकडून सुटका करण्यात आली. अर्धा तास रेस्क्यू करीत या सर्वानी या पारवळास जीवदान देत नैसर्गिक अधिवासात सोडले. महापालिकेच्या मंगलधाम इमारतीसमोरील एका झाडावरील मांज्यामध्ये एक पारवळ अडकल्याची माहिती नागरिकांनी महापालिका अग्निशमन विभागाला दिली.

यावेळी अग्निशमन अधिकारी विजय पवार आणि त्यांची टीम तातडीने दाखल झाली. यावेळी वीज मंडळाला बोलावून तात्पुरता वीज पुरवठा खंडित केला. झाड उंच असल्याने महापालिकेच्या वीज मंडळाच्या क्रेनला पाचारण करण्यात आले. यावेळी प्राणीमित्र मुस्तफा मुजावर आणि मंदार शिंपी यांनी क्रेन बकेट मधून वरती जात मांज्याच्या दोर्‍यात अडकलेल्या पारवाळाची सुटका केली.

मांज्या तोडल्यानंतर लगेच अडकलेले पारवळ नैसर्गिक अधिवासात निघून गेले. मात्र यासाठी अर्धातास झालेले रेस्क्यू ऑपरेशन झाले. हे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नेचर कॉनसर्व्हेशन सोसायटी आणि इंसाफ फौंडेशनचे तबरेज खान, मुस्तफा मुजावर, मंदार शिंपी, आदित्य पाटील, राहुल पवार यांनी सहभाग घेतला.

चांगल्या रिटर्नसाठी ‘या’ 10 लार्जकॅप शेअर्समध्ये गुंतवू शकता पैसे; जाणून घ्या तज्ञांचे मत

नवी दिल्ली । आज सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 4 टक्क्यांनी घसरले आहेत. 4 ट्रेडिंग सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाले आहे. यूएस ट्रेझरी उत्पन्नातील वाढ आणि कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात विक्रीचा दबाव वाढला.

दरम्यान, या 10 लार्जकॅप शेअर्सबाबत ब्रोकरेज हाऊस बुलिश आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, या शेअर्समध्ये 32 टक्क्यांपर्यंत वाढ दिसून येते. या शेअर्सवर एक नजर टाकूयात.

एचडीएफसी बँक
एचडीएफसी बँकेला बाय रेटिंग देताना, शेअरखानने 1973 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा स्टॉक रु 1509 वर दिसत आहे. या शेअरमध्ये 30 टक्के रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे.

एचसीएल टेक्नॉलॉजीज
एचसीएल टेकला बाय रेटिंग देत शेअरखानने रु. 1,550 चे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर रु. 1,175 वर दिसत आहे. या शेअरमध्ये 32 टक्के रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे.

बजाज फायनान्स
या शेअरला बाय रेटिंग देत शेअरखानने 9,097 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 7,531 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 20 टक्के रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे.

टेक महिंद्रा
टेक महिंद्राला बाय रेटिंग देताना, शेअरखानने 2,060 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर रु. 1,668 वर दिसत आहे. या शेअरमध्ये 23 टक्के रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे.

अल्ट्राटेक सिमेंट
अल्ट्राटेक सिमेंटला बाय रेटिंग देताना, शेअरखानने 9,200 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 7,454 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 23 टक्के रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस
टीसीएसला बाय रेटिंग देताना जिओजितने 4,457 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 3,827 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 16 टक्के रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे.

इन्फोसिस
Infosys ला बाय रेटिंग देत जिओजितने रु. 2,299 चे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर रु. 1,824 वर दिसत आहे. या शेअरमध्ये 26 टक्के रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे.

एशियन पेंट्स
एशियन पेंट्सला बाय रेटिंग देताना, प्रभुदास लिल्लाधर यांनी रु. 3,762 चे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 3,307 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 13 टक्के रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे.

बजाज ऑटो
बजाज ऑटोला बाय रेटिंग देताना, प्रभुदास लिल्लाधर यांनी 3,911 रुपयांचे टार्गेट दिले आहे. सध्या हा शेअर 3,309 रुपयांवर दिसत आहे. या शेअरमध्ये 18 टक्के रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे.

HUL
मोतलाल ओसवाल यांनी बाय रेटिंग देताना एचयूएलला रु. 2,750 चे टार्गेट दिले आहे. सध्या हा स्टॉक रु 2,261 वर दिसत आहे. या शेअरमध्ये 21 टक्के रिटर्न मिळू शकतो, असा विश्वास शेअर खानला आहे.