Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2919

प्रसिद्ध अभिनेत्रीचा अमानुषपणे खून, ‘या’ कारणामुळे पतीनेच काढला काटा

ढाका : वृत्तसंस्था – बांगलादेशात एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा रस्त्याशेजारी असलेल्या गवतात गोणीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या अभिनेत्रीची निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण बांगलादेश हादरला आहे. या मृत अभिनेत्रीचे नाव इस्लाम शिमू असे आहे. बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका शहरातील एका ब्रिजजवळ तिचा संशयास्पद पद्धतीने मृतदेह आढळून आला होता.

या परिसरातील काही स्थानिक लोकांना सोमवारी सकाळी कदमटोली क्षेत्रात अलीपूर येथे संशयस्पदरित्या एक गोणी आढळली होती. त्या गोणीतून दुर्गंध येत असल्याने नागरिकांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह अभिनेत्री रायमा इस्लाम शिमू हिचा असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला असता आरोपींनी रायमाला आधी जखमी केलं होतं. त्यानंतर तिची निर्घृणपणे हत्या केली होती. त्यानंतर तिच्या मृतदेहाला गोणीत भरुन पूलाजवळ फेकून दिला होता. यानंतर पोलिसांनी मृतदेह मिटफोर्ट रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

रायमा ढाका शहरात ग्रीन रोड परिसरात आपल्या पती आणि दोन मुलांसह राहत होत्या. ती रविवारी सकाळी शूटिंगसाठी घराबाहेर पडली त्यानंतर ती परत आलीच नाही. यानंतर तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. आपली आई शूटिंगमध्ये व्यस्त असेल, असं रायमाच्या मुलांना वाटलं होतं. पण आई रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने मुलांनी आपल्या वडिलांसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रायमाचा मृतदेह मिळाल्यानंतर रायमाचा भाऊ शाहिदुल इस्लाम खोकॉन याने तिचा पती सखावत अमीन नोबोले याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी रायमाच्या पतीसह सहा जणांना अटक करण्यात आली.

पतीनेच काढला काटा
या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत आपण रायमाचा खून केल्याचे कबुल केले. या प्रकरणी पोलिसांनी जी कार ताब्यात घेतली आहे त्याच्या मागच्या सीटवर रक्ताचे डाग आढळून आले. घरगुती वादांमुळे आपण तिची हत्या केल्याचं तिच्या पतीने कबूल केलं आहे. तसंच या खुनात ड्रायव्हरचाही सहभाग होता असेदेखील त्याने कबुल केले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी रायमाचा पती आणि त्याचा ड्रायव्हर अशा दोघांना अटक केली आहे.

रायमा इस्लाम शिमू यांची कारकीर्द
रायमाच्या अभिनय क्षेत्रातील आपल्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलेलं आहे. तसेच तिने अनेक नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. तिने 1998 साली ‘बार्तामान’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तसेच रायमाने आतापर्यंत एकूण 25 चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

EPS पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी, आता महिना संपण्यापूर्वीच खात्यात जमा होणार पेन्शनची रक्कम

Business

नवी दिल्ली । EPS 95 पेन्शन घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. त्यांना आता पेन्शनसाठी थांबावे लागणार नाही. पेन्शन महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. पेन्शनधारकांनी तक्रार केली की, त्यांच्या खात्यात पेन्शनची रक्कम महिन्याच्या सुरुवातीला खूप उशीरा टाकली जाते. याचा त्यांना खूप त्रास होतो.

पेन्शनधारकांची ही समस्या लक्षात घेऊन EPFO ने एक परिपत्रक जारी केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता अशी उपाययोजना करण्यात आली आहे ज्याद्वारे पेन्शनधारकांना महिना संपण्यापूर्वी मार्च वगळता इतर सर्व महिन्यांत पेन्शन मिळेल. त्यांना पेन्शनसाठी थांबावे लागणार नाही.

शेवटच्या कामाच्या दिवशी खात्यात पैसे जमा केले जातील
आता पेन्शनची रक्कम महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शनधारकांच्या खात्यात जमा केली जाईल. आतापर्यंत पेन्शन महिन्याच्या सुरुवातीला जमा होत असे. अनेकवेळा पेन्शनधारकांच्या खात्यात सुट्टी किंवा इतर कारणांमुळे पेन्शनची रक्कम उशिरा येते. पेन्शन विभागाने या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या निर्देशानुसार, सर्व क्षेत्रीय कार्यालये मासिक माहिती बँकांना अशा प्रकारे पाठवू शकतात की मार्च व्यतिरिक्त महिन्याच्या शेवटी पेन्शनधारकांच्या खात्यात कामाच्या दिवशी किंवा त्यापूर्वी पेन्शन जमा केली जावी. मार्चमधील शेवटच्या कामकाजाच्या दिवशी पेन्शन खात्यात जमा केली जाणार नाही. 1 एप्रिल रोजी किंवा नंतर जमा केली जाईल.

तक्रारी मिळत होत्या
EPFO ने सांगितले की, पेन्शन विभागाला वेळेवर पेन्शन न मिळाल्याच्या तक्रारी येत होत्या. या तक्रारी लक्षात घेऊन आता पेन्शनची रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच ही रक्कम बँकांनी पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याच्या दिवसापूर्वी जास्तीत जास्त 2 दिवस आधी द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Budget 2022: नवीन टॅक्स सिस्टीमचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार उचलू शकतात ‘ही’ पावले

Income Tax

नवी दिल्ली । 2020 मध्ये कमी टॅक्स रेटसह नवीन पर्यायी इन्कम टॅक्स सिस्टीम लागू झाली. मात्र, अद्याप ही सिस्टीम करदात्यांची मने जिंकू शकलेली नाही. पर्सनल इन्कम टॅक्स भरणारे बहुतेक करदाते टॅक्स भरण्यासाठी जुन्या इन्कम टॅक्स सिस्टीमची निवड करत आहेत. 2022 च्या अर्थसंकल्पात नवीन इन्कम टॅक्स सिस्टीम लोकप्रिय करण्यासाठी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन इन्सेन्टिव्हसह आणखी काही आकर्षक घोषणा करू शकतात.

सरकारने 2020 मध्ये नवीन पर्यायी टॅक्स सिस्टीम लागू केली. यामध्ये टॅक्सचे रेटही कमी ठेवण्यात आले होते. मात्र, तरीही हे पर्सनल इन्कम टॅक्स भरणाऱ्या करदात्यांची मने जिंकू शकले नाही. यामागे अनेक कारणे आहेत. विशेष बाब म्हणजे सरकारने 2019 मध्ये कॉर्पोरेट टॅक्ससाठी असेच पर्यायी टॅक्स स्ट्रक्चर आणले होते. कॉर्पोरेट करदात्यांना ते चांगलेच आवडले.

अशी आहे नवीन आणि जुनी टॅक्स सिस्टीम
2020-21 पासून जुन्या आणि नवीन टॅक्स सिस्टीममध्ये निवड करण्याचा पर्याय आहे. जुन्या सिस्टीममध्ये, आयकर कायद्याच्या कलम 80C, 80D, HRA यासह अनेक सूट उपलब्ध आहेत. नवीन टॅक्स सिस्टीममध्ये कोणतीही सूट मिळणार नाही. यामध्ये, केवळ 80 CCD (2) म्हणजेच नियोक्त्याच्या योगदानावरील सूटचा लाभ प्राप्तिकरदात्याला मिळू शकतो. नवीन टॅक्स सिस्टीममध्ये टॅक्सचे रेट कमी आहेत मात्र नवीन टॅक्स पद्धत स्वीकारणाऱ्या करदात्यांना आयकर कायद्याच्या अध्याय VI-A अंतर्गत मिळणारे फायदे जसे कि, स्टॅण्डर्ड डिडक्शन, होम लोन, LIC ,हेल्थ इन्शुरन्स इत्यादीमध्ये कोणतीही गुंतवणूक नसलेल्या कर कपात आणि सूट यांचा लाभ घेऊ शकणार नाही.

यामुळे करदाते दूर राहिले
कमी टॅक्स रेट असलेली एक्सझम्प्शन फ्री टॅक्स सिस्टीम सरकारच्या अपेक्षेप्रमाणे लोकप्रिय झाली नाही. याची अनेक कारणे आहेत. स्वतंत्र सामाजिक सुरक्षा सिस्टीमचा अभाव, कोविड-19 च्या काळात मेडिकल इन्शुरन्सचे वाढते महत्त्व आणि नवीन सिस्टीम मध्येही इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अनिवार्यता, हे तज्ज्ञांनी न स्वीकारण्यामागचे प्रमुख कारण मानले आहे.

कन्सल्टन्सी फर्म डेलॉइट इंडियाच्या भागीदार ताप्ती घोष यांनी लाइव्ह मिंटला सांगितले की, नवीन टॅक्स सिस्टीम जास्त सोपी आहे यात शंका नाही. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. यातील एक कारण म्हणजे ज्यांचा पगार 15 लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांनाही नव्या सिस्टीममध्ये 30 टक्के टॅक्स भरावा लागेल. आयकरदात्याला त्याचा लाभ मिळत नसताना ते का निवडायचे?

काही अकाउंटंटचे म्हणणे आहे की, नवीन टॅक्स सिस्टीम व्यवसायाच्या उत्पन्नाच्या दृष्टीने खूपच किचकट आहे. बर्‍याच लोकांच्या उत्पन्नाचा स्त्रोत व्यवसायाबरोबरच नोकरी देखील आहे. दिल्लीस्थित चार्टर्ड अकाउंटंट तरुण कुमार सांगतात की, कोविड-19 आणि वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे अनेकांनी नोकऱ्यांसोबत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. अशाप्रकारे नोकरी आणि व्यवसायात उत्पन्न असल्याने तो करदाता झाला. जर एखाद्याचे व्यवसाय किंवा व्यवसायातून उत्पन्न असेल, तर अशा परिस्थितीत कलम 115 BAC मधून सूट (opt out) चा लाभ एकदाच घेता येईल. त्यामुळेच नवीन टॅक्स सिस्टीम व्यावसायिक करदात्याला आकर्षित करू शकलेली नाही. आयकर कायद्याच्या कलम 115 BAC मध्ये नवीन टॅक्स सिस्टीमची तरतूद आहे.

अर्थ मंत्रालय विचार करत आहे
लाइव्ह मिंटवर प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अर्थ मंत्रालय नवीन टॅक्स सिस्टीम लोकप्रिय करण्यासाठी गांभीर्याने विचार करत आहे. या टॅक्स सिस्टीममधील त्रुटी आणि करदात्यांना त्यात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधले जात आहेत. 2022 च्या अर्थसंकल्पात नवीन टॅक्स सिस्टीमसाठी इन्सेन्टिव्ह आणि इतर सुविधा जाहीर केल्या जाऊ शकतात. मात्र, अर्थ मंत्रालय, महसूल विभाग आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने या संदर्भात ई-मेलद्वारे पाठवलेल्या लाइव्ह मिंटच्या प्रश्नांना उत्तर दिले नाही.

शाब्बास रोहित!! एका रोहित कडून दुसऱ्या रोहितचे अभिनंदन….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत सर्व विरोधकांनी नामोहरम करत दिवंगत आर आर पाटील यांचे सुपुत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी सत्ता काबीज केली. या विजयानंतर त्यांच्यावर राज्यभरातुन कौतुकांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी देखील रोहित पाटील यांच्यावर कौतुकाची थाप मारली.

रोहित पवार यांनी ट्विट करत रोहित पाटील यांचे कौतुक केले. शाब्बास रोहित!! खूप खूप अभिनंदन अस म्हणत त्यांनी शाबासकी दिली.

कवठे महांकाळ निवडणुकीत रोहित पाटलांचा डंका

कवठे महांकाळ येथे 13 जागांसाठी नगरपंचायत निवडणूक लागली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर विजय मिळवला आहे. आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक येकवटले होते. तरीही रोहित पाटील यांनी एकहाती विजय मिळवत विरोधकांना अस्मान दाखवलं.

“पारंपारिक विरोधकांच्या भुलथापांना पाटणची जनता बळी पडली नाही”; सत्यजित पाटणकरांचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी पाटण नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. या ठिकाणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना धक्का सहन करावा लागला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस नेते सत्यजित पाटणकर यांनीविजय उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यानंतर “पारंपारिक विरोधकांच्या भुलथापांना पाटणची जनता बळी पडली नाही,” अशी टीका करीत सत्यजित पाटणकर यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई याच्यावर हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी काँग्रेस नेते सत्यजित पाटणकर यांनी विजयानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,  पाटण या ठिकाणी आमचे जे पारंपरिक विरोधक आहेत. सध्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आम्हाला पराभूत करण्यासाठी अनेक भूलथापा जनतेत केल्या. अनेक विकास एकमे मंजूर करून आणली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आणि पाटण नगर पंचायतीमध्ये सत्ता कायम राखण्यास राष्ट्रवादीला यश मिळाले आहे. या ठिकाणी 17 जागासाठी 63 उमेदवार रिंगणात होते. याही वेळेस पाटणच्या जनतेने पारंपारिक विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता राष्ट्रवादीला पाठींबा दिला.

सातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायत निवडणूक हि राष्ट्रवादी काँग्रेस नेते विक्रमसिह पाटणकर आणि शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई याच्यासाठी प्रतिष्टेची मानली जात होती. पाटण नगरपंचायत निवडणुकीत 15 जागावरती राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या देसाई गटाला व शिवसेना पक्षाला या ठिकाणी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/342987960777492

पाटणकर गटाने पहिल्या 12 प्रभागात विजयी सलामी दिली. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आस्मा सादिक इनामदार यांनी 202 मते मिळवून विजय संपादन केला आहे तर शबाना इम्रान मुकादम यांना 167 मते मिळाली आहेत. याच मित्राबरोबर हिराबाई मारुती कदम आणि श्रद्धा संजय कवर यांचाही या ठिकाणी पराभव झाला आहे.

विरोधकांनी माझा बाप काढला, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत सर्व विरोधकांना घायाळ करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी आपल्या विजयानंतर विरोधकांना पुन्हा एकदा इशारा दिला.आजच्या या विजयानंतर त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही, असे रोहित पाटील यांनी म्हंटल.

रोहित पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले होते. त्यानंतर रोहित पाटील यांनी प्रचाराची सर्व धुरा स्वतःच्या खांद्यावर घेत दमदार प्रचार केला होता. रोहित पाटील यांनी प्रचारादरम्यान विरोधकांवर तुफानी हल्ला चढवला होता. निकालानंतर तुम्हाला माझा बाप अर्थात आर आर आबांची आठवण होईल, असा इशारा त्यांनी दिला होता.

आज कवठे महांकाळ निवडणुकीत रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवल्यानंतर रोहित पाटील यांनी पुनः एकदा विरोधकांवर निशाणा साधला. निवडणुकीच विरोधकांनी माझा बाप काढला होता. मला बालिश ठरवलं होतं. माझ्या बापाची पुण्याई म्हणाले, पण आता त्यांना माझ्या वडिलांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही,” अशी प्रतिक्रिया रोहित पाटील यांनी विजयानंतर दिली.

Budget 2022: विमान वाहतूक क्षेत्राची ‘ही’ मागणी पूर्ण झाल्यास हवाई प्रवास स्वस्त होणार

नवी दिल्ली । भारताचा नागरी विमान वाहतूक उद्योग यावेळच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पाकडे आशेने पाहत आहे. साथीच्या रोगाचा मोठा फटका बसलेल्या या उद्योगाला आगामी अर्थसंकल्पात जेट इंधनावरील कर कपातीची अपेक्षा आहे. जेणेकरून कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकर करता येईल.

एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) वरील करात कपात करणे ही या क्षेत्राची प्रमुख मागणी आहे. हे केवळ एअरलाइनच्या ऑपरेटिंग खर्चाच्या 25%-40% आहे. सध्या, काही राज्य सरकारे ATF वर 25%-30% मूल्यवर्धित कर (VAT) लावतात.

‘एक्सपेक्टेशंस: केंद्रीय बजट 2022-23’
रेटिंग एजन्सी ICRA ने ‘एक्सपेक्टेशंस: केंद्रीय बजट 2022-23’ शीर्षकाच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नागरी विमान वाहतूक उद्योगाला सरकारकडून त्वरित आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. तसेच, तात्काळ आकारणी आणि कर कमी केल्याने कामकाज पुन्हा रुळावर येईल आणि प्रवासी वाहतुकीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये ATF, विमानतळ शुल्क, पार्किंग आणि लँडिंग तसेच नेव्हिगेशन शुल्कावरील कर कमी करणे हे समाविष्ट आहे.

कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर द्या
गेल्या काही वर्षांपासून विमान वाहतूक आणि विमानतळ क्षेत्र सातत्याने या मागण्यांचा पुनरुच्चार करत आहे. विशेषत: साथीच्या आजारानंतर या मागण्यांच्या समर्थनार्थ जोरात आवाज उठवला जात आहे. ICRA ला अपेक्षा आहे की,आगामी केंद्रीय अर्थसंकल्प प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजनेद्वारे (RCS) कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर देईल.

विद्यमान विमानतळ क्षमतेचा विस्तार आवश्यक आहे
ICRA ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की आगामी अर्थसंकल्पात काही प्रमुख विमानतळांवर नवीन विमानतळ उभारणे आणि सध्याची विमानतळ क्षमता वाढवण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे. जेणेकरून एअरलाइन्ससमोरील सध्याचे अडथळे दूर करण्यात मदत होईल. तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी कमी सेवा नसलेल्या विमानतळांशी कनेक्टिव्हिटी सुधारली जाईल.

विमान वाहतूक क्षेत्रातील या मागण्या पूर्ण झाल्यास संपूर्ण उद्योगासोबतच प्रवाशांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. जेट इंधनावर कर कपात झाल्यास विमानाची तिकिटेही स्वस्त होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून जिल्हा मध्यवर्ती बँकेतून काढले; महेश शिंदेंचा हल्लाबोल

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी कोरेगाव नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल 14-7 ने विजयी झाले. विजयानंतर शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षावर घणाघाती टीका केली आहे. राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून आम्हाला मध्यवर्ती बँकेतून काढले, अशी टीका करीत शिंदेनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

कोरेगाव नगरपंचायतीचा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. ज्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली त्यावेळी राष्ट्रवादीने बँकेच्या निवडणुकीत आमच्याशी गद्दारी केली. आणि आम्हाला मध्यवर्ती बँकेतून बाहेर काढले, अशी टीका शिंदे यांनी यावेळी केली.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायत निवडणूक हि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. यामध्ये शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या परिवर्तन पॅनल 14-7 ने विजयी झाले आहेत.

Cryptocurrency price : प्रमुख क्रिप्टोकरन्सीमध्ये झाली घसरण, आजची किंमत जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या 24 तासांत, क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये घसरण झाली. बुधवारी, 19 जानेवारी 2022 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10:43 वाजता, जागतिक क्रिप्टो बाजार 1.28% ने घसरला होता. एकूण क्रिप्टोची मार्केट कॅप $1.98 ट्रिलियन पर्यंत घसरली. टेरा लुनामध्ये सुमारे 2 टक्क्यांची वाढ झाली होती, त्यानंतर बिटकॉइन आणि इथेरियम दोन्ही रेड मार्कवर ट्रेड करत होते.

Bitcoin बुधवारी 0.75% ने $41,820.98 वर ट्रेड करत होता. गेल्या 24 तासांत बिटकॉइनने $41,820.98 चा नीचांक गाठला आणि $41,392.22 चा उच्चांक नोंदवला गेला. इथेरियम 2.26% खाली $3,112.37 वर ट्रेड करत आहेत. इथेरियमने त्याच कालावधीत $3,096.12 चा नीचांक आणि $3,205.15 चा उच्चांक गाठला. बुधवारी बातमी लिहिली तेव्हा, क्रिप्टो मार्केटमध्ये बिटकॉइनचे वर्चस्व 40 टक्के होते, तर इथेरियमचे वर्चस्व 18.8 टक्के नोंदवले गेले होते.

गेल्या 24 तासांची क्रिप्टोची हालचाल
Coinmarketcap च्या डेटानुसार, बुधवारी, Cardano गेल्या 24 तासांमध्ये सर्वात जास्त घसरले. ही करन्सी 8.35% खाली $1.44 वर ट्रेड करत होती. मार्केट कॅपनुसार, टॉप 15 करन्सीची स्थिती अशी होती-
>>Terra Luna: 2.59% वाढीने $78.58 वर
>> Dogecoin: 1.86% घसरणीने $0.1665 वर
>>Shiba Inu : 2.87% घसरणीने $0.00002794 वर
>>BNB: 1.46% घसरणीने $464.84 वर
>>Solana : 0.25% घसरणीने $138.83 वर
>>XRP: 1.51% घसरणीने $0.7447 वर

एका दिवसात सर्वाधिक वाढ झालेल्या करन्सीज
गेल्या 24 तासांमध्ये (दुपारी 2:30 वाजेपर्यंत) या तीन करन्सीमध्ये सर्वाधिक वाढ झाली. Patron (PAT) मध्ये 1671.70% ची वाढ नोंदवली गेली. PIggyBankDAO (PB) हा गेल्या 24 तासांत 268.00% च्या वाढीसह दुसऱ्या क्रमांकाची करन्सी होती. PlotX (PLOT) मध्ये 216.07% ची वाढ दिसून आली.

Gold Price : सोने आणि चांदी खरेदी करण्याची चांगली संधी, आजचे दर त्वरित तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोने-चांदी खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी सोन्याच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर दुसरीकडे आज चांदीचा दर वाढला आहे.

जाणून घ्या आजचा दर काय आहे
आज सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर आजच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यासह सोने 48 हजारांच्या जवळ पोहोचले आहे. आजच्या ट्रेडिंगमध्ये सोने 47,925 प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे. दुसरीकडे, चांदी 0.22 च्या वाढीसह 63,160 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,840 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,090 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,090 रुपये
पुणे – 46,320 रुपये
नागपूर -47,090 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,090 रुपये
पुणे -48,840 रुपये
नागपूर – 49,090 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4632.00 Rs 4645.00 0.28 %⌃
8 GRAM Rs 37056 Rs 37160 0.28 %⌃
10 GRAM Rs 46320 Rs 46450 0.28 %⌃
100 GRAM Rs 463200 Rs 464500 0.28 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4884.00 Rs 4896.00 0.245 %⌃
8 GRAM Rs 39072 Rs 39168 0.245 %⌃
10 GRAM Rs 48840 Rs 48960 0.245 %⌃
100 GRAM Rs 488400 Rs 489600 0.245 %⌃