Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2918

सानिया मिर्झाने केली निवृत्तीची घोषणा; शेवटची मॅच कधी खेळणार?

saniya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय महिला टेनिसला एका नव्या उंचीवर नेणारी प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाने आज निवृत्ती जाहीर केली. ऑस्ट्रेलियन ओपन 2022 मध्ये महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर सानियाने निवृत्तीची घोषणा केली

सानिया म्हणाली, हा माझा शेवटचा हंगाम असेल, असे मी ठरवले आहे. मी आठवड्यातून आठवड्यात घेत आहे. मी संपूर्ण सीझन खेळू शकेन की नाही याची खात्री नाही, पण मला हा सीझन संपूर्ण खेळायचा आहे. नंतर त्याचे वडील आणि प्रशिक्षक इम्रान मिर्झा यांनीही ईएसपीएनला याची पुष्टी केली.

सानिया आणि तिची युक्रेनियन जोडीदार नादिया किचनोक यांना ऑस्ट्रेलियन ओपनच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यांचा स्लोव्हेनियाच्या तमारा झिदानसेक आणि काजा जुवान यांनी एक तास ३७ मिनिटांत ४-६, ६-७(५) असा पराभव केला. मात्र, सानिया आता या ग्रँडस्लॅमच्या मिश्र दुहेरीत अमेरिकेच्या राजीव रामसह सहभागी होणार आहे.

सानिया ही भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू आहे. ती महिला दुहेरीत पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत सहा ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत. यातील तीन विजेतेपद महिला दुहेरीत आणि तीन जेतेपद मिश्र दुहेरीत जिंकले. 2009 मध्ये मिश्र दुहेरीत ऑस्ट्रेलियन ओपन, 2012 मध्ये फ्रेंच ओपन आणि 2014 मध्ये यूएस ओपन असे त्याचे नाव होते. महिला दुहेरीत 2015 मध्ये विम्बल्डन आणि यूएस ओपन, 2016 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन.

पुण्यातून अपहरण झालेला चिमुकला अखेर ‘इथे’ सापडला; 300 पोलिस घेत होते शोध

पुणे : पुण्यातील बाणेर परिसरातून पाच ते सहा दिवसांपूर्वी चार वर्षीय डुग्गू उर्फ स्वर्णम चव्हाण (swarnav chavan) या चिमुरड्याचे अपहरण करण्यात आले होते. पोलीस कसून त्याचा शोध घेत होते. अखेर हा चिमुरडा आज सापडला. पिंपरी-चिंचवड परिसरातील पुनावळे येथे पोलिसांना तो सापडला.

मागील आठवड्यात बालेवाडीमधून चार वर्षांच्या स्वर्णमचे अपहरण केले गेले होते. त्यानंतर स्वर्णमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. पुणे पोलिसांची मोठी फौज मुलांला शोधत होती, खूप गुप्तता पाळून हा तपास सुरू होता, जवळपास ३०० ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलांचा शोध घेत होते. अखेर आज वाकड जवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे.

चतुरश्रृंगी पोलिसात याबाबत तक्रार आली होती, कशासाठी अपहरण केलं किंवा हा याचे कारण पोलिस शोधत आहेत. गेले आठ दिवस पोलीस सोसियल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. अखेर मुलाला आठ दिवसांनंतर शोधण्यात यश आले आहे. कोणी अपहरण केलं? का केलं? हे मात्र अजून कळू शकते नाही, त्याचा तपास पुणे पोलीस करत आहेत.

आवाज कोणाचा आवाज राष्ट्रवादीचा; राज्यातील सर्वाधिक नगरपंचायती ताब्यात

NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले असून यात महाविकास आघाडीने भाजपला धोबीपछाड दिला आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार सरशी केली असून राष्ट्रवादीला तब्बल 27 नगरपंचायतीत विजय मिळवता आला आहे.

महाविकास आघाडीने काही ठिकाणी एकत्र निवडणूक लढवली तर काही ठिकाणी त्या त्या परिस्थितीनुसार तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले. या सर्वात राष्ट्रवादीने बाजी मारत तब्बल 27 नगरपंचायतीत सत्ता काबीज केली.

    कोणाला किती जागा मिळाल्या-
भाजपाला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा
राष्ट्रवादी काँग्रेसला 27 नगरपंचायती आणि ३८७ जागा
काँग्रेसला 22 नगरपंचायची आणि २९७ जागा
शिवसेनेला 17 नगरपंचायती आणि ३०० जागा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. त्यात कर्जत नगरपंचायत येथे रोहित पवार आणि कवठे महांकाळ येथे रोहित पाटील यांनी मिळवलेला विजय नक्कीच राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढवणारा असेल

‘या’ तालुक्यात अनधिकृतपणे कोळसा भट्टीना आला ऊत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

जत तालुक्यातील बिरनाळ, कंठी, वळसंग, काराजंगी, निगडी इत्यादी परिसरात अनधिकृतपणे कोळसा भट्टीना ऊत आला आहे. वनखाते खात्याच्या आशीर्वादाने या कोळसा भट्ट्या सुरू असल्याची चर्चा आहे दर ५० किलोच्या पोत्यास ३०० रुपये दराने कोकणातील मजुरांच्या टोळ्या कार्यरत आहेत. वनखात्याच्या आशीर्वाद जोरात असल्यामुळे अगदी रस्त्याच्या कडेला या कोळसा भट्ट्या सुरू आहेत जत परिसरात तयार होणारा कोळसा कोल्हापूर, सांगली सारख्या शहरी भागात पाठविले जात आहे.

या शहरी भागासाठी कोळसा पाठवणारा एक मोठा ठेकेदार आहे त्याच्या नियंत्रणाखाली या कोळसा भट्ट्या उभ्या राहिल्या आहेत या कोळसा व्यापारातून या ठेकेदारांनी लाखोंची माया गोळा केल्याची चर्चा आहे पण मजूर मात्र थंडीत राबत आहेत. अगदी कडाक्याच्या थंडीत रानात राहून हे मजूर पोटासाठी कोळसा तयार करतात मजुरांचा सगळा संसार उघड्यावर आहे अशा थंडीच्या परिस्थितीमध्ये लहान मुला बाळांसह मजुरांच्या टोळ्या कार्यरत आहेत. ना पाण्याची सोय ना निवाऱ्याची सोय अशा कठीण परिस्थितीमध्ये हा संसाराचा बाजार मांडला आहे.

महाराष्ट्रात भाजपा हाच नंबर वनचा पक्ष हे पुन्हा एकदा… – चंद्रकांतदादा पाटील

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आतापर्यंत या निवडणुकीत भाजपला 24 जागा तर महाविकास आघाडीला 66 जागा मिळालेल्या आहेत. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. “भाजपा महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष आहे, हे आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालं. अजुनही आम्ही म्हणत आहोत की एकएकटे लढा मग पाहुयात कोणाची ताकद जास्त आहे.” असे आव्हान पाटील यांनी दिले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारपरिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील महत्वाच्या अशा 106 नगरपंचायतींचे निकाल लागत आहेत. त्यातील सात नगरपंचायतींचे निकाल उद्या लागतील. म्हणजे जवळपास 99 नगरपंचायतींचे निकाल पूर्ण लागले आहेत. या निवडणुकांचे निकाल पाहिल्यास असे लक्षात येईल की, पुन्हा एकदा भाजपा महाराष्ट्रातला क्रमांक एकचा पक्ष आहे. हे सिद्ध झाले आहार. सदस्य संख्येत देखील भाजपा क्रमांक एकवर आहे.

“राज्यातील नगरपंचायती पूर्ण जिंकणे आणि भाजपाच्या पाठिंब्याने जिंकणे यात देखील भाजपा क्रमांक एकवर हे सिद्ध झाले आहे. आम्ही वारंवार सांगत आलेलो आहे की, महाराष्ट्रात लढायचे असेल तर वेगवेगळे लढा आणि मग कोणाची ताकद जास्त आहे ते पाहू, असे पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारबाबत म्हंटले.

‘त्या’ चारचाकी गाडीची सम्राट महाडिक यांच्याकडून पाहणी, महाडिक उद्योग समूहाकडून कुमार पाटील यांचा सन्मान

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

फॅब्रिकेशनचा व्यवसाय सांभाळत शेतकर्‍यांसाठी उपयुक्त चारचाकी गाडीची निर्मिती करणार्‍या कुमार पाटील यांची भेट घेत युवा नेते सम्राट महाडिक यांनी कौतुक केले. सम्राट महाडिक यांनी कुमार पाटील यांच्या वर्कशॉपला प्रत्यक्ष भेट दिली आणि चारचाकी गाडीची पाहणी केली. इस्लामपूर पेठ रस्त्यावरील विष्णू नगर येथील फेब्रिकेशन व्यवसायिक कुमार पाटील यांनी एक वर्षाची मेहनत घेऊन शेतकर्‍यांना उपयुक्त ठरणारी गाडीची निर्मिती केली आहे.

फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव आणि कौशल्ये वापरत दुचाकीच्या इंजिनचा वापर केलेली चार चाकीगाडी शेतकर्‍यांना उपयुक्त आहे. शेतीमध्ये अंतर्गत मशागतीची कामे कशी करता येईल? शेतकर्‍यांना छोटी-छोटी सायकल कोळपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देत असतानाच या गाडीची कल्पना कशी सुचली? लोखंडी साहित्य वापरताना कोणत्या दुचाकीचे इंजिन वापरले? गाडीला शेती अवजारे कशी जोडता येतील? याबाबत महाडिक यांनी माहिती जाणून घेतली.

सम्राट महाडिक म्हणाले, कुमार पाटील यांच्या नवनिर्मिती कौशल्याचा वापर नक्की शेतकर्‍यांना होईल. कमी खर्चामध्ये बनवलेली गाडी शेतकर्‍यांना वरदान आहे. शासनाने कुमार पाटील व जाफर नायकवडी यांना प्रशिक्षित करून मदत करावी अशी अपेक्षाही व्यक्त केली. तसेच महाडिक उद्योग समूह नेहमी तुमच्या पाठीशी राहणार असल्याचा विश्वास दिला. यावेळी पेठ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शंकर पाटील, सुरेश कदम, आनंदराव कदम, रमेश कदम, अमोल कदम, रूपेश कदम, प्रशांत कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. इराप्पा पाटील व मयुरेश पाटील यांनी स्वागत केले.

नगरपंचायत निवडणूकीत भाजपला जनतेने नाकारलं; नवाब मलिकांचा हल्लाबोल

Malik Fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सर्व जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर हल्लाबोल केला. नगरपंचायत निवडणुकीत 80 टक्के जागा महाविकास आघाडीला मिळाल्या असून याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारल आहे असे नवाब मलिक यांनी म्हंटल.

नवाब मलिक म्हणाले, राज्यातील जनतेचा कल महाविकास आघाडी कडे दिसत आहेत. काही ठिकाणी तिन्ही पक्ष एकत्र लढले तर काही ठिकाणी तिन्ही पक्ष वेगवेगळे लढले तरीही मतांचे विभाजन झालं नाही आणि महाविकास आघाडीला भरगोस यश मिळाले अस नवाब मलिक यांनी म्हंटल.

यावेळी नवाब मलिक यांनी रोहित पाटील, रोहित पवार यांचेही विशेष अभिनंदन केले. राष्ट्रवादीतील नवीन नेते रोहित पवार, सुनील शेळके, रोहित पाटील यांनी दोन तीन वर्ष आपल्या मतदारसंघात चांगला संपर्क ठेवला त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे अस मलिक यांनी म्हंटल.

गंभीर आजार असणाऱ्या 45 वर्षांवरील लोकांना आता मिळणार बूस्टर डोस ? यामागील सत्य जाणून घ्या

नवी दिल्ली । देशात करोना विषाणूविरूद्ध लसीकरण मोहीम त्याविरुद्धचे एक मोठे शस्त्र म्हणून चालवली जात आहे. 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांना लस देण्याचे कामही सुरू झाले आहे. त्याच वेळी, 10 जानेवारीपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आणि फ्रंटलाईन वर्कर्सना प्रीकॉशनरी डोसच्या नावाखाली लसीचा बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता अशी माहिती समोर आली आहे की, देशातील 45 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या, गंभीर आजार किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना बूस्टर डोस देण्याची कोणतीही योजना सरकारने तयार केलेली नाही.

एका रिपोर्टनुसार, सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, डेटाच्या कमतरतेमुळे तिसऱ्या डोसबाबत खबरदारी घेतली जात आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने या संदर्भात सांगितले आहे की, ‘आम्ही 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना बूस्टर डोस किंवा प्रीकॉशनरी डोस लागू करण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू केलेली नाही.’ तर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार मंडळाचे (NTAGI) सदस्य या लसीकरणाबाबत म्हणतात की, या कामासाठी अद्याप कोणतीही रणनीती ठरलेली नाही.तसेच यावर अद्याप कोणतीही चर्चा देखील झालेली नाही. बूस्टर डोस किंवा तिसऱ्या डोसबाबत काही संशोधन केले जात आहे, आता आम्ही त्यांच्या परिणामांची वाट पाहत आहोत.’

काही तज्ञ असेही म्हणतात की,”कोविशील्ड लागू करण्याचा मध्यांतर वाढवणे हे बूस्टर डोससारखे कामकरेल. भारताच्या कोविड 19 वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष एनके अरोरा यांनी याआधी सांगितले होते की,”लसीच्या सुरुवातीच्या फेज 3 चाचण्यांचे परिणाम असे दर्शवतात की, दोन डोसमधील वेळ वाढल्यास ही लस अधिक प्रभावी आहे.

त्याच वेळी, देशात आतापर्यंत अँटी-कोविड-19 लसीचे 158.74 कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी ही माहिती दिली. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना एकूण 3,70,32,672 डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत 65 लाखांहून जास्त (65,85,945) डोस देण्यात आले.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 56 लाखांहून जास्त (56,42,395) फ्रंटलाइन वर्कर्स, हेल्थ वर्कर्स आणि 60 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या लोकांना प्रीकॉशनरी डोस देण्यात आले आहेत. रात्री उशिरापर्यंत अंतिम आकडेवारीसह दररोजच्या लसीकरणाची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

नारायण राणेंना शिवसेनेचा दणका !! कुडाळमधील भाजपची सत्ता संपुष्टात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेला कुडाळ नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं भाजपला जोरदार धक्का दिला आहे. शिवसेनेनं 7 जागा जिंकल्या आहेत तर काँग्रेसल 2 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपला 8 जागा मिळून देखील काही उपयोग होणार नाही. राणेंसाठी हा खूप मोठा धक्का असेल.

संपूर्ण राज्याचे लक्ष कुडाळ नगरपंचातीच्या निकालाकडे लागले होते. पण अखेर भाजपाला एका मताने आणि एका जागेने सत्तेपासून दुर केले आहे. कुडाळमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपाला ९ जागा मिळाल्या होत्या. मात्र यंदा भाजपाला यंदा ८ जागाच जिंकता आल्या आहेत. तर शिवसेनेला ७ आणि काँग्रेसला २ जागा मिळाल्या आहेत.

दरम्यान, राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत पक्षीय बलाबल पाहता भाजपने आघाडी घेतली आहे. मात्र महाविकास आघाडी म्हणून बघितलं तर मात्र तिन्ही पक्षांनी जोरदार सरशी केली आहे

5G टेक्नोलॉजीमुळे विमानांना काय धोका आहे? अशाप्रकारे समजून घ्या

वॉशिंग्टन । बुधवारपासून यूएस विमानतळांवर 5G मोबाईल टेक्नोलॉजीचा वापर सुरू होत आहे. अशा परिस्थितीत आज एअर इंडियाची विमाने अमेरिकेला जाणार नाहीत. एअर इंडियाने दिल्ली-न्यूयॉर्क, दिल्ली-सॅन फ्रान्सिस्को, दिल्ली-शिकागो, मुंबई-न्यू जर्सी फ्लाइट्स रद्द केली आहेत. 5G मुळे विमानांना होणाऱ्या अडचणींमुळे एअर इंडियाने फ्लाइट्सच्या वेळेत बदल केला तसेच विमानेही बदलली जाणार आहेत. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना 5G संदर्भात याआधीच पत्र लिहिले होते. 5G टेक्नोलॉजीमुळे फ्लाइट्सना काय धोका आहे ते समजून घेऊयात:-

5G टेक्नोलॉजीमुळे एअरलाइन्सच्या फ्रिक्वेन्सीमध्ये बाधा येण्याची अपेक्षा आहे. याबाबत सुमारे 10 विमान कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सरकारला पत्र लिहिले आहे. त्यानुसार विमान कंपन्या आणि टेलीकम्युनिकेशन इंडस्ट्री यांच्यात चर्चा सुरू आहे. या संवादानंतरच 5G तंत्रज्ञानाचे लॉन्चिंग काही दिवस पुढे ढकलण्यात आले. मात्र, आता ती वेळ या आठवड्यात संपुष्टात येत आहे.

असे मानले जात आहे की जर 5G टेक्नोलॉजी लागू केली तर सुमारे 1100 फ्लाइट्स रद्द होऊ शकतात. अमेरिकेच्या सर्व प्रमुख विमान कंपन्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून काही काळ स्थगिती देण्याची विनंती बिडेन प्रशासनाला केली आहे.

त्याचे परिणाम घातक ठरू शकतात, असा इशाराही विमान कंपन्यांनी दिला आहे. सुमारे 1 लाख प्रवाशांना याचा फटका बसू शकतो. याचा परिणाम केवळ प्रवाशांवरच होणार नाही, तर कार्गो फ्लाइट्सवरही होऊ शकतो.

एअरलाइन कंपन्या काय म्हणतात:-

1- आवश्यक सुधारणा न करता किंवा एविएशन इक्विपमेंटमध्ये बदल न करता 5G कार्यान्वित केल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते.

2- 5G टेक्नोलॉजीमुळे विमानाचे ऑल्टीट्यूड (उंची) मोजण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

3- विमानतळाभोवती 5G टेक्नोलॉजी मुळे धोकादायक समस्या उद्भवू शकतात

4- हे पाहता 5G टेक्नोलॉजी धावपट्टीपासून दोन मैलांच्या अंतरावर ठेवावी.

काही एअरलाईन्सच्या सीईओने अमेरिकन परिवहन सचिवांना पत्र लिहून म्हटले आहे – ‘जर 5G मध्ये आवश्यक अपग्रेड न करता किंवा एविएशन इक्विपमेंटमध्ये बदल न करता लागू केले तर मोठी दुर्घटना घडू शकते. 5G तंत्रज्ञानामुळे विमानाची ऑल्टीट्यूड मोजण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

एव्हिएशन रेग्युलेटर FAA ने सांगितले की,” त्यांनी ट्रान्सपॉन्डर्सला काही 5G सेक्टर्समध्ये ऑपरेट करण्याची परवानगी दिली आहे. 5G च्या C-बँडमुळे प्रभावित होणार्‍या 88 विमानतळांपैकी 48 विमानतळांना नवीन टेक्नोलॉजीसाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. या विमानतळांवरील अनसर्टिफाइड इक्विपमेंटमुळे हजारो फ्लाईट्स रखडण्याची भीती विमान कंपन्यांना आहे. युनायटेड एअरलाइन्सने सोमवारी सांगितले की,”सध्याच्या 5G वायरलेसमुळे एका वर्षात 15,000 फ्लाईट्स आणि 12.5 लाख प्रवासी प्रभावित होतील.”