Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2920

साक्री नगरपंचायत भाजपच्या ताब्यात; शिवसेनेला जोरदार धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | धुळे जिल्ह्यातील साक्री नगरपंचायत निवडणूकीत भाजपने सत्ताधारी शिवसेनेला धक्का देत सत्ता काबीज केली आहे. साक्री नगरपंचायतीत भाजपने 17 पैकी 11 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला आहे.

साक्री नगरपंचायत निवडणुकीसाठी 21 डिसेंबर ला मतदान प्रक्रिया पार पाडली. 17 प्रभागासाठी पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपने 11 जागा जिंकत दमदार विजय मिळवला. शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. तर 1 अपक्ष निवडून आला.

साक्री नगरपंचायत निवडणूकीत काँग्रेसने एकला चलो रे ची भूमिका घेतली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं युती केली होती. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पाहायला मिळाली यात भाजपने बाजी मारली

सातारा जिल्हा नगरपंचायत निवडणुक : वडूजला नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे सहा तर काँग्रेसचा केवळ एक उमेदवार विजयी

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी अशा सहा नगरपंचायतीची निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान आता वडूज नगरपंचायतीचा निकाल हाती आलेला आहे. या ठिकाणी भाजपाला 6, राष्ट्रवादी काँग्रेसला 5, काँग्रेसने 1,अपक्षमधून 4 , वंचित आघाडीतून 1 अशा एकूण 17 जागेवरून उमेदवार निवडून आले आहेत.

वडूज नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आरती काळे, शोभा वायदंडे, स्वप्नाली गोडसे, सुनील गोडसे, रोशना गोडसे हे उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसमधून अभय देशमुख हे निवडून आले आहेत. तर भाजपमधून रेखा माळी, रेश्मा बनसोडे, सोमनाथ जाधव, बनाजी पाटोळे, ओंकार चव्हाण, जयवंत पाटील हे निवडून आले आहेत. अपक्ष म्हणून मनीषा काळे, राधिका गोडसे, मनोज कुंभार, सचिन माळी हे निवडून आले आहेत. वंचित आघाडीतून शोभा बडेकर या विजयी झाल्या आहेत.

वडूज नगरपंचायतीमध्ये भाजपने सर्वाधिक जागा निवडून आणल्या आहेत. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला असून या पक्षाच्या पाच जागा विजयी झाल्या आहेत. तर अपक्षमधून चार जागा निवडून आल्या आहेत.

Stock Market : कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात घसरण, आयटी शेअर्समध्ये घसरण

Stock Market Timing

नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजारांची बुधवारी कमकुवत सुरुवात झाली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स 280 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी घसरून 60,550.76 च्या पातळीवर ट्रेड करत आहे. दुसरीकडे, निफ्टी 53.05 अंकांच्या किंवा 0.29 टक्क्यांच्या घसरणीसह 18075 च्या पातळीवर ट्रेड करत आहे.

जागतिक संकेत कमकुवत दिसत आहेत. आशिया खंडावर दबाव दिसून येत आहे. SGX NIFTY मध्ये फ्लॅटचे काम सुरू आहे. बॉण्ड यील्ड वाढल्यामुळे अमेरिकन बाजाराचा मूड खराब झाला आहे. काल DOW सुमारे 550 अंकांनी घसरून बंद झाला. दुसरीकडे, कच्च्या तेलातही वाढ सुरूच असून ब्रेंट $90 च्या दिशेने झेपावला आहे.

मंगळवार, 18 जानेवारी रोजी बाजारातील शेवटच्या ट्रेडिंग तासांमध्ये नफा-वुकतीमुळे बेंचमार्क निर्देशांक 1 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाले. काल निफ्टी 18200 च्या खाली घसरला. दुसरीकडे, जवळपास सर्वच क्षेत्रातील विक्रीमुळे सेन्सेक्स 500 हून जास्त अंकांनी घसरला.

फोकस मध्ये रिलायन्स
रिलायन्स जिओने DoT ला वेळेपूर्वी 30791 कोटी रुपये दिले. सर्व जुनी स्पेक्ट्रमचे पेमेंट वेळेपूर्वी भरले गेले आहेत. कंपनीने 2014, 2015, 2016 आणि 2021 मध्ये मिळालेल्या स्पेक्ट्रमसाठी पैसे दिले आहेत. कंपनीकडे 585.3 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम आहे. प्रीपेमेंटमुळे कंपनीचे वार्षिक 1200 कोटी रुपयांचे व्याज वाचले आहे.

IPO अपडेट
AGS Transact Technologies ची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) आज सबस्क्रिप्शनसाठी उघडेल. तीन दिवसांच्याइनिशियल शेअर-सेलसाठी प्राईस बँड 166-175 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे, जो शुक्रवार, 21 जानेवारी रोजी बंद होईल. पेमेंट सोल्यूशन प्रोव्हायडरने आपल्या इश्यूपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 204 कोटी रुपये उभे केले. 2022 चा हा पहिला पब्लिक इश्यू आहे. IPO ही ऑफर फॉर सेल आहे, ज्यामध्ये 680 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स प्रमोटर आणि इतर भागधारकांद्वारे विकले जातील.

क्रूड
कच्च्या तेलाच्या किंमती 7 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. क्रूडची किंमत प्रति बॅरल $89 च्या जवळ पोहोचली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील ही वाढ ONGC, OIL, HOEC साठी सकारात्मक बातमी आहे तर BPCL/HPCL/IOC पेंट कंपन्यांसाठी नकारात्मक आहे.

रोहितने विरोधकांना आर आर पाटीलांची आठवण करुन दिलीच; कवठे महांकाळ नगरपंचायतीत राष्ट्रवादी विजयी

rohit patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागलेल्या कवठे महांकाळ नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते रोहित पाटील यांनी सर्व विरोधकांना अस्मान दाखवत आपली सत्ता खेचून आणली आहे. रोहित पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागा जिंकत आपलं नाणे खणखणीत आहे हे दाखवून दिले आहे.

कवठे महांकाळ येथे 13 जागांसाठी नगरपंचायत निवडणूक लागली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर विजय मिळवला आहे. आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक येकटवले होते. तरीही रोहित पाटील यांनी एकहाती विजय मिळवत विरोधकांना अस्मान दाखवलं.

शिवसेनेचे माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी खासदार संजय काका पाटील तसेच राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस, शेतकरी विकास आघाडी हे सर्व विरोधकांचे आव्हान रोहीत पाटील यांच्यासमोर होत. मात्र रोहित पाटील यांनी खंबीरपणे लढा देत राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवून दिला

सातारा जिल्हा नगरपंचायत निवडणुक : पाटणला राष्ट्रवादीची सत्ता ; पाटणकर गट पुन्हा सत्तेत, गृहराज्यमंत्र्यांना दणका

पाटण प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील पाटण नगरपंचायत मध्ये मतमोजणी पार पडली. यामध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवण्यात ठेवण्यात यश मिळाले आहे. पाटण नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवले आहे. मात्र शिवसेनेने विजय खाते खोलले आहे.

सत्ताधारी पाटणकर गटाने पहिल्या 12 प्रभागात विजयी सलामी दिली. प्रभाग क्रमांक 14 मध्ये आस्मा सादिक इनामदार यांनी 202 मते मिळवून विजय संपादन केला आहे तर शबाना इम्रान मुकादम यांना 167 मते मिळाली आहेत. याच मित्राबरोबर हिराबाई मारुती कदम आणि श्रद्धा संजय कवर यांचाही या ठिकाणी पराभव झाला आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/342987960777492

 

प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये शैलजा मिलिंद पाटील यांनी 202 मते मिळवून विजय मिळवला तर वैशाली सुनिल पवार आणि अश्विनी प्रदीप शेलार यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे. पाटण नगर पंचायत मध्ये 15 जागा वरती राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या देसाई गटाला व शिवसेना पक्षाला या ठिकाणी केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

सातारा जिल्हा नगरपंचायत निवडणुक : कोरेगाव नगरपंचायतीवर आमदार महेश शिंदेंच्या पॅनलची सत्ता; शशिकांत शिंदेंना धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी अशा सहा नगरपंचायतीची निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान कोरेगाव नगर पंचायतीच्या 17 जागांसाठी मतमोजणी सुरुवात झाली असून पहिल्या नऊ जागा वरती मतमोजणी पार पडली. यामध्ये आठ जागावरती शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या पॅनलने आघाडी घेतली आहे. त्यामुळे कोरेगावमध्ये सत्ता परिवर्तन होऊन राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना धक्का बसला आहे.

कोरेगाव नगर पंचायत निकाल हाती आला आहे. आमदार महेश शिंदे पुरस्कृत कोरेगाव शहर विकास पॅनल 9 पैकी 8 जागांवर विजयी मिळवला आहे. तर आमदार शशिकांत शिंदे पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पॅनल 9 पैकी 1 जागेवर विजयी मिळवला आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्यासाठी येथील लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. या ठिकाणी एकूण 17 जागांसाठी मतमोजणी केली जात असून कोरेगाव नगर पंचायत निकाल हाती आला आहे. कोरेगावमध्ये आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध आमदार महेश शिंदे असा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या 23 जागांसाठी मंगळवारी शांततापूर्ण वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडली. जिल्ह्यात एकूण 31 बूथवर सुमारे 17 हजार 168 मतदारांपैकी 13 हजार 818 उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात; भाजपच्या सत्तेला सुरुंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्जत नगरपंचायत निवडणूकित राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या गडाला सुरुंग लावत हादरा दिला आहे. कर्जत नगरपंचायतसाठी 17 जागांपैकी 12 जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादी काँग्रेसने ताब्यात घेतली.

गेल्या काही वर्षांपासून कर्जत नगरपंचायत भाजपच्या ताब्यात होती. मात्र आमदार रोहित पवार यांचा करिष्मा कर्जत मध्ये पाहायला मिळाला. भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली. प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी कर्जतमधील वातावरण ढवळून निघाले होते. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत 80 टक्के मतदान झालं होतं. अनेक वर्षांपासून ही नगरपंचायत भाजपच्या ताब्यात होती. सत्ता राखण्यासाठी शिंदेंनी सर्व शक्ती पणाला लावली मात्र रोहित पवार यांच्यापुढे भाजपचा सुफडा साफ झाला

लस न घेता रस्त्यावर फिरणे महागात ! महिन्याभरात साडेसहा लाख रुपयांचा दंड मनपाने केला वसूल

औरंगाबाद – शहरात गेल्या काही दिवसात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घ्या, अन्यथा दंड वसूल केला जाईल, असे आदेश प्रशासनाने काढले आहेत. तथापि, दंड भरू पण लस न घेता फिरू, असाच आविर्भाव सध्या नागरिकांचा आहे. महापालिकेने कोरोना प्रतिबंधाची लस न घेता रस्त्यावर फिरणाऱ्या एक हजार 262 नागरिकांकडून तब्बल सहा लाख 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लसीकरणाला गती देण्यासाठी प्रशासनाचे काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. पण अनेक जण अद्याप लस घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. ज्या भागात लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, तिथे जनजागृती केली जात आहे. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र त्यालाही नागरिक जुमानत नसल्याने ज्या नागरिकाने लसीचा एकही डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांना रस्त्यावर अडवून पाचशे रुपयांचा दंड करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

महापालिका क्षेत्रात प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा व उपायुक्त सौरभ जोशी यांनी नागरिक मित्र पथकांच्या माध्यमातून शहराच्या विविध भागातील नागरिकांचे लसीकरण प्रमाणपत्र तपासण्याची मोहीम सुरु केले आहे. 16 डिसेंबर 2021 ते 17 जानेवारी 2022 या एक महिन्याच्या काळात पंधरा नागरिक मित्र पथकांच्या माध्यमातून 75 हजार 50 नागरिकांचे लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासण्यात आले. त्यात एक हजार 262 नागरिकांनी अद्याप लस घेतली नसल्याचे स्पष्ट झाले. या नागरिकांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारून सहा लाख 31 हजार रुपये वसुल करण्यात आले. तसेच त्यांना लवकरात लवकर लस घेण्याचे आवाहन करण्यात आले. लस न घेतलेल्या नागरिकांना दंड करण्याची कारवाई सुरुच राहील असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

सातारा जिल्हा नगरपंचायत निवडणुक : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला ; 31 बुथवरून मतमोजणीला सुरुवात

Satara District Gram Panchayat Election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात सध्या नगरपंचायत निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा आणि दहिवडी अशा सहा नगरपंचायतीची निवडणुकीसाठी काल मंगळवारी 80.49 टक्के मतदान झाले. मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतमोजणीला सुरुवात केली आहे. मत मोजणीसाठी 31 बूथवर 615 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने सातारा जिल्ह्यातील सहा नगरपंचायतीच्या 23 जागांसाठी मंगळवारी शांततापूर्ण वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडली. जिल्ह्यात एकूण 31 बूथवर सुमारे 17 हजार 168 मतदारांपैकी 13 हजार 818 उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

सातारा जिल्ह्यातील लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा येथील प्रत्येकी चार व दहिवडी नगरपंचायतीच्या तीन अशा 23 इतर मागास प्रवर्गाच्या जागांसाठी एकूण 82 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दरम्यान काल सहा नगरपंचायतीच्या 13 हजार 818 मतदारांनी निवडणुकीच्या रिंगणातील 82 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद केले.

कोरेगाव मध्ये आमदार शशिकांत शिंदे विरुद्ध आमदार महेश शिंदे असा हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आहे. जिल्हा प्रशासनाने 31 बूथवर 615 कर्मचारी यांची नियुक्ती केली असून नगरपंचायत कार्यक्षेत्रात मतमोजणी केली जाणार असून एक केंद्राध्यक्ष ‘ चार मतमोजणी अधिकारी तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्या नेमणुका निश्चित झाल्या असून दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल येणे अपेक्षित आहेत.

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला –

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायत मध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे यामध्ये कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. पाटण नगरपंचायती साठी राज्यमंत्री शंभूराजे देसाई तसेच माझी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर व सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक सत्यजित पाटणकर यांचे देसाई पाटणकर गट आमने- सामने आहे. पाटण येथे काही ठिकाणी तिरंगी तिरंगी चौरंगी लढत होत आहे त्यामुळे यामध्ये प्रामुख्याने देसाई की पाटणकर गट सत्ता मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

ठरलं तर!! गोव्यात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार

Uddhav Thackeray Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गोवा विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र एकत्रच निवडणूक लढतील अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केली आहे. तसेच इथून पुढे काँग्रेस सोबत युतीबाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही अस म्हणत त्यांनी काँग्रेस वर आपली नाराजी व्यक्त केली.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, गेल्या 5 वर्षात 15 आमदार काँग्रेस ला सोडून गेले तरी ते स्वबळाची भाषा करतात. त्यांना वाटत की ते गोव्यात आपल्या बळावर निवडणूक जिंकू शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यात शिवसेनेसोबत युती केली असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काँग्रेसच्या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. आपण महाराष्ट्रात एकत्र आलो म्हणून भाजपला सत्तेपासून बाहेर ठेऊ शकलो. ती मानसिकता देशभरात असायला हवी, तरच भाजपला आपण लांब ठेवू शकू. गोव्यात मात्र काँग्रेस भाजपला रस्ते मोकळे करीत आहे, असं आव्हाड यांनी म्हंटल.