Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2930

पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच कृष्णा नदीच्या पात्रात दुर्मिळ पाणमांजराचं दर्शन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

काही दिवसापासून नदीकाठच्या भागातील शेतकऱ्यांना मुंगुसासारखा प्राणी वावरताना दिसत होता. शेतकऱ्यांनी याची माहिती नदीकाठी वावरणाऱ्या मगरीच्या बंदोबस्तासाठी डिग्रज बंधाऱ्या वरील वन कर्मचारी इकबाल पठाण व ढवळे यांना दिली होती. त्यांनी माग घेता मुंगसासारखा वेगळाच प्राणी नदीच्या काठावर फिरत असलेला दिसला. खात्री करणेसाठी जवळ जाऊन शोध घेतला असता मुंगूस नसून मुंगसासारखा एक वेगळाच प्राणी दिसलेची खात्री झाली.

त्यांनी मोबाईल वर काढलेला फोटोसह माहिती खात्री करणे करणेसाठी मानद वन्यजीव रक्षक ह्यांना पाठवली व ते दुर्मिळ पाणमांजर असल्याची खात्री केली. दुसऱ्या दिवशी सदर परिसरातील शेतकऱ्यांना विचारले असता हा प्राणी काही दिवस झाले इथे दिसत आहे व मागच्या वर्षी पण थोडे दिवस इथे आढळलेची खात्री झाली.याची माहिती मिळताच वाईल्ड लाईफ रेस्कु चे डॉ.अनिरुध्द पाटील आणि सुजित चोपडे यांनी अंकलखोप, हाळभाग येथे या पाणमांजराला कॅमेराबद्ध केले.

डॉक्टर पाटील हे शेतात काम करत असतानाच नदी काठावर हालचाल जाणवली व ओटर सदृश्य प्राणी दिसलेंनी उत्सुकता म्हणून खात्री केली व सोबत असलेल्या कॅमेरा मध्ये त्याचा फोटो घेतला. ह्या पूर्वी आधी असा प्राणी कृष्णेच्या पत्रात आपण पहिला नसलेच त्यांनी सांगीतले. हा प्राणी प्रथमच पहिला व अधिक माहिती साठी वन विभागाला कळविले आहे . ते म्हणाले गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच पश्चिम महाराष्ट्रात या दुर्मिळ पाणमांजराचे दर्शन झाले.येथील शेतकरी शीतल चोपडे , राकेश चोपडे आणि तुषार घाडगे यांना याच भागात मागील आठवड्यात 3 पाणमांजर पाहिले असलेच सांगितले आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकरीता 30 कोटी निधी देण्याचे शासनाने दिले आदेश

परभणी प्रतिनिधी | अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामाचा आढावा आयोजित बैठकीत महामंडळाकरीता पुरवणी मागणीव्दारे अर्थसंकल्पित रु.50.00 कोटी निधीपैकी रु.30.00 कोटी निधी वितरीत करण्यासाठी शासनाने आदेश दिले असल्याची माहीती महामंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिली असल्यामुळे राज्यातील महामंडळातील विविध योजनांचे लाभार्थी असणाऱ्या हजारो युवकांना याचा लाभ होणार आहे अशी माहिती परभणी विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अतिश गरड यांनी हॅलो महाराष्ट्र शी बोलताना दिली आहे .

शुक्रवार 14 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांनी यासंदर्भात एक बैठक घेत महामंडळ संदर्भात निधी वाटपाचा निर्णय घेत महामंडळात द्वारे विविध योजनांतून लाभ घेणाऱ्या व्यक्तींना यावेळी दिलासा दिला असल्याचे अतिश गरड यांनी हॅलो कृषीशी बोलताना सांगितले . बैठकीत सर्व महामंडळांसाठी तरतूद करण्यात आलेल्या निधीचं तातडीनं वितरण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला देत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळासह महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ, श्यामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ आदींसाठी तरतुद केलेल्या निधीचे तातडीनं वितरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळासह इतर सर्व महामंडळासाठी तरतुद केलेल्या निधीचं तातडीनं वितरण करण्याचे निर्देश बैठकीत दिले गेल आहेत.अण्णासाहेब पाटील आर्थिक‍ मागास विकास महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना काटेकोरपणे आर्थिक शिस्त पाळा. महामंडळाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवताना समाजातल्या पात्र, गरजू लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या.

राज्यातील सर्व समाज घटकांच्या शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसह समतोल सामाजिक प्रगती साधण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं वेगवेगळ्या प्रवर्गासाठी विविध विकास महामंडळाच्या माध्यमातून योजना राबवण्यात येतात. समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना शेतीपूरक व्यवसाय, विपणन प्रक्रिया,उद्योग, पुरवठा व साठवणूकीसह लघू उद्योग, वाहतूक, अन्य व्यावसायिक उद्योगासाठी आर्थिक मदत करताना राज्यातील सर्व भागातील जास्तीत-जास्त तरुणांना या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करावा.दोन दिवसापुर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी आज जीआर काढुण तात्काळ आदेश दिले .याचा लाभ राज्यातील हजारो युवकांना होणार आहे तरी जास्तीत जास्त युवकांना योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन परभणी विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अतिश नाना गरड यांनी केले आहे

Bank Holidays : ‘या’ महिन्याच्या उर्वरित 15 दिवसांपैकी 6 दिवस बँका राहणार बंद

Bank Holiday

नवी दिल्ली । जर तुमचेही या महिन्यात बँकेत काही काम असेल तर ते लवकर निकाली काढा. जानेवारीच्या उरलेल्या 15 दिवसांत अनेक सुट्या असणार आहेत. वेगवेगळ्या राज्यांमध्ये या सुट्ट्या वेगवेगळ्या असल्या तरी या 15 दिवसांमध्ये सर्व सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँका 6 दिवस बंद राहणार आहेत.जानेवारीतील सणांमुळे, RBI ने विविध राज्यांमध्ये बँका अनेक दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र तरीही तुम्ही ऑनलाइन मोडमध्ये बँकिंग सेवा वापरु शकाल.

वेगवेगळ्या राज्यांमध्ये सणांनिमित्त वेगवेगळ्या दिवशी सुट्ट्या असणार आहेत. बँकेच्या सुट्ट्या प्रत्येक राज्यानुसार बदलतात.बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या सणांवरही अवलंबून असतात.

दुसरीकडे, जर तुम्ही जानेवारी 2022 मध्ये बँकांमध्ये जाण्याची तयारी करत असाल किंवा ऑफलाइन बँकिंगसाठी तुमच्या शाखेत जात असाल, तर या महिन्याच्या बँक सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट खाली दिली आहे, त्यावर एक नजर टाका-

बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण लिस्ट पहा…

18 जानेवारी, मंगळवार – थाई पूसम (चेन्नई)

22 जानेवारी, महिन्याचा चौथा शनिवार

23 जानेवारी, रविवार

26 जानेवारी, बुधवार – प्रजासत्ताक दिन (देशभर साजरा केला जातो)

30 जानेवारी, रविवार

31 जानेवारी, सोमवार – मी-डॅम-मे-फी (आसाम)

Budget 2022 : ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सरकार वाढवू शकते पीएम किसानची रक्कम

PM Kisan

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात सरकारचा पूर्ण भर आगामी अर्थसंकल्प 2022 मध्ये अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर असू शकतो. यामध्येही विशेषतः ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेबाबत. याअंतर्गत सरकार 2022 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अनेक घोषणा करू शकते. यामध्ये पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे.

कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,”पीएम किसान अंतर्गत रक्कम 6,000 रुपयांपेक्षा जास्त केल्याने शेतकऱ्यांना दिलासा तर मिळेलच मात्र त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. कृषी हे एकमेव असे क्षेत्र आहे ज्यावर महामारीचा फारसा परिणाम झालेला नाही.” तज्ज्ञांचे म्हणणे आहे की,” पीएम किसान व्यतिरिक्त सरकार या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक सवलती जाहीर करू शकते.”

उत्पन्न वाढल्याने महागाईच्या आघाडीवर दिलासा मिळणार आहे
IIFL सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (रिसर्च) अनुज गुप्ता सांगतात की,”महागाईच्या या काळात सरकारने बजट 2022 मध्ये PM किसान सन्मान निधी अंतर्गत रक्कम वाढवली तर भविष्यात अनेक फायदे दिसून येतील. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढेलच मात्र महागाईच्या आघाडीवरही दिलासा मिळेल.” ते म्हणाले की,”वाढत्या महागाईमुळे शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या खते, बियाणे आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत पीएम किसान वाढल्याने शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.”

उत्पन्न वाढेल, वापर वाढेल
अनुज गुप्ता सांगतात की,”जर शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळाले तर ते आपले उत्पादन वाढवण्यासाठी त्याचा वापरू शकतील. सरकारने नुकतीच खाद्यतेलाशी संबंधित योजना सुरू केली आहे. पीएम किसानच्या वाढीव प्रमाणात, शेतकरी तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवू शकतात. त्यामुळे खाद्यतेलाची आयात कमी होईल. विशेष म्हणजे उत्पादन वाढल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, जेणेकरून ते पूर्वीपेक्षा जास्त खर्च करू शकतील. यामुळे खप वाढेल, ज्यामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था मजबूत होईल.”

ही रक्कम वाढवण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे
पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत रक्कम वाढवण्याची मागणी यापूर्वीही अनेकदा करण्यात आली आहे. ही रक्कम वाढवण्याची घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक 6,000 रुपये पाठवले जातात, जे 3 हप्त्यांमध्ये दिले जातात. येत्या आर्थिक वर्षापासून ही रक्कम 8,000 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. याचा अर्थ असा आहे की, आता शेतकऱ्यांना वर्षभरात प्रत्येकी 2,000 रुपयांचे चार हप्ते दिले जाऊ शकतात.

13 कोटी शेतकरी कुटुंबांना 20,900 कोटी मिळाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जानेवारी 2022 रोजी पीएम किसानचा 10 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला होता. यामुळे 13 कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात 20,900 कोटी रुपये वर्ग करण्यात आले. या योजनेंतर्गत 1.38 लाख कोटी रुपयांहून अधिक मानधनाची रक्कम शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे.

जानेवारीमध्ये FPI ने आतापर्यंत केली आहे 3117 कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली । भारतासह जगभरात ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएन्टमधील कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, परकीय गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कायम आहे. सलग तीन महिन्यांच्या विक्रीनंतर, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) जानेवारी 2022 मध्ये आतापर्यंत भारतीय शेअर बाजारात 3,117 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी, FPIs ने जानेवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात 3,202 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

डिपॉझिटरी डेटानुसार, 1 ते 14 जानेवारी दरम्यान परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी इक्विटीमध्ये 1,857 कोटी रुपये आणि हायब्रिड इंस्ट्रूमेंटमध्ये 1,743 कोटी रुपये ओतले. यासह, त्यांनी 3,117 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक सोडून डेट सेगमेंटमध्ये 482 कोटी रुपये काढले. यापूर्वी, ऑक्टोबर 2021 पासून, त्याने सलग तीन महिने भारतीय बाजारपेठेत निव्वळ विक्री केली होती.

IT क्षेत्रातील बड्या कंपन्यांचे चांगले रिझल्ट आले आहेत
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्हीके विजय कुमार म्हणाले की,”आयटी क्षेत्रातील बड्या कंपन्यांच्या चांगल्या रिझल्ट मुळे जानेवारीमध्ये त्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. फायनान्स सेक्टरमध्येही असेच होणे अपेक्षित आहे.”

FPI भारतीय शेअर बाजाराबाबत सावध आहेत
हिमांशू श्रीवास्तव, एसोसिएट डायरेक्‍टर (मॅनेजर रिसर्च), मॉर्निंगस्टार इंडिया यांनी सांगितले की,” FPIs सध्या भारतीय शेअर बाजाराबाबत सावध दृष्टिकोन बाळगत आहेत.” डेट सेगमेंटविषयी बोलताना ते म्हणाले की,”FPIs भारतीय डेट मार्केटमध्ये दीर्घकाळापासून लक्षणीय गुंतवणूक करत नाहीत आणि तोच ट्रेंड अजूनही सुरू आहे.”

प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील (वय 93) यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांचे नुकतेच निधन झाले आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते.

ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील (वय 93) यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. वातावरणातील बदलामुळे तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

यापूर्वी उपचारादरम्यान प्रा. एन. डी .पाटील यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले आहे. मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नाही. दरम्यान आज त्यांची प्रकृति अधिकच खालावली. तसेच नुकतीच त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रा. एन. डी. पाटील यांचा जीवनप्रवास –

संपूर्ण नाव : नारायण ज्ञानदेव पाटील

जन्म : 15 जुलै 1929 – ढवळी ( नागाव ), जि.सांगली येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म

शिक्षण : एम.ए. ( अर्थशास्त्र ), पुणे विद्यापीठ,1955; एल.एल.बी.( 1962 ) पुणे विद्यापीठ

अध्यापन कार्य

1954- 1957 छत्रपती शिवाजी कॉलेज,सातारा येथे प्राध्यापक तसेच ‘कमवा व शिका’ या योजनेचे प्रमुख व रेक्टर.
1960 साली कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर येथे प्राचार्य
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य.
शिवाजी विद्यापीठ – पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य 1962
शिवाजी विद्यापीठ – सिनेट सदस्य 1965
शिवाजी विद्यापीठ – कार्यकारिणी सदस्य 1962-1978
शिवाजी विद्यापीठ – सामाजिकशास्त्र विभागाचे डीन 1976-1978
सदस्य, प्राथमिक शिक्षण आयोग,महाराष्ट्र राज्य 1991
रयत शिक्षण संथेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य- 1959 पासून
रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन – 1990 पासून
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ ,बेळगाव अध्यक्ष – 1985 पासून

राजकीय कार्य

1948 – शेतकरी कामगार पक्षात प्रवेश
1957 – मुंबई गिरणी कामगार संघटनेचे सरचिटणीस
1960-66,1970-76,1976-82 अशी 18 वर्षे महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य
1969- 1978, 1985 – 2010 – शे.का.प.चे सरचिटणीस
1978-1980 – सहकारमंत्री ,महाराष्ट्र राज्य
1985-1990- महाराष्ट्र विधानसभा सदस्य (कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधी )
1999-2002 – निमंत्रक लोकशाही आघाडी सरकार

मिळालेले सन्मान / पुरस्कार

भाई माधवराव बागल पुरस्कार – 1994
स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ,नांदेड – डी.लीट.पदवी, 1999
राष्ट्रीय बियाणे महामंडळ ( अध्यक्षपद )भारत सरकार – 1998 – 2000
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ – डी.लीट.पदवी, 2000
विचारवेध संमेलन ,परभणी अध्यक्षपद- 2001
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर – डी.लीट.पदवी
शाहीर पुंडलिक फरांदे पुरस्कार

Video म्हैशीचा चक्क 31 वा वाढदिवस : बॅंनरसह वाजत, गाजत सामाजिक उपक्रमांनी साजरा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

असं म्हटलं जातं ज्या माणसाच्या मनात प्राण्यांविषयी प्रेम आहे ती माणसं आपल्या पाळीव प्राण्यांना जिवापाड जपतात पोटच्या मुलांप्रमाणे आपल्या जनावरांचे संगोपन करतात. आजकाल आपण अनेक पाळीव प्राण्यांचा वाढदिवस साजरा करताना पाहिले. असाच एक प्रसंग सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात घडलाय धामणेर गावात पाळीव म्हशीच्या अनोखी वाढदिवसाची चर्चा जोरात रंगली आहे. म्हशीच्या वाढदिवासाला चक्क बॅंनरही लावण्यात आला होता.

संतोष क्षीरसागर हे दरवर्षी 16 जानेवारीला आपल्या म्हशीचा वाढदिवस साजरा करतात. म्हशीमुळे क्षीरसागर यांच्या घरात भरभराटी आल्याचे ते सांगतात. त्यामुळे त्यांनी म्हशीचे नाव “राणी लक्ष्मी ” ठेवलेले आहे. आपल्या लाडक्या म्हशीचा 31 वा वाढदिवस साजरा करताना मालकाचे डोळे अक्षरशा पाण्याने भरुन आले. संतोष क्षीरसागर यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. संतोष क्षीरसागर यांच्या म्हशीच्या वाढदिवसाला तरुण युवकवर्ग, महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

https://twitter.com/Princy_Vishu/status/1482967056522055686

आपल्या म्हशीच्या वाढदिवसासाठी गोठ्यासमोर रांगोळी काढून, म्हशीला ओवळून, शिंग वाजवून केक कापून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांनी या वाढदिवसानिमित्त कातकरी समाजाच्या मुलांना, ऊस तोडणी मजूराच्या मुलांना खाऊ वाटप केले. शेवटपर्यंत आईची सेवा केली जाते. तशीच आपल्या पाळीव जनावरांची सेवा करत राहणार अशी, भावना संतोष क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार; हायकोर्टाने फेटाळला अटकपूर्व जामीन

Nitesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संतोष परब हल्ल्याप्रकरणी अडचणीत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांना हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. राणे कुटुंबियांसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे याना याप्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे अज्ञातवासात असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मुंबईत तर शिवसैनिकांकडून राणे यांच्याविरोधात पोस्टरबाजी देखील करण्यात आली होती. आता हायकोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्या नंतर अटक होऊ शकते.

नेमकं काय आहे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या प्राणघातक हल्ला झाला. प्रकरणी पोलिसांना चौघांना अटक केली आहे. संतोष परब यांनी हल्लेखोरांनी नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केल्याचा आरोप केला आहे. त्यांनतर पोलीस नितेश राणे यांना शोधत आहेत.

HDFC बँकेच्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले, तज्ञांकडून गुंतवणूक धोरण समजून घ्या

HDFC Bank

मुंबई । HDFC बँकेचे तिसऱ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. बँकेचा नफा 18% वाढून 10342 कोटींवर पोहोचला आहे. तसेच, asset quality मध्येही सुधारणा होत आहे. बँकेची कर्जवाढ गेल्या 6 तिमाहीत सर्वोत्तम राहिली आहे. याशिवाय, जानेवारीच्या मालिकेत स्टॉक 6% वर चढला आहे. वार्षिक आधारावर, डिसेंबर 2021 तिमाहीत बँकेचा नफा 10,342.2 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न वाढून 18,443.48 कोटी रुपये झाले आहे.

HDFC बँकेबाबत जेपी मॉर्गन यांचे मत
जेपी मॉर्गनने HDFC बँकेला ओव्हरवेट रेटिंग दिले आहे आणि शेअरचे टार्गेट 2100 रुपये निश्चित केले आहे. ते म्हणतात की,” 2023 च्या आर्थिक वर्षात त्याचे निव्वळ व्याज मार्जिन आणखी वाढू शकते. त्याचे मूल्यांकन दीर्घ चक्रापेक्षा कमी आहे आणि P/B आणि P/E स्तर आकर्षक आहेत.”

HDFC बँकेबाबत CLSA चे मत
CLSA ने HDFC बँकेला बाय रेटिंग दिले आहे आणि स्टॉकचे टार्गेट 2025 रुपये निश्चित केले आहे. ते म्हणतात की,” तिसऱ्या तिमाहीत asset quality चांगली होती तर स्मॉल कोर फी अपेक्षेपेक्षा कमी होती.मॅनेजमेंटच्या कॉमेंट्रीनुसार, रिटेल आणि कमर्शियल ग्रोथ यापुढे मजबूत राहील. FY22-24 साठी CAGR 18% कमाईचा अंदाज आहे.

HDFC बँकेबाबत MACQUARIE चे मत
MACQUARIE ने HDFC BANK वर रेटिंगपेक्षा जास्त कामगिरी केली आहे आणि शेअरसाठी Rs.2005 चे टार्गेट आहे. ते म्हणतात की,” तिमाहीचे निकाल अंदाजानुसार होते आणि त्यात कमी तरतुदींची भूमिका चांगली होती. त्याची कमकुवत PPoP Growth काळजी करण्यासारखे काही नाही. बँकिंग क्षेत्रातील ही आमची सर्वोच्च निवड आहे.”

HDFC बँकेबाबत Nomura चे मत
Nomura ला HDFC बँकेवर बाय रेटिंग आहे आणि शेअरसाठी 1955 रुपयांचे टार्गेट आहे. यामध्ये रिकव्हरी सुरूच राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याची एसेट क्वालिटी होल्डिंग चांगली असेल.

HDFC बँकेवर CS चे मत
CS ने HDFC बँकेला आउटपरफॉर्म रेटिंग दिले आहे आणि स्टॉकसाठी 1950 रुपयांचे टार्गेट ठेवले आहे. ते म्हणतात की,”ग्रोथ रिकव्हरी होईल आणि एसेट क्वालिटी चांगली होईल. चांगले परिणाम देण्यासाठी बँक चांगल्या स्थितीत आहे. त्यांनी FY22-24 साठी EPS अंदाज 1 टक्क्यांनी वाढवला आहे.”

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात वाढ, आजचा भाव तपासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज, ट्रेडिंगच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीमध्ये तेजीचा कल दिसून येतो आहे. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचा भाव 66 रुपयांनी वाढला, तर चांदीही 99 रुपयांनी प्रति किलोने वाढली.

MCX वर फेब्रुवारीच्या डीलसाठी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 66 रुपयांनी वाढून 47,844 रुपयांवर पोहोचला. एप्रिल महिन्याच्या करारासाठी सोन्याची किंमत 47,953 रुपये आहे. येथेही सोन्याच्या दरात 67 रुपयांची उसळी आहे.

चांदीबद्दल बोलायचे झाल्यास, मार्चच्या करारासाठी, MCX वर चांदीची किंमत 98 रुपयांनी वाढून 61701 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार सोन्याचे दर खालीलप्रमाणे :

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,440 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 48,960 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,100 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,100 रुपये

सोन्याची शुद्धता कशी तापासाल?
साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

सोन्याच्या दरात दुप्पटीने वाढ होऊ शकते
सोन्याच्या दरात पुढल्या वर्षी दुपटीने वाढ होऊ शकते असा अंदाज काही तज्ञ व्यक्त करत आहेत. येणाऱ्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 47,100 रुपये
पुणे – 46,440 रुपये
नागपूर -47,100 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्रति 10 ग्रॅम चे दर) :
मुंबई – 49,100 रुपये
पुणे -48,960 रुपये
नागपूर – 49,100 रुपये

PolicyBazar वेबसाइटनुसार 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 22 Carat Gold Yesterday 22 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4645.00 Rs 4646.00 0.022 %⌃
8 GRAM Rs 37160 Rs 37168 0.022 %⌃
10 GRAM Rs 46450 Rs 46460 0.022 %⌃
100 GRAM Rs 464500 Rs 464600 0.022 %⌃

 

PolicyBazar वेबसाइटनुसार 24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Gram 24 Carat Gold Yesterday 24 Carat Gold Today Daily Price Change
1 GRAM Rs 4897.00 Rs 4898.00 0.02 %⌃
8 GRAM Rs 39176 Rs 39184 0.02 %⌃
10 GRAM Rs 48970 Rs 48980 0.02 %⌃
100 GRAM Rs 489700 Rs 489800 0.02 %⌃