Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2931

कोरोना काळात गंगेत वाहून गेलेले मृतदेह तुम्हांला मतदान करणार आहेत का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर तोफ डागली आहेत. करोना काळात गंगेत वाहून गेलेले मृतदेह त्यांना मतदान करणार आहेत का? असा टोला राऊतांनी लगावला आहे.

उत्तरप्रदेश मध्ये अराजकता आहे. कोरोना काळात गंगा नदीत लोकांचे मृतदेह आपण पहिले आहेत तरीही भाजपला वाटत असेल कि आम्हाला ३०० पेक्षा जास्त जागा मिळतील तर त्यांना काय गांगेतील मृतदेह मतदान करणार आहेत का अशी टीका संजय राऊत यांनी केली, जिवंत लोक तर भाजपला कधीही मतदान करणार नाहीत असेही राऊत यांनी म्हंटल

दरम्यान, अखिलेश यादव यांनी देखील आपले संपूर्ण लक्ष निवडणुकीवर केंद्रीत केले पाहिजे आणि सर्वांना सोबत घेऊन लढाई लढली पाहिजे असा सल्ला संजय राऊत यांनी दिला. लोक फार मोठ्या अपेक्षेने अखिलेश यांच्याकडे पाहत आहेत. अखिलेश, काँग्रेस आणि अन्य भाजपविरोधी पक्ष्यात परिवर्तनाची ताकद असून त्यांना मिळूनच लढावे लागेल असेही राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा प्रजासत्ताक दिन आता काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली आहे. 26 जानेवारी 2022 म्हणजेच प्रजासत्ताक दिवस आणि पंजाब विधानसभा निवडणुकी आधी खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने धमकी दिली असून 26 जानेवारीला नरेंद्र मोदींना रोखणार असल्याचे खलिस्तानी समर्थकाने म्हटले आहे.

26 जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात येणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांना धमकी देण्याचा प्रकार सिख फॉर जस्टिस यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ एसएफजे प्रमुख गुरुपतवंत सिंह पन्नू यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ अजय शेरावत यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत 26 जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्लॉक करा अन् तिरंग्याऐवजी खलिस्थानी झेंडा फडकवा. तसेच पंतप्रधान मोदी यांचा ताफाही इंडिया गेटवर जाण्यापासून रोखणार आहे. दरम्यान ‘सिख फॉर जस्टिस’ने वकिलांनाही धमकी दिली असून काही वकिलाची यादी तयार करणार असल्याचे म्हंटले आहे.

‘सिख फॉर जस्टिस’ने भारतातील लोकांना भडकावण्यासाठी 2,50,000 अमेरिकन डॉलरचे बक्षीस घोषीत केले होते. दि. 5 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेची त्रृटी यांच्यामुळेच झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान दि. 3 जानेवारी रोजी सिख फॉर जस्टिस यांनी एक व्हिडीओ जारी करत पंजाबमधील शेतकऱ्यांना भडकावले होते.

दोन दुचाकींच्या धडकेत पादचारी नर्सचा गर्भपात

Accident

औरंगाबाद – चिखलठाण्याजवळ गुरुवारी रात्री झालेल्या एका विचित्र अपघातात एका पादचारी परिचारिकेचा गर्भपात झाला. ही परिचारिका खाजगी रुग्णालयात काम करते.

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, दोन दुचाकी परिचारिकांना धडक दिल्याने या परिचारिकेचा गर्भपात झाला. हा अपघात 13 जानेवारीला रात्री नऊ वाजेच्या सुमारास जालना रोडवरील विमानतळाजवळ झाला. मुकुंदवाडी येथील एंडोवर्ल्ड हॉस्पिटल मधील दोन परिचारिका काम संपवून घराकडे पायी जात होत्या. त्यावेळी विचित्र पद्धतीने भरधाव वाहन चालवणाऱ्या दोन दुचाकी (एमएच 20 ईझेड 1981) आणि (एमएच 20 ईपी 0730) स्वारांनी परिचारिकांना धडक दिली.

या अपघातात एका परिचारिकेचा पाय फ्रॅक्चर होऊन गर्भातील नवजात शिशुचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक शिवाजी चौरे करत आहेत.

Share Market : आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंगच्या दिवशी बाजाराची सावध सुरुवात

नवी दिल्ली । आठवड्याच्या पहिल्याच ट्रेडिंगच्या दिवशी बाजाराने सपाट पातळीवर सुरुवात केली आहे. बाजार उघडल्यानंतर सेन्सेक्स 52.77 अंकांच्या किंवा 0.09 टक्क्यांच्या वाढीसह 61,275.80 च्या पातळीवर दिसत आहे. दुसरीकडे, निफ्टी 17.35 अंकांनी किंवा 0.10 टक्क्यांनी वाढून 18,273.10 च्या पातळीवर दिसत आहे.

ONGC, Hero MotoCorp, IOC, टाटा मोटर्स आणि अदानी पोर्ट्स हे निफ्टीमध्ये टॉप गेनर्स ठरले आहेत. तर एचसीएल टेक्नॉलॉजी, टायटन कंपनी, एक्सिस बँक, सिप्ला आणि अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांना टॉप लुझर्स ठरले आहे.

NSE वर F&O बंदी अंतर्गत येणारे स्टॉक
17 जानेवारी रोजी, 4 स्टॉक्स NSE वर F&O बंदी अंतर्गत आहेत. यामध्ये एस्कॉर्ट्स, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, व्होडाफोन आयडिया आणि सेलच्या नावांचा समावेश आहे. सिक्योरिटीजच्या पोझिशन्सने त्यांच्या मार्केट वाइड पोझिशन मर्यादेपेक्षा जास्त असल्यास F&O विभागामध्ये समाविष्ट केलेले स्टॉक्स बंदी श्रेणीमध्ये ठेवले जातात.

14 जानेवारी रोजी विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत 1598.20 कोटी रुपयांची विक्री केली. त्याच वेळी, या दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 371.41 कोटी रुपयांची खरेदी केली.

मार्केट कॅप
गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्सच्या टॉप 10 कंपन्यांपैकी 8 कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 2,34,161.58 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, इन्फोसिस आणि टीसीएसला सर्वाधिक फायदा झाला आहे.गेल्या आठवड्यात बीएसईचा 30 शेअर्सचा बेंचमार्क 1,47.38 अंकांनी म्हणजेच 2.47 टक्क्यांनी वाढला आहे.

HDFC बँक: Q3 चा निकाल चांगला, नफा 18% वाढला
एचडीएफसी बँकेचे निकाल तिसऱ्या तिमाहीत अपेक्षेपेक्षा चांगले होते. नफा 18% वाढून 10 हजार 342 कोटी झाला आहे. त्याच वेळी, कर्जाच्या वाढीमध्ये आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत चांगली सुधारणा झाली आहे. 6 तिमाहीत कर्जाची वाढ सर्वोत्तम राहिली आहे. जानेवारीच्या मालिकेत स्टॉक 6% वाढला आहे.

जागतिक बाजारपेठ
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी जागतिक बाजार मंदीचे संकेत देत आहेत. आशियामध्ये सुरुवातीची कमजोरी दिसून येत आहे. SGX निफ्टी आणि डाऊ फ्युचर्स देखील कमी ट्रेड करत आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजार संमिश्र होते. आज अमेरिकन बाजार बंद राहतील.

आशियाई बाजारात संमिश्र ट्रेडिंगचे संकेत आहेत. आज चीनच्या जीडीपीवर बाजाराची नजर असेल. चीनचा विकास दर मंदावण्याची अपेक्षा आहे. निर्बंध आणि कोलमडलेल्या रिअल्टी क्षेत्राचा परिणाम चीनच्या जीडीपीच्या आकडेवारीवर दिसून येतो. दरम्यान, ओमिक्रॉनचा वेग वाढला असून तो बीजिंगपर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे, गेल्या आठवड्यातील बाजाराच्या हालचालींबद्दल बोलायचे झाले तर, शुक्रवारी अमेरिकन बाजारात संमिश्र व्यवसाय होता. निकालानंतर बँकिंग शेअर्सवर दबाव आला आणि ते घसरले. आज अमेरिकन बाजार बंद राहणार आहेत. अमेरिकन दिग्गजांचे निकाल या आठवड्यात येतील. BoA, Goldman Sachs, MS, P&G आणि Netflix चे निकाल या आठवड्यात जाहीर होतील.

टेस्ट, बाधित कमी : सातारा जिल्ह्यात पाॅझिटीव्ह रेट 30 टक्क्यांवर

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणीत रिपोर्टमध्ये 793 जण बाधित आढळले आहेत. रात्री आलेल्या तपासणी अहवालात तपासणी व बाधित कमी असून कोरोना पाॅझिटीव्ह रेट वाढलेला आहे. कोरोनाचा पाॅझिटीव्ह रेट 29.23 टक्क्यांवर गेल्याने चितेंचे वातावरण कायम असून ते वाढताना दिसत आहे.

गेल्या चोवीस तासात सातारा जिल्ह्यात 2 हजार 713 लोकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 793 लोक बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालात पाॅझिटीव्ह रेट 29. 23 टक्के आला आहे. रविवारी दिवसभरात 365 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्याचा बाधितांचा आकडा सध्या 2 लाख 59 हजार 385 एवढा झाला आहे.

सातारा जिल्ह्यात आजपर्यंत 2 लाख 46 हजार 468 जण कोरोनामूक्त झाले. तर आज पर्यंत 6 हजार 512 जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 24 लाख 33 हजार 135 जणांचे नमूने घेण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यात 4 हजार 573 अॅक्टीव रूग्ण आहेत. सध्या 5 रूग्ण गंभीर असून 215 रूग्ण विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत.

प्रा. एन. डी. पाटील यांची प्रकृती चिंताजनक !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील (वय 93) यांची प्रकृती बिघडली असल्याने त्यांना  खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांची प्रकृतीची स्थिती पाहता ते उपचारास फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती मिळाली आहे. प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

ज्येष्ठ विचारवंत आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणारे लढवय्ये नेते प्रा. एन. डी .पाटील (वय 93) यांना काल कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रकृती चिंताजनक बनली आहे. दरम्यान डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.

प्रा. एन. डी .पाटील यांची वातावरणातील बदलामुळे तब्येत बिघडल्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले आहेत. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले आहे. मागच्या दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नाही. ते उपचारास फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

उत्पल पर्रीकर अपक्ष लढल्यास काँग्रेस,आप आणि तृणमूलने त्यांना पाठिंबा द्यावा; राऊतांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर याना भाजपकडून विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता कमी असून ते वेळप्रसंगी अपक्ष लढण्याची शक्यता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना उत्पल पर्रीकर यांच्या विरोधात उमेदवारी न देण्याचे आवाहन केलं आहे

याबाबत संजय राऊत यांनी ट्विट करत म्हंटल की, गोवा विधानसभा निवडणुकीत उत्पल पर्रीकर जर अपक्ष निवडणूक लढणार असती तर तर मी आम आदमी पक्ष , काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस याना आव्हान करतो कि त्यांनी उत्पल पर्रीकर यांच्या उमेदवारीला पाठिंबा देऊन त्याच्या विरोधात कोणताही उमेदवार उभा करू नये. मनोहर पर्रीकर यांना हीच खरी श्रद्धांजली असेल असेही राऊत यांनी म्हंटल

मनोहर पर्रीकर हे भाजपचे मोठे नेते होते पण त्यांच्या मृत्यूनंतर भाजपने त्यांच्या कुटुंबाशी वैर घेतलं आहे. उत्पल पर्रीकर यांची लायकी आणि कर्तृत्त्व काढून त्यांचा अपमान भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे जरी भाजपने उत्पल पर्रीकर याना तिकीट दिले नाही तर सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा आणि त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन संजय राऊत यांनी भाजपविरोधी पक्षांना दिले

‘नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है’; वडेट्टीवारांचे पडळकरांना प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओबीसी राजकीय आरक्षणासदंर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी काल राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्यावरून मंत्री विजय वडेट्टीवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरटीका केली होती. त्यांच्या टीकेला मंत्री वडेट्टीवार यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. “पडळकर अजून नवे आहेत, नव्या पक्षाप्रमाणे ते फडफडत आहेत. ‘नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है,” असा टोला वडेट्टीवारांनी लगावला आहे.

मंत्री वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टातून ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात येणारा निकाल हा ओबीसींच्या बाजूने लागेल, असा विश्वास आहे. काल राज्य मागासवर्ग आयोगाच्या मुद्दय्यावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली. त्यांच्याबाबत सांगायचे झाले तर ‘नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है’. ज्या व्यक्तीवर लुटमारीचे, फसवणुकीचे, लोकांची शेती चोरल्याचे असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अशा माणसाबद्दल काही बोलायचे नाही. ते नवे आहेत.

गोपीचंद पडळकर हे एका नव्या पक्षाप्रमाणे फडफडत आहेत. आम्ही पडळकरांच्या खात्यात पाच कोटी दिले आहेत. तरीही ते पैसे कमी मिळाले असल्याचे सांगत आहेत. आता आम्ही दिलेल्या पैशाचे काय करायचं हा पडलकरांचा अधिकार आहे. त्यांना परवानची काही गरज नाही. अर्धवट माहितीच्या आधारे पडळकर बोलत आहेत,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

मराठी पाट्यांवरुन शिवसेना-एमआयएममध्ये जुंपली

Imtiaj jaleel,

औरंगाबाद – ज्या सरकारने सर्व पाट्या मराठीतून असाव्यात असा निर्णय घेतला आहे. यावरून शिवसेना, मनसे, एमआयएममध्ये जुंपली असून, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खासदार निधीतून मराठी पाटील आणण्यासाठी पुढाकार घेण्याचा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

शिवसेना मनसेमध्ये पाट्यांचे श्रेय घेण्यासाठी जोरदार स्पर्धा लागली आहे. त्यात एमआयएमने देखील उडी घेत, सरकारने पाट्या मराठीतून करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. त्यावर शिवसेनेचे खासदार निधी वापरण्याचा सल्ला दिला आहे. शहरात मनसेने मराठी पाट्या असणाऱ्या दुकानदारांना गौरवपत्र देऊन सन्मान करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यात शिवसेनेने देखील जुन्या स्टाइलने आक्रमक पणे दुकानदारांना मराठीतून पाठवा लावण्याची तंबी दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठी भाषेचे जतन करून तिच्या संवर्धनासाठी व मुलांवर बालवयातच भाषेचा संस्कार व्हावा या उद्देशाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तातडीने दुकानदारांनी स्वतःहून अंमलबजावणी करावी; नसता मराठीतून पाट्या लावण्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेईल असा इशारा शिवसेनेचे पूर्व विधानसभा संघटक राजु वैद्य यांनी दिला आहे.

भाषेच्या संवर्धनासाठी भाषेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. शिवसेनेने सुरुवातीपासून मराठी भाषेतून पाट्या लावण्याची मागणी केलेली आहे. मराठी भाषा संवर्धन विभागाने दुकानांना मराठीतूनच पाट्या लावण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीतून पाट्या लावण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आता दुकानदारांनी पुढाकार घ्यावा मराठीतून पाट्या लावण्याचे कारवाई करावी; नसता शिवसेना आक्रमक होऊन दुकानांवरील पाट्या मराठीतून लावण्याची मोहीम हाती घेईल, असे राजु वैद्य यांनी म्हटले आहे.

नाडे गावात पुन्हा चोरट्यांची दहशत : एका रात्रीत सलग तीन घरफोड्या

पाटण | तालुक्यातील नाडे गावात एकाच रात्री सलग दोन घरफोड्या करून भावाला धारदार हत्यारांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन घरी पाहुणी आलेल्या बहीणीच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्यांच्या ऐवज सोन्याची चोरी केल्याच्या घटनेला अद्याप एक माहिना ही पूर्ण झाला नाही. अशातच शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा सलग तीन बंद घरे फोडण्याची घटना घडली. त्यामुळे एकाच महिन्यात सलग दोन वेळा चोरट्यानी नाडे परिसर टार्गेट केल्यामुळे नाडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे पोलिसांपुढे मात्र एक आव्हान निर्माण झाले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाडे पूर्व पांढरवाडी येथील हिराजी शंकर कारंडे, दत्ताजी गोविद कारंडे आणि यशवंत बंडू कारंडे हे कामानिमित्त मुंबई येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मात्र यांची मूळ घरे नाडे -पांढरवाडी येथे आहेत. घरांतील सर्वजण मुंबईला राहत असलेमुळे पांढरवाडी येथील यांची तीन ही घरे बंद असतात. नेमका याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यानी पाळत ठेवून वरील तिन्ही ही बंद घरांचे दरवाजे, गेट कटावणीने फोडून शुक्रवारी मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास हिराजी कारंडे आणि दत्ताजी कारंडे यांच्या घरात प्रवेश केला घरांचे कुलूपे फोडून चोरट्यानी कपाटे उचकटली. मात्र यामध्ये काहीही हाताला लागले नसल्याने चोरटे पसार झाले. दरम्यान शेजारीच असलेले यशवंत कारंडे यांच्या गेटचे कुलूप फोडले. मात्र शेजारील लाईट लागल्यामुळे चोरटे तेथूनच पसार झाले.

दरम्यान या तिन्ही ही घटनेत चोरट्यांचा हाताला काहीही लागले नाही. मात्र एकाच महिन्यात घडलेल्या सलग दुसऱ्या घटनेमुळे नाडे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती मिळताच मल्हारपेठ पोलिस, नाडे ग्रामपंचायतीचे सरपंच विष्णू पवार, पोलीस पाटील अण्णा पाटील, सचिन पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मल्हारपेठ पोलिसांत कोणतीही तक्रार नोंद झाली नव्हती.