Sunday, December 28, 2025
Home Blog Page 2929

चोरटयाकडून 10 मोटारसायकल हस्तगत : सातारा शहर डी. बी. पथकाची कारवाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून मोटारसायकल चोरीच्या घटना वारंवार होत असतात. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक समीर कदम आणि कर्मचारी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 10 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी डी.बी. पथकास मार्गदर्शन करून मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे डी.बी. पथकातील पोलीस स्टाफ सातारा शहर पोलीस ठाणेचे हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मोटारसायकल चोरीबाबत एका संशयिताची माहीती मिळाल्यानंतर त्याच्यावर पाळत ठेवून त्याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर सदर संशयिताकडे गोपनिय माहितीचे व तांत्रिक पुरावाचे आधारे त्यास कौशल्यपूर्वक विचारपूस केली असता धक्कादायक माहिती मिळाली. सदर युवकाने संभाजीनगर परिसरात राहून सदर परिसरातील मोटारसायकल चोरी केलेचे सांगितले. तसेच त्याने विविध अडचणी सांगून सदरचे मोटारसायकल हे विविध ठिकाणी दिल्या असल्याचे सांगितले.

त्याप्रमाणे डी. बी. पथकाने संशयिताने चोरी केलेल्या एकूण 9 मोटारसायकल हस्तगत केलेल्या आहेत. त्यामध्ये 1 पॅशन प्रो 3 स्पेल्डर, 1 ग्रे रंगाची अॅक्टिव्हा, 1 बजाज सीटी 100, 1 डिस्कव्हर, 1 सी.डी. डिलक्स, 1 हिरो होन्डा पॅशन, 1 होन्डा शाईन मोटारसायकल आहेत. सदरच्या मोटारसायकल पैकी 9 मोटारसायकल सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतून व 1 मोटारसायकल हि भुईंज येथून त्याचे अन्य साथीदारामार्फत चोरी केली असल्याचे त्याने कबुली दिली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजय बो-हाडे, सहा पोलीस अधिक्षक आंचल दलाल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पो. ना. सुजित भोसले, पो.ना. अविनाश चव्हाण, पो.ना. पंकज ढाणे, पो.ना. ज्योतीराम पवार, पो. ना अभय साबळे, पो. ना. विक्रम माने, पो.कॉ. गणेश घाडगे, पो. कॉ. संतोष कचरे, पो. कॉ. सागर गायकवाड, पो. कॉ. विशाल धुमाळ यांनी केलेली आहे.

शाळा सुरु करण्यासाठी मेस्टा, मेसा संघटना आक्रमक

औरंगाबाद – राज्यातील शाळा सुरु करण्यासंबंधी सर्वच संस्थाचालक आणि शिक्षक संघटनांकडून जोरदार मागणी होत आहे. त्यातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संघटना असलेल्या मेस्टा आणि मेसा या दोन संघटना जास्त आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारने शाळा सुरु करण्यासाठी परवानगी द्यावी, अन्यथा कारवाई झाली तरी चालेल, आम्ही शाळा सुरु करणारच, असा इशारा या संघटनांनी दिला होता. त्यानुसार आज मेस्टा संघटनेच्या वतीने औरंगाबादच्या ग्रामीण भागातील काही शाळा सुरु करण्यात आल्या. तर मेसा संघटनेने औरंगाबादमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांसमोर निदर्शने केली.

औरंगबादमध्ये मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. काळे कपडे घालून याठिकाणी सदस्यांनी आंदोलन केले. 27 जानेवारीपर्यंत शाळा सुरु करण्याची परवानगी द्या, अन्यथा आम्ही कठोर निर्णय घेऊ, असा इशारा संघटनेने दिला आहे.

औरंगाबादमधील महाराष्ट्र इंग्रजी स्कूल ट्रस्टीज असोसिएशन अर्थात मेस्टा संघटनेने आजपासून म्हणजेच 17 जानेवारीपासून शाळा सुरु करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, ग्रामीण भागातील काही शाळा सुरु करण्यात आल्याची माहिती मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय तायडे पाटील यांनी दिली.

भारतात बनवलेल्या गाड्यांची परदेशात जोरदार विक्री; ‘या’ कंपनीच्या कारला सर्वाधिक मागणी

नवी दिल्ली । परदेशातही भारतात बनवलेल्या कारची मागणी वाढत आहे. यामुळेच 2021-22 च्या पहिल्या नऊ महिन्यांत म्हणजेच एप्रिल-डिसेंबरमध्ये भारताच्या प्रवासी वाहनांच्या निर्यातीत 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये मारुती सुझुकी इंडिया आघाडीवर असून तब्बल 1.68 लाख कारची निर्यात केली आहे.

सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या आकडेवारीनुसार, भारताने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत एकूण 4,24,037 प्रवासी वाहनांची निर्यात केली. 2020-21मध्ये यांचं गाड्यांच्या निर्यातीचा आकडा 2,91,170 एवढा होता. प्रवासी कार निर्यात 45 टक्क्यांनी वाढून 2,75,728 युनिट्सवर पोहोचली आहे. युटिलिटी वाहनांची निर्यात 47 टक्क्यांनी वाढून 1,46,688 वर पोहोचली. व्हॅनची निर्यात जवळपास दुप्पट होऊन 1,621 युनिट्स झाली. 2020-21 च्या याच कालावधीत हा आकडा 877 युनिट होता.

मारुतीने मारलं बाजी, ‘या’ देशांमध्ये करत आहे निर्यात
मारुतीने समीक्षाधीन कालावधीत 1,67,964 प्रवासी वाहनांची निर्यात केली. हे 2020-21 च्या याच कालावधीतील 59,821 युनिट्सपेक्षा जवळपास 3 पट जास्त आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत सुपर कॅरी (LCV) च्या 1,958 युनिट्सची निर्यात केली. मारुतीने प्रामुख्याने लॅटिन अमेरिका, आसियान, आफ्रिका, पश्चिम आशिया आणि शेजारील देशांमध्ये निर्यात केली आहे. आपल्या टॉप पाच निर्यात मॉडेल्समध्ये बलेनो, डिझायर, स्विफ्ट, एस-प्रेसो आणि ब्रेझा यांचा समावेश आहे.

दुसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई
निर्यातीच्या बाबतीत मारुतीनंतर ह्युंदाई मोटर इंडिया आणि किया इंडियाचा क्रमांक लागतो. ह्युंदाई मोटर इंडियाची निर्यात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत 1,00,059 युनिट्सवर होती. मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीपेक्षा हे प्रमाण 35 टक्क्यांनी जास्त आहे. त्याचप्रमाणे किआ इंडियाने समीक्षाधीन कालावधीत जागतिक बाजारपेठेत 34,341 कार निर्यात केल्या. 2020-21 च्या याच कालावधीत हा आकडा 28,538 युनिट्स होता. या कालावधीत फोक्सवॅगनची निर्यात 29,796 युनिट्सवर होती.

मेक इन इंडियामुळे निर्यात वाढण्यास मदत झाली
मारुती सुझुकीचे कार्यकारी संचालक (कॉर्पोरेट व्यवहार) राहुल भारती म्हणतात की,”दोन वर्षांपूर्वी कंपनीने निर्यातीत प्रचंड वाढ करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. या महत्त्वाकांक्षेमागे मेक इन इंडिया अंतर्गत स्थानिकीकरण आणि निर्यात वाढवण्याची वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाची रणनीती आहे.” ते म्हणाले की,” यामुळे आम्ही एप्रिल-डिसेंबर 2021-22 मध्ये 1,69,922 वाहने (PV आणि LCV) निर्यात करू शकलो. नऊ महिन्यांतील हा उच्चांक आहे.”

तिसऱ्या तिमाहीत निर्यातीतही वाढ झाली आहे
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये प्रवासी वाहनांची एकूण निर्यात 1,39,363 युनिट्सपर्यंत वाढली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ते 1,36,016 युनिट्स होते. मात्र, डिसेंबर 2021 मध्ये प्रवासी वाहनांची निर्यात घटून 54,846 युनिट्सवर आली. डिसेंबर 2020 मध्ये हा आकडा 57,050 युनिट्स होता.

क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बसू शकतो झटका; सरकार टॅक्स लावण्याची शक्यता

Online fraud

नवी दिल्ली । देशात क्रिप्टोकरन्सीबाबत सुरू असलेल्या गोंधळामुळे सरकार 2022 च्या अर्थसंकल्पात याला टॅक्सच्या कक्षेत आणण्याचा विचार करू शकते. टॅक्स एक्सपर्टचे म्हणणे आहे की, आगामी अर्थसंकल्पात विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त क्रिप्टोकरन्सीच्या विक्री-खरेदीवर टीडीएस/टीसीएसचा विचार केला जाऊ शकतो.

नांगिया अँडरसन एलएलपीचे कर प्रमुख अरविंद श्रीवत्सन म्हणतात की, अशा ट्रान्सझॅक्शना विशेष ट्रान्सझॅक्शनच्या कक्षेत आणले पाहिजे. यासह, आयकर अधिकाऱ्यांना क्रिप्टोकरन्सीच्या खरेदी आणि विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती मिळेल. सध्या जगात सर्वाधिक क्रिप्टोकरन्सी भारतात आहेत. त्यांची संख्या सुमारे 10.07 कोटी आहे.

30 टक्के दराने टॅक्स
अरविंद म्हणतात की,” क्रिप्टोकरन्सीच्या विक्रीतून मिळणारी कमाई लॉटरी, गेम शो आणि कोडी यांसारख्या 30 टक्के उच्च टॅक्स स्लॅबमध्ये मोजली पाहिजे.” एका रिपोर्टचा हवाला देत ते म्हणाले की,”2030 पर्यंत भारतीयांची क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक $24.1 कोटीं पर्यंत वाढू शकते.”

प्रतिगामी टॅक्स व्यवस्था
ते म्हणाले की,”संसदेच्या हिवाळी अधिवेशनात क्रिप्टोकरन्सीचे रेग्युलेशन करण्यासाठी विधेयक मांडले जाणे अपेक्षित होते. मात्र, ते मांडले गेले नाही. आता हे विधेयक सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात आणू शकते, अशी अपेक्षा आहे. जर सरकारने भारतीयांना क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यापार करण्यास मनाई केली नाही, तर आम्ही अपेक्षा करतो की सरकार यासाठी प्रतिगामी टॅक्स व्यवस्था आणू शकेल.”

खरेदी आणि विक्री दोन्हीचे निरीक्षण करणे
अरविंद म्हणतात की,”क्रिप्टोकरन्सीवरील कर आकारणीत बाजाराचा आकार, त्यात गुंतवलेली रक्कम आणि जोखीम यानुसार काही बदल केले जाऊ शकतात. त्यांना स्रोतावर कर वजावट (TDS) आणि स्रोतावर कर गोळा (TCS) च्या कक्षेत आणले जाऊ शकते.” ते म्हणाले की,”क्रिप्टोकरन्सीची विक्री आणि खरेदी या दोन्ही गोष्टी फायनान्शियल ट्रॅन्झॅक्शन स्टेटमेंट (SFT) च्या कक्षेत आणल्या पाहिजेत. असे केल्याने त्यांच्यावर लक्ष ठेवता येते.”

Budget 2022: 80C अंतर्गत जीवन विम्यासाठी स्वतंत्र विभाग केला जाऊ शकतो

Life Insurance

नवी दिल्ली । कोरोना महामारीच्या काळात पुढील महिन्यात सादर होणार्‍या सर्वसाधारण अर्थसंकल्प 2022 मध्ये लोकांसह उद्योगालाही मोठ्या आशा आहेत. जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार या अर्थसंकल्पात अनेक पावले उचलू शकते. या अंतर्गत, 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणार्‍या अर्थसंकल्पात आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत जीवन विम्यासाठी स्वतंत्र टॅक्स बकेट तयार करता येईल. ग्राहकांच्या हितासाठी एन्युटीला टॅक्स फ्री (Tax Free Annuity) करू शकते.

2022-23 च्या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने, जीवन विमा उद्योगाने सरकारला जीवन विम्याच्या प्रीमियमसाठी स्वतंत्र बकेट तयार करण्याचे आणि 80C अंतर्गत दिलेल्या सूटमध्ये विमाधारकांसाठी पेन्शन लाभ (वार्षिक) टॅक्स फ्री करण्याचे सुचवले आहे. करमाफीची 1.50 लाख रुपयांची मर्यादा कमी होत आहे, अशी मागणी आधीच होत आहे. सरकारने त्यात वाढ करावी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2022 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

कर सवलतीचा लाभ फक्त स्वतंत्र बकेट मधूनच मिळेल
Ageas Federal Life Insurance चे CMO आणि उत्पादन प्रमुख कार्तिक रमन, सांगतात की, कर सवलतीसाठी रु. 1.50 लाख बकेट सध्या खूप गोंधळलेले आहे. लाइफ इन्शुरन्सच्या माध्यमातून करमाफीचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी यामध्ये फारसा वाव नाही. 80C मर्यादा रु. 1.50 लाख असल्याने सवलतीच्या बाबतीत आपल्याला कर लाभांसाठी एक वेगळी बकेट हवी आहे. वास्तविक, सर्व काही या अंतर्गत येते, कारण PPF हा त्याचा एक भाग आहे. कोणाकडे होम लोन असेल तर ते यातून पूर्ण होते. त्यामुळे करमाफीसाठी जीवन विम्यात गुंतवणूकीची वेगळी रक्कम ठेवावी.

खर्च वाढल्याने कर लादणे योग्य नाही
जीवन विम्याव्यतिरिक्त, उद्योगाने आपल्या बजेट शिफारशींमध्ये एन्युइटी उत्पादनांना कर सूट अंतर्गत आणण्याची विनंती केली आहे. यावेळी पेन्शन उत्पादनांना पगार म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्यावर कर आकारला जातो. मात्र, हे सामान्यतः त्यांच्यासाठी उपलब्ध आहे जे त्यांच्या उत्पन्नाच्या नियमित स्रोतातून बाहेर गेले आहेत आणि वार्षिक उत्पन्नाचा पर्यायी स्रोत म्हणून विचार करतात. कार्तिकने सांगितले की, जीवनशैलीवर होणारा खर्च सातत्याने वाढत आहे. अशा स्थितीत एन्युइटी कर लावणे योग्य नाही. कलम 10D अंतर्गत एन्युइटीचा विचार करून ते करमुक्त करण्याचे सरकारला आवाहन आहे. या अंतर्गत, बोनससह जीवन विम्याच्या फायद्यांवर कर सूट दिली जाते.

1.50 लाख रुपयांची मर्यादा घसरली
कार्तिकने सांगितले की 80C ची पूर्ण मर्यादा 1.50 लाख रुपये आहे. या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या योजनांमुळे मर्यादा कमी होत आहे. आयुर्विमा ही एक महत्त्वाची गुंतवणूक आहे आणि महामारीच्या प्रभावाची तीव्रता लक्षात घेऊन करात सूट देणे आवश्यक आहे. यामुळे लोकं जीवन विमा घेण्यास प्रवृत्त होतील. जीवन विम्याशी संबंधित करात सूट देण्यासाठी सरकारने वेगळी तरतूद करावी अशी आमची इच्छा आहे कारण पूर्वीच्या तुलनेत अनेक प्रकारच्या कर्जात वाढ झाली आहे आणि खर्चही वाढला आहे. त्याच वेळी, 80C मध्ये सूट केवळ 1.50 लाख रुपयांपर्यंत आहे.

‘या’ महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांचा विस्फोट सुरूच, चोवीस तासांत तब्बल 431 जण पॉझिटिव्ह

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे 

जिल्ह्यात कोरोनाची कहर कमी होताना दिसत नाही. कडक्याची पडणारी थंडी त्यातच साथीच्या रोगांमुळे कोरोना जोरदारपणे बळावत आहे. रविवारी गेल्या चोवीस तासांत नव्याने तब्बल 431 जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी महापालिका क्षेत्रातील 143 रुग्णांचा समावेश आहे. अ‍ॅक्टीव्ह रुग्णसंख्या अडीच हजाराचा आकडा पार केला.

एका रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाधित रुग्णापैंकी 130 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली. तसेच आटपाडी 07, कडेगाव 06, खानापूर 23, पलूस 6, तासगाव 55, जत 17, कवठेमहांकाळ 02, मिरज 39, शिराळा 01 आणि वाळवा तालुक्यात 29 रुग्ण आढळले.राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट आली असताना सांगली जिल्ह्यात रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.

महानगरपालिका क्षेत्रासह वाळवा, मिरज आणि तासगाव तालुक्यातील रुग्णांत झपाट्याने वाढ सुरुच असल्याचे रविवारी पुन्हा स्पष्ट झाले. गेल्या चोवीस तासांत कोरोना संयशित असलेल्या रुग्णांच्या आरटीपीसीआर चाचण्या 1277 पैकी 244 बाधित तर 905 अँन्टीजेन चाचणीमध्ये 200 जण बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही चाचण्यांमध्ये 431 जण पॉझिटिव्ह आढळले.

कौतुकास्पद ! इस्लामपुरातील तरुणाने बनवली शेतीसाठीपूरक चारचाकी गाडी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

इस्लामपूर येथील कुमार पाटील या तरुणाने फॅब्रिकेशन व्यवसायातील अनुभव कौशल्य वापरून शेतीपूरक चारचाकी गाडी तयार केली आहे. दुचाकीच्या इंजिनचा वापर करत तयार केलेली चारचाकी गाडी शेतकऱ्यांना वरदा आहेत मशागतीची कामे या चारचाकी गाडीने सहज करता येत आहेत. एक वर्षाच्या मेहनतीने आलेल्या गाडीची अंतिम चाचणी आज यशस्वी झाली. तेव्हा कुमार पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. इस्लामपूर-पेठ रस्त्यावर विष्णुनगर येथे कुमार पाटील यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे.

गेली वीस वर्षे च्या माध्यमातून शेतक-यांना छोटी-छोटी सायकल कोपी व इतर लोखंडी अवजारे बनवून देत आहेत, हे असतानाच शेतकऱ्यांना उपयुक्त असे नवीन काही करता येईल का? याचा विचार त्यांनी केला. एक वर्षांपूर्वी त्यांना चारचाकी गाडीची कल्पना सुचली. चारचाकी गाडीसाठी लोखंडी साहित्य वापरताना दुचाकीचे इंजिन वापरण्याचे ठरले १०० सी सी इंजिन घेत त्यापासून चारचाकीची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. चारचाकी गाडी तयार करीत असताना स्टेरिंग ऐवजी हॅण्डलचा वापर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. चारचाकी कारप्रमाणे गिअर टाकून गाडी पाठीमागे सहज कशी घेता येईल का? यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यशही आले आहे.

इंजिन दुचाकीचे असले तरी रिव्हर्स गियरचा बॉक्स स्वतःच्या कल्पकतेने तयार केला आहे. त्यानंतर तयार गाडीला शेतीपुरक अवजारे कशी जोडता येतील ? यासाठी मित्रांशी चर्चा करून तशी अवजारे ही बनवण्यात आली. सर्वसामान्य शेतकरी वर्गाला कोळपणी, नांगरट, पेरणी तसेच औषध फवारणी या शेती कामासाठी ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. खडतर रस्त्यावर कमीत कमी जागेत सहजपणे गाडी नेता येते. त्यामुळे अरूंद जागेत गाडीचा वापर शेतीला कसा करता येईल? असा विचार केला गेलाय. शहरातून शेतातील गोठयामध्ये पशुखाद्याची पोती वाहतूक तसेच वैरणीची ने-आण करणे यासाठी सीटच्या मागे दोन्ही चाकांच्या गार्डवर तशी रचना केली आहे. अल्प वेळेत व कमी खर्चात चारचाकी गाडी काम करत असल्याने शेतकऱ्यांना ती नक्कीच वरदान ठरणार आहे.

एन. डी. पाटील यांच्या निधनाने जनहिताशी बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता हरपला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांचे आज निधन झाले. वयाच्या 94 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एन डी पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत हळहळ व्यक्त केली. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे असे शरद पवार यांनी म्हंटल.

याबाबत शरद पवार यांनी ट्विट करत म्हंटल की, डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी वर्गाप्रती आस्था असलेला, जनहिताशी अखेरपर्यंत बांधिलकी जपणारा तत्त्वनिष्ठ व निस्वार्थी नेता आज हरपला आहे. उपेक्षित लोकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी विधिमंडळातही आवाज उठवला, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी सभागृह गाजवले

शेतकरी कामगार पक्षाची धुरा निष्ठेने सांभाळणार्‍या एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची जबाबदारीही त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात तितक्याच क्षमतेने पार पाडली. संस्थेच्या वाटचालीतील त्यांचे योगदान कधीच पुसले जाणार नाही. सर्व कुटुंबियांप्रति या दुःखद प्रसंगी सांत्वना व्यक्त करतो. प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली असे शरद पवार यांनी म्हंटल.

‘शिवशाही’ ने दिवसभरात कमावून दिले दोन लाखांचे उत्पन्न

shivshahi

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी दोन महिन्यांपासून संप पुकारला आहे. प्रशासनाने संपावरील कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले, तर काही अजूनही कामावर हजर झाले नाहीत. जे हजर झाले त्यांच्या मदतीने व खाजगी शिवशाहीच्या वतीने प्रवासी वाहतूक सध्या सुरू आहे.

काल दिवसभरात पुणे मार्गावर 14 खाजगी शिवशाही चालवण्यात आल्या. या खाजगी शिवशाहींनी दिवसभरात 2 लाख 8 हजार 80 रुपयाचे उत्पन्न एसटीच्या तिजोरीत पाडून दिले.

याव्यतिरिक्त मध्यवर्ती बस स्थानकातून औरंगाबाद-बुलढाणा मार्गावर 3, औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर 5, औरंगाबाद-वैजापूर मार्गावर 1, औरंगाबाद-कन्नड मार्गावर 2, तर औरंगाबाद-पुणे मार्गावर 1 लालपरी चालवण्यात आली. तसेच औरंगाबाद-तुळजापूर 2, औरंगाबाद-नगर 1, औरंगाबाद-नाशिक 1, आणि औरंगाबाद-जळगाव मार्गावर 2 लालपरी चालवण्यात आल्या. नाशिक मार्गावर 6 खाजगी शिवशाही बस चालवण्यात आल्या.

राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ हरपलं; राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय जीवनातील अत्यंत धडाडीचे नेतृत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. “एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एन.डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं,” असे शेट्टी म्हणाले.

माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकण्यास मन तयार होत नाही.

एन. डी. पाटील हे राज्यातील चालतं बोलतं विद्यापीठ होतं. ते आंदोलनात उतरल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना दखल घ्यावी लागायची, असं राजू शेट्टी म्हणाले. टोल नाका प्रश्न, शेतकऱ्याचं आंदोलन, सीमा भागाचा लढा असेल, अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी लढा दिला, अशी प्रतिक्रिया शेट्टी यांनी दिली.

कोल्हापुरात उद्या होणार अंत्यसंस्कार

प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर उद्या, मंगळवारी कोल्हापुरातच पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थीव अत्यंदर्शनासाठी कदमवाडी परिसरातील शाहू कॉलेज येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमी येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.