Monday, December 29, 2025
Home Blog Page 2947

Share Market : सेन्सेक्सने घेतली 85 अंकांची उसळी तर निफ्टी 16250 च्या वर बंद

Stock Market

मुंबई । गुरुवारी, संमिश्र जागतिक संकेतांदरम्यान, भारतीय बाजारातही संमिश्र ट्रेड दिसून आला. दिवसभराच्या अस्थिरतेनंतर अखेर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद होण्यात यशस्वी झाले. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्स 85.26 अंकांच्या किंवा 0.14 टक्क्यांच्या वाढीसह 61,235.30 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 45.45 अंकांच्या किंवा 0.25 टक्क्यांच्या वाढीसह 18,257.80 वर बंद झाला.

गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, सन फार्मा, कोल इंडिया आणि यूपीएल निफ्टीमध्ये टॉप गेनर्स राहिले, तर विप्रो, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँक हे टॉप लुझर्स ठरले.

एका दिवसापूर्वी निफ्टी 61 हजारांच्या पुढे बंद झाला
याआधी बुधवारी सेन्सेक्स 533.15 अंकांच्या किंवा 0.88 टक्क्यांच्या वाढीसह 61,150.04 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 138.70 अंकांनी किंवा 0.77 टक्क्यांनी वाढून 18,194.45 वर बंद झाला.

Go Airlines चा IPO प्लॅन पुढे ढकलला
नुस्ली वाडिया ग्रुपने कोविड-19 ची तिसरी लाट आणि त्याचा प्रवासी व्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेऊन त्यांच्या बजट एअरलाइनGo Airlinesचा 3,600 कोटी रुपयांचा IPO आणण्याची योजना तात्पुरती पुढे ढकलली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, ग्रुपशी संबंधित अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.

आज ‘या’ कंपन्यांचे तिमाही निकाल येणार आहेत
आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी Mindtree, Tata Metaliks, Aditya Birla Money, CESC, Athena Global Technologies, Eureka Industries, Gautam Gems, GTPL Hathway, Mega Corporation, Mishtann Foods, Palm Jewels, Plastiblends India, Rotographics (India) आणि Surana Solar यांसारख्या कंपन्या आपले निकाल जाहीर करतील.

उत्तरप्रदेशमध्ये भाजपला खिंडार; अजून एका मंत्र्यांच्या राजीनाम्याने खळबळ

Yogi Modi Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश निवडणूक भाजपसाठी म्हणावी तेवढी सोप्पी राहिली नाही. आज सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मंत्र्याने राजीनामा देत पक्षाला रामराम ठोकला. उत्तरप्रदेशचे आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. धर्मसिंह सैनी यांनी राजीनामा दिला आहे. योगी सरकारसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी सरकारमधील ३ मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली होती

ज्या अपक्षेनं दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि लहान-सहान व्यापारी व छोटे उद्योजक यांनी राज्यात एकत्रितपणे भाजपचे सरकार बनिण्याचं काम केलं. मात्र, या सर्वांची आणि त्यांच्या लोकप्रतिनीधींची सातत्याने उपेक्षा होत आहे, त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं सैनी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी उत्तर प्रदेशचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान यांनी गुरुवारी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला. राज्यातील दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे. तसेच, मागास आणि ओबीसी प्रवर्गाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेय. त्यामुळे, मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतोय, असे दारासिंह यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे

ओबीसी समुदायामधील स्वामी प्रसाद मौर्य आणि दारासिंग चव्हाण यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांनी भाजपचा राजीनामा देत मोठा धक्का दिला आहे. याशिवाय अन्य चार आमदारांनी देखील भाजप सोडली आहे. भाजप सोडणाऱ्या नेत्यांनी दलित, मागास, ओबीसी समाजावर अन्याय आणि भेदभाव केल्याचा आरोप योगी आदित्यनाथ सरकारवर केला आहे.

ऐकावं ते नवलंच! स्वत:ची दुचाकी चोरल्यामुळे त्यानेही चोरली महागडी गाडी अन्…

bikes

औरंगाबाद : महिनाभरापुर्वी स्वत:ची दुचाकी चोरीला गेल्यामुळे अस्वस्थ झालेल्या तरुणाने दुस-याची महागडी दुचाकी चोरल्याचा अजबच प्रकार समोर आला आहे. पंधरा दिवसांपासून चोरीच्या दुचाकीवर फिरताना तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दुपारी एमआयडीसी वाळुज भागातील ओअ‍ॅसिस चौकातून ताब्यात घेतले. योगेश उमाजी नाईक असे त्याचे नाव आहे.

स्वत:ची दुचाकी चोरीला गेल्यामुळे दुस-याची दुचाकी चोरुन वापरत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पोलिसांनी योगेश नाईक याला पकडले. नाईकची दुचाकी वाळुज एमआयडीसीतील झलक हॉटेल समोरून २५ डिसेंबर २०२१ रोजी चोरीला गेली होती. त्यामुळे त्याने अनिल दगडू जाधव यांची महागडी दुचाकी चोरली. ही दुचाकी योगेशने स्वत: चोरल्याचे पोलिसांना सांगितले.

दरम्यान, योगेश याला अटक करत पुढील कारवाईसाठी वाळुज एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्ता शेळके, जमादार किरण गावंडे, ओमप्रकाश बनकर, नवनाथ खांडेकर, अझहर कुरेशी यांच्या पथकाने केली.

3 लाख देऊन लग्न केलं; दहाच दिवसात नववधू म्हणाली, सोडा..मला आधीच दोन..

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थामधील बाडमेर जिल्ह्यात एक विचित्र प्रकरण घडले आहे. यामध्ये बाडमेर पोलिसांनी नववधू आणि तिच्या साथीदाराला अटक केली आहे. यामध्ये लग्न जुळवून देणाऱ्या दलालाने वरपक्षाकडून तीन लाख रुपये उकळले होते. त्यानंतर वधूशी खोटे लग्न लावून दिल्याचा आरोप त्या दलालावर करण्यात आला आहे. आणि सर्वात धक्कादायक गोष्ट अशी कि ती नवविवाहित वधू आधीच विवाहित होती, आणि ती दोन मुलांची आईही आहे. असा खुलासा त्या नवविवाहित महिलेने केला आहे. लग्न झाल्यावर वधूला पंजाबमधील आपल्या मूळगावी परत नेण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र कुटुंबीयांच्या सतर्कतेमुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. यानंतर पोलिसांनी नववधूला अटक केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
राजस्थानमातील बाडमेर जिल्ह्यात राहणाऱ्या संबंधित पीडित तरुणाचे लग्न जमत नव्हते. यादरम्यान या व्यक्तीची ओळख जुझाराम याच्याशी झाली. यानंतर जुझारामने पीडित तरुणाला लग्न जुळवून देतो असे आमिष दाखवले. मात्र यासाठी तुला तीन लाख रुपये मोजावे लागतील अशी अट त्याने संबंधित पीडित तरुणाला घातली. यानंतर लग्न करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणाने आपल्या भावाशी यासंदर्भात चर्चा केली. यानंतर दोघे भाऊ पैसे देण्यासाठी तयार झाले. यानंतर 27 डिसेंबर रोजी बाडमेर न्यायालयात या तरुणाचे एका महिलेशी लग्न लावण्यात आले.

या नववधूचे नाव कोडाबाई असे असून ती मूळची पंजाबची रहिवासी आहे. लग्नानंतर 10 दिवस या नव्या जोडप्यांमध्ये सर्वकाही सुरळीत चालले होते. यानंतर काही दिवसांनी दलालाने वराच्या घरच्यांना फोन करुन सांगितले कि वधूच्या माहेरी एका नातेवाईकाचे लग्न आहे. त्यामुळे तिला काही दिवसांसाठी पंजाबला पाठवा. मात्र वधू किंवा तिच्या माहेरच्या मंडळींऐवजी दलालाने फोन केल्यामुळे पीडित तरुणाच्या कुटुंबियांना याचा संशय आला. यानंतर वराच्या कुटुंबीयांनी नववधूची खोदून-खोदून चौकशी केली. तेव्हा तिने हा सगळा प्रकार सांगितला. ‘मी आधीच विवाहित आहे, मला दोन मुलं आहेत, मला जाऊ द्या’ असा खुलासा तिने यावेळी केला. यानंतर वराचा भाऊ तिला आणि तिच्या मैत्रिणीला कोतवाली पोलिस ठाण्यात घेऊन गेला. या प्रकरणी तीन दलाल आणि नववधूवर फसवणुकीसह अनेक कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला अटक केली आहे. तसेच या दलालांचा शोध घेण्यासाठी काही पथके तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

गल्लीत निवडणूक जिंकली म्हणजे वर्ल्डकप जिंकला असं होत नाही; नवाब मलिकांची राणेंवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे त्याच्याकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर टीका केली जाते. दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीवरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. “राणेंनी पैसा आणि ताकदीच्या जोरावर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जिंकली. गल्लीत निवडणूक जिंकली म्हणजे वर्ल्ड कप जिंकला असं होत नाही,” अशी टीका मलिक यांनी राणेंवर केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, नारायण राणे हे एक केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी देशपातळीवरील निवडणुकीत लक्ष घालायला हवे. ते सोडून ते जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्ष घालत आहेत. त्यांनी उत्तर प्रदेशात 24 जागांची जबाबदारी घ्यावी आणि त्या ठिकाणी भाजपच्या जागा निवडून आणाव्यात, मग आम्हाला कळेल की ते केंद्रीय मंत्री आहेत.

गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत दिले नव्हते. काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे गोव्यात भाजपची सत्ता आली. त्यावेळी देखील जे राजकारण घडले तेच आता पुन्हा एकदा गोव्यात होत आहे. महाविकास आघडी प्रमाणे गोवा विकास आघाडी करावी,अशी आमची भूमिका असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले.

Paytm पेमेंट्स बँकेचा विक्रम, एका महिन्यात झाले 92.60 कोटींचे UPI ट्रान्सझॅक्शन

नवी दिल्ली । Paytm Payments Bank Ltd. म्हणजेच PPBL ने जाहीर केले आहे की, त्यांना एका महिन्यात 92.60 कोटी पेक्षा जास्त UPI ट्रान्सझॅक्शन मिळाले आहेत, हा टप्पा गाठणारी देशातील पहिली लाभार्थी बँक बनली आहे. यासह, PPBL देशातील सर्वात मोठी आणि वेगाने वाढणारी UPI लाभार्थी बँक म्हणून आपले स्थान मजबूत करत आहे.

सर्वात मोठी UPI लाभार्थी बँक राहिली आहे
ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या तिमाहीत, Paytm पेमेंट्स बँकेने 2020 च्या याच तिमाहीत 96.49 कोटी लाभार्थी ट्रान्सझॅक्शनच्या तुलनेत एकूण 250.74 कोटी लाभार्थी ट्रान्सझॅक्शनची नोंद केली. त्यात वार्षिक 159.85 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ती वर्षभरात (मे 2021 वगळता) सर्वात मोठी UPI लाभार्थी बँक राहिली आहे आणि दर महिन्याला वाढत आहे.

लाभार्थी बँक काय आहे ?
लाभार्थी बँका या खातेदारांच्या बँका आहेत ज्यांना पैसे मिळतात. हे ग्राहकांना त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँक खात्यांमध्ये डेलीचे पेमेंट किंवा बचतीसाठी पैसे मिळविण्याचे प्राधान्य देते.

UPI म्हणजे काय ?
UPI ही एक रिअल टाइम पेमेंट सिस्टीम आहे, जी मोबाईल अ‍ॅपद्वारे बँक खात्यात त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकते. डिजिटल पेमेंटसाठी UPI सारखी सुविधा तुम्हाला घरबसल्या सहजपणे पैसे ट्रान्सफर करू देते. यासाठी तुम्हाला फक्त पेटीएम, फोनपे, भीम, गुगल पे इत्यादी UPI सपोर्टिंग अ‍ॅप्सची गरज आहे.

UPI द्वारे, तुम्ही एकापेक्षा जास्त बँक खाते UPI अ‍ॅप्सशी लिंक करू शकता. त्याच वेळी, एका UPI अ‍ॅपद्वारे अनेक बँक खाती ऑपरेट केली जाऊ शकतात. विशेष म्हणजे तुमच्याकडे स्कॅनर, मोबाईल नंबर, UPI आयडी यापैकी एकच माहिती असली तरीही UPI तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्याची परवानगी देतो.

मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का – खासदार जलील

imtiyaj jalil
imtiyaj jalil

औरंगाबाद – असे का होते की जेव्हा-जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. लोक मुर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाही. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे, अशी खोचक टीका औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकरवर केली आहे. याविषयी ट्विट केले आहे.

बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने सर्व दुकानांच्या पाट्या मराठीत लावणे बंधनकारक असल्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यावर जलील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

पुढे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकार महाराष्ट्र वक्फ बोर्ड आणि योजनांना मदत देण्याचा निर्णय घेऊ शकते का? किंवा अल्पसंख्यांक आणि विशेषतः मुस्लिमांना त्या बदल्यात काहीही न मिळता फक्त मते द्यायची आहेत.

HDFC बँकेने आपल्या FD आणि RD वरील व्याजदरात केले बदल, नवीन दर जाणून घ्या

HDFC Bank

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेने त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट्स (FD) आणि रिकरिंग डिपॉझिट्स (RD) चे व्याजदर बदलले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर आपले दर बदलले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, हे नवे दर कालपासून म्हणजेच 12 जानेवारीपासून लागू झाले आहेत.

आज जाहीर झालेल्या बदलानंतर, HDFC बँक आता 7 ते 29 दिवसांत मॅच्युर होणाऱ्या डिपॉझिट्सवर 2.50 टक्के व्याजदर देत आहे. 30 दिवस ते 90 दिवसात मुदतपूर्ती होणाऱ्या डिपॉझिट्सवर आता सर्वसामान्यांना 3.00 टक्के व्याजदर मिळणार आहे. बिगर ज्येष्ठ नागरिकांना आता 91 दिवस – 6 महिने आणि 6 महिने 1 दिवस ते 1 वर्षात फिक्स्ड डिपॉझिट्सवर 3.50 टक्के आणि 4.40 टक्के व्याज मिळेल.

2 कोटींपेक्षा कमी रुपयांवरील व्याजदर
वेळ नियमित                               व्याज दर (% मध्ये)        ज्येष्ठ नागरिक दर (% मध्ये)
7-14दिवस                                       2.50 %                                 3.00 %
15-29 दिवस                                    2.50 %                               3.00 %
30-45 दिवस                                    3.00 %                                3.50 %
46-60 दिवस                                    3.00 %                                3.50 %
61-90 दिवस                                    3.00 %                                3.50 %
91 दिवस ते 6 महिने                          3.50 %                               4.00 %
6 महिने 1 दिवस – 9 महिने                4.40 %                                4.90 %
9 महिने 1 दिवस – 1 वर्षापेक्षा कमी      4.40 %                                4.90 %
1 वर्ष                                               4.90 %                                5.40 %
1 वर्ष 1 दिवस – 2 वर्षे                        5.00 %                                5.50 %
2 वर्षे 1 दिवस – 3 वर्षे                        5.20 %                                5.70 %
3 वर्षे 1 दिवस – 5 वर्षे                        5.40 %                                5.90 %
5 वर्षे 1 दिवस – 10 वर्षे                      5.60 %                                6.35 %

HDFC बँक रिकरिंग डिपॉझिट्स व्याज दर
HDFC बँकेतील रिकरिंग डिपॉझिट्सवरील व्याजदरातही आज बदल करण्यात आला आहे. बँक सध्या रहिवासी, NRO आणि NREs यांना 27 महिने ते 120 महिन्यांत मॅच्युर होणाऱ्या रिकरिंग डिपॉझिट्सवर खालील व्याजदर देत आहे.

वेळ व्याज दर (वार्षिक)      ज्येष्ठ नागरिकांसाठी     व्याज दर    अनिवासी भारतीयांसाठी       प्रभावी होईल
6 महिने                                         3.50 %           4.00 %                 N.A.                    25 ऑगस्ट 2020
9 महिने                                         4.40 %          4.90 %                 N.A.                     25 ऑगस्ट 2020
12 महिने                                       4.90 %          5.40 %               4.90 %                 15 ऑक्टोबर 2020
१५ महिने                                       5.00 %          5.50 %               5.00 %                    1 डिसेंबर 2021
२४ महिने                                      5.00 %           5.50 %               5.00 %                    1 डिसेंबर 2021
27 महिने                                      5.20 %           5.70 %               5.20 %                  12 जानेवारी 2022
26 महिने                                      5.20 %           5.70 %               5.20 %                   12 जानेवारी 2022
३९ महिने                                      5.40 %            5.90 %              5.40 %                    12 जानेवारी 2022
48 महिने                                      5.40 %            5.90 %              5.40 %                  12 जानेवारी 2022
60 महिने                                      5.40 %            5.90 %              5.40 %                  12 जानेवारी 2022
90 महिने                                      5.60 %            6.10 %              5.60 %                   12 जानेवारी 2022
120 महिने                                    5.60 %           6.10 %               5.60 %                   12 जानेवारी 2022

आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील; राणेंचा पुन्हा एकदा अजितदादांवर निशाणा

Narayan Rane Ajit Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत नारायण राणेनी महाविकास आघाडीला धक्का देत सत्ता काबीज केली . त्यानंतर आज ध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली असून बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली. या निवडीनंतर राणेंनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. लोकं अक्कल सांगायला इथे आली होती. आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील असा टोला राणेंनी लगावला

नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला. ११-७ ने आपण महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोठमोठी लोकं आली. फार काही बोलली. ही लोकं अक्कल सांगायला इथे आली होती. आज त्यांना अकलेचे धडे मिळाले असतील अशा शब्दांत राणेंनी अजित पवारांचा समाचार घेतला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते –

जिल्हा बँकेच्या निमित्ताने अजित पवार सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही”, असं म्हणत त्यांनी राणेंवर निशाणा साधला होता.

”फडणवीस हे स्टेजवरचे नट, राणे आणि विखे-पाटीलच भाजप चालवतात”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गोव्यात भाजपच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता परभणीतील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी प्रवेश करताच त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ‘राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे स्टेजवरचे नट आहेत. पण, खरा भाजप पक्ष नारायण राणे आणि राधाकृष्ण विखे पाटील चालवतात,” अशी टीका विजय गव्हाणे यांनी केली.

परभणीत आज त्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गव्हाणे यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, माझी राजकीय मैत्री ही प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडेंची होती. त्यामुळेच मी भाजपमध्ये गेलो. त्या पक्षात काम केले. पण, गोपीनाथ मुंडेनंतर आता ही भाजप तशी राहिली नाही. आता भाजपमध्ये बहुजन समाजातील लोकांना जागाच नाही, असे विधानही गव्हाणे यांनी केले आहे.

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्यानंतर गव्हाणे यांनी भाजपमधील नेत्यांची होत असलेली खदखद सांगून टाकली. भाजपमध्ये पंकजा ताईंचे पण हाल सुरू आहेत. त्या पक्षात का आहेत? हे माहिती नाही. त्याबाबत मी त्यांना विनंती करणार आहे. भाजपचे विचारच यामागील सूत्रधार आहे, असेही गव्हाणे यांनी यावेळी म्हंटले.

असेच चित्र गोव्यातही दिसायला लागले आहे – शरद पवार

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले ते म्हणाले की, आज एक दिवस असा जात नाही जेव्हा युपीमध्ये भाजपमधील लोक पक्ष सोडून गेले नाहीत. पक्ष सोडणाऱ्यांमध्ये मंत्री आणि आमदारांचाही समावेश आहे. गोव्यातही हे चित्र दिसायला लागले आहे. ही प्रक्रिया सुरू झाली असून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी विजयराव गव्हाणे यांनी आपला निर्णय जाहीर केला. माझ्या अंतःकरणात १४ जानेवारी हा दिवस कायम राहतो. या दिवशी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्ताराचा जो निर्णय घेतला, तो माझ्या स्वाक्षरीने झाला होता, असे पवार यांनी म्हंटले.